02-02-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.2003  ओम शान्ति   मधुबन


“या वर्षी निमित्त आणि निर्मान बनून जमेच्या खात्याला वाढवा आणि अखंड महादानी बना”


आज अनेक भुजाधारी बापदादा आपल्या चोहो बाजूच्या भुजांना बघत आहेत. काही भुजा साकारमध्ये समोर आहेत आणि काही भुजा सूक्ष्म रूपामध्ये दिसत आहेत. बापदादा आपल्या अनेक भुजांना पाहून हर्षित होत आहेत. सर्व भुजा नंबरवार खूप ऑलराउंडर, एव्हररेडी, आज्ञाधारक भुजा आहेत. बापदादांनी फक्त इशारा केला तरी राईट हॅन्ड्स म्हणतात - हां बाबा, हाजिर बाबा, आता बाबा. अशा मुरब्बी मुलांना पाहून किती आनंद होतो! बापदादांना रुहानी नशा (आत्मिक अभिमान) आहे की बापदादांशिवाय इतर कोणत्याही धर्म-आत्मा, महान-आत्म्याला अशा आणि इतक्या सहयोगी भुजा मिळत नाहीत. बघा सर्व कल्पामध्ये चक्कर मारा अशा भुजा कोणाला मिळाल्या आहेत? तर बापदादा प्रत्येक भुजेची विशेषता पाहत आहेत. साऱ्या विश्वातून निवडलेल्या विशेष भुजा आहात, परमात्म सहयोगी भुजा आहात. पहा आज या हॉलमध्ये देखील किती पोहोचले आहेत! (आज हॉलमध्ये १८ हजारहून अधिक भाऊ-बहिणी बसले आहेत) सर्वजण आपल्याला परमात्म भुजा आहोत, असा अनुभव करता का? नशा आहे ना!

बापदादांना आनंद आहे की चोहो बाजूंचे सगळे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पोहोचले आहेत. परंतु नवीन वर्ष कोणती आठवण करून देते? नवीन युग, नवीन जन्म. जितका म्हणून हा अति जुना शेवटचा जन्म आहे तितकाच नवीन पहिला जन्म किती सुंदर आहे! हा श्याम आणि तो सुंदर. इतका स्पष्ट आहे की, जसा काही आजच्या दिवशी जुने वर्ष देखील स्पष्ट आहे आणि नवीन वर्ष देखील समोर स्पष्ट आहे. असे आपले नवीन युग, नवीन जन्म स्पष्ट समोर येते? आज लास्ट जन्मामध्ये आहोत आणि उद्या पहिल्या नवीन जन्मामध्ये असणार. क्लियर आहे? समोर येते का? जी सुरुवातीची मुले आहेत त्यांनी ब्रह्मा बाबांचा अनुभव केला. ब्रह्मा बाबांना जसा आपला नवीन जन्म, नवीन जन्मातील राजाई शरीर रुपी वस्त्र सदैव समोर खुंटीवर अडकवलेले दिसत होते. जी कोणी मुले भेटण्यासाठी जात होती ती अनुभव करत होती, ब्रह्माबाबांचा अनुभव होता, आज वृद्ध आहे उद्या मिचनू (छोटे बाळ) बनणार. लक्षात आहे ना! जुन्यांना लक्षात आहे? आहे देखील ‘आज आणि उद्या’चा खेळ. इतके स्पष्ट भविष्य अनुभव व्हावे. आज स्वराज्य अधिकारी आहे उद्या विश्व राज्य अधिकारी. आहे नशा? बघा, आज मुले मुकुट घालून बसली आहेत. (रिट्रीटमध्ये आलेली डबल विदेशी छोटी मुले मुकुट घालून बसली आहेत) तर कोणता नशा आहे? मुकुट घातल्याने कोणता नशा आहे? हे फरिश्त्याच्या नशेमध्ये आहेत. हात हलवत आहेत, आम्ही नशेमध्ये आहोत.

तर या वर्षी काय करणार? नवीन वर्षामध्ये नवीनता काय करणार? काही प्लॅन बनवला आहे? नवीनता काय करणार? प्रोग्रॅम तर करत राहता, लाख लोकांचा देखील केला आहे, दोन लाखांचा देखील केला आहे, नवीनता काय करणार? आजकालचे लोक एका बाजूला स्व-प्राप्तीसाठी इच्छुक देखील आहेत, परंतु हिंमतहीन आहेत. हिंमत नाही आहे. ऐकायची इच्छा देखील आहे, परंतु बनण्याची हिंमत नाही आहे. अशा आत्म्यांना परिवर्तन करण्यासाठी पहिल्यांदा तर आत्म्यांना हिंमतीचे पंख लावा. हिंमतीच्या पंखाचा आधार आहे - अनुभव. अनुभव करवा. अनुभव अशी गोष्ट आहे की, ओंजळभर मिळाल्यानंतर थोडासा अनुभव केला तर अनुभवाचे पंख म्हणा, अथवा अनुभवाचे पाय म्हणा त्यामुळे हिंमतीच्या बाबतीत पुढे जाऊ शकतील. यासाठी विशेष या वर्षी निरंतर अखंड महादानी बनावे लागेल, अखंड. मनसा द्वारे शक्ति स्वरूप बनवा. महादानी बनून मनसा द्वारे, व्हायब्रेशन द्वारे निरंतर शक्तींचा अनुभव करवा. वाचा द्वारे ज्ञानदान द्या, कर्मा द्वारे गुणांचे दान द्या. पूर्ण दिवस भले मनसा, भले वाचा, भले कर्म तिन्ही द्वारा अखंड महादानी बना. वेळेनुसार आता दानी नाही, कधी-कधी दान केले, असे नाही, अखंड दानी कारण की आत्म्यांना आवश्यकता आहे. तर महादानी बनण्यासाठी पहिले आपले जमेचे खाते चेक करा. चारही सब्जेक्टमध्ये जमेचे खाते किती परसेंट मध्ये आहे? जर स्वतःमध्ये जमेचे खाते नसेल तर महादानी कसे बनणार! आणि जमेच्या खात्याला चेक करण्याची निशाणी कोणती आहे? मनसा, वाचा, कर्म द्वारे सेवा तर केली परंतु जमेची निशाणी आहे - सेवा करत असताना पहिली स्वतःची संतुष्टता. त्याच सोबत ज्यांची सेवा केली, त्या आत्म्यांना आनंदाने संतुष्टता आली? जर दोनही बाजूला संतुष्टता नसेल तर समजा की, सेवेच्या खात्यामध्ये तुमच्या सेवेचे फळ जमा झालेले नाही.

बापदादा कधी-कधी मुलांचे जमेचे खाते बघतात. तर कुठे-कुठे मेहनत जास्त आहे, परंतु जमेचे फळ कमी आहे. कारण? दोन्ही बाजूंच्या संतुष्टतेची कमी. भले स्वतः असो नाहीतर दुसरे असोत जर संतुष्टतेचा अनुभव केला नाही, तर जमेचे खाते कमी होते. बापदादांनी खूप सोप्या पद्धतीने जमेचे खाते वाढविण्याची गोल्डन चावी मुलांना दिली आहे. जाणता का ती चावी कोणती आहे? मिळाली तर आहे ना! जमेचे खाते सहजच भरपूर करण्याची गोल्डन चावी आहे - कोणतेही मनसा-वाचा-कर्म, कशातही सेवा करते वेळी एक तर आपल्यामध्ये निमित्त भावाची स्मृति. निमित्त भाव, निर्मान भाव, शुभ भाव, आत्मिक स्नेहाचा भाव, जर या भावाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन सेवा करता तेव्हा सहज तुमच्या या भावामुळे आत्म्यांची भावना पूर्ण होते. आजचे लोक प्रत्येकाचा भाव काय आहे, ते नोट करतात. काय निमित्त भावाने करत आहेत, की अभिमानाच्या भावाने! जिथे निमित्त भाव आहे तिथे निर्मान भाव ऑटोमॅटिकली येतो. तर चेक करा - काय जमा झाले? किती जमा झाले? कारण की या वेळी संगमयुगच जमा करण्याचे युग आहे. नंतर तर सारे कल्प जमेचे प्रारब्ध आहे.

तर या वर्षी कोणते विशेष अटेंशन द्यायचे आहे? आपले-आपले जमेचे खाते चेक करा. चेकर सुद्धा बना, मेकर सुद्धा बना कारण समयाच्या समीपतेची दृश्ये बघत आहात. आणि सर्वांनी बापदादांसोबत वायदा केला आहे की आम्ही समान बनणार. वायदा केला आहे ना? ज्यांनी वायदा केला आहे, त्यांनी हात वर करा. पक्का केला आहे? की पर्सेंटेज मध्ये? पक्का केला आहे ना? तर ब्रह्मा बाबांसारखे खाते जमा पाहिजे ना! ब्रह्मा बाप समान बनायचे असेल तर ब्रह्मा बाबांचे विशेष चरित्र काय पाहीले? सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये, ‘मी’ म्हटले की ‘बाबा’ म्हटले? ‘मी करत आहे’, नाही, ‘बाबा करवून घेत आहेत’. कोणाला भेटायला आला आहात? बाबांना भेटायला आले आहात. मी पणाचा अभाव, अविद्या, असे पाहीले ना! पाहिलेत? प्रत्येक मुरलीमध्ये बाबा, बाबा किती वेळा आठवण करून देतात? तर समान बनणे, याचा अर्थच आहे पहिले ‘मी’पणाचा अभाव असावा. या अगोदर ऐकवले आहे की, ब्राह्मणांचा ‘मी’पणा देखील खूप रॉयल आहे. लक्षात आहे ना? ऐकवले होते ना! सर्वांना वाटते की बापदादांची प्रत्यक्षता व्हावी. बापदादांची प्रत्यक्षता करावी. प्लॅन खूप बनवता. चांगले प्लॅन बनवता, बापदादा खुश आहेत. परंतु हा रॉयल रूपातील ‘मी’पणा प्लॅनमध्ये, सफलतेमध्ये काही पर्सेंटेज कमी करतो. नॅचरल संकल्पामध्ये, बोलमध्ये, कर्मामध्ये, प्रत्येक संकल्पामध्ये बाबा, बाबा स्मृतीमध्ये असावा. ‘मी’पणा नाही. बापदादा करावनहार करवून घेत आहेत. जगत-अंबेची हीच विशेष धारणा होती. जगत-अंबाचे स्लोगन आठवते, जुन्या लोकांच्या लक्षात असेल. आहे लक्षात? बोला, (हुक्मी हुक्म चलाए रहा) ही विशेष धारणा जगत-अंबेची होती. तर नंबर घ्यायचा आहे, समान बनायचे आहे तर ‘मी’पणा नष्ट व्हावा. मुखातून ऑटोमॅटिक ‘बाबा-बाबा’ शब्द निघावा. कर्मामध्ये, तुमच्या चेहेऱ्यामध्ये बाबांची मूर्ती दिसावी तेव्हा प्रत्यक्षता होईल.

बापदादा हे रॉयल रूपातील ‘मी-मी’ चे गाणे खूप ऐकतात. मी जे केले तेच बरोबर आहे, मी जो विचार केला तोच बरोबर आहे, तेच व्हायला हवे, हा ‘मी’पणा धोका देतो. भले विचार जरूर करा, बोला जरूर परंतु निमित्त आणि निर्मान भाव ठेवून. बापदादांनी या आधी सुद्धा एक आत्मिक ड्रिल शिकवले आहे, कोणते ड्रिल? आता-आता मालक, आता-आता बालक. विचार देण्यामध्ये मालकपणा, मेजॉरिटीने फायनल केल्यानंतर मग बालकपणा. हे मालक आणि बालक… हे रुहानी ड्रिल खूप-खूप आवश्यक आहे. बापदादांचे शिकवणीचे केवळ तीन शब्द लक्षात ठेवा - सर्वांना आठवते आहे! मनसामध्ये निराकारी, वाचेमध्ये निरहंकारी, कर्मामध्ये निर्विकारी. जेव्हापण संकल्प करता तर निराकारी स्थितीमध्ये स्थित होऊन संकल्प करा इतर सर्व काही विसरून गेले तरी चालेल परंतु हे तीन शब्द विसरू नका. ही साकार रूपातील तीन शब्दांची शिकवण सौगात (भेट) आहे. तर ब्रह्मा बाबांवर साकार रूपामध्ये देखील प्रेम होते. आता देखील डबल फॉरेनर्स अनेक अनुभव ऐकवतात की ब्रह्मा बाबांवर खूप प्रेम आहे. बघितलेले नाहीये तरीही प्रेम आहे. आहे? हां डबल फॉरेनर्स ब्रह्मा बाबांवर जास्त प्रेम आहे ना? आहे ना? तर ज्याच्यावर प्रेम असते ना त्याची सौगात खूप सांभाळून ठेवतात. मग भेट छोटीशी जरी असली ना, तरीही ज्याच्यावर अति प्रेम असते ना त्याची भेट लपवून ठेवली जाते, सांभाळून ठेवली जाते. तर ब्रह्मा बाबांवर प्रेम असेल तर या तीन शब्दांच्या शिकवणीवर प्रेम हवे. यामध्ये संपन्न बनणे किंवा समान बनणे खूप सहज होऊन जाईल. आठवा, ब्रह्मा बाबांनी काय म्हटले!

तर नवीन वर्षामध्ये वाचेची सेवा भले करा, धुमधडाक्यात करा परंतु अनुभव करून देण्याची सेवा नेहमी लक्षात ठेवा. सर्वांना अनुभव व्हावा की या बहिणी द्वारे किंवा भावाद्वारे आम्हाला शक्तीचा अनुभव झाला, शांतीचा अनुभव झाला, कारण अनुभव कधीच विसरला जात नाही. ऐकलेले विसरून जाते. चांगले वाटते परंतु विसरून जाते. अनुभव अशी गोष्ट आहे जी त्याला खेचून तुमच्या जवळ घेऊन येईल. संपर्कवाला संबंधामध्ये येत राहील कारण संबंधाशिवाय वारशाचे अधिकारी बनू शकत नाहीत. तर अनुभव संबंधामध्ये घेऊन येणारा आहे. अच्छा.

समजले, काय करणार? चेक करा, चेकर सुद्धा बना आणि मेकर सुद्धा बना. अनुभव करविणारे मेकर बना, जमेचे खाते चेक करणारे चेकर बना. अच्छा.

आता सर्वजण काय कराल? बापदादांना नवीन वर्षाची काही गिफ्ट देणार की नाही? नवीन वर्षामध्ये काय करता? एकमेकांना गिफ्ट देता ना. एक तर ग्रीटिंग कार्ड देतात आणि एक गिफ्ट देतात. तर बापदादांना ग्रीटिंग कार्ड नको आहे, रेकॉर्ड पाहिजे. सर्व मुलांचे रेकॉर्ड नंबरवन असावे, हे रेकॉर्ड हवे आहे. निर्विघ्न असावे, आता या ज्या काही विघ्न आलेल्या गोष्टी ऐकतात ना, तर बापदादांना हसण्यासारखा एक खेळ आठवतो. माहित आहे का हसण्यासारखा खेळ कोणता आहे ते? तो खेळ आहे - म्हातारे-म्हातारे बाहुल्यांचा खेळ खेळत आहेत. आहेत म्हातारे परंतु खेळ बाहुल्यांचा खेळतात, तर हसण्यासारखा खेळ आहे ना. तर आता ज्या छोट्या-छोट्या गोष्टी ऐकतात, पाहतात ना तर असेच वाटते, वानप्रस्थ अवस्थावाले आणि गोष्टी किती छोट्या आहेत! तर हे रेकॉर्ड बाबांना आवडत नाही. याच्या ऐवजी, कार्डच्या ऐवजी रेकॉर्ड द्या - निर्विघ्न, छोट्या गोष्टी समाप्त. मोठ्या गोष्टींना छोट्या करायला शिका आणि छोट्या गोष्टींना संपवायला शिका. बापदादा प्रत्येक मुलाचा चेहरा, बापदादांचा चेहरा पाहण्याचा आरसा बनवू इच्छितात. तुमच्या आरशामध्ये बापदादा दिसावेत. तर असा विचित्र आरसा बापदादांना गिफ्ट मध्ये द्या. दुनियेमध्ये तर असा कोणता आरसाच नाही की ज्यामध्ये परमात्मा दिसून येतील. तर तुम्ही या नवीन वर्षाची अशी गिफ्ट द्या जे विचित्र आरसा बनाल. जे कोणी बघतील, जे कोणी ऐकतील तर त्यांना बापदादाच दिसून यावेत, ऐकू यावेत. बाबांचा आवाज ऐकू यावा. तर भेट द्याल का? देणार? जे देण्याचा दृढ संकल्प करत आहेत, त्यांनी हात वर करा. दृढ संकल्पाचा हात वर करा. डबल फॉरेनर्स देखील हात वर करत आहेत. सिंधी ग्रुप देखील हात वर करत आहे. विचार करून हात वर करत आहेत.

चांगले आहे - बापदादांना सिंधी ग्रुप कडून आशा आहे, सांगू कोणती आशा आहे? हीच आशा आहे की सिंधी ग्रुप मधून एक असा माईक निघावा जो चॅलेंज करेल की काय होतो आणि काय बनलो आहे. जो सिंधी लोकांना जागे करेल. बिचारे, खरंच बिचारे आहेत. ओळखतच नाहीत. देशाच्या अवतारालाच जाणत नाहीत. तर सिंधी ग्रुपमध्ये असा माईक निघावा जो चॅलेंज देऊन म्हणेल की, ‘वास्तविकता काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो’. ठीक आहे? ही बापदादांची आशा पूर्ण कराल? अच्छा.

चोहो बाजूच्या सदैव अखंड महादानी मुलांना, चोहो बाजूचे बाबांचे राईट हॅन्ड, आज्ञाधारक भुजांना, चोहो बाजूच्या सदैव सर्व आत्म्यांना हिंमतीचे पंख लावणाऱ्या हिंमतवान आत्म्यांना, चोहो बाजूच्या सदैव बाप समान प्रत्येक कर्मामध्ये फॉलो करणाऱ्या ब्रह्मा बाबा आणि जगत अंबेच्या शिकवणीला सदैव प्रॅक्टिकल जीवनामध्ये आणणाऱ्या सर्व मुलांना खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण, आशीर्वाद आणि नमस्ते.

डबल विदेशींप्रती आणि भारतातील मुलांप्रती डबल गुड नाईट आणि गुड मॉर्निंग दोन्हीही देत आहे. जसे आता आनंदी आहात ना! तर जेव्हा अशी कोणती परिस्थिती येईल तेव्हा आजच्या या दिवसाला आठवून आनंदामध्ये नाच करा. नेहमी खुशीच्या झोपाळ्यामध्ये झोके घेत रहा. कधीही दुःखाची लाट येऊ नये. दुःख देणारे तर दुनियेमध्ये अनेक आत्मे आहेत, तुम्ही सुख देणारे, सुख घेणारे, सुखदात्याची मुले सुख स्वरूप आहात. कधी सुखाच्या झोपाळ्यामध्ये झोके घ्या, कधी प्रेमाच्या झोपाळ्यामध्ये झोके घ्या, कधी शांतीच्या झोपाळ्यामध्ये झोके घ्या. झोकेच घेत रहा. खाली मातीमध्ये पाय ठेवू नका. झोकेच घेत रहा. खुश रहा आणि सर्वांना खुश ठेवा आणि लोकांना खुशी वाटा. अच्छा. ओम् शांती.

वरदान:-
फरिश्तेपणाच्या स्थिती द्वारे बाबांच्या स्नेहाचे रिटर्न देणारे समाधान स्वरूप भव

फरिश्तेपणाच्या स्थितीमध्ये स्थित होणे - हेच बाबांच्या स्नेहाचे रिटर्न आहे, असे रिटर्न देणारे समाधान स्वरूप बनतात. समाधान स्वरूप बनल्याने स्वतःच्या आणि अन्य आत्म्यांच्या समस्या आपोआप संपून जातात. तर आता अशी सेवा करण्याची वेळ आहे, घेण्यासोबतच देण्याची वेळ आहे. म्हणून आता बाप समान उपकारी बनून, हाक ऐकून आपल्या फरिश्ता रुपाद्वारे त्या आत्म्यांपर्यंत पोहोचा आणि समस्यांमुळे थकून गेलेल्या आत्म्यांचा थकवा दूर करा.

सुविचार:-
व्यर्थच्या बाबतीत निष्काळजी बना, मर्यादेमध्ये नाही.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा

आपसातील संस्कारांमध्ये जी भिन्नता आहे त्याला एकतेमध्ये आणायचे आहे. एकतेसाठी वर्तमानाच्या भिन्नतेला नष्ट करून दोन गोष्टी करायच्या आहेत - एक - एकनामी बनून सदैव प्रत्येक गोष्टीमध्ये एकाचेच नाव घ्या, त्याच सोबत संकल्पांची, वेळेची आणि ज्ञानाच्या खजिन्याची इकॉनॉमी करा. म्हणजे मग ‘मी’ विलीन होऊन सगळ्या भिन्नता एका बाबांमध्ये सामावून जातील.