05-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्हाला सायलेन्समध्ये राहून एका बाबांची आठवण करायची आहे, यामध्ये घंटा इत्यादी वाजवण्याची गरज नाही”

प्रश्न:-
कोणत्या बाबतीत पित्यासमान बनलात तर सर्व कामे सिद्ध होतील?

उत्तर:-
जसे बाबा प्रेमाचा सागर आहेत तसे खूप-खूप प्रेमळ बना. क्रोधाने काम बिघडते, बनत नाही; त्यामुळे डोळे मोठे करणे, मोठ्याने बोलणे, तापणे, याची गरज नाही. शांत राहणे खूप-खूप चांगले आहे. प्रेमाने बरीच कामे सिद्ध होऊ शकतात.

गीत:-
तुम्ही हो माता पिता...

ओम शांती।
ही महिमा आहे एकाची. परंतु भक्तिमार्गामध्ये फक्त एकाची महिमा गायल्याने भक्तीचा शो होत नाही म्हणून भक्तीमध्ये अनेकांची महिमा गातात. तिथे आवाजही खूप असतो. टाळ-घंटा बडवणे, गाणी-भजने गाणे, मोठमोठ्याने आरत्या म्हणणे इत्यादी भक्तिमार्गामध्ये किती चालते. विविध प्रकारचे आवाज, मंत्रोच्चार, श्लोक पठण, स्तुतीपाठ इत्यादी असते; आणि ज्ञान मार्गामध्ये आहे सायलेन्स. फक्त इशारा दिला जातो, आवाज अजिबात नाही. भक्तीमध्ये किती थाटमाट आहे. सर्वात जास्त घंटा वाजतात शिवाच्या मंदिरामध्ये, जिथे-तिथे पहा घंटाच घंटा आहेत. कोणाला झोपेतून उठवण्यासाठी काही घंटा वाजवल्या जात नाहीत. शिवबाबांनी येऊन मनुष्यांना कुंभकर्णाच्या अज्ञान झोपेतून जागे केले आहे, परंतु घंटा वाजवत नाहीत. अगदी शांतीने, दोन शब्दांमध्येच समजावून सांगतात. बुद्धिवान जे असतात ते दोन शब्दातच समजून जातात.

बाबा म्हणतात - मुलांनो, माझी आठवण करा. तुम्हीच मला बोलावले आहे - ‘हे पतित-पावन या’. आता मी आलो आहे तुम्हाला मार्ग सांगत आहे. अजूनही तुम्हाला पतित बनून याच दुनियेमध्ये राहायचे आहे काय! तुम्हाला तर पावन दुनियेमध्ये राहण्याची इच्छा आहे ना. पावन दुनिया स्वर्गाला म्हटले जाते. म्हणतातच मुळी ‘पतित-पावन’, तर समजले पाहिजे की पतित-पावन येऊन काय करतील? जरूर नरकातून स्वर्गामध्ये घेऊन जातील. न समजता असेच बोलावत राहतात, टाळ्या वाजवत राहतात. परंतु हे जाणत नाहीत की, बाबा आले तर येऊन काय करतील? वास्तविक ही मनुष्यापासून देवता बनण्याची युनिव्हर्सिटी देखील आहे. म्हणूनच तर गातात - ‘मनुष्य को देवता किये…’ यामध्ये शास्त्र इत्यादी काहीही वाचायचे नाही. भक्तिमार्गामध्ये अनेक शास्त्रे इत्यादी वाचतात, पुष्कळ प्रवचने इत्यादी असतात. महिना-महिना मंडप बनवून बसून आवाज करतात (बोलत असतात). इथे किती शांतीमध्ये बसून बाबा समजावून सांगतात. पाहा, तुम्हाला बाबा येऊन पावन बनवून, पावन दुनियेचे मालक बनवतात. अभ्यास देखील किती सोपा आहे. तुम्ही सर्वात आधी पावन होता, गोल्डन एज्डमध्ये होता. मग ८४ जन्म घेता-घेता आयर्न एज्डमध्ये तमोप्रधान बनला आहात. आता तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे म्हणून माझी आठवण करा; ती देखील अजपा. जसे कन्येचे जेव्हा लग्न होते तेव्हा ती कशाचा जप करते? आठवणीमध्ये राहते. तुम्ही देखील सर्व पत्नी आहात, हे शिवबाबा पतींचेही पती आहेत. तुमचा साखरपुडा झाला आहे परमात्म्यासोबत. साखरपुडा जेव्हा झाला तेव्हा बस आठवण बुद्धीमध्ये पक्की झाली. खात्री झाली की आपण साखरपुडा केला आहे. मग एकामेकांची आठवण करत राहतात. तुम्हाला देखील बाबा म्हणतात निश्चयबुद्धी झाला आहात की, आपण एका बाबांची मुले आपसामध्ये भाऊ-भाऊ आहोत. भावांना वारसा मिळतो एका बाबांकडून; म्हणून बाबांना बोलावतात. जरी मनुष्य देहामध्ये येऊन भाऊ-बहिण बनतात. परंतु बोलावणारी आत्मा आहे ना. भाऊ-भाऊ बोलावतात - ‘हे पतित-पावन बाबा या’. बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. पावन असणाऱ्याला सतोप्रधान, पतित असणाऱ्याला तमोप्रधान म्हटले जाते. या गोष्टी बाबा संगमावरच समजावून सांगतात. ही आहे गीता पाठशाळा. या पाठशाळेमध्ये बाबा येऊन राजयोग शिकवत आहेत, नरापासून नारायण बनवत आहेत. तिथे (लौकिक शाळेमध्ये) टीचर तर समोर बसून शिकवतात, दिसून येतात. हे आहेत गुप्त. तर या टीचरला देखील बुद्धी-योगाद्वारे समजून घ्यावे लागते. ते निराकार पतित-पावन बाबा आहेत. तेच आठवण करून देत आहेत की, कल्पापूर्वी देखील मी तुम्हाला राजयोग शिकवला होता. तेव्हाच तर म्हटले जाते - मनमनाभव; पवित्र बना तर असे लक्ष्मी-नारायण बनाल. यामध्ये टाळ-घंटा इत्यादी वाजवण्याची गरजच नाही. बाबा स्वतः येऊन जागे करतात. मनमनाभवचा अर्थ आहे - सायलेन्स. स्वतःला आत्मा निश्चय करा. बस्स! आता आपल्याला आपल्या घरी जायचे आहे. बाबांनाच सगळे म्हणतात की, आम्हाला दुःखातून सोडवून मुक्त करा. संन्यासी लोक फक्त ब्रह्मची आठवण करतात. आता ब्रह्म तत्व तर घर आहे. ते घराची आठवण करतील, इथे आपल्याला बाबांची आठवण करायची आहे. फक्त घराची आठवण कराल तर जसे संन्यासी व्हाल. ब्रह्म काही भगवान नाहीये.

बाबा बसून समजावून सांगतात - माझी आठवण करा तर तुम्ही निर्वाणधाममध्ये निघून जाल. मग तिथून स्वर्गामध्ये याल. इथून मी तुम्हा मुलांना सोबत घेऊन जाईन. तुम्हाला ठाऊक आहे नाकतोड्यांची झुंड किती मोठी असते. सर्वांची युनिटी असते. आधी पुढचा बसला की बाकी सगळे बसतील. मधमाशा देखील अशाच असतात. राणीने घर सोडले तर बाकी सगळ्या तिच्या मागे पळत सुटतील. तो जणू त्यांचा साजन झाला. त्यांच्यामध्ये मग हमजीन्सवर सजणीच राज्य करते. शास्त्रांमध्ये देखील आहे - सर्व आत्मे मच्छरांसदृश पळतात. अगणित आत्मे आहेत. त्या माशा प्रत्येक सीझनमध्ये आपल्या राणीच्या मागे पळतात. तुम्हाला तर एकदाच पळायचे आहे. आता सर्व आत्म्यांना मूलवतनला जायचे आहे. तुमचा अजिबात आवाज नसतो म्हणून बाबा उदाहरण देतात. मोहरीच्या दाण्यासारखे भरडले जातात. बाबा सुद्धा बिंदू, मोहरीच्या दाण्यासारखे आहेत. खसखसचा दाणा सुद्धा खूप छोटा असतो. परमात्मा सुद्धा बिंदू आहेत. त्यांना दिव्य दृष्टी शिवाय पाहता सुद्धा येत नाही. अगदी सूक्ष्म स्टार सारखा आहे. गीतेमध्ये दाखवले आहे - अखंड ज्योतीचा साक्षात्कार झाला; तर इथे देखील जेव्हा अखंड ज्योतीचा साक्षात्कार होईल तेव्हा समजतील साक्षात्कार झाला. जर बिंदूचा झाला तर समजतील हा परमात्मा थोडाच आहे. गीतेमध्ये तर लिहिलेले आहे - अर्जुनाला खूप तेजोमय साक्षात्कार झाला. भक्तीच्या गोष्टी बुद्धीमध्ये पक्क्या झालेल्या आहेत. भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यामध्ये दिवस-रात्री इतका फरक आहे. तुम्ही जाणता आपण ६३ जन्म शरीराद्वारे किती डान्स करतो. ६३ जन्म किती भक्तीमार्गाचा गोंधळ पाहतो. त्यातही सुरुवातीला जेव्हा सतोप्रधान भक्ती होती तेव्हा एका शिवबाबांचीच भक्ती करत होते. मग हे गंगा-स्नान इत्यादी नंतर सुरू होतात. आधी अव्यभिचारी भक्ती असते, मग वृद्धिंगत होते. इथे तर एकदम शांती पसरलेली आहे. एका दमडीचाही खर्च न करता तुम्ही विश्वाचे मालक बनता. मम्मा दमडी शिवाय आली आणि विश्व महाराणी बनली. हे साधारण होते. एकदम गरीब घरातील एका दमडीचाही खर्च न करता पहा काय बनतात. मम्मा मग सेवा खूप करत होती. जाऊन इतरांना समजावून सांगत होती की बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही सतोप्रधान बनाल. यामध्ये खर्चाची तर कोणती गोष्टच नाही. जर कोणी थोडाफार खर्च करतही असेल तर तो स्वतःसाठीच असतो. जसे शेतामध्ये दोन मूठी धान्य पेरले तर त्यापासून किती भरपूर धान्य पिकते. मोठे शेत होते. ही देखील २१ जन्मांसाठी तुमची किती कमाई होते. मनुष्यापासून देवता बनणे किती सोपे आहे. एका सेकंदाची गोष्ट आहे. बसलेत देखील कसे सामान्य पद्धतीने आहेत. जर कोणी बसू शकत नसेल तर बाबा म्हणतात आडवे पडून देखील मुरली ऐका. ही आहे धारणेची गोष्ट. मनातल्या मनात बाबांची आणि सृष्टीचक्राची आठवण करत राहा. आठवण करत-करतच शरीर सोडायचे आहे. बाकी तोंडात गंगाजल घालण्याची कोणतीही गोष्ट नाही. गुरू-गोसावी तर खूप घाबरवतात की, तुम्ही नियम तोडाल, भक्ती केली नाहीत तर असे होईल. समजा कोणाचा पाय मोडला किंवा नुकसान झाले तर म्हणतील तुम्ही भक्ती सोडली त्याचा हा परिणाम झाला, तर घाबरून जातात. इथे तर काहीच करायचे नाहीये. बाबांची आठवण करून द्यायची आहे, सृष्टीचक्राचे रहस्य समजावून सांगायचे आहे. आता कलियुगाच्या नंतर सतयुग येणार आहे, विनाश होणार आहे जरूर, म्हणून ही महाभयंकर लढाई सज्ज आहे. स्वयं भगवान येऊन राजयोग शिकवून नरापासून नारायण बनवतात. हा राजयोग आहे, प्रजायोग नाही. शुभ बोलायला हवे. मुलांना खूप गोड बनायचे आहे. बाबा गोड आहेत ना. क्रोध इत्यादी सर्व दानामध्ये घेतात.

बाबा म्हणतात - मी प्रेमाचा सागर आहे, तुम्ही देखील बना. अतिशय प्रेमाने समजावून सांगतात. नाहीतर मुले खूप गोंधळ माजवतात कारण माया डोके खराब करून टाकते, त्यामुळे विचार येतो की कधीही कोणाला काही बोलू नये, प्रेमाने समजावून सांगावे. डोळे मोठे करणे, तापणे, मोठ्याने बोलणे, याची गरजच नाही, यामुळे काम बिघडते. शांत राहणे चांगले आहे. विकारांचे दान देऊन मग परत घेतात तर आपलेच पद गमावून बसतात. बाबांचे बनले अर्थात ५ विकारांचे दान देऊन टाकले. म्हणतात - दे दान तर सुटेल ग्रहण. तरी देखील बाबा पंडा आहेत ना, पंडे ब्राह्मण असतात. शिवबाबा देखील रुहानी पंडा आहेत. तुम्ही देखील पंडे आहात. बाबा ब्रह्माच्या तनामध्ये येतात तर हे देखील ब्राह्मण झाले. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये) बसले आहेत, त्यांची महिमा गातात - ‘तुम मात-पिता…’ इतर कोणाचीही अशी महिमा नाही. त्यांचे कर्तव्य देखील असे आहे. ही पाठशाळा आहे, बाबा शिकवत आहेत, हे मुलांच्या लक्षात राहिले पाहिजे. एम-ऑब्जेक्ट आहेच मुळी विश्वाची बादशाही मिळवणे. तर असे शिक्षण देणाऱ्याची व्यवस्थित आठवण केली पाहिजे. स्कुलमधून स्टुडंट चांगल्या मार्कांनी पास होतात तर वर्ष-वर्ष टीचरला भेटवस्तू पाठवत राहतात. हे सण इत्यादी सर्व या वेळचे आहेत, परंतु याचे महत्व कोणीही जाणत नाही.

बाबा आहेत नॉलेजफुल. ते येतातच रचनेच्या आदि, मध्य आणि अंताचे ज्ञान देण्यासाठी. ते दगड-मातीत कसे बरे येतील? एका डॉक्टरने असे सिद्ध केले होते की, प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे. परमात्मा म्हटले नाही. आणि मग असे म्हणतात की ते सर्वव्यापी आहेत. त्यांनी म्हटले सर्वांमध्ये आत्मा, तर संन्याशांनी म्हटले सर्वांमध्ये परमात्मा. किती दिवस-रात्री इतका फरक आहे. हे तर बेहदचे बाबा आहेत. सर्वांमधून बुद्धियोग तोडून आपल्यासोबत जोडतात. ते (संन्यासी) म्हणतात - आत्मा बुडबुडा सागरातून निघाला आहे, सागरामध्ये लीन होईल. ब्रह्मज्ञानी समजतात - छोटी ज्योत मोठ्या ज्योतीमध्ये लीन होईल, नंतर मग नवीन उत्पत्ती होते. बाबा समजावून सांगतात - ही भक्तीची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. मी देखील ड्रामाच्या नोंदीनुसार तुम्हा मुलांना येऊन हे ज्ञान समजावून सांगतो. ८४ जन्मांचे जे चक्र फिरतात, हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जे काही होते सर्व नोंदलेले आहे. कोणी गायन देखील करतात तर कोणी विघ्न सुद्धा आणतात.

तुम्हा मुलांना शिवबाबांकडून वारसा घ्यायचा आहे. ते येतातच सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी. देहाचे तर नाव सुद्धा घेत नाहीत. देहासहित थोडेच कोणाला पळवून न्यायला आलो आहे. मला तर म्हणतात - ‘हे लिबरेटर या, आम्हाला दुःखातून लिबरेट करून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चला, जिथे आराम, सुख-शांती मिळेल’. तर सर्वांना इथेच देह सोडायला लावून आत्म्यांना घेऊन जाईन. तर काळांचाही काळ झाले ना! मी सर्वांना एकत्र घेऊन जाणार आहे. किती वंडरफुल गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. कधी कोणती गोष्ट समजली नाही तर बोला की, ही गोष्ट बाबांनी अजून आम्हाला समजावून सांगितलेली नाही. जेव्हा सांगतील तेव्हा तुम्हाला ऐकवू. अशा प्रकारे स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. मुले समजतात बाबा ज्ञानाचा सागर आहेत. नवीन-नवीन गोष्टी ऐकवत राहतात. जगाचा इतिहास-भूगोल ऐकविणारे रचयिता बाबा आहेत, जे आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात. तुम्ही लाईट हाऊस देखील आहात तर स्वदर्शन चक्रधारी सुद्धा आहात. परंतु माया विसरायला लावते. कोंडीत सापडता. काही ना काही परिणाम होतोच. कर्मांचा हिशोब आहे ना. जोपर्यंत कर्मातीत अवस्था बनलेली नाही तर तोपर्यंत काही ना काही होत राहते. हिशोब चुकता झाला आणि शरीर सोडून देतील, युद्ध सुरू होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) विकारांचे दान देऊन परत घ्यायचे नाही. मुखाने शुभ गोष्टीच बोलायच्या आहेत, अतिशय गोड बनायचे आहे. बाबांसारखे प्रेमाचा सागर बनून राहायचे आहे.

२) सायलेन्समध्ये राहून दमडीचाही खर्च न करता विश्वाची बादशाही घ्यायची आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहून, थोडा-फार खर्च करून २१ जन्मांची कमाई करायची आहे.

वरदान:-
त्रिकालदर्शी स्थिती द्वारे मायेच्या हल्ल्यापासून सेफ राहणारे अतींद्रिय सुखाचे अधिकारी भव

संगमयुगाचे विशेष वरदान अथवा ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे - अतींद्रिय सुख. हा अनुभव इतर कोणत्याही युगामध्ये होत नाही. परंतु या सुखाच्या अनुभूतीसाठी त्रिकालदर्शी स्थिती द्वारे मायेच्या हल्ल्यापासून सेफ राहा. जर वारंवार मायेचा हल्ला होत राहीला तर इच्छा असूनही अतींद्रिय सुखाचा अनुभव करू शकणार नाही. जे अतींद्रिय सुखाचा अनुभव करतात त्यांना इंद्रियांचे सुख आकर्षित करू शकत नाही; नॉलेजफुल असल्यामुळे त्यांना अतींद्रिय सुखासमोर इंद्रियांचे सुख तुच्छ वाटू लागते.

बोधवाक्य:-
कर्म आणि मनसा दोन्ही सेवांचा बॅलन्स असावा, तेव्हाच शक्तिशाली वायुमंडळ बनवू शकाल.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

जसे आहोत, ज्यापण परिस्थिती समोर आहेत, त्याच परिस्थितींमध्ये राहून, याच शरीरामध्ये आपल्याला संपूर्ण बनायचे आहे, हे लक्ष्य ठेवा. तुमचे संगमयुगी संपूर्ण रूप शक्तींच्या रूपामध्ये आणि पांडवांच्या रूपामध्ये गायले गेले आहे. जेव्हा या स्वरूपामध्ये स्थित व्हाल तेव्हा कळून येईल की आपले भक्त कोणते आहेत आणि प्रजा कोणती आहे. जी प्रजा असेल ती अजून जवळ येईल आणि जे भक्त असतील ते शेवटी पायावर लोटांगण घालतील.