14-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
गोड
मुलांनो - या डोळ्यांनी जे काही दिसते, याला पाहत असताना देखील पाहू नका, यामधून
मोह काढून टाका कारण याला आग लागणार आहे’’
प्रश्न:-
ईश्वरीय
गव्हर्मेंटचे गुप्त कर्तव्य कोणते आहे, ज्याला दुनिया जाणत नाही?
उत्तर:-
ईश्वरीय गव्हर्मेंट आत्म्यांना पावन बनवून देवता बनविते - हे आहे अतिशय गुप्त
कर्तव्य, ज्याला मनुष्य समजू शकत नाहीत. जेव्हा मनुष्य देवता बनतील तेव्हाच तर
नरकवासी पासून स्वर्गवासी बनू शकतील. मनुष्याचे संपूर्ण कॅरॅक्टर विकारांनी बिघडवले
आहे. आता तुम्ही सर्वांना श्रेष्ठ कॅरॅक्टरवाले (उत्तम चारित्र्यवान) बनविण्याची
सेवा करत आहात, हेच तुमचे मुख्य कर्तव्य आहे.
ओम शांती।
जेव्हा ओम् शांती म्हटले जाते, तेव्हा आपला स्वधर्म आणि आपले घर आठवते परंतु
घरामध्ये बसून तर रहायचे नाहीये. बाबांची मुले बनला आहात तर जरूर स्वर्गाचा वारसा
देखील आठवेल. ओम् शांती म्हटल्याने देखील संपूर्ण ज्ञान बुद्धीमध्ये येते. मी आत्मा
शांत स्वरूप आहे, शांतीचे सागर बाबांची संतान आहे. जे बाबा स्वर्गाची स्थापना करतात,
तेच बाबा आम्हाला पवित्र, शांत-स्वरूप बनवितात. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. पवित्र
दुनिया आणि अपवित्र दुनिया. पवित्र दुनियेमध्ये एकही विकार नसतो. अपवित्र
दुनियेमध्ये ५ विकार आहेत म्हणूनच म्हटले जाते - विकारी दुनिया. ती आहे निर्विकारी
दुनिया. निर्विकारी दुनियेमधून शिडी उतरत-उतरत मग खाली विकारी दुनियेमध्ये येता. ती
आहे पावन दुनिया, ही आहे पतित दुनिया. राम राज्य आणि रावण राज्य आहे ना! समयानुसार
दिवस आणि रात्रीचे गायन आहे. ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र. दिवसा सुख, रात्री
दुःख असते. रात्र भटकवणारी असते. तसे तर रात्रीमध्ये काही भटकणे होत नाही परंतु
भक्तीला भटकणे म्हटले जाते. तुम्ही मुले इथे आला आहात सद्गती प्राप्त करण्यासाठी.
तुमच्या आत्म्यामध्ये ५ विकार असल्या कारणामुळे पाप होते, त्यामध्ये देखील मुख्य आहे
काम विकार, ज्यामुळेच मनुष्य पाप आत्मा बनतात. हे तर प्रत्येकजण जाणतो की, आपण पतित
आहोत, भ्रष्टाचारातून जन्मलो आहोत. एका काम विकारामुळे संपूर्ण क्वालिफिकेशन (पात्रता)
बिघडते म्हणून बाबा म्हणतात - या काम विकाराला जिंकाल तर जगतजीत नवीन दुनियेचे मालक
बनाल. तर आतमध्ये इतका आनंद झाला पाहिजे. मनुष्य जेव्हा पतित बनतात तेव्हा त्यांना
काहीच समजत नाही. या काम विकारावरूनच किती भांडणे होतात. किती अशांती, हाहाकार माजतो.
यावेळी दुनियेमध्ये हाहाकार का आहे? कारण सर्व पाप आत्मे आहेत. विकारांमुळेच असूर
म्हटले जाते. आता बाबांकडून समजते आहे आपण तर एकदम कवडी समान वर्थ नॉट ए पेनी होतो.
जी वस्तू उपयोगाची नाही त्याला आगीमध्ये जाळले जाते. आता तुम्ही मुले समजता
दुनियेमध्ये कोणतीही वस्तू उपयोगाची राहिलेली नाही. सर्व मनुष्यमात्राला आग लागणार
आहे. जे काही या डोळ्यांनी पाहता, सर्वाला आग लागणार आहे. आत्म्याला काही आग लागत
नाही. आत्मा तर जशी इन्शुरन्स (सेफ) आहे. आत्म्याचा कधी इन्शुरन्स (विमा) उतरवतात
काय? विमा तर शरीराचा उतरवतात. मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, हा खेळ आहे.
आत्मा तर वरती ५ तत्वांच्याही वरती राहते. ५ तत्वांनीच संपूर्ण दुनियेची सामग्री
बनते, आत्मा काही बनत नाही, आत्मा तर चिरंतन आहे. फक्त पुण्य-आत्मा, पाप-आत्मा बनते.
५ विकारांमुळे आत्मा किती घाणेरडी बनते. आता बाबा आले आहेत पापांपासून
सोडविण्याकरिता. विकारामुळे संपूर्ण कॅरॅक्टर (चारित्र्य) बिघडते. चारित्र्य कशाला
म्हटले जाते - हे देखील कोणाला माहित नाही आहे. गायले देखील आहे पांडव राज्य, कौरव
राज्य. आता पांडव कोण आहेत, हे देखील कोणी जाणत नाहीत. आता तुम्हाला समजते आहे आपण
ईश्वरीय गव्हर्मेंटचे आहोत. बाबा आले आहेत राम राज्य स्थापन करण्यासाठी. यावेळी
ईश्वरीय गव्हर्मेंट काय करत आहे? आत्म्यांना पावन बनवून देवता बनवत आहे. नाही तर मग
देवता कुठून आले - हे कोणीही जाणत नाहीत म्हणून याला गुप्त गव्हर्मेंट म्हटले जाते.
आहेत तर हे देखील मनुष्यच परंतु देवता कसे बनले, कोणी बनवले? देवी-देवता तर असतातच
मुळी स्वर्गामध्ये. तर त्यांना स्वर्गवासी कोणी बनवले. स्वर्गवासी पासून मग नरकवासी
बनतात. पुन्हा नरकवासी सो स्वर्गवासी बनतात. हे तुम्ही देखील आधी जाणत नव्हता, मग
बाकीचे तरी कसे कोणी जाणतील. स्वर्ग सतयुगाला, नरक कलियुगाला म्हटले जाते. हे देखील
तुम्हाला आता समजते आहे. हा ड्रामा बनलेला आहे. हे शिक्षण आहेच पतिता पासून पावन
बनण्याचे. आत्मा पतित बनते. पतिता पासून पावन बनविणे - हा धंदा बाबांनी तुम्हाला
शिकवला आहे. पावन बनाल तर पावन दुनियेमध्ये याल. आत्माच पावन बनेल तेव्हाच तर
स्वर्गाच्या लायक बनाल. हे ज्ञान तुम्हाला या संगमयुगावरच मिळते. पवित्र बनण्याचे
हत्यार मिळते. पतित-पावन एका बाबांनाच म्हटले जाते. म्हणतात आम्हाला पावन बनवा. हे
लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते. मग ८४ जन्म घेऊन पतित बनले आहेत. श्याम आणि
सुंदर, यांचे नाव देखील असे ठेवले आहे परंतु मनुष्य अर्थ थोडेच समजतात. श्रीकृष्णा
विषयी देखील अगदी क्लियर स्पष्टीकरण मिळते. यामध्ये दोन दुनिया केल्या आहेत.
वास्तविक दुनिया तर एकच आहे. तीच नवीन आणि जुनी होते. जशी पहिली छोटी मुले मग मोठी
होऊन वृद्ध होतात. दुनिया देखील नवीन तीच जुनी होते. तुम्ही समजावून सांगण्याकरिता
किती डोकेफोड करता. आपली राजधानी स्थापन करत आहात ना. यांना देखील समजले आहे ना.
समजल्यामुळे किती गोड बनले आहेत. कोणी समजावून सांगितले? भगवंताने. युद्धाची तर
गोष्टच नाही. भगवंत किती हुशार, नॉलेजफूल बनवतात. शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन
नमस्कार करतात परंतु ते काय आहेत, कोण आहेत, हे कोणीही जाणत नाहीत. ‘शिव काशी
विश्वनाथ गंगा…’ बस्स, हेच फक्त म्हणत राहतात, अर्थ जरा सुद्धा समजत नाहीत. तुम्ही
समजावून सांगाल तर म्हणतील - ‘तुम्ही आम्हाला काय समजावून सांगणार, आम्ही तर
वेद-शास्त्र इत्यादी सर्व काही वाचलेले आहे’. तुम्हा मुलांमध्ये असे नंबरवार आहेत
जे ही धारणा करतात. बरेचजण तर विसरून जातात कारण एकदम पत्थरबुद्धी बनले आहेत. तर आता
जे पारसबुद्धी बनले आहेत त्यांचे काम आहे इतरांना देखील पारसबुद्धी बनविणे. पत्थर
बुद्धी असणाऱ्यांचे वर्तनच असे असते कारण हंस - बगळे बनले ना. हंस कधी कोणाला दुःख
देत नाहीत. बगळे दुःख देतात. त्यांना असूर म्हटले जाते. ओळखता येत नाहीत. खूप
सेंटर्सवर देखील असे विकारी खूप येतात. बहाणा करतात की आम्ही पवित्र राहतो परंतु आहे
खोटे. म्हटले देखील जाते - ‘खोटी दुनिया…’ आता आहे संगम. किती फरक पडतो. जे खोटे
बोलतात, खोटी कामे करतात, तेच थर्ड ग्रेड (तृतीय श्रेणीतील) बनतात. फर्स्ट, सेकंड,
थर्ड ग्रेड असते ना. बाबा सांगू शकतात - हे थर्ड ग्रेड आहेत.
बाबा समजावतात
पवित्रतेचा पूर्ण पुरावा द्यायचा आहे. बरेचजण म्हणतात - ‘तुम्ही दोघे एकत्र राहून
पवित्र राहता - हे तर असंभव आहे’. परंतु मुलांमध्ये योगबल नसल्याकारणाने इतकी सोपी
गोष्ट देखील व्यवस्थित समजावून सांगू शकत नाहीत. त्यांना ही गोष्ट कोणीही सांगत
नाहीत की, ‘इथे आम्हाला स्वयं भगवान शिकवतात. ते म्हणतात पवित्र बनल्याने तुम्ही २१
जन्म स्वर्गाचे मालक बनाल. जबरदस्त लॉटरी मिळते. आम्हाला अजूनच आनंद होतो’. अनेक
मुले गंधर्व विवाह करून पवित्र राहून दाखवतात. देवी-देवता पवित्र आहेत ना. अपवित्र
पासून पवित्र तर एक बाबाच बनवतील. हे देखील समजावून सांगितले आहे ज्ञान, भक्ती,
वैराग्य. ज्ञान आणि भक्ती अर्धे-अर्धे आहे आणि भक्ती नंतर आहे वैराग्य. आपल्याला आता
या पतित दुनियेमध्ये रहायचे नाहीये, हे कपडे (शरीर) उतरून घरी जायचे आहे. ८४ चे
चक्र आता पूर्ण झाले. आता आपण जातो शांतीधामला. सर्व प्रथम अल्फची गोष्ट विसरायची
नाही. मुले हे देखील समजतात की, ही जुनी दुनिया जरूर नष्ट होणार आहे. बाबा नवीन
दुनिया स्थापन करतात. बाबा अनेकदा नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी आले आहेत आणि मग
नरकाचा विनाश होतो. नरक किती मोठा आहे, स्वर्ग किती छोटा आहे. नवीन दुनियेमध्ये
आहेच मुळी एक धर्म. इथे तर अनेक धर्म आहेत. लिहिलेले देखील आहे शंकराद्वारे विनाश.
अनेक धर्मांचा विनाश होतो मग ब्रह्मा द्वारे एका धर्माची स्थापना होते. हा धर्म कोणी
स्थापन केला? ब्रह्माने तर नाही केला. ब्रह्माच पतिता पासून मग पावन बनतात.
माझ्यासाठी (शिवबाबांसाठी) तर असे म्हणणार नाही की, पतिता पासून पावन. पावन आहेत तर
लक्ष्मी-नारायण नाव आहे, पतित आहेत तर ब्रह्मा नाव आहे. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची
रात्र. त्यांना (शिवबाबांना) अनादि क्रिएटर (अनादि निर्माता) म्हटले जाते. आत्मे तर
आहेतच. आत्म्यांचा निर्माता म्हणता येणार नाही म्हणूनच ‘अनादि’ म्हटले जाते. बाबा
अनादि तर आत्मे देखील अनादि आहेत. खेळ सुद्धा अनादि आहे. हा अनादि पूर्व-नियोजित
ड्रामा आहे. मज आत्म्याला सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताच्या कालावधी विषयीचे
ज्ञान मिळते. हे कोणी दिले? बाबांनी. तुम्ही २१ जन्मांकरिता धनीचे बनता आणि मग
रावणाच्या राज्यामध्ये बिना धनीचे (अनाथ) बनता. मग कॅरॅक्टर्स (चारित्र्य) बिघडू
लागतात. विकार आहेत ना. मनुष्य समजतात नरक-स्वर्ग सर्व एकाच वेळी अस्तित्वात असतात.
आता तुम्हा मुलांना किती स्पष्टपणे समजावून सांगितले जाते. आता तुम्ही गुप्त आहात,
शास्त्रांमध्ये काय-काय लिहून ठेवले आहे. धाग्याचा किती गुंता झाला आहे. बाबांनाच
बोलावतात - ‘आम्ही काही कामाचे राहिलेलो नाही आहोत. येऊन पावन बनवून आमचे चारित्र्य
सुधारा’. तुमचे चारित्र्य किती सुधारतात. बरेचजण तर सुधारण्याच्या ऐवजी अजूनच जास्त
बिघडतात. वर्तनावरूनच समजून येते. आज हंस म्हटले जातात, उद्या बगळे बनतात. उशीर
लागत नाही. माया देखील अत्यंत गुप्त आहे. इथे काही दिसून थोडेच येते. बाहेर
गेल्यावर दिसून येते आणि मग आश्चर्यवत् सुनन्ती… भागन्ती होतात. इतक्या जोराने
पडतात की हाडेच तुटतात. इंद्रप्रस्थाची गोष्ट आहे. माहीत तर होतेच. मग अशा व्यक्तीने
सभेमध्ये येता कामा नये. थोडे-फार ज्ञान ऐकले तर स्वर्गामध्ये येतातच. ज्ञानाचा
विनाश होत नाही. आता बाबा म्हणतात - पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करा. जर
विकारामध्ये गेलात तर पद भ्रष्ट होईल. आता तुम्हाला समजते आहे - हे चक्र कसे फिरते.
आता तुम्हा मुलांची
बुद्धी किती बदलते तरी देखील माया जरूर धोका देते. इच्छा मात्रम् अविद्या. कोणती
इच्छा ठेवली तर संपलाच. वर्थ नॉट ए पेनी बनतात. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील
माया कोणत्या ना कोणत्या प्रकारे धोका देते मग ते हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत.
काही मुले तर अशी असतात जी आपल्या वडिलांना मारायला देखील उशीर करत नाहीत. पूर्ण
परिवाराला सुद्धा मारून टाकतात. महान पाप आत्मे आहेत. रावण काय-काय करायला लावतो.
खूप तिरस्कार वाटतो. किती घाणेरडी दुनिया आहे, याच्यावर कधीही मन जडू द्यायचे नाही.
पवित्र बनण्यासाठी खूप हिम्मत पाहिजे. विश्वाच्या बादशाहीचे बक्षीस घेण्यासाठी
मुख्य आहे पवित्रता. पवित्रतेवरून किती भांडणे होतात. गांधीजी देखील म्हणत होते -
‘हे पतित-पावन या’. आता बाबा म्हणतात - ‘हिस्ट्री-जॉग्राफी पुन्हा रिपीट होते’.
सर्वांना परत यायचेच आहे, तेव्हाच तर एकत्र जायचे आहे. सर्वांना घरी घेऊन जाण्यासाठी
बाबा देखील आले आहेत ना. बाबा आल्याशिवाय कोणी परत जाऊ शकत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
विश्वाच्या
बादशाहीचे बक्षीस घेण्यासाठी मुख्य आहे पवित्रता, त्यामुळे पवित्र बनण्याची हिंमत
ठेवायची आहे. आपले चारित्र्य सुधारायचे आहे.
वरदान:-
नेहमी
आठवणीच्या छत्रछायेखाली, मर्यादेच्या रेषेच्या आत राहणारे मायाजीत विजयी भव बाबांची
आठवणच छत्रछाया आहे, छत्रछायेमध्ये राहणे अर्थात मायाजीत विजयी बनणे. नेहमी
आठवणीच्या छत्रछायेखाली आणि मर्यादेच्या रेषेच्या आत रहा तर कोणाचीही रेषेच्या आत
येण्याची हिंमत होणार नाही. मर्यादेच्या रेषेच्या बाहेर जाता तर माया देखील आपले
बनवण्यामध्ये हुशार आहे. परंतु आपण अनेकदा विजयी बनलो आहोत, विजयीमाळा आपलेच यादगार
आहे या स्मृतीद्वारे नेहमी समर्थ रहा तर मायेकडून पराजित होऊ शकणार नाही.
बोधवाक्य:-
सर्व
खजिन्यांना स्वतःमध्ये सामावून घ्या तर संपन्नतेचा अनुभव होत राहील.