02-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या जुन्या पतित दुनियेविषयी तुम्हाला बेहदचे वैराग्य वाटले पाहिजे कारण तुम्हाला पावन बनायचे आहे, तुमच्या चढत्या कलेने सर्वांचे कल्याण होते”

प्रश्न:-
असे म्हटले जाते - ‘आत्मा आपलीच शत्रू सुद्धा आहे आणि आपलीच मित्र सुद्धा आहे’, खरी मित्रता काय आहे?

उत्तर:-
एका बाबांच्या श्रीमतावर सदैव चालत राहणे - हीच खरी मित्रता आहे. खरी मित्रता आहे बाबांची आठवण करून पावन बनणे आणि बाबांकडून पूर्ण वारसा घेणे. ही मित्रता करण्याची युक्ती बाबाच सांगतात. संगमयुगावरच आत्मा आपला मित्र बनते.

गीत:-
तूने रात गँवाई…

ओम शांती।
असे तर हे गाणे आहे भक्तीमार्गाचे, साऱ्या दुनियेमध्ये जी गाणी गातात किंवा शास्त्र वाचतात, तीर्थांवर जातात, तो सर्व आहे - भक्तीमार्ग. ज्ञानमार्ग कशाला म्हटले जाते, भक्तीमार्ग कशाला म्हटले जाते, हे तुम्ही मुलेच समजू शकता. वेद-शास्त्र, उपनिषद इत्यादी ही सर्व आहेत भक्तीची. अर्धा कल्प भक्ती चालते आणि अर्धा कल्प मग ज्ञानाचे प्रारब्ध चालते. भक्ती करता-करता खाली उतरायचेच आहे. ८४ पुनर्जन्म घेत खाली उतरतात. मग एका जन्मामध्ये तुमची चढती कला होते. याला म्हटले जाते - ज्ञानमार्ग. ज्ञानासाठी गायले गेले आहे - ‘एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती’. रावण राज्य जे द्वापर पासून चालत येते, ते नष्ट होऊन मग राम-राज्य स्थापन होते. ड्रामामध्ये जेव्हा तुमचे ८४ जन्म पूर्ण होतात तेव्हा चढत्या कलेने सर्वांचे भले होते. हे शब्द कुठे ना कुठे काही शास्त्रांमध्ये आहेत. ‘चढती कला सर्व का भला’. सर्वांची सद्गती करणारे तर एक बाबाच आहेत ना. संन्यासी-उदासी तर अनेक प्रकारचे आहेत. अनेक मत-मतांतरे आहेत. जसे शास्त्रांमध्ये लिहिले आहे कल्पाचे आयुर्मान लाखो वर्षे आहे, आता शंकराचार्यांच्या मतानुसार १० हजार वर्षे… किती फरक पडतो. कोणी मग म्हणेल इतके हजार. कलियुगामध्ये आहेत अनेक मनुष्य, अनेक मते, अनेक धर्म. सतयुगामध्ये असतेच एक मत. हे बाबा बसून तुम्हा मुलांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकवतात. असे ऐकविण्यामध्ये देखील किती वेळ लागतो. ऐकवतच राहतात. असे म्हणू शकत नाही की, हे सर्व आधी का नाही ऐकवले. शाळेमध्ये अभ्यासक्रम नंबरवार असतो. छोट्या मुलांची कर्मेंद्रिये छोटी असतात तर त्यांना थोडे शिकवतात. मग जशी-जशी कर्मेंद्रिये मोठी होत जातात, बुद्धीचे कुलूप उघडत जाईल. शिक्षण धारण करत जातील. लहान मुलांच्या बुद्धीमध्ये काही धारण होऊ शकणार नाही. मोठे होतात तर मग बॅरिस्टर, जज वगैरे बनतात, इथे देखील असेच आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये धारणा चांगली होते. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे पतितापासून पावन बनविण्यासाठी. तर आता पतित दुनिये विषयी वैराग्य वाटले पाहिजे. आत्मा पावन बनली तर मग पतित दुनियेमध्ये राहू शकत नाही. पतित दुनियेमध्ये आत्मा देखील पतित, मनुष्य देखील पतित आहेत. पावन दुनियेमध्ये मनुष्य देखील पावन, पतित दुनियेमध्ये मनुष्य देखील पतित असतात. हे आहेच रावण राज्य. यथा राजा-राणी तथा प्रजा. हे सर्व ज्ञान आहे याला बुद्धीने समजून घ्यायचे. यावेळी सर्वांची बाबांशी आहे विपरीत बुद्धी. तुम्ही मुले तर बाबांची आठवण करता. आतमध्ये बाबांविषयी प्रेम आहे. आत्म्यामध्ये बाबांबद्दल प्रेम आहे, आदर आहे कारण बाबांना जाणता. इथे तुम्ही सन्मुख आहात. शिवबाबांकडून ऐकत आहात. ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप, ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर, आनंदाचा सागर आहेत. गीता ज्ञान दाता परमपिता त्रिमूर्ती शिव परमात्मा उवाच. त्रिमूर्ती शब्द जरूर घालायचे आहे कारण त्रिमूर्तीचे तर गायन आहे ना. ब्रह्माद्वारे स्थापना तर जरूर ब्रह्मा द्वारेच ज्ञान ऐकवतील. श्रीकृष्ण तर असे म्हणणार नाही की, ‘शिव भगवानुवाच’. प्रेरणेने काहीही होत नाही. ना त्याच्यामध्ये काही शिवबाबांची प्रवेशता होऊ शकत. शिवबाबा तर परक्या देशामध्ये येतात. सतयुग तर श्रीकृष्णाचा देश आहे ना. तर दोघांचीही महिमा वेग-वेगळी आहे. मुख्य गोष्टच ही आहे.

सतयुगामध्ये गीता तर कोणी वाचत नाहीत. भक्तीमार्गामध्ये तर जन्म-जन्मांतर शिकतात. ज्ञान मार्गामध्ये तर ते असू शकत नाही. भक्तीमार्गामध्ये ज्ञानाच्या गोष्टी असत नाहीत. आता रचता बाबाच रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. मनुष्य काही रचता असू शकत नाही. मनुष्य म्हणू शकत नाही की, ‘मी रचता आहे’. बाबा स्वतः सांगतात - मी मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहे. मी ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर, सर्वांचा सद्गती दाता आहे. श्रीकृष्णाची महिमाच वेगळी आहे. तर हा सर्व कॉन्ट्रास्ट (फरक) लिहिला पाहिजे. जेणेकरून मनुष्य वाचून लगेच समजतील की, गीतेचा ज्ञान दाता श्रीकृष्ण नाही आहे; आणि या गोष्टीचा जर त्यांनी स्वीकार केला तर तुम्ही जिंकलात. मनुष्य श्रीकृष्णासाठी किती व्याकुळ होतात, जसे शिवाचे भक्त शिवासाठी गळा कापायला तयार होतात; बस्स, ‘मला शिवाकडे जायचे आहे’, तसे ते समजतात श्रीकृष्णाकडे जायचे आहे. परंतु श्रीकृष्णाकडे जाऊ शकत नाहीत. श्रीकृष्णकडे बळी चढण्याचा प्रश्नच येत नाही. देवींवर बळी चढतात. देवतांवर कधी कोणी बळी चढणार नाहीत. तुम्ही देवी आहात ना. तुम्ही शिवबाबांच्या बनला आहात तर शिवबाबांवर देखील बळी चढता. शास्त्रांमध्ये हिंसक गोष्टी लिहिल्या आहेत. तुम्ही तर शिवबाबांची संतान आहात. तन-मन-धनाने बळी चढता, बाकी दुसरी कोणती गोष्ट नाहीये त्यामुळे शिव आणि देवींवर बळी चढतात. आता गव्हर्मेंटने शिवकाशीमध्ये बळी चढवणे बंद केले आहे. आता ती तलवारच नाही आहे. भक्तिमार्गामध्ये जे आपघात (आत्महत्या) करतात हा देखील जसा स्वतःशी वैर करण्याचा उपाय आहे. मित्रता करण्याचा एकच उपाय आहे जो बाबा सांगतात - पावन बनून बाबांकडून पूर्ण वारसा घ्या. एका बाबांच्या श्रीमतावर चालत रहा, हीच मित्रता आहे. म्हणतात की, ‘जिवात्मा स्वतःचीच शत्रू आहे’. मग बाबा येऊन ज्ञान देतात तर मग जिवात्मा स्वतःचीच मित्र बनते. आत्मा पवित्र बनून बाबांकडून वारसा घेते, संगमयुगावर प्रत्येक आत्म्याला बाबा येऊन मित्र बनवतात. आत्मा स्वतःची मित्र बनते, श्रीमत मिळते तर ती समजते की, मी बाबांच्या मतावरच चालणार. स्वतःच्या मतावर अर्धा कल्प चाललो. आता श्रीमताद्वारे सद्गतीला प्राप्त करायचे आहे, यामध्ये स्वतःची मत चालू शकत नाही. बाबा तर फक्त मत देतात. तुम्ही देवता बनण्यासाठी आला आहात ना. इथे चांगली कर्म कराल तर दुसऱ्या जन्मामध्ये देखील चांगले फळ मिळेल, अमरलोकमध्ये. हा तर आहेच मृत्यूलोक. हे रहस्य देखील तुम्ही मुलेच जाणता, तेही नंबरवार. कोणाच्या बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने धारणा होते, कोणी धारणा करू शकत नाहीत तर यामध्ये टीचर काय करू शकतील. टीचर कडून कृपा अथवा आशीर्वाद मागणार काय. टीचर तर शिकवून स्वतःच्या घरी निघून जातात. शाळेमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम भगवंताची प्रार्थना करतात - हे भगवान, आम्हाला पास करा म्हणजे मग आम्ही भोग घेऊन येऊ. टीचरला कधी म्हणणार नाहीत की, आशीर्वाद द्या. यावेळी परमात्मा आपला पिता देखील आहे तर टीचर देखील आहे. बाबांचे आशीर्वाद तर नक्कीच असतातच. बाबा मुलांवर प्रेम करतात, मुले आली तर त्यांना धन देईन. तर हा आशीर्वाद झाला ना. हा एक नियम आहे. मुलाला पित्याकडून वारसा मिळतो. आता तर तमोप्रधानच होत जातात. जसा पिता तशी मुले. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्ट तमोप्रधान होत जाते. तत्त्व देखील तमोप्रधानच होत जातात. हे आहेच दुःखधाम. अजून ४० हजार वर्षे जर आयुर्मान असेल तर काय हालत होईल. लोकांची बुद्धी अगदीच तमोप्रधान झाली आहे.

आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये बाबांसोबत योग लावल्याने प्रकाश आला आहे. बाबा म्हणतात - जितके आठवणीमध्ये रहाल तितकी लाईट (तेज) वाढत जाईल. आठवणीमुळे आत्मा पवित्र बनते. लाईट वाढत जाते. आठवणच केली नाहीत तर लाईट मिळणार नाही. आठवणीनेच लाईटची वृद्धी होते. जर आठवण केली नाहीत आणि मग कोणते विकर्म केलेत तर लाईट कमी होईल. तुम्ही पुरुषार्थ करता सतोप्रधान बनण्याचा. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आठवणीनेच तुमची आत्मा पवित्र होत जाईल. तुम्ही लिहू देखील शकता - हे रचयिता आणि रचनेचे ज्ञान श्रीकृष्ण देऊ शकत नाही. ते तर आहे प्रारब्ध. हे देखील लिहिले पाहिजे की ८४ व्या अंतिम जन्मामध्ये कृष्णाची आत्मा पुन्हा ज्ञान घेत आहे; मग पहिल्या नंबरमध्ये जाते. बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे सतयुगामध्ये नऊ लाखच असतील, मग त्यांच्यापासून वृद्धी देखील होईल ना. दास-दासी देखील पुष्कळ असतील ना, जे पूर्ण ८४ जन्म घेतात. ८४ जन्मच मोजले जातात. जे चांगल्या रीतीने परीक्षा पास करतील ते सर्वप्रथम येतील. जितके उशिराने जातील तर घर तर जुने आहे असे म्हणणार ना. नवीन घर बनते मग दिवसेंदिवस आयुर्मान कमी होत जाईल. तिथे तर सोन्याचे महाल बनतात, ते तर जुने होऊ शकत नाहीत. सोने तर कायम चमकतच राहील. तरी देखील साफ जरूर करावे लागते. दागिने देखील भले चोख सोन्याचे बनवा तरी देखील शेवटी चमक तर कमी होते, मग त्याला पॉलिश केले पाहिजे. तुम्हा मुलांना सदैव याचा आनंद वाटला पाहिजे की आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत. या नरकामध्ये हा अंतिम जन्म आहे. या डोळ्यांनी जे बघतो तर जाणतो की, ही जुनी दुनिया, जुने शरीर आहे. आता आम्हाला सतयुग नवीन दुनियेमध्ये नवीन शरीर घ्यायचे आहे. पाच तत्व देखील नवीन असतात. असे विचार सागर मंथन चालले पाहिजे. हे शिक्षण आहे ना. शेवटपर्यंत तुमचे हे शिक्षण चालू राहील. शिक्षण बंद झाले की मग विनाश होईल. तर स्वतःला स्टुडंट समजून या आनंदामध्ये राहिले पाहिजे ना की, स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत. हा आनंद काही कमी थोडाच आहे. परंतु त्यासोबतच माया देखील उलटे काम करवून घेते. ५-६ वर्षे पवित्र राहून मग माया खाली कोसळून घालते (पतन होते). एकदा जरी कोसळला तर मग ती अवस्था बनू शकत नाही. आपण कोसळलो आहोत तर ती घृणा येते. आता तुम्हा मुलांनी सर्वकाही लक्षात ठेवायचे आहे. या जन्मामध्ये जी पापे केली आहेत, प्रत्येक आत्म्याला आपल्या जीवनाविषयी तर माहिती आहे ना. कोणी मंद-बुद्धी, कोणी विशाल-बुद्धी असतात. आपला बालपणीचा इतिहास तर आपल्या लक्षात असतो ना. हे बाबा (ब्रह्मा बाबासुद्धा) बालपणीचा इतिहास ऐकवतात ना. बाबांना ते घर इत्यादी सर्व लक्षात आहे. परंतु आता तर तिथे देखील सर्व नवीन घरे बनली असतील. सहाव्या वर्षापासूनची स्वतःची जीवन कहाणी लक्षात राहते. जर विसरला असेल तर डल-बुद्धी म्हणणार. बाबा म्हणतात - स्वतःची जीवन कहाणी लिहा. आयुष्याची गोष्ट आहे ना. माहिती होते की लाईफमध्ये किती चमत्कार होते. गांधी, नेहरू इत्यादींचे किती मोठे-मोठे खंड बनतात. वास्तविक लाइफ तर तुमची खूप मौल्यवान आहे. वंडरफुल लाईफ आहे. हे आहे मोस्ट व्हॅल्युएबल, अमूल्य जीवन. याचे मूल्य कथन केले जाऊ शकत नाही. यावेळी तुम्हीच सेवा करता. हे लक्ष्मी-नारायण काहीच सेवा करत नाहीत. तुमची लाईफ खूप व्हॅल्युएबल (खूप मौल्यवान) आहे, जेव्हा इतरांचे देखील असे जीवन बनविण्याची सेवा करता. जे चांगली सेवा करतात ते गायन लायक बनतात. वैष्णव देवीचे देखील मंदिर आहे ना. आता तुम्ही खरे-खरे वैष्णव बनता. वैष्णव अर्थात जे पवित्र आहेत. आता तुमचे खाणे-पिणे देखील वैष्णव आहे. पहिल्या नंबरच्या विकारामध्ये (काम विकारामध्ये) तरी तुम्ही वैष्णव (पवित्र) आहातच. जगत-अंबेची ही सर्व मुले ब्रह्माकुमार-कुमारी आहेत ना. ब्रह्मा आणि सरस्वती. बाकी सर्व मुले त्यांची संतान आहेत. नंबरवार देवी देखील आहेत, ज्यांची पूजा होते. बाकी इतक्या भुजा इत्यादी ज्या दिल्या आहेत ते सर्व आहे फालतू. तुम्ही अनेकांना आप समान बनवता त्यामुळे भुजा दिल्या आहेत. ब्रह्माला देखील १०० भुजावाला, हजार भूजावाला दाखवतात. या सर्व भक्तीमार्गातील गोष्टी आहेत. तुम्हाला मग बाबा म्हणतात - दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. कोणालाही दुःख देऊ नका. कोणाला उलटा-सुलटा रस्ता सांगून सत्यानाश करू नका. एकच मुख्य गोष्ट समजावून सांगितली पाहिजे की, बाबा आणि वारशाची आठवण करा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) गायन किंवा पूजन योग्य बनण्याकरिता पक्का वैष्णव बनायचे आहे. खाण्या-पिण्याच्या शुद्धतेबरोबरच पवित्र रहायचे आहे. या मौल्यवान जीवनामध्ये सेवा करून अनेकांचे जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे.

२) बाबांसोबत असा योग ठेवायचा आहे ज्यामुळे आत्म्याची लाईट वाढत जाईल. कोणतेही विकर्म करून लाईट कमी करायची नाही. स्वतः सोबत मित्रता करायची आहे.

वरदान:-
स्व-स्थितीच्या सीटवर स्थित राहून परिस्थितींवर विजय प्राप्त करणारे मास्टर रचता भव

कोणतीही परिस्थिती प्रकृतीद्वारे येते त्यामुळे परिस्थिती रचना आहे आणि स्व-स्थितीवाला रचयिता आहे. मास्टर रचता किंवा मास्टर सर्वशक्तिवान कधीही हार खाऊ शकत नाही. असंभव आहे. जेव्हा कोणी आपली सीट सोडतात तेव्हा हार होते. सीट सोडणे अर्थात शक्तीहीन बनणे. सीटच्या आधारे शक्ती स्वतः येतात. जे सीट वरून खाली येतात त्यांना मायेची धुळ लागते. बापदादांचे लाडके, मरजीवा जन्मधारी ब्राह्मण कधीही देह-अभिमानाच्या मातीमध्ये खेळू शकत नाहीत.

बोधवाक्य:-
दृढता कठोर संस्कारांना देखील मेणबत्ती प्रमाणे वितळवून टाकते (नष्ट करते).

अव्यक्त इशारे - कंबाइंड रूपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना:-

जसे ज्ञान स्वरूप आहात तसे स्नेह स्वरूप बना, ज्ञान आणि स्नेह दोन्ही कंबाइंड असावेत कारण ज्ञान बीज आहे, पाणी स्नेह आहे. जर बिजाला पाणी मिळाले नाही तर फळ देणार नाही. ज्ञानासोबत हृदयापासूनचा स्नेह असेल तर प्राप्तीचे फळ मिळेल.