09-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा तुम्हा मुलांना ‘भक्ती तू आत्म्या’पासून ‘ज्ञानी तू आत्मा’
बनविण्यासाठी, पतिता पासून पावन बनविण्यासाठी आले आहेत”
प्रश्न:-
ज्ञानवान मुले
सदैव कोणत्या चिंतनामध्ये राहतात?
उत्तर:-
मी अविनाशी आत्मा आहे, हे शरीर विनाशी आहे, मी ८४ शरीरे धारण केली आहेत. आता हा
शेवटचा जन्म आहे. आत्मा कधी लहान-मोठी होत नसते. शरीरच लहान-मोठे होते. हे डोळे
शरीरामध्ये आहेत परंतु यातून बघणारी मी आत्मा आहे. बाबा आत्म्यांनाच ज्ञानाचा तिसरा
नेत्र देतात. तो देखील जोपर्यंत शरीराचा आधार घेत नाहीत तोपर्यंत शिकवू शकत नाहीत.
असे चिंतन ज्ञानवान मुले सदैव करत राहतात.
ओम शांती।
हे कोणी म्हटले? आत्म्याने. अविनाशी आत्म्याने शरीराद्वारे म्हटले. शरीर आणि
आत्म्यामध्ये किती फरक आहे. शरीर ५ तत्त्वांचा इतका मोठा पुतळा बनतो. भले शरीर छोटे
जरी असले तरी देखील आत्म्यापेक्षा तर नक्कीच मोठे आहे. पहिले तर एकदम छोटा पिंड असतो,
जेव्हा थोडा मोठा होतो तेव्हा आत्मा त्यामध्ये प्रवेश करते. मग शरीर मोठे होता-होता
इतके मोठे होते. आत्मा तर चैतन्य आहे ना. जोपर्यंत आत्मा प्रवेश करत नाही तोपर्यंत
पुतळा काहीच कामाचा नाही. किती फरक आहे. बोलणारी चालणारी सुद्धा आत्माच आहे. ती एक
छोटासा बिंदूच आहे. ती कधीही लहान-मोठी होत नाही. तिचा विनाश होत नाही. आता हे परम
आत्मा बाबांनी समजावून सांगितले आहे की, ‘मी आत्मा अविनाशी आहे आणि शरीर विनाशी आहे.
त्याच्यामध्ये मी प्रवेश करून मी पार्ट बजावतो’. या गोष्टींचे आता तुम्ही चिंतन करता.
पूर्वी तर ना आत्म्याला जाणत होता, ना परमात्म्याला जाणत होता, फक्त म्हणण्यापुरते
म्हणत होता - परमपिता परमात्मा. आत्मासुद्धा समजत होतो परंतु मग कोणी तरी म्हणाले
तुम्ही परमात्मा आहात. हे कोणी सांगितले? या भक्तीमार्गातील गुरूंनी आणि शास्त्रांनी.
सतयुगामध्ये तर असे कोणी सांगणार नाही. आता बाबांनी सांगितले आहे - ‘तुम्ही माझी
मुले आहात. आत्मा नैसर्गिक आहे, शरीर अनैसर्गिक मातीचे बनलेले आहे. जेव्हा आत्मा
असते तेव्हा शरीर बोलते-चालते’. आता तुम्ही मुले जाणता बाबा येऊन आम्हा आत्म्यांना
समजावून सांगत आहेत. निराकार शिवबाबा या संगमयुगावरच येऊन या शरीराद्वारे ऐकवतात.
हे डोळे तर शरीरामध्ये असतातच. आता बाबा ‘ज्ञान-चक्षू’ देतात. आत्म्यामध्ये ज्ञान
नसेल तर ‘अज्ञान-चक्षू’ आहेत. बाबा येतात तेव्हा आत्म्याला ‘ज्ञान-चक्षू’ मिळतात.
आत्माच सर्व काही करते. आत्मा कर्म करते शरीराद्वारे. आता तुम्ही समजता की, बाबांनी
हे शरीर धारण केले आहे. आपले देखील रहस्य सांगतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे
रहस्य देखील सांगतात. संपूर्ण नाटकाचे देखील नॉलेज देतात. आधी तुम्हाला काहीही
माहित नव्हते. हां, नाटक नक्की आहे. सृष्टीचे चक्र फिरत असते. परंतु कसे फिरते, हे
कोणीही जाणत नाहीत. रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान तुम्हाला आत्ता मिळते.
बाकी तर सगळी आहे भक्ती. बाबाच येऊन तुम्हाला ज्ञानी तू आत्मा बनवतात. पूर्वी तुम्ही
‘भक्ती तू आत्मा’ होता. तुम्ही आत्मे भक्ती करत होता. आता तुम्ही आत्मे ज्ञान ऐकता.
भक्तीला म्हटले जाते अंधःकार. आपण असे म्हणणार नाही की भक्तीमुळे भगवान भेटतो.
बाबांनी समजावून सांगितले आहे भक्तीचा देखील पार्ट आहे, ज्ञानाचा देखील पार्ट आहे.
तुम्ही जाणता आपण भक्ती करत होतो तेव्हा काहीच सुख नव्हते. भक्ती करत, त्रास सहन
करत होतो, बाबांना शोधत होतो. आता समजता यज्ञ, तप, दान-पुण्य इत्यादी जे काही करत
होते, शोधून-शोधून त्रास सहन करून-करून सर्व थकून गेले. तमोप्रधान होतात कारण खालीच
यायचे असते ना. खोटी कामे करणे म्हणजे घाणेरडे होणे असते. पतित सुद्धा बनले. असे
नाही की पावन बनण्यासाठी भक्ती करत होतो. भगवंताद्वारे पावन बनल्याशिवाय आपण पावन
दुनियेमध्ये जाऊ शकत नाही. असे नाही की पावन बनल्याशिवाय भगवंताला भेटू शकत नाही.
भगवंताला तर सांगतात - येऊन पावन बनवा. भगवंताला तर पतित असणारेच पावन बनण्यासाठी
भेटतात. पावन असणाऱ्यांना तर भगवान भेटतही नाहीत. सतयुगामध्ये थोडेच या
लक्ष्मी-नारायणाला भगवान भेटतात. भगवान येऊन तुम्हा पतितांना पावन बनवतात आणि तुम्ही
हे शरीर सोडता. पावन तर या तमोप्रधान सृष्टीमध्ये राहू शकत नाहीत. बाबा तुम्हाला
पावन बनवून अदृश्य होतात, ड्रामामध्ये त्यांचा पार्टच वंडरफुल आहे; जशी आत्मा दिसू
शकत नाही. भले साक्षात्कार होतो तरीही समजू शकत नाही. बाकी तर सर्वांना समजू शकतो
हा अमका आहे, हा तमका आहे. आठवण करतात. इच्छा असते अमक्याचा चैतन्यमध्ये
साक्षात्कार घडावा बाकी तर काहीच अर्थ नाही. अच्छा, चैतन्यमध्ये बघता, मग पुढे काय?
साक्षात्कार झाल्यावर मग अदृश्य होईल. अल्पकालीन क्षणभंगुर सुखाची इच्छा पूर्ण होईल.
त्याला म्हटले जाईल अल्पकालीन क्षणभंगुर सुख. साक्षात्काराची इच्छा होती ती पूर्ण
झाली, बस्स. इथे तर मुख्य गोष्ट आहे पतितापासून पावन बनण्याची. पावन बनलात तर देवता
बनाल अर्थात् स्वर्गामध्ये जाल.
शास्त्रांमध्ये तर
कल्पाचा कालावधी लाखो वर्षांचा लिहून ठेवला आहे. समजतात कलियुगाची अजून ४० हजार
वर्षे बाकी आहेत. बाबा तर समजावून सांगतात - संपूर्ण कल्पच ५ हजार वर्षांचे आहे.
म्हणजे मनुष्य अंधारात आहेत ना. याला म्हटले जाते घोर अंधःकार. कोणालाच ज्ञान नाहीये.
ती सर्व आहे भक्ती. रावण जेव्हा येतो तेव्हा भक्ती सुद्धा त्याच्यासोबत असते आणि
जेव्हा बाबा येतात तेव्हा त्यांच्यासोबत ज्ञान असते. बाबांकडून एकदाच ज्ञानाचा वारसा
मिळतो. पुन्हा-पुन्हा मिळू शकत नाही. तिथे (सतयुगामध्ये) तर तुम्ही कोणाला ज्ञान
देत नाही. गरजच नाही. ज्ञान त्यांना मिळते जे अज्ञानामध्ये आहेत. बाबांना कोणीही
ओळखत सुद्धा नाहीत. बाबांना शिवी दिल्याशिवाय कोणी बोलतच नाही. हे देखील तुम्ही मुले
आता समजता. तुम्ही म्हणता - ‘ईश्वर सर्वव्यापी नाहीत, ते आम्हा आत्म्यांचे पिता
आहेत’ आणि ते म्हणतात की, ‘परमात्मा दगड-धोंड्यामध्ये आहे’. तुम्हा मुलांना चांगल्या
प्रकारे समजले आहे - भक्ती एकदम वेगळी गोष्ट आहे, त्यामध्ये जरासुद्धा ज्ञान नाही
आहे. पूर्ण काळच बदलून जातो. भगवंताचे नाव सुद्धा बदलते आणि मनुष्यांचे देखील नाव
बदलून जाते. आधी म्हटले जाते - देवता मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ते दैवी गुणवाले
मनुष्य आहेत आणि हे आहेत आसुरी गुणवाले मनुष्य. एकदम घाणेरडे आहेत. गुरू नानकांनी
देखील म्हटले आहे - ‘अशंख चोर…’. कोणा मनुष्याने असे म्हटले तर त्याला लगेच म्हणतील,
तुम्ही ही शिवी का देता. परंतु बाबा म्हणतात हा सर्व आसुरी संप्रदाय आहे. तुम्हाला
स्पष्ट करून सांगतात. तो रावण संप्रदाय, तो राम संप्रदाय. गांधीजीसुद्धा म्हणायचे
राम-राज्य हवे. राम राज्यामध्ये सर्वजण ‘निर्विकारी’ आहेत, रावण राज्यामध्ये सर्वजण
‘विकारी’ आहेत. याचे नावच आहे वेश्यालय. रौरव नरक आहे ना. या वेळचे मनुष्य विषय
वैतरणी नदीमध्ये बुडालेले आहेत. मनुष्य, पशु-प्राणी इत्यादी सगळे एकसारखेच आहेत.
मनुष्याची काहीच महिमा नाहीये. ५ विकारांवर तुम्ही मुले विजय मिळवून मनुष्या पासून
देवता पद प्राप्त करता, इतर सर्व नष्ट होतात. देवता सतयुगामध्ये राहत होते. आता या
कलियुगामध्ये असुर राहतात. असुरांचे लक्षण कोणते आहे? ५ विकार. देवतांना म्हटले जाते
- ‘संपूर्ण निर्विकारी’ आणि असुरांना म्हटले जाते - ‘संपूर्ण विकारी’. ते आहेत १६
कला संपूर्ण आणि इथे आहेत शून्य कला. सर्वांची कला-काया (विशेषता आणि देह) नष्ट झाले
आहे. आता हे बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. बाबा येतातच जुनी आसुरी दुनिया
बदलण्याकरिता. रावण राज्य वेश्यालयाला बाबा शिवालय बनवतात. त्यांनी (दुनियावाल्यांनी)
तर इथेच नावे ठेवली आहेत - त्रिमूर्ती हाऊस, त्रिमूर्ती रोड... पूर्वी थोडीच अशी
नावे होती. आता असायला काय पाहिजे? ही सर्व दुनिया कोणाची आहे? परमात्म्याची आहे
ना. परमात्म्याची दुनिया आहे जी अर्धे कल्प पवित्र, अर्धे कल्प अपवित्र असते.
क्रिएटर तर बाबांना म्हटले जाते ना. तर मग ही दुनिया त्यांचीच झाली ना. बाबा
समजावून सांगतात - ‘मीच मालक आहे. मी बीजरूप, चैतन्य, ज्ञानाचा सागर आहे.
माझ्यामध्ये सर्व ज्ञान आहे, इतर कोणालाही नाही. तुम्ही समजू शकता या सृष्टी
चक्राच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज बाबांनाच आहे. बाकी तर सगळ्या आहेत थापा. मुख्य
थाप खूप वाईट आहे, ज्याच्यासाठी बाबा तक्रार करतात. तुम्ही मला दगड-धोंड्यात,
कुत्रा-मांजरात समजले आहात. तुमची किती दुर्दशा झाली आहे.
नव्या दुनियेतील
मनुष्यांमध्ये आणि जुन्या दुनियेतील मनुष्यांमध्ये दिवस-रात्री एवढा फरक आहे.
अर्ध्या कल्पापासून अपवित्र मनुष्य, पवित्र देवतांसमोर डोके टेकतात. मुलांना हे
देखील समजावून सांगण्यात आले आहे की, सर्वात पहिली पूजा होते शिवबाबांची. जे शिवबाबा
तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतात. रावण तुम्हाला पूज्य पासून पुजारी बनवतो.
पुन्हा मग बाबा ड्रामा प्लॅन अनुसार तुम्हाला पूज्य बनवतात. रावण वगैरे ही सर्व नावे
तर आहेत ना. जेव्हा दसरा साजरा करतात तेव्हा बाहेरून किती व्यक्तींना बोलावतात.
परंतु अर्थ काही समजत नाहीत. देवतांची किती निंदा करतात. परंतु अशा काही गोष्टी तर
अजिबात नाहीत. जसे म्हणतात की, ‘ईश्वर नावा-रूपा पासून न्यारा आहे अर्थात
अस्तित्वातच नाही’. तसेच हे जे काही खेळ इत्यादी बनवतात ते तसे काहीच नाही आहे. ही
सर्व आहे मनुष्यांची बुद्धी. मनुष्य मताला आसुरी मत म्हटले जाते. यथा राजा-राणी तथा
प्रजा. सर्व असेच बनतात. याला म्हटलेच जाते डेव्हिल वर्ल्ड (सैतानाची दुनिया)
म्हणतात. सर्व एकमेकांना शिव्या देत राहतात. तर बाबा समजावून सांगत आहेत -
‘मुलांनो, जेव्हा बसता तेव्हा स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’. अज्ञान
काळामध्ये तुम्ही परमात्म्याला वर आहेत असे समजत होता. आता तर जाणता बाबा इथे आलेले
आहेत त्यामुळे तुम्ही बाबा वरती आहेत असे समजत नाही. तुम्ही बाबांना इथे, या
तनामध्ये बोलवले आहे. तुम्ही जेव्हा आपापल्या सेंटर्सवर असता तेव्हा समजाल की
शिवबाबा मधुबनमध्ये यांच्या तनामध्ये आहेत. भक्तीमार्गामध्ये तर परमात्म्याला वरती
आहेत असे मानत होता. ‘हे भगवान…’ आता तुम्ही बाबांची कुठे आठवण करता? बसून काय करता?
तुम्ही जाणता ब्रह्माच्या तनामध्ये आहेत तर जरूर इथेच आठवण करावी लागेल. वरती तर
नाहीत. इथे पुरुषोत्तम संगमयुगावर आलेले आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला इतके
श्रेष्ठ बनविण्यासाठी इथे आलो आहे. तुम्ही मुले माझी इथे आठवण कराल, भक्त वरती आठवण
करतील. तुम्ही भले परदेशात असाल तरी देखील म्हणाल शिवबाबा ब्रह्माच्या तनामध्ये
आहेत. शरीर तर अवश्य पाहिजे ना, तुम्ही कुठेही बसले असाल तरीही आठवण तर जरूर इथेच
कराल. ब्रह्माच्या तनामध्येच आठवण करावी लागेल. बरेच बुद्धीहीन ब्रह्माला मानतच
नाहीत. बाबा असे म्हणत नाहीत की ब्रह्माची आठवण करू नका. ब्रह्मा शिवाय शिवबाबा कसे
आठवतील? बाबा म्हणतात - मी या तनामध्ये आहे. यांच्यामध्ये माझी आठवण करा म्हणून
तुम्ही बाबा आणि दादा दोघांचीही आठवण करता. यांची (ब्रह्मा बाबांची) स्वतःची आत्मा
आहे, हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. शिवबाबांना तर आपले स्वतःचे शरीर नाहीये. बाबांनी
सांगितले आहे की, मी या प्रकृतीचा आधार घेतो. बाबा बसून सर्व ब्रह्मांड आणि
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात; बाकी कोणी ब्रह्मांडाला
जाणतसुद्धा नाहीत. ब्रह्म, जिथे मी आणि तुम्ही रहातो; सुप्रीम बाबा, नॉन-सुप्रीम
आत्मे त्या ब्रह्मलोक शांतीधामचे आपण निवासी आहोत. शांतीधाम अतिशय गोड नाव आहे. या
सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. खरे तर आपण ब्रह्म महतत्त्वाचे रहिवासी आहोत,
ज्याला निर्वाण धाम, वानप्रस्थ म्हटले जाते. या गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये
आहेत. जेव्हा भक्ती असते तेव्हा ज्ञानाचा एक शब्दही नसतो. याला म्हटले जाते
पुरुषोत्तम संगमयुग, जेव्हा परिवर्तन होते. जुन्या दुनियेमध्ये असुर राहतात, नवीन
दुनियेमध्ये देवता राहतात त्यामुळे त्यांना बदलण्यासाठी बाबांना यावे लागते.
सतयुगामध्ये तुम्हाला यातले काहीही माहिती नसणार. आता तुम्ही कलियुगामध्ये आहात तरी
देखील काहीच माहिती नाही आहे. जेव्हा नवीन दुनियेमध्ये असाल तेव्हा सुद्धा या जुन्या
दुनियेविषयी काहीच माहिती नसणार. आत्ता जुन्या दुनियेत आहात तर नवीन दुनिये विषयी
माहिती नाही. नवी दुनिया केव्हा होती काहीच माहिती नाही. ते (दुनियावाले) तर लाखो
वर्षे म्हणतात. तुम्ही मुले जाणता बाबा कल्प-कल्प या संंगमयुगावरच येतात, येऊन या
व्हरायटी झाडाचे (वैविध्यपूर्ण वृक्षाचे) रहस्य समजावून सांगतात आणि हे चक्र कसे
फिरते ते देखील तुम्हा मुलांना समजावून सांगतात. तुमचे कामच हे इतरांना समजावून
सांगण्याचे आहे. आता प्रत्येकाला समजावून सांगण्यामध्ये तर खूप वेळ लागेल त्यामुळे
आता तुम्ही एकाच वेळी अनेकांना समजावून सांगता. भरपूर लोकं येऊन समजून घेतात. या
गोड-गोड गोष्टी तुम्हाला मग अनेकांना समजावून सांगायच्या आहेत. तुम्ही प्रदर्शन
इत्यादी ठिकाणी समजावून सांगता ना; आता शिवजयंतीला आणखी चांगल्या प्रकारे खूप जणांना
बोलावून समजावून सांगायचे आहे. खेळाचा कालावधी किती आहे, हे तुम्ही तर बिनचूक
सांगाल. हा झाला विषय. आम्ही देखील हे समजावून सांगणार. तुम्हाला बाबा समजावून
सांगतात ना ज्यामुळे तुम्ही देवता बनता. जसे तुम्ही समजून घेऊन देवता बनता तसे
इतरांनाही बनवता. आम्हाला हे बाबांनी समजावून सांगितले आहे. आम्ही कोणाची निंदा
वगैरे करत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, ज्ञानाला सद्गतीचा मार्ग म्हटले जाते, एक
सद्गुरूच पार करणारे आहेत. अशा प्रकारे मुख्य मुद्दे काढून समजावून सांगा. हे सर्व
ज्ञान बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकणार नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पुजारी
पासून पूज्य बनण्याकरिता संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. ज्ञानवान बनून आपणच
आपल्याला बदलायचे आहे. अल्पकालीन सुखाच्या मागे जायचे नाही.
२) बाबा आणि दादा
दोघांचीही आठवण करायची आहे. ब्रह्मा शिवाय शिवबाबांची आठवण करू शकणार नाही.
भक्तीमध्ये वरती आठवण केली, आता ब्रह्माच्या तनामध्ये आले आहेत त्यामुळे दोघांचीही
आठवण आली पाहिजे.
वरदान:-
प्रत्येक
कर्मामध्ये विजयाचा दृढ निश्चय आणि नशा ठेवणारे अधिकारी आत्मा भव
विजय आमचा जन्मसिद्ध
अधिकार आहे - या स्मृतीद्वारे सदैव उडत रहा. काहीही होवो - हे स्मृतीमध्ये आणा की,
‘मी सदा विजयी आहे’. काहीही झाले तरी हा निश्चय अटळ पाहिजे. नशेचा आधार आहेच निश्चय.
निश्चय कमी तर नशा कमी, म्हणून म्हणतात - निश्चयबुद्धी विजयी होतो. निश्चयाच्या
बाबतीत ‘कधी-कधी’वाले बनू नका. बाबा अविनाशी आहेत तर अविनाशी प्राप्तीचे अधिकारी बना.
प्रत्येक कर्मामध्ये विजयी होण्याचा निश्चय आणि नशा पाहिजे.
बोधवाक्य:-
बाबांच्या
स्नेहाच्या छत्रछायेखाली रहा तर कोणतेही विघ्न टिकू शकणार नाही.