04-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्ही पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करता, पुरुषोत्तम आहेत देवता,
कारण ते आहेत पावन, तुम्ही पावन बनत आहात”
प्रश्न:-
बेहदच्या
बाबांनी तुम्हा मुलांना शरण का दिली आहे?
उत्तर:-
कारण आता आपण सर्व रिफ्यूजच्या (कचऱ्याच्या) डब्यामध्ये पडून होतो. बाबा आम्हाला
कचऱ्याच्या डब्यातून काढून गुल-गुल बनवतात. आसुरी गुणवाल्यांना दैवी गुणवान बनवितात.
ड्रामा अनुसार बाबांनी येऊन आम्हाला कचऱ्यातून काढून ॲडॉप्ट करून आपले बनविले आहे.
गीत:-
यह कौन आया आज
सवेरे-सवेरे…
ओम शांती।
रात्रीला दिवस बनविण्यासाठी बाबांना यावे लागले. आता तुम्ही मुले जाणता की बाबा
आलेले आहेत. आधी आपण शूद्र वर्णाचे होतो, शूद्र-बुद्धी होतो. वर्णांचे चित्र देखील
समजावून सांगण्यासाठी खूप चांगले आहे. मुले जाणतात आपण या वर्णांमध्ये कसे चक्र
फिरतो. आता आपल्याला परमपिता परमात्म्याने शूद्रापासून ब्राह्मण बनवले आहे.
कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर आपण ब्राह्मण बनतो. ब्राह्मणांना पुरुषोत्तम
म्हणणार नाही. पुरुषोत्तम तर देवतांना म्हणणार. ब्राह्मण इथे पुरुषार्थ करतात
पुरुषोत्तम बनण्यासाठी. पतितापासून पावन बनण्यासाठीच बाबांना बोलावतात. तर स्वतःला
विचारले पाहिजे की, आपण कितपत पावन बनत आहोत? स्टुडंट देखील अभ्यासासाठी विचार सागर
मंथन करतात ना. समजतात या शिक्षणाने आपण हे बनणार. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे
की आता आपण ब्राह्मण बनलो आहोत देवता बनण्याकरिता. हे आहे अमूल्य जीवन कारण तुम्ही
ईश्वरीय संतान आहात. ईश्वर तुम्हाला राजयोग शिकवत आहेत, पतिता पासून पावन बनवत आहेत.
पावन देवता बनतो. वर्णांवर समजावून सांगणे खूप चांगले आहे. संन्यासी इत्यादी या
गोष्टींना मानणार नाहीत. बाकी ८४ जन्मांचा हिशोब समजू शकतील. हे देखील समजू शकतात
की आपण संन्यास धर्मवाले ८४ जन्म घेत नाही. इस्लामी, बौद्धी इत्यादी देखील समजतील
आपण ८४ जन्म घेत नाही. हां, पुनर्जन्म घेतो परंतु कमी. तुम्ही समजावून सांगितल्यावर
लगेच समजून जातील. समजावून सांगण्याची देखील युक्ती पाहिजे. तुम्ही मुले इथे सन्मुख
बसले आहात तर बाबा बुद्धीला रिफ्रेश करतात जशी इतर मुले देखील इथे येतात रिफ्रेश
होण्यासाठी. तुम्हाला तर बाबा रोज रिफ्रेश करतात की ही धारणा करा. बुद्धीमध्ये हाच
विचार चालत रहावा, आपण ८४ जन्म कसे घेतो? कसे शूद्रापासून ब्राह्मण बनलो आहोत?
ब्रह्माची संतान ब्राह्मण. आता ब्रह्मा कुठून आले? बाबा बसून समजावून सांगत आहेत -
‘मी यांचे नाव ब्रह्मा ठेवतो’. हे जे ब्रह्माकुमार-कुमारी आहेत हे एक कुटुंब बनले
आहे. तर जरूर ॲडॉप्टेड आहेत. बाबाच ॲडॉप्ट करतील. त्यांना पिता म्हटले जाते, आजोबा
म्हणणार नाही. पित्याला पिताच म्हटले जाते. संपत्ती मिळतेच मुळी पित्याकडून. कोणी
काका, मामा किंवा जातवाले देखील ॲडॉप्ट करतात. जसे बाबांनी एकदा म्हटले होते एक
मुलगी कचऱ्याच्या डब्ब्यामध्ये पडलेली होती, तिला कोणीतरी उचलून जाऊन कोणाला तरी
दत्तक दिली कारण त्यांना स्वतःचे मूल नव्हते. तर मुलगी ज्यांच्याकडे दत्तक गेली
त्यांनाच मम्मा-बाबा म्हणू लागेल ना. ही मग आहे बेहदची गोष्ट. तुम्ही मुले देखील जशी
बेहदच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये पडलेले होता. विषय वैतरणी नदीमध्ये पडलेले होता.
किती घाणेरडे बनला होता. ड्रामा अनुसार बाबांनी येऊन त्या कचऱ्यातून काढून तुम्हाला
ॲडॉप्ट केले आहे. तमोप्रधानला कचराच म्हणणार ना. आसुरी गुणवाले मनुष्य आहेत
देह-अभिमानी. काम, क्रोध हे देखील मोठे विकार आहेत ना. तर तुम्ही रावणाच्या मोठ्या
रिफ्युजमध्ये (शरणमध्ये) पडला होता. वास्तविक रेफ्यूजी (शरणार्थी) सुद्धा आहात. आता
तुम्ही बेहदच्या बाबांची शरण घेतली आहे, रिफ्युज मधून निघून गुल-गुल देवता
बनण्यासाठी. यावेळी सारी दुनिया रिफ्युजच्या (कचऱ्याच्या) मोठ्या डब्यामध्ये पडली
आहे. बाबा येऊन तुम्हा मुलांना कचऱ्यातून काढून आपले बनवतात. परंतु कचऱ्यात
राहणाऱ्यांना इतके अंगवळणी पडले आहे, जे बाहेर काढतात तरी देखील कचराच चांगला वाटतो.
बाबा येऊन बेहदच्या कचऱ्यातून बाहेर काढतात. बोलावतात देखील की बाबा येऊन आम्हाला
गुल-गुल बनवा. काट्यांच्या जंगलातून काढून फूल बनवा. खुदाई (दैवी) बगीच्यामध्ये बसवा.
आता असुरांच्या जंगलामध्ये पडलो आहोत. बाबा तुम्हा मुलांना बगीच्यामध्ये घेऊन जातात.
शूद्रा पासून ब्राह्मण बनला आहात मग देवता बनणार. ही देवतांची राजधानी आहे.
ब्राह्मणांची राजाई नाही आहे. भले नाव पांडव आहे परंतु पांडवांना राजाई नाहीये.
राजाई प्राप्त करण्यासाठी बाबांसोबत बसले आहेत. बेहदची रात्र आता पूर्ण होऊन बेहदचा
दिवस सुरू होतो. गाणे ऐकलेत ना - ‘कौन आया सवेरे-सवेरे…’ पहाटे येतात रात्रीला
नाहीसे करून दिवस बनविण्यासाठी अर्थात स्वर्गाची स्थापना, नरकाचा विनाश करण्यासाठी.
एवढे जरी बुद्धीमध्ये राहिले तरी आनंद होईल. जे नवीन दुनियेमध्ये उच्च पद मिळविणारे
आहेत ते कधी आपला आसुरी स्वभाव दाखवणार नाहीत. ज्या यज्ञाद्वारे इतके उच्च बनतात,
त्या यज्ञाची खूप प्रेमाने सेवा करतील. अशा यज्ञामध्ये तर हाडे देखील स्वाहा केली
पाहिजेत. स्वतःला बघितले पाहिजे - या वर्तनामुळे आपण उच्च पद कसे मिळवणार! बेसमज
लहान मुले तर नाही आहोत ना. समजू शकतात - राजा कसे, प्रजा कसे बनतात? बाबांनी रथ
देखील अनुभवी घेतला आहे. जे राजा इत्यादींना देखील चांगल्या रीतीने ओळखतात.
राजांच्या दास-दासींना देखील खूप सुख मिळते. ते तर राजांसोबतच राहतात. परंतु म्हटले
तर जातील दास-दासीच. सुख तर आहे ना. जे राजा-राणी खातील ते त्यांना मिळेल. बाहेर
राहणारे असे थोडेच खाऊ शकतील. दासींमध्ये देखील नंबरवार असतात. कोणी शृंगार करणारी,
कोणी मुलांना सांभाळणारी, कोणी झाडू इत्यादी मारणारी. इथल्या राजांना इतक्या
दास-दासी आहेत, तर तिथे किती भरपूर असतील. सर्वांवर वेगवेगळे आपले-आपले इन्चार्ज
असतात. राहण्याचे स्थान वेगळे असेल. ते काही राजा-राणी सारखे सजलेले असणार नाहीत.
जसे सर्व्हंट क्वार्टर्स असतात ना. आत जरूर येतील परंतु राहणार सर्व्हंट
क्वार्टर्समध्ये. तर बाबा चांगल्या रीतीने समजावून सांगतात स्वतःवर दया करा. आपण
उच्च ते उच्च बनावे. आपण आता शूद्रापासून ब्राह्मण बनलो आहोत. अहो सौभाग्य. मग देवता
बनणार. हे संगमयुग खूप कल्याणकारी आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण भरलेले
आहे. भंडाऱ्यामध्ये देखील योगामध्ये राहून भोजन बनवले तर त्यातही अनेकांचे कल्याण
सामावलेले आहे. श्रीनाथद्वारेमध्ये एकदम सायलेन्समध्ये भोजन बनवतात. श्रीनाथाचीच
आठवण राहते. भक्त आपल्या भक्तीमध्ये खूप मग्न राहतात. तुम्हाला मग ज्ञानामध्ये मग्न
राहिले पाहिजे. श्रीकृष्णाची एवढी भक्ती केली जाते की काही विचारूच नका. वृंदावन
मध्ये दोन मुली आहेत, पूर्ण भक्तीणी आहेत, म्हणतात - बस्स, आम्ही इथेच राहणार. इथेच
शरीर सोडणार, श्रीकृष्णाच्या आठवणीमध्ये. त्यांना खूप सांगतात की, चांगल्या घरामध्ये
येऊन रहा, ज्ञान घ्या, तर म्हणाल्या आम्ही तर इथेच राहणार. तर त्यांना म्हणणार -
‘भक्त शिरोमणी’. श्रीकृष्णावर किती कुर्बान जातात. आता तुम्हाला बाबांवर कुर्बान
व्हायचे आहे. अगदी सुरुवातीला शिव बाबांवर किती कुर्बान झाले. पुष्कळजण आले. जेव्हा
इंडियामध्ये आले तेव्हा खूप जणांना आपले घरदार आठवू लागले. कितीतरी निघून गेले.
ग्रहचारी तर खूप जणांवर येते ना. कधी कशी दशा, कधी कशी दशा बसते. बाबांनी समजावून
सांगितले आहे - कोणीही आले तर बोला, कुठे आला आहात? बाहेर बोर्डावर पाहिलेत ना -
ब्रह्माकुमार-कुमारी. हा तर परिवार आहे ना. एक आहे निराकार परमपिता परमात्मा. दुसरे
मग प्रजापिता ब्रह्माचे देखील गायन आहे. ही सर्व त्यांची मुले आहेत, आजोबा आहेत
शिवबाबा. वारसा त्यांच्याकडून मिळतो. ते सल्ला देतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही
पतितापासून पावन बनाल. कल्पापूर्वी देखील असा सल्ला दिला होता. किती श्रेष्ठ शिक्षण
आहे. हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण बाबांकडून वारसा घेत आहोत.
तुम्ही मुले
मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण शिकत आहात. तुम्हाला जरूर दैवीगुण धारण करायचे
आहेत. तुमचे खाणे-पिणे, बोलणे-चालणे किती रॉयल असले पाहिजे. देवता फार थोडे खातात.
त्यांच्यामध्ये काही कोणती हाव थोडीच असते. ३६ प्रकारचे भोजन बनते, खातात किती थोडे.
खाण्या-पिण्याची हाव ठेवणे - याला देखील आसुरी वर्तन म्हटले जाते. दैवी गुण धारण
करायचे असतील तर खाणे-पिणे अतिशय शुद्ध आणि साधारण असले पाहिजे. परंतु माया अशी आहे
जी एकदम पत्थर-बुद्धी बनवते; तर मग पद देखील असे मिळेल. बाबा म्हणतात - स्वतःचे
कल्याण करण्यासाठी दैवी गुण धारण करा. चांगल्या रीतीने शिकाल आणि शिकवाल तर
तुम्हालाच मोबदला मिळेल. बाबा देत नाहीत, तुम्ही आपल्या पुरुषार्थाने मिळवता.
स्वतःला बघितले पाहिजे की, ‘मी कितपत सेवा करतो? मी कोण बनणार? यावेळी जर शरीर सुटले
तर काय मिळेल?’ बाबांना विचाराल तर बाबा ताबडतोब सांगतील की, या वर्तनावरून समजले
जाते की, हे अमके पद मिळवतील. पुरुषार्थच करत नाहीत तर कल्प-कल्पांतरासाठी आपलेच
नुकसान करून घेतात. चांगली सेवा करणारे नक्कीच चांगले पद प्राप्त करतील. आतून माहिती
असते हे जाऊन दास-दासी बनतील. बाहेरून तसे म्हणू शकत नाहीत. शाळेमध्ये देखील
स्टुडंटला समजते की आपण सीनियर बनणार का ज्युनियर? इथे देखील असे आहे. सीनियर जे
असतील ते राजा-राणी बनतील, ज्युनियर कमी दर्जाचे पद मिळवतील. श्रीमंतामध्ये देखील
सीनियर आणि ज्युनियर असतील. दास-दासींमध्ये देखील सीनियर आणि ज्युनियर असतील.
सीनियरवाल्यांचा दर्जा उच्च असतो. झाडू मारणाऱ्या दासीला कधी आत महालामध्ये येण्याचा
हुकूम असत नाही. या सर्व गोष्टींना तुम्ही मुले चांगल्या रीतीने समजू शकता. नंतर
शेवटी आणखी समजत जाल. उच्च बनविणाऱ्यांचा मग आदर देखील ठेवायचा असतो. बघा कुमारका
आहे, त्या सीनियर आहेत तर रिगार्ड ठेवला पाहिजे.
बाबा मुलांचे लक्ष
वेधून घेतात - जी मुले महारथी आहेत, त्यांचा रीगार्ड (आदर) ठेवा. रिगार्ड ठेवत नाही
तर मग आपल्यावरच पापांचे ओझे चढवतात. या सर्व गोष्टी बाबा लक्षात आणून देतात. चांगली
खबरदारी पाहिजे. नंबरवार कोणाचा रिगार्ड कसा ठेवला पाहिजे, बाबा तर प्रत्येकाला
जाणतात ना. परंतु जर कोणाला सांगितले तर ट्रेटर बनायला वेळ लावणार नाहीत. मग कुमारी,
माता इत्यादींवर देखील बंधन येतात. अत्याचार सहन करावे लागतात. जास्त करून माताच
लिहितात - ‘बाबा, आम्हाला हे खूप त्रास देतात, आम्ही काय करावे? अरे, तुम्ही काही
जनावर थोड्याच आहात जे जबरदस्ती करतील. मनात आहे तेव्हाच तर विचारत आहेस की, आता
काय करू! यामध्ये विचारण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आत्मा आपलाच मित्र आहे,
आपलाच शत्रू आहे. जे पाहिजे ते करावे. विचारले याचा अर्थ मनात आहे. मुख्य गोष्टच आहे
आठवणीची. आठवणीनेच तुम्ही पावन बनता. हे लक्ष्मी-नारायण नंबरवन पावन आहेत ना. मम्मा
किती सेवा करत होती. असे तर कोणी म्हणू शकत नाही की आम्ही मम्मा पेक्षाही हुशार
आहोत. मम्मा ज्ञानामध्ये सर्वात शक्तिशाली होती. योगाची कमी खूप जणांमध्ये आहे.
आठवणीमध्ये राहू शकत नाहीत. आठवण केली नाहीत तर विकर्म विनाश कशी होतील! कायदा
म्हणतो - शेवटी आठवणीमध्येच शरीर सोडायचे आहे. शिवबाबांच्या आठवणी मध्येच प्राण
तनातून निघावा. एका बाबांशिवाय दुसरे काहीही आठवता कामा नये. कुठेही आसक्ती असू नये.
ही प्रॅक्टिस करायची आहे - आपण अशरीरी आलो होतो आणि पुन्हा अशरीरी होऊन जायचे आहे.
मुलांना वारंवार समजावून सांगत राहतात. खूप गोड बनायचे आहे. दैवी गुण देखील असले
पाहिजेत. देह-अभिमानाचे भूत असते ना. स्वतःवर खूप लक्ष ठेवायचे आहे. खूप प्रेमाने
चालायचे आहे. बाबांची आठवण करा आणि चक्राची आठवण करा. चक्राचे रहस्य जरी कोणाला
समजावून सांगाल तरी देखील आश्चर्य वाटेल. ८४ जन्मांचीच जिथे कोणाला आठवण राहत नाही
तर ८४ लाख मग कसे कोणाला आठवू शकतील? विचार देखील करू शकत नाही, या चक्रालाच
बुद्धीमध्ये लक्षात ठेवाल तरी देखील अहो सौभाग्य. आता हे नाटक पूर्ण होत आहे. जुन्या
दुनियेपासून वैराग्य असले पाहिजे, बुद्धियोग शांतीधाम-सुखधाममध्ये रहावा. गीतेमध्ये
देखील आहे मनमनाभव. कोणताही गीतापाठी मनमनाभवचा अर्थ जाणत नाही. तुम्ही मुले जाणता
- भगवानुवाच, देहाच्या सर्व संबंधांना सोडून स्वतःला आत्मा समजा. कोणी म्हटले? स्वतः
बाबांनी. कोणी मग म्हणतात - आम्ही तर शास्त्रांनाच मानतो, भले भगवान आलेले आहेत
तरीही मानणार नाहीत. बरोबर शास्त्राचे अध्ययन करत राहतात. भगवान आले आहेत राजयोग
शिकवत आहेत, स्थापना होत आहे, ही शास्त्रे इत्यादी सर्व आहेतच भक्तिमार्गाची.
भगवंतावर निश्चय झाला तर वारसा घेऊ लागतील, मग भक्ती देखील उडून जाईल. परंतु जेव्हा
निश्चय होईल तेव्हा ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) देवता
बनण्यासाठी अतिशय रॉयल संस्कार धारण करायचे आहेत. खाणे-पिणे खूप शुद्ध आणि साधारण
ठेवायचे आहे. लोभी बनायचे नाही. स्वतःचे कल्याण करण्यासाठी दैवी गुण धारण करायचे
आहेत.
२) स्वतःवर लक्ष
ठेवून, सर्वांसोबत खूप प्रेमाने चालायचे आहे. आपल्यापेक्षा जे सीनियर आहेत, त्यांचा
आदर जरूर ठेवायचा आहे. खूप-खूप गोड बनायचे आहे. देह-अभिमानामध्ये यायचे नाही.
वरदान:-
होऊन गेलेल्या
गोष्टींना दयाळू बनून सामावून घेणारे शुभ-चिंतक भव जर कोणाच्या होऊन गेलेल्या
कमजोरीच्या गोष्टी कोणी ऐकवेल तर शुभ भावनेने त्यापासून दूर व्हा. आपसामध्ये व्यर्थ
चिंतन किंवा कमजोरीच्या गोष्टी करता कामा नयेत. झालेल्या गोष्टींना दयाळू बनून
सामावून घ्या. सामावून घेऊन शुभ भावनेने त्या आत्म्याप्रती मनसा सेवा करत रहा. भले
संस्कारांच्या वश कोणी उलटे बोलत असेल, करत असेल किंवा ऐकत असेल तर त्याला परिवर्तन
करा. एका पासून दुसऱ्याकडे, दुसऱ्या पासून तिसऱ्याकडे अशी व्यर्थ गोष्टींची माळ होऊ
नये. असे अटेंशन ठेवणे अर्थात शुभचिंतक बनणे आहे.
बोधवाक्य:-
संतुष्टमणी बना
तर प्रभु प्रिय, लोकप्रिय आणि स्वयंप्रिय बनाल.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बना” जसे शरीर आणि आत्मा कंबाइंड आहे तर
जीवन आहे. जर आत्मा शरीरापासून वेगळी झाली तर जीवन समाप्त होते. असे कर्मयोगी जीवन
अर्थात कर्म योगा शिवाय नाही, योग कर्मा शिवाय नाही. सदैव कंबाइंड असेल तर सफलता
मिळत राहील.