11-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, दुनियेमध्ये भले इतर कोणाची भीती बाळगू नका, परंतु या बाबांची भीती जरूर बाळगा, भीती बाळगणे अर्थात पापकर्मांपासून सुरक्षित राहणे”

प्रश्न:-
बाबा प्रत्येक मुलाला स्वतःची तपासणी करण्याचे (चार्ट ठेवण्याचे) श्रीमत का देतात?

उत्तर:-
कारण ईश्वरीय कायदे अतिशय कडक आहेत. जर ब्राह्मण बनून छोट्या-मोठ्या चुका झाल्या तर खूप कठोर सजा भोगावी लागेल, म्हणून बाबा म्हणतात - स्वतःवर लक्ष ठेवा. जर कोणताही कर्मांचा जुना हिशोब बाकी राहिला, तर मानी आणि मोचरा खावा लागेल (सजा भोगून मग पद मिळेल). आता कयामतची (महाविनाशाची) वेळ अत्यंत जवळ आहे त्यामुळे आपले सर्व हिशोब योगबलाने चुकते करा.

ओम शांती।
बाबांच्या आठवणीमध्ये तर मुले स्वतःहूनच राहतात. वारंवार सांगण्याचीही गरज पडत नाही. बाबांचे डायरेक्शन आहे की चालता-फिरता, उठता-बसता बाबांची आठवण करा, म्हणजे मग रावण ज्याने तुम्हाला पतित बनवले आहे, त्याच्यावर विजय प्राप्त कराल. तुम्हाला कोणतेही शस्त्र इत्यादी देत नाहीत, फक्त योगबलाने तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता. विजय मिळवायचा आहे जरूर आणि संगमावरच प्राप्त करता, ज्यावेळी रावणाचे राज्य संपुष्टात येऊन, राम-राज्याची स्थापना होणार आहे. बाबा हिंसा तर कधी शिकवू शकत नाहीत. देवतांचा आहेच - अहिंसा परमोधर्म. दुनिया हे जाणत नाही की, तिथे काम-कटारीची हिंसा होत नाही. जे कल्पापूर्वी निर्विकारी बनले असतील, तेच तुमच्या गोष्टींना मानतील. आता तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात. गायले देखील गेले आहे - ‘शिव शक्ती सेना’. तुम्ही आहात गुप्त योद्धे, प्रत्येक जण स्वतःसाठी करत आहेत. मायाजीत, जगतजीत बनायचे आहे. तुम्ही स्वतःसाठी करता, अर्थात आपल्या भारत देशासाठी करता. यामध्ये जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात ते प्राप्त करतात. जे ५ विकारांवर विजय मिळवतील तेच जगतजीत बनतील, बाकी कोणत्या गोष्टीवर विजय मिळवायचा नाहीये. तुमचे आहेच रावणाच्या राज्यावर विजय प्राप्त करणे अर्थात दैवी गुण धारण करणे. दैवी गुण धारण केल्याशिवाय सतयुगामध्ये जाऊ शकत नाही. तर स्वतःला विचारायचे आहे की, मी कितपत दैवी गुण धारण केले आहेत? दैवी गुण धारण करणे अर्थात रावणावर विजय प्राप्त करणे. म्हणतात - रामराज्य होते तर केवळ एका रामानेच तर राज्य केले नसेल? प्रजा सुद्धा तर असेल. येथे राजा, राणी तसेच प्रजा सर्वजण रावणावर विजय प्राप्त करत आहेत. दैवी गुण धारण करत आहेत. दैवीगुणांमध्ये खाणे-पिणे, बोलणे-चालणे सर्व शुद्ध-पवित्र असते. प्रत्येक गोष्टीमध्ये खरे काय ते सांगायचे आहे. बाबा आहेतच सत्य. तर अशा बाबांशी किती सच्चे बनून (प्रामाणिक बनून) राहिले पाहिजे. जर सच्चे बनला नाहीत तर किती वाईट गति होईल! उच्च गति प्राप्त केली पाहिजे. नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनायचे आहे. म्हटले देखील

जाते - ‘तुम्हरी गत मत तुम ही जानो’. बाबा जे मत देतात, त्याद्वारे किती उच्च गति होते. उच्च ते उच्च बाबा उच्च ते उच्च गति प्राप्त करून देतात. तर आता श्रीमतावर चालून दैवी गुण धारण करायचे आहेत. जन्म-जन्मांतरीची पापे योगबलाशिवाय भस्म होऊ शकणार नाहीत, यासाठी आठवणीची यात्रा खूप चांगली पाहिजे. चांगली आठवण राहील - अमृतवेलेला. त्यावेळी वायुमंडळ खूप चांगले असते. दिवसा भले कितीही वेळ बसा, परंतु अमृतवेलेसारखा वेळ नाही.

आपल्या गोष्टी गुप्त आहेत. इंग्रजीमध्ये म्हणतात - “वुई आर ॲट वार”, आपले युद्ध आहे - रावणासोबत. हा पहिल्या नंबरचा शत्रू आहे. राम संप्रदायाने, रावण संप्रदायावर श्रीमताद्वारे विजय प्राप्त केला आहे. बाबा सर्वशक्तिमान आहेत ना. दुनिया तर बिचारी यावेळी घोर अंधारामध्ये आहे. त्यांना हेच ठाऊक नाहीये की, आपण हार खाल्ली आहे. मायेकडून हार खाणे अर्थात पराभव होणे आहे,

माया कोणाला म्हटले जाते - हे देखील कोणीही जाणत नाही. साऱ्या लंकेवर रावणाचे राज्य होते. शास्त्रांमध्ये भक्तिमार्गाच्या किती दंतकथा लिहून ठेवल्या आहेत, ज्या जन्म-जन्मांतर वाचल्या आहेत. आता देखील म्हणतात की, शास्त्रे तर जरूर वाचली पाहिजेत, जे वाचत नाहीत त्यांना नास्तिक म्हटले जाते; आणि बाबा म्हणतात - तुम्ही हे सर्व वाचत-वाचत नास्तिक बनला आहात. मुलांनी या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या पाहिजेत की भारत जेव्हा सतोप्रधान होता तेव्हा त्याला स्वर्ग म्हटले जात असे. तेच भारतवासी ८४ जन्म घेत-घेत आता पतित तमोप्रधान बनले आहेत. आता पुन्हा पावन कसे बनतील. बाबा म्हणतात - माझी आठवण करा, तर सतोप्रधान पावन बनाल; इतर कोणत्याही देहधाऱ्याची आठवण करू नका, कोणाला गुरू बनवू नका. म्हटले जाते गुरुविना घोर अंधार. असंख्य गुरू आहेत. परंतु सर्व अंधारामध्ये घेऊन जाणारे आहेत. बाबा म्हणतात - ज्ञानसूर्य जेव्हा येतील तेव्हा घोर अंधार दूर होईल. संन्यासी भले पावन बनतात परंतु जन्म तर विकारामधूनच घेतात ना. देवी-देवता काही विकारातून जन्म घेत नाहीत. इथे सर्वांची शरीरे मूत-पलीती (विकाराने मलीन झालेली) आहेत. बाबा असे मूत-पलीती कपडे (अशी मलीन आत्मा) स्वच्छ करतात. आत्मा पवित्र बनेल तेव्हा मग शरीरही चांगले मिळेल. त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. स्वतःवर लक्ष ठेवायचे आहे - माझ्याकडून कोणते वाईट काम तर होत नाही ना! ईश्वरीय कायदे देखील कडक आहेत. कोणी वाईट काम केले तर त्याची खूप कठोर शिक्षा आहे. कयामतचा (महाविनाशाचा) काळ आहे. सर्व हिशोब योगबलाद्वारे चुकते करायचे आहेत. जर चुकतू केले नाहीत तर मोचरा खावा लागेल (सजा खावी लागेल). मग म्हटले देखील जाते - मोचरा आणि मानी (सजा आणि भाकरी). मानी (भाकरी) तर प्रत्येकाला मिळणार आहे. मुक्ती आणि जीवनमुक्तीची मानी सर्वांना देतील. कोणी पास विद् ऑनर होतील, तर कोणाला मोचरा मिळेल आणि मग थोडी मानी मिळेल, अपमानास्पद रीतीने. तख्तावर तर ते बसू शकणार नाहीत. कोणतेही वाईट काम केले तर बेइज्जती (मानहानी) होईल, ती देखील बाबांसमोर. शिवबाबा बसले आहेत ना. तुम्हाला साक्षात्कार करवतील की, मी यामध्ये होतो, तुम्हाला किती समजावून सांगत होतो. आता मी संपूर्णमध्ये (ब्रह्मामध्ये) आहे. तुम्ही मुली संपूर्ण बाबांकडे जाता. त्यांच्याद्वारे शिवबाबा डायरेक्शन इत्यादी देतात ना. तुम्हाला बाबा साक्षात्कार करवतील की यांच्यामध्ये बसून तुम्हाला किती शिकवत होतो, समजावून सांगत होतो की दैवी गुण धारण करा, सेवा करा. कोणाची निंदा करू नका. तरी देखील तुम्ही ही कामे केली आहेत, आता खा शिक्षा. जितकी म्हणून पापे केली असतील तेवढी सजा भोगावी लागेल. कोणी खूप सजा खातात, कोणी कमी. त्यामध्ये देखील नंबरवार आहेत, जितके होईल तितके योगबलाने विकर्मांना नष्ट करत राहायचे आहे. सर्वात मोठी हीच आकांक्षा ठेवायची आहे की, आता आपण संपूर्ण पक्के सोने कसे बनावे? उठता-बसता हेच बुद्धीमध्ये राहावे, जितकी आठवण कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. मायेच्या वादळांची पर्वा करायची नाही, जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करायची आहे. मला तमोप्रधानपासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबांची आठवण कराल तर तुमची पापे नष्ट होतील. कोणते पाप देखील करता कामा नये. नाहीतर शंभर पटीने वाढेल. क्षमा मागितली नाहीत तर मग वृद्धि होत-होत शेवटी सत्यानाश होतो. माया पापा मागून पाप करवून घेत राहील. बेहदच्या बाबांकडून बेअदबी (अपमान) होतो. हे देखील बऱ्याच जणांना समजत नाही. बाबा नेहमी समजावून सांगतात की, असे समजा की शिवबाबा मुरली चालवत आहेत. शिवबाबा डायरेक्शन देतात तर आठवणही राहावी, भीती देखील राहावी. खूप पाप करत राहतात. स्पष्ट बोलले पाहिजे की बाबा, माझ्याकडून ही-ही चूक झाली. बाबा म्हणतात - डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे. जे काही केले आहे ते सांगा. खरे काय ते सांगितल्याने अर्धे माफ होईल.

बाबांनी समजावून सांगितले आहे - जे नंबरवन पुण्य-आत्मा बनतात, तेच मग पाप-आत्मा देखील नंबरवन बनतात. बाबा स्वतः सांगतात - तुमचा अनेक जन्मांमधील हा अंतिम जन्म आहे. तुम्ही पुण्य-आत्मा होतात, आता पाप-आत्मा बनला आहात; आता पुन्हा पुण्य-आत्मा बनायचे आहे. आपले कल्याण तर करायचे आहे. इथे तुम्हाला डोके टेकवण्याची सुद्धा गरज नाही, फक्त बाबांची आठवण करायची आहे. भले हे देखील वयोवृद्ध आहेत, नमस्ते करतात. मुले घरामध्ये थोडेच सारखे-सारखे नमस्ते करतात. एकदा नमस्ते केले मग प्रतिसादामध्ये देखील केले जाते. बाबा म्हणतात - तुम्ही मला मोठे समजून नमस्ते करता, मी मग तुम्हाला विश्वाचा मालक समजून नमस्ते करतो. अर्थ आहे ना. मनुष्य तर राम-राम म्हणतात, परंतु अर्थ काहीच समजून घेत नाहीत. वास्तविक राम अर्थात शिवबाबा. राम तो रघुपती वाला नाही, हा राम निराकार आहे. त्यांचे नाव आहे - शिवबाबा. शिवाच्या समोर कोणीही असे म्हणणार नाही की, मी रामाची पूजा करतो. आता बाबा म्हणतात - तुम्ही मंदिरांमध्ये जाऊन समजावून सांगा की हे देखील मनुष्यच होते. तुम्ही यांच्या समोर जाऊन महिमा गाता - ‘तुम्ही निर्विकारी, सर्वगुणसंपन्न, आम्ही पापी, नीच आहोत’. हे शरीर देखील मनुष्याचे आहे आणि ते शरीर देखील मनुष्याचे आहे; परंतु त्यांच्यामध्ये दैवीगुण आहेत म्हणून देवता आहेत. तुम्ही स्वतः म्हणता - आमच्यामध्ये आसुरी गुण आहेत म्हणून वानर आहोत. दोघांचाही चेहरा एकच आहे. सीरत मध्ये (वर्तनामध्ये) फरक आहे. भारतवासीच सिरताज (मुकुटधारी) होते. आता नो ताज, गरीब देखील भारतवासीच आहेत. बाबा देखील भारतामध्येच येतात, जिथे स्वर्ग बनणार आहे तिथेच बाबा येतील ना. म्हटले जाते कलंगी अवतार (कल्की अवतार), किती कलंक लावले आहेत. इतर धर्माचे लोक देखील जर काही बोलत असतील, तर ते देखील भारतवासीयांचेच अनुकरण करत आहेत. पत्थर-बुद्धी असल्याकारणाने मला देखील दगड-मातीमध्ये असल्याचे सांगतात. बाबांना जाणतच नाहीत की बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून भारताला किती सिरताज बनवतात. भारताची किती सेवा करतात. बाबा म्हणतात - माझी तुम्ही निंदा करता. मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. तुम्ही किती अपकार करता. रावणाने तुमची सद्सद्-विवेक बुद्धीच नष्ट केली आहे. वाईट गति झाली आहे, तेव्हाच तर बोलावता - ‘पतित-पावन या’. स्पष्टीकरण किती सहज मिळते. तरी देखील बरीच मुले विसरून जातात. योग नाही त्यामुळे धारणा देखील होत नाही, म्हणून बाबा म्हणतात बंधनात असणाऱ्या सर्वात जास्त आठवण करतात. शिवबाबांच्या आठवणीमध्ये सहन देखील करतात. भारतवासियांमध्ये जे देवी-देवता बनणारे आहेत तेच इथे येतील. आर्य समाजी तर देवतांच्या मूर्तींना मानत सुद्धा नाहीत. झाडाची शेवटची फांदी आहे, मुश्कीलीने २-३ जन्म असतील.

पुष्कळ माणसे असे समजतात की, विकारा शिवाय दुनिया कशी चालेल. अरे, देवतांना संपूर्ण निर्विकारी म्हटले जाते ना. हे देखील कोणाला माहीत नाहीये की तिथे विकार असतच नाहीत. कल्पापूर्वीचे असणारे लगेचच समजून जातात. गायन देखील आहे - भगवानुवाच, काम महाशत्रु आहे. परंतु भगवंताने हे कधी म्हटले होते - हे कोणालाच माहीत नाही. आता तुम्ही मुले जगतजीत बनत आहात. परंतु उच्च पद प्राप्त करण्यासाठी मेहनत करायची आहे. बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून फक्त बुद्धियोग माझ्याशी लावा. जर का बाबांचे बनला आहात तर बाबांवर प्रेम असायला हवे. बाकी सर्वांशी काम करून घेण्यापुरते प्रेम ठेवायचे आहे. बुद्धीमध्ये हा विचार असला पाहिजे की बिचाऱ्यांना स्वर्गवासी कसे बनवावे. खऱ्या यात्रेवर चालण्याची युक्ती सांगावी. ती आहे भौतिक यात्रा, जी जन्म-जन्मांतर करत आले आहेत. ही एकच आठवणीची यात्रा आहे. आता आपले ८४ जन्म पूर्ण झाले, पुन्हा सतयुगाची हिस्ट्री रिपीट होणार आहे. पतित काही घरी जाऊ शकत नाहीत. पावन बनवण्यासाठी पतित-पावन बाबाच पाहिजेत. भले संन्यासी पावन बनतात परंतु परत घरी जाऊ शकत नाहीत. सर्वांना घेऊन जाणारे बाबाच आहेत. बाबा येऊन सर्वांना रावणाच्या तावडीतून सोडवून मुक्त करून देतात. सतयुगामध्ये दुःख देणारी कोणतीही वस्तू नसते. नावच आहे - सुखधाम. हे आहे - दुःखधाम. तो क्षीर-सागर, हा आहे विषय-सागर.

आता तुम्ही जाणता, स्वर्गामध्ये किती सुखात, आरामात राहतात. क्षीर-सागरामधून निघून विषय-सागरामध्ये कसे येतात, हे कोणीही जाणत नाहीत. बाबा समजावून सांगतात - श्रीमतवर चालायचे आहे, मग जबाबदार ते आहेत. श्रीमत सांगते - हां भले जा, मुलांचा सांभाळ करा. त्यांना भू-भू करत राहा (ज्ञान सांगत राहा), तर थोडेफार कल्याण होईल. स्वर्गामध्ये तर येतील. बाबा येऊन २१ जन्मांसाठी नरकवासीपासून स्वर्गवासी बनवतात. हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. हे (ब्रह्मा बाबा) देखील आधी काहीच जाणत नव्हते. जशी यांच्या ८४ जन्मांची कहाणी आहे - “तत्त्वम्”, हे देखील राजयोग शिकत आहेत. तुम्ही आहात राजऋषी. ते आहेत हठयोग-ऋषी. तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहून राजाई प्राप्त करत आहात. तुम्ही सर्वजण शरणागति घेण्यासाठी आला आहात ना. आता हे (दुनियावाले) समजतात की, आम्ही तर स्वर्गातच बसलो आहोत. दुनियेमध्ये आहे मायेचा भपका. जोपर्यंत नरकाचा विनाश होत नाही तोपर्यंत स्वर्ग कसा होऊ शकतो. मायावी पुरुष यालाच स्वर्ग समजून बसले आहेत. बाबांना नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी किती मेहनत करावी लागते. पूर्ण नरकवासी आहेत. स्वर्गवासी बनतच नाहीत. बाबा किती प्रेमाने समजावून सांगतात. अच्छा!

गोड-गोड मुलांनो, रावणावर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल. त्यासाठी पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) असे कोणतेही काम करायचे नाही ज्यामुळे अपमान होईल. सजा खावी लागेल. मायेच्या वादळांची पर्वा न करता जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करायची आहे. एका बाबांवर खरेखुरे प्रेम ठेवायचे आहे.

2) आपली उच्च गति बनविण्यासाठी सच्च्या बाबांसोबत सच्चे राहायचे आहे. कोणतीही गोष्ट लपवायची नाही.

वरदान:-
सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे बाबांना देऊन सदैव स्वतःची उन्नती करणारे सहजयोगी भव

जी मुले बाबांच्या कार्याला संपन्न करण्याच्या जबाबदारीचा संकल्प घेतात त्यांना बाबा देखील तितकाच सहयोग देतात. फक्त जे काही व्यर्थचे ओझे आहे ते बाबांवर सोडून द्या. बाबांचे बनून, बाबांवर जबाबदाऱ्यांचे ओझे सोपवल्याने सफलता देखील जास्त आणि उन्नती देखील सहज होईल. ‘का’ आणि ‘कसे’, या प्रश्नांपासून मुक्त राहा, विशेष फुलस्टॉपची स्थिती राहावी तेव्हा मग सहजयोगी बनून अतींद्रिय सुखाचा अनुभव करत राहाल.

बोधवाक्य:-
दिल आणि दिमाग (मन आणि बुद्धीमध्ये) ऑनेस्टी असेल तर बाबांचे आणि परिवाराचे विश्वास पात्र बनाल.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

जितकी संपूर्ण स्टेज समीप येत जाईल तितके तुम्ही दुसऱ्यांचे संकल्प रीड करू शकाल, यासाठी स्वतःच्या संकल्पांवर फुल ब्रेक हवा. जे स्वतःच्या संकल्पांना समेटू शकतात तेच इतरांच्या संकल्पांना समजू शकतात. त्यामुळे संकल्पांचा गाशा गुंडाळत चला.