12-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता तुम्ही संगमयुगावर आहात, तुम्हाला या जुन्या कलियुगी दुनियेचा अजिबात विचार येता कामा नये”

प्रश्न:-
बाबांनी मुलांना श्रेष्ठ कर्म करण्याची अथवा कर्मांना सुधारण्यासाठी कोणती विधी सांगितली आहे?

उत्तर:-
आपल्या कर्मांना सुधारण्याकरिता सच्च्या बाबांसोबत नेहमी सच्चे राहा, जर कधी चुकीने देखील एखादे उलटे काम झाले तर ते लगेचच बाबांना लिहून द्या. सच्चाई ने बाबांना ऐकवाल तर त्याचा प्रभाव कमी होईल. अन्यथा वृद्धी होत राहील. जर बाबांकडे समाचार आला तर बाबा त्याला सुधारण्यासाठी श्रीमत देतील.

ओम शांती।
शिवबाबा ब्रह्माद्वारे मुलांना विचारत आहेत की मुलांनो, तुम्ही इथे सकाळपासून बसून काय करत आहात? तुम्ही स्टुडंट तर आहातच. तर जरूर इथे बसून हा विचार करत असाल की आम्हाला शिवबाबा शिकवण्यासाठी आले आहेत. या शिक्षणाद्वारे आम्ही सूर्यवंशी बनणार कारण तुम्ही राजयोग शिकत आहात. विष्णुपुरीचा मालक बनण्यासाठी शिकत आहोत, या विचारामध्ये बसला आहात की कोणाला आपली जबाबदारी, मुले-बाळे, कामधंदा इत्यादीची आठवण येत आहे? बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे की, ही गीता पाठशाळा आहे, आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत आणि आम्ही लक्ष्मी-नारायण अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य बनणार आहोत. हा आहे राजयोग. मुलांच्या बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे की, आपण बाबांकडून डायरेक्ट ऐकून सूर्यवंशी घराण्याचे सभासद बनणार आहोत. लक्ष्मी-नारायणाचे चित्र समोर उभे आहे, आमचे राज्य असेल. दुनियेमध्ये लोकांना हे ठाऊक नाही आहे की, स्वर्ग कशाला म्हटले जाते. तुम्ही मुले म्हणता की, आम्ही आता बाबांकडून स्वर्गातील स्वराज्य विद्या शिकत आहोत. आम्हीच स्वर्गाचे मालक बनणार आहोत. मनातल्या मनात याचे स्मरण करत रहायचे आहे. जसे शाळेमध्ये स्टुडंटच्या बुद्धीमध्ये असते की आपण बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी बनण्याकरिता शिकत आहोत. तुम्हाला एवढे तरी आठवणीत राहते की विसरून जाता? तुम्ही उच्च ते उच्च भगवंताचे स्टुडंट आहात. तुम्हाला उच्च ते उच्च देवता बनविण्यासाठी बाबा शिकवत आहेत, तुम्ही त्यांची मुले आहात. आत्मे या शरीराद्वारे आपल्या भविष्यातील पदाची आठवण करत आहेत की देहाचे नातेवाईक, भौतिक संपत्ती, काम-धंदा यांची आठवण करत आहेत? इथे जेव्हा येता तेव्हा असे समजले पाहिजे की, बेहदचे बाबा आम्हाला बेहदचा मालक बनविण्याकरिता शिकवण्यासाठी येतात. मग तुम्ही राजा-राणी बना नाहीतर प्रजा बना! मालक तर बनता ना. नवीन दुनियेमध्ये आहेच मुळी सूर्यवंशी घराणे. तुम्ही हे तर समजता ना की, आम्ही आमचे साम्राज्य स्थापन करणार आहोत.

बाबा जाणतात की, मुलांना बाहेर राहत असताना, घरदार, शेतीवाडीच्या व्यापामध्ये इतकी बाबांची आठवण राहू शकत नाही. तर इथे जेव्हा येता तेव्हा बाहेरचे सर्व विचार बाहेरच सोडून या. तुम्ही आता त्या कलियुगी दुनियेमध्ये नाहीच आहात, आता तुम्ही संगमावर आहात. कलियुगाला सोडून दिले आहे, बाहेर कलियुग आहे. मधुबन जे खास आहे, हा आहे संगम म्हणून मधुबनचे गायन आहे. इथे या मुरलीचेच चिंतन करायचे आहे. जे ऐकता त्याला रिपीट करा आणि विचार सागर मंथन करा. जितका वेळ मिळेल चित्रांच्या समोर येऊन बसा. यांना बघत राहा आणि शिकत राहा. ब्राह्मणी ज्या स्टुडंट्सना इथे घेऊन येतात त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. खूप काळजी घेतली पाहिजे. जसे टीचर्सना काळजी असते की, जर आपल्या शाळेतील कमी विद्यार्थी पास झाले तर इज्जत जाईल; जेव्हा शाळेतील जास्तीत-जास्त मुले पास होतात, तेव्हा तो टीचर चांगला मानला जातो. ब्राह्मणींना स्टुडंट्सवर लक्ष दिले पाहिजे. इथे तुम्ही जसे संगमावर आला आहात, जिथे डायरेक्ट बाबा ऐकवत आहेत. इथला प्रभाव चांगला आहे. इथे जर तुम्हाला घर-परिवार, कामधंदा आठवत असेल तर बाबा समजतील हे साधारण प्रजा बनतील. आले होते राजा बनण्यासाठी परंतु…; नाहीतर मुलांना आतून खूप आनंद झाला पाहिजे. चित्र देखील तुम्हाला खूप मदत करतात. लोक, आठवण करण्यासाठी अष्ट देवतांची आणि गुरूंची चित्रे (फोटो) देवघरामध्ये ठेवतात. परंतु त्यांची आठवण केल्याने काहीही मिळत नाही. भक्तिमार्गामध्ये जे काही करतात, खालीच उतरत आले आहेत (पतितच बनत आले आहेत). तुम्हा मुलांना उच्च पातळीवर जाण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. घरी शिवबाबांचे चित्र ठेवाल तर वारंवार आठवण येईल. पूर्वी तुम्ही हनुमानाची, श्रीकृष्णाची, रामाची आठवण करत होता. आता शिवबाबा सन्मुख म्हणत आहेत की, माझी आठवण करा. त्रिमूर्तीचे चित्र खूप सुंदर आहे, हे चित्र सदैव खिशामध्ये ठेवून द्या. घडोघडी बघत राहा म्हणजे मग आठवण राहील. बाबा (ब्रह्मा बाबा) भक्त होते, तर ते लक्ष्मी-नारायणाचा फोटो खिशात ठेवत असत. तसेच गादीच्या खाली देखील ठेवत असत, परंतु त्याने मिळाले तर काहीच नाही. आता बाबांकडून भरपूर प्राप्ती होत आहे, त्यांचीच आठवण करायची आहे, यासाठी माया प्रतिकार करते. ज्ञान तर खूप सुंदर ऐकतात आणि ऐकवतात, याबाबतीत वेगाने पुढे जातात; असे म्हणत नाहीत की, ८४ चे चक्र विसरायला होते. असे देखील नाही की, इथे राहणारे जास्ती आठवण करतात. नाही, इथे राहून देखील कितीतरी जण असे आहेत जे धूलछांईची (निरुपयोगी गोष्टींची) आठवण करत राहतात. ज्या बाबांकडून आपण गोरे बनण्यासाठी आलो आहोत त्यांना जाणत सुद्धा नाहीत. मायेची सावली खूप पडते. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. बाबा जाणतात बरीच चांगली-चांगली मुले देखील आठवणीमध्ये राहत नाहीत. योगमध्ये राहिल्यानेच देह-अभिमान कमी होईल, तुमच्यामध्ये खूप मधुरता राहील. देह-अभिमान असल्याने गोड बनत नाहीत, चिडत राहतात. बाबा सर्वांसाठी म्हणत नाहीत; कोणी सपूत मुले देखील आहेत, सुपुत्र त्यांना समजले जाते जे योगमध्ये राहतात. त्यांच्याकडून कोणतीही उलट-सुलट गोष्ट होणार नाही. मित्र-नातेवाईक इत्यादी सर्वांना विसरून जातील. आपण अशरीरी आलो होतो, आता अशरीरी बनून घरी जायचे आहे. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, ज्याद्वारे तुम्ही आपल्या घराला जाणता, राजधानीला देखील जाणता. तुम्ही मुले हे देखील जाणता की, शिवबाबा काही काळे लिंग नाहीये. जसे ते (दुनियावाले) दाखवतात, शिवबाबा तर बिंदू प्रमाणे आहे. आपण हे देखील जाणतो - आपण आता घरी जाणार, तिथे आपण अशरीरी असतो. आता आपल्याला अशरीरी बनायचे आहे. स्वतःला आत्मा समजून पतित-पावन बाबांची आठवण करायची आहे. हे तर समजावून सांगितले जाते की, आत्मा अविनाशी आहे. तिच्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे, त्याचा कधीही अंत होत नाही. थोडा काळ मुक्तीधाममध्ये जाऊन मग पार्टमध्ये यायचे आहे. तुम्ही ऑल राऊंड पार्ट बजावता, हे नेहमी लक्षात राहिले पाहिजे. आता आपल्याला घरी जायचे आहे. बाबांची आठवण केल्याने आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान बनणार. इथे तुम्हाला काही कामधंद्याची आठवण करायची नाहीये.

इथे तुम्ही पूर्णतः संगमयुगावर आहात. आता तुम्ही बोटीमध्ये बसलेले आहात; कोणी मग वाटेतच उतरतात आणि मग अडकून मरतात. यावर देखील शास्त्रांमध्ये एक कहाणी आहे. आता तुम्ही जाणता - आपण पलीकडच्या तीरावर जात आहोत, खिवैया (नाविक) बाबा आहेत. श्रीकृष्णाला खिवैया अथवा बागवान म्हणणार नाही. शिव भगवानुवाच आहे. पतित-पावन शिवबाबा आहेत. श्रीकृष्णाकडे बुद्धी जाऊ शकत नाही. मनुष्यांची बुद्धी तर भटकत राहते, बाबा येऊन भटकण्यापासून सोडवतात. फक्त एवढेच सांगतात - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तेव्हाच तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल’. या गोष्टी विसरता कामा नये. इथून तुम्ही खूप रिफ्रेश होऊन जाता. अनुभव देखील ऐकवता - बाबा, आम्ही पुन्हा होतो तसेच बनतो. मित्र-नातेवाईक इत्यादींचे तोंड पाहतो आणि मग मोहात पडतो. तुम्ही मुले आशिक आहात, कामकाज करत असताना माशुकची आठवण करा तेव्हाच उच्चपद प्राप्त कराल. आत्ता जर पुरुषार्थ केला नाहीत तर सिंगल ताज सुद्धा मिळणार नाही. इथे मुले जेव्हा येतात तेव्हा टाईम वेस्ट करता कामा नये. दुसरे तर अजून इथे काहीच नाहीये. फक्त दिलवाडा मंदिर तुमचे यादगार आहे, ते तुम्ही पाहू शकता. वरती वैकुंठ उभा आहे. तुमचे झाड देखील क्लियर आहे. खाली राजयोग मध्ये बसला आहात, वरती राजाई उभी आहे. हुबेहूब दिलवाडा मंदिर बनले आहे. तुम्ही जाणता - शिवबाबा आम्हाला पुन्हा ज्ञान देऊन स्वर्गाचा मालक बनवत आहेत. या कलियुगाचा विनाश होणार आहे. हे ‘आदि देव’, ‘आदि नाथ’ कोण आहेत. तुम्ही सर्वांच्या ऑक्युपेशनला (चरित्राला) जाणता ना. या वेळची चर्चा मग भक्तिमार्गामध्ये चालते. सण, व्रतवैकल्ये ही सर्व यावेळची आहेत. खरे व्रत आहे - मनमनाभव. बाकी निर्जल राहणे, उपवास करणे, हे काही व्रत नाही आहे. दुनियेमध्ये यावेळी मायेचा भपका खूप आहे. यापूर्वी ही लाईट, गॅस इत्यादी काहीच नव्हते; नंतर निघाले आहेत. १०० वर्षे झाली आहेत, यामध्ये मनुष्य अडकून पडले आहेत. म्हणतात - आमच्यासाठी स्वर्ग इथेच आहे. मायेचा इतका प्रभाव आहे ज्यामुळे बाबांची अजिबात आठवणच करत नाहीत. म्हणतात - ‘तुम्ही येऊन बघा, आम्ही कसे स्वर्गामध्ये बसलो आहोत’. आता स्वर्गाच्या समोर तर हे काहीच नाही. कुठे स्वर्ग, कुठे नरक. स्वर्गातील एकही गोष्ट इथे असू शकत नाही. तिथे प्रत्येक गोष्ट सतोप्रधान असेल. तिथल्या गायी देखील फर्स्टक्लास असतील. तुम्ही देखील फर्स्टक्लास बनता तर तुमचे राहणीमान, खाणे-पिणे इत्यादी सर्व फर्स्टक्लास असते. सूक्ष्मवतनमध्ये तुम्ही फळे इत्यादी पाहून येता ना. नावच देतात शुबीरस. दुनियेतील लोकांना तर हे देखील ठाऊक नाहीये की स्वर्ग आहे कुठे? तिथे सर्व काही सतोप्रधान असते. तिथे अशी ही माती इत्यादी उडत नाही. दुःखाची तर कोणती गोष्टच नाही. परंतु मुलांना अजूनही हा नशा चढत नाही की, बाबा आम्हाला स्वर्गाचा मालक बनविण्यासाठी हे शिक्षण देत आहेत. चित्र किती स्पष्ट आहेत. चित्रे तयार करण्यासाठी वेळ तर लागतो. बाबा सर्व काही सेवेनिमित्त बनवून घेतच राहतात. परंतु काही जण तर आपल्या कामधंद्यामध्ये इतके अडकलेले आहेत जे बाबांची आठवण सुद्धा करत नाहीत. प्रदर्शनीच्या चित्रांचे एक मॅगझीन देखील आहे, ते देखील वाचले पाहिजे. गीतेचे जे नियमी असतात (गीतेच्या नियमांचे पालन करणारे असतात) ते कुठेही जातील तेव्हा गीता जरूर वाचतील. आता तुम्हाला खरी गीता चित्रांसहित मिळाली आहे. आता चांगल्या प्रकारे मेहनत केली पाहिजे. नाहीतर उच्चपद प्राप्त करू शकणार नाही; आणि मग जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा हाय-हाय करावे लागेल. परीक्षा संपली की मग पुढच्या वर्गामध्ये नंबरवार बसतात. इथे देखील जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा नंबरवार रुद्रमाळा, नंतर मग विजयी माळेमध्ये जाल. स्कूलमध्ये कोणी मुले नापास होतात तेव्हा किती दुःखी होतात. तुमची आहे कल्पकल्पांतरीची बाजी.

बरीच मुले, मॅगझीन पूर्णपणे वाचत नाहीत. मुलांनी मॅगझीन वाचून सेवा केली पाहिजे. लिहितात - बाबा, अमकीची बदली करा, चांगली ब्राह्मणी पाठवा. काही जणांचे तर ब्राह्मणीवर इतके प्रेम होते की ब्राह्मणीची बदली झाली की कोसळतात. सेंटरवर यायचेच सोडून देतात. एखादे उलटे काम झाले तर सच्चाईने ताबडतोब बाबांना लिहिले पाहिजे, म्हणजे मग त्या पापाचा प्रभाव कमी होईल. नाहीतर वृद्धी होत जाईल. बाबा सुधारण्यासाठी सांगतात परंतु कोणाला सुधारायचेच नसेल तर पाप-कर्म करणे सोडतच नाहीत. भाग्यामध्ये नाही, त्यामुळे मग बाबांना खरा समाचार देत नाहीत. बाबांकडे रिपोर्ट आल्याने सुधारण्याचा प्रयत्न करतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अशरीरी बनण्याचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. कोणतीही उलटी-सुलटी गोष्ट करायची नाही. अतिशय गोड बनायचे आहे. कोणत्याही गोष्टीवरून चिडायचे नाही.

२) मुरलीचे चिंतन करायचे आहे. जे ऐकता त्यावर विचार सागर मंथन करायचे आहे. ‘मनमनाभव’चे व्रत घ्यायचे आहे.

वरदान:-
नेहमी देह-अभिमान आणि देहाची दुर्गंधी यापासून दूर राहणारे इंद्रप्रस्थ निवासी भव

असे म्हणतात की इंद्रप्रस्थमध्ये पऱ्यांशिवाय इतर कोणीही मनुष्य निवास करू शकत नाही. मनुष्य अर्थात जे स्वतःला आत्मा न समजता, देह समजतात. तर देह-अभिमान आणि देहाची जुनी दुनिया, जुन्या नात्यांपासून सदैव वरती उडत राहा. जरा देखील मनुष्यपणाची दुर्गंधी नसावी. देही-अभिमानी स्थितीमध्ये राहा, ज्ञान आणि योगाचे पंख मजबूत असावेत तेव्हाच म्हणणार इंद्रप्रस्थ निवासी.

बोधवाक्य:-
आपल्या तन, मन, धनाला सफल करणे अथवा सर्व खजिन्यांना वाढवणारेच खरे बुद्धिमान आहेत.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

संपूर्णता नंबरवार असेल. माळेचे १०८ मणी आहेत, त्यामध्ये पहिला नंबरचा मणी आणि १०८ वा मणी दोघांनाही संपूर्ण अथवा विजयी रत्न तर म्हणणार. विजयी रत्न अर्थात आपल्या नंबरप्रमाणे संपूर्णत्वाला प्राप्त झालेले, त्यांच्यासाठी संपूर्ण ड्रामामध्ये तीच संपूर्णत्वाची पहिली स्टेज आहे.