13-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, या ड्रामामध्ये तुम्ही हीरो हीरोइन पार्टधारी आहात, साऱ्या कल्पामध्ये तुमच्यासारखा हिरो पार्ट इतर कोणाचाही नाही”

प्रश्न:-
मनुष्यापासून देवता बनण्याची परीक्षा कोण पास करू शकतात?

उत्तर:-
जे फॉलो फादर करून पित्यासमान पवित्र बनतात तेच ही परीक्षा पास करू शकतात. २१ जन्मांचा बेहदचा वारसा मिळतो आहे तर जरूर थोडीशी मेहनत करावी लागेल. आता जर मेहनत केली नाहीत तर कल्पकल्पांतर करणार नाही आणि मग उच्चपद कसे काय प्राप्त कराल. पवित्र बनाल तर चांगले पद मिळवाल, अन्यथा सजा खावी लागेल.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांशी बाबा समोरासमोर बोलत आहेत. मुले समजत असतील - आमच्याशी बेहदचे बाबा बोलत आहेत, जे सर्वात अति गोड आहेत. बाबा देखील गोड आहेत, टीचर देखील गोड आहेत कारण दोघांकडूनही वारसा मिळतो. गुरुकडून भक्तीचा वारसा मिळतो. इथे तर एकाच कडून तिन्ही वारसे मिळतात. आनंद देखील होतो. तुम्ही त्यांच्या सन्मुख बसला आहात. तुम्ही जाणता बेहदचे बाबा ज्यांना पतित-पावन म्हटले जाते, तेच मनुष्य-सृष्टीचे बीजरूप आहेत. ते बीज जड असते, हे आहे चैतन्य. याला सत् चित् आनंद स्वरूप म्हटले जाते आणि मग त्यांची महिमा देखील आहे. ते ज्ञानाचा सागर आहेत परंतु त्यांच्याकडून कोणते नॉलेज मिळते हे कोणालाच ठाऊक नाहीये. तुम्ही जाणता ज्यांना बाबा नॉलेज देत आहेत, तेच भक्तिमार्गामध्ये यांची मंदिरे बांधतात, शास्त्रे इत्यादी बनवतात. हे देखील तुम्ही जाणता की, खरोखर दर ५ हजार वर्षानंतर हा कल्पाचा संगम येतो. याला म्हटले जाते रुहानी अविनाशी पुरुषोत्तम संगमयुग. असे तर उत्तम पुरुष भरपूर आहेत. परंतु ते एका जन्मामध्ये उत्तम पुरुष बनतात, आणि मग मध्यम, कनिष्ठ बनतात. हे लक्ष्मी-नारायण पाहा किती उत्तम पुरुष आहेत. हे आहेत पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तमणी. असे दोघांनाही उत्तम कोणी बनवले? गायले जाते - उच्च ते उच्च भगवान आहेत, ते वरती राहतात. मनुष्य-सृष्टीमध्ये उच्च ते उच्च हे विश्व महाराजा-महाराणी आहेत. उच्च ते उच्च भारतामध्ये राज्य करत होते. आता हे राज्य त्यांनी कसे प्राप्त केले! हे कोणालाच ठाऊक नाही. असे बाबा जे तुम्हाला इतके श्रेष्ठ बनवतात, ते किती गोड वाटले पाहिजेत. त्यांच्या मता प्रमाणे चालले पाहिजे. असा श्रेष्ठ विश्वाचा मालक बनविणारे बाबा शिकवतात किती साधारण रीतीने. हे देखील तुम्ही जाणता की बेहदचे बाबा भारतामध्येच येतात. शिवजयंती देखील साजरी करतात. येऊन भारताला स्वर्ग बनवतात. आता स्मृती आली आहे की, आपण स्वर्गवासी ८४ जन्म उपभोगून नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा स्वर्गवासी बनविण्याकरिता बाबा आलेले आहेत. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल. सतोप्रधान बनल्याशिवाय परत कोणीही जाऊ शकत नाही; नाहीतर सजा खावी लागेल. सजा देखील आत्म्याला मिळते ना. गर्भ-जेलमध्ये शरीर धारण करायला लावून मग सजा देतात. मुलांना खूप दुःख भोगावे लागते, त्राही-त्राही करतात; म्हणतात - पुन्हा असे पाप करणार नाही. तुम्हा मुलांना तर गर्भ-जेलमध्ये जायचे नाहीये. तिथे गर्भ-महाल आहेत, कारण तिथे पाप होत नाही. इथे रावणराज्यामध्ये पाप होते तेव्हाच तर रामराज्याची मागणी करतात. परंतु हे जाणत नाही की, रावण राज्य काय चीज आहे. जाळतात तर नष्ट झाला पाहिजे. पुन्हा-पुन्हा जाळत राहतात, म्हणजे मेलेला नाहीये. मग हे सर्व करून फायदा तरी काय? ते लोक जाऊन लंका लुटून येतात. एका झाडाला रोग लागतो, त्याला सोने समजून घेऊन येतात. वास्तविक तुम्ही यावेळी रावणावर विजय प्राप्त करता आणि गोल्डन एज्डचे (सतयुगाचे) मालक बनता. अजमेरमध्ये वैकुंठाचे मॉडेल बनवले आहे. आता तुम्ही जाणता - बाबा आलेले आहेत मुलांना पुन्हा स्वर्गाचा मालक बनविण्याकरिता. हिरे-माणकांच्या महालांमध्ये आपण राज्य करणार.

आता तुम्ही मुले योग बलाद्वारे निर्विकारी सतोप्रधान बनता. आत्मा संपूर्ण निर्विकारी बनून मग शांतीधाममध्ये निघून जाईल, तिथे दुःखाची गोष्ट नसते. बाबांनी समजावून सांगितले आहे - या नाटकामध्ये तुमचा

सर्वात मोठा मुख्य पार्ट आहे

- हिरो-हिरॉईनचा. राज्य घेणे आणि गमावणे - हा खेळ आहे. हिरो-हिरॉईन तुम्ही आहात. हिरो याचा अर्थ आहे - मुख्य पार्टधारी. तुम्ही गोल्डन एज्ड मध्ये पवित्र गृहस्थ आश्रम मध्ये राहत होता. आयर्न एज्ड मध्ये अपवित्र गृहस्थ व्यवहार आहे. आता बाबा गोल्डन एज्ड मध्ये घेऊन जातील. तिथे लक्ष्मी-नारायण सूर्यवंशींचे राज्य असेल. ते पुनर्जन्म घेत चंद्रवंशीमध्ये येतील, वृद्धी होत राहील. आता किती करोड झाले आहेत. आता म्हणतात जन्मदर कमी व्हावा. ज्यांना एक-दोन मुले असतील ते थोडेच मुले होणे थांबवतील. आता तुम्ही माहिती देऊ शकता की, लोकसंख्या कमी करणे हे तर बाबांवरतीच आहे. बाबा जाणतात, लोकसंख्या वाढेल तेव्हाच तर मरतील. मी आलो आहे सर्वांना खलास करून एका धर्माची स्थापना करण्यासाठी. तिथे ९ लाख असतील; तर छू मंतर झाले ना. कलियुग रूपी रात्र संपून दिवस सुरू होईल. बर्थ कंट्रोलवर किती खर्च करतात. बाबांचा काहीच खर्च नाही. नैसर्गिक आपत्ती येतील आणि सर्व काही नष्ट होईल, ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ते लोक (दुनियावाले) जो प्लॅन बनवत आहेत, तो देखील ड्रामामध्ये नोंदलेला आहे. युरोपवासी यादव एका बाजूला, तर या बाजूला भारतवासी कौरव आणि पांडव दोघे भाऊ-भाऊ आहेत. भारतामध्ये भाऊ-भाऊ आहेत. जे आता कलियुगामध्ये भाऊ-भाऊ आहेत, तुम्ही आता तिथून बाहेर पडून संगमावर आला आहात. कौरव आणि पांडव एकाच घरातील होते. आत्मा खरे तर भाऊ-भाऊ आहेत. सर्वात पहिले तुम्हा आत्म्यांनाच बाबा भेटले आहेत. शर्यतीमध्ये जे सर्वात पहिले पोचतात ते बक्षीस घेतात. तुमची आहे आठवणीची शर्यत. हे कोणत्या शास्त्रांमध्ये नाहीये. बाबा म्हणतात - माझ्यासोबत योग ठेवा. या ‘योग’ची यात्रा यावेळीच असते. ही यात्रा इतर कोणीही शिकवू शकत नाही. सतयुगामध्ये ना रुहानी योग असतो, ना भौतिक योग असतो; तिथे तर याची गरजच नाही. यावेळी तुमच्या बुद्धीमध्ये पक्के होते. ड्रामामध्ये प्रत्येक सेकंदाचा ॲक्ट सांगितला गेला आहे. याला स्वदर्शनचक्र म्हटले जाते. वास्तविक स्वदर्शनचक्रधारी आता तुम्ही बनता. ८४ जन्मांचे अथवा सृष्टीचक्राचे नॉलेज तुम्हाला आहे. स्व अर्थात आत्मा. आत्म्याला हे ज्ञान आहे तर आता तुम्ही मुले स्वदर्शनचक्रधारी बनला आहात. मी तुम्हाला म्हणेन - रूहानी मुलांनो, स्वदर्शनचक्रधारी ब्राह्मण कुलभूषण. या शब्दांचा अर्थ कोणीही नवीन व्यक्ती समजू शकणार नाही. हे अलंकार तुम्हाला देत नाहीत कारण तुमच्यापैकी कितीतरी भागन्ती होतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये ८४ चे चक्र आहे. आता नंबर वनमध्ये जाल. पहिले घरी जाऊन मग देवता बनाल. त्यानंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनाल. किती समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. इतकी जरी कोणी आठवण केली तरी अहो सौभाग्य! बाकी थोडा वेळ राहिला आहे, नंतर मग स्वर्गामध्ये जाल. बाकी शास्त्रांमध्ये तर अनेक दंतकथा लिहिल्या आहेत. कृष्ण जो सर्वांचा इतका लाडका आहे, त्याच्यासाठी लिहिले आहे - ‘सापाने डंख मारला, असे झाले…’ राधेपेक्षाही श्रीकृष्ण लाडका वाटतो कारण त्याने मुरली वाजवली आहे. वास्तविक ही आहे ज्ञानाची गोष्ट. तुम्ही यावेळी ज्ञान-ज्ञानेश्वरी आहात. आणि मग शिकून राज-राजेश्वरी बनता. हे आहे एम ऑब्जेक्ट. तुम्हाला काही जण विचारतात की, इथला उद्देश्य कोणता आहे? तर तुम्ही बोला, मनुष्यापासून देवता बनवणे. आम्हीच सो देवता होतो. ८४ जन्मांनंतर शूद्र बनलो, आता पुन्हा ब्राह्मण बनलो आहोत, नंतर देवता बनणार. शिकवणारा ज्ञानाचा सागर परमात्मा आहेत, श्रीकृष्ण नाही. हा राजयोग इतर कोणीही शिकवू शकत नाही. तुम्ही म्हणता - बाबा, आम्ही कल्प-कल्प येऊन तुमच्याकडून राज्य-भाग्य घेतो. हे देखील तुम्ही जाणता. या महाभारी लढाई द्वारेच स्वर्गाचे गेट उघडणार आहे. बाबा येऊन राजयोग शिकवत आहेत तर जरूर स्वर्ग पाहिजे. नरक नष्ट झाला पाहिजे. ही महाभारत लढाई शास्त्रांमध्ये आहे.

(खोकला आला) हा खोकला कोणाला येतो? शिवबाबांना की ब्रह्मा बाबांना. (ब्रह्मा बाबांना) हा कर्मभोग आहे. शेवटपर्यंत होत राहील, जोपर्यंत संपूर्ण बनत नाहीत. नंतर मग हे शरीर देखील राहणार नाही, तोपर्यंत काही ना काही होत राहील; याला कर्मभोग म्हटले जाते. सतयुगामध्ये कर्मभोग असत नाहीत. कोणताही आजार इत्यादी होत नाही. आपण एव्हरहेल्दी, एव्हरवेल्दी बनतो. सदैव हर्षित राहतो कारण बेहदच्या बाबांकडून वारसा मिळतो. मग अर्ध्याकल्पा नंतर दुःख सुरू होते. ते देखील जेव्हा भक्ती व्यभिचारी होते तेव्हा जास्त दुःख होते, तेव्हा त्राही-त्राही करतात आणि मग विनाश होतो. आता तुम्ही सन्मुख ऐकत आहात तर किती मजा येते. तुम्ही जाणता हे आमचे खरे पिता, खरा टीचर, खरा सद्गुरु आहेत. ही महिमा एका निराकार बाबांचीच आहे. ते आहेत उच्च ते उच्च भगवान. त्या बाबांची आठवण करा तर उच्चपद प्राप्त कराल. हे कोणी साधु-संत महात्मा तर तख्तावर बसत नाहीत. कधी पाया पडायला देखील देत नाहीत. बाबा म्हणतात - मी तुमचा ओबिडियन्ट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवक) आहे. मला पाय कुठे आहेत? तुम्ही डोके कशावर टेकवणार? अनेक गुरूंसमोर डोके टेकवून-टेकवून तुमचे कपाळ झिजले आहे. जे भक्तिमार्गामध्ये होते ते ज्ञानमार्गामध्ये होऊ शकत नाही. भक्तिमार्गामध्ये म्हणतात - ‘हे राम…’ बाबा म्हणतात - इथे काही आवाज करायचा (मंत्र जप करायचा) नाहीये. स्वतःला आत्मा समजून गुप्त बाबांची आठवण करायची आहे. ‘हे शिव…’, असे देखील म्हणायचे नाही. तुम्हाला आवाजापासून परे (दूर) जायचे आहे. मुलांना आतून बाबांची आठवण राहते. आत्मा जाणते की हे आमचे बाबा आहेत. तुम्ही आतून गुप्त आठवण करता याला अ-जपा आठवण म्हटले जाते. जप करायचा नाहीये. माळा मनातल्या मनात जपा नाहीतर बाहेरून जपा, गोष्ट एकच आहे. मनातल्या मनात फिरवणे याला काही गुप्त म्हणता येत नाही. गुप्त गोष्ट आहे - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे. ते शिवबाबा हे प्रजापिता ब्रह्मा. तुम्हाला शृंगार करण्यासाठी डबल इंजिन मिळते. यांची आत्मा (ब्रह्मा बाबांची आत्मा) देखील शृंगार करत आहे. नंतर मग सर्व माहेरी निघून जाल. तिथून मग सासरी विष्णुपुरीमध्ये याल. हे आहे डबल अलौकिक माहेर, ते लौकिक, ते पारलौकिक. या अलौकिक बाबांना कोणीही जाणत नाहीत; तेव्हाच तर म्हणतात - या दादाला (ब्रह्मा बाबांना) का बसवले आहे. हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, यांच्या तनामधून परमात्मा शिकवत आहेत. हे अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये पूज्यपासून पुजारी बनले आहेत. राजापासून रंक बनले आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - यांच्या तनामध्ये मी प्रवेश करतो. हे देखील कोणाच्या डोक्यात जात नाही. मंदिरांमध्ये नंदीला ठेवले आहे. आता शंकर तर आहे सूक्ष्मवतनवासी. सूक्ष्मवतनमध्ये नंदी इत्यादी तर असतच नाहीत. नंदी अर्थात पुरुष. भागीरथला पुरुष दाखवतात. मनुष्य तर अगदीच बुद्धू बनले आहेत. बाबा म्हणतात - रावणाने बुद्धू बनवले आहे. स्वतः म्हणतात - रामराज्य पाहिजे. आता रामराज्य तर सतयुगामध्ये असते. कलियुगामध्ये असते रावण राज्य. राम आणि रावण भारतामध्येच असतात. शिवजयंती देखील भारतामध्ये साजरी करतात, रावण जयंती साजरी करत नाही, कारण तो शत्रू आहे. जयंती त्याची साजरी केली जाते जो सुख देतो. आता शिवबाबा येऊन ज्ञान ऐकवत आहेत आणि रावणावर विजय प्राप्त करून देतात. आता तुम्ही जाणता रावण काय चीज आहे! कधी येतो! अचूक हिशोब सांगितला जातो. या गोष्टी चांगल्या प्रकारे धारण करा, विसरू नका. ज्ञान-सागराकडे ढग बनून आला आहात. तर भरून मग वर्षा करायची आहे, यासाठी धारणा खूप चांगली पाहिजे. इथे तुम्ही सन्मुख बसला आहात. भासना येते आपण बेहद बाबांच्या सन्मुख, घरामध्ये बसलो आहोत. ब्राह्मण कुलभूषण देखील आहोत. मम्मा, बाबा देखील आहेत. बाबा आम्हाला टीचरच्या रूपामध्ये शिकवत आहेत. सद्गुरूच्या रूपामध्ये सोबत घेऊन जातील. ते गुरु लोक घेऊन जात नाहीत. गुरुचे काम आहे फॉलोअर्सना सोबत घेऊन जाणे. वास्तविक ते काही फॉलोअर्स देखील नाहीत. ते संन्याशी, हे गृहस्थी तर फॉलोअर्स कसे झाले. तुम्ही शिवबाबांना देखील फॉलो करता, ब्रह्मा बाबांना देखील फॉलो करता. जसे हे बनतात तसेच तुम्ही देखील बनता. मी आत्मा पवित्र बनून बाबांकडे निघून जाणार. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. खरे खरे फॉलोअर्स तुम्ही आहात.

बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्याकरिता. आता ज्ञान-चितेवर बसा तर मी तुम्हाला घेऊन जाईन. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. त्यावेळी बाकीचे सर्व धर्म शांतीधाम मध्ये होते. या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. बाबांचे फॉलोअर्स बना. जितके पवित्र बनाल तितके चांगले पद प्राप्त कराल, नाहीतर सजा खावी लागेल. जायचे तर जरूर आहे; २१ जन्मांचा वारसा मिळत आहे तर का नाही मेहनत करायची. आता मेहनत केली नाहीत तर कल्पकल्पांतर करणार नाही, आणि मग उच्चपद कसे मिळेल. हा खूप मोठा बेहदचा क्लास आहे. एकच परीक्षा आहे. मनुष्यापासून देवता बनायचे आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांचे खरे-खरे फॉलोअर्स बनून संपूर्ण पवित्र बनायचे आहे. २१ जन्मांचा वारसा घेण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

२) तोंडाने ‘हे शिवबाबा’ असे देखील म्हणायचे नाहीये. आवाजापासून परे (दूर) जायचे आहे. स्वतःला आत्मा समजून मनातल्या मनात बाबांची आठवण करायची आहे.

वरदान:-
सदैव आपल्या रॉयल कुळाच्या स्मृती द्वारे उच्च स्टेजवर राहणारे गुणमूर्त भव

जे रॉयल कुळाचे असतात ते कधीही धरतीवर, मातीमध्ये पाय ठेवत नाहीत. इथे देह-अभिमान ही माती आहे, यामध्ये खाली येऊ नका, या मातीपासून दूर राहा. सदैव स्मृती रहावी की आम्ही उच्च ते उच्च बाबांच्या रॉयल फॅमिलीतील, उच्च स्टेज असणारी मुले आहोत, म्हणजे मग खाली नजर जाणार नाही. नेहमी स्वतःला गुणमूर्त असल्याचे पाहून उच्च स्टेजवर स्थित होऊन राहा. कमजोरीला चेक करत ती नष्ट करत जा. त्याचा वारंवार विचार कराल तर ती कमजोरी तशीच राहून जाईल.

बोधवाक्य:-
रॉयल तो आहे जो आपल्या हर्षित मुखाद्वारे प्युरिटीच्या रॉयल्टीचा (पवित्रतेच्या राजाई संस्काराचा) अनुभव करवेल.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म या दोघांमधील अंतर समाप्त होईल तेव्हा संपूर्ण स्थितीच्या समीप याल. हा व्यक्त देश अव्यक्त देश बनेल. जसे बापदादा व्यक्तमध्ये येतात तरी देखील अव्यक्त रूपाच्या अव्यक्त देशातील अव्यक्ती प्रवाहामध्ये राहतात, तसाच मुलांनाही अनुभव करवतात. तर तुम्ही देखील आपल्या अव्यक्त स्थितीचा अनुभव इतरांना करवा.