31-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही आहात स्पिरिच्युअल रूहानी इनकाग्निटो सॅलवेशन आर्मी (अध्यात्मिक
रुहानी गुप्त मुक्ती सेना) तुम्हाला साऱ्या दुनियेला सॅलवेज करायचे आहे (वाचवायचे
आहे), बुडालेल्या बेड्याला (जीवन रुपी नावेला) पार न्यायचे आहे”
प्रश्न:-
संगमयुगावर
बाबा कोणती युनिव्हर्सिटी उघडतात जी साऱ्या कल्पामध्ये असत नाही?
उत्तर:-
राजाई प्राप्त करण्याकरिता शिक्षण शिकण्याची गॉड फादरली युनिव्हर्सिटी अथवा कॉलेज
संगमयुगावर बाबाच उघडतात. अशी युनिव्हर्सिटी साऱ्या कल्पामध्ये असत नाही. या
युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण शिकून तुम्ही डबल मुकुटधारी राजांचाही राजा बनता.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांना सर्वात अगोदर बाबा विचारतात - इथे येऊन जेव्हा बसता तर
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करता का? कारण इथे तुम्हाला कोणताही काम-धंदा,
मित्र-संबंधी इत्यादी काहीच नाही आहे. तुम्ही हा विचार करून येता की आम्ही बेहदच्या
बाबांना भेटण्यासाठी जात आहोत. कोण म्हणत आहे? आत्मा शरीराद्वारे बोलत आहे.
पारलौकिक बाबांनी हे शरीर उधारीवर घेतले आहे, यांच्याद्वारे समजावून सांगत आहेत. हे
एकदाच घडते जे बेहदचे बाबा येऊन शिकवतात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्याने
तुमचा बेडा (जीवनरूपी नांव) पार होईल. प्रत्येकाचा बेडा बुडालेला आहे, जो जितका
पुरुषार्थ करेल तितका बेडा पार होईल. गातात ना - ‘हे मांझी बेडी मेरी पार लगाओ’. खरे
तर प्रत्येकाला आपल्या पुरुषार्थाने पार जायचे आहे. जसे पोहायला शिकवतात आणि जेव्हा
शिकतात तेव्हा आपोआप पोहू लागतात. त्या सर्व आहेत भौतिक गोष्टी. या आहेत रुहानी (आत्मिक)
गोष्टी. तुम्ही जाणता आत्मा आता चिखलाच्या दलदली मध्ये अडकली आहे. यावर एक हरणाचे
देखील उदाहरण देतात. पाणी समजून जातात, परंतु तो असतो चिखल तर त्यामध्ये अडकून
पडतात. कधी-कधी स्टीमर्स (आगबोटी), गाड्या इत्यादी देखील चिखलामध्ये अडकून पडतात.
मग त्यांना सैलवेज करतात (त्या चिखलामधून बाहेर काढतात), ते सर्व आहेत सैलवेशन आर्मी
(मुक्ती दल), तुम्ही आहात रूहानी. तुम्ही जाणता सगळेच मायेच्या दलदलीमध्ये खूप
अडकलेले आहेत, याला मायेची दलदल म्हटले जाते. यातून तुम्ही कसे बाहेर पडू शकता ते
बाबा येऊन समजावून सांगतात. ते (दुनियावाले) सैलवेज करतात, त्यामध्ये मदत पाहिजे
मनुष्याला मनुष्याची. इथे तर मग आत्मा जाऊन दलदलीमध्ये अडकून पडली आहे. बाबा रस्ता
सांगतात की यातून तुम्ही कसे बाहेर पडू शकता. मग इतरांना देखील रस्ता सांगू शकता.
स्वतःला आणि इतरांना रस्ता सांगायचा आहे की तुमची नौका या विषय-सागरातून
क्षीरसागरामध्ये कशी जाईल. सतयुगाला म्हटले जाते क्षीरसागर अर्थात सुखाचा सागर. हा
आहे दुःखाचा सागर. रावण दुःखाच्या सागरामध्ये बुडवतो. बाबा येऊन सुखाच्या सागरामध्ये
घेऊन जातात.
तुम्हाला रुहानी
सैलवेशन आर्मी (आत्मिक मुक्ती दल) म्हटले जाते. तुम्ही श्रीमतावर सर्वांना रस्ता
सांगता. सर्वांना सांगता - दोन पिता आहेत, एक हदचे, दुसरे बेहदचे. लौकिक पिता असताना
देखील सर्व त्या पारलौकिक पित्याची आठवण करतात परंतु त्यांना अजिबात जाणत नाहीत.
बाबा काही निंदा करत नाहीत परंतु ड्रामाचे रहस्य सांगतात. हे देखील समजावून
सांगण्यासाठीच म्हणतात की, यावेळी सर्व मनुष्य मात्र ५ विकार रुपी दलदलीमध्ये अडकून
पडलेला आसुरी संप्रदाय आहे. दैवी संप्रदायाला आसुरी संप्रदाय जाऊन नमस्कार करतात
कारण ते संपूर्ण निर्विकारी आहेत. संन्याशांना देखील नमस्कार करतात ते देखील घरदार
सोडून जातात. पवित्र राहतात. या संन्याशांमध्ये आणि देवतांमध्ये रात्रं-दिवसाचा फरक
आहे. देवतांचा तर जन्म देखील योगबलाने होतो. या गोष्टींना कोणीही जाणत नाही. सर्वजण
म्हणतात ईश्वराची गत-मत न्यारी, ईश्वराचा अंत मिळू शकत नाही. केवळ ‘ईश्वर’ अथवा
‘भगवान’ म्हटल्याने इतके प्रेम वाटत नाही. सर्वात चांगला शब्द आहे - बाबा. मनुष्य
बेहदच्या पित्याला जाणत नाहीत तर जसे काही ऑरफन (अनाथ) आहेत.
मॅगझीनमध्ये देखील
दाखविले आहे, मनुष्य काय म्हणतात आणि भगवान काय म्हणतात. बाबा काही शिवी देत नाहीत,
मुलांना समजावून सांगत आहेत कारण बाबा तर सर्वांना जाणतात ना. समजावून सांगण्यासाठी
म्हणतात - यांच्यामध्ये आसुरी गुण आहेत, आपसामध्ये भांडत राहतात. इथे तर भांडण्याची
गरजच नाही. ते आहेत कौरव अर्थात आसुरी संप्रदाय. हे आहेत दैवी संप्रदाय. बाबा
म्हणतात - मनुष्य, मनुष्याला मुक्ती अथवा जीवनमुक्तीसाठी राजयोग शिकवेल असे होऊ शकत
नाही. यावेळी बाबाच तुम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. देह-अभिमान आणि देही-अभिमानी
यामध्ये फरक पहा किती आहे. देह-अभिमानामुळे तुम्ही घसरतच आला आहात (पतन होत आले).
बाबा एकदाच येऊन तुम्हाला देही-अभिमानी बनवतात. असे नाही की तुम्ही सतयुगामध्ये
देहाशी संबंध ठेवणार नाही. तिथे हे ज्ञान राहत नाही की, मी आत्मा परमपिता
परमात्म्याची संतान आहे. हे ज्ञान आताच तुम्हाला मिळते जे प्राय: लोप होते. तुम्हीच
श्रीमतावर चालून प्रारब्ध प्राप्त करता. बाबा येतातच राजयोग शिकविण्याकरिता. असे
शिक्षण इतर कोणतेच नाही. डबल मुकुटधारी राजे सतयुगामध्ये असतात. मग सिंगल
मुकुटवाल्यांची देखील राजाई आहे. आता ती राजाई राहिलेली नाही, प्रजेचे प्रजेवर
राज्य आहे. तुम्ही मुले आता राजाईसाठी शिकत आहात, याला गॉड फादरली युनिव्हर्सिटी
म्हटले जाते. तुमचे नाव देखील लिहिलेले आहे. ते लोक भले नावे ठेवतात गीता पाठशाळा.
शिकवतात कोण? श्रीकृष्ण भगवानुवाच म्हणतील. आता श्रीकृष्ण काही शिकवू शकणार नाही.
श्रीकृष्ण तर स्वतःच शिकण्यासाठी पाठशाळेमध्ये जातात. प्रिन्स-प्रिन्सेस कसे
स्कूलमध्ये जातात, तिथली भाषाच वेगळी आहे. असे देखील नाही की संस्कृतमध्ये गीता
सांगितली आहे. इथे तर अनेक भाषा आहेत. जो जसा राजा असेल तो आपली भाषा चालवतो.
संस्कृत भाषा काही राजांची भाषा नाहीये. बाबा काही संस्कृत शिकवत नाहीत. बाबा तर
राजयोग शिकवतात, सतयुगासाठी.
बाबा म्हणतात -काम
महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त करा. प्रतिज्ञा करवून घेतात, इथे जे पण येतात
त्यांच्याकडून प्रतिज्ञा करवून घेतली जाते. काम विकाराला जिंकल्याने तुम्ही जगतजीत
बनाल. हा आहे मुख्य विकार. ही हिंसा द्वापर पासून सुरू झालेली आहे ज्यामुळे
वाममार्ग सुरू झाला. देवता कसे वाम मार्गामध्ये जातात, त्याचे देखील मंदिर आहे. खूप
छी-छी (विकारी) चित्रे बनवली आहेत. बाकी वाम मार्गामध्ये कधी गेले, त्याची
तिथी-तारीख तर नाही आहे. सिद्ध होते काम-चितेवर बसल्याने काळे बनतात परंतु नाव-रूप
तर बदलते ना. काम-चितेवर चढल्याने आयरन एजड बनतात. आता तर ५ तत्व देखील तमोप्रधान
आहेत ना, म्हणून शरीर देखील असे तमोप्रधान बनते. जन्मत:च कोणी कसे, कोणी कसे जन्म
घेतात. तिथे तर एकदम सुंदर शरीर असते. आता तमोप्रधान असल्या कारणाने शरीरे देखील अशी
आहेत. मनुष्य ईश्वर, प्रभू इत्यादी विविध नावांनी आठवण करतात परंतु त्या बिचाऱ्यांना
ठाऊकच नाही आहे की, आत्मा आपल्या पित्याची आठवण करत आहे - ‘ओ बाबा, येऊन शांती द्या’.
इथे तर कर्मेंद्रियांद्वारे पार्ट बजावत आहेत तर शांती कशी मिळणार. विश्वामध्ये
शांती होती जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. परंतु कल्पाची आयु लाखों वर्षे
म्हटले आहे तर मनुष्य बिचारे कसे समजतील. जेव्हा यांचे (देवतांचे) राज्य होते तेव्हा
एक राज्य, एक धर्म होता; दुसऱ्या कोणत्याही खंडामध्ये असे म्हणत नाहीत की एक धर्म,
एक राज्य असावे. इथे आत्मा मागत आहे एक राज्य असावे. तुमची आत्मा जाणते आता आपण एक
राज्य स्थापन करत आहोत. तिथे साऱ्या विश्वाचे मालक आपणच असणार. बाबा आम्हाला सर्व
काही देतात. आपले राज्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपण साऱ्या विश्वाचे मालक बनतो.
या विश्वामध्ये काही सूक्ष्म वतन, मूल वतन येत नाही. हे सृष्टीचे चक्र इथेच फिरत
राहते. याला बाबा, जे रचयिता आहेत तेच जाणतात. असे नाही की रचना रचतात. बाबा येतातच
संगमावर, जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया बनविण्यासाठी. दूरदेशातून बाबा आले आहेत,
तुम्ही जाणता नवीन दुनिया आपल्यासाठी बनत आहे. बाबा आम्हा आत्म्यांचा शृंगार करत
आहेत. त्याच्यासोबत मग शरीरांचा देखील शृंगार होईल. आत्मा पवित्र झाल्याने मग शरीर
देखील सतोप्रधान मिळेल. सतोप्रधान तत्वांपासून शरीरे बनतील. यांचे सतोप्रधान शरीर
आहे ना त्यामुळे नॅचरल ब्युटी (नैसर्गिक सौंदर्य) असते. गायले देखील जाते - ‘रिलीजन
इज माइट (धर्म एक शक्ती आहे)’. आता माइट मिळाली कुठून? एकच देवी-देवतांचा धर्म आहे
ज्याद्वारे माइट मिळते. या देवताच साऱ्या विश्वाचे मालक बनतात दुसरे कोणीही विश्वाचे
मालक बनत नाहीत. तुम्हाला किती माइट मिळते. लिहिलेले देखील आहे आदि सनातन देवी-देवता
धर्माची स्थापना शिवबाबा ब्रह्माद्वारे करतात. या गोष्टी दुनियेमध्ये कोणाला ठाऊक
थोडेच आहे. बाबा म्हणतात - मी ब्राह्मण कुळ स्थापन करतो आणि मग त्यांना सूर्यवंशी
डिनायस्टीमध्ये घेऊन जातो. जे चांगल्या रीतीने शिकतात ते पास होऊन सूर्यवंशीमध्ये
येतात. आहे सारी ज्ञानाची गोष्ट त्यांनी (लोकांनी) मग स्थूल बाण, हत्यारे इत्यादी
दाखवली आहेत. बाण चालवायला देखील शिकवतात. छोट्या मुलांना देखील बंदूक चालवायला
शिकवतात. तुमचा मग आहे योग-बाण. बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण कराल तर
तुमची विकर्म विनाश होतील. हिंसेचा काही प्रश्नच नाही. तुमचे शिक्षण देखील आहे
गुप्त. तुम्ही आहात स्पिरिच्युअल, रुहानी सैलवेशन आर्मी (अध्यात्मिक, रुहानी मुक्ती
सेना). हे कोणालाच ठाऊक नाही आहे की रूहानी आर्मी (आत्मिक सेना) कशी असते? तुम्ही
आहात इनकागनीटो, स्पिरिच्युअल रूहानी सैलवेशन आर्मी. साऱ्या दुनियेला तुम्ही सैलवेज
करता. सर्वांचा बेडा बुडालेला आहे. बाकी सोन्याची काही लंका नाही आहे. असे नाही की
सोन्याची द्वारका खाली पाताळात गेली आहे, ती बाहेर येईल. नाही, द्वारकेमध्ये देखील
यांचे राज्य होते परंतु सतयुगामध्ये होते. सतयुगी राजांचा ड्रेसच वेगळा असतो.
त्रेतामध्ये वेगळा. वेगवेगळे ड्रेस, विविध रीती-रिवाज असतात. प्रत्येक राजाचे
रीती-रिवाज आपापले, सतयुगाचे तर नाव घेताच मन आनंदित होते. म्हणतातच मुळी - स्वर्ग,
पॅराडाईज परंतु मनुष्य काहीच जाणत नाहीत. मुख्य तर आहे हे दिलवाडा मंदिर. तुमचे
हुबेहूब यादगार आहे. मॉडेल तर नेहमी छोटे बनवतात ना. हे अगदी अचूक मॉडेल आहे.
शिवबाबा देखील आहेत, आदी देव देखील आहेत, वरती वैकुंठ दाखवला आहे. शिवबाबा आहेत तर
जरूर त्यांचा रथ देखील असेल. आदि देव बसले आहेत, हे देखील कोणाला माहित नाही आहे.
हा शिवबाबांचा रथ आहे. महावीरच राजाई प्राप्त करतात. आत्म्यामध्ये ताकत कशी येते,
हे देखील तुम्ही आता समजता. वारंवार स्वतःला आत्मा समजा. आपण आत्मा सतोप्रधान होतो
तर पवित्र होतो. शांतीधाम, सुखधाम मध्ये जरूर पवित्रच असणार. आता बुद्धीमध्ये येते,
किती सोपी गोष्ट आहे. भारत सतयुगामध्ये पवित्र होता. तिथे अपवित्र आत्मा राहू शकत
नाही. इतके सर्व पतित आत्मे वर कसे जातील. जरूर पवित्र बनूनच जातील ना. आग लागते मग
सर्व आत्मे निघून जातील. बाकी शरीरे राहतात. या सर्व खाणाखुणा देखील आहेत.
‘होलिका’चा अर्थ कोणी समजतात थोडेच. सारी दुनिया यामध्ये स्वाहा होणार आहे. हा
ज्ञान यज्ञ आहे. ‘ज्ञान’ शब्द काढून टाकून बाकी ‘रुद्र यज्ञ’ म्हणतात. वास्तविक हा
आहे - रुद्र ज्ञान यज्ञ. हा ब्राह्मणांद्वारेच रचला जातो. खरे-खुरे ब्राह्मण तुम्ही
आहात. प्रजापिता ब्रह्माची तर सर्वजण संतान आहात ना. ब्रह्मा द्वारेच मनुष्य सृष्टी
रचली जाते. ब्रह्मालाच ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते, यांची वंशावळी असते ना.
जसे वेग-वेगळ्या जातीची वंशावळी ठेवतात. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की मूलवतनमध्ये आहे
आत्म्यांचा सिजरा (आत्म्यांची वंशावळी), कायद्याप्रमाणे. शिवबाबा, मग
ब्रह्मा-विष्णु-शंकर, मग लक्ष्मी-नारायण इत्यादी सर्व आहेत मनुष्यांचे कुळ. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रूहानी
सैलवेशन आर्मी बनून स्वतःला आणि सर्वांना योग्य मार्ग दाखवायचा आहे. साऱ्या दुनियेला
विषय-सागरातून सैलवेज करण्यासाठी बाबांचे पूर्णत: मदतगार बनायचे आहे.
२) ज्ञान-योगाद्वारे
पवित्र बनून आत्म्याचा शृंगार करायचा आहे, शरीराचा नाही. आत्मा पवित्र बनल्याने
शरीराचा शृंगार स्वतः होईल.
वरदान:-
किनारा करण्या
ऐवजी प्रत्येक क्षण बाबांचा आधार असल्याचा अनुभव करणारे निश्चय बुद्धी विजयी भव
‘विजयी भव’ची वरदानी
आत्मा प्रत्येक क्षण स्वतःला बाबांच्या आधाराखाली अनुभव करतात. त्यांच्या मनामध्ये
संकल्पमात्र देखील निराधार अथवा एकटेपणाचा अनुभव होत नाही. कधी उदासी अथवा
अल्पकाळाचे हदचे वैराग्य येत नाही. ते कधीही कोणत्या कार्यापासून, समस्यांपासून,
व्यक्ती पासून किनारा करत नाहीत (दूर जात नाहीत); परंतु प्रत्येक कर्म करत असताना,
सामना करत असताना, सहयोगी असताना देखील बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये राहतात.
बोधवाक्य:-
एका
बाबांच्याच कंपनीमध्ये रहा आणि बाबांनाच आपला कंपेनियन (जोडीदार) बनवा.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
दिव्य-बुद्धी रुपी
विमानाद्वारे सर्वात उच्च शिखरावरच्या स्थितीमध्ये स्थित रहा, अव्यक्त वतनवासी बनून
विश्वाच्या सर्व आत्म्यांप्रती शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेच्या सहयोगाची लाट पसरवा.
योगाच्या प्रयोगाद्वारे दुःखी-अशांत आत्म्यांना शांती आणि शक्तीची सकाश द्या.