31-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही आता जुन्या दुनियेच्या गेटमधून निघून शांतीधाम आणि सुखधाम मध्ये जात आहात, बाबाच मुक्ती आणि जीवनमुक्तीचा रस्ता सांगतात”

प्रश्न:-
वर्तमान वेळी सर्वात चांगले कर्म कोणते आहे?

उत्तर:-
सर्वात चांगले कर्म आहे मनसा, वाचा, कर्मणा आंधळ्यांची काठी बनणे. तुम्हा मुलांना विचार सागर मंथन केले पाहिजे की, असा कोणता शब्द लिहावा जेणेकरून लोकांना घराचा (मुक्तीचा) आणि जीवनमुक्तीचा रस्ता मिळेल. मनुष्य सहज समजतील की, इथे शांती, सुखाच्या दुनियेमध्ये जाण्याचा रस्ता सांगितला जातो.

ओम शांती।
जादूगाराचा दिवा ऐकलात ना? अल्लाउद्दीनचा दिवा देखील गायला जातो. अल्लाउद्दीनचा दिवा आणि जादूगाराचा दिवा काय-काय दाखवतो? वैकुंठ, स्वर्ग, सुखधाम. दिव्याला प्रकाश म्हटले जाते. आता तर अंधार आहे ना. आता हा जो प्रकाश दाखविण्यासाठी मुले प्रदर्शनी, मेळे इत्यादी करतात, इतका खर्च करतात, डोकेफोड करतात. मुले विचारतात बाबा याचे नाव काय ठेवावे? इथे मुंबईला ‘गेट वे ऑफ इंडिया’ म्हणतात. आगबोटी आधी मुंबईलाच येतात. दिल्लीमध्ये सुद्धा ‘इंडिया गेट’ आहे. आता आपले हे आहे - ‘गेट ऑफ मुक्ती-जीवनमुक्ती’. दोन गेट आहेत ना. गेट नेहमी दोन असतात इन आणि आऊट. एकातून येणे आणि दुसऱ्यातून जाणे. हे देखील असेच आहे - आपण नवीन दुनियेमध्ये येतो आणि मग जुन्या दुनियेमधून बाहेर पडून आपल्या घरी निघून जातो. परंतु स्वतःहून परत काही आपण जाऊ शकत नाही कारण घराला विसरलो आहोत, गाईड पाहिजे. ते देखील आम्हाला भेटले आहेत जे मार्ग सांगतात. मुले जाणतात बाबा आम्हाला मुक्ती-जीवनमुक्ती, शांती आणि सुखाचा रस्ता सांगतात. तर ‘गेट ऑफ शांतीधाम-सुखधाम’ लिहावे. विचार सागर मंथन करायचे असते. खूप विचार चालतात की, मुक्ती-जीवनमुक्ती कशाला म्हटले जाते, ते देखील कोणाला माहित नाहीये. शांती आणि सुख तर सर्वांना हवेसे वाटते. शांती देखील असावी आणि धन-दौलत सुद्धा असावी. ते तर असतेच सतयुगामध्ये. तर नाव लिहावे - ‘गेट ऑफ शांतीधाम आणि सुखधाम’ किंवा ‘गेट ऑफ प्युरिटी, पीस, प्रॉस्परिटी’. हे तर चांगले शब्द आहेत. तिन्ही इथे नाही आहेत. तर यावर मग समजावून सांगावे देखील लागेल. नवीन दुनियेमध्ये हे सर्व काही होते. नवीन दुनियेची स्थापना करणारे आहेत पतित-पावन, गॉड फादर. तर जरूर आपल्याला या जुन्या दुनियेतून निघून घरी जावे लागेल. तर हे प्युरिटी, पीस, प्रॉस्परिटीचे गेट झाले ना. बाबांना हे नाव चांगले वाटते. आता खरे तर त्याचे ओपनिंग तर शिवबाबा करतात. परंतु आम्हा ब्राह्मणांद्वारे करवून घेतात. दुनियेमध्ये ओपनिंग सेरेमनी (उद्घाटन समारोह) तर खूप होत असतात. कोणी हॉस्पिटलचे करतील, कोणी युनिव्हर्सिटीचे करतील. हे तर एकदाच होते आणि आता यावेळीच होते म्हणून विचार केला जातो. मुलांनी लिहिले - ब्रह्मा बाबांनी येऊन उद्घाटन करावे. बाप-दादा दोघांनाही बोलवायचे. बाबा ब्रह्मा बाबांना म्हणतात - तुम्ही बाहेर कुठेही जाऊ शकत नाही. उद्घाटन करण्यासाठी जावे, विवेक नाही म्हणतो, कायदा नाही. हे तर कोणीही उघडू शकतात. वर्तमानपत्रात देखील येईल - प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. हे नाव देखील खूप छान आहे ना. प्रजापिता तर सर्वांचे पिता झाले ना. हे काही कमी आहेत काय! आणि मग बाबा स्वतः सेरेमनी करतात. करन-करावनहार आहेत ना. बुद्धीमध्ये राहिले पाहिजे ना की आपण स्वर्गाची स्थापना करत आहोत. तर किती पुरुषार्थ करून श्रीमतावर चालले पाहिजे. वर्तमान समयी मनसा-वाचा-कर्मणा सर्वात चांगले कर्म तर एकच आहे - आंधळ्यांची काठी बनणे. गातात देखील - हे प्रभू आंधळ्यांची काठी. सर्वजण आंधळेच आंधळे. तर बाबा येऊन काठी बनतात. ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात, ज्यामुळे स्वर्गामध्ये तुम्ही नंबरवार पुरुषार्थानुसार जाता. नंबरवार तर आहेतच. हे खूप मोठे बेहदचे हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी आहे. समजावून सांगितले जाते - आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा पतित-पावन आहेत. तुम्ही त्या बाबांची आठवण करा तर सुखधाम मध्ये निघून जाल. हे आहे हेल (नरक), याला हेवन (स्वर्ग) म्हणणार नाही. हेवनमध्ये आहेच एक धर्म. भारत स्वर्ग होता, दुसरा कोणता धर्म नव्हता. एवढे फक्त लक्षात ठेवा, हे देखील मनमनाभव आहे. आपण स्वर्गामध्ये पूर्ण विश्वाचे मालक होतो - एवढे सुद्धा लक्षात राहत नाही! बुद्धीमध्ये आहे - आपल्याला बाबा मिळाले आहेत तर तसा आनंद झाला पाहिजे. परंतु माया देखील काही कमी नाहीये. अशा बाबांचे बनून देखील इतके आनंदात राहत नाहीत. घुसमटत राहतात. माया सारखी-सारखी खूप त्रास देत राहते. शिवबाबांची आठवण विसरायला लावते. स्वतः देखील म्हणतात - आठवण टिकत नाही. बाबा डुबकी मारायला लावतात ज्ञान सागरामध्ये आणि माया मग डुबकी मारायला लावते विषय सागरामध्ये. खूप आनंदाने डुबक्या मारू लागतात. बाबा म्हणतात शिवबाबांची आठवण करा. माया मग विसरायला लावते. बाबांची आठवण करत नाहीत. बाबांना जाणतच नाहीत. दुःख-हर्ता, सुख-कर्ता तर परमपिता परमात्मा आहेत ना. ते आहेतच दुःख हरणारे. ते (भक्तिमार्गात लोक) मग गंगेमध्ये जाऊन डुबकी मारतात. असे समजतात गंगा पतित-पावनी आहे. सतयुगामध्ये गंगेला दुःख हारिणी, पाप विनाशिनी म्हणणार नाही. साधू-संत इत्यादी सगळे नदीच्या तीरावर जाऊन बसतात. सागराच्या किनाऱ्यावर का बसत नाहीत? आता तुम्ही मुले सागराच्या किनाऱ्यावर बसता. असंख्य मुले सागराकडे येतात. तर मग समजतात सागरातून निघालेल्या या छोट्या-मोठ्या नद्या देखील पतित-पावनी आहेत. ब्रह्मपुत्रा, सिंधु, सरस्वती अशी देखील नावे ठेवली आहेत.

बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, तुम्हाला मनसा-वाचा-कर्मणा खूप-खूप काळजी घ्यायची आहे, तुम्हाला कधीही क्रोध येता कामा नये. क्रोध आधी मनसामध्ये येतो मग वाचेमध्ये आणि नंतर कर्मामध्ये सुद्धा येतो. या तीन खिडक्या आहेत म्हणून बाबा समजावून सांगतात - गोड मुलांनो, जास्त वाणी चालवू नका, शांतीमध्ये रहा, वाणीमध्ये आलात तर कर्मामध्ये येईल. राग अगोदर मनसामध्ये येतो आणि मग वाचा-कर्मणामध्ये येतो. तिन्ही खिडक्यांमधून निघतो. आधी मनसामध्ये येईल. दुनियावाले तर एकमेकांना दुःख देतच राहतात, भांडण-तंटे करत राहतात. तुम्हाला तर कोणालाही दुःख द्यायचे नाहीये. विचार सुद्धा येता कामा नये. सायलेन्समध्ये राहणे खूप चांगले आहे. तर बाबा येऊन स्वर्गाचे अथवा सुख-शांतीचे गेट सांगतात. मुलांनाच सांगतात. मुलांना म्हणतात तुम्ही देखील इतरांना सांगा. प्युरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी (पवित्रता, शांती आणि समृद्धी) असतेच मुळी स्वर्गामध्ये. तिथे कसे जातात, ते समजून घ्यायचे आहे. हे महाभारताचे युद्ध देखील गेट उघडते. बाबांचे विचार सागर मंथन तर चालते ना. काय नाव ठेवावे? पहाटे विचार सागर मंथन केल्याने लोणी निघते. चांगल्या कल्पना सुचतात; म्हणून बाबा म्हणतात - पहाटे उठून बाबांची आठवण करा आणि विचार सागर मंथन करा - काय नाव ठेवावे? विचार केला पाहिजे, कोणाला चांगला विचार देखील सुचतो. आता तुम्ही समजता पतिताला पावन बनविणे अर्थात नरकवासीला स्वर्गवासी बनविणे. देवता पावन आहेत, तेव्हाच तर त्यांच्यासमोर डोके टेकवतात. तुम्ही आता कोणासमोर डोके टेकवू शकत नाही, कायदा नाही. बाकी युक्तीने चालावे लागते. साधू लोक स्वतःला श्रेष्ठ पवित्र समजतात, इतरांना अपवित्र नीच समजतात. तुम्ही भले समजता आपण सर्वात उच्च आहोत परंतु कोणी हाथ जोडले तर प्रतिसाद द्यावा लागतो. ‘हरी ओम् तत् सत्’ करतात, तर करावेच लागेल. युक्तीने चालला नाहीत तर ते हाती लागणार नाहीत. खूप युक्त्या केल्या पाहिजेत. जेव्हा मृत्यू डोक्यावर उभा ठाकतो तेव्हा सर्वजण भगवंताचे नाव घेतात. आजकाल योगायोग तर खूप होत राहतील. हळू-हळू आग पसरत जाते. आगीची सुरुवात परदेशातून होईल आणि मग हळू-हळू सर्व दुनिया जळून जाईल. शेवटी तुम्ही मुलेच बाकी राहता. तुमची आत्मा पवित्र होते तर तुम्हाला तिथे नवीन दुनिया मिळते. दुनियेची नवीन नोट तुम्हा मुलांना मिळते. तुम्ही राज्य करता. अल्लाउद्दीनचा दिवा देखील प्रसिद्ध आहे ना! नोट अशी केल्याने कुबेराचा खजिना मिळतो. आहे देखील बरोबर. तुम्ही जाणता अल्लाह अवलदिन झटक्यात इशाऱ्याने साक्षात्कार घडवतात. फक्त तुम्ही शिवबाबांची आठवण करा म्हणजे सर्व साक्षात्कार होतील. नवधा भक्तीने देखील साक्षात्कार होतो ना. इथे तुम्हाला एम ऑब्जेक्टचा साक्षात्कार तर होतोच मग तुम्ही बाबांची, स्वर्गाची खूप आठवण कराल. वारंवार बघत रहाल. जे बाबांच्या आठवणीमध्ये आणि ज्ञानामध्ये तल्लीन असतील तेच अखेरची दृश्ये बघू शकतील. खूप मोठे ध्येय आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे काही मावशीचे घर नाहीये. खूप मेहनत आहे. आठवणच मुख्य आहे. जसे बाबा दिव्यदृष्टी दाता आहेत तसे तुम्ही स्वतः स्वतःसाठी दिव्यदृष्टी दाता बनाल. जसे भक्तीमार्गामध्ये आतूर होऊन आठवण करतात तर साक्षात्कार होतो. आपल्या मेहनतीने जसे की दिव्यदृष्टी दाता बनतात. तुम्ही देखील आठवणीची मेहनत करत रहाल तर खूप आनंदामध्ये रहाल आणि साक्षात्कार होत राहतील. ही सारी दुनिया विसरायला होईल. मनमनाभव होईल. अजून काय पाहिजे! मग योगबलाने तुम्ही आपले शरीर सोडता. भक्तीमध्ये देखील मेहनत करावी लागते, यामध्ये देखील मेहनत केली पाहिजे. मेहनत करण्यासाठी बाबा रस्ता खूप फर्स्टक्लास सांगत असतात. स्वतःला आत्मा समजल्याने मग देहाचे भानच राहणार नाही. जणू बाप समान बनाल. साक्षात्कार घडवत रहाल. खूप आनंदही वाटेल. सर्व गायन शेवटच्या रिझल्टचे आहे. आपल्या नावा-रूपापासून देखील न्यारे व्हायचे आहे तर मग दुसऱ्याच्या नावा-रूपाची आठवण केल्याने काय हालत होईल! नॉलेज तर खूप सोपे आहे. प्राचीन भारताचा जो योग आहे, त्यामध्ये जादू आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे ब्रह्मज्ञानी देखील असे शरीर सोडतात - ‘मी आत्मा आहे, परमात्म्यामध्ये लीन व्हायचे आहे’. परंतु असे लीन कोणी होत नाही. आहेत ब्रह्मज्ञानी. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) पाहिलेले आहे की कसे बसल्या-बसल्या शरीर सोडतात. वायुमंडळ अतिशय शांत असते, सन्नाटा होतो. सन्नाटा देखील त्यांना जाणवेल जे ज्ञान मार्गामध्ये असतील, शांतीमध्ये राहणारे असतील. बाकी बरीच मुले तर अजून बाल्यावस्थेमध्ये आहेत. घडो-घडी कोसळतात, यामध्ये खूप-खूप गुप्त मेहनत आहे. भक्तीमार्गातील मेहनत दिसून येते. माळा फिरवा, देवघरामध्ये बसून भक्ती करा. इथे तर चालता-फिरता तुम्ही आठवणीमध्ये राहता. कोणालाही कळू शकत नाही की, हे राजाई घेत आहेत. योगाद्वारेच सारा हिशोब चुकता करायचा आहे. ज्ञानाने थोडाच चुकता होईल. हिशोब चुकता होईल आठवणीद्वारे. कर्मभोग आठवणीनेच चुकता होईल. हे आहे गुप्त. बाबा सर्व काही गुप्तपणे शिकवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मनसा-वाचा-कर्मणा कधीही क्रोध करायचा नाही. या तीन खिडक्यांवर खूप लक्ष ठेवायचे आहे. वाणी अधिक चालवायची नाही. एकमेकांना दुःख द्यायचे नाही.

२) ज्ञान आणि योगामध्ये तल्लीन राहून अंतिम दृश्ये बघायची आहेत. आपल्या आणि दुसऱ्यांच्या नावा-रूपाला विसरून, ‘मी आत्मा आहे’, या स्मृतीने देहभानाला नाहीसे करायचे आहे.

वरदान:-
प्रेमाच्या बाणाने प्रेमामध्ये घायाळ करणारे स्नेह आणि प्राप्ती संपन्न लवलीन आत्मा भव

जसे लौकिक रीतीने कोणी कोणाच्या प्रेमामध्ये लवलीन (एकरूप) होतो तर चेहऱ्यावरून, डोळ्यांवरून, वाणीवरून अनुभव होतो की हा एकरूप झाला आहे, आशिक आहे. तर तुम्ही जेव्हा अशा स्टेजवर पोहोचता तर जितके आपल्यामध्ये बाबांविषयीचे प्रेम इमर्ज असेल तितकाच प्रेमाचा बाण इतरांना देखील प्रेमाने घायाळ करेल. भाषणाच्या लिंकचा विचार करणे, पॉईंट्सची उजळणी करणे - हे स्वरूप नसावे, स्नेह आणि प्राप्तीचे संपन्न स्वरूप, एकरूप झालेले स्वरूप असावे. ऑथॉरिटी होऊन बोलण्याने त्याचा प्रभाव पडतो.

बोधवाक्य:-
संपूर्णते द्वारे समाप्तीच्या वेळेला समीप आणा.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रूपी कल्चरला धारण करा:-

एवढे तर सर्वजण समजू लागले आहेत की, हे “कोणीतरी आहेत”, परंतु ‘हेच आहेत’ आणि ‘हेच एक आहेत’, आता या हालचालीचा नांगर फिरवा. आता - ‘अजूनही आहेत’, ‘हे देखील आहेत’, इथपर्यंत पोहोचले आहेत परंतु आता ‘हेच एक आहेत’, असा तीर मारा. धरणी तर बनली आहे आणि बनत जाईल. परंतु जे फाउंडेशन आहे, नवीनता आहे, बीज आहे, ते आहे - नवीन ज्ञान. निस्वार्थ प्रेम आहे, रुहानी प्रेम आहे याचा तर अनुभव करतात परंतु आता प्रेमा सोबतच ज्ञानाच्या ऑथॉरिटीवाले आत्मे आहेत, सत्य ज्ञानाची ऑथॉरिटी आहे, हे प्रत्यक्ष करा तेव्हा प्रत्यक्षता होईल.