03-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुमचे हे नवीन झाड खूप गोड आहे, या गोड झाडालाच किडे लागतात, किड्यांना
नष्ट करण्याचे औषध आहे मनमनाभव”
प्रश्न:-
पास विद् ऑनर
होणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणे काय असतील?
उत्तर:-
ते फक्त एका विषयातच नाही परंतु सर्व विषयांवर संपूर्ण लक्ष देतील. स्थूल सेवेचा
विषय देखील चांगला आहे, अनेकांना सुख मिळते, याने देखील मार्क्स जमा होतात परंतु
त्याच सोबत ज्ञान देखील पाहिजे तर वर्तणूक देखील हवी. दैवी गुणांवर पूर्णपणे अटेंशन
असावे. ज्ञान-योग पूर्ण असावा तेव्हा पास विद् ऑनर होऊ शकाल.
गीत:-
न वह हमसे जुदा
होंगे…
ओम शांती।
मुलांनी काय ऐकले? मुलांचे मन कोणामध्ये गुंतले आहे? गाईड मध्ये. गाईड काय-काय
दाखवतात? स्वर्गामध्ये जाण्याचा दरवाजा दाखवतात. मुलांना नाव देखील दिले आहे - ‘गेट
वे टू हेवन’. स्वर्गाचे फाटक कधी उघडते? आत्ता तर हेल (नरक) आहे ना. हेवनचे (स्वर्गाचे)
फाटक कोण उघडतात आणि कधी उघडतात? हे तुम्ही मुलेच जाणता. तुम्हाला सदैव आनंद वाटत
असतो. स्वर्गामध्ये जाण्यासाठी रस्ता तुम्ही जाणता. मेळे, प्रदर्शनी द्वारे तुम्ही
हे दाखवता की मनुष्य स्वर्गाच्या द्वारी कसा जाऊ शकतो. चित्रे तर तुम्ही पुष्कळ
बनवली आहेत. बाबा विचारतात - या सर्व चित्रांमध्ये कोणते असे चित्र आहे ज्याद्वारे
आपण कोणालाही समजावू शकू की हे आहे स्वर्गामध्ये जाण्याचे गेट. गोळा (सृष्टी
चक्राच्या) चित्रामध्ये स्वर्गामध्ये जाण्याचे गेट सिद्ध होते. हेच योग्य आहे. वरती
त्या बाजूला आहे नरकाचे गेट आणि या बाजूला आहे स्वर्गाचे गेट. अगदी क्लियर आहे.
इथून सर्व आत्मे पळतात शांतीधामला मग येतात स्वर्गामध्ये. हे गेट आहे. संपूर्ण
चक्राला देखील गेट म्हणणार नाही. वरती जिथे संगम दाखवला आहे ते आहे पूर्ण गेट.
जिथून आत्मे निघून जातात, आणि मग नवीन दुनियेमध्ये येतात. बाकी सर्व शांतीधाम मध्ये
राहतात. काटा दाखवतो - हा नरक आहे, तो स्वर्ग आहे. सर्वात चांगले फर्स्ट क्लास
समजावून सांगण्यालायक हे चित्र आहे. अगदी क्लियर आहे, गेट वे टू हेवन. ही बुद्धीने
समजून घेण्याची गोष्ट आहे ना. अनेक धर्मांचा विनाश आणि एका धर्माची स्थापना होत आहे.
तुम्ही जाणता आम्ही सुखधाममध्ये जाणार, बाकी सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. गेट
तर अगदी क्लिअर आहे. हा गोळाच मुख्य चित्र आहे. यामध्ये नरकाचे द्वार, स्वर्गाचे
द्वार अगदी क्लियर आहे. स्वर्गाद्वारी जे कल्पापूर्वी गेले होते तेच जातील, बाकी
सर्व शांतीद्वार मध्ये निघून जातील. नरकाचे द्वार बंद होऊन शांती आणि सुखाचे द्वार
उघडते. सर्वात फर्स्ट क्लास चित्र हे आहे. बाबा कायम सांगतात - त्रिमूर्ती, दोन गोळे
आणि हे चक्र ही फर्स्ट क्लास चित्रे आहेत. जे कोणी येईल त्यांना आधी या चित्रावर
दाखवा स्वर्गामध्ये जाण्याचे हे गेट आहे. हा नरक, हा स्वर्ग. नरकाचा आता विनाश होतो.
मुक्तीचे गेट उघडते. यावेळी आपण स्वर्गामध्ये जाणार बाकी सर्व शांतीधाम मध्ये जातील.
किती सोपे आहे. स्वर्गाच्या द्वारी सर्वच तर जाणार नाहीत. तिथे तर या
देवी-देवतांचेच राज्य होते. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, स्वर्गाच्या द्वारी
जाण्यासाठी आता आपण लायक बनलो आहोत. “जितना लिखेंगे, पढ़ेंगे होंगे नवाब, रूलेंगे,
पिलेंगे तो होंगे खराब” (जितके शिकालसवराल तितके उच्च पद मिळवाल आणि
खेळण्या-बागडण्यामध्ये वेळ घालवाल तर पद भ्रष्ट होईल). सर्वात चांगले चित्र हे
गोळ्याचे आहे, बुद्धीने समजू शकता एकदा चित्र पाहिले मग बुद्धीने विचार केला जातो.
तुम्हा मुलांचे पूर्ण दिवस हे विचार चालत राहिले पाहिजेत की, कोणते चित्र मुख्य
असावे, ज्यावर आम्ही चांगल्या रीतीने समजावून सांगू शकतो. गेट वे टू हेवन - हे
इंग्रजी अक्षर खूप चांगले आहे. आता तर अनेक भाषा झाल्या आहेत. ‘हिंदी’ शब्द
‘हिंदुस्थान’ वरून निघाला आहे. हिंदुस्तान शब्द काही बरोबर नाही आहे, याचे खरे नाव
तर भारतच आहे. भारत खंड म्हणतात. अशी तर गल्ल्या इत्यादींची नावे बदलली जातात.
खंडाचे नाव थोडेच बदलले जाते. महाभारत शब्द आहे ना. सर्व ठिकाणी भारतच स्मृतीत येतो.
गातात देखील - ‘भारत आमचा देश आहे’. हिंदू धर्म म्हटल्याने मग भाषा देखील हिंदी केली
आहे. हे आहे असत्य. सतयुगामध्ये सत्यच सत्य होते - सत्य परिधान करणे, सत्य खाणे,
सत्य बोलणे. इथे सर्वच खोटे झाले आहे. तर हा ‘गेट वे टू हेवन’ शब्द खूप चांगला आहे.
चला, आम्ही तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्याचे गेट सांगतो. किती भाषा झाल्या आहेत. बाबा
तुम्हा मुलांना सद्गतीचे श्रेष्ठ मत देतात. बाबांच्या मतासाठी गायन आहे - त्यांची
गत मत न्यारी. तुम्हा मुलांना किती सोपे मत देतात. ईश्वराच्या श्रीमतावरच तुम्हाला
चालायचे आहे. डॉक्टरच्या मतावर डॉक्टर बनतील. भगवंताच्या मतावर भगवान-भगवती बनायचे
असते. आहे देखील ‘भगवानुवाच’; म्हणूनच बाबांनी सांगितले होते - पहिले तर हे सिद्ध
करा की, भगवान कोणाला म्हटले जाते. स्वर्गाचे मालक जरूर भगवान-भगवतीच झाले ना.
‘ब्रह्म’मधे तर काहीच नाही आहे. स्वर्ग देखील इथेच आणि नरक देखील इथेच असतो.
स्वर्ग-नरक दोन्ही एकदम वेगवेगळे आहेत. मनुष्यांची बुद्धी एकदम तमोप्रधान झाली आहे,
काहीच समजत नाहीत. सतयुगाला लाखो वर्षे दिली आहेत. कलियुगासाठी म्हणतात ४० हजार
वर्षे बाकी आहेत. अगदीच घोर अंधारामध्ये आहेत.
आता तुम्ही मुले जाणता
बाबा आम्हाला हेवन (स्वर्गामध्ये) घेऊन जाण्याकरिता असे गुणवान बनवत आहेत. मुख्य
चिंता तर हीच करायची आहे की आपण सतोप्रधान कसे बनावे? बाबांनी सांगितले आहे मामेकम्
(मज एकाची) आठवण करा. चालता-फिरता काम करता बुद्धीमध्ये हे लक्षात असावे.
आशिक-माशुक देखील कर्म तर करतात ना. भक्तीमध्ये देखील कर्म तर करतात ना. बुद्धीमध्ये
त्यांची आठवण असते. आठवण करण्यासाठी माळा फिरवतात. बाबा देखील घडो-घडी सांगतात - मज
पित्याची आठवण करा. सर्वव्यापी म्हणता तर मग आठवण कोणाची कराल? बाबा म्हणतात -
तुम्ही किती नास्तिक बनले आहात. बाबांनाच ओळखत नाही आहात. म्हणता देखील - ‘ओ गॉड
फादर’. परंतु ते कोण आहेत, हे जरासुद्धा ठाऊक नाही आहे. आत्मा म्हणते - ‘ओ गॉड फादर’.
परंतु आत्मा काय आहे, आत्मा वेगळी आहे, त्यांना म्हणतात परम-आत्मा अर्थात सुप्रीम,
उच्च ते उच्च सुप्रीम सोल, परम-आत्मा. एकही मनुष्य असा नाही ज्याला आपल्या आत्म्याचे
ज्ञान असेल. मी आत्मा आहे, हे शरीर आहे. दोन गोष्टी तर आहेत ना. हे शरीर ५ तत्वांचे
बनलेले आहे. आत्मा तर अविनाशी एक बिंदू आहे. ती कोणत्या वस्तू पासून बनेल. इतका
छोटासा बिंदू आहे, साधू-संत इत्यादी कोणालाच माहित नाही. यांनी (ब्रह्मा बाबांनी)
तर अनेक गुरू केले परंतु कोणीही हे नाही सांगितले की आत्मा काय आहे? परमपिता
परमात्मा काय आहे? असे नाही फक्त परमात्म्यालाच जाणत नाहीत. आत्म्याला सुद्धा जाणत
नाहीत. आत्म्याला ओळखतील तर परमात्म्याला सुद्धा लगेच ओळखतील. मूल स्वतःला ओळखत
असेल आणि वडिलांना ओळखत नसेल तर कसे चालेल? तुम्ही तर आता जाणता - आत्मा काय आहे,
कुठे राहते? डॉक्टर लोक सुद्धा एवढे मात्र समजतात - ती अति सूक्ष्म आहे, या
डोळ्यांनी दिसू शकत नाही; मग काचेमध्ये जरी बंद केले तरीही पाहू कसे शकतील?
दुनियेमध्ये तुमच्यासारखे ज्ञान कोणालाही नाही आहे. तुम्ही जाणता आत्मा बिंदू आहे,
परमात्मा सुद्धा बिंदू आहे. बाकी आपण आत्मे पतितापासून पावन, पावन पासून पतित बनतो.
तिथे (परमधाम मध्ये) तर पतित आत्मा राहत नाही. तिथून सर्वजण पावन येतात आणि मग पतित
बनतात. नंतर मग बाबा येऊन पावन बनवतात, ही खूप सोप्यात सोपी गोष्ट आहे. तुम्ही जाणता
आपली आत्मा ८४ चे चक्र फिरून आता तमोप्रधान बनली आहे. आपणच ८४ जन्म घेतो. काही एकाची
गोष्ट नाहीये. बाबा म्हणतात - मी समजावून यांना (ब्रह्मा बाबांना) सांगतो, तुम्ही
ऐकता. मी यांच्यामध्ये प्रवेश केला आहे, यांना सांगतो, तुम्ही ऐकता. हा रथ आहे. तर
बाबांनी सांगितले आहे, नाव दिले पाहिजे, ‘गेट वे टू हेवन’. परंतु यामध्येही समजावून
सांगावे लागेल की, सतयुगामध्ये जो देवी-देवता धर्म होता तो आता प्राय: लोप झाला आहे.
कोणालाच माहित नाही आहे. ख्रिश्चन सुद्धा सुरुवातीला सतोप्रधान होते मग पुनर्जन्म
घेता-घेता तमोप्रधान बनतात. झाडही जुने जरूर होते. हे व्हरायटी धर्मांचे झाड आहे.
झाडाच्या हिशोबाने इतर सर्व धर्मवाले येतातच मागाहून. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे.
असा थोडाच कधी कोणाला सतयुगामध्ये येण्याचा टर्न मिळेल. नाही. हा तर अनादि खेळ
बनलेला आहे. सतयुगामध्ये एकच आदि सनातन प्राचीन देवी-देवता धर्म होता. आता तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आपण स्वर्गामध्ये जात आहोत. आत्मा म्हणते आम्ही
तमोप्रधान आहोत तर घरी कसे जाणार, स्वर्गामध्ये कसे जाणार? त्यासाठी सतोप्रधान
बनण्याची युक्ती सुद्धा बाबांनी सांगितली आहे. बाबा म्हणतात - मलाच पतित-पावन
म्हणतात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. भगवानुवाच लिहिलेले आहे. सर्व हे
देखील म्हणत राहतात - क्राईस्टच्या इतकी वर्षे पहिले भारत हेवन होता. परंतु कसा बनला
आणि मग कुठे गेला, हे कोणीही जाणत नाही. तुम्ही तर चांगल्या प्रकारे जाणता. पूर्वी
या सर्व गोष्टी थोड्याच जाणत होता. दुनियेमध्ये हे देखील कोणाला माहित नाहीये की
आत्माच चांगली किंवा वाईट बनते. सर्व आत्मे संतान आहेत. बाबांची आठवण करतात. बाबा
सर्वांचा माशुक आहे, सर्वजण आशिक आहेत. आता तुम्ही मुले जाणता तो माशुक आलेला आहे.
खूप गोड माशुक आहे. नाहीतर सर्वजण त्यांची आठवण का करतील? कोणीही असा मनुष्य नसेल
ज्याच्या मुखातून परमात्म्याचे नाव निघत नसेल. फक्त जाणत नाहीत. तुम्ही जाणता आत्मा
अशरीरी आहे. आत्म्यांची देखील पूजा होते ना. आपण जे पूज्य होतो ते मग आपल्याच
आत्म्याला पूजू लागलो. होऊ शकते पूर्वीच्या जन्मामध्ये ब्राह्मण कुळामध्ये जन्म
घेतला असेल. श्रीनाथाला भोग लागतो, खातात तर पुजारी लोक. हा सर्व आहे भक्तिमार्ग.
तुम्हा मुलांनी
सर्वांना समजावून सांगायचे आहे - स्वर्गाचे फाटक उघडणारे बाबा आहेत. परंतु उघडणार
कसे, सांगणार कसे? भगवानुवाच आहे तर जरूर शरीरा द्वारे उवाच (बोलणे) होईल ना.
आत्माच शरीराद्वारे बोलते, ऐकते. बाबा हे विस्तार करून सांगतात. बीज आणि झाड आहे.
तुम्ही मुले जाणता हे नवीन झाड आहे. हळूहळू मग वृद्धी होत जाते. तुमच्या या नवीन
झाडाला किडे देखील खूप लागतात कारण हे नवीन झाड खूप गोड आहे. गोड झाडालाच किडे
इत्यादी काही ना काही लागतात मग औषध देतात. बाबांनी देखील मनमनाभवचे खूप चांगले औषध
दिले आहे. मनमनाभव नसल्या कारणाने किडे खाऊन टाकतात. किडलेली वस्तू काय कामाची. ती
तर फेकून दिली जाते. कुठे उच्च पद, कुठे नीच पद. फरक तर आहे ना. गोड मुलांना
समजावून सांगत राहतात अतिशय गोड-गोड बना. कोणाशीही लून पाणी (खारट पाण्यासारखे) बनू
नका, क्षीरखंड बना (दूध-साखरे सारखे गोड) बना. तिथे वाघ-बकरी देखील क्षीरखंड होऊन
राहतात. तर मुलांना देखील क्षीरखंड बनायला हवे. परंतु कोणाच्या भाग्यातच नसेल तर
तदबीर (पुरुषार्थ) तरी काय करणार! नापास होतात. शिक्षक तर शिकवतात भाग्य
उंचावण्यासाठी. शिक्षक शिकवतात तर सर्वांना. फरक देखील तुम्ही बघता. विद्यार्थी
क्लासमध्ये ओळखू शकतात, कोण कोणत्या सब्जेक्टमध्ये हुशार आहे. इथे देखील असे आहे.
स्थूल सेवेचा देखील सब्जेक्ट तर आहे ना. जशी भंडारी आहे, अनेकांना सुख मिळते,
सर्वजण किती आठवण काढतात. हे तर ठीक आहे, या विषयामध्ये देखील मार्क्स मिळतात. परंतु
पास विद् ऑनर होण्यासाठी फक्त एका विषयामध्येच नाही तर सर्व विषयांमध्ये पूर्ण लक्ष
द्यायचे आहे. ज्ञान देखील पाहिजे, वर्तन देखील असे हवे, दैवी गुण देखील हवेत.
अटेंशन ठेवणे चांगले आहे. भंडारीकडे देखील कोणी आले तर म्हणतील - मनमनाभव.
शिवबाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल. बाबांची
आठवण करताना इतरांना देखील परिचय देत रहा. ज्ञान आणि योग पाहिजे. खूप सोपे आहे.
मुख्य गोष्टच ही आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. प्रदर्शनीमध्ये देखील कोणाला
घेऊन जा, चला आम्ही तुम्हाला स्वर्गाचे गेट दाखवतो. हा नरक आहे, तो स्वर्ग आहे. बाबा
म्हणतात - माझी आठवण करा, पवित्र बना तर तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनाल. मनमनाभव.
हुबेहूब तुम्हाला गीता ऐकवतात म्हणून बाबांनी चित्र बनवले आहे - गीतेचा भगवान कोण?
स्वर्गाचे गेट कोण उघडतात? उघडतात शिवबाबा. श्रीकृष्ण त्या गेट मधून पार होतो.
मुख्य चित्र आहेतच दोन. बाकी तर विस्तार आहे. मुलांना खूप गोड बनायचे आहे. प्रेमाने
बोलायचे आहे. मनसा, वाचा, कर्मणा सर्वांना सुख द्यायचे आहे. बघा भंडारी सर्वांना
आनंद देते तर त्यांच्यासाठी सौगात देखील आणतात. हा देखील सब्जेक्ट आहे ना. येऊन
सौगात देतात, ती म्हणते मी तुमच्याकडून का घेऊ, मग तुमची आठवण येईल. शिवबाबांच्या
भंडाऱ्यातून मिळाले तर आम्हाला शिवबाबांची आठवण येईल. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपले
श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी आपसामध्ये खूप-खूप क्षीरखंड, गोड होऊन रहायचे आहे, कधीही
खारट पाणी व्हायचे नाही. सर्व विषयांवर पूर्ण अटेंशन द्यायचे आहे.
२) सद्गतीसाठी बाबांचे
जे श्रेष्ठ मत मिळाले आहे, त्यावर चालायचे आहे आणि सर्वांना श्रेष्ठ मतच ऐकवायचे आहे.
स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता दाखवायचा आहे.
वरदान:-
प्रत्येक
आत्म्याला हिंमत, उल्हास देणारे, दयाळू विश्व कल्याणकारी भव
कधीही ब्राह्मण
परिवारामध्ये कोणत्याही कमजोर आत्म्याला, तुम्ही कमजोर आहात - असे म्हणायचे नाही.
तुम्हा दयाळू विश्व कल्याणकारी मुलांच्या मुखातून सदैव प्रत्येक आत्म्याप्रती शुभ
बोलच निघाले पाहिजेत, निराश करणारे नाहीत. भले मग कोणी कितीही कमजोर असेल, त्याला
इशारा किंवा शिकवण देखील द्यायची असेल तर आधी समर्थ बनवून मग शिकवण द्या. आधी
धरणीवर हिंमत आणि उत्साहाचे नांगर फिरवा, नंतर बीज टाका म्हणजे प्रत्येक बिजाचे
सहजच फळ निघेल. याने विश्व कल्याणाची सेवा जलद होईल.
बोधवाक्य:-
बाबांचे
आशीर्वाद घेऊन नेहमी भरपूरतेचा अनुभव करा.
अव्यक्त इशारे – “
कंबाइंड रूपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना ”
नेहमी प्रत्येक कर्म
करत असताना स्वतःला कर्मयोगी आत्मा अनुभव करा. कोणतेही कर्म करत असताना आठवण विसरू
शकत नाही. कर्म आणि योग - दोन्ही कंबाइंड व्हावा. जसे कोणी जोडलेल्या वस्तूला विलग
करू शकत नाही, तसे कर्मयोगी बना.