04-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, ज्ञानवान बना म्हणजे मग धनवान बनाल, जगदंबा ज्ञान-ज्ञानेश्वरीच मग राज-राजेश्वरी बनते”

प्रश्न:-
बाबांना आपल्या मुलांची दया येते त्यामुळे बाबा मुलांना श्रेष्ठभाग्य बनविण्यासाठी कोणते श्रीमत देतात?

उत्तर:-
गोड मुलांनो, डोक्यावर जे पापांचे ओझे आहे, त्याला मृत्यूपूर्वी आठवणीच्या यात्रेमध्ये राहून खाली करा. कोणतेही विकर्म करू नका. बाबा आले आहेत तुम्हाला यमदूताच्या फाशीपासून सोडविण्याकरिता, त्यामुळे आता असे कोणतेही कर्म करू नका.

गीत:-
रात के राही थक मत जाना…

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांना या गाण्याचा अर्थ समजला आहे. बाबा आले आहेत भक्तीरूपी रात्रीचा विनाश करून दिवस स्थापन करण्याकरिता कारण बाबांनाच बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. समजतात की आपण कोणत्यातरी काळी पावन होतो, आता पतित आहोत. तीच गोष्ट मागितली जाते जी आधी होती आणि आत्ता नाही आहे. तुम्ही मुले जाणता पवित्र देवी-देवतांची राजधानी होती. ज्ञान-ज्ञानेश्वरीच नंतर मग राज-राजेश्वरी बनेल. जशी जगत-अंबा आणि लक्ष्मी या दोघी वेगवेगळ्या आहेत. लक्ष्मीला कधी जगत-अंबा म्हणणार नाही. लक्ष्मीला तिची दोन मुलेच मातेश्वरी म्हणतील. इथे जगत-अंबेला सर्व भारतवासी जे पण रिलीजस माइंडेड आहेत (धार्मिक वृत्तीचे आहेत) ते सर्व माँ (आई) म्हणतात. देवी-देवतांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची भक्ती करतात. आता तुम्हाला ठाऊक झाले आहे की आपण भरपूर भक्ती केली आहे. दान-पुण्य इत्यादी जितके तुम्ही केले आहे तितके इतर कोणीही केले नसेल. सर्वात जास्त भक्ती तुम्ही केली आहे. आता तुम्ही तुमचे यादगार जिवंतपणी बघत आहात. आदि देव आणि आदि देवी आहेत, ज्यांना जगत-अंबा म्हणतात. आता तुम्ही जाणता जगत-अंबा श्रीमंत बनते. तुम्ही तिची मुले आहात ना. आता तुम्ही शिकत आहात. ती आहे गॉडेज ऑफ नॉलेज (सरस्वती). त्या (दुनियेतील) नॉलेजने कधी कोणी राजा-राणी बनत नाहीत. तुम्ही जाणता आपण आत्मे शिवबाबांची मुले आहोत आणि हे आहेत प्रजापिता ब्रह्मा. शिवबाबा यांच्याद्वारे नवीन दुनियेची स्थापना करत आहेत. गायले देखील गेले आहे - ब्रह्मा द्वारा स्थापना. हे व्यवस्थित समजून घेऊन धारण करायचे आहे. म्हणतात ना - वाघिणीच्या दुधासाठी सोन्याचे भांडे पाहिजे. हे ज्ञान देखील सर्वशक्तिमान परमपिता परमात्म्याचे आहे. त्याच्यासाठी देखील बुद्धी रुपी भांडे सोन्याचे पाहिजे. नवीन दुनियेमध्ये आत्मा आणि शरीर दोन्ही सोन्याचे बनतात. आता तुमची आत्मा दगडाचे भांडे आहे. तर शरीर देखील असेच आहे. भारतामध्येच ‘श्याम आणि सुंदर’, ‘पतित आणि पावन’ असे म्हटले जाते. इतर कोणत्याही खंडांमध्ये असे म्हणणार नाहीत की, ‘आम्हा पतितांना येऊन पावन बनवा’. म्हणतात दुःखातून सोडवून, शांतीमध्ये घेऊन जा. विवेक देखील म्हणतो की, आम्ही भारतवासी पावन होतो, या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. भले कितीही मोठी व्यक्ती असेल. ती देखील गुरुच्या पायाशी लोळण घेते कारण गुरुने संन्यास धारण केला आहे. ५ विकारांना सोडले आहे तर विकारी, निर्विकारी असणाऱ्यांना मान देतात. पवित्रतेचाच मान आहे. द्वापर पासून राजा-राणी आणि वजीर असतात. सतयुगामध्ये राजा-राणीला वजीर नसतात. जेव्हा पतित राजा-राणी बनतात तेव्हा एक वजीर ठेवतात. आता तर जास्तच पतित बनले आहेत त्यामुळे शेकडो वजीर ठेवतात. ही आहे ड्रामाची भावी. बाबा म्हणतात - पहा कशी ड्रामाची भावी बनलेली आहे. तर जरूर पहिला भारतच होता नंतर मग दुसऱ्या धर्माचे आले. बाबा समजावून सांगत आहेत - यावेळी तुम्ही आहात ज्ञान-ज्ञानेश्वरी. जगत-अंबा तर आहे ब्रह्माची मुलगी, गॉडेज ऑफ नॉलेज. जगत-अंबा ज्ञानवान आहे, जी दुसऱ्या जन्मामध्ये धनलक्ष्मी बनते. तुम्हाला आता बाबा ज्ञान शिकवत आहेत. तुम्ही जाणता आपण तिथे श्रीमंत बनणार. दुनियेमध्ये हे कोणालाच ठाऊक नाही आहे की हे लक्ष्मी-नारायण इतके श्रीमंत कसे बनले. लक्ष्मी-नारायण तेच ब्रह्मा-सरस्वती आहेत. ब्रह्मा जगत-पिता आहेत तर जरूर भरपूर ब्राह्मण-ब्राह्मणी असतील. तुम्ही कितीतरी ब्राह्मण-ब्राह्मणी आहात. तुम्ही जाणता - आपण या ज्ञानाद्वारे भविष्यामध्ये असे धनवान बनणार आहोत. एकदम गॉडेज ऑफ वेल्थ, यापेक्षा जास्त वेल्थ इतर कोणाकडे असूच शकत नाही. म्हणूनच गायले जाते - ‘नॉलेज इज सोर्स ऑफ इन्कम’; जज, बॅरिस्टर इत्यादी नॉलेजमुळेच तर बनतात ना. तर हे इन्कम आहे ना. एखाद्या डॉक्टरला एका-एका केसचे लाख रुपये सुद्धा मिळतात. एखादा राजा-राणी अथवा प्रिन्स आजारी पडला आणि त्या डॉक्टरने आजारातून बरे केले तर त्या आनंदामध्ये मोठ-मोठे बंगले बांधण्यासाठी पैसे देतात. किती इन्कम झाले. तर शिक्षणाद्वारेच पद प्राप्त करतात. हे तुमचे शिक्षण देखील आहे आणि धंदा देखील आहे.

तुम्ही गोड मुले आता सौदा करण्यासाठी आला आहात. कखपण देऊन लाख कमावता. बाबा अविनाशी सर्जन देखील आहेत. सदैव निरोगी बनण्यासाठी बाबा योग शिकवत आहेत. बाबा म्हणतात - मी गॅरंटी देतो की, तुम्ही २१ जन्मांकरिता एव्हरहेल्दी बनाल. तर अशा सर्जनचे औषध अर्थात श्रीमतावर का बरे चालायचे नाही! बाबांचा सल्ला माना. माझी आठवण करा. म्हणतात ना - ‘सिमर-सिमर सुख पाओ, कलह क्लेश मिटे सब तन के’. भक्तिमार्गामध्ये काही कलह-क्लेश नष्ट होत नाही. अनेक संन्यासी देखील अर्धांगाने आजारी होऊन जागेवर पडून राहतात. जसे काही वेडे होतात. तुम्ही मुले जाणता - जर आपण बाबांच्या श्रीमतावर चाललो तर एव्हरहेल्दी बनू. तिथे (सतयुग-त्रेतामध्ये) वयोमर्यादा सरासरी १२५ ते १५० वर्षे असते. असे नाही की द्वापर मध्ये एकदम ३५ वर्षांचे आयुष्य होते. नाही, सुरुवातीला १०० ते १२५ वर्षे आयुष्य असेल, नंतर ७० ते ८० वर्षे आयुष्य असेल, आता तर ३५ ते ४० वर्षांपर्यंत येऊन पोहोचले आहे. लहान वयातच मृत्यू होतो, कारण भोगी आहेत. तुम्ही जाणता - आता आपण भोगी पासून योगी बनत आहोत. तिथे इतके दीर्घायुष्य असेल ज्यामुळे कधीही अकाली मृत्यू होणार नाही. बाबा आठवण करून देत आहेत - तुम्हाला केवढे राज्य-भाग्य दिले होते. आता रावणाने लुटले आहे. तिथे ही मंदिरे इत्यादी असत नाहीत. तुमचे एक स्लोगन देखील आहे - ‘भारताचा आदि सनातन देवी-देवता धर्म जिंदाबाद, बाकी सर्व मुर्दाबाद’, अर्थात अनेक धर्मांचा विनाश. तिथे केवळ एकच भारत खंड होता. एका खंडामध्ये मनुष्य देखील जरूर थोडेच असतील. तुम्ही लिहू शकता की, ‘थोड्याच काळामध्ये भारताची लोकसंख्या नऊ लाख होईल आणि बाकीचे सर्व नष्ट होतील’. एका धर्माची स्थापना आता होत आहे. न्यू डीटी राज्यामध्ये (नवीन दैवी राज्यामध्ये) एकच भाषा, एकच रिती-रिवाज असेल. इथे तर प्रत्येकाचे रीति-रिवाज आपले-आपले आहेत. तिथे एक राज्य, वन कम्युनिटी होती (एक समुदाय होता). तुम्ही अशा प्रकारची स्लोगन्स वृत्तपत्रांमध्ये टाकू शकता. बाबांकडून सल्ला घेतात की, पैसा खर्च करून वृत्तपत्रांमध्ये द्यायचे का? बाबा म्हणतील - भले द्या. लोकांना माहीत तर होईल की, काय चालले आहे. म्हणतात देखील - क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी स्वर्ग होता. सूर्यवंशी देवी-देवतांची वन रिलिजन, वन कम्युनिटी होती (एक धर्म, एक समुदाय होता). या महाभारत लढाई नंतर स्वर्गाचे गेट उघडले होते. वृत्तपत्रामध्ये द्या, नाव बी.के.चे असावे. परंतु बी.के. तेव्हा म्हणू शकतो जेव्हा पवित्र राहील. बाबांना बोलावले आहे. आता बाबा आले आहेत तर आता बाबांकडे प्रतिज्ञा करा. भक्तिमार्गामध्ये किती खस्ता खाल्ल्या आहेत; यज्ञ, तप, दान इत्यादी केले आहे. सुरुवातीला एका ‘शिव’चीच भक्ती करत होते, नंतर मग देवतांची, आणि आता तर व्यभिचारी बनले आहेत. आता बाबा तुम्हाला सर्व दुःखांमधून सोडवत आहेत. बाबा तुम्हा मुलांना नॉलेज देऊन किती श्रेष्ठ, मनुष्यापासून देवता बनवत आहेत. सतयुगामध्ये तुमच्याकडे सर्वकाही सोन्याचे असेल. बाबा तुम्हाला श्रीमत देऊन स्वर्गाचा मालक बनवत आहेत. तुम्ही मग श्रीमतावर का चालत नाही? बाबा यमदूतांच्या फाशीपासून सोडवतात, गर्भ-जेलच्या सजेपासून सोडवतात. तुम्ही स्वर्गामध्ये गर्भ-महालामध्ये राहता. इथे (या दुनियेमध्ये) आहे जेल, कारण मनुष्य पाप कर्म करतात. तिथे हे ५ विकारच नाहीत, तरी देखील राजा-राणी, प्रजा यांच्या पदामध्ये फरक तर असेल ना. पैसा कमावण्यासाठी मनुष्य मेहनत तर करतात ना. तिथे वजीर नसतात कारण तुम्ही इथले प्रारब्ध प्राप्त करता. आता बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही श्रीमतावर चाला. मी दूरदेशातून पतित शरीरामध्ये, पतित राज्यामध्ये आलो आहे. हा आहे रावणाचा देश, तुम्हा मुलांना येऊन वारसा देतो. अशा बाबांची आज्ञा न मानणे, तो तर कु-पुत्र झाला ना. विकाराच्या मागे इतके थोडेच हैराण झाले पाहिजे! बाबा म्हणतात - हे विकार दुःख देणारे आहेत. पतितांना पावन बनविणे - हे माझे काम आहे. किती प्रेमाने समजावून सांगतात - खा, प्या, सुखी राहा, परंतु हे लक्षात ठेवा की आपण शिवबाबांकडे आलो आहोत, त्यांच्याकडून आमची पालना (पालन-पोषण) होत आहे. जर मित्र-संबंधी इत्यादींनी दिलेली वस्तू वापराल तर त्यांचीच आठवण येईल, पद भ्रष्ट होईल. इथे शिवबाबांच्या भंडाऱ्यातून, पतित-पावन बाबांच्या यज्ञा मधून संगोपन होणार आहे, पतित घरामधून नाही. इतर कोणीही दिलेली वस्तू असेल तर त्याचीच आठवण येईल. त्यासाठी गायन आहे - ‘अन्तकाल जो स्त्री सिमरे…’ किती चांगली अवस्था असली पाहिजे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असून बुद्धीने असे समजायचे आहे की, हे सर्व नष्ट झालेले आहेत. आमचे तर एक बाबा. आता पित्याची कधी माळा जपली जाते का? मी तुम्हा मुलांना आठवण करून देतो की, माझी आठवण करा, तुम्हाला खूप बळ मिळेल, विकर्म विनाश होतील, बलवान बनाल. हे लक्ष्मी-नारायण बलवान आहेत ना. जे बलवान असतात ते राज्य प्राप्त करतात. बाबा (ब्रह्मा बाबा) आपले उदाहरण सांगतात - ‘मी १२ गुरू केले, गुरुने सांगितले - पहाटे उठून १००० माळेचा जप कर. मी म्हणत असे कोणता वेगळा वेळ सांगा. संपूर्ण दिवस मी काम-धंद्यामुळे थकून जातो’. जसे आता तुम्ही देखील म्हणता - बाबा, आम्ही पहाटे उठू शकत नाही. बाबा म्हणतात - असे म्हणू नका की मी पवित्र राहू शकत नाही, आठवणीमध्ये राहू शकत नाही. आठवण केली नाहीत तर विकर्म कशी विनाश होतील. तुम्हाला तमोप्रधानापासून सतोप्रधान जरूर बनायचे आहे. हा अंतिम जन्म आहे, तर जरूर पवित्र बना. बाबांच्या श्रीमतावर चालला नाहीत तर काय पद प्राप्त कराल. अर्ध्याकल्पापासून तुम्ही मला बोलावले आहे. आता मी म्हणतो - पावन बनून माझी आठवण करा. इतरांना देखील मार्ग सांगत राहा, संदेश देत राहा. बाबा म्हणतात - मनमनाभव. मृत्यू समोर उभा आहे. तुम्हालाच मेसेंजर अथवा पैगंबर म्हटले जाते. तुम्हा ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही मेसेंजर बनू शकत नाही. पतित-पावन शिवबाबा येतात. कोणामध्ये प्रवेश करतात, हे देखील लिहिलेले आहे. ब्रह्मा द्वारा स्थापना. हे समजतात थोडेच. सूक्ष्मवतनमध्ये प्रजापिता ब्रह्मा असेल काय? पतितापासून पावन तर इथेच बनतात. सायलेन्सच्या बळाद्वारे स्थापना होते, सायन्सच्या बळाद्वारे विनाश होतो. सर्व म्हणतात - ‘आम्हाला शांती कशी मिळेल’? आता आत्मा तर आहेच मुळी शांत स्वरूप. इथे पार्ट बजावण्याकरिता आला आहात, इथे शांत कसे काय राहाल. ती शांती शांतीधाम मध्येच मिळेल, इथे तर दुःखच मिळेल. सतयुगामध्ये सुख-शांती दोन्ही असेल.

आता तुम्ही मुले इथे सन्मुख ऐकत आहात. बाबा म्हणतात - पतित व्यक्ती मला कधीही भेटू शकत नाही; अन्यथा, घेऊन येणाऱ्या ब्राह्मणीवर पाप चढेल. (इंद्रसभेच्या परीचे उदाहरण आहे ना). वास्तविक इंद्रसभा ही आहे. या ज्ञान सब्ज पऱ्या, पुष्कराज पऱ्या आहेत. तर अजूनच धक्का बसेल. बाबा सक्त मनाई करतात - कोणीही पतित असणाऱ्याला घेऊन यायचे नाही. पूर्वी बाबा नेहमी विचारत असत की, ‘प्रतिज्ञा केली आहेस का!’ तर म्हणत असत - ‘पुरुषार्थ करत आहे’. जेव्हा पक्का निश्चय होईल तेव्हाच तुम्ही बाबांना भेटू शकाल. जर बाबांना भेटल्यानंतर विकारामध्ये गेला तर १०० पटीने दंड होईल. बाबा समजतील कदाचित यांच्या नशिबामध्ये नाही. बाबा तर भाग्य बनविण्याकरिता पुरुषार्थ करायला सांगतात. मग अशा बाबांचे म्हणणे मानत नसाल तर काय गति होईल! बाबांना तर दया येते. म्हणतात - स्वतःला सुधारत जा. असे होऊ नये की चालता-चालता मरून जाल (पतित बनाल). काळजी वाटली पाहिजे की, आपण बाबांची आठवण करून पापांचे ओझे दूर करावे. अच्छा!

सर्वांची सद्गती करणारे एक शिवबाबाच आहेत, त्यांचा फोटो तर काढू शकत नाही, त्यांना दिव्य-दृष्टी द्वारेच पाहू शकता. बाकी त्यांना जाणून घेणे शक्य आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अशी अवस्था बनवायची आहे जेणेकरून अंतिम समयी एका बाबांचीच आठवण यावी. दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये, बुद्धीमध्ये हे असावे की हे सर्व नष्ट होणार आहे.

२) आपणच आपल्याला सुधारायचे आहे, या अंतिम जन्मामध्ये जरूर पवित्र बनायचे आहे. ही काळजी घ्यायची आहे की, आपल्याकडून कोणतेही पाप कर्म होऊ नये.

वरदान:-
ड्रामाच्या ढालीला समोर ठेवून खुशीचा खुराक खाणारे सदा शक्तिशाली भव

खुशी रुपी भोजन आत्म्याला शक्तिशाली बनवते. म्हणतात देखील - ‘खुशी जैसी खुराक नहीं’. यासाठी ड्रामाच्या ढालीला व्यवस्थितपणे कार्यामध्ये वापरा. जर सदैव ड्रामाची आठवण राहिली तर कधीही उदास होणार नाही, खुशी गायब होणार नाही, कारण हा ड्रामा कल्याणकारी आहे त्यामुळे अकल्याणकारी दृश्यामध्ये देखील कल्याण सामावलेले आहे, असे समजून नेहमी आनंदी राहाल.

बोधवाक्य:-
पर-चिंतन आणि पर-दर्शनाच्या धुळीपासून दूर राहणारेच खरे मौल्यवान हिरे आहेत.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

संपन्नता आणि संपूर्णतेला प्राप्त करण्यासाठी देहाच्या अभिमानापासून संपूर्ण समर्पित व्हायचे आहे. देहाचा अभिमान पूर्णतः नष्ट व्हावा, तेव्हाच म्हटले जाईल - सर्व समर्पणमय जीवन. असे जे सर्व त्यागी, सर्व समर्पण जीवनवाले आहेत त्यांचीच संपूर्ण अवस्था गायली जाते; आणि जेव्हा संपूर्ण बनाल तेव्हाच सोबत जाल.