03-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आत्मा रूपी ज्योतीमध्ये ज्ञान-योगाचे घृत टाका तर ज्योत तेवत राहील, ज्ञान आणि योगाचे कॉन्ट्रास्ट व्यवस्थित समजून घ्यायचे आहे”

प्रश्न:-
बाबांचे कार्य प्रेरणेने होऊ शकत नाही, त्यांना इथे यावेच लागेल, असे का?

उत्तर:-
कारण मनुष्यांची बुद्धी एकदम तमोप्रधान आहे. तमोप्रधान बुद्धी प्रेरणेला कॅच करू शकत नाही. बाबा येतात तेव्हा तर म्हटले जाते - ‘छोड़ भी दे आकाश सिंहासन…’

गीत:-
‘छोड़ भी दे आकाश सिंहासन…

ओम शांती।
भक्तांनी हे गाणे बनवले आहे. आता याचा अर्थ किती सुंदर आहे. म्हणतात - आकाश सिंहासन सोडून या. आता आकाश तर हे आहे. हे आहे राहण्याचे स्थान. आकाशातून तर कोणती वस्तू येत नाही. आकाश सिंहासन म्हणतात. आकाश तत्वामध्ये तर तुम्ही राहता आणि बाबा राहतात महतत्वामध्ये. त्याला ब्रह्म किंवा महतत्त्व म्हटले जाते, इथे आत्मे निवास करतात. बाबा देखील जरूर तिथूनच येतील. कोणी तरी येईल ना. म्हणतात - येऊन आमची ज्योत जागृत करा. गायन देखील आहे - एक आहे ‘अन्धे की औलाद अन्धे’ आणि दुसरे आहेत ‘सज्जे की औलाद सज्जे’. धृतराष्ट्र आणि युधिष्ठिर नावे दाखवतात. आता ही तर औलाद आहे रावणाची. माया रूपी रावण आहे ना. सर्वांची रावण बुद्धी आहे, आता तुम्ही आहात ईश्वरीय बुद्धी. बाबा आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडत आहेत. रावण कुलूप बंद करतो. जेव्हा एखाद्याला कोणती गोष्ट समजत नाही तेव्हा त्याला म्हणतात - हा तर पत्थर-बुद्धी आहे. बाबा इथे येऊन ज्योत जागृत करतील ना; प्रेरणेने थोडेच काम होते. आत्मा जी सतोप्रधान होती, तिची ताकद आता कमी झाली आहे. तमोप्रधान बनली आहे. एकदम झुंझार (धुरकट) झाली आहे. व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तर तिच्यासाठी दिवा पेटवून ठेवतात. आता दिवा का पेटवतात? समजतात दिवा विझून अंधार होऊ नये म्हणून दिवा पेटवून ठेवतात. आता इथे दिवा पेटवल्याने तिथे कसा प्रकाश होईल? काहीच समजत नाहीत. आता तुम्ही हुशार-बुद्धी बनता. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला स्वच्छ-बुद्धी बनवितो’. ज्ञान घृत टाकतो. ही देखील समजावून सांगण्याची गोष्ट आहे. ज्ञान आणि योग दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. योगाला ज्ञान म्हणता येणार नाही. कोणी समजतात भगवंताने येऊन हे देखील ज्ञान दिले ना की, माझी आठवण करा. परंतु याला ज्ञान म्हणता येणार नाही. हे तर बाबा आणि मुले आहेत. मुले जाणतात की हे आपले बाबा आहेत, यामध्ये ज्ञानाची गोष्ट म्हणता येणार नाही. ज्ञान तर विस्तार आहे. ही तर केवळ आठवण आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. बस्स, ही तर कॉमन गोष्ट आहे. याला ज्ञान म्हटले जात नाही. बाळाने जन्म घेतला तर ते जरूर पित्याची आठवण करेल ना. ज्ञानाचा विस्तार आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा- हे काही ज्ञान नाही झाले. तुम्ही स्वतः जाणता, आपण आत्मा आहोत, आपले पिता परम आत्मा परमात्मा आहेत. याला ज्ञान म्हणावे का? बाबांना बोलावतात. ज्ञान तर आहे नॉलेज, ज्या प्रकारे कोणी एम.ए करतात, कोणी बी. ए. करतात, किती ढीगभर पुस्तके वाचावी लागतात. आता बाबा तर म्हणतात तुम्ही माझी मुले आहात ना, मी तुमचा पिता आहे. माझ्याशीच योग लावा अर्थात आठवण करा. याला ज्ञान म्हणता येत नाही. तुम्ही मुले तर आहातच. तुम्ही आत्मे कधीही विनाशाला प्राप्त होत नाही. कोणाचा मृत्यू होतो तर त्याच्या आत्म्याला बोलावतात, आता ते शरीर तर नष्ट झाले. आत्मा भोजन कसे खाणार? भोजन तर तरीही ब्राह्मणच खातील. परंतु हे सर्व आहेत भक्तिमार्गाचे रिवाज. असे नाही की आपल्या सांगण्याने तो भक्तीमार्ग बंद होईल. तो तर चालतच येतो. आत्मा तर एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेते.

मुलांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आणि योगाचे कॉन्ट्रास्ट अगदी स्पष्ट असले पाहिजे. बाबा जे म्हणतात - ‘माझी आठवण करा’, हे काही ज्ञान नाही आहे. हे तर बाबा डायरेक्शन देतात, याला योग म्हटले जाते. ज्ञान आहे - सृष्टी चक्र कसे फिरते - त्याचे नॉलेज. योग अर्थात आठवण. मुलांचे कर्तव्य आहे - बाबांची आठवण करणे. ते आहेत लौकिक, हे आहेत पारलौकिक. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. तर ज्ञान वेगळे झाले ना. मुलाला सांगावे लागते का की, बाबांची आठवण कर. लौकिक पिता तर जन्मताच लक्षात राहतो. इथे बाबांची आठवण करून द्यावी लागते. यामध्ये मेहनत करावी लागते. स्वतःला आत्मा समजून बाबांना आठवण करणे - हे खूप मेहनतीचे काम आहे. म्हणून बाबा म्हणतात योगामध्ये टिकून राहू शकत नाही. मुले लिहितात - बाबा आठवण विसरायला होते. असे म्हणत नाहीत की ज्ञान विसरायला होते. ज्ञान तर खूप सोपे आहे. आठवणीला ज्ञान म्हटले जात नाही, यामध्ये मायेची वादळे खूप येतात. भले ज्ञानामध्ये कोणी खूप हुशार आहेत, मुरली खूप चांगली चालवतात परंतु बाबा विचारतात - आठवणीचा चार्ट काढा, किती वेळ आठवण करता? बाबांची आठवण केल्याचा यथार्थ चार्ट बनवून दाखवा. मुख्य गोष्ट आठवणीचीच आहे. पतितच बोलावतात की, येऊन पावन बनवा. मुख्य गोष्ट आहे पावन बनण्याची. यामध्येच मायेची विघ्ने पडतात. शिव भगवानुवाच - आठवणीमध्ये सगळेच खूप कच्चे आहेत. चांगली-चांगली मुले जी मुरली तर खूप चांगली चालवतात, परंतु आठवणीमध्ये एकदम कमजोर आहेत. योगाद्वारेच विकर्म विनाश होतात. योगाद्वारेच कर्मेंद्रिये एकदम शांत होऊ शकतात. एका बाबांव्यतिरिक्त दुसरे काहीही आठवता कामा नये, कोणता देह सुद्धा आठवू नये. आत्मा जाणते ही संपूर्ण दुनिया नष्ट होणार आहे, आता आपण आपल्या घरी जातो. नंतर मग येणार राजधानीमध्ये. हे कायम बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. ज्ञान जे मिळते ते आत्म्यामध्ये राहिले पाहिजे. बाबा तर आहेत योगेश्वर, जे आठवण शिकवतात. वास्तविक ईश्वराला योगेश्वर म्हणता येणार नाही. तुम्ही योगेश्वर आहात. ईश्वर बाबा म्हणतात - माझी आठवण करा. हे आठवण शिकविणारे ईश्वर पिता आहेत. ते निराकार पिता शरीराद्वारे ऐकवतात. मुले देखील शरीराद्वारे ऐकतात. कित्येकजण तर योगामध्ये खूप कच्चे आहेत. अजिबात आठवण करत नाहीत. जी काही जन्म-जन्मांतरीची पापे आहेत सर्वांची सजा खातील. इथे येऊन जे पाप करतात ते तर अजूनच शंभर पटीने सजा खातील. ज्ञानाची बडबड तर खूप करतात, योग मात्र अजिबात नाही आहे ज्यामुळे पापे भस्म होत नाहीत, कच्चेच राहतात; म्हणूनच खरीखुरी माळा ८ चीच बनली आहे. नवरत्न गायली जातात. १०८ रत्न असे कधी ऐकले आहे? १०८ रत्नांची कोणती वस्तू बनवत नाहीत. असे भरपूर आहेत जे या गोष्टींना पूर्णपणे समजत नाहीत. आठवणीला ज्ञान म्हटले जात नाही. ज्ञान सृष्टीचक्राला म्हटले जाते. शास्त्रांमध्ये ज्ञान नाहीये, ती शास्त्र आहेत भक्ती मार्गाची, बाबा स्वतः म्हणतात मी याच्याद्वारे प्राप्त होत नाही. साधू इत्यादी सर्वांचा उद्धार करण्याकरिता मी येतो. ते समजतात ब्रह्ममध्ये लीन व्हायचे आहे. मग उदाहरण देतात - पाण्याच्या बुडबुड्याचे. आता तुम्ही असे म्हणत नाही. तुम्ही तर जाणता आपण आत्मे बाबांची मुले आहोत. “मामेकम् याद करो'’ हे शब्द देखील म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत. भले म्हणतात आपण आत्मा आहोत परंतु आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे - हे ज्ञान अजिबात नाहीये. हे बाबाच येऊन ऐकवतात. आता तुम्ही जाणता आम्हा आत्म्यांचे घर ते आहे. तिथे संपूर्ण सिजरा (वंश वृक्ष) आहे. प्रत्येक आत्म्याला आपापला पार्ट मिळालेला आहे. सुख कोण देतात, दुःख कोण देतात हे देखील कोणाला माहित नाही आहे.

भक्ती आहे रात्र, ज्ञान आहे दिवस. ६३ जन्म तुम्ही त्रास सहन करता. मग ज्ञान देतो तर किती वेळ लागतो? सेकंद. हे तर गायले गेले आहे - सेकंदामध्ये जीवन मुक्ती. हे तुमचे पिता आहेत ना, तेच पतित-पावन आहेत. त्यांची आठवण केल्याने तुम्ही पावन बनाल. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग हे चक्र आहे. नावे देखील जाणतात परंतु असे पत्थर-बुद्धी आहेत की, कालावधी विषयी कोणालाच माहिती नाहीये. समजतात देखील घोर कलियुग आहे. जर कलियुग अजूनही चालू राहिले तर अजूनच घोर अंधार होईल म्हणून गायले जाते - ‘कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले होते आणि विनाश झाला’. थोडे जरी ज्ञान ऐकले तर प्रजा बनतात. कुठे हे लक्ष्मी-नारायण, कुठे प्रजा! शिकवणारे तर एकच आहेत. प्रत्येकाचे आपापले भाग्य आहे. काहीजण तर स्कॉलरशिप घेतात, आणि मग कोणी नापास होतात. रामाला बाणाची निशाणी का दिली आहे? कारण नापास झाला. ही देखील गीता पाठशाळा आहे, कोणी तर काहीच मार्क्स घेण्याच्या लायक नाहीत. मी आत्मा बिंदू आहे, बाबा देखील बिंदू आहेत, असे त्यांना आठवण करायचे आहे. जे या गोष्टींना समजत देखील नाहीत, ते काय पद प्राप्त करतील! आठवणीमध्ये न राहिल्याने खूप घाटा पडतो. आठवणीचे बळ खूप कमाल करते, कर्मेंद्रिये एकदम शांत, शितल होतात. ज्ञानाने शांती होणार नाही, योगाच्या बळाने शांती होईल. भारतवासी बोलावतात की येऊन आम्हाला ते गीतेचे ज्ञान ऐकवा, आता कोण येणार? श्रीकृष्णाची आत्मा तर इथे आहे. कोणी सिंहासनावर थोडेच बसतात, ज्याला बोलवतात. जर कोणी म्हटले की, आम्ही क्राइस्टच्या आत्म्याची आठवण करतो. अरे, ती तर इथेच आहे, त्यांना काय माहित की क्राइस्टची सोल इथेच आहे, परत जाऊ शकत नाही. लक्ष्मी-नारायण, या पहिल्या नंबर वाल्यांनाच पूर्ण ८४ जन्म घ्यायचे आहेत तर बाकीचे मग परत कसे जाऊ शकतात. तो सर्व हिशोब आहे ना. मनुष्य तर जे काही बोलतात ते खोटे. अर्धा कल्प आहे झूठ खंड, अर्धा कल्प आहे सचखंड. आता तर प्रत्येकाला समजावून सांगितले पाहिजे - यावेळी सर्व नरकवासी आहेत मग स्वर्गवासी देखील भारतवासीच बनतात. मनुष्य किती वेद-शास्त्र, उपनिषद इत्यादी वाचतात. याद्वारे मुक्तीला प्राप्त करतील काय? उतरायचे तर आहेच. प्रत्येक वस्तू सतो, रजो, तमोमध्ये जरूर येते. न्यू वर्ल्ड (नवीन दुनिया) कशाला म्हटले जाते, हे ज्ञान कोणालाच नाही आहे. हे तर बाबा सन्मुख बसून समजावून सांगतात. देवी-देवता धर्म कधी, कोणी स्थापन केला - भारतवासीयांना काहीच माहिती नाहीये. तर बाबांनी समजावून सांगितले आहे - ज्ञानामध्ये भले कितीही चांगले आहेत परंतु योगामध्ये बरीच मुले नापास आहेत. योग नसेल तर विकर्म विनाश होणार नाहीत, उच्च पद मिळणार नाही. जे योगामध्ये तल्लीन आहेत तेच उच्च पद प्राप्त करतील. त्यांची कर्मेंद्रिये एकदम शितल होतात. देहा सहित सर्व काही विसरून देही-अभिमानी बनतात. आपण अशरीरी आहोत आता घरी जातो. उठता-बसता असेच समजा - आता हे शरीर तर सोडायचे आहे. आपण पार्ट बजावला, आता घरी जातो. ज्ञान तर मिळाले आहे, जसे बाबांमध्ये ज्ञान आहे, त्यांना तर काही कोणाची आठवण करायची नाहीये. आठवण तर तुम्हा मुलांना करायची आहे. बाबांना ‘ज्ञानाचा सागर’ म्हटले जाते. ‘योगाचा सागर’ असे तर म्हणणार नाही ना. चक्राचे नॉलेज ऐकवतात आणि स्वतःचा परिचय देतात. आठवणीला ज्ञान म्हटले जात नाही. आठवण तर मुलांना आपोआपच येते. आठवण तर करायचीच आहे, नाही तर वारसा कसा मिळेल? बाबा आहेत तर वारसा जरूर मिळतो. बाकी आहे नॉलेज. आपण ८४ जन्म कसे घेतो, तमोप्रधानापासून सतोप्रधान, सतोप्रधानापासून तमोप्रधान कसे बनतो, हे बाबाच समजावून सांगतात. आता सतोप्रधान बनायचे आहे बाबांच्या आठवणीद्वारे. तुम्ही रूहानी मुले रूहानी बाबांकडे आला आहात, त्यांना शरीराचा आधार तर पाहिजे ना. म्हणतात मी वृद्ध तनामध्ये प्रवेश करतो. आहे देखील वानप्रस्थ अवस्था. आता बाबा येतात तेव्हा संपूर्ण सृष्टीचे कल्याण होते. हा (ब्रह्मा बाबा) आहे भाग्यशाली रथ, यांच्याद्वारे किती सेवा होते. तर या शरीराचे भान सोडण्याकरिता आठवण पाहिजे. यामध्ये ज्ञानाची गोष्ट नाही. जास्त करून आठवण शिकवायची आहे. ज्ञान तर सोपे आहे. लहान मुले देखील ऐकवू शकतील. बाकी आठवणीमध्येच मेहनत आहे. एकाचीच आठवण रहावी, याला म्हटले जाते अव्यभिचारी आठवण. कोणाच्या शरीराची आठवण करणे - ती आहे व्यभिचारी आठवण. आठवणीद्वारे सर्वांना विसरून अशरीरी बनायचे आहे.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) उठता-बसता बुद्धीमध्ये रहावे की, आता मी हे जुने शरीर सोडून परत घरी जाणार. ज्याप्रमाणे बाबांमध्ये सर्व ज्ञान आहे, असे मास्टर ज्ञानाचा सागर बनायचे आहे.

वरदान:-
कंबाइंड स्वरूपाच्या स्मृती द्वारे श्रेष्ठ स्थितीच्या सीटवर सेट राहणारे सदा संपन्न भव संगमयुगावर शिव-शक्तीच्या कंबाइंड स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहिल्याने प्रत्येक असंभव कार्य संभव होते. हेच सर्व श्रेष्ठ स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये स्थित राहिल्याने ‘संपन्न भव’चे वरदान मिळते. बापदादा सर्व मुलांना कायम सुखदायी स्थितीची सीट देतात. सदैव याच सीटवर सेट रहा तर अतींद्रीय सुखाच्या झोपाळ्यामध्ये झोके घेत रहाल, फक्त विस्मृतीचे संस्कार समाप्त करा.

बोधवाक्य:-
पॉवरफुल वृत्ती द्वारे आत्म्यांना योग्य आणि योगी बनवा.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- एक मताचे वातावरण तेव्हा बनेल जेव्हा सामावण्याची शक्ती असेल. तर भिन्नतेला सामावून घ्या तेव्हा आपसामध्ये जवळ याल आणि सर्वांसमोर दृष्टांत रूप बनाल. ब्राह्मण परिवाराची विशेषता आहे - अनेक असताना देखील एक. हे एकतेचे व्हायब्रेशन संपूर्ण विश्वामध्ये एक धर्म, एक राज्याची स्थापना करेल; म्हणून विशेष अटेंशन देऊन भिन्नतेला नाहीसे करून एकता आणायची आहे.