31-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो - तुम्ही आपला वेळ वाया घालवायचा नाही, आतल्या आत ज्ञानाचे मनन-चिंतन करत रहा तर निद्राजीत बनाल, आळस इत्यादी येणार नाही"

प्रश्न:-
तुम्ही मुले बाबांवर फिदा का झाला आहात? फिदा होणे याचा अर्थ काय आहे?

उत्तर:-
फिदा होणे अर्थात बाबांच्या आठवणीमध्ये एकरूप होणे. जेव्हा आठवणीमध्ये एकरूप होता तेव्हा आत्मा रुपी बॅटरी चार्ज होते. ही आत्मा रुपी बॅटरी निराकार बाबांशी जोडली जाते, त्यामुळे बॅटरी चार्ज होते, विकर्म विनाश होतात. कमाई जमा होते.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत - आता इथे तुम्ही शरीरासोबत बसले आहात. तुम्ही जाणता मृत्यूलोकमध्ये हे अंतिम शरीर आहे. नंतर काय होणार? मग बाबांसोबत शांतीधाममध्ये एकत्र होणार. हे शरीर नसणार नंतर मग स्वर्गामध्ये येतील ते नंबरवार पुरुषार्थानुसार, सर्वच काही एकत्र येणार नाहीत. ही राजधानी स्थापन होत आहे. जसे बाबा शांतीचे, सुखाचे सागर आहेत; तर बाबा मुलांना देखील असेच शांतीचा, सुखाचा सागर बनवत आहेत; मग जाऊन शांतीधाममध्ये विराजमान व्हायचे आहे. तर बाबांची, घराची आणि सुखधामची आठवण करायची आहे. इथे तुम्ही जितके या अवस्थेमध्ये (योगमध्ये) बसता, तेवढी तुमची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतात, याला म्हटले जाते - ‘योगाग्नी’. संन्यासी काही सर्वशक्तिमान सोबत योग लावत नाहीत. ते तर राहण्याचे स्थान, ‘ब्रह्म’सोबत योग लावतात. ते आहेत तत्व योगी, ब्रह्म अथवा तत्वा सोबत योग लावणारे. इथे जिव आत्म्यांचा खेळ असतो, तिथे स्वीट होममध्ये फक्त आत्मे राहतात. त्या स्वीट होममध्ये जाण्यासाठी सारी दुनिया पुरुषार्थ करत असते. संन्याशी देखील म्हणतात - ‘आम्ही ब्रह्ममध्ये लिन होणार’. असे म्हणत नाहीत की आम्ही ब्रह्ममध्ये जाऊन निवास करू. हे तर तुम्ही मुले आता समजले आहात. भक्ती मार्गामध्ये किती कट-कट ऐकत असतात. इथे तर बाबा येऊन फक्त दोन शब्द समजावून सांगतात. जसे मंत्र जपतात ना. कोणी गुरुची आठवण करतात, कोणी कोणाची आठवण करतात. विद्यार्थी शिक्षकाची आठवण करतात. आता तुम्हा मुलांना फक्त बाबा आणि घरच लक्षात आहे. बाबांकडून तुम्ही वारसा घेता शांतीधाम आणि सुखधामचा. तेच मनामध्ये लक्षात राहते. मुखाने काहीही बोलायचे नाहीये. बुद्धीने तुम्ही जाणता शांतीधामच्या नंतर आहे सुखधाम. आम्ही अगोदर मुक्तीमध्ये नंतर मग जीवनमुक्तीमध्ये जाणार. मुक्ती-जीवनमुक्ती दाता एक बाबाच आहेत. बाबा मुलांना वारंवार समजावून सांगत असतात - वेळ वाया घालवू नका. जन्म-जन्मांतरीचे पापांचे ओझे डोक्यावर आहे. या जन्मातील पापे इत्यादीची तर स्मृती असते. सतयुगामध्ये या गोष्टी असत नाहीत. इथे मुले जाणतात जन्म-जन्मांतरीच्या पापांचे ओझे आहे. नंबरवन आहे काम विकाराचे विकर्म, जे जन्म-जन्मांतर करत आले आहात आणि बाबांची निंदा सुद्धा खूप केली आहे. बाबा जे सर्वांना सद्गती देतात, त्यांची किती निंदा केली आहे. हे सर्व लक्षात ठेवायचे आहे. आता जितके होऊ शकेल बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. वास्तविक ‘वाह सद्गुरु’ असे म्हटले जाते, गुरु सुद्धा नाही. ‘वाह गुरू’चा कुठलाही अर्थ नाही. ‘वाह सद्गुरु!’ मुक्ती-जीवनमुक्ती तेच देतात ना. तिथे (दुनियेमध्ये) गुरु तर अनेक आहेत. हे आहेत एकच सद्गुरु. तुम्ही लोकांनी गुरू तर खूप केले आहेत. प्रत्येक जन्मामध्ये दोन-चार गुरु करत असतात. एक गुरू करुन मग अजून दुसरीकडे जातात. कदाचित इथूनच जास्त चांगला मार्ग मिळेल, वेगवेगळ्या गुरूंकडून प्रयत्न करत राहतात. परंतु मिळत काहीच नाही. आता तुम्ही मुले जाणता इथे रहायचे तर नाहीये. सर्वांना जायचे आहे शांतीधामला. बाबा तुमच्या निमंत्रणावरून आले आहेत. तुम्हाला आठवण करून देत आहेत - तुम्ही मला सांगितले की, ‘या, येऊन आम्हाला पतिता पासून पावन बनवा’. पावन तर शांतीधाम देखील आहे सुखधाम सुद्धा आहे. बोलावतात - आम्हाला घरी घेऊन जा. घराची सर्वांना आठवण आहे. आत्मा पटकन सांगेल आमचे निवासस्थान परमधाम आहे. परमपिता परमात्मा देखील परमधाममध्ये राहतात. आम्ही देखील परमधाम मध्ये राहतो.

आता बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘तुमच्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे’. ही आहे बेहदची गोष्ट. बेहदची दशा सर्वांवर बसली आहे. चक्र फिरत राहते. आम्हीच सुखा मधून दुःखामध्ये, मग दुःखा मधून सुखामध्ये येतो. शांतीधाम, सुखधाम आणि मग हे दुःखधाम. हे देखील आता तुम्ही मुलेच समजता, मनुष्यांच्या बुद्धीमध्ये तर काही येत नाही. आता बाबा जिवंतपणी मरायला शिकवत आहेत. परवाने शमेवर फिदा होतात. कोणी मग त्याच्यावर आशिक होऊन खाक होतात, कोणी फिदा होतात, कोणी मग फेरी मारून निघून जातात. ही देखील बॅटरी आहे ना, सर्वांचा बुद्धीयोग त्या एकाशी आहे. निराकार बाबांसोबत बॅटरी जणू जोडलेली आहे. या आत्म्याच्या (ब्रह्मा बाबांच्या) तर खूप जवळ आहेत त्यामुळे खूप सोपे होते. बाबांची आठवण केल्याने तुमची बॅटरी चार्ज होत जाते. तुम्हा मुलांना थोडे अवघड तर होते, यांना (ब्रह्माबाबांना) सोपे आहे. तरीसुद्धा यांना पुरुषार्थ तर करावा लागतो, जितका तुम्हा मुलांना करावा लागतो. हे जितके जवळ आहेत, तितकाच मग बोजा (जबाबदाऱ्या) देखील खूप आहे. गायन देखील आहे - ‘जिनके माथे मामला…’ यांच्यावर तर खूप जबाबदाऱ्या आहेत ना. बाबा तर आहेतच संपूर्ण, यांना (ब्रह्मा बाबांना) संपूर्ण बनायचे आहे, यांना सर्वांची खूप देखरेख करावी लागते. भले दोघे एकत्र आहेत तरी देखील काळजी तर असतेच ना. मुलींना किती मार पडतो तर जसे काही दुःख होते. कर्मातीत अवस्था तर नंतर शेवटी होईल, तोपर्यंत काळजी वाटत राहते. मुलींची चिट्ठी आली नाही तरी देखील काळजी वाटत राहते - आजारी तर नसेल? सेवेचा समाचार आल्यावर बाबा जरूर त्यांची आठवण करतील. बाबा या तनाद्वारे (ब्रह्मा बाबांच्या शरीराद्वारे) सेवा करतात. कधी मुरली थोडी चालते, असे तर २-४ दिवस मुरली भले नाही आली, तरी तुमच्या जवळ पॉईंट्स तर असतातच. तुम्हाला देखील आपली डायरी बघितली पाहिजे (वाचली पाहिजे). बॅज वरून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. जेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्म होता तेव्हा दुसरा कोणताही ही धर्म नव्हता. झाडाचे चित्र जरूर सोबत असायला हवे. वेगवेगळ्या धर्मांचे रहस्य समजावून सांगायचे असते. अगदी सुरुवातीला एकच अद्वैत धर्म होता. विश्वामध्ये सुख, शांती, पवित्रता होती. बाबांकडूनच वारसा मिळतो कारण बाबाच शांतीचे सागर, सुखाचे सागर आहेत ना. या आधी तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता जसे बाबांच्या बुद्धीमध्ये हे सर्व आहे, तसे तुम्ही देखील बनता. तुम्ही देखील सुखाचा, शांतीचा सागर बनता. आपला पोतामेल पहायचा आहे - कुठल्या गोष्टीमध्ये कमी आहे? मी खरोखर प्रेमाचा सागर आहे, असे कोणते वर्तन तर होत नाही ना ज्यामुळे कोणी नाराज होत असेल? स्वतःवर नजर ठेवायची आहे. असे नाही की बाबा आशीर्वाद देतील तेव्हा तुम्ही असे बनाल. नाही. बाबा म्हणतात - ‘मी ड्रामा अनुसार आपल्या वेळेवर आलो आहे’. माझा हा कल्प-कल्पाचा प्रोग्राम आहे. हे ज्ञान दुसरे कोणीही देऊ शकणार नाही. सत् बाबा, सत् टीचर, सद्गुरु एकच आहेत. हा जरी पक्का निश्चय असेल तरी तुमचा विजय आहे. इतके अनेक जे धर्म आहेत, त्या सर्वांचा विनाश तर होणारच आहे. जेव्हा सतयुगी सूर्यवंशी घराणे होते तेव्हा दुसरे कुठलेही घराणे नव्हते, तरीसुद्धा असेच होणार. संपूर्ण दिवसभर अशा प्रकारे स्वतःशीच गोष्टी करत रहा. ज्ञानाचे मुख्य-मुख्य पॉईंट्स आतमध्ये टपकत राहिले पाहिजेत, खुशी झाली पाहिजे. बाबांमध्ये ज्ञान आहे, ते तुम्हाला आता मिळत आहे. त्याला धारण करायचे आहे, याकरिता वेळ फुकट घालवता कामा नये. रात्रीचा सुद्धा वेळ मिळतो. दिसून येते आत्मा इंद्रियांद्वारे काम करता-करता थकून गेली आहे तर मग झोपून जाते. बाबा तुमची भक्तिमार्गातील सर्व थकावट दूर करून अथक बनवतात. जसे रात्री आत्मा थकून जाते तर मग शरीरापासून वेगळी होते, ज्याला निद्रा म्हटले जाते. झोपते कोण? आत्म्यासोबत कर्मेंद्रिये सुद्धा झोपतात. तर रात्री झोपतेवेळी सुद्धा बाबांची आठवण करून अशा प्रकारचे विचार करत-करत झोपी गेले पाहिजे. होऊ शकते की शेवटी तुम्ही दिवस-रात्र झोपेला जिंकणारे निद्राजीत बनाल. मग सतत आठवणीमध्ये रहाल, अत्यंत खुशीमध्ये रहाल. ८४ जन्मांच्या चक्राला बुद्धीने फिरवत रहाल. जांभई किंवा डुलकी इत्यादी येणार नाही. हे निद्रेला जिंकणाऱ्या मुलांनो, कमाई करताना कधीही झोप काढायची नाही. जेव्हा ज्ञानामध्ये मश्गुल व्हाल तेव्हा तुमची अवस्था अशी होईल. इथे (सेंटरवर) तुम्ही थोडा वेळ बसता तेव्हा कधी जांभई किंवा डुलकी येता कामा नये. आणि इतरत्र ध्यान गेल्याने मग जांभई येईल.

तुम्हा मुलांना हे देखील लक्षात ठेवायचे आहे की आम्हाला इतरांना देखील आप समान बनवायचे आहे. प्रजा तर हवी ना. नाहीतर राजा कसे बनणार. ‘धन दिये धन ना खुटे…’ दुसऱ्यांना समजावून सांगाल, दान देत रहाल तर कधीही कमी पडणार नाही. नाहीतर जमा होणार नाही. मनुष्य तर खूप कंजूस देखील असतात. धनापायी अनेक भांडण-तंटे होतात. इथे बाबा म्हणतात - ‘तुम्हाला मी हे अविनाशी धन देतो तर तुम्ही मग ते इतरांना देत रहा. यामध्ये कंजूस बनायचे नाही. जर तुम्ही दान देत नसाल तर याचा अर्थ ते तुमच्याकडे नाही. ही कमाई अशी आहे, यामध्ये युद्ध इत्यादी करण्याची गोष्ट नाही, याला म्हटले जाते गुप्त. तुम्ही आहात गुप्त योद्धे. ५ विकारांसोबत तुम्ही लढता. तुम्हाला अननोन वॉरियर्स (अज्ञात योद्धे) सुद्धा म्हटले जाते. वजिरांकडे लष्कर खूप असते. इथे देखील असेच आहे, प्रजा पुष्कळ आहे, बाकी कॅप्टन, मेजर इत्यादी सर्व आहेत. तुम्ही सेना आहात, त्यामध्ये सुद्धा नंबरवार आहात. बाबा समजतील हे कमांडर आहेत, हे मेजर आहेत. महारथी, घोडेस्वार आहेत ना. हे तर बाबा जाणतात, समजावून सांगणारे तीन प्रकारचे आहेत. तुम्ही व्यापार करता अविनाशी ज्ञान रत्नांचा. जसे ते (दुनियेमध्ये) सुद्धा व्यापार शिकवतात, गुरुचे देहावसान झाले तर त्याच्या पाठीमागे त्याचे शिष्य चालवतात ना. ते आहे स्थूल, हे आहे सूक्ष्म. अनेक प्रकारचे धर्म आहेत. प्रत्येकाचे आपले-आपले मत आहे. तुम्ही सुद्धा जाऊन त्यांचे ऐकू शकता - ते लोक काय शिकवतात, काय-काय सांगतात. बाबा तर तुम्हाला ८४ च्या चक्राची कहाणी सांगतात. बाबा येऊन तुम्हा मुलांनाच वारसा देतात, हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता कलियुग अंतापर्यंत हे आत्मे येत राहतात, वृद्धी होत राहते. जोपर्यंत बाबा इथे आहेत, संख्या वाढतच जाते मग इतके सर्व राहणार कुठे? खाणार कुठे? सर्व हिशोब ठेवावा लागतो ना. तिथे (सतयुगामध्ये) तर इतके मनुष्य असत नाहीत. खाणारेच थोडे, सर्वांची आपापली शेती असते. धान्य ठेवून काय करणार. तिथे पाऊस इत्यादीसाठी यज्ञ वगैरे करावे लागत नाहीत, जसे इथे करतात. आता बाबांनी यज्ञ रचला आहे. संपूर्ण जुनी सृष्टी या यज्ञामध्ये स्वाहा होणार आहे. हा आहे बेहदचा यज्ञ. ते लोक पावसासाठी हदचा यज्ञ करतात. पाऊस पडला तर खुश होतात, यज्ञ सफल झाला. नाही पडला तर धान्य पिकणार नाही, दुष्काळ पडतो. भले यज्ञ करतात परंतु पाऊस जर पडणारच नसेल तर काय करू शकतात. सर्व संकटे तर येणारच आहेत. मुसळधार पाऊस, भूकंप हे सर्व होणार आहे. ड्रामाच्या चक्राला तर तुम्ही मुलांनी जाणले आहे. हे सृष्टी चक्राचे चित्र देखील खूप मोठे असायला हवे. मोक्याच्या ठिकाणी जाहिरात लावलेली असेल तर मोठ-मोठ्या व्यक्ती वाचतील. समजतील की खरोखर आता पुरुषोत्तम संगमयुग आहे. कलियुगामध्ये तर पुष्कळ मनुष्यमात्र आहेत. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. तर मग बाकी इतके सर्व नक्कीच नष्ट होतील. शिवजयंती म्हणजेच स्वर्ग जयंती, लक्ष्मी-नारायण जयंती. गोष्ट तर अतिशय सोपी आहे. शिवजयंती साजरी केली जाते. ते आहेत बेहदचे बाबा, त्यांनीच स्वर्गाची स्थापना केली होती. कालचीच गोष्ट आहे, तुम्ही स्वर्गवासी होता. ही तर खूप सोपी गोष्ट आहे. मुलांनी खूप चांगल्या रीतीने समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगायचे आहे. आनंदात सुद्धा रहायचे आहे. आता आम्ही कायमसाठी रोगराई पासून मुक्त होऊन १००% हेल्दी, वेल्दी बनतो. आता वेळ फार थोडा आहे. भले कितीही दुःख, मृत्यू इत्यादी होतील, तुम्ही त्यावेळी अतिशय आनंदामध्ये असाल. तुम्ही जाणता मृत्यू तर येणारच आहे. हा कल्प-कल्पाचा खेळ आहे. यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही. जे पक्के आहेत ते कधीच हाय-हाय करणार नाहीत. मनुष्य कोणाचे ऑपरेशन वगैरे बघतात तर चक्कर येते. आता तर किती मोठ्या प्रमाणात मृत्यू होतील. तुम्ही मुले समजता हे तर सर्व होणारच आहे. गायन देखील आहे - ‘मिरूआ मौत मलू का शिकार…’ या जुन्या दुनियेमध्ये तर तुम्ही पुष्कळ दुःख झेलले आहे, आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) बाबांकडून अविनाशी ज्ञानधन घे