01-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हा आत्म्यांचा स्वधर्म शांती आहे, तुमचा देश शांतीधाम आहे, तुम्ही
आत्मे शांत स्वरूप आहात त्यामुळे तुम्ही शांती मागू शकत नाही”
प्रश्न:-
तुमचे योगबळ
कोणता चमत्कार करते?
उत्तर:-
योगबळाद्वारे तुम्ही संपूर्ण दुनियेला पवित्र बनविता, तुम्ही किती थोडी मुले
योगबळाद्वारे हा संपूर्ण पर्वत उचलून सोन्याचा पर्वत स्थापन करता. ५ तत्व सतोप्रधान
बनतात, चांगले फळ देतात. सतोप्रधान तत्वांमुळे ही शरीरे देखील सतोप्रधान असतात.
तिथली फळे देखील खूप मोठी-मोठी आणि स्वादिष्ट असतात.
ओम शांती।
जेव्हा ओम् शांती म्हटले जाते तेव्हा खूप आनंद झाला पाहिजे कारण वास्तवामध्ये आत्मा
आहेच शांत स्वरूप, तिचा स्वधर्मच शांत आहे. यावर संन्यासी देखील म्हणतात, शांतीचा
तर जणू तुमच्या गळ्यामध्ये हार पडलेला आहे. शांतीला बाहेर कुठे शोधता. आत्मा स्वतः
शांत स्वरूप आहे. या शरीरामध्ये पार्ट बजावण्याकरिता यावे लागते. आत्मा कायम शांत
राहीली तर कर्म कसे करेल? कर्म तर करायचेच आहे. होय, शांतीधाम मध्ये आत्मे शांत
राहतात. तिथे शरीरच नाही, हे कोणतेही संन्यासी इत्यादी समजत नाहीत की आपण आत्मा
आहोत, शांतीधामचे रहिवासी आहोत. मुलांना समजावून सांगितले गेले आहे - शांतिधाम आपला
देश आहे, तर मग आपण सुखधाममध्ये येऊन पार्ट बजावतो आणि मग रावण राज्य असते
दुःखधाममध्ये. ही ८४ जन्मांची कहाणी आहे. अर्जुन प्रती भगवानुवाच आहे ना की, ‘तू
आपल्या जन्मांना जाणत नाहीस’. एकट्याला का म्हणतात? कारण एकाची गॅरंटी आहे. या
राधे-कृष्णाची तर गॅरंटी आहे ना तर यांनाच म्हणतात. हे बाबा देखील जाणतात, मुले
देखील जाणतात की ही जी सर्व मुले आहेत ती सर्वच काही ८४ जन्म घेणारी नाही आहेत. कोणी
मध्येच येतील, कोणी शेवटी येतील. याचे तर निश्चित आहे. यांना (ब्रह्मा बाबांना)
म्हणतात - ‘माझ्या बाळा’. तर हा अर्जुन झाला ना. रथावर बसले आहेत ना. मुले स्वतः
देखील समजू शकतात - आपण जन्म कसे घेणार? सेवाच करत नाहीत तर मग सतयुग नवीन
दुनियेमध्ये पहिले कसे येतील? यांच्या नशिबी कुठे आहे. मागाहून जे जन्म घेतील
त्यांच्यासाठी तर घर जुने होत जाईल ना. मी यांच्यासाठी म्हणतो, ज्यांच्यासाठी
तुम्हाला देखील खात्री आहे. तुम्ही देखील समजू शकता - मम्मा-बाबा ८४ जन्म घेतात.
कुमारका आहे, जनक आहे, असे-असे महारथी जे आहेत ते ८४ जन्म घेतात. जे सेवा करत नाहीत
तर जरूर काही जन्मा नंतरच येतील. समजतात आपण तर नापास होणार, शेवटी येणार.
स्कूलमध्ये धावण्याच्या शर्यती मध्ये निशाण्या पर्यंत जाऊन मग माघारी येतात ना.
सर्व एकरस असू शकत नाहीत. शर्यतीमध्ये थोडासा पाव इंचाचा जरी फरक पडला तरी प्लसमध्ये
येतो, ही देखील अश्व शर्यत आहे. ‘अश्व’ घोड्याला म्हटले जाते. रथाला देखील घोडा
म्हटले जाते. बाकी हे जे दाखवतात की, दक्ष प्रजापित्याने यज्ञ रचला, त्यामध्ये
घोड्याची आहुती दिली, या सर्व गोष्टी काही नाही आहेत. ना दक्ष प्रजापिता आहे, ना
कोणता यज्ञ रचला आहे. पुस्तकांमध्ये भक्ती मार्गाच्या किती दंतकथा आहेत, त्यांचे
नावच आहे कथा. खूप कथा ऐकतात. तुम्ही तर हे शिकत आहात. शिक्षणाला कधी कथा थोडीच
म्हणणार. शाळेमध्ये शिकतात, एम ऑब्जेक्ट असते. समजतात की आपल्याला या शिक्षणाने ही
नोकरी मिळणार. काही ना काही मिळते. आता तुम्हा मुलांना खूप देही-अभिमानी बनायचे आहे.
हीच मेहनत आहे. बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. खास आठवण करायची असते,
असे नाही की मी तर शिवबाबांचा बच्चा आहे ना मग आठवण कशासाठी करू. नाही, स्वतःला
स्टुडंट समजून आठवण करायची आहे. आम्हा आत्म्यांना शिवबाबा शिकवत आहेत, हे देखील
विसरून जातात. शिवबाबा एकच टीचर आहेत जे सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य ऐकवतात,
हे सुद्धा लक्षात रहात नाही. प्रत्येक मुलाने आपल्या मनाला विचारायचे आहे की, किती
वेळ बाबांची आठवण राहते? जास्त वेळ तर बाह्यमुखतेमध्येच जातो. ही आठवणच मुख्य आहे.
या भारताच्या योगाचीच खूप महिमा आहे. परंतु योग कोण शिकवतात - हे कोणालाच माहित
नाहीये. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. आता श्रीकृष्णाची आठवण केल्याने तर
एकही पाप भस्म होणार नाही कारण तो तर देहधारी आहे. पाच तत्वांनी बनलेला आहे. त्याची
आठवण केली तर जणू मातीची आठवण केली, ५ तत्वांची आठवण केली. शिवबाबा तर अशरीरी आहेत
म्हणून म्हणतात - ‘अशरीरी बना, मज पित्याची आठवण करा’.
म्हणता देखील - हे
पतित-पावन, तो तर एकच आहे ना. युक्तीने विचारले पाहिजे - ‘गीतेचे भगवान कोण?’ भगवान
रचयिता तर एकच असतो. जरी मनुष्य स्वतःला भगवान म्हणतात देखील तरीही असे कधीच
म्हणणार नाहीत की, तुम्ही सर्व माझी मुले आहात. एक तर म्हणतील - ततत्वम्, नाही तर
म्हणतील - ईश्वर सर्वव्यापी आहे. मीही भगवान, तुही भगवान, जिकडे पाहतो तूच तू आहेस.
दगडामध्ये देखील तू आहेस, असे म्हणतात. ‘तुम्ही माझी मुले आहात’, असे म्हणू शकत
नाहीत. हे तर बाबाच म्हणतात - ‘माझ्या लाडक्या रूहानी मुलांनो’. असे दुसरे कोणीही
म्हणू शकत नाही. मुस्लिमांना जर कोणी म्हटले - ‘माझ्या लाडक्या मुलांनो’, तर
थोबाडीतच मारतील. हे एक पारलौकिक पिताच म्हणू शकतात. इतर कोणीही सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताचे ज्ञान देऊ शकत नाही. ८४ च्या शिडीचे रहस्य एका निराकार
बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सांगू शकत नाही. त्यांचे खरे नावच आहे - ‘शिव’. ही तर
लोकांनी खूप नावे दिलेली आहेत. अनेक भाषा आहेत. तर आपापल्या भाषेमध्ये नावे ठेवतात.
जसे मुंबईमध्ये बबुलनाथ म्हणतात, परंतु ते अर्थ थोडेच समजतात. तुम्ही समजता
काट्यांना फूल बनविणारे आहेत. भारतामध्ये शिवबाबांची हजारोंनी नावे असतील, अर्थ
काहीच समजत नाहीत. बाबा मुलांनाच समजावून सांगतात. त्यामध्ये देखील मातांना बाबा
जास्त पुढे करतात. आज-काल महिलांचा मान देखील आहे कारण पिता आले आहेत ना. बाबा
मातांची महिमा उच्च करतात. तुम्ही शिवशक्ती सेना आहात, तुम्हीच शिवबाबांना जाणता.
सच्चे तर एकच आहेत. गायले देखील जाते - ‘सच की बेड़ी हिले डुले, डूबे नहीं’. तर
तुम्ही सच्चे आहात, नवीन दुनियेची स्थापना करत आहात. बाकी खोट्या बेड्या तर सर्व
नष्ट होतील. तुम्ही देखील काही इथे राज्य करणारे नाही आहात. तुम्ही मग दुसऱ्या
जन्मामध्ये येऊन राज्य करणार. या खूप गुप्त गोष्टी आहेत ज्या तुम्हीच जाणता. हे बाबा
भेटले नसते तर तुम्हाला काहीच माहित झाले नसते. आता कळले आहे.
हे आहेत युधिष्ठिर,
मुलांना युद्धाच्या मैदानामध्ये उभे करणारे. हे आहेत नॉनव्हायोलेन्स, अहिंसक.
मनुष्य हाणामारीला हिंसा समजतात. बाबा म्हणतात पहिली मुख्य हिंसा तर काम कटारीची आहे
म्हणून काम विकाराला महाशत्रू म्हटले आहे, याच्यावरच विजय प्राप्त करायचा आहे. मूळ
गोष्ट आहेच काम विकाराची, पतित अर्थात विकारी. विकारी म्हटलेच जाते पतित बनणाऱ्यांना,
जे विकारामध्ये जातात. क्रोध करणाऱ्यांना असे म्हणणार नाही की हे विकारी आहेत.
क्रोधी असणाऱ्याला क्रोधी, लोभी असणाऱ्याला लोभी म्हणणार. देवतांना निर्विकारी
म्हटले जाते. देवता निर्लोभी, निर्मोही, निर्विकारी आहेत. ते कधी विकारामध्ये जात
नाहीत. तुम्हाला लोक म्हणतात, विकारा शिवाय मुले कशी होतील? त्यांना तर निर्विकारी
मानतात ना. ती आहेच व्हाईसलेस दुनिया. द्वापर-कलियुग आहे विशश दुनिया. स्वतःला
विकारी, देवतांना निर्विकारी म्हणतात तर खरे ना. तुम्ही जाणता आपण देखील विकारी होतो.
आता यांच्यासारखे निर्विकारी बनत आहोत. या लक्ष्मी-नारायणाने देखील आठवणीच्या बळाने
हे पद प्राप्त केले आहे आणि पुन्हा प्राप्त करत आहेत. आपणच देवी-देवता होतो, आपणच
कल्पापूर्वी असे राज्य मिळवले होते, जे गमावले, मग पुन्हा मिळवत आहोत. हेच चिंतन
बुद्धीमध्ये चालत राहिले तरी देखील आनंद मिळेल. परंतु माया ही आठवण विसरायला लावते.
बाबा जाणतात, तुम्ही कायमचे आठवणीमध्ये राहू शकणार नाही. तुम्ही मुलांनी अचल बनून
आठवण करत रहा तर लवकर कर्मातीत अवस्था होईल आणि आत्मा परत निघून जाईल. परंतु नाही.
पहिल्या नंबरमध्ये तर हे जाणार आहेत. त्या नंतर आहे शिवबाबांची वरात. लग्नामध्ये
माता मातीच्या मटक्यामध्ये ज्योत पेटवून घेऊन जातात ना, ही निशाणी आहे. शिवबाबा
साजन तर सदैव जागती ज्योत आहेत. बाकी आमची ज्योत जागृत केली आहे. इथली गोष्ट मग
भक्तिमार्गामध्ये घेऊन गेले आहेत. तुम्ही योगबलाने आपली ज्योत जागृत करता. योगाने
तुम्ही पवित्र बनता. ज्ञानाने धन मिळते. शिक्षणाला सोर्स ऑफ इन्कम म्हटले जाते ना.
योगबलाने तुम्ही खास भारताला आणि संपूर्ण सामान्य विश्वाला पवित्र बनविता. यामध्ये
कन्या खूप चांगल्या मदतगार बनू शकतात. सेवा करून उच्च पद प्राप्त करायचे आहे. जीवन
हिऱ्यासमान बनवायचे आहे, कमी नाही. गायले जाते फॉलो फादर, मदर. सी मदर, फादर आणि
अनन्य ब्रदर्स, सिस्टर्स
तुम्ही मुले
प्रदर्शनीमध्ये देखील समजावून सांगू शकता की तुम्हाला दोन पिता आहेत - लौकिक आणि
पारलौकिक. यामध्ये मोठे कोण? मोठे तर जरूर बेहदचे पिता आहेत ना. वारसा
त्यांच्याकडून मिळाला पाहिजे. आता वारसा देत आहेत, विश्वाचा मालक बनवत आहेत.
भगवानुवाच - तुम्हाला राजयोग शिकवतो मग तुम्ही दुसऱ्या जन्मामध्ये विश्वाचे मालक
बनाल. बाबा कल्प-कल्प भारतामध्ये येऊन भारताला खूप श्रीमंत बनवतात. तुम्ही विश्वाचे
मालक बनता या शिक्षणाद्वारे. त्या शिक्षणाने काय मिळणार? इथे तर तुम्ही २१
जन्मांकरिता हिऱ्यासमान बनता. त्या शिक्षणामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. हे तर पिता,
टीचर, गुरु एकच आहेत. तर पित्याचा वारसा, टीचरचा वारसा आणि गुरुचा वारसा सर्व देतात.
आता बाबा म्हणतात देहा सहित सर्वांना विसरायचे आहे. ‘आप मुये मर गई दुनिया’. बाबांची
दत्तक मुले बनलात, तर बाकी कोणाची आठवण कराल. इतरांना बघत असताना जसे काही बघतच नाही.
पार्टमध्ये देखील येतात परंतु बुद्धीमध्ये आहे की, आता आपल्याला घरी जायचे आहे आणि
मग पुन्हा इथे येऊन पार्ट बजावायचा आहे. हे जरी लक्षात राहीले तरी देखील खूप आनंद
होईल. मुलांनी देहभान सोडून दिले पाहिजे. ही जुनी वस्तू इथेच सोडायची आहे, आता परत
जायचे आहे. नाटक संपत आहे. जुन्या सृष्टीला आग लागत आहे. आंधळ्यांची मुले आंधळी
अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत. लोकांना तर वाटेल, हा झोपलेला मनुष्य दाखवला
आहे. परंतु ही अज्ञान निद्रेची गोष्ट आहे, ज्यातून तुम्ही जागे करता. ज्ञान अर्थात
दिवस आहे सतयुग, अज्ञान अर्थात रात्र आहे कलियुग. या खूप समजून घेण्याच्या गोष्टी
आहेत. कन्या विवाह करते तेव्हा आई-वडील, सासू-सासरे इत्यादी सर्वांचीच आठवण येईल.
त्यांना विसरावे लागेल. अशी देखील युगल आहेत, जी संन्याशांना दाखवतात की, आम्ही
युगल बनून कधी विकारामध्ये जात नाही. ज्ञान तलवार दोघांच्या मध्ये आहे. बाबांचा
आदेश आहे - पवित्र रहायचे आहे. पहा रमेश-ऊषा आहेत, कधीही पतित बनले नाहीत; ही भीती
आहे जर आपण पतित बनलो तर २१ जन्मांची राजाई नष्ट होईल. दिवाळे निघेल. असे कोणी-कोणी
नापास होतात. गंधर्व विवाह असे नाव तर आहे ना. तुम्ही जाणता पवित्र राहिल्याने खूप
उच्च पद मिळेल. एका जन्मासाठी पवित्र बनायचे आहे. योगबलाने कर्मेंद्रियांवर देखील
कंट्रोल येतो. योगबलाने तुम्ही संपूर्ण दुनियेला पवित्र बनवता. तुम्ही किती थोडी
मुले योगबलाने हा सारा पर्वत नाहीसा करून सोन्याचा पर्वत स्थापन करता. मनुष्य थोडेच
समजतात, ते तर गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत राहतात. हे तर बाबाच येऊन संपूर्ण
दुनियेला गोल्डन एजेड बनवतात. असे नाही की हिमालय काही सोन्याचा होईल. तिथे तर
सोन्याच्या खाणी तुडुंब होतील. ५ तत्व सतोप्रधान आहेत, फळ देखील चांगले देतात.
सतोप्रधान तत्वांमुळे हे शरीर देखील सतोप्रधान होते. तिथली फळे देखील खूप मोठी-मोठी
आणि स्वादिष्ट असतात. नावच आहे स्वर्ग. तर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
केल्यानेच विकार सुटतील. देह-अभिमान आल्याने विकाराचा प्रयत्न केला जातो. योगी कधी
विकारामध्ये जाणार नाहीत. ज्ञान एक शक्ती तर आहे, मनुष्य योगी नसेल तर कोसळेल (अधोगती
होईल). जसे विचारले जाते - पुरुषार्थ मोठा की प्रारब्ध? तर म्हणतात - पुरुषार्थ मोठा.
तसेच यामध्ये म्हणणार योग मोठा. योगानेच पतिता पासून पावन बनता. आता तुम्ही मुले तर
म्हणाल आम्ही बेहदच्या बाबांकडून शिकणार. मनुष्याकडे शिकल्याने काय मिळणार?
महिन्यामध्ये काय कमाई होईल? हे तर तुम्ही एक-एक रत्न धारण करता. ही आहेत लाखो
रुपयांची. तिथे पैसे मोजले जात नाहीत. अगणित संपत्ती असते. सर्वांची आपापली शेती
इत्यादी असते. आता बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला राजयोग शिकवतो. हे आहे एम-ऑब्जेक्ट.
पुरुषार्थ करून उच्च बनायचे आहे. राजधानी स्थापन होत आहे. या लक्ष्मी-नारायणाने कसे
प्रारब्ध प्राप्त केले, यांच्या प्रारब्धला जाणलेत तर मग बाकी काय पाहिजे. आता
तुम्ही जाणता कल्प ५ हजार वर्षानंतर बाबा येतात, येऊन भारताला स्वर्ग बनवतात. तर
मुलांना सेवा करण्याचा उमंग असला पाहिजे. जोपर्यंत कोणाला रस्ता सांगत नाही,
तोपर्यंत भोजन स्वीकारणार नाही - इतका उमंग-उत्साह असेल तेव्हा उच्च पद प्राप्त करू
शकता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ईश्वरीय
सेवा करून आपले जीवन २१ जन्मां करिता हिऱ्या समान बनवायचे आहे. माता-पिता आणि अनन्य
भाऊ-बहिणींनाच फॉलो करायचे आहे.
२) कर्मातीत अवस्था
बनविण्यासाठी देहा सहित सर्वांना विसरायचे आहे. आपली आठवण अचल आणि स्थायी बनवायची
आहे. देवता प्रमाणे निर्लोभी, निर्मोही, निर्विकारी बनायचे आहे.
वरदान:-
तडफडणाऱ्या
आत्म्यांना एका सेकंदामध्ये गती-सद्गती देणारे मास्टर दाता भव
ज्याप्रमाणे स्थूल
ऋतूसाठी व्यवस्था करता, सेवाधारी सामग्री सर्व तयार करता ज्यामुळे कोणालाही कसलाच
त्रास होऊ नये, व्यर्थ वेळ जाऊ नये. असेच आता सर्व आत्म्यांची गती-सद्गती करण्याचा
अंतिम ऋतू येणार आहे, तडफडणाऱ्या आत्म्यांना लाईनमध्ये उभे राहण्याचे कष्ट द्यायचे
नाहीत, येत जातील आणि घेत जातील. यासाठी एव्हररेडी बना. पुरुषार्थी जीवनामध्ये
राहिल्याने वरती आता दातापणाच्या स्थितीमध्ये रहा. प्रत्येक संकल्प, प्रत्येक सेकंदा
मध्ये मास्टर दाता बनून चालत रहा.
बोधवाक्य:-
हजूरला
बुद्धीमध्ये हाजिर ठेवाल तर सर्वप्राप्ती जी हुजूर करेल.
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना, एकता आणि एकाग्रतेला धारण करा
एकतेच्या सोबत
एकांतप्रिय बनायचे आहे. एकांतप्रिय ते असतील ज्यांचा अनेकांपासून बुद्धियोग तुटलेला
असेल आणि एकाचाच प्रिय असेल. एक प्रिय असल्या कारणाने एकाच्याच आठवणीमध्ये राहू शकता.
एकांतप्रिय अर्थात एका व्यतिरिक्त बाकी दुसरे कोणीही नाही. सर्व नाती, सर्व सुखाचा
रस एका द्वारे घेणाराच एकांत-प्रिय बनू शकतो.