09-11-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, हेच
शिक्षण आहे जे तुम्हाला नरापासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनवते, त्यामुळे
अभ्यासावर खूप-खूप लक्ष द्यायचे आहे”
प्रश्न:-
बाबांकडून
मुलांना कोणता वारसा मिळतो जो कुठल्याही तीर्थक्षेत्रावर अथवा जंगलामध्ये गेल्याने
मिळू शकत नाही?
उत्तर:-
बाबांकडून
मुलांना सुख-शांती-संपत्तीचा वारसा मिळतो, जो इतर कुठेही मिळू शकत नाही. मनुष्य
शांतीकरिता जंगलामध्ये जातात परंतु तुम्ही मुले जाणता शांती तर आम्हा आत्म्यांचा
स्वधर्म आहे.
गीत:-
तुम्हें पाके
हमने जहाँ पा लिया…
ओम शांती।
बाबा बसून
मुलांना समजावून सांगत आहेत कारण तुम्ही आता धनके (धनीचे) बनला आहात. बाकीचे जे पण
मनुष्य मात्र आहेत ते निधनके आहेत. ‘धनी’, एका बाबांनाच म्हटले जाते. घरामध्ये
जेव्हा भांडणे करतात तेव्हा म्हटले जाते - तुमचा कोणी धनी-धोरी नाही आहे काय? आता
सारे साऱ्या दुनियेतील मनुष्य मात्र भांडण-तंटे करत राहतात. एकमेकांचा खून देखील
करतात. बाबाच येऊन समजावून सांगतात - हा काम विकार तर महाशत्रू आहे, ज्यामुळे सर्व
जण आदि-मध्य-अंत दुःख प्राप्त करतात. तुम्ही मुले जाणता आता आपण बेहदच्या बाबांकडून
बेहद सुखाचा वारसा घेत आहोत. मनुष्य भले म्हणतात की, आम्हाला शांती पाहिजे, परंतु
शांती काय आहे, कुठून मिळते, जंगलामध्ये गेल्याने शांती मिळेल काय? सुख-शांती कधी
आणि कोण देते, तीर्थक्षेत्रांवर कशासाठी जातात? हे देखील कोणी जाणत नाहीत. फक्त
ऐकलेले आहे की, भक्ती केल्याने भगवान भेटेल. भगवंताला जाणत सुद्धा नाहीत. बाबा
म्हणतात - मी येऊन तुम्हा मुलांना सुख-शांती देतो. आता सुख शांती-संपत्ती, कोणाकडेच
नाहीये. ती देणाऱ्याला देखील कोणी जाणत नाही. बाबा येऊन समजावून सांगत आहेत की,
तुम्ही गाता देखील - दुःख हर्ता, सुख कर्ता. गांधीजी देखील बोलावत होते की, ‘हे
पतित-पावन, येऊन पावन बनवा’. फक्त गातात - ‘पतित-पावन सिताराम..’ परंतु अर्थाचा तर
पत्ताच नाहीये. भक्ती कशासाठी करतात, त्याने काय मिळेल? काहीही जाणत नाहीत. ही
भक्तीची ड्रामामध्ये नोंद आहे. द्वापरपासून रावण-राज्य सुरू होते. मनुष्य हे जाणत
नाहीत की रावण काय चीज आहे! कधीपर्यंत रावणाला जाळत राहणार! मग त्याचा जन्म कधी झाला,
रावणाचा पुतळा बनवून जळतात. आत्मा कधी जळत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच जाणता.
आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.
लक्ष्मी-नारायणालाच भगवती-भगवान म्हटले जाते. मग त्रेतामध्ये रामाचे राज्य होते.
त्यांना हे राज्य कसे मिळाले, आणि मग ते राज्य कुठे गेले, हे कोणीही जाणत नाही
अर्थात रचनेच्या आदि-मध्य-अंताला कोणीही जाणत नाही. तुम्ही या नॉलेजने स्वर्गाचे
मालक बनता. स्कूलमध्ये शिक्षण घेऊन कोणी वकील, कोणी जज बनतात, परंतु लक्ष्मी-नारायण
बनत नाहीत. हे पद कोणत्या शिक्षणाद्वारे प्राप्त केले! हे कोणालाही माहित नाही.
भगवानुवाच - मी तुम्हाला राजयोग शिकवतो. असा कोणीही नसेल जो म्हणेल की, मी तुम्हाला
असे लक्ष्मी-नारायण बनवतो. तुम्ही मुले जाणता ही लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (घराणे)
या शिक्षणाने बनली आहे. दुनियेमध्ये या गोष्टींना कोणीही जाणत नाहीत.
सतयुगासाठी देखील लाखो
वर्षे म्हणतात, तर मग हे तरी कसे ठाऊक असेल की, लक्ष्मी-नारायण कुठे गेले? पाहत
देखील आहेत की भारतामध्येच लक्ष्मी-नारायणाची पुष्कळ चित्रे आहेत. भरपूर मंदिरे
बनवलेली आहेत. समजतात की, यांच्याकडून आपल्याला धन मिळेल. महालक्ष्मीकडे प्रत्येक
दिवाळीला धन मागतात, परंतु सोबत जरूर नारायण देखील असेल ना. दिवाळीला पूजा करतात आणि
मग त्यांची अल्पकाळ सुखाची भावना पूर्ण होते तर समजतात की, लक्ष्मीकडून धन मिळते.
वास्तविक लक्ष्मी-नारायण दोघेजण आहेत. लक्ष्मी, महालक्ष्मी काही वेगवेगळे नाही आहेत,
या गोष्टी मनुष्य जाणत नाहीत. बाबाच समजावून सांगतात. आजकाल मनुष्य तर ईश्वर
दगड-मातीमध्ये आहे असे म्हणतात. बाबा म्हणतात - सर्वजण पत्थर-बुद्धी आहेत.
पारस-बुद्धी तर सतयुगामध्ये आहेत. जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा
सोन्या-हिऱ्यांचे महाल होते. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. शास्त्रांमध्ये कल्पाचे
आयुष्य लाखो वर्षे लिहिले आहे. बाबा म्हणतात - भक्तीमार्गावर, ही शिडी खाली उतरावीच
लागते. ड्रामा अनुसार जेव्हा अधोगती होते तेव्हाच मी येतो आणि येऊन नवीन दुनिया
बनवतो. आता तुम्ही मुले नवीन दुनियेचे मालक बनण्याकरिता राजयोग शिकत आहात. तुम्ही
जाणता - या महाभारत लढाईद्वारे जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. हा ड्रामा
पूर्वनियोजित आहे. सतयुगामध्ये देवी-देवतांचे राज्य होते. त्याला आता ५ हजार वर्षे
झाली. २५०० वर्षे सूर्यवंशी, चंद्रवंशींचे राज्य चालले. बाकी द्वापरपासून रावण
राज्य सुरू झाले. मनुष्य पतित बनत जातात. परंतु त्यांना हे ठाऊक नाही आहे की,
आपल्याला पतित कोणी बनवले? आपण पावन होतो, मग पतित कसे बनलो? हे बाबाच येऊन समजावून
सांगतात. रावण राज्य सुरू झाल्याने तुम्ही पतित बनत जाता. रावणाच्या जन्माला आता
२५०० वर्षे झाली आहेत. शिवबाबांच्या जन्माला ५ हजार वर्षे झाली, त्यांना राम म्हटले
जाते. त्याला रावण राज्य म्हटले जाते. वास्तविक राम म्हटले नाही पाहिजे. आजकाल
मनुष्यांची नावे रामचंद्र, कृष्णचंद्र अशी ठेवतात.
५ हजार वर्षांपूर्वी
भारत सोन्याची चिडिया होता. त्याला गोल्डन एज्ड वर्ल्ड (सतयुगी दुनिया) म्हटले जाते.
वैकुंठ होता, परंतु कुठे होता हे जाणत नाहीत. आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे,
सृष्टीचक्र काय आहे काहीही जाणत नाहीत. म्हणूनच तर त्यांना म्हटले जाते -
तुच्छ-बुद्धी. ऋषी-मुनी रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. तेव्हाच
तर नेती-नेती (आम्ही जाणत नाही) म्हणतात, ना बाबांना जाणत, ना वारशाला जाणत.
बाबांकडून वारसा म्हणून विश्वाची बादशाही जी मिळते त्याला देखील जाणत नाहीत. आता
साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला तुम्ही जाणता, तर तुम्ही डबल आस्तिक झालात.
लोकांना तर हे देखील ठाऊक नाही की शांती कोणाकडून आणि कुठून मिळेल. या संन्याशांकडे
जाऊन म्हणतात - आम्हाला शांती पाहिजे. आता आपल्याला शांती कुठून मिळू शकेल? कर्म तर
करायचेच आहे ना? शांती तर मिळेल - शांतीधाममध्ये. घरामध्ये जर एक अशांत असेल तरी
देखील संपूर्ण घराला अशांत करेल. शांती मिळते - स्वीट होममध्ये. मग तिथून आम्हा
आत्म्यांना बाबा पार्ट बजावण्याकरिता नवीन दुनियेमध्ये पाठवून देतात. बाबा दोजक
मध्ये (नरकामध्ये) थोडेच पाठवतील. शांतीधाम मधून सुखधाम मध्ये जाणार. तुम्ही मुले
जाणता - ही स्वयं भगवंताची पाठशाळा आहे. हा काही सत्संग नाहीये. इथे भगवानुवाच आहे
- मुलांप्रति. निराकार शिवबाबा शरीरामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांशी बोलतात. आत्मा
देखील शरीरामध्ये आहे ना. आत्म्याला जेव्हा कर्मेंद्रिये मिळतात तेव्हा आत्मा बोलते,
ऐकते. आता आत्म्यांना बाबा बसून शिकवत आहेत. परमात्म्याला बोलावतात - ‘हे पतित-पावन…,
हे सद्गती दाता, लिबरेटर, गाईड’ परंतु हे जाणत नाहीत की ते कसे लिबरेट करून, मग
गाईड बनून, कुठे घेऊन जातील. फक्त ओरडत राहतात. आता गॉड फादर आलेले आहेत. तुम्हा
मुलांना गाईड (मार्गदर्शन) करत आहेत. ते स्वतः तुम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन जातात.
मग तुम्ही स्वतःच सुखधाम मध्ये निघून जाल. बाबा एकदाच येऊन सर्वांचे गाईड बनतात. मग
नवीन दुनियेमध्ये बाबा गाईड करणार नाहीत. यावेळी सर्व मनुष्य पतित असल्याकारणाने हे
जाणत नाहीत की, आपण परत घरी कसे जावे, कारण उडू शकत नाही. तिथे जाण्याकरिता भक्ती
खूप करतात. परंतु हे जाणत नाहीत की आपण पतित आहोत त्यामुळे जाऊ शकत नाही. पतित-पावन
बाबा येऊन जेव्हा पावन बनवतील तेव्हाच आपण जाऊ शकतो. आता बाबा पावन बनण्याची युक्ती
तुम्हाला सांगत आहेत, सर्वांना पतितापासून पावन बनायचेच आहे. आता किती असंख्य
मनुष्य आहेत. सतयुगामध्ये जेव्हा देवतांचे राज्य असते तेव्हा नवीन झाडामध्ये नऊ लाख
असतात. सुरुवातीला थोडी पाने असतात ना. नंतर मग झाड मोठे होत जाते. सुरुवातीला एकाच
धर्माचे असतात. आता तुम्ही स्वतःला नरकवासी समजणार नाही. बाकी सर्व आहेत नरकवासी.
परंतु ते स्वतःला तसे समजत नाहीत. यावेळी सर्वांची सुरत (चेहरा) तर मनुष्याचा आहे,
परंतु सिरत (वृत्ती) वानरासारखी आहे. मोठ-मोठे राजा देखील लक्ष्मी-नारायणाच्या
पायावर लोटांगण घालतात. आता ते काही पतिताला पावन बनवणारे तर नाहीत किंवा ते काही
दयाळू थोडेच आहेत. जेव्हा कोणी दुःखी होतात तेव्हा त्यांच्यावर दया केली पाहिजे.
दयाळू तर एक बाबाच आहेत. बाबाच येऊन पत्थर-बुद्धी असणाऱ्यांना पारस-बुद्धी बनवतात.
आता तुम्ही देवता बनत आहात. ही आहेच मुळी नरापासून नारायण बनण्याची पाठशाळा. हा
राजयोग आहे. ऋषी-मुनी हे जाणत नाहीत की, गीतेचा राजयोग कोणी शिकवला. गीतेचे पूर्णपणे
खंडन केले आहे. समजतात - श्रीकृष्णाने राजयोग शिकवला होता. म्हणतात - श्रीकृष्ण
भगवानुवाच मनमनाभव. आता श्रीकृष्ण काही परमात्मा तर नाहीये. तो तर सतयुगाचा प्रिन्स
आहे. जो संगमयुगावर राजयोग शिकून राजाई प्राप्त करतो. त्याला मग भगवान बनवले आहे.
असंख्य मनुष्य गीता ऐकतात. परंतु एकालाही हे ठाऊक नाही की गीतेचा भगवान शिव आहे,
श्रीकृष्ण नाही. म्हणतात - सगळे एकच आहेत. अशा लोकांसमोर देखील डोकेफोड करावी लागते.
६३ जन्मांपासून हेच समजत आले आहेत की, श्रीकृष्ण भगवान आहे. द्वापर पासून शास्त्रे
बनली आहेत. तर जरूर सर्वप्रथम गीता बनली असेल. ही सर्व शास्त्रे भक्तिमार्गाची आहेत.
ज्ञानमार्गाचे एकही शास्त्र नाही. सर्वात पहिली आहे - गीता. त्यानंतर मग ही
वेद-उपनिषदे बनली आहेत. ती देखील सर्व गीतेची मुलेबाळे आहेत. ते शिकत-शिकत खालीच
उतरत आले आहेत. आता ८४ जन्म पूर्ण झाले आहेत. आता पहिल्या नंबरवर जायचे आहे. आता
तुम्ही पुन्हा सतयुगी लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी इथे शिकण्याकरिता आला आहात. सगळेच
काही लक्ष्मी-नारायण बनणार नाहीत, ही राजधानी स्थापन होत आहे. परंतु राजधानी कोणी
स्थापन केली हे कोणालाही कळणार नाही. कलियुगामध्ये इतके असंख्य मनुष्य आहेत ज्यामुळे
पोट भरण्यासाठी अन्न देखील मिळत नाही, आणि सतयुगामध्ये फक्त लक्ष्मी-नारायणाची
राजधानी असेल. इथे बघा किती धर्म आहेत. समोर महाभारी महाभारत लढाई उभी आहे, तरी
देखील लोकांचे डोळे उघडत नाहीत. तर ही महाभारत लढाई कल्पापूर्वी देखील लागली होती,
त्याच्यानंतर काय झाले, काहीच जाणत नाहीत. या सर्व गोष्टी तुम्ही
ब्राह्मण-ब्राह्मणीच जाणता. तुम्हाला बाबांनी ब्रह्मा द्वारे ॲडॉप्ट केले आहे.
भगवान तुम्हाला शिकवून असे लक्ष्मी-नारायण बनवत आहेत, तर व्यवस्थित शिकले पाहिजे
ना. फक्त बाबांची आणि नवीन दुनियेची आठवण करा, म्हणजे मग तुम्ही नवीन दुनियेमध्ये
निघून जाल. आणि मग जर चांगल्या प्रकारे शिकाल आणि शिकवाल तर राजा-राणी बनू शकता;
जितकी तुम्ही रूहानी सेवा कराल. तुम्ही आहात रूहानी सोशल वर्कर (आत्मिक समाजसेवक).
बाकी सारी दुनिया आहे भौतिक सोशल वर्कर. तुम्हा आत्म्यांना बाबा दररोज ज्ञान देतात.
आत्म्यांची सेवा करतात ना. त्याला म्हटले जाते आत्म्यांची सेवा, जे शिकवतात देखील
स्पिरिच्युअल फादर. ही आहे मनुष्याला देवता बनविण्याची पाठशाळा. बनतील देखील जरूर.
जेव्हा तुम्ही शिकून तयार व्हाल तेव्हा विनाश सुरू होईल आणि मग तुम्ही देखील निघून
जाल. म्हणतात ना - ‘राम गयो, रावण गयो…’ फार थोडे मागे राहतात जे मग अदली-बदली होत
राहतात. मग तुम्ही स्वर्गामध्ये याल. तुमच्यासाठी आता नवीन दुनिया स्थापन होत आहे,
तुम्ही स्वर्गवासी बनण्याकरिता शिकत आहात. हा नरक आहे. आता तुम्ही आहात संगमावर. आता
तुम्ही ब्राह्मण-ब्राह्मणी बनला नाहीत तर वारसा घेऊ शकणार नाही. वारसा ब्राह्मणांना
मिळतो, जे एका बाबांशिवाय इतर कोणत्याही देहधारीची आठवण करत नाहीत. बाकी थोडेफार
काहीतरी ऐकले आहे ते मग प्रजेमध्ये येतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रुहानी
सोशल वर्कर बनून शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. बाबांसोबतच येणाऱ्या नवीन दुनियेची
देखील आठवण करायची आहे.
२) बाबांसारखे दयाळू
बनून सर्वांना पारस-बुद्धी बनविण्याची सेवा करायची आहे.
वरदान:-
निराकार सो
साकार या मंत्राच्या स्मृतीमध्ये सेवेचा पार्ट बजावणारे रुहानी सेवाधारी भव
जसे बाबा निराकार सो
साकार बनून सेवेचा पार्ट बजावतात, तसा तुम्हा मुलांना देखील या मंत्राचे यंत्र
स्मृतीमध्ये ठेवून सेवेचा पार्ट बजावायचा आहे. ही साकार सृष्टी, साकार शरीर एक
स्टेज आहे. स्टेज आधार आहे, पार्टधारी आधारमूर्त आहे, मालक आहे. या स्मृतीने न्यारे
बनून पार्ट बजावा, म्हणजे मग सेन्स सोबत इसेन्सफूल, रुहानी सेवाधारी बनाल.
बोधवाक्य:-
साक्षी बनून
प्रत्येक खेळाला पाहणारेच साक्षी-दृष्टा आहेत.
हे अव्यक्त इशारे -
ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.
प्रेम आणि शक्ती
जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्रित होतात तेव्हा अति न्यारी आणि अति प्यारी अवस्था
होते, ज्याच्यावर प्रेम असते त्याच्यासारखे बनायचे आहे, हाच प्रेमाचा पुरावा आहे.
परंतु फक्त प्रेम बाळगल्याने तुम्ही संपूर्ण बनणार नाही, प्रेमा सोबतच शक्ती देखील
असेल तर स्वतः संपूर्ण बनून इतरांना देखील संपूर्ण बनवाल.