31-08-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2006 ओम शान्ति
मधुबन
“स्मृती स्वरूप,
अनुभवी मूर्त बनून सेकंदाच्या तीव्र गतीने परिवर्तन करून पास विद ऑनर बना”
आज बापदादा चोहो
बाजूच्या मुलांमध्ये तीन विशेष भाग्याच्या रेषा मस्तकामध्ये चमकताना बघत आहेत.
सर्वांची मस्तके भाग्याच्या रेषांनी चमकत आहेत. एक आहे - परमात्म पालनेच्या भाग्याची
रेषा. दुसरी आहे - श्रेष्ठ शिक्षकाद्वारे शिक्षणाच्या भाग्याची रेषा. तिसरी आहे -
सद्गुरू द्वारे श्रीमताच्या भाग्याची रेषा. तसे तर तुमचे भाग्य अथाह आहे तरीही आज
या विशेष तीन रेषा बघत आहेत. तुम्ही सुद्धा आपल्या मस्तकामध्ये चमकणाऱ्या रेषांचा
अनुभव करत आहात ना! सर्वात श्रेष्ठ आहे परमात्म प्रेमाच्या पालनेची रेषा. जसे बाबा
उच्च ते उच्च आहेत तर परमात्म पालना सुद्धा उच्च ते उच्च आहे. ही पालना किती
थोड्यांनाच प्राप्त होते, परंतु तुम्ही सर्व या पालनेचे पात्र बनला आहात. ही पालना
साऱ्या कल्पामध्ये तुम्हा मुलांना एकदाच प्राप्त होते. आता नाही तर कधीच प्राप्त
होऊ शकत नाही. ही परमात्म पालना, परमात्म प्रेम, परमात्मप्राप्ति कोटींमध्ये काही
आत्म्यांनाच अनुभव होते. तुम्ही सगळे अनुभवी तर आहात ना! अनुभव आहे? पालनेचा सुद्धा
अनुभव आहे, शिक्षण आणि श्रीमत याचा देखील अनुभव आहे ना? अनुभवी मूर्त आहात ना? तर
सदैव आपल्या मस्तकामध्ये हा भाग्याचा तारा चमकत असलेला दिसून येतो, सदैव? की कधी
चमकत असलेला तारा डल (मंद) सुद्धा होतो का? मंद होता कामा नये. जर चमकत असलेला तारा
मंद होत असेल तर त्याचे कारण काय आहे? जाणता का?
बापदादांनी पाहिले आहे,
त्याचे कारण आहे - स्मृती स्वरूप बनलेला नाहीत. विचार करता - ‘मी आत्मा आहे’, परंतु
विचार स्वरूप बनता, स्मृती स्वरूप कमी बनता. जोपर्यंत स्मृती स्वरूप सदैव बनत नाही
तोपर्यंत समर्थी (शक्ती) येऊ शकत नाही. स्मृतीच समर्थी (शक्ती) देते. स्मृती
स्वरूपच समर्थ स्वरूप आहे, म्हणून भाग्याचा तारा कमी चमकत आहे. आपणच आपल्याला विचारा
की जास्त वेळ विचार स्वरूप बनता की स्मृती स्वरूप बनता? विचार स्वरूप बनल्याने
विचार खूप चांगले करता, ‘मी असा आहे, मी असा आहे, मी असा आहे…’ परंतु स्मृती स्वरूप
नसल्याकारणाने चांगले विचार करत असताना देखील व्यर्थ संकल्प, साधारण संकल्प मिक्स
होऊन जातात. वास्तविक बघितले तर तुमचे अनादि स्वरूप ‘स्मृती सो समर्थ स्वरूप’ आहे.
विचार करणारे स्वरूप नाहीये. आणि आदिला (सुरुवातीला) देखील यावेळच्या स्मृती
स्वरूपाचे प्रारब्ध प्राप्त होते. तर अनादि आणि आदि स्मृती स्वरूप आहे आणि यावेळी
अंताला संगम समयी देखील स्मृती स्वरूप बनता. तर आदि, अनादि आणि अंतिम तिन्ही
काळांमध्ये स्मृती स्वरूप आहात, विचार स्वरूप नाही आहात. म्हणून बापदादांनी यापूर्वी
देखील सांगितले आहे की, वर्तमान समयी अनुभवी मूर्त बनणे ही श्रेष्ठ स्टेज आहे.
विचार करता - ‘आत्मा आहे, परमात्म प्राप्ती आहे’, परंतु समजणे आणि अनुभव करणे
यामध्ये खूप अंतर आहे. अनुभवी मूर्त कधीही ना मायेपासून धोका खाऊ शकतो, ना दुःखाची
अनुभुती करू शकतो. हे जे अधून-मधून मायेचे खेळ पाहता, किंवा खेळ खेळता सुद्धा,
त्याचे कारण आहे - ‘अनुभवी मूर्त’ची कमतरता आहे. अनुभवाची ऑथॉरिटी सर्वात श्रेष्ठ
आहे. तर बापदादांनी पाहिले की बरीच मुले विचार करतात परंतु स्वरूपाची अनुभुती कमी
आहे.
आजच्या दुनियेमध्ये
मेजॉरिटी आत्मे बघणे आणि ऐकणे याला थकून गेली आहेत परंतु अनुभवाद्वारे प्राप्ती करू
इच्छितात. तर अनुभव करविणे, हे एक अनुभवीच करू शकतो. आणि अनुभवी आत्मा सदैव पुढे
जात राहील, उडत राहील कारण अनुभवी आत्म्यामध्ये उमंग-उत्साह नेहमी इमर्ज रूपामध्ये
असतो. तर चेक करा प्रत्येक पॉईंटचे अनुभवी मूर्त बनला आहात? अनुभवाची ऑथॉरिटी
तुमच्या प्रत्येक कर्मामध्ये दिसून येते? प्रत्येक बोल, प्रत्येक संकल्प अनुभवाच्या
ऑथॉरिटीने आहे का केवळ समजण्याच्या आधारावर आहे? एक आहे समजणे, दुसरे आहे अनुभव करणे.
प्रत्येक सब्जेक्टमध्ये ज्ञानाचे पॉईंट्स वर्णन करणे, ते तर बाहेरचे स्पीकर सुद्धा
खूप स्पीच करतात. परंतु प्रत्येक पॉईंटचे अनुभवी स्वरूप बनणे, हा आहे - ‘ज्ञानी तू
आत्मा’. योग लावणारे पुष्कळ आहेत, योगामध्ये बसणारे भरपूर आहेत, परंतु योगाचा अनुभव
अर्थात शक्ती स्वरूप बनणे आणि शक्ती स्वरूपाची परख ही आहे की, ज्यावेळी ज्या शक्तीची
गरज आहे, त्यावेळी त्या शक्तीचे आवाहन करून निर्विघ्न स्वरूप बनेल. परंतु एका जरी
शक्तीची जर का कमी असेल, वर्णन आहे परंतु स्वरूप नसेल तरी देखील ऐनवेळेला धोका खाऊ
शकता. हवी आहे सहनशक्ती आणि तुम्ही युज कराल सामना करण्याची शक्ती, तर योगयुक्त
अनुभवी स्वरूप म्हटले जाणार नाही. चारही सब्जेक्टमध्ये स्मृती स्वरूप अथवा अनुभवी
स्वरूप याची निशाणी काय असेल? स्थितीमध्ये निमित्त भाव, वृत्तीमध्ये सदैव शुभ भाव,
आत्मिक भाव, निःस्वार्थ भाव. वायुमंडळामध्ये किंवा संबंध-संपर्कामध्ये सदैव निर्मान
भाव, वाणीमध्ये सदैव निर्मल वाणी. या विशेषता अनुभवी मूर्तच्या कायम नॅचरल नेचर
असेल. नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव). आता बरीच मुले कधी-कधी म्हणतात की, आमची इच्छा
नसते असे करण्याची परंतु माझी जुनी नेचर आहे (जुना स्वभाव आहे). नेचर नॅचरल तेच काम
करते, विचार करावा लागत नाही, परंतु नेचर नॅचरली काम करते. तर स्वतःला चेक करा -
माझे नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) काय आहे? जर कोणताही जुना स्वभाव अंश मात्र जरी
असेल, तर तो सतत कार्यामध्ये येता-येता पक्का संस्कार बनतो. त्या जुन्या नेचरला,
जुन्या स्वभावाला, जुन्या संस्कारांना नष्ट देखील करू इच्छिता परंतु करू शकत नाही,
त्याचे कारण काय आहे? नॉलेजफूल तर सगळ्या बाबतीत बनला आहात, परंतु जी इच्छा असते की
असे व्हायला नको, ते होऊन जाते, तर याचे कारण काय आहे? परिवर्तन करण्याची शक्ती कमी
आहे. मेजॉरिटीमध्ये दिसून येते की, परिवर्तन शक्तीला समजतात देखील, वर्णन सुद्धा
करतात, जर सर्वांना ‘परिवर्तन शक्ती’च्या टॉपिकवर लिहिण्यासाठी सांगितले किंवा भाषण
करायला सांगितले तर बापदादांना माहित आहे की सगळे खूप हुशार आहेत, खूप चांगले भाषण
सुद्धा करू शकतात, लिहू देखील शकतात आणि दुसरे कोणी आले तर त्याला समजावून सुद्धा
खूप चांगले सांगतात - काही हरकत नाही, परिवर्तन करा. परंतु स्वतःमध्ये परिवर्तन
करण्याची शक्ती कितपत आहे! वर्तमान समयाच्या महत्वाला लक्षात घेऊन परिवर्तन
करण्यामध्ये वेळ लावता कामा नये. सेकंदामध्ये परिवर्तनाची शक्ती उपयोगात यायला हवी
कारण जर समजता की, असे व्हायला नको आहे, तर समजून देखील जर परिवर्तन करू शकत नसाल,
तर त्याचे कारण काय आहे? विचार करता परंतु स्वरूप बनत नाही. संपूर्ण दिवसामध्ये
‘विचार स्वरूप’ जास्त बनता, ‘स्मृती सो समर्थ स्वरूप’ ते मेजॉरिटी कमी आहे.
आता तीव्र गतीचा काळ
आहे, तीव्र पुरुषार्थाची वेळ आहे, साधारण पुरुषार्थाची वेळ नाही, सेकंदामध्ये
परिवर्तन याचा अर्थ आहे - स्मृती स्वरुपाद्वारे एका सेकंदामध्ये निर्विकल्प, व्यर्थ
संकल्प निवृत्त व्हावेत, कशासाठी? कारण तुम्हीच समयाच्या समाप्तीला समीप आणणारे
निमित्त आहात. तर सध्याच्या वेळेच्या महत्वा प्रमाणे जर जाणता देखील की, प्रत्येक
पावलामध्ये पद्म सामावलेला आहे, मग वाढवण्या विषयी तर बुद्धीमध्ये ठेवता परंतु
गमावण्याचे देखील बुद्धीमध्ये ठेवा. जर एका पावलामध्ये पद्म बनत असेल तर एका
पावलामध्ये पद्म गमावता सुद्धा, हो की नाही? तर आता मिनिटाची गोष्ट सुद्धा गेली,
दुसऱ्यांना म्हणता - ‘वन मिनिट सायलेन्समध्ये रहा’; परंतु तुम्हा लोकांसाठी सेकंदाची
गोष्ट असली पाहिजे. जसे ‘हां’ आणि ‘ना’ विचार करण्यामध्ये किती वेळ लागतो? सेकंद.
तर परिवर्तन शक्ती इतकी फास्ट हवी. समजले की, हे ठीक आहे, हे ठीक नाहीये, तर ‘ठीक
नाही’ला बिंदू लावायचा आहे आणि ‘ठीक’ ला प्रॅक्टिकल मध्ये आणायचे आहे. आता बिंदूच्या
महत्वाला कार्यामध्ये लावा. तीन बिंदूना तर जाणता ना! परंतु बिंदुला वेळेवर
कार्यामध्ये लावा. जसे वैज्ञानिक सर्व गोष्टींना वेगवान बनवत आहेत आणि परिवर्तनाची
शक्ती सुद्धा जास्ती कार्यामध्ये लावत आहेत. तर सायलेन्सची शक्तीवाले आता लक्ष्य
ठेवा जर परिवर्तन करायचे आहे, नॉलेजफूल असाल तर आता पॉवरफुल बना, सेकंदाच्या गतीने.
‘करत आहोत… होऊन जाऊ... करूच…,’ हे नको. होऊ शकते की अवघड आहे? कारण लास्ट समयी
सेकंदाचा पेपर येणार आहे, मिनिटाचा नाही, तर सेकंदाचा अभ्यास खूपकाळाचा असेल
तेव्हाच तर सेकंदामध्ये पास विद ऑनर बनाल ना! परमात्म स्टुडंट आहात, परमात्म शिक्षण
शिकत आहात, तर पास विद ऑनर बनायचेच आहे ना! पासिंगचे मार्क्स घेतलेत तर काय झाले!
पास विद ऑनर. तर काय लक्ष्य ठेवले आहे? जे समजतात पास विद ऑनर बनायचे आहे त्यांनी
हात वर करा, पास विद ऑनर? ऑनर शब्दाला अंडरलाईन करा. अच्छा. तर आता काय करावे लागेल?
‘मिनिट मोटर’ तर कॉमन आहे, आता सेकंदाचे काम आहे.
हां, पंजाबवाले, आता
सेकंदाचा मामला आहे. यामध्ये नंबर वन कोण होईल? पंजाब. काही मोठी गोष्ट नाही आहे
ना. जितके अभिमानाने म्हणता, खूप छान म्हणता, अभिमानाने म्हणता, बापदादा जेव्हा
ऐकतात तर खूप खुश होतात, म्हणता - काही मोठी गोष्ट नाही आहे, बापदादा सोबत आहेत.
ऑथॉरिटी तर सोबत आहे, तर आता काय करायचे आहे? आता वेगवान बनावे लागेल. सेवा तर करत
आहात, आणि सेवेशिवाय आणखी करणार तरी काय? रिकामे बसणार का? सेवा तर ब्राह्मण
आत्म्यांचा धर्म आहे, कर्म आहे. परंतु आता सेवे सोबतच समर्थ स्वरूप, जितका सेवेचा
उमंग-उत्साह दाखवला आहे, बापदादा खुश आहेत, मुबारक सुद्धा देत आहेत. परंतु जसा
सेवेचा ताज मिळाला आहे ना! (युवा पदयात्री ताज घालून बसले आहेत) ताज घातला आहे, बघा
किती सुंदर वाटत आहे. आता स्मृती स्वरूप बनण्याचा ताज घालून दाखवा. युथ ग्रुप आहे
ना! तर काय चमत्कार करणार? सेवेमध्ये देखील नंबरवन आणि समर्थ स्वरूपामध्ये सुद्धा
नंबरवन. संदेश देणे हा देखील ब्राह्मण जीवनाचा धर्म आणि कर्म आहे परंतु आता बापदादा
इशारा देत आहेत की परिवर्तनाची मशिनरी वेगवान करा. नाही तर पास विद ऑनर होणे अवघड
होईल. दीर्घकाळाचा अभ्यास हवा. विचार केला आणि केले. केवळ विचार स्वरूप बनू नका,
समर्थ स्मृती सो समर्थ स्वरूप बना. व्यर्थला तीव्र गतीने समाप्त करा. व्यर्थ संकल्प,
व्यर्थ बोल, व्यर्थ कर्म, व्यर्थ वेळ आणि संबंध-संपर्क यामध्ये देखील व्यर्थ विधी,
रीती सर्वांना समाप्त करा. जेव्हा ब्राह्मण आत्मे तीव्र गतीने असे स्व मधील व्यर्थची
समाप्ती करतील तेव्हा आत्म्यांचे आशीर्वाद आणि आपल्या पुण्याचे खाते तीव्र गतीने जमा
करतील.
बापदादांनी या अगोदर
सुद्धा सांगितले आहे की बापदादा तीन खाती चेक करतात. पुरुषार्थाच्या गतीचे खाते,
आशीर्वादांचे खाते, पुण्याचे खाते परंतु मेजॉरिटींचे खाते अजूनही खूप कमी आहे
म्हणून बापदादा आज या स्लोगनची आठवण करून देत आहेत की आता वेगवान बना, तीव्र
पुरुषार्थी बना. तीव्र गतीने समाप्ती करणारे बना. तीव्र गतीने मनसा द्वारे वायुमंडळ
परिवर्तन करणारे बना.
बापदादा एका
गोष्टीमध्ये सर्व मुलांवर खूप खुश सुद्धा आहेत. कोणत्या गोष्टी मध्ये? बाबांवर
सर्वांचे प्रेम अगदी जिगरी आहे, याची मुबारक आहे. परंतु सांगू काय करायचे! या
सीझनच्या समाप्तीपर्यंत, अजून तर वेळ बाकी आहे, या सीझनच्या समाप्तीपर्यंत तीव्र
गतिचा काही ना काही जलवा दाखवा. पसंत आहे? पसंत आहे? जे समजतात लक्ष्य आणि लक्षण
दोन्हीपण लक्षात ठेवणार, त्यांनी हात वर करा. डबल फॉरेनर्स सुद्धा ठेवणार, टीचर्स
देखील ठेवणार आणि यूथ देखील ठेवणार आणि पहिली लाईन वाले देखील ठेवणार! तर पद्म,
पद्म, पद्मपटीने इनॲडव्हान्स मुबारक असो. अच्छा.
आता-आता अभ्यास करा -
एका सेकंदामध्ये निर्विकल्प, निरव्यर्थ संकल्प बनून एकाग्र, एक बाप दुसरा ना कोणी,
या एकाच संकल्पामध्ये एकाग्र होऊन बसू शकता का! दुसरा कोणताही संकल्प नसावा. एकाच
संकल्पामध्ये एकाग्रतेच्या शक्तिच्या अनुभवामध्ये बसा. वेळ लावू नका, एका
सेकंदामध्ये. अच्छा.
चोहो बाजूंच्या
मुलांना ज्यांनीपण विशेष प्रेमपूर्वक आठवण पाठवली आहे, त्या प्रत्येक मुलाने आपल्या
नावाने प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासूनचे आशीर्वाद स्वीकार करा. बापदादा बघत आहेत
की सर्वांच्या मनामध्ये येते, आमची देखील आठवण, आमची देखील आठवण, परंतु तुम्ही मुले
संकल्प करता आणि बापदादांकडे त्याच वेळी पोहोचतो. म्हणून सर्व मुलांना प्रत्येकाला
नाव आणि विशेषता संपन्न प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.
तर सर्व सदैव स्मृति
स्वरूप, समर्थ स्वरूप, अनुभव स्वरूप श्रेष्ठ मुलांना, सदैव जो शुभ विचार केला ते
लगेच केले, जसे तुरंत दानाचे महत्व आहे तसे तुरंत परिवर्तनाचे देखील महत्व आहे. तर
तुरंत परिवर्तन करणाऱ्या विश्व परिवर्तक मुलांना, सदैव परमात्म पालना, परमात्म
प्रेम, परमात्म शिक्षण आणि परमात्म श्रीमताला प्रत्येक कर्मामध्ये आणणाऱ्या महावीर
मुलांना. सदैव हिंमत आणि एकाग्रता, एकते द्वारे नंबर वन तीव्र पुरुषार्थ करणाऱ्या
मुलांना बापदादांची हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण, हृदयापासून आशीर्वाद आणि नमस्ते.
दादींसोबत संवाद:-
सर्वजण चांगला पार्ट
बजावत आहेत. बापदादा प्रत्येकाच्या पार्टला बघून खुश होत आहेत. छोटे-छोटे देखील
चांगला पार्ट बजावत आहेत. असे समजू नका आम्ही तर छोटे आहोत. छोटे सुभान अल्लाह आहेत.
शक्तींचा आपला पार्ट आहे, पांडवांचा आपला पार्ट आहे. पांडव नसतील तरी देखील काम
चालणार नाही, शक्ति नसतील तरी देखील काम चालणार नाही, म्हणून भारतामध्ये चतुर्भुजचे
यादगार आहे. इतर कोणत्याही धर्मामध्ये चतुर्भुज दाखवत नाहीत परंतु भारताच्या यादगार
मध्ये चतुर्भुजचे महत्व आहे. तर दोघेही चांगला पार्ट बजावत आहेत परंतु आता लवकर
करायचे आहे, बस्स. कधी-कधी थोडे ढिले पडता. आता ढिले पडण्याची वेळ नाही आहे.
वेगवेगळ्या गोष्टी तर होतच असतात परंतु आपल्याला गोष्टींचे रहस्य समजून राजयुक्त,
योगयुक्त, स्नेहयुक्त, सहयोग युक्त बनून चालायचे आहे. ठीक आहे ना. (दादीजींना
उद्देशून -) खूप छान वाटते ना? बघा कितीसारे आले आहेत? का आले आहेत? हे सर्व का आले
आहेत! तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. बापदादांना तर भेटायला आले आहेतच परंतु सोबत
जर दादी नसतील तर म्हणतात ना मजा येत नाही. आणि तुम्ही सर्व नसाल तरी देखील मजा येत
नाही.
वरदान:-
स्मृतीच्या
स्विच द्वारे स्व कल्याण आणि सर्वांचे कल्याण करणारे सिद्धी स्वरूप भव स्थितीचा
आधार स्मृति आहे. ही शक्तिशाली स्मृति रहावी की “मी बाबांचा आणि बाबा माझे”. तर याच
स्मृतीने स्वतःची स्थिती शक्तिशाली राहील आणि दुसऱ्यांना देखील शक्तिशाली बनवाल. जसे
स्विच ऑन केल्यामुळे प्रकाश पडतो तसे ही स्मृती देखील एक स्विच आहे. सदैव स्मृति
रुपी स्वीचवर अटेंशन (लक्ष) असेल तर स्वतःचे आणि सर्वांचे कल्याण करत रहाल. नविन
जन्म झाला तर नविन स्मृति असाव्यात. जुन्या सर्व स्मृति समाप्त - याच विधीने
‘सिद्धी स्वरूप’ चे वरदान प्राप्त होईल.
सुविचार:-
अतींद्रिय सुखाची
अनुभूति करण्यासाठी आपल्या शांत स्वरूप स्थितीमध्ये स्थित रहा.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना. बापदादा प्रेमाच्या बंधनामध्ये
बांधले गेले आहेत. सुटावेसे वाटले तरी देखील सुटू शकत नाहीत, म्हणून भक्तिमध्ये
देखील बंधनाचे चित्र दाखवले आहे. प्रॅक्टिकलमध्ये प्रेमाच्या बंधनामध्ये अव्यक्त
असून देखील बांधून घ्यावे लागते. व्यक्त मधून सोडवले तरी देखील सुटू शकले नाहीत. हा
प्रेमाचा धागा खूप मजबूत आहे. असे प्रेम स्वरूप बनून, एकमेकांना प्रेमाच्या
धाग्यामध्ये बांधून समीप संबंधाची आणि आपलेपणाची अनुभूती करवा.