08-11-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.10.2071  ओम शान्ति   मधुबन


विशेष दीपावली निमित्त अव्यक्त बापदादांची मधुर महावाक्ये


आज बापदादा काय बघत आहेत? तुम्हां दीपकांची माळा बघण्यासाठी आले आहेत. जो दीपमाळेचा यादगार दिवस लोक साजरा करतात परंतु बापदादा चैतन्य दीपकांच्या माळेला बघत आहेत.

तुम्ही देखील सर्वजण जेव्हा दीपमाळेच्या दिवशी प्रज्वलित झालेले दीपक बघता तेव्हा बघत असताना असा आनंद होतो का की, आमचेच यादगार साजरे करत आहेत? जसा तेवत असलेला दीपक सुंदर वाटतो, तसेच स्वतःच्या यादगारला पाहून स्मृती आल्याने तुम्ही देखील सर्वजण विश्वाच्या पित्याला आणि संपूर्ण विश्वातील आत्म्यांना सुंदर वाटता. तर आज यादगार असलेल्या रूपाला प्रत्यक्ष रूपामध्ये पाहण्यासाठी बाबा आले आहेत. माळेमध्ये केवळ एक मणी नसतो, अनेक मण्यांची मिळून माळा बनते. जर वेगळा एकच दीपक तेवत असेल तर त्याला काही दीपकांची माळा म्हटले जाणार नाही. तर असेच अनेक दीपक प्रज्वलित झालेले, माळेच्या रूपामध्ये दिसून येतात. तर प्रत्येकजण स्वतःला या दीपमाळेमध्ये गुंफलेला, प्रज्वलित झालेला दीपक समजता ना? की तुम्ही लोक देखील अनेक प्रज्वलित दीपकांची माळा पाहून हर्षित होता? आज दीपमाळेच्या दिवशी तुम्ही सर्वांनी दीपावली साजरी केली का? आज विशेष रूपाने दीपावली साजरी केली? तसे तर तुम्ही सदैव प्रज्वलित झालेले दीपक आहात, परंतु जेव्हा विशेष यादगाराचा दिवस असतो तेव्हा विशेष आत्म्यांनी काय करायला हवे? विशेष आत्मे, जे विशेष रूपाने निमित्त बनतात, त्यांना विशेष कोणती सेवा करायची आहे? विशेष आत्म्यांना तर इतरांपेक्षा विशेष कार्य करायचे आहे ना. कारण, जे इतर आत्मे देखील करू शकतात आणि करत आहेत, तेच तुम्ही विशेष आत्म्यांनी केले तर मग फरक तो काय राहिला? विशेष आत्म्यांना विशेष कार्य करायचे आहे. बापदादा अशा विशेष दिवसांमध्ये विशेष रूपाने मुलांची आणि भक्तांची तिन्ही रूपाने सेवा करतात. विशेष आत्म्यांना खास आपल्या यादगाराच्या दिवशी साक्षात्कार-मूर्त बनून, साक्षात बापदादा समान आत्म्यांच्या प्रति आपल्या कल्याणाच्या भावनेने, आपल्या रुहानी स्नेहाच्या स्वरूपाने, आपल्या सूक्ष्म शक्तींद्वारे इतर आत्म्यांमध्ये शक्ती भरली पाहिजे. जसे अव्यक्त रूपामध्ये बापदादा चोहो बाजूला मुलांची सेवा करतात. ते समजतात की, बापदादांनी माझी भेट घेतली, माझ्या आठवणीला प्रतिसाद दिला अथवा माझ्या आठवणीचे प्रत्यक्ष फळ मी अनुभव केले; अथवा भक्त देखील अनुभव करतात की, आमच्या प्रेमाचे अथवा भावनेचे फळ भगवंताने पूर्ण केले, हा अनुभव प्रॅक्टिकल रूपामध्ये होत असतो.

अशा विशेष आत्म्यांनी आपल्या अव्यक्त स्थितीमध्ये, आपल्या रुहानी लाईट आणि माईटच्या स्थितीद्वारे लाईट हाऊस आणि माईट हाऊस बनून एकाच स्थानावर राहत असून देखील चोहो बाजूला अलौकिक रुहानी सेवेच्या भावनेने आणि वृत्तीने सेवा केली पाहिजे यालाच म्हटले जाते बेदहची सेवा. असा अनुभव अथवा जाणीव झाली पाहिजे की माझी प्रजा अथवा भक्त आज विशेष रूपाने यादगाराच्या दिवशी मज विशेष आत्म्याची आठवण करत आहेत. अल्पकाळाची रिद्धी-सिद्धी असणारे एकाच स्थानावर राहून आपल्या भक्तांना आपल्या रूपाचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडवू शकतात, तर काय विशेष आत्मे आपल्या लाईट आणि माईट द्वारे भक्तांना अथवा प्रजेला आपल्या सेवेद्वारे अनुभव करून देऊ शकत नाहीत काय? तर जेव्हा असे विशेष यादगाराचे दिवस येतात तेव्हा विशेष आत्म्यांनी असा विशेष सेवेचा अनुभव केला पाहिजे. अशी सेवा कधी केली आहे? अच्छा, ही झाली सेवा. आणि दीपावलीच्या दिवशी स्वतः प्रति विशेष अटेंशन राहिले? आजच्या दिवशी आपल्या आत्म्याच्या संस्कारांमध्ये कायमसाठी परिवर्तन करण्यावर विशेष अटेंशन दिले? जेव्हा यादगाराच्या रूपामध्ये आजच्या दिवशी जुनी खाती संपवण्याच्या रिवाजाच्या रूपामध्ये चालत आले आहे, ते तुम्ही आत्म्यांनी प्रॅक्टिकल रूपामध्ये अवश्य केले आहे, तेव्हाच तर यादगार चालत आले आहे. तर आजच्या दिवशी आपल्या जुन्या संस्कारांचे जे काही थोडेफार शिल्लक राहिलेले खाते आहे, ते संपवले आहे का? खाते संपवण्यापूर्वी स्वतःचे खाते चेक केले जाते, रिझल्ट काढला जातो. तसा तुम्ही सर्वांनी आपला पोतामेल चेक केला आहे काय? तर काय चेक करायचे आहे? आजच्या दिवसापर्यंत जो काही पुरुषार्थ चालला त्याचा रिझल्ट आतापर्यंत कोणत्या गोष्टींमध्ये आणि किती टक्के सफलता-मूर्त बनलो? पहिले तर आपल्या मनसा संकल्पांच्या पोतामेलला चेक करा की, आतापर्यंत संपूर्ण श्रेष्ठ संकल्पांच्या पुरुषार्थामध्ये कितपत सफलता आली आहे? व्यर्थ संकल्पांच्या अथवा विकल्पांच्या बाबतीत कितपत विजयी बनलो आहे? आणि वाणीद्वारे आत्म्यांना कितपत बाबांचा परिचय देऊ शकतो, किती आत्म्यांना बाबांचे स्नेही अथवा सहयोगी बनवू शकतो? वाचेमध्ये रुहानियत अथवा अलौकिकता अथवा आकर्षण कितपत आले आहे? तसेच कर्मणाद्वारे सदैव न्यारे आणि प्यारे, अलौकिक, असाधारण कर्म कितपत करू शकतो? कर्मांमध्ये कर्मयोगीचे, योगयुक्त, युक्तियुक्त, स्नेहयुक्त रूप कितपत आणले आहे? आपल्या संस्कारांमध्ये आणि स्वरूपांमध्ये अर्थात चेहऱ्यावर कितपत पित्यासमान आकर्षण रूप, स्नेही रूप, सहयोगी रूप बनलो आहे? अशा प्रकारे आपला पोतामेल चेक केल्याने आतापर्यंत ज्या काही त्रुटी अथवा दोष राहिले आहेत त्याला दूर करून नवीन खाते सुरू करू शकाल. अशा पद्धतीने आपला पोतामेल चेक करा.

याला म्हणतात दीपावली साजरी करणे अथवा स्वतःला संपूर्ण बनविण्याचा दृढ संकल्प करणे हेच साजरे करणे आहे. तर अशी दीपावली साजरी केली आहे की फक्त मिलन साजरे केले? मिलन साजरे करण्याचे यादगार हे माळेच्या रूपामध्ये आहे; परंतु दृढ संकल्पांचे यादगार हे दिव्याच्या ज्योतीच्या रूपामध्ये आहे. तर दोन्ही रूपांनी साजरी केली? नवीन वस्त्रे परिधान केली? आत्म्याला नवीन शरीर कोणत्या आधारावर मिळते? संस्कारांच्या आधारावर मिळते ना. आत्म्याचे जसे संस्कार असतात त्यानुसारच शरीर तयार होते. तर कोणते नवीन शरीर अथवा नवीन वस्त्र परिधान कराल?

आत्म्यामध्ये नवीन युगाचे संस्कार अथवा नवीन युगाचे संस्थापक बाबांसारखे संपूर्ण संस्कारांना धारण करणे - हेच नवीन वस्त्रे परिधान करणे आहे. या शरीराला भले कितीही नवीन वस्त्रे घाला परंतु आजच्या जुन्या दुनियेतील नवीन वस्तू देखील नवीन दुनियेच्या पुढे जुन्याच आहेत; कारण त्या जडजडीभूत अवस्थेला प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे नवीन वस्त्रे परिधान केली तरीही त्यांना नवीन म्हटले जाणार नाही. सतोप्रधान दुनियेमध्येच सर्व काही नवीन असते. तमोप्रधान दुनियेतील सर्व गोष्टी जुन्या आहेत. असार आहेत. मग त्यांना नवीन म्हणायचे का? तर नवीन वस्त्र अर्थात आपल्या आत्म्याचे नवीन संस्कार, श्रेष्ठ संस्कार धारण करणे होय. आणखी काय कराल? जर नवीन संस्कार धारण केले आहेत तर पोतामेल ठेवल्याने पोताई (रंगरंगोटी) होईल ना. तर पोतामेल ठेवणे हीच रंगरंगोटी अर्थात सफाई, स्वच्छता राखणे आहे. जसे रंगरंगोटी करतात तेव्हा जी काही घाण आणि किटाणू असतात ते आपोआप नष्ट होतात. तर जेव्हा असा पोतामेल चेक कराल तेव्हा ज्या काही उणिवा राहिल्या असतील त्या आपोआपच नाहीशा होतील. एकमेकांना आपल्या मधुर वाणीने कोणत्या शब्दांची देवाण-घेवाण कराल? जसे दीपावलीला एकमेकांकडून खर्ची (पॉकेटमनी) घेतात ना! तुम्ही लोक एकमेकांना कोणती पॉकेटमनी द्याल? तुमच्याकडे कोणती वस्तू आहे जी एकमेकांना पॉकेटमनी म्हणून द्याल? (स्नेहाची पॉकेटमनी). तर एकमेकांचे स्नेही कायमसाठी आहात, की खास आजच्या दिवशीच स्नेही बनणार? स्नेही तर आहात आणि याच स्नेहाची निशाणी, एकमेकांच्या समीपतेची निशाणी ही दीपमाळा म्हटली जाते. विशेष दिनानिमित्त विशेष खर्ची कोणती द्यायची आहे? जी आतापर्यंत आपल्या पुरुषार्थाद्वारे सहज सफलता प्राप्त झाली असेल अथवा अनुभव झाला असेल, असे आपल्या अनुभवाचे ज्ञान-रत्न, ज्याद्वारे प्रत्यक्ष अनुभवी बनून, इतरांना अनुभवी बनवू शकता, असे रत्न एकमेकांना विशेषत: खर्चीच्या रूपामध्ये (पॉकेटमनीच्या रूपामध्ये) दिले पाहिजे. समजले? बाबांच्या खजिन्याला आपल्या अनुभवाद्वारे जो आपला बनवला आहे, तसे हे आपले बनवलेले ज्ञान-रत्न एकमेकांना दिले पाहिजे, ज्यामुळे ती आत्मा देखील याने सहज अनुभवी बनेल, हीच आहे खर्ची (पॉकेटमनी). तर एकमेकांना अशी खर्ची दिली पाहिजे जी कायमसाठी स्मृतीचे रूप बनेल. जेव्हा असा रत्न एखाद्याला द्याल तेव्हा त्या आत्म्याला बाबांसोबतच तुमच्याकडून मिळालेल्या रत्नाची कायमची आठवण नक्कीच राहील. तर कोणालाही कायमसाठी संपन्न करणारी खर्ची दिली पाहिजे. अशी दीपावली साजरी करा आणि असेच श्रेष्ठ आत्मा बनून इतर आत्म्यांची श्रेष्ठ सेवा करा.

आजच्या दिवशी सर्व आत्मे धनासाठी तहानलेले आहेत. तर अशा तहानलेल्या आत्म्यांना असे रुहानी धन द्या ज्यामुळे त्या आत्म्याला कधीही धन मागण्याची गरजच उरणार नाही. धन कोण मागतात? भिकारी. आजच्या दिवशी आत्मा भिकारी बनते. रॉयल भिकारी म्हणा. कितीही करोडपती असो, परंतु आजच्या दिवशी भिकारी बनतात. अशा भिकारी आत्म्याला भिकारीपणातून सोडवा, हीच आहे बेहदची सेवा. दात्याची मुले आहात ना. तर दात्याची मुले, वरदात्याची मुले, आपल्या वरदानाच्या शक्तीद्वारे, ज्ञान-दानाच्या शक्तीद्वारे भिकाऱ्यांना मालामाल बनवा. आजच्या दिवशी या भिकारी आत्म्यांवर विधाता आणि वरदाताच्या मुलांना दया आली पाहिजे. ज्या आत्म्यांना अशी दया येते, त्यांनाच माया आणि विश्वाचे असे आत्मे नमस्कार करतात; म्हणून आजही दीपक प्रज्वलित केले जातात. जेव्हा लाईट लावली जाते तेव्हा नमस्कार जरूर करतात. तर अशा ज्योती प्रज्वलित झालेल्या आत्म्यांचे यादगार आजही कायम आहे. विझलेल्या दिव्याला कधी नमस्कार करत नाहीत, तर सदैव जागती ज्योत बना. अशा आत्म्यांना बापदादा देखील नमस्ते करतात.

(महाराष्ट्र झोनच्या भाऊ-बहिणींप्रती अव्यक्त बापदादांची महावाक्ये - रिवाइज : २०-०३-२०१२)

या झोनची संख्या भरपूर आहे. नाव आहे - ‘महाराष्ट्र’; तर ‘महा’ असणारच ना! तर जसे नाव आहे तशीच संख्या देखील महान आहे. बॉम्बे आणि दिल्ली दोन्हीकडील मुले सेवा तर खूप चांगली करत आहेत, ती तर सांगण्याची गरज नाहीये. चांगली करत आहेत, करत राहतील परंतु बापदादा दिल्ली आणि बॉम्बे कडून हेच इच्छित आहेत की, जे तुमच्या संबंध-संपर्कामध्ये आलेले विशेष आत्मे, जे माईक देखील बनू शकतात आणि मग वारस देखील बनू शकतात, असा एखादा ग्रुप तयार करा, कारण मेजॉरिटी सर्व वर्गांनी (विंग्जनी) आपली लिस्ट बापदादांना पाठवली होती. ती लिस्ट पाहिली आहे का? चांगले-चांगले लिस्टमध्ये आहेत जे नाव प्रसिद्ध करू शकतात. आता त्यांना प्रत्यक्ष करा. तुमच्याऐवजी त्यांनी भाषणे करावीत - त्यांनी आपला अनुभव ऐकवावा, ज्ञान काय आहे, आमच्या जीवनामध्ये कसा फरक पडला आहे, ते वर्णन करावे. जेव्हा कार्यक्रम असतो, आता देखील कितीतरी जण आपले चांगले-चांगले अनुभव ऐकवतात देखील परंतु ते तर कार्यक्रमामध्ये ऐकवले, परंतु निरंतर त्या जीवनाचा अनुभव करावा. असे अटेंशन द्याल तर तयार होणारे आहेत. अनेकजण योग्य आहेत परंतु थोडा पुरुषार्थ करून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करा. वास्तविक प्रत्येक विंगने ही लिस्ट प्रत्यक्ष रूपामध्ये परिवारासमोर आणि बाबांसमोर आणली पाहिजे. विंग्जनी काम केले आहे. बापदादांनी पाहिले आहे काम केले आहे, परंतु बऱ्याचकाळापासून करत आहेत, आता काही नवीनता आणा. नवीनता हीच आहे की वारसदार बनवा.

कमीत-कमी जे संपर्कामध्ये आलेले आहेत ते संबंधामध्ये यावेत, संबंधानंतर सेवेमध्ये लागावेत. संबंध असा नाही, येण्या-जाण्याचा संबंध नव्हे परंतु बाबांचे आणि परिवाराचे साथीदार बनावेत. असे देखील होणार आहे, आता बापदादांनी पाहिले की जर ब्राह्मण एकत्र येऊन कोणताही एक संकल्प करतील तर तो पूर्ण झालेलाच आहे; परंतु सर्वांचा एकच संकल्प असावा, कारण आता वायुमंडळ बदलले आहे. तर बापदादा अशा माईक क्वालिटीच्या मुलांचे संघटन तयार करू इच्छित आहेत. मधुबनमध्ये भेटायला येतात ती गोष्ट वेगळी आहे परंतु परिवाराचे बनून आले पाहिजेत कारण सेवेमध्ये काही ना काही नवीनता तर हवीच ना! अच्छा.

बाकी बापदादांची एक आशा इतरही झोनच्या प्रति राहिलेली आहे. ती कोणती आहे? प्रत्येक सेंटरने ही खूशखबर लिहून पाठवावी की आमचे सेंटर निर्विघ्न आहे, मिलनसार आहे. सर्व बाबांची मुले ॲक्युरेट, जो कार्यक्रम बनवलेला आहे त्यामध्ये बिझी आहेत, निर्विघ्न आहेत. असे अजून कोणत्याही झोनकडून आलेले नाही. तर महाराष्ट्र तर महान कार्य करणार ना! कोणत्याही झोनने अजून ही खूशखबर पाठवलेली नाही. बनायचे आहे, बनायचे तर तुम्हालाच आहे आणखी कोण बनणार! तुमची तपस्या कमी नाहीये. भले मग टीचर आहेत अथवा स्टुडंट आहेत, दुनियेच्या हिशोबाने प्रत्येकजण महान आत्मा आहेत. आता देखील पाहा, हे निर्विघ्न बनण्याचे थोडे जरी काम कराल तरी सगळे जसे तुमच्या जड चित्रांकडे (मूर्तींकडे) शुभ भावनेने पाहतात, तसे तुम्हाला चैतन्य रूपामध्ये देवींच्या रूपामध्ये, देवतांच्या रूपामध्ये पाहतील. बाकी सेवा सर्वांनी चांगली केली आहे, त्याची बापदादा मुबारक देत आहेत. अच्छा.

वरदान:-
दिव्य गुणांच्या आवाहनाद्वारे अवगुणांना समाप्त करणारे दिव्यगुणधारी भव

जसे दीपावलीला श्रीलक्ष्मीचे आवाहन करतात तसे तुम्ही मुले स्वतःमध्ये दिव्य गुणांचे आवाहन करा तर अवगुण आहुती रूपामध्ये नष्ट होऊन जातील. मग नवीन संस्कार रूपी नवीन वस्त्र धारण कराल. आता जुन्या वस्त्रांवर (जुन्या संस्कारांशी) जरासुद्धा प्रेम असू नये. ज्या काही त्रुटी, दोष, निर्बलता, कोमलता राहिलेल्या आहेत - ती सर्व जुनी खाती आजपासून कायमसाठी समाप्त करा, तेव्हा दिव्यगुणधारी बनाल आणि भविष्यामध्ये ताजपोशी (राज्याभिषेक) होईल. त्याचेच यादगार ही दीपावली आहे.

सुविचार:-
स्वराज्य अधिकारी बनायचे असेल तर मन रुपी मंत्र्याला आपला सहयोगी बनवा.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

“बिंदू आणि सिंधू” हे दोन शब्द जरी लक्षात ठेवले तरीही सहज संपूर्णता येऊ शकते. एका बिंदूचीच आठवण आणि एकरस अवस्था, एकाचेच मत (श्रीमत) आणि एकाच्याच कर्तव्यामध्ये मदतगार. फक्त बिंदू आणि एक, यापेक्षा जास्त विस्तारामध्ये जाण्याची गरज नाही. विस्तारामध्ये जायचे असेल तर फक्त सेवे प्रति जा. त्या पलीकडे आपली बुद्धी चालवण्याची गरज नाही.