04-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हाला अविनाशी ज्ञान रत्नांचे दान देत आहेत, तुम्ही मग दुसऱ्यांना हे दान देत रहा, याच दानामुळे सद्गती होईल”

प्रश्न:-
कोणता नवीन रस्ता तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही जाणत नाही?

उत्तर:-
घरी जाण्याचा रस्ता अथवा स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता आता तुम्हाला बाबांकडून मिळाला आहे. तुम्ही जाणता शांतीधाम आम्हा आत्म्यांचे घर आहे, स्वर्ग वेगळा आहे, शांतीधाम वेगळे आहे. हा नवीन मार्ग तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत नाही. तुम्ही म्हणता आता कुंभकर्णाची झोप सोडा, डोळे उघडा, पावन बना. पावन बनून घरी जाऊ शकाल.

गीत:-
जाग सजनियाँ जाग...

ओम शांती।
भगवानुवाच. हे तर बाबांनी समजावून सांगितले आहे की मनुष्याला किंवा देवतांना भगवान म्हटले जात नाही कारण यांचे साकारी रुप आहे. बाकी परमपिता परमात्म्याचे तर ना आकारी, ना साकारी रूप आहे म्हणूनच त्यांना ‘शिव परमात्माए नमः’ म्हटले जाते. ज्ञानाचे सागर ते एकच आहेत. कोणत्याही मनुष्याला ज्ञान असू शकत नाही. कशाचे ज्ञान? रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान अथवा आत्मा आणि परमात्म्याचे हे ज्ञान कोणालाच नाही आहे. तर बाबा येऊन जागे करतात - ‘ओ सजणींनो, ओ भक्तिणींनो जाग्या व्हा’. सर्व पुरुष अथवा स्त्री भक्तिणी आहेत. भगवंताची आठवण करतात. सर्व (ब्राइड्स) नववधू आठवण करतात एका (ब्राइडग्रूमची) नवरदेवाची. सर्व आशिक आत्मे परमपिता परमात्मा माशुकाची आठवण करतात. सर्व सीता आहेत, राम एक परमपिता परमात्मा आहे. राम शब्द का म्हणतात? रावण राज्य आहे ना. तर त्याच्या तुलनेमध्ये म्हणून रामराज्य म्हटले जाते. राम आहेत बाबा, ज्यांना ईश्वर सुद्धा म्हणतात, भगवान सुद्धा म्हणतात. त्यांचे खरे नाव आहे - शिव. तर ते आता म्हणतात - ‘जागा, आता नवयुग येत आहे. जुने विनाश होत आहे’. या महाभारत लढाई नंतर सतयुगाची स्थापना होते आणि या लक्ष्मी-नारायणाचे राज्य असेल. जुने कलियुग नष्ट होत आहे म्हणूनच बाबा म्हणतात - ‘बाळांनो, कुंभकर्णाची झोप सोडा. आता डोळे उघडा. नवीन दुनिया येत आहे’. नवीन दुनियेला स्वर्ग, सतयुग म्हटले जाते. हा आहे नवीन मार्ग. हा घरी अथवा स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता कोणीही जाणत नाहीत. स्वर्ग वेगळा आहे, शांतीधाम जिथे आत्मे राहतात, ते वेगळे आहे. आता बाबा म्हणतात - ‘जागे व्हा, तुम्ही रावण राज्यामध्ये पतित बनले आहात. या समयी एकही आत्मा पवित्र-आत्मा असू शकत नाही. पुण्य-आत्मा म्हणणार नाही. भले मनुष्य दान-पुण्य करतात, परंतु पवित्र आत्मा तर एकही नाही आहे. इथे कलियुगामध्ये आहेत पतित आत्मे, सतयुगामध्ये आहेत पावन आत्मे, म्हणूनच म्हणतात - ‘ओ शिवबाबा, तुम्ही येऊन आम्हाला पावन-आत्मा बनवा’. ही पवित्रतेची गोष्ट आहे. या वेळेला बाबा येऊन तुम्हा मुलांना अविनाशी ज्ञान रत्नांचे दान देतात. म्हणतात - तुम्ही देखील दुसऱ्यांना दान देत रहा म्हणजे मग ५ विकारांचे ग्रहण सुटेल. ५ विकारांचे दान द्या तेव्हा दुःखाचे ग्रहण सुटेल. पवित्र बनून सुखधाममध्ये निघून जाल. ५ विकारांमध्ये नंबर वन आहे काम विकार, तो सोडून द्या आणि पवित्र बना. मुले स्वतः देखील म्हणतात - हे पतित-पावन, आम्हाला पावन बनवा. पतित विकारी असणाऱ्याला म्हटले जाते. हा सुख आणि दुःखाचा खेळ भारताकरिताच आहे. बाबा भारतामध्येच येऊन साधारण तनामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतात आणि मग यांचे देखील जीवन चरित्र बसून ऐकवतात. हे सर्व आहेत ब्राह्मण-ब्राह्मणी, प्रजापिता ब्रह्माची संतान. तुम्ही सर्वांना पवित्र बनण्याची युक्ती सांगता. ब्रह्माकुमार आणि कुमारी तुम्ही विकारामध्ये जाऊ शकत नाही. तुम्हा ब्राह्मणांचा हा एकच जन्म आहे. देवता वर्णामध्ये तुम्ही २० जन्म घेता, वैश्य, शूद्र वर्णामध्ये ६३ जन्म. ब्राह्मण वर्णाचा हा एक अंतिम जन्म आहे, ज्यामध्येच पवित्र बनायचे आहे. बाबा म्हणतात पवित्र बना. बाबांची आठवण किंवा योगबलाने विकर्म विनाश होतील. हा एक जन्म पवित्र बनायचे आहे. सतयुगामध्ये तर कोणीही पतित असत नाही. आता हा अंतिम जन्म पवित्र बनाल तर २१ जन्म पवित्र रहाल. पावन होता, आता पतित बनले आहात. पतित आहेत म्हणूनच बोलावतात. पतित कोणी बनवले आहे? रावणाच्या आसुरी मताने. तुम्हा मुलांना माझ्याशिवाय रावण राज्यातून, दुःखातून कोणीही मुक्त करू शकत नाही. सर्वजण काम चितेवर बसून भस्म झाले आहेत. मला येऊन ज्ञान-चितेवर बसवावे लागते. ज्ञानाचे जल ओतावे लागते. सर्वांची सद्गती करावी लागते. जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात त्यांचीच सद्गती होते. बाकी सर्व शांतीधाममध्ये निघून जातात. सतयुगामध्ये फक्त देवी-देवता आहेत, त्यांनाच सद्गती मिळालेली आहे. बाकी सर्वांना गती अथवा मुक्ती मिळते. ५००० वर्षांपूर्वी या देवी-देवतांचे राज्य होते. लाखो वर्षांची काही गोष्ट नाहीये. आता बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, मज एक पित्याची आठवण करा. ‘मनमनाभव’, शब्द तर प्रसिद्ध आहे. भगवानुवाच - कोणत्याही देहधारीला भगवान म्हटले जात नाही. आत्मे तर एक शरीर सोडून दुसरे घेतात. कधी स्त्री बनतात, कधी पुरुष बनतात. ईश्वर कधीही जन्म-मरणाच्या खेळामध्ये येत नाहीत. हे ड्रामा अनुसार नोंदलेले आहे. एक जन्म दुसऱ्या जन्माशी मेळ खाऊ शकत नाही. मग तुमचा हा जन्म जेव्हा पुन्हा रीपीट होईल तेव्हा मग हीच कृती, हाच चेहरा-मोहरा पुन्हा घेणार. हा अनादि ड्रामा पूर्वनियोजित आहे. हा बदलू शकत नाही. श्रीकृष्णाला जे शरीर सतयुगामध्ये होते तेच पुन्हा तिथे मिळणार. ती आत्मा तर आता इथे आहे. तुम्ही आता जाणता आपण पुन्हा तेच बनणार. या (फोटोतील) लक्ष्मी-नारायणाची फिचर्स ॲक्युरेट नाही आहेत, तरीदेखील तशीच बनणार. नवीन कोणीही या गोष्टी समजू शकणार नाही. कोणालाही जेव्हा व्यवस्थित समजावून सांगाल तेव्हाच ८४ चे चक्र जाणतील; आणि समजतील खरोखर प्रत्येक जन्मामध्ये नाव, रूप, चेहरा इत्यादी वेगवेगळे असतात. आता यांच्या (लक्ष्मी-नारायणाच्या) अंतिम ८४ व्या जन्मातील चेहरे हे आहेत म्हणूनच नारायणाचा चेहरामोहरा जवळजवळ तसाच दाखवला आहे. नाहीतर मनुष्य समजू शकणार नाही.

तुम्ही मुले जाणता - मम्मा-बाबाच हे लक्ष्मी-नारायण बनतात. इथे तर ५ तत्वच पवित्र नाही आहेत. ही सर्व शरीरे पतित आहेत. सतयुगामध्ये तर शरीरे देखील पवित्र असतात. श्रीकृष्णाला मोस्ट ब्युटीफुल म्हणतात. नैसर्गिक सौंदर्य असते. इथे विदेशामध्ये भले मनुष्य गोरे आहेत परंतु त्यांना देवता थोडेच म्हणणार. दैवी गुण तर नाहीयेत ना. तर बाबा किती चांगल्या रीतीने बसून समजावून सांगतात. हे आहे उच्च ते उच्च शिक्षण, ज्यामुळे तुमची किती श्रेष्ठ कमाई होते. अगणित हिरे-माणके, धन असते. तिथे (सतयुगामध्ये) तर हिरे-माणकांचे महाल होते. आता ते सर्व नष्ट झाले आहेत. तर तुम्ही किती धनवान बनता. २१ जन्मांकरिता अमाप कमाई आहे, यासाठी मेहनत खूप पाहिजे. देही-अभिमानी बनायचे आहे - मी आत्मा आहे, हे जुने शरीर सोडून आता परत आपल्या घरी जायचे आहे. बाबा आता नेण्यासाठी आले आहेत. मी आत्म्याने आता ८४ जन्म पूर्ण केले, आता पुन्हा पावन बनायचे आहे, बाबांची आठवण करायची आहे. नाहीतर महाविनाशाची वेळ आहे. शिक्षा भोगूनच परत जाणार. हिशोब तर सर्वांना चुकता करायचाच आहे. भक्तिमार्गामध्ये काशी कलवट खात होते (काशीला जाऊन बळी चढायचे) तरी देखील कोणीही मुक्ती प्राप्त करू शकत नाहीत. तो आहे भक्ती मार्ग, हा आहे ज्ञान मार्ग. या ज्ञानामध्ये जीवघात करण्याची काही आवश्यकता नसते. तो आहे जीव-घात. तरी देखील भावना असते की, मुक्ती प्राप्त करावी त्यामुळे पापांचा हिशोब चुकता होऊन मग पुन्हा चालू होतो. आता तर काशी कलवट करण्याचे धाडस कोणी क्वचितच करतात. बाकी मुक्ती अथवा जीवनमुक्ती मिळू शकत नाही. बाबांशिवाय कोणीही जीवनमुक्ती देऊ शकत नाही. आत्मे येत राहतात तर मग परत कसे काय जातील? बाबाच येऊन सर्वांची सद्गती करून परत घेऊन जातील. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. आत्म्याचा तर कधीच विनाश होत नाही. आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. सतयुगामध्ये आयुर्मान जास्त असते. दुःखाची कुठली गोष्टच नाही. एक शरीर सोडून दुसरे घेतात. जसे सापाचे उदाहरण आहे, त्याला मरणे म्हणू शकत नाही. दुःखाची गोष्टच नाही. समजतात - आता वेळ पुर्ण झाली आहे, या शरीराला सोडून दुसरे घेणार. तुम्हा मुलांना या शरीरापासून डिटॅच (अलिप्त) होण्याचा अभ्यास इथेच करायचा आहे. मी आत्मा आहे, आता मला घरी परत जायचे आहे मग नवीन दुनियेमध्ये येणार, नवीन खाल (शरीर) घेणार, हा सराव करा. तुम्ही जाणता आत्मा ८४ शरीरे घेते. लोकांनी मग ८४ लाख सांगितले आहे. बाबांसाठी तर मग अगणित वेळा दगड-धोंड्यामध्ये आहेत असे बोलतात. याला म्हटले जाते धर्माची निंदा करणे. मनुष्य स्वच्छ-बुद्धी पासून एकदम तुच्छ-बुद्धी बनतात. आता बाबा तुम्हाला स्वच्छ बुद्धी बनवतात. स्वच्छ बनता आठवणीद्वारे. बाबा म्हणतात - आता नवीन युग येत आहे, त्याचेच प्रतीक हे महाभारत युद्ध आहे. हे तेच मुसळांचे युद्ध आहे, ज्यामध्ये अनेक धर्मांचा विनाश, एका धर्माची स्थापना झाली होती, तर जरूर ईश्वर आहे ना. श्रीकृष्ण इथे कसे येऊ शकणार? ज्ञानाचा सागर - निराकार, की श्रीकृष्ण? श्रीकृष्णाला हे ज्ञानच असणार नाही. हे ज्ञान लुप्त होते. तुमची देखील भक्ती मार्गामध्ये मग चित्रे बनतील. तुम्ही पूज्यच मग पुजारी बनता, कला कमी होते. आयुष्य सुद्धा कमी होत जाते कारण भोगी बनता. तिथे (सतयुगामध्ये) आहेत योगी. असे नाही की कोणाच्यातरी आठवणीमध्ये योग लावतात. तिथे आहेतच पवित्र. श्रीकृष्णाला देखील योगेश्वर म्हणतात. या समयी श्रीकृष्णाची आत्मा बाबांसोबत योग लावत आहे. श्रीकृष्णाची आत्मा या वेळी योगेश्वर आहे, सतयुगामध्ये तिला योगेश्वर म्हणणार नाही, तिथे तर राजकुमार बनते. तर शेवटी तुमची अवस्था अशी असली पाहिजे की एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाच्याही शरीराची आठवण राहू नये. शरीरातून आणि जुन्या दुनियेमधून मोह नष्ट व्हावा. संन्यासी राहतात तर जुन्या दुनियेमध्येच परंतु घरादाराचा मोह नष्ट करतात. ‘ब्रह्म’ला ईश्वर समजून त्याच्याशी योग लावतात. स्वतःला ब्रह्मज्ञानी, तत्त्वज्ञानी म्हणतात. असे समजतात की आपण ब्रह्ममध्ये लीन होणार. बाबा म्हणतात हे सर्व चुकीचे आहे. बरोबर तर मी आहे, मलाच ट्रुथ (सत्य) म्हटले जाते.

तर बाबा समजावून सांगत आहेत आठवणीची यात्रा एकदम पक्की पाहिजे. ज्ञान तर एकदम सोपे आहे. देही-अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. बाबा म्हणतात कोणाचाही देह आठवता कामा नये, ही आहे भुतांची आठवण, भूत पूजा. मी तर अशरीरी आहे, तुम्हाला आठवण करायची आहे माझी. या डोळ्यांनी पाहत असताना देखील बुद्धीने बाबांची आठवण करा. बाबांच्या डायरेक्शनवर चाला तरच धर्मराजाच्या सजेपासून सुटका होईल. पावन बनलात की सजा संपेल, ध्येय खूप उच्च आहे. प्रजा बनणे तर खूप सोपे आहे, त्यातूनही श्रीमंत प्रजा, गरीब प्रजा कोण-कोण बनू शकतात, बाबा सर्व समजावून सांगतात. शेवटी तुमच्या बुद्धीचा योग फक्त बाबा आणि घरासोबत राहिला पाहिजे. जसे ॲक्टर्सचा नाटकामध्ये पार्ट संपतो तेव्हा त्यांची बुद्धी आपल्या घराकडे जाते. ही आहे बेहदची गोष्ट. ती आहे हदची कमाई, ही आहे बेहदची कमाई. चांगल्या ॲक्टर्सची कमाई देखील भरपूर असते. तर बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून बुद्धियोग तिथे लावायचा आहे. ते (दुनियेमध्ये) एकमेकांचे आशिक-माशुक असतात. इथे तर सर्व आशिक आहेत एका माशुकचे. त्यांचीच सर्वजण आठवण करतात. वंडरफुल प्रवासी आहे ना. आता यावेळी आले आहेत सर्वांना दुःखातून सोडवून सद्गतीमध्ये घेऊन जाण्यासाठी. त्यांना म्हटले जाते खराखुरा माशुक. ते (दुनियेतील) एकमेकांच्या शरीरावर आशिक होतात, विकाराची तर गोष्ट नसते. त्याला म्हणणार देह-अभिमानाचा योग. ती तर भूतांची आठवण झाली. मनुष्याची आठवण करणे अर्थात ५ भूतांची, प्रकृतीची आठवण करणे. बाबा म्हणतात प्रकृतीला विसरून माझी आठवण करा. मेहनत आहे ना आणि मग दैवी गुण देखील हवेत. कोणाचा बदला घेणे, हा देखील आसुरी गुण आहे. सतयुगामध्ये असतोच एक धर्म, बदला घेण्याचा प्रश्नच नाही. तो आहेच अद्वैत देवता धर्म जो शिवबाबांव्यतिरिक्त इतर कोणीही स्थापन करू शकत नाही. सूक्ष्म वतनवासी देवतांना फरिश्ता म्हणणार. या वेळी तुम्ही आहात ब्राह्मण नंतर फरिश्ता बनाल. मग घरी परत जाल आणि पुन्हा नवीन दुनियेमध्ये येऊन दैवी गुणवाले मनुष्य अर्थात देवता बनाल. आता शूद्रा पासून ब्राह्मण बनता. प्रजापिता ब्रह्माची संतान बनला नाहीत तर मग वारसा कसा घेणार. हे प्रजापिता ब्रह्मा आणि मम्मा, ते मग लक्ष्मी-नारायण बनतात. आता पहा तुम्हाला जैन लोक सांगतात - आमचा जैन धर्म सर्वात जुना आहे. आता खरेतर ‘महावीर’ तर आदि देव ब्रह्मालाच म्हणतात. आहेत ब्रह्माच, परंतु कोणी जैन मुनि आला त्याने महावीर नाव ठेवले. आता तुम्ही सर्व महावीर आहात ना. मायेवर विजय प्राप्त करत आहात. तुम्ही सर्व बहाद्दूर बनता. खरेखुरे महावीर-महावीरणी तुम्ही आहात. तुमचे नाव आहे शिव-शक्ती, सिंहावर स्वार झालेली दाखवली आहे आणि महारथी हत्तीवर स्वार झालेले दाखवले आहेत. तरीसुद्धा बाबा म्हणतात ध्येय खूप उच्च आहे. एका बाबांचीच आठवण करायची आहे तर विकर्म विनाश होतील, दुसरा कोणताही मार्ग नाही. योगबलाने तुम्ही संपूर्ण विश्वावर राज्य करता. आत्मा म्हणते, आता मला घरी जायचे आहे, ही जुनी दुनिया आहे, हा आहे बेहदचा संन्यास. गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना पवित्र बनायचे आहे आणि सृष्टी चक्राला समजून घेतल्याने चक्रवर्ती राजा बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) धर्मराजाच्या सजेपासून वाचण्यासाठी कोणाच्याही देहाची आठवण करायची नाही. या डोळ्यांनी सर्व काही पाहत असताना देखील एका बाबांचीच आठवण करायची आहे, अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. पावन बनायचे आहे.

२) सर्वांना मुक्ती आणि जीवन मुक्तीचा रस्ता सांगायचा आहे. आता नाटक पूर्ण झाले, घरी परत जायचे आहे - या स्मृतीने बेहदची कमाई जमा करायची आहे.

वरदान:-
एका सेकंदाच्या डावाने संपूर्ण कल्पाचे भाग्य बनविणारे श्रेष्ठ नशीबवान भव

या संगमाच्या समयाला आशीर्वाद मिळाला आहे - जे हवे, जसे हवे, आणि जितके हवे तितके भाग्य बनवू शकता; कारण भाग्यविधाता पित्याने भाग्य बनविण्याची चावी मुलांच्या हातामध्ये दिली आहे. लास्ट येणारा देखील फास्ट जाऊन फर्स्ट येऊ शकतो. फक्त सेवेच्या विस्तारामध्ये स्वतःची स्थिती सेकंदामध्ये सार स्वरूप बनविण्याचा अभ्यास करा. आता-आता डायरेक्शन मिळाले की, एका सेकंदामध्ये ‘मास्टर बीज’ बना तर वेळ लागू नये. या एका सेकंदाच्या डावाने संपूर्ण कल्पाचे भाग्य बनवू शकता.

बोधवाक्य:-
डबल सेवेद्वारे शक्तिशाली वायुमंडळ बनवा तर प्रकृती दासी बनेल.

अव्यक्त इशारा - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला अंगीकारा:-

अनेक वृक्षांच्या फांद्यांचा आता एकच चंदनाचा वृक्ष झाला आहे. लोक म्हणतात - दोन-चार मातासुद्धा एकत्र राहू शकत नाहीत आणि इथे आता सर्व माता संपूर्ण विश्वामध्ये एकता स्थापन करण्याच्या निमित्त बनल्या आहेत. मातांनीच विविधतेमध्ये एकता आणली आहे. देश वेग-वेगळा आहे, भाषा वेग-वेगळ्या आहेत, संस्कृती वेग-वेगळी आहे परंतु तुम्हा लोकांनी विविधतेला एकतेमध्ये आणले आहे.