06-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, हे
ध्येय अत्यंत कठीण आहे, त्यामुळे आपला वेळ बरबाद न करता सतोप्रधान बनण्याचा
पुरुषार्थ करा”
प्रश्न:-
मुलांची चढती
कला न होण्याचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर:-
चालता-चालता
थोडा जरी अहंकार आला, स्वतःला हुशार समजले, मुरली मिस केली, ब्रह्माबाबांची अवज्ञा
केली तर कधीही चढती कला होऊ शकणार नाही. साकारच्या मनातून उतरला अर्थात निराकारच्या
मनातून सुद्धा उतरला.
गीत:-
लाख जमाने वाले…
ओम शांती।
मुलांनी गाणे
ऐकले. मुले म्हणतात - आम्हाला कोणीही संशय-बुद्धी बनविण्याकरिता काहीही केले तरीही
आम्ही संशय-बुद्धी बनणार नाही. भले कितीही उलट्या-सुलट्या गोष्टी ऐकवतील तरी देखील
आम्ही संशय-बुद्धी बनणार नाही. श्रीमतावर चालत राहणार. बाबा दररोज विविध पॉईंट्स
समजावून सांगत राहतात. सतयुगामध्ये ९ लाख होते. तर जरूर एवढ्या सगळ्या मनुष्यांचा
विनाश होईल. तर जो बुद्धिवान असेल तो इशाऱ्याने समजून जाईल की, खरोखर या लढाई
द्वारेच अनेक धर्म नष्ट होऊन एक देवी-देवता धर्माची स्थापना होणार आहे. जे लायक
बनतील तेच मनुष्यापासून देवता बनतील. बाबांशिवाय इतर कोणीही मनुष्यापासून देवता बनवू
शकत नाही. तर मुलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आता आपल्याला घरी जायचे आहे, परंतु
माया पुन्हा-पुन्हा विसरायला लावते. आता इथूनच बाबांची आठवण करून सतोप्रधान बनायचे
आहे. कोणत्याही क्षणी युद्ध पेटेल, काही नियम थोडाच आहे. म्हणतात देखील - कदाचित
महायुद्ध देखील होईल, जे थांबूसुद्धा शकणार नाही. सगळे जण एकमेकांशी युद्ध करू
लागतील. तर विनाश होण्यापूर्वी का नाही आपण आठवणीमध्ये राहून तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करावा. आठवणीच्या यात्रेमध्येच माया विघ्न आणते;
म्हणून बाबा दररोज सांगत असतात - चार्ट ठेवा. मुश्किलीने कोणी २-४ जण चार्ट लिहितात.
बाकीचे तर संपूर्ण दिवस आपल्या काम-धंद्यामध्येच अडकलेले आहेत. अनेक प्रकारच्या
अडचणींमध्ये अडकून पडतात. मुलांना हे तर माहीत आहे की आपल्याला सतोप्रधान जरूर
बनायचे आहे. तर कुठेही राहत असताना पुरुषार्थ करायचा आहे. मनुष्यांना समजावून
सांगण्याकरिता चित्रे इत्यादी देखील बनवत राहतात; कारण यावेळी मनुष्य १०० टक्के
तमोप्रधान आहेत. सुरुवातीला जेव्हा मुक्तिधाम मधून येतात तेव्हा सतोप्रधान असतात.
नंतर मग सतो, रजो, तमो मध्ये येता-येता यावेळी सर्व जण तमोप्रधान बनले आहेत.
सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे की, बाबांची आठवण केल्याने तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. विनाश देखील समोर उभा आहे. सतयुगामध्ये एकच धर्म
होता तर बाकी सर्व निर्वाणधाममध्ये होते. मुलांनी चित्रांवर लक्ष दिले पाहिजे. मोठी
चित्रे असतील तर व्यवस्थित समजू शकतील. सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे.
‘मनमनाभव’ हाच मुख्य शब्द आहे अथवा अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) एवढेच समजावून
सांगण्यासाठी किती मेहनत करावी लागते. समजावून सांगणारे देखील नंबरवार आहेत,
बेहदच्या बाबांवर प्रेम असले पाहिजे. बुद्धीमध्ये हे असले पाहिजे की, आम्ही बाबांची
सेवा करत आहोत. खुदाई-खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) बनायचे आहे. ते लोक भले शब्द
बोलतात परंतु अर्थ समजत नाहीत. आता बाबा आले आहेत मुलांची सेवा करण्याकरिता; आम्हाला
किती उत्कृष्ट देवी-देवता बनवतात. आज आपण किती गरीब बनलो आहोत. सतयुगामध्ये किती
सर्वगुण संपन्न बनतील, इथे मात्र एकमेकांमध्ये भांडण-तंटे करत राहतात. हे कोणालाच
ठाऊक नाही आहे की, विनाश होणार आहे. त्यांना वाटते की शांती होईल, अगदीच घोर
अंधारामध्ये आहेत. आता त्यांना समजावून सांगणारा कोणी पाहिजे. परदेशामध्ये देखील
तुम्ही हे नॉलेज देऊ शकता. सभेमध्ये बसून एक गोष्ट समजावून सांगा की, महाभारी लढाई
तर प्रसिद्ध आहे, यामुळे जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. आता गॉड फादर देखील इथे
आहेत. जरूर तेच ब्रह्मा द्वारा स्वर्गाची स्थापना करत आहेत. शंकराद्वारे कलियुगाचा
विनाश देखील होणार आहे, कारण आता आहे संगम. नैसर्गिक आपत्ती देखील येणार आहेत. तिसरे
महायुद्ध हे अखेरचे युद्ध म्हटले जाते. सरतेशेवटी विनाश देखील जरूर होणार आहे. आता
सर्वांना हे सांगावे लागेल की, बेहदच्या बाबांची आठवण करा म्हणजे मग मुक्तिधाममध्ये
निघून जाल. भले ते त्यांच्या धर्मामध्ये राहून देखील बाबांची आठवण केल्याने आपल्या
धर्मामध्ये चांगले पद मिळवू शकतात.
तुम्ही जाणता - बेहदचे
बाबा आम्हाला प्रजापिता ब्रह्माच्या तनाद्वारे नॉलेज देत आहेत तर मग इतरांना देखील
हे ज्ञान द्यावे लागेल. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आस-पास सर्वांना संदेश द्यायचा आहे.
इतर धर्मियांना देखील बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाहेरच्यांना, राजांना देखील हे
नॉलेज द्यायचे आहे. त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे. बाबा म्हणतात - त्रिमूर्ती,
गोळा आणि झाड ही मुख्य चित्रे जी आहेत ती कपड्यावर छापली तर बाहेर देखील घेऊन जाऊ
शकता. मोठ्या साईझमध्ये छापता येत नसेल तर दोन तुकड्यामध्ये करा. या त्रिमूर्ती,
झाड, गोळ्याच्या चित्रामध्ये संपूर्ण ज्ञान सामावलेले आहे. शिडीच्या चित्रातील
ज्ञान देखील या गोळ्याच्या चित्रामध्ये येते. शिडीच्या चित्रामध्ये ८४ जन्म कसे
घेतले जातात हे विस्ताराने दाखवले आहे. सृष्टी-चक्राच्या चित्रामध्ये सर्व
धर्मियांची माहिती येते. शिडीच्या चित्रामध्ये सतोप्रधान मग सतो, रजो, तमोमध्ये कसे
येतात, कसे खाली उतरतात हे दाखवले आहे. आता बाबा म्हणतात - मामेकम् आठवण करा.
बाबांचा संपूर्ण दिवस विचार चालत राहतो. तर कोणी नवीन मोठा बंगला बनवावा, त्यामध्ये
इतकी मोठी भिंत असावी जेणेकरून त्यावर ६९ फूट साईझचे चित्र बनवता येईल. कमीत-कमी १२
फुटाची भिंत पाहिजे. यावेळी भाषा देखील अनेक आहेत, सर्व धर्माच्या लोकांना हे ज्ञान
सांगावे लागेल, तर मग किती भाषांमध्ये ही चित्रे बनवावी लागतील. इतक्या
विशाल-बुद्धीने युक्ती रचली पाहिजे. सेवेची आवड असली पाहिजे. खर्च तर करायचाच आहे.
बाकी तुम्हाला भीक मागण्याची गरज नाही. आपणच हुंडी भरेल. ड्रामामध्ये तशी नोंद आहे.
मुलांची बुद्धी चालली पाहिजे. परंतु मुले थोडेसे काही करतात आणि त्यांना अभिमान येतो
की आम्ही खूप हुशार आहोत. बाबा म्हणतात - रुपयातून चार आणे सुद्धा शिकले नाही आहात.
कोणी दोन आणे, कोणी एक आणा, कोणी एका पैशा एवढे सुद्धा फार मुश्किलीने शिकले आहेत.
काहीच समजत नाहीत. मुरली वाचण्याची देखील आवड नाहीये. श्रीमंत प्रजा, गरीब प्रजा
सर्व काही इथेच बनणार आहे. कोणी तर बाबांशी अन्जाम करून (प्रतिज्ञा करून) मग पुन्हा
तोंड काळे करतात. म्हणतात - बाबा, आम्ही हार खाल्ली. बाबा म्हणतात - तुम्ही तर
प्याद्यांपेक्षाही प्यादे आहात, वर्थ नॉट ए पेनी. असे काय पद प्राप्त करतील! आता
सूर्यवंशी राजधानी स्थापन होत आहे. ज्यांना बाबांची आठवण राहते, तेच आनंदामध्ये
राहतात. फक्त एवढे जरी लक्षात राहिले की, बाबांकडून आपण कोणता वारसा घेत आहोत, तरी
देखील खूप फायदा आहे. धारण करून मग आप समान बनवायचे आहे. मुलांकडून एवढी सेवा होत
नाही. थोडीशी सेवा केली तर समजतात की, आपण पास झालो. देह-अभिमानामध्ये येऊन कोसळतात
(अधोगती होते). जर ब्रह्मा बाबांचा अपमान कराल तर शिवबाबा म्हणतात जणू तुम्ही माझा
अपमान केला. बापदादा दोघे एकत्रित आहेत ना. असे नाही की, ‘आमचे तर शिवबाबांशीच
कनेक्शन आहे’, अरे! वारसा तर यांच्या द्वारेच मिळेल ना. मनातील समाचार यांना (ब्रह्मा
बाबांना) ऐकवायचा आहे. सल्ला घ्यायचा आहे. शिवबाबा म्हणतात - मी साकार द्वारे सल्ला
देणार. ब्रह्माशिवाय शिवबाबांकडून वारसा कसा घ्याल. बाबांशिवाय काहीच काम होऊ शकत
नाही, म्हणून मुलांनी खूप-खूप काळजी घ्यायची आहे. उलट्या अहंकारामध्ये येऊन आपली
बरबादी करतात. साकारच्या मनातून उतरतात तर निराकारच्या मनातून सुद्धा उतरतात. असे
बरेच आहेत - जे कधी मुरली सुद्धा ऐकत नाहीत, पत्र देखील लिहीत नाहीत तर बाबांनी काय
समजायचे! ध्येय खूप कठीण आहे. मुलांनी आपला वेळ बरबाद करता कामा नये. जे स्वतःला
महारथी समजतात त्यांनी मोठ्या कार्यामध्ये मदत केली पाहिजे. तर बाबा खुश होऊन आफरीन
(शाब्बासकी) देतील, यांच्याद्वारे अनेकांचे कल्याण होईल. प्रदर्शनीमध्ये तर पुष्कळ
लोक येतात. प्रजा तर बनते, बाबांची सेवाभावी मुलांवर नजर असते. सूर्यवंशी राजा-राणी
बनणारेच या इंद्रसभेमध्ये आले पाहिजेत. जे सेवा करत नाहीत ते लायक बनत नाहीत. पुढे
जाऊन सर्व काही माहीत होईल - कोण-कोण काय बनेल! मुलांना खूप नशा असला पाहिजे की,
आपण उद्या स्वर्गामध्ये जाऊन राजकुमार बनणार. इथे तुम्ही आला आहात राजयोग
शिकण्याकरिता. चांगल्या रीतीने शिकला नाहीत तर कमी दर्जाचे पद मिळेल. बाबांकडे
सर्विस समाचार आला पाहिजे. बाबा, आज मी ही सेवा केली. कधी पत्रच लिहीत नाहीत तर
बाबांनी काय समजावे? मेला. बाबांना देखील तीच मुले लक्षात राहतात जी सेवेमध्ये
असतात. बाबांचा परिचय देत राहतात. शिवबाबा ब्रह्मा द्वारे ब्रह्माकुमार-कुमारींना
वारसा देत आहेत. शिवबाबा ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांची रचना रचतात. आता बाकीचे सर्व
धर्म अस्तित्वात आहेत, परंतु देवी-देवता धर्म जो फाउंडेशन आहे, तोच गायब झाला आहे.
हा सारा खेळ बनलेला आहे. शिडीच्या चित्रामध्ये सगळेच धर्म नाही आहेत. त्यामुळे
गोळ्याच्या चित्रावर समजावून सांगावे लागेल, गोळ्यामध्ये स्पष्ट आहे. हे देखील
समजावून सांगायचे आहे की सतयुगामध्ये देवी-देवता डबल मुकुटधारी होते. यावेळी
पवित्रतेचा मुकुट कोणालाच नाही आहे. असा एकही नाही ज्याला आपण लाईटचा ताज देऊ शकतो.
स्वतःला देखील देऊ शकत नाही. आम्ही लाईट साठीच (पवित्रते साठीच) पुरुषार्थ करत आहोत.
शरीर काही इथे पवित्र नाही आहे. आत्मा योगबलाद्वारे पवित्र बनता-बनता शेवटी पवित्र
होईल. ताज तर सतयुगामध्ये मिळेल. सतयुगामध्ये डबल ताज, भक्तिमार्गामध्ये सिंगल ताज.
इथे कोणताही ताज नाहीये. आता तुम्हाला फक्त पवित्रतेचा ताज कुठे दाखवावा? लाईट कुठे
ठेवावी? ज्ञानी तर बनला आहात परंतु जेव्हा कम्प्लीट पवित्र बनता तेव्हा लाईट असायला
हवी. तर सूक्ष्मवतनमध्ये लाईट दाखवावी का? जशा मम्मा सूक्ष्मवतनमध्ये पवित्र फरिश्ता
आहेत ना. तिथे सिंगल मुकुट आहे. परंतु आता लाईट कशी दाखवावी? पवित्र बनतात अंतामध्ये.
जेव्हा योगमध्ये बसता तेव्हा तिथे लाईट दाखवावी का? आज लाईट द्या आणि उद्या पतित
बनला तर लाईटच गायब होते; म्हणून अंतामध्ये जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा
लाईट असू शकते. परंतु तुम्ही संपूर्ण बनताच सूक्ष्मवतनमध्ये निघून जाल. जसे बुद्ध,
क्राईस्टला दाखवतात. सर्वप्रथम पवित्र आत्मा धर्म स्थापन करण्याकरिता येते, त्यांना
लाईट देऊ शकता, मुकुट देऊ शकत नाही. तुम्ही देखील बाबांची आठवण करता-करता पवित्र
बनाल. स्वदर्शन चक्र फिरवता-फिरवता तुम्ही राजाई पद प्राप्त कराल. तिथे वजीर नसतात.
इथे अनेकांकडून सल्ला घ्यावा लागतो. तिथे सर्व सतोप्रधान आहेत. या सर्व समजून
घेण्याच्या गोष्टी आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
बापदादांकडून आफरीन (शाब्बासकी) मिळवण्यासाठी बाबांच्या श्रेष्ठ कार्यामध्ये
पूर्णपणे मदतगार बनायचे आहे. बाबांना आपल्या सेवेचा समाचार द्यायचा आहे.
२) देह-अभिमानामध्ये
येऊन कधीही अपमान करायचा नाही. उलट्या अभिमानामध्ये यायचे नाही. आपला वेळ बरबाद
करायचा नाही. सेवेच्या युक्त्या रचायच्या आहेत, सेवाभावी बनायचे आहे.
वरदान:-
नेहमी दयाळू
आणि कल्याणाच्या दृष्टीने विश्वाची सेवा करणारे विश्व परिवर्तक भव
विश्व परिवर्तक अथवा
विश्व सेवाधारी आत्म्यांचे मुख्य लक्षण आहे - आपल्या दयाळू आणि कल्याणाच्या
दृष्टीद्वारे विश्वाला संपन्न आणि सुखी बनविणे. जी अप्राप्त वस्तू आहे, ईश्वरी सुख,
शांती आणि ज्ञानाच्या धना द्वारे, सर्व शक्तींच्या द्वारे सर्व आत्म्यांना
भिकारीपासून अधिकारी बनविणे. असे सेवाधारी आपला प्रत्येक सेकंद, बोल, कर्म, संबंध
आणि संपर्क सेवेमध्येच लावतात. त्यांच्या पाहण्यामध्ये, चालण्यामध्ये, खाण्यामध्ये
सर्वांमध्ये सेवा सामावलेली असते.
बोधवाक्य:-
मान, शान यांचा
त्याग करून आपल्या वेळेला बेहदच्या सेवेमध्ये सफल करणे म्हणजेच परोपकारी बनणे आहे.
हे अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
अंतिम संपूर्ण
स्थितीला प्राप्त करण्याकरिता स्वतःला पाहुणे समजून चाला. जे स्वतःला पाहुणे समजतात
ते व्यक्त मध्ये असताना देखील अव्यक्त स्थिती मध्ये राहतात, त्यांचा कोणाशीही लगाव
नसतो (कोणाबद्दलही आकर्षण नसते). मी या शरीरामध्ये, या जुन्या दुनियेमध्ये पाहुणा
आहे, फक्त थोड्या वेळासाठी हे शरीर कार्यामध्ये वापरायचे आहे.