30-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सन शोज फादर, मनमतला सोडून श्रीमतावर चाला तेव्हाच बाबांचा शो करू शकाल’’
प्रश्न:-
१:- बाबा,
कोणत्या मुलांचे रक्षण जरूर करतात?
उत्तर:-
जी मुले सच्ची आहेत, त्यांचे रक्षण जरूर होते. जर रक्षण होत नसेल तर आतमध्ये जरूर
कोणते ना कोणते खोटे असेल. क्लास मिस करणे, संशयामध्ये येणे अर्थात आतमध्ये काही ना
काही खोटे आहे. त्यांना माया पंजा मारते.
प्रश्न:-
२:- कोणत्या
मुलांसाठी माया चुंबक आहे?
उत्तर:-
जे मायेच्या सुंदरतेकडे आकर्षित होतात, त्यांच्यासाठी माया चुंबक आहे. श्रीमतावर
चालणारी मुले आकर्षित होणार नाहीत.
ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांना बसून समजावून सांगतात, हा तर मुलांनी निश्चय केला आहे
की, रुहानी बाबा आम्हा रुहानी मुलांना शिकवत आहेत. ज्याच्यासाठीच गायन आहे -
‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’ मूलवतनमध्ये कधी वेगळे रहात नाहीत; तिथे तर
सर्व एकत्र राहतात. वेगळे राहतात तर जरूर तिथून आत्मे विभक्त होतात आणि येऊन
आपला-आपला पार्ट बजावतात. सतोप्रधानामधून उतरत-उतरत तमोप्रधान बनतात. बोलावतात -
‘पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवा’. बाबा देखील म्हणतात - मी दर ५ हजार वर्षानंतर
येतो. हे सृष्टीचे चक्रच ५ हजार वर्षांचे आहे. पूर्वी तुम्ही हे जाणत नव्हता.
शिवबाबा समजावून सांगत आहेत तर जरूर कोणत्या शरीरा द्वारे समजावत असतील. वरून कोणती
आकाशवाणी तर करत नाहीत. शक्ती अथवा प्रेरणेची कोणती गोष्टच नाही. तुम्ही आत्मा
शरीरामध्ये येऊन वार्तालाप करता. त्याचप्रमाणे बाबा देखील म्हणतात - ‘मी सुद्धा
शरीरा द्वारे डायरेक्शन देतो’. मग त्यानुसार जे जितके चालतात, तर आपलेच कल्याण
करतात. श्रीमतावर चालो अथवा न चालो, टीचरचे ऐको अथवा न ऐको, आपल्या स्वतःचेच कल्याण
अथवा अकल्याण करतात. अभ्यास केला नाही तर जरूर नापास होतील. बाबा हे देखील सांगत
राहतात की, शिवबाबांकडून शिकून मग इतरांना शिकवायचे आहे. फादर शोज सन. देहधारी
पित्याची गोष्ट नाही. हे आहेत रूहानी पिता. तुम्ही हे देखील समजता की जितके आपण
श्रीमतावर चालू तितका वारसा प्राप्त करणार. पूर्णपणे चालणारे उच्च पद प्राप्त करतील.
न चालणारे उच्च पद प्राप्त करणार नाहीत. बाबा तर म्हणतात - ‘माझी आठवण कराल तर तुमची
पापे नष्ट होतील. रावण राज्यामध्ये तुमच्यावर खूप पापे चढलेली आहेत’. विकारामध्ये
गेल्यानेच पाप-आत्मा बनतात. पुण्य-आत्मा आणि पाप-आत्मा जरूर असतात. पुण्य
आत्म्यासमोर पाप आत्मे जाऊन माथा टेकवतात. मनुष्यांना हे माहीतही नाही आहे की, देवता
जे पुण्य आत्मे आहेत, तेच मग पुनर्जन्मामध्ये येत-येत पाप-आत्मा बनतात. ते (दुनियावाले)
तर समजतात हे (देवता) सदैव पुण्य-आत्मा आहेत. बाबा सांगतात, पुनर्जन्म घेता-घेता
सतोप्रधाना पासून तमोप्रधानते पर्यंत येतात. जेव्हा एकदम पाप-आत्मा बनतात तेव्हा मग
बाबांना बोलावतात. जेव्हा पुण्य-आत्मा असतात तर आठवण करण्याची गरज राहत नाही. तर हे
तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे, सेवा करायची आहे. बाबा तर जाऊन सर्वांना
सांगणार नाहीत. सेवाकरण्या लायक मुले आहेत तर मुलांनीच जायला पाहिजे. मनुष्य तर
दिवसेंदिवस असुर बनतात. ओळख नसल्या कारणाने बकवास करायला सुद्धा वेळ लावत नाहीत.
मनुष्य म्हणतात गीतेचा भगवान श्रीकृष्ण आहे. तुम्ही सांगता - ‘तो तर देहधारी आहे,
त्याला देवता म्हटले जाते’. श्रीकृष्णाला पिता म्हणता येणार नाही. असे तर सर्वजण
पित्याची आठवण करतात ना. आत्म्यांचा पिता तर अजून दुसरा कोणता असत नाही. हे
प्रजापिता ब्रह्मा देखील म्हणतात - ‘निराकार पित्याची आठवण करायची आहे’. हे (ब्रह्मा
बाबा) झाले शारीरिक पिता. समजावून तर खूप सांगितले जाते, बरेच व्यवस्थित न
समजल्यामुळे उलटा रस्ता पकडून जंगलामध्ये जाऊन पडतात. बाबा तर रस्ता सांगतात
स्वर्गामध्ये जाण्याचा. तरी देखील जंगलाच्या दिशेने निघून जातात. बाबा समजावून
सांगतात की, तुम्हाला जंगलाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे - रावण. तुम्ही मायेकडून
हार खाता. रस्ता विसरून जाता त्यामुळे मग त्या जंगलाचे काटे बनता. ते मग
स्वर्गामध्ये उशिराने येतील. इथे तुम्ही आलेच आहात स्वर्गामध्ये जाण्याचा पुरुषार्थ
करण्यासाठी. त्रेताला देखील काही स्वर्ग म्हणणार नाही. २५ टक्क्यांनी कमी झाले ना.
तुम्ही इथे आलेच आहात जुनी दुनिया सोडून नवीन दुनियेमध्ये जाण्याकरिता. त्रेताला
काही नवीन दुनिया म्हणणार नाही. नापास झालेले तिथे निघून जातात कारण बरोबर रस्ता
पकडत नाहीत. वर-खाली होत राहतात. तुम्हाला जाणीव होते जशी आठवण असायला हवी तशी राहत
नाही. स्वर्गवासी जे बनतात त्यांना म्हणणार उत्तम पास. त्रेतावाल्यांना नापास मध्ये
गणले जाते. तुम्ही नरकवासी पासून स्वर्गवासी बनता. नाही तर मग नापास म्हटले जाते.
त्या (लौकिक) शिक्षणामध्ये तर नापास झाले की मग पुन्हा दुसऱ्या वर्षी शिकतात.
यामध्ये दुसऱ्या वर्षी शिकण्याचा तर प्रश्नच येत नाही. जन्म-जन्मांतर,
कल्प-कल्पांतर तीच परीक्षा उत्तीर्ण होतात जी कल्पापूर्वी केली आहे. या ड्रामाच्या
रहस्याला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. बरेचजण समजतात की, आपण चालू शकत नाही. जसे
एखादा वृद्ध असेल तर त्याला हाताला पकडून चालवाल तेव्हाच तो चालेल, नाहीतर चालू शकत
नाही. असेच जर भाग्यामध्ये नसेल तर कितीही फूल बनविण्यासाठी जोर द्या, परंतु बनतच
नाहीत. अकचे देखील फूल असते. हे काटे तर टोचतात.
बाबा किती समजावून
सांगतात. काल तुम्ही ज्या शिवाची पूजा करत होता तेच आज तुम्हाला शिकवत आहेत.
प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थासाठीच जोर दिला जातो. पाहिले जाते - माया
चांगल्या-चांगल्या फुलांना खाली पाडते. हाडेच तोडून टाकते, ज्याला मग ट्रेटर (द्रोही)
म्हटले जाते. जो एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये निघून जातो त्याला ट्रेटर
म्हटले जाते. बाबा देखील म्हणतात - ‘माझे बनून मग मायेचे बनतात तर त्यांना देखील
ट्रेटर म्हटले जाते. त्यांचे वर्तनच असे असते. आता बाबा मायेपासून सोडविण्यासाठी आले
आहेत. मुले म्हणतात - माया अतिशय वाईट आहे, ती आपल्याकडे खूप खेचून नेते. माया जशी
चुंबक आहे. यावेळी चुंबकाचे रूप घेते. दुनियेमध्ये सौंदर्य किती वाढले आहे. पूर्वी
हे चित्रपट इत्यादी थोडेच होते. हे सर्व १०० वर्षांमध्ये निघाले आहेत. बाबा (ब्रह्मा
बाबा) तर अनुभवी आहेत ना. तर मुलांनी या ड्रामाच्या गूढ रहस्याला चांगल्या रीतीने
समजून घेतले पाहिजे, प्रत्येक गोष्ट ॲक्युरेट नोंदलेली आहे. १०० वर्षांमध्ये हा जसा
स्वर्ग बनला आहे, विरोधासाठी. तर समजले जाते - आता स्वर्ग आणखीनच लवकर होणार आहे.
विज्ञान देखील खूप उपयोगामध्ये येते. हे तर खूप सुख देणारे देखील आहे ना. ते सुख
स्थाई व्हावे त्यासाठी या जुन्या दुनियेचा विनाश देखील होणार आहे. सतयुगाचे सुख
आहेच मुळी भारताच्या नशिबामध्ये. ते (इतर धर्मवाले) तर येतातच मागाहून, जेव्हा
भक्तीमार्ग सुरू होतो, जेव्हा भारतवासींचे पतन होते तेव्हा इतर धर्मावाले नंबरवार
येतात. भारत घसरत-घसरत एकदम भुई सपाट होतो. पुन्हा चढायचे आहे. इथे (संगमवासी
ब्राह्मण) देखील चढतात मग पडतात. किती पडतात, काही विचारू नका. कोणी तर मानत सुद्धा
नाहीत की बाबा आपल्याला शिकवत आहेत. चांगले-चांगले सेवाभावी ज्यांची बाबा महिमा
करतात ते देखील मायेच्या तावडीत सापडतात. कुस्ती होते ना. माया देखील अशी लढते.
एकदम पूर्ण खाली पाडते. पुढे चालून तुम्हा मुलांना माहित होत जाईल. माया एकदम पूर्ण
झोपवूनच टाकते. तरी देखील बाबा म्हणतात एकदा ज्ञान ऐकले आहे तर स्वर्गामध्ये जरूर
येणार. बाकी पद काही प्राप्त करू शकणार नाहीत ना. कल्पापूर्वी ज्याने जो पुरुषार्थ
केला आहे किंवा पुरुषार्थ करता-करता कोसळले आहेत, तसेच आता देखील कोसळतात आणि चढतात.
हार आणि जीत होते ना. सर्व काही मुलांच्या आठवणीवर अवलंबून आहे. मुलांना हा अखुट
खजिना मिळतो. त्यांचे (दुनियावाल्यांचे) तर किती लाखोंचे दिवाळे निघते. कोणी तर
लक्षाधीश बनतात, ते देखील एका जन्मापुरते. मग दुसऱ्या जन्मामध्ये थोडेच पुन्हा इतके
धन असेल. कर्मभोग देखील खूप आहेत. तिथे स्वर्गामध्ये तर कर्मभोगाची गोष्टच नाही.
यावेळी तुम्ही २१ जन्मांकरिता किती जमा करता. जे पूर्ण पुरुषार्थ करतात, पूर्ण
स्वर्गाचा वारसा प्राप्त करतात. बुद्धीमध्ये राहिले पाहिजे आपण खरोखर स्वर्गाचा
वारसा प्राप्त करत आहोत. हा विचार करायचा नाही की पुन्हा खाली कोसळणार (पतन होणार).
सर्वात जास्त हे (ब्रह्मा बाबा) खाली आले आहेत आता पुन्हा चढायचेच आहे. ऑटोमॅटिकली
पुरुषार्थ देखील होत राहतो. बाबा समजावून सांगतात - पहा माया किती प्रबळ आहे.
मनुष्यांमध्ये किती अज्ञान भरलेले आहे, अज्ञानापोटी बाबांना देखील सर्वव्यापी
म्हणतात. भारत किती फर्स्ट क्लास होता. तुम्ही समजता आपण असे होतो, आता पुन्हा बनत
आहोत. या देवतांची किती महिमा आहे, परंतु तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीच जाणत
नाहीत. तुम्हीच जाणता बेहदचे बाबा ज्ञान सागर येऊन आपल्याला शिकवतात. तरी देखील माया
अनेकांना संशयामध्ये घेऊन येते. कपट-कारस्थान करणे सोडत नाहीत. म्हणूनच बाबा
म्हणतात - आपला खरा-खरा चार्ट लिहा. परंतु देह-अभिमानामुळे खरे सांगत नाहीत. तर ते
देखील विकर्म बनते. खरे सांगायला पाहिजे ना. नाही तर खूप सजा खावी लागते. गर्भ
जेलमध्ये देखील खूप सजा मिळते. म्हणतात - ‘तोबा-तोबा…, आम्ही पुन्हा असे काम करणार
नाही’. जसे कोणाला मार पडतो तेव्हा देखील अशी माफी मागतात. सजा मिळाली तरी देखील असे
करतात. आता तुम्ही मुले समजता मायेचे राज्य केव्हा पासून सुरू झाले आहे. पाप करत
राहतात. बाबा बघतात - हे इतके मधुर मुलायम (गोड मृदू) बनत नाहीत. बाबा किती मृदू
एखाद्या लहान मुलाप्रमाणे होऊन चालतात, कारण ड्रामावर चालत राहतात. म्हणतील जे झाले
ड्रामाची भावी. समजावतात देखील की, आता या पुढे असे होता कामा नये. हे बाप-दादा
दोघेही एकत्र आहेत ना. दादांचे (ब्रह्मा बाबांचे) मत स्वतःचे आहे, ईश्वराचे मत
स्वतःचे आहे. समजले पाहिजे की हे मत कोण देतात? हे देखील पिता तर आहेत ना. बाबांचे
तर मानले पाहिजे. बाबा तर मोठे बाबा आहेत ना, म्हणून बाबा म्हणतात - असेच समजा की
शिवबाबा समजावत आहेत. समजत नसाल तर पदही मिळणार नाही. ड्रामा प्लॅन अनुसार बाबा
देखील आहेत, दादा सुद्धा आहेत. बाबांचे श्रीमत मिळते. माया अशी आहे जी महावीर,
पैलवानांना देखील कोणते ना कोणते उलटे काम करायला लावते. समजून येते हे बाबांच्या
मतावर चालत नाहीत. स्वतः देखील फील करतात, मी माझ्या आसुरी मतावर आहे. श्रीमत देणारे
येऊन उपस्थित झाले आहेत. त्यांचे आहे ईश्वरीय मत. बाबा स्वतः सांगतात की, जर यांचे
कोणते असे मत मिळाले जरी तरी देखील त्याला ठीक करणारा मी बसलो आहे. तरीही मी रथ
घेतला आहे ना. मी रथ घेतला तेव्हाच यांनी शिवी खाल्ली आहे. नाही तर कधीही शिवी
खाल्लेली नाही. माझ्यामुळे किती शिव्या खातात. तर यांची देखील संभाळ करावी लागेल.
बाबा रक्षण जरूर करतात. जसे मुलांचे रक्षण बाबा करतात ना. जितके सत्याला धरून
चालतात, तितकी रक्षा होते. खोट्याची रक्षा होत नाही. त्यांची तर मग सजा कायम होते,
म्हणूनच बाबा समजावतात - माया तर एकदम नाकाला पकडून नाहीसेच करते. मुले स्वतः अनुभव
करतात माया खाऊन टाकते तर मग शिक्षण सोडून देतात. बाबा म्हणतात शिक्षण जरूर शिका.
अच्छा, कुठे कोणाचा दोष आहे. यामध्ये जसे जो करेल, ते भविष्यामध्ये मिळवेल, कारण आता
दुनिया बदलत आहे. माया अशी पंजा मारते ज्यामुळे ती खुशी राहत नाही. मग ओरडतात -
‘बाबा, माहित नाही काय होते’. युद्धाच्या मैदानामध्ये खूप सावध राहतात की कुठे कोणी
पंजा मारू नये. तरी देखील कोणी जास्त ताकदवाले असतात तर त्याला सोडून दुसऱ्याला खाली
पाडतात. मग दुसऱ्या दिवसासाठी जास्त ताकद वाल्यांना ठेवतात. हे मायेचे युद्ध तर
शेवटपर्यंत चालत राहते. खाली-वर होत राहतात. बरीच मुले खरे सांगत नाहीत. इज्जतीची
खूप भीती असते - माहित नाही बाबा काय म्हणतील. जोपर्यंत खरे सांगत नाही तोपर्यंत
पुढे चालू शकणार नाहीत. आत खटकत राहते, मग वाढ होत जाते. स्वतःहून कधीही खरे
सांगणार नाहीत. जर दोघे असतील तर समजतात - हे बाबांना ऐकवतील तर आम्ही सुद्धा
ऐकवणार. माया अतिशय वाईट आहे. समजून येते त्यांच्या भाग्यामध्ये इतके उच्च पद नाही
आहे त्यामुळे मग डॉक्टर पासून लपवतात. लपविल्यामुळे आजार सुटणार नाही. जितके लपवाल
तितके कोसळतच रहाल (पतन होतच राहील). भूते तर सर्वांमध्ये आहेत ना. जोपर्यंत
कर्मातीत अवस्था बनत नाही तोपर्यंत क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) देखील सोडत नाही.
सर्वात मोठा शत्रू आहे - काम विकार. कितीतरी खाली पडतात (पतन होते). बाबा तर
वारंवार समजावून सांगत राहतात - शिवबाबां व्यतिरिक्त कोणत्याही देहधारीची आठवण
करायची नाही. बरेचजण तर इतके पक्के आहेत ज्यांना कधीही कोणाची आठवण सुद्धा येणार
नाही. पतिव्रता स्त्री असते ना, तिची कु-बुद्धी असत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्याला शिकविणारे
स्वतः ज्ञानाचे सागर, बेहदचे बाबा आहेत, यामध्ये कधी संशय येऊ द्यायचा नाही,
कपट-कारस्थाने सोडून आपला खरा-खरा चार्ट ठेवायचा आहे. देह-अभिमानामध्ये येऊन कधीही
ट्रेटर बनायचे नाही.
२) ड्रामाला
बुद्धीमध्ये ठेवून बाप समान अतिशय मधुर विनम्र बनून रहायचे आहे. आपला अहंकार
दाखवायचा नाही. आपले मत सोडून एका बाबांच्या श्रेष्ठ मतावर चालायचे आहे.
वरदान:-
एका बाबांच्या
प्रेमामध्ये लवलीन होऊन लक्ष्या पर्यंत पोहोचणारे सर्व आकर्षण मुक्त भव
बापदादा मुलांना
आपल्या स्नेह आणि सहयोगाच्या मांडीवर बसवून लक्ष्या पर्यंत घेऊन जात आहेत. हा मार्ग
मेहनतीचा नाही आहे परंतु जेव्हा हायवेच्या ऐवजी गल्लीमध्ये निघून जाता किंवा
लक्ष्याच्या निशाणीच्याही अजून पुढे निघून जाता तर मागे फिरण्यासाठी मेहनत करावी
लागते. मेहनती पासून वाचण्याचे साधन आहे एकाच्याच प्रेमामध्ये रहा. एका बाबांच्या
प्रेमामध्ये लीन होऊन प्रत्येक कार्य करा तर दुसरे काहीही दिसणार नाही. सर्व
आकर्षणांपासून मुक्त व्हाल.
बोधवाक्य:-
आपण भाग्यशाली
असल्याचा अनुभव चेहऱ्याद्वारे आणि वर्तनाद्वारे करवा.