07-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो,
संग-दोष खूप नुकसान करतो, त्यामुळे संग-दोषापासून स्वतःला वाचवण्यासाठी विशेष काळजी
घ्या, हा संग-दोष अतिशय हानिकारक आहे”
प्रश्न:-
बालपणाचे तीन
प्रकार कोणते आहेत? कोणत्या प्रकारच्या बालपणाला कधीही विसरु नये?
उत्तर:-
एक बालपण -
लौकिक आई-वडिलांकडे जन्म घेताच मिळाले. दुसरे बालपण - गुरूचा शिष्य बनल्यावर झाले
आणि तिसरे बालपण लौकिक आई-वडिलांना सोडून अलौकिक आई-वडिलांचे बनलात. अलौकिक बालपण
अर्थात ईश्वराची दत्तक मुले. ईश्वराची दत्तक मुले बनलात अर्थात मरजीवा बनलात. या
अलौकिक बालपणाला कधीही विसरू नका. जर विसरलात तर खूप रडावे लागेल. रडणे अर्थात
मायेचा फटका बसणे.
गीत:-
बचपन के दिन
भुला न देना...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी
मुलांनी गाण्याचा अर्थ समजून घेतला. ३ प्रकारचे बालपण आहे. एक आहे - लौकिक बालपण,
दुसरे आहे - निवृत्ती मार्गाचे बालपण, ते देखील घरदार सोडून जिवंतपणी मरून गुरूचे
अथवा संन्याशांचे बनतात.
तो काही त्यांचा पिता
नाहीये. ते गुरूचे बनतात, गुरूंच्या सोबत राहतात. ते देखील जिवंतपणी मरून जाऊन
गुरूचे बनतात, जंगलात निघून जातात. तिसरा आहे हा तुमचा वंडरफुल मरजीवा जन्म. एका
आई-वडिलांना सोडून तुम्ही दुसऱ्या आई-वडिलांचे बनता. हे आहेत रुहानी मात-पिता. हा
तुमचा मरजीवा जन्म आहे. ईश्वरीय कुशीमध्ये रूहानी जन्म. तुमच्याशी आत्ता रूहानी बाबा
बोलत आहेत. ते सर्व आहेत देहधारी पिता. हे आहेत रूहानी पिता; म्हणूनच गातात -
‘बाबांचे बनून, मरजीवा बनल्यावर मग हे विसरून जाऊ नका’. शिवबाबा आहेत सर्वश्रेष्ठ
भगवान. जेव्हा कोणी गीता इत्यादीवर वादविवाद करतात तेव्हा सर्वात पहिली ही गोष्ट
विचारायची आहे की, ‘…तर मग सर्वश्रेष्ठ भगवान कोण आहेत?’ ब्रह्मा देवताय नमः, विष्णू
देवताय नमः म्हणतात, आणि मग म्हणतात शिव परमात्माय नमः... ते सर्व धर्मियांचे पिता
आहेत. सर्वात पहिली हीच गोष्ट समजावून सांगायची आहे - ते आहेत एकमेव सर्वश्रेष्ठ
बाबा. ब्रह्मा, विष्णूला कोणी गॉडफादर म्हणणार नाहीत. पहिले तर हे पक्के करा की
गॉडफादर एक आहेत, ते निराकार आहेत, ज्यांना क्रिएटर (रचयिता) देखील म्हणतात.
पतित-पावन सुद्धा म्हणतात. बाबांकडून तर जरूर वारसा मिळेल. हा विचार करा, बेहदच्या
बाबांकडून कोणाला वारसा मिळाला. बाबा आहेत नवीन दुनिया रचणारे. त्यांचे नाव ‘शिव’
आहे. ‘शिव परमात्माय नमः’ असे म्हणतात, त्यांची जयंती देखील साजरी करतात. तेच
पतित-पावन, रचयिता, नॉलेजफुल आहेत, मग सर्वव्यापीची गोष्ट संपून जाते. त्यांची महिमा
कर्तव्यांनुसार आहे. भूतकाळात जे श्रेष्ठ कर्तव्ये करून जातात त्यांची महिमा गायली
जाते. सर्वश्रेष्ठ आहेत बाबा. त्यांना लिबरेटर देखील म्हणतात, दयाळू, दुःख हर्ता,
सुख कर्ता सुद्धा म्हणतात, गाईड देखील म्हणतात. जेव्हा कोणी नवीन ठिकाणी जातात तर
तेव्हा गाईडला सोबत घेऊन जातात. परदेशातून आलेल्यांना सर्व काही दाखवण्यासाठी इथला
गाईड देतात. तीर्थ यात्रेला घेऊन जाणारे पंडे असतात. आता बाबांना ‘गाईड’ म्हणतात तर
जरूर गाईड केले असेल. सर्वव्यापी म्हटल्यामुळे सारी गोष्टच संपुष्टात येते.
सर्वप्रथम हे समजावून सांगा की, सर्वांचे पिता एक आहेत. सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता
आहे, ती भगवंताने गायलेली आहे. एवढे त्यांना सिद्ध करून सांगितले तर त्यांची
मुलेबाळे (बाकी छोट्या-छोट्या गोष्टी) सर्व खोटे सिद्ध होतील. सर्वात पहिले गीतेचे
सार ऐकवायला पाहिजे. शिव भगवानुवाच. आता शिवबाबांचे चरित्र काय असेल? ते तर फक्त
म्हणतात, मी या शरीराचा आधार घेऊन तुम्हाला पतितापासून पावन बनण्याचा मार्ग सांगतो.
मुलांना राजयोग शिकविण्यासाठी येतो, यात चरित्र (लीला त्या) काय करणार? हे तर वृद्ध
आहेत. फक्त येऊन मुलांना शिकवतात. पतितांना पावन बनविण्यासाठी राजयोग शिकवतात.
तुम्ही सतयुगामध्ये जाऊन राज्य कराल. तुम्हाला वारसा मिळतो, बाकी सर्व आत्मे
मुक्तिधाम, निराकारी दुनियेमध्ये असतील. ही खूप सोपी गोष्ट आहे. भारतामध्ये
देवी-देवतांचे राज्य होते. एकच धर्म होता. आता कलियुगामध्ये किती असंख्य मनुष्य
आहेत, तिथे फार थोडे असतात. परमपिता परमात्मा एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा
विनाश घडवण्यासाठी येतात. बाकी सर्व शांतीधाम मध्ये निघून जातील. तिथे कोणी अपवित्र
आत्मा काही राहू शकत नाही. त्यांचे नावच आहे - पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता. ही
जुनी दुनिया, आयर्न एज्ड आहे. सतयुगाला म्हटले जाते गोल्डन एज्ड. जे देवतांचे पुजारी
आहेत, ते लगेचच सर्व काही समजतील. जे पूज्य आहेत तेच पुजारी बनतात. तर पहिला बाबांचा
परिचय द्यायचा आहे. आपण त्यांची मुले आहोत हे विसरू नका. विसरलात तर रडावे लागेल.
मायेचा काही ना काही फटका बसेल. देही-अभिमानी बनायचे आहे. आम्हा आत्म्यांना परत
बाबांकडे जायचे आहे. इतके असंख्य मनुष्य मरतील, मग कोण कोणासाठी रडेल? भारतामध्ये
सर्वात जास्त रडतात. आधी बारा महिने ‘अरे देवा, हे देवा…’ करतात. छाती बडवत राहतात.
हा मृत्यूलोकचा रिती-रिवाज आहे, तुम्हाला आता सर्व अमरलोकामधले रिती-रिवाज शिकवत आहे.
तुमचे आता साऱ्या जुन्या दुनियेपासून वैराग्य आहे.
बाबा म्हणतात -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हे सर्व नष्ट होणार आहे. आता आपण परत जात आहोत, नाटक
पूर्ण होत आहे. नाटकामध्ये सर्व ॲक्टर्स आहेत, मग मोह कोणामध्ये ठेवणार. समजतात की
यांना जाऊन दुसरा पार्ट बजावायचा आहे. रडण्याची काय गरज आहे? प्रत्येकाचा पार्ट
नोंदलेला आहे. जसे बाबा ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत तर बाबांना
फॉलो करून तसे बनायचे आहे. सागरामधून नद्यांचा उगम होतो. सर्व नंबरवार आहेत. कोणी
चांगली वर्षा करतात, अनेकांना आपसमान बनवतात. आंधळ्यांची काठी बनतात. बाबांना तर
भरपूर मदतनीस हवे आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही आंधळ्यांची काठी बना. सर्वांना मार्ग
दाखवा. फक्त एकाच ब्राह्मणीला थोडेच आंधळ्यांची काठी बनायचे आहे? तुम्हा सर्वांना
बनायचे आहे. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. याला म्हटले जाते तिसरा
नेत्र मिळण्याची कथा. आत्म्यासाठी दिव्य नेत्र आहे. मनुष्य तर काहीही समजत नाहीत.
एकदम तुच्छ-बुद्धि बनले आहेत. भारतवासी हे जाणत नाहीत की आपला धर्म कोणी स्थापन केला.
बाबांचा जन्म देखील इथेच होतो. शिवजयंती देखील साजरी करतात. मग सर्वव्यापी कसे असू
शकतील? पित्याला आणि रचनेला दुनियेमध्ये कोणीही जाणत नाहीत. ऋषि-मुनी सर्व नेती-नेती
(आम्ही जाणत नाही) म्हणत गेले. एकच घोड चूक केली आहे की, परमात्म्याला सर्वव्यापी
म्हटले आहे. तुम्ही सिद्ध करून सांगा की, ते सर्वांचे पिता आहेत, पतित-पावन,
लिबरेटर आहेत. जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये घेऊन जातात. तिथे दुःखाची काही
गोष्टच नसते. शास्त्रांमध्ये तर काय-काय लिहिले आहे. लक्ष्मी-नारायणासाठी देखील
म्हणतात - तिथे त्यांना विकाराशिवाय मुल होईल का? अरे, म्हटलेच जाते -
सर्वगुणसंपन्न, १६ कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी
दुनिया). याला म्हटले जाते - विशश वर्ल्ड (विकारी दुनिया), मग असे कसे म्हणता की,
तिथे सुद्धा विकार असेल? पहिले तर जोपर्यंत बाबांना जाणत नाहीत तोपर्यंत काहीही समजू
शकणार नाहीत. सर्वव्यापीची फार मोठी चूक आहे. जेव्हा त्या भ्रमातून बाहेर पडतील
तेव्हा बाबांना जाणू शकतील. निश्चय करा की, बाबा तुमच्याकडून राज्य-भाग्य घेण्यासाठी
आम्ही पुन्हा एकदा तुमचे बनलो आहोत. शास्त्रांमध्ये तर काय-काय लिहिले आहे.
लक्ष्मी-नारायणाला सतयुगामध्ये दाखवतात आणि बालपणीच्या राधे-कृष्णाला मग द्वापरमध्ये
घेऊन गेले आहेत. आता श्रीकृष्ण तर स्वर्गातला राजकुमार होता. मग श्रीकृष्णाची
प्रत्येक जन्मामध्ये फीचर्स (गुण-वैशिष्ठ्ये) बदलत जातात. सगळ्याच जन्मामध्ये
एकसारखी फीचर्स तर कधी असू शकत नाहीत. असे थोडेच होईल की, श्रीकृष्ण पुन्हा त्याच
फीचर्समध्ये द्वापरमध्ये येऊ शकेल, अशक्य आहे.
तुम्ही जाणता आपण खरे
तर तिथले (मूलवतनचे) रहिवासी आहोत. ते आमचे स्वीट सायलेन्स होम आहे, ज्याच्यासाठी
भक्ती करतात. म्हणतात - आम्हाला शांती पाहिजे. आत्म्याला पार्ट बजावण्यासाठी
कर्मेंद्रिये मिळाली आहेत, मग शांतीमध्ये कसे रहाणार? शांतीसाठीच हठयोग शिकतात,
गुहेमध्ये जातात. एक महिना कोणी गुहेमध्ये जाऊन बसला तर त्याच्यासाठी ते शांतीधाम
आहे की काय? तुम्ही जाणता आता आम्ही शांतीधाममध्ये जाऊन मग पार्ट बजावण्यासाठी
सुखधाम मध्ये येणार आहोत. ते लोक (दुनियावाले) म्हणतात जे सुखी आहेत त्यांच्यासाठी
स्वर्ग आहे, जे दुःखी आहेत त्यांच्यासाठी नरक आहे. तुम्ही जाणता - स्वर्ग नव्या
दुनियेला आणि नरक जुन्या दुनियेला म्हटले जाते. भगवानुवाच - ही भक्ती, यज्ञ-तप,
दान-पुण्य इत्यादी करणे - हा सर्व आहे भक्तिमार्ग, याच्यामध्ये काहीही सार नाही (अर्थ
नाही). सतयुग-त्रेताला ब्रह्माचा दिवस म्हटले जाते. ब्रह्माचा दिवस सो तुम्हा
ब्राह्मणांचा दिवस, मग तुमची रात्र सुरू होते. तुम्ही सर्वप्रथम सतयुगामध्ये जाता,
मग तुम्हीच फेऱ्यामध्ये येता. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तुम्हीच बनता.
तुम्ही म्हणता - ‘शिव भगवानुवाच’ आणि ते म्हणतात - ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’. खूपच मोठा
फरक आहे. ते तर (श्रीकृष्ण तर) पूर्ण ८४ जन्म घेतात. त्यांच्यासोबत पूर्ण सूर्यवंशी
संप्रदाय पुनर्जन्म घेत-घेत आता शेवटी पुन्हा राज्य-भाग्य घेत आहेत. तुम्ही मुले,
ज्यांना हे समजते त्यांनाच मजा येते. नवीन असणाऱ्यांना मजा येणार नाही. तुम्ही
कोणाची निंदा करत नाही. बाबा तुम्हाला किती सोपे करून समजावून सांगतात. इथे तुम्ही
बाबांच्या संगतीत बसला आहात त्यामुळे तुम्हाला चांगले समजते. बाहेर गेल्यावर
संगतीमुळे माहीत नाही काय हालत होईल. संगदोष खूप खराब आहे. स्वर्गामध्ये अशा गोष्टी
नसतात. त्याचे नावच आहे स्वर्ग, वैकुंठ, सुखधाम. शास्त्रांमध्ये तर लिहिले आहे की
तिथे देखील असूर होते. आता तुम्हाला माहीत झाले आहे की, आम्ही विश्वाचे मालक होतो.
तिथे जमीन आकाश कशातही पार्टिशन (विभाजन) नसते. आता तर किती पार्टिशन्स आहेत.
आपल्या-आपल्या सीमा आखत असतात. दुनियेमध्ये किती भांडणे होतात. तर जेव्हा कोणीही
येतील तेव्हा सर्वात पहिले त्यांना हे समजावून सांगा की, बाबा कोण आहेत, भगवान
कोणाला म्हटले जाते? ब्रह्मा, विष्णू, शंकर देवता आहेत. भगवान एक असतो, दहा नसतात.
श्रीकृष्ण भगवान होऊ शकत नाही. भगवान हिंसा कशी शिकवतील? भगवानुवाच - काम महाशत्रू
आहे, त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी प्रतिज्ञा करा. राखी बांधा. ही आत्ताची
गोष्ट आहे. जे काही भूतकाळामध्ये होऊन गेले आहे ते मग भक्तिमार्गामध्ये होईल.
दिवाळीला महालक्ष्मीची पूजा करतात. हे थोडेच कोणाला माहीत आहे की लक्ष्मी-नारायण
दोन्ही एकत्र आहेत. लक्ष्मीला, धन कुठून मिळेल? कमाई करणारा तर पुरुष असतो ना! नाव
लक्ष्मीचे गायले गेले आहे. आधी लक्ष्मी नंतर नारायण. ते मग महालक्ष्मीला वेगळे
समजतात. त्यांना ४ भुजा दाखवतात. दोन स्त्रीच्या, दोन पुरुषाच्या भुजा. परंतु ते या
गोष्टींना जाणत नाहीत. तुम्ही आता डिटेलमध्ये जाणता.
तर गाणे ऐकले - ‘बचपन
के दिन भुला ना देना…’ आत्मा म्हणते - बाबा, आम्हाला आता स्मृती आली आहे. पहाटे
लवकर उठून बाबांशी गोष्टी केल्या पाहिजेत. अमृतवेलेला बाबांची आठवण करणे चांगले आहे
ना. संध्याकाळच्या वेळी एकांतामध्ये जाऊन बसा. भले आपसात पती-पत्नी एकत्र आहात तरी
देखील या गोष्टी करत राहा. शिवबाबा ब्रह्माच्या देहातून काय म्हणतात. आपण जेव्हा
पूज्य बनलो होतो तेव्हा बाबांची आठवण करत नव्हतो. जेव्हा पुजारी बनतो तेव्हा बाबांची
आठवण करतो. अशा प्रकारे गोष्टी केल्या पाहिजेत, कोणी ऐकेल तर आश्चर्यचकित होतील.
अर्धेकल्प आम्ही काम-चितेवर बसून जळून खाक झालो होतो, कब्रदाखल झालो होतो. आता
आम्हाला ज्ञान-चितेवर बसायचे आहे, स्वर्गामध्ये जायचे आहे. ही जुनी दुनिया आहे.
भारतवासी समजतात की, हा स्वर्ग आहे. अरे, स्वर्ग तर सतयुगामध्ये असतो. स्वर्गामध्ये
देवी-देवतांचे राज्य होते. इथे तर मायेचा भपका आहे. आता बाबा म्हणतात - संगदोषामध्ये
येऊन कुठे मरून जाऊ नका, नाहीतर खूप पश्चाताप होईल. परीक्षेचा निकाल जेव्हा लागतो
तेव्हा सर्वांना माहीत होते. पूर्वी मुली ध्यानामध्ये जाऊन सर्व काही सांगत होत्या
की, ‘ही राणी बनेल, ही दासी’. नंतर मग बाबांनी ते बंद करायला लावले. शेवटी सर्व काही
माहीत होईल की, आपण बाबांची किती सेवा केली! किती जणांना आपसमान बनवले! ते सर्व
आठवेल, साक्षात्कार होईल, साक्षात्काराशिवाय धर्मराज देखील शिक्षा देऊ शकत नाही.
मुलांना पुन्हा-पुन्हा समजावून सांगितले आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबा
येऊन गोड-गोड झाडाचे कलम लावतात. ते गव्हर्मेंट वाले स्थूल झाडांची कलमे लावतात,
उत्सव साजरा करतात. इथे नवीन दुनियेचे कलम लागत आहे. तर अशा बाबांना विसरू नका.
बाबांच्या सेवेमध्ये लागा, नाही तर शेवटी खूप पश्चाताप करावा लागेल. आत्ता जर वारसा
घेतला नाहीत तर मग कल्प-कल्पांतराचा हिशोब बनेल, त्यामुळे पूर्ण पुरुषार्थ करायचा
आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जसे बाबा
ज्ञानाचा, आनंदाचा, प्रेमाचा सागर आहेत; तसे पित्यासमान बनायचे आहे आणि इतरांनाही
आपसमान बनविण्याची सेवा करायची आहे. सर्वांना ज्ञानाचा तिसरा नेत्र द्यायचा आहे.
२) अशी कोणाचीही संगत
करायची नाही ज्यामुळे पश्चाताप करावा लागेल. संगदोष फार खराब आहे, त्यामुळे स्वतःला
सांभाळायचे आहे. बाबांकडून वारसा घेण्याचा पुरेपूर पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
संतुष्टतेच्या
विशेषतेद्वारा अथवा श्रेष्ठतेद्वारा सर्वांचे इष्ट बनणारे वरदानी मूर्त भव
जे सदैव स्वतःच्या
बाबतीत आणि सर्वांच्या बाबतीत संतुष्ट राहतात, तेच अनेक आत्म्यांचे ‘इष्ट’ आणि
‘अष्ट देवता’ बनू शकतात. सर्वात मोठ्यात मोठा गुण म्हणा, दान म्हणा, विशेषता म्हणा
किंवा श्रेष्ठता म्हणा - ती तर संतुष्टताच आहे. संतुष्ट आत्माच प्रभू-प्रिय,
लोक-प्रिय आणि स्वयं-प्रिय असते. अशी संतुष्ट आत्माच वरदानी रूपामध्ये प्रसिद्ध
होईल. आता शेवटच्या समयी महादानी पेक्षाही जास्त वरदानी रूपा द्वारे सेवा होईल.
बोधवाक्य:-
विजयी रत्न ते
आहेत ज्यांच्या मस्तकावर सदैव विजयाचा तिलक चमकत असेल.
हे अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
पांडवांचे गायन आहे
की, ते वितळून नष्ट झाले. खरे तर ते पर्वतांवर नाही परंतु उच्च स्थितीमध्ये विरघळून
गेले; त्यांनी स्वतःला खालच्या पातळीवरून एकदम वरती जी अव्यक्त स्थिती आहे, त्या
स्थितीमध्ये स्थित केले अर्थात त्या अव्यक्त स्थिती मध्ये संपूर्णतेला प्राप्त झाले.
हे तुम्हा पांडवांचेच यादगार आहे.