31-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही इथे सर्वशक्तिमान बाबांकडून शक्ती घेण्यासाठी अर्थात दिव्यामध्ये ज्ञानाचे घृत घालण्यासाठी आला आहात”

प्रश्न:-
शिवाच्या वरातीचे गायन का आहे?
उत्तर:-
कारण शिवबाबा जेव्हा परत जातात तेव्हा सर्व आत्म्यांची झुंड त्यांच्या मागे-मागे पळत जाते, मूलवतनमध्ये सुद्धा आत्म्यांचा मनोरा तयार होतो. तुम्ही पवित्र बनणारी मुले बाबांसोबतच जाता. सोबत असल्यामुळेच वरातीचे गायन आहे.

ओम शांती।
मुलांनी सर्वप्रथम हा एकच मुद्दा समजावून सांगायचा आहे की आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत आणि हे सर्वांचे पिता आहेत. त्यांना सर्वशक्तिमान म्हटले जाते. तुमच्यामध्ये सर्व शक्ती होत्या. तुम्ही विश्वावर राज्य करत होता. भारतातच या देवी-देवतांचे राज्य होते, म्हणजे तुम्हा मुलांचे राज्य होते. तुम्ही पवित्र देवी-देवता होतात, तुमचे कूळ अथवा डिनायस्टी (घराणे) आहे, ते सर्व निर्विकारी होते. कोण निर्विकारी होते? आत्मे. आता पुन्हा तुम्ही निर्विकारी बनत आहात. जणू काही सर्वशक्तिमान बाबांची आठवण करत त्यांच्याकडून शक्ती भरून घेत आहात. बाबांनी समजावून सांगितले आहे आत्माच ८४ चा पार्ट बजावते. त्यांच्यामध्ये जी सतोप्रधान ताकद होती ती मग दिवसेंदिवस कमी होत जाते. सतोप्रधानापासून तमोप्रधान बनायचे आहे. जशी बॅटरीची ताकद कमी होत जाते तेव्हा गाडी थांबून राहते. बॅटरी डिस्चार्ज होते. आत्म्याची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होत नाही, थोडीफार ताकद राहते. जसे कोणाचा मृत्यू झाल्यावर दिवा पेटवतात, त्याच्यामध्ये तूप घालत राहतात जेणेकरून ज्योत विझू नये. बॅटरीची ताकद कमी होते तेव्हा मग चार्ज करण्यासाठी ठेवतात. आता तुम्ही मुले समजता तुमची आत्मा सर्वशक्तीमान होती, आता पुन्हा तुम्ही सर्वशक्तीमान बाबांसोबत आपला बुद्धियोग लावता. जेणेकरून बाबांची शक्ती आपल्यामध्ये यावी कारण शक्ती कमी झाली आहे. थोडीशी जरूर शिल्लक राहते. एकदम सगळीच संपली तर मग शरीरच राहणार नाही. आत्मा बाबांची आठवण करता-करता एकदम शुद्ध (पवित्र) बनते. सतयुगामध्ये तुमची बॅटरी पूर्ण चार्ज असते नंतर मग थोडी-थोडी कमी होत जाते. त्रेता पर्यंत मीटर कमी होतो, ज्याला कला म्हटले जाते. मग म्हणणार - आत्मा जी सतोप्रधान होती, ती सतो बनली, शक्ती कमी होते. तुम्ही समजता आपण मनुष्यापासून देवता बनतो सतयुगामध्ये. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात, त्यामुळे सर्व शक्तीचे दिवाळेच निघाले आहे. मग बाबांची आठवण केल्याने पूर्ण शक्ती येईल, कारण तुम्ही जाणता देहासहित देहाची जी काही सर्व नाती आहेत, ती सर्व नष्ट होणार आहेत आणि मग तुम्हाला बेहदचे राज्य मिळते. बाबा देखील बेहदचे आहेत तर वारसा देखील बेहदचा देतात. आता तुम्ही ‘पतित’ आहात. तुमची ताकद पूर्णपणे कमी होत गेली आहे. माझ्या मुलांनो, आता तुम्ही माझी आठवण करा, मी ऑलमाइटी आहे, माझ्याकडून ऑलमाइटी राज्य मिळते. सतयुगामध्ये देवी-देवता सर्व विश्वाचे मालक होते, पवित्र होते, दैवी गुणवान होते. आता ते दैवी गुण नाहीत. सर्वांची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होऊ लागली आहे. आता पुन्हा बॅटरी भरत आहे. परमपिता परमात्म्यासोबत योग लावल्याशिवाय बॅटरी चार्ज होऊ शकत नाही. ते बाबाच एव्हर प्युअर (सदा पावन) आहेत. इथे सर्व इम्प्योर (अपवित्र) आहेत. जेव्हा प्युअर असतात तेव्हा बॅटरी चार्ज असते. तर आता बाबा समजावून सांगत आहेत - एकाचीच आठवण करायची आहे. सर्वोच्च आहेत भगवान. बाकी सर्व आहे रचना. रचनेकडून रचनेला कधी वारसा मिळत नाही. क्रिएटर तर एकच आहेत. ते बेहदचे बाबा आहेत. बाकी तर सर्व आहेत हदचे. बेहदच्या बाबांची आठवण केल्याने बेहदची बादशाही मिळते. तर मुलांना मनातून समजले पाहिजे - आमच्यासाठी बाबा नवीन दुनिया स्वर्गाची स्थापना करत आहेत. ड्रामा प्लॅन अनुसार स्वर्गाची स्थापना होत आहे. तुम्ही जाणता - सतयुग येणार आहे. सतयुगामध्ये असतेच मुळी सदैव सुख. ते कसे मिळते? बाबा बसून समजावून सांगतात - ‘मामेकम याद करो’...’ मी एव्हर प्युअर आहे. मी कधी मनुष्याचे शरीर घेत नाही. ना दैवी शरीर घेतो, ना मनुष्याचे शरीर घेतो; अर्थात मी जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाही. फक्त तुम्हा मुलांना स्वर्गाची बादशाही देण्यासाठी, जेव्हा हे साठीला वानप्रस्थावस्थेमध्ये असतात तेव्हा यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) तनामध्ये येतो. हेच पूर्ण सतोप्रधानापासून तमोप्रधान बनले आहेत. नंबर वन सर्वोच्च भगवान आहेत, मग आहेत सूक्ष्मवतनवासी ब्रह्मा-विष्णू-शंकर, ज्यांचा साक्षात्कार होतो. सूक्ष्मवतन मध्यावर आहे ना! तिथे शरीर असू शकत नाही. सूक्ष्म शरीर फक्त दिव्य दृष्टीने बघता येते. मनुष्य-सृष्टी तर इथे आहे. बाकी ते तर फक्त साक्षात्कार करण्यासाठी फरिश्ते आहेत. तुम्ही मुले देखील शेवटी जेव्हा पूर्णतः पवित्र बनता तेव्हा तुमचा सुद्धा साक्षात्कार होतो. असे फरिश्ते बनून मग सतयुगामध्ये इथेच येऊन स्वर्गाचे मालक बनाल. हा ब्रह्मा काही विष्णूची आठवण करत नाही. हा सुद्धा शिवबाबांची आठवण करतो आणि हा विष्णू बनतो. तर हे समजले पाहिजे ना. यांनी राज्य कसे मिळवले! युद्ध इत्यादी तर काही सुद्धा होत नाही. देवता हिंसा कशी बरे करतील!

कोणी मानो अथवा न मानो, आता तुम्ही मुले बाबांची आठवण करून बादशाही मिळवता. गीतेमध्ये देखील आहे - ‘माझ्या मुलांनो, देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून मामेकम् याद करो!’ त्यांना तर देहच नाही आहे, जो मोह असेल. म्हणतात - मी थोड्या वेळासाठी यांचे शरीर उधार घेतो. नाहीतर मी नॉलेज कसे देऊ? मी बीजरूप आहे ना! या पूर्ण झाडाचे नॉलेज माझ्याकडे आहे. इतर कोणाला हेच ठाऊक नाही आहे की, या सृष्टीचे आयुर्मान किती आहे? याची स्थापना, पालना, विनाश कसा होतो? मनुष्यांना तर माहिती असली पाहिजे. मनुष्यच शिकतात. पशू तर शिकणार नाहीत ना! ते शिकतात हदचे शिक्षण. बाबा तुम्हाला बेहदचा अभ्यास शिकवतात, ज्याद्वारे तुम्हाला बेहदचा मालक बनवतात. तुम्हाला तर हे समजावून सांगितले पाहिजे की, भगवान कोणा मानवाला अथवा देहधारीला म्हटले जात नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील सूक्ष्म देह आहे ना. यांचे नावच वेगळे आहे, यांना भगवान म्हटले जात नाही. हे शरीर तर या दादाच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्याचे तख्त होते. अकाल तख्त आहे ना. आता हे अकालमुर्त बाबांचे तख्त आहे. अमृतसरमध्ये देखील एक अकाल तख्त आहे ना. मोठमोठ्या हस्ती ज्या असतात ते त्या अकाल तख्तावर जाऊन बसतात. आता बाबा समजावून सांगत आहेत - ही सर्व अकाल आत्म्यांची तख्त आहेत. आत्मा अकाल आहे जिला काळ खाऊ शकत नाही. बाकी तख्त (शरीर) तर बदलत राहतात. अकाल मूर्त आत्मा या तख्तावर बसते. अगोदर छोटे तख्त असते (छोटे शरीर असते) नंतर मग मोठे होते. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आत्मा अकाल आहे. बाकी तिच्यामध्ये चांगले किंवा वाईट संस्कार असतात तेव्हाच तर म्हटले जाते ना - कर्मांचे हे फळ आहे. आत्म्याचा कधी विनाश होत नाही. आत्म्यांचे पिता एक आहेत. हे तर समजून घेतले पाहिजे ना. हे बाबा काही शास्त्रांमधल्या गोष्टी ऐकवतात का! शास्त्र इत्यादी वाचल्याने परत तर कोणी जाऊ शकत नाही. अखेरीला सगळे जातील. जसे टोळांचा थवा किंवा मधमाशांची झुंड जाते ना. मधमाशांची सुद्धा राणी असते. तिच्या मागून सगळे जातात. बाबा देखील जातील तेव्हा त्यांच्या मागे सर्व आत्मे जातील. तिथे मुलवतनमध्ये जणू सर्व आत्म्यांचा मनोरा आहे. इथे मग आहे मनुष्यांची झुंड. तर ही झुंड देखील एक दिवस पळून जाणार आहे. बाबा येऊन सर्व आत्म्यांना घेऊन जातात. शिवाची वरात म्हटले जाते. मुले म्हणा अथवा सजण्या म्हणा. बाबा येऊन मुलांना शिकवून आठवणीची यात्रा देखील शिकवतात. पवित्र बनल्याशिवाय तर आत्मा जाऊ शकत नाही. जेव्हा पवित्र बनेल तेव्हा सर्वात पहिली शांतीधामला जाईल. तिथे जाऊन सगळे निवास करतात. तिथून मग हळू-हळू येत राहतात, वृद्धी होत राहते. सर्वात पहिले तर तुम्हीच बाबांच्या मागून पळणार. तुमचा बाबांसोबत किंवा सजणींचा साजणासोबत योग आहे. राजधानी बनणार आहे ना. सगळे एकत्र येत नाहीत. तिथे सर्व आत्म्यांची दुनिया आहे. तिथून मग नंबरवार येतात. झाड हळू-हळू वृद्धिंगत होत जाते. सर्वात पहिला तर आहे आदि सनातन देवी-देवता धर्म, जो बाबा स्थापन करतात. सर्वप्रथम आम्हाला ब्राह्मण बनवतात. प्रजापिता ब्रह्मा आहे ना. प्रजेमध्ये मग भाऊ-बहीणी बनतात. ब्रह्माकुमार आणि कुमारी पुष्कळ आहेत. जरूर निश्चयबुद्धी असतील तेव्हाच तर इतके भरपूर झाले आहेत. ब्राह्मण किती असतील? कच्चे किंवा पक्के? कोणी तर ९९ मार्क्स घेतात, कोणी १० मार्क्स घेतात तर मग कच्चे झाले ना. तुमच्यामध्ये देखील जे पक्के आहेत जे जरूर अगोदर येतील. कच्चे असणारे नंतर येतील. ही पार्टधारींची दुनिया आहे जी फिरत राहते. सतयुग, त्रेता… हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. हे आता बाबांनी सांगितले आहे. अगोदर तर आपण उलटे समजत आलो की, कल्पाचे आयुर्मान लाखो वर्षे आहे. आता बाबांनी सांगितले आहे हे तर पूर्ण ५ हजार वर्षाचे चक्र आहे. अर्धा कल्प आहे रामाचे राज्य, अर्धा कल्प आहे रावणाचे राज्य. लाखो वर्षांचे कल्प असते तर अर्धे-अर्धे सुद्धा होऊ शकणार नाही. दुःख आणि सुखाची ही दुनिया बनलेली आहे. हे बेहदचे नॉलेज बेहदच्या बाबांकडून मिळते. शिवबाबांच्या शरीराचे कोणते नाव नाही आहे. हे शरीर तर या दादांचे (ब्रह्मा बाबांचे) आहे. बाबा कुठे आहेत? बाबांनी थोड्या काळासाठी लोन घेतले आहे. बाबा म्हणतात - मला मुख तर पाहिजे ना. इथे सुद्धा गोमुख बनवले आहे. पहाडातून पाणी तर जिथे-तिथे येते. इथे मग गोमुख बनवले आहे, त्यातून पाणी येते, त्याला गंगाजल समजतात. आता गंगा मग कुठून आली? हे सर्व आहे खोटे. ‘झूठी काया, झूठी माया, झूठा सब संसार’. भारत जेव्हा स्वर्ग होता तर सत्यखंड म्हटला जातो आणि मग भारतच जेव्हा जुना बनतो तेव्हा झुठखंड म्हटले जाते. या झुठखंडामध्ये जेव्हा सर्वजण पतित बनतात तेव्हा बोलावतात - बाबा आम्हाला पावन बनवून या जुन्या दुनियेतून घेऊन चला. बाबा म्हणतात - माझी सर्व मुले काम-चितेवर चढून काळी बनली आहेत. बाबा मुलांना बसून सांगत आहेत - तुम्ही स्वर्गाचे मालक होता ना! स्मृती आली आहे ना. मुलांनाच सांगतात, साऱ्या दुनियेला सांगत नाहीत. तुम्हालाच सांगतात तेव्हाच माहीत होईल की आपला पिता कोण आहे!

या दुनियेला म्हटले जाते फॉरेस्ट ऑफ थॉर्नस (काट्यांचे जंगल). सर्वात मोठा काटा काम-विकाराचा लावतात. भले इथे भक्त देखील पुष्कळ आहेत, शाकाहारी आहेत, परंतु असे नाही की, विकारामध्ये जात नाहीत. असे तर खुपजण बाल ब्रह्मचारी देखील राहतात. लहानपणापासूनच कधी मांसाहार इत्यादी खात नाहीत. संन्यासी सुद्धा म्हणतात - निर्विकारी बना. तो हदचा संन्यास मनुष्य करवतात. दुसऱ्या जन्मामध्ये मग गृहस्थीपाशी जन्म घेऊन मग पुन्हा घरदार सोडून निघून जातात. सतयुगामध्ये हे श्रीकृष्ण इत्यादी देवता कधी घरदार सोडून जातात का? नाही. तर त्यांचा आहे हदचा संन्यास. आता तुमचा आहे बेहदचा संन्यास. साऱ्या दुनियेचा, नातलग इत्यादींचा बुद्धीने संन्यास करता. तुमच्यासाठी आता स्वर्गाची स्थापना होत आहे. तुमची बुद्धी स्वर्गाकडेच जाणार. तर शिवबाबांचीच आठवण करायची आहे. बेहदचे बाबा म्हणतात - माझी आठवण करा. मनमनाभव, मध्याजी भव, तर तुम्ही देवता बनाल. हा तोच गीतेचा एपिसोड आहे. संगमयुग सुद्धा आहे. मी संगमावरच येऊन ऐकवतो. राजयोग जरूर अगोदरच्या जन्मामध्ये संगमावर शिकले असणार. ही सृष्टी बदलते ना, तुम्ही पतितापासून पावन बनता. आता हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, जेव्हा की, आपण असे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनतो. प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजून घेऊन पक्की केली पाहिजे. हे कोणी मनुष्य थोडेच सांगत आहेत. हे आहे श्रीमत श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत, भगवंताचे. बाकी सर्व आहेत मनुष्य मत. मनुष्य मताने खाली येता (पतन होते). आता श्रीमताद्वारे तुम्ही चढता (उत्थान होते). बाबा मनुष्यापासून देवता बनवतात. दैवी मत स्वर्गवासीचे आहे आणि ते आहे नरकवासी मनुष्य मत, ज्याला रावण मत म्हटले जाते. रावण राज्य सुद्धा काही कमी नाहीये. साऱ्या दुनियेवर रावणाचे राज्य आहे. ही बेहदची लंका आहे जिच्यावर रावणाचे राज्य आहे नंतर मग देवतांचे पवित्र राज्य होईल. तिथे खूप सुख असते. स्वर्गाची किती महिमा आहे. म्हणतात देखील - स्वर्गवासी झाला. तर जरूर नरकामध्ये होता ना. हेलमधून (नरकामधून) गेला तर जरूर पुन्हा नरकामध्येच येईल ना! स्वर्ग आता आहे कुठे? या गोष्टी काही शास्त्रामध्ये नाहीत. आता बाबा तुम्हाला सारे नॉलेज देत आहेत. बॅटरी भरते. माया मग लिंक तोडते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मन-वचन-कर्माने पवित्र बनून आत्मा रुपी बॅटरीला चार्ज करायचे आहे. पक्का ब्राह्मण बनायचे आहे.

२) मनमत अथवा मनुष्य मत सोडून एका बाबांच्या श्रीमतावर चालून स्वतःला श्रेष्ठ बनवायचे आहे. सतोप्रधान बनून बाबांसोबत उडून जायचे आहे.

वरदान:-
सत्यतेच्या शक्तीद्वारे प्रकृतीला अथवा विश्वाला सतोप्रधान बनविणारे मास्टर विधी-विधाता भव

जेव्हा तुम्ही मुले सत्यतेच्या शक्तीला धारण करून मास्टर विधी-विधाता बनता तेव्हा प्रकृति सतोप्रधान बनते, युग सतयुग बनते. सर्व आत्मे सद्गतीचे भाग्य बनवतात. तुमची सत्यता पारस समान आहे. जसा पारस लोखंडाला पारस बनवतो, तशी सत्यतेची शक्ती आत्म्याला, प्रकृतीला, समयाला, सर्व सामुग्रीला, सर्व नात्यांना, संस्कारांना, आहार-व्यवहाराला सतोप्रधान बनवते.

बोधवाक्य:-
योगी आत्मे ते आहेत ज्यांना प्रकृतीची हलचल देखील आकर्षित करणार नाही.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

स्वदर्शन चक्रधारी सो छत्रधारी बना तेव्हाच देहाच्या स्मृतीच्या अनेक व्यर्थ संकल्पांच्या चक्रापासून, लौकिक आणि अलौकिक संबंधांच्या चक्रापासून, आपल्या अनेक जन्मांच्या स्वभाव आणि संस्कारांच्या चक्रापासून आणि प्रकृतीच्या अनेक प्रकारच्या आकर्षणाच्या चक्रापासून जेव्हा मुक्त व्हाल तेव्हा अन्य आत्म्यांना देखील बाबांपासून प्राप्त झालेल्या शक्तींद्वारे अनेक चक्रांपासून सहजच सोडवून जीवन-मुक्त बनवू शकाल.