05-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - या शरीर रुपी कपड्याला इथेच सोडायचे आहे, त्यामुळे यातून मोह काढून टाका,
कोणत्याही मित्र-नातेवाईकांची आठवण येऊ नये”
प्रश्न:-
ज्या
मुलांमध्ये योगबळ आहे, त्यांची लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
त्यांना कोणत्याही गोष्टीचा जरासुद्धा शॉक बसणार नाही, कुठेही मोह असणार नाही. समजा
आज कोणी शरीर सोडले तर दुःख होऊ शकत नाही, कारण की जाणतात यांचा ड्रामामध्ये इतकाच
पार्ट होता. आत्मा एक शरीर सोडून जाऊन दुसरे शरीर घेईल.
ओम शांती।
हे ज्ञान अतिशय गुप्त आहे, यामध्ये नमस्ते देखील करावे लागत नाही. दुनियेमध्ये
नमस्ते अथवा राम-राम इत्यादी म्हणतात. इथे या सर्व गोष्टी चालू शकत नाहीत कारण की
ही एक फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये एकमेकांना नमस्ते अथवा गुडमॉर्निंग करणे - इतके शोभत
नाही. घरामध्ये तर खाणे-पिणे केले ऑफिसला गेला, मग आला, हे चालत रहाते. नमस्ते
करण्याची गरज राहत नाही. गुडमॉर्निंगची फॅशन देखील युरोपियनकडून आली आहे. नाहीतर
अगोदर असे काही करत नव्हते. काही सत्संगामध्ये आपसात भेटतात तेव्हा नमस्ते करतात,
पाया पडतात. हे पाया इत्यादी पडणे नम्रतेकरिता शिकवतात. इथे तर तुम्हा मुलांना
देही-अभिमानी बनायचे आहे. आत्मा, आत्म्याला नमस्कार तो काय करणार? तरी देखील
म्हणायचे तर असते. जसे बाबांना म्हणता - बाबा नमस्ते. आता बाबा देखील म्हणतात - मी
साधारण ब्रह्मा तनाद्वारे तुम्हाला शिकवतो, यांच्याद्वारे स्थापना करवून घेतो. कशी?
ते तर जेव्हा बाबा समोर असतील तेव्हा समजावून सांगतील, नाही तर कोणी समजतील तरी कसे.
हे बाबा सन्मुख बसून समजावून सांगतात तेव्हा मुले समजतात. दोघांनाही नमस्ते म्हणावे
लागते - बापदादा नमस्ते. बाहेरच्यांनी जर हे ऐकले तर गोंधळतील की हे ‘बापदादा’ काय
म्हणतात. डबल नाव देखील बऱ्याच लोकांची असतात ना. जसे लक्ष्मीनारायण अथवा राधेकृष्ण…
अशी देखील नावे आहेत. हे तर जसे स्त्री-पुरुष एकत्र झाले. आता हे तर आहेत बापदादा.
या गोष्टींना तुम्ही मुलेच समजू शकता, जरूर बाबा मोठे आहेत. ते नाव भले डबल आहे
परंतु व्यक्ती तर एकच आहे ना. मग दोन्ही नावे का ठेवली आहेत? आता तुम्ही मुले जाणता
की हे चुकीचे नाव आहे. बाबांना बाकी दुसरे तर कोणी ओळखू शकत नाहीत. तुम्ही म्हणाल -
नमस्ते बापदादा. बाबा मग म्हणतील - नमस्ते जिस्मानी रुहानी बच्चे (देहधारी आत्मिक
मुलांनो), परंतु इतके लांबलचक बोलणे शोभत नाही. शब्द तर बरोबर आहेत. तुम्ही आता
देहधारी मुले देखील आहात तर रुहानी मुले देखील आहात. शिवबाबा सर्व आत्म्यांचे पिता
आहेत आणि मग प्रजापिता देखील जरूर आहेत. प्रजापिता ब्रह्माची संतान भाऊ-बहिणी आहेत.
प्रवृत्ति मार्ग होतो. तुम्ही सर्व आहात ब्रह्माकुमार-कुमारी. ब्रह्माकुमार-कुमारी
झाल्यामुळे प्रजापिता देखील सिद्ध होतात. यामध्ये अंधश्रद्धेचा काही प्रश्नच नाही.
तुम्ही बोला ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारींना बाबांकडून वारसा मिळतो. ब्रह्माकडून
मिळत नाही, ब्रह्मा देखील शिवबाबांचा मुलगा आहे. सूक्ष्मवतन-वासी ब्रह्मा, विष्णू,
शंकर - ही आहे रचना. यांचा रचयिता आहे - शिव. शिवासाठी तर कोणी म्हणू शकत नाही की
यांचा क्रिएटर कोण? शिवाचा कोणीही क्रिएटर असत नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकर - ही आहे
रचना. यांच्या देखील वरचे आहेत शिव, सर्व आत्म्यांचे पिता. आता क्रिएटर आहेत तर मग
प्रश्न उठतो केव्हा क्रिएट केले? नाही, हे तर अनादि आहे. इतक्या आत्म्यांना केव्हा
क्रिएट केले? असा प्रश्न उठू शकत नाही. हा अनादि ड्रामा चालत आलेला आहे, बेअंत आहे.
याचा कधीही अंत होत नाही. या गोष्टी तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार समजतात. हे आहे
खूप सोपे. एका बाबांशिवाय इतर कोणा विषयी आकर्षण नसावे, कोणी मरो अथवा जगो. गायन
देखील आहे - ‘अम्मा मरे तो भी हलुआ खाना…’ समजा कोणाचाही मृत्यू झाला तरीही काळजी
करण्याची गरज नाही कारण हा ड्रामा अनादि बनलेला आहे. ड्रामानुसार त्यांना यावेळी
जायचेच होते, यामध्ये आपण तरी काय करू शकतो. जरा सुद्धा दुःखी व्हायचे नाही. ही आहे
योगबळाची अवस्था. लॉ म्हणतो जरासुद्धा शॉक बसता कामा नये. सर्व ॲक्टर्स आहेत ना.
आपला-आपला पार्ट बजावत राहतात. मुलांना ज्ञान मिळालेले आहे.
बाबांना म्हणतात - हे
परमपिता परमात्मा येऊन आम्हाला घेऊन जा. इतक्या सर्व शरीरांचा विनाश करून सर्व
आत्म्यांना सोबत घेऊन जाणे, हे तर खूप मोठे काम झाले. इथे एक जरी कोणी मेला तरी १२
महिने रडत राहतात. बाबा तर इतक्या प्रचंड प्रमाणात सर्व आत्म्यांना घेऊन जातील.
सर्वांची शरीरे इथेच सुटतील. मुले जाणतात महाभारत युद्ध सुरु होते तेव्हा डासां
प्रमाणे जात राहतात. नैसर्गिक आपत्ती देखील येणार आहेत. ही संपूर्ण दुनिया बदलते.
आता पहा इंग्लंड, रशिया इत्यादी किती मोठे-मोठे देश आहेत. सतयुगामध्ये हे सर्व होते
काय? दुनियेमध्ये हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही की आपल्या राज्यामध्ये हे
कोणीही नव्हते. एकच धर्म, एकच राज्य होते, तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत
ज्यांच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट व्यवस्थित पक्की होते. जर धारणा असेल तर तो नशा
कायम चढलेला राहील. असा नशा कोणाला फार मुश्किलीने चढलेला राहतो. मित्र-नातेवाईक
इत्यादी सर्व बाजूंनी मन काढून एका बेहदच्या खुशीमध्ये टिकेल, ही तर खूप मोठी कमाल
आहे. हां, हे देखील शेवटी होईल. शेवटीच कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात. शरीराचे
देखील भान नष्ट होते. बस आता आपण जातो, हे जसे कॉमन होईल. जसे नाटकवाले पार्ट
बजावून मग घरी जातात. हा देहरूपी कपडा तर तुम्हाला इथेच सोडायचा आहे. हे कपडे इथेच
घेतो, इथेच सोडतो. या सर्व नविन गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत, दुसऱ्या
कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). अल्फ आहेत सर्वात
वरती. म्हणतात देखील ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारे विनाश, विष्णूद्वारे पालना.
ठीक आहे, मग शिवाचे काय काम आहे? उच्च ते उच्च शिवबाबांना कोणीही जाणत नाहीत.
म्हणतात - ते तर सर्वव्यापी आहेत. ही सर्व त्यांचीच रूपे आहेत. साऱ्या दुनियेच्या
बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे, त्यामुळे सर्व तमोप्रधान बनले आहेत. बाबा म्हणतात -
संपूर्ण दुनिया दुर्गतीला प्राप्त झाली आहे. मग मीच येऊन सर्वांना सद्गती देतो. जर
सर्वव्यापी आहेत तर मग सर्व भगवानच भगवान आहेत काय? एका बाजूला म्हणतात - सर्वजण
बांधव आहेत, आणि मग म्हणतात सर्वजण पिता आहोत, समजतच नाहीत. आता तुम्हा मुलांना
बेहदचे बाबा म्हणतात, ‘मुलांनो, माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. आता
तुम्हाला या दादांची किंवा मम्माची देखील आठवण करायची नाहीये. बाबा तर म्हणतात कि
ना मम्मा, ना बाबा, कोणाची काहीही महिमा नाही. शिवबाबा नसते तर हे ब्रह्मा देखील
काय करू शकले असते? यांची आठवण केल्याने काय होणार! हां, तुम्ही जाणता यांच्याद्वारे
(ब्रह्माबाबांद्वारे) आपण बाबांकडून वारसा घेत आहोत, ब्रह्मा बाबांकडून नाही. हे
ब्रह्माबाबा देखील शिवबाबांकडून वारसा घेतात, तर आठवण त्यांची (शिवबाबांची) करायची
आहे. हे (ब्रह्मा बाबा) तर मधले दलाल आहेत. मुलगा आणि मुलगीचा साखरपुडा होतो, तेव्हा
एकमेकांची आठवण तर करतील ना. लग्न ठरवणारा तर मधला दलाल झाला. ब्रह्मा बाबांद्वारे
बाबा तुम्हा आत्म्यांचा साखरपुडा आपल्या सोबत करून घेतात; म्हणून गायन देखील आहे
सद्गुरू दलालाच्या रूपामध्ये मिळाले. सद्गुरू काही दलाल नाहीये. सद्गुरू तर निराकार
आहेत. भले ‘गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू’, असे म्हणतात परंतु ते काही गुरु नाहीत.
सद्गुरू तर एक बाबाच आहेत जे सर्वांची सद्गती करतात. बाबांनी तुम्हाला शिकवले आहे
मग तुम्ही इतरांना सुद्धा मार्ग सांगता आणि सर्वांना म्हणता की, दिसत असताना देखील
पाहू नका. बुद्धी शिवबाबांसोबत जोडलेली असावी. या डोळ्यांनी जे काही पाहता ते
कब्रदाखल होणार आहे. आठवण एका बाबांची करायची आहे, या ब्रह्मा बाबांची नाही. बुद्धी
म्हणते यांच्याकडून (ब्रह्मा बाबांकडून) वारसा थोडाच मिळणार आहे. वारसा तर
बाबांकडून मिळणार आहे. जायचे देखील बाबांकडे आहे. स्टुडंट, स्टुडंटची थोडीच आठवण
करतील. स्टुडंट तर टिचरची आठवण करतील ना. स्कुलमध्ये जी हुशार मुले असतात ते मग
इतरांना देखील पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न करतात. बाबा देखील म्हणतात एकमेकांना पुढे
घेऊन जाण्याचा प्रयत्न करा परंतु नशिबात नसेल तर पुरुषार्थ सुद्धा करत नाहीत.
थोड्यामध्येच समाधान मानतात. इतरांना समजावून सांगितले पाहिजे, प्रदर्शनीमध्ये तर
पुष्कळजण येतात, अनेकांना समजावून सांगितल्याने खूप उन्नती होते. निमंत्रण देऊन
बोलावतात. तर मोठ्या-मोठ्या हुशार व्यक्ती येतात. निमंत्रण न देता तर अनेक प्रकारचे
लोक येतात. काय-काय उलटे-सुलटे बरळत राहतात. रॉयल (सभ्य) व्यक्तींची वागणूक देखील
रॉयल असते. रॉयल व्यक्ती रॉयल्टीने आत येतील. या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या
व्यवहारामध्ये देखील खूप फरक असतो. त्या लोकांमध्ये चालण्याची, बोलण्याची सभ्यता
सुद्धा नसते. मेळ्यामध्ये तर सर्व प्रकारचे येतात, कोणाला मनाई केली जात नाही
त्यामुळे कुठेही प्रदर्शनीमध्ये निमंत्रण कार्ड देऊन आमंत्रित कराल तर रॉयल
चांगले-चांगले लोक येतील. मग ते इतरांना सुद्धा जाऊन ऐकवतील. कधी महिलांचा
प्रोग्राम ठेवा म्हणजे मग फक्त महिलाच येऊन बघतील कारण काही ठिकाणी महिला खूप
बुरख्यात असतात. तर फक्त महिलांचाच प्रोग्राम असावा. कोणीही पुरुष येता कामा नये.
बाबांनी समजावून सांगितले आहे सर्वात पहिले तुम्हाला हे समजावून सांगायचे आहे की,
शिवबाबा निराकार आहे. शिवबाबा आणि प्रजापिता ब्रह्मा दोघेही बाबा झाले. दोघेही काही
एकसारखे तर असू शकणार नाही, जे दोन्ही बाबांकडून वारसा मिळेल. दुनियेमध्ये
आजोबांकडून किंवा बाबांकडून वारसा मिळेल. आजोबांच्या प्रॉपर्टी वर अधिकार असतो. भले
कसाही कु-पुत्र असला तरीही अशा मुलाला देखील आजोबांचा वारसा मिळेल. हा इथला (या
दुनियेचा) कायदा आहे. समजतात देखील याला पैसा मिळाल्यावर एक वर्षाच्या आत उडवून
टाकेल. परंतु गव्हर्मेंटचा कायदा असा आहे त्यामुळे द्यावे लागते. गव्हर्मेंट काहीच
करू शकत नाही. बाबा (ब्रह्मा बाबा) तर अनुभवी आहेत. एका राजाचा मुलगा होता, एक करोड
रुपये १२ महिन्यामध्ये संपवून टाकले. असे देखील असतात. शिवबाबा तर म्हणणार नाहीत की
मी पाहिले आहे. हे दादा (ब्रह्मा बाबा) म्हणत आहेत, मी अशी खूप उदाहरणे बघितली आहेत.
ही दुनिया खूप घाणेरडी आहे. ही आहेच जुनी दुनिया, जुने घर. जुन्या घराला नेहमी
मोडून टाकायचे असते. या लक्ष्मी-नारायणाचे राजाई घर पहा कसे फर्स्ट क्लास आहे.
आता तुम्ही
बाबांद्वारे समजून घेत आहात आणि तुम्ही देखील नरापासून नारायण बनता. ही आहेच
सत्यनारायणाची कथा. हे देखील तुम्ही मुलेच समजता. तुमच्यामध्ये देखील पूर्ण फूले
अजून कोणी बनले नाही आहेत, यामध्ये खूप चांगली रॉयल्टी पाहिजे. तुम्ही दिवसेंदिवस
उन्नती करत राहता. फुले बनत जाता.
तुम्ही मुले प्रेमाने
म्हणता “बापदादा”. हि देखील तुमची नविन भाषा आहे, जी लोकांच्या लक्षात येऊ शकत नाही.
समजा बाबा कुठेही गेले तर मुले म्हणतील बापदादा नमस्ते. बाबा प्रतिसाद देतील -
रुहानी देहधारी मुलांना नमस्ते. असे म्हणावे लागेल ना. कोणी ऐकेल तर म्हणतील ही तर
कोणती नविन गोष्ट आहे, बापदादा एकत्र कसे म्हणतात. बाबा आणि दादा दोघेही कधी एक
असतात काय? नावे देखील दोघांची वेगळी आहेत. शिवबाबा, ब्रह्मा दादा, तुम्ही या
दोघांची संतान आहात. तुम्ही जाणता यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) शिवबाबा बसलेले
आहेत. आपण बापदादांची मुले आहोत. हे जरी बुद्धीमध्ये लक्षात राहीले तरीही आनंदाचा
पारा चढलेला राहील आणि ड्रामावर देखील पक्के रहायचे आहे. समजा कोणी शरीर सोडले,
जाऊन दुसरा पार्ट बजावतील. प्रत्येक आत्म्याला अविनाशी पार्ट मिळालेला आहे, यामध्ये
काहीही शंका येण्याची गरजच नाही. त्यांना जाऊन दुसरा पार्ट बजावायचा आहे. परत तर
बोलावू शकत नाही. ड्रामा आहे ना. यामध्ये रडण्याचा काही प्रश्नच नाही. अशी अवस्था
असणारेच जाऊन निर्मोही राजा बनतात. सतयुगामध्ये सर्व निर्मोही असतात. इथे कोणी मेला
तर किती रडतात. बाबांना प्राप्त केले तर मग रडण्याची गरजच नाही. बाबा किती चांगला
मार्ग दाखवतात. कन्यांसाठी तर खूप चांगले आहे. वडील फुकटचे पैसे खर्च करणार आणि तू
जाऊन नरकात पडणार. यापेक्षा तर वडिलांना सांगा की, ‘मी या पैशांनी रुहानी
युनिव्हर्सिटी कम हॉस्पिटल खोलते. अनेकांचे कल्याण केले तर तुमचे देखील पुण्य, माझे
देखील पुण्य जमा होईल’. मुले स्वतः देखील उत्साहामध्ये राहणारी असावीत की, आम्ही
भारताला स्वर्ग बनविण्यासाठी तन-मन-धन सर्व खर्च करू. इतका नशा राहिला पाहिजे.
द्यायचे असेल तर द्या, द्यायचे नसेल तर देऊ नका. तुम्ही आपले आणि अनेकांचे कल्याण
करू इच्छित नाही? एवढा नशा असला पाहिजे. खास कुमारींनी तर खूप खंबीरपणे उभे राहिले
पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपले वर्तन
खूप रॉयल ठेवायचे आहे. अतिशय सभ्यतेने बातचीत करायची आहे. नम्रतेचा गुण धारण करायचा
आहे.
२) या डोळ्यांनी जे
काही दिसते आहे - ते सर्व कब्रदाखल होणार आहे त्यामुळे याला बघत असताना देखील पहायचे
नाही. एका शिवबाबांचीच आठवण करायची आहे, कोणत्या देहधारीची नाही.
वरदान:-
मास्टर ज्ञान
सागर बनून बाहुल्यांचा खेळ बंद करणारे स्मृति सो समर्थ स्वरूप भव
जसे भक्तिमार्गामध्ये
मूर्ती बनवून पूजा इत्यादी करतात, आणि मग त्यांना बुडवून टाकतात तर तुम्ही त्याला
बाहुल्यांचा खेळ म्हणता. तसे तुमच्या समोर देखील जेव्हा कोणत्या शक्तिहीन, असार (व्यर्थ
गोष्टी), ईर्षा, अनुमान, आवेश इत्यादी सारख्या गोष्टी आल्या आणि तुम्ही त्यांचा
विस्तार करून अनुभव करता किंवा करविता की हेच सत्य आहे, तर हे देखील जसे त्यामध्ये
प्राण भरता. आणि नंतर मग त्यांना ज्ञान सागर बाबांच्या आठवणीने, बिती सो बिती करून,
स्व-उन्नतीच्या लाटांमध्ये बुडवता देखील परंतु यामध्ये सुद्धा वेळ तर वाया जातोच
ना, म्हणून अगोदरच मास्टर ज्ञान सागर बनून ‘स्मृति सो समर्थि भव’च्या वरदाना द्वारे
या बाहुल्यांच्या खेळाला बंद करा.
बोधवाक्य:-
जे वेळेवर
सहयोगी बनतात त्यांना एकाचे पद्मगुणा फळ मिळते.
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-
जे कोणी राजनेता अथवा
धर्मनेता आहेत त्यांना “पवित्रता आणि एकता” याचा अनुभव करवा. याच कमतरतेमुळे दोन्ही
सत्ता कमजोर आहेत. धर्मसत्तेला धर्मसत्ताहीन बनविण्याची विशेष पद्धती आहे -
पवित्रतेला सिद्ध करणे आणि राज्य सत्तावाल्यांसमोर एकतेला सिद्ध करणे.