14-11-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, पहाटे लवकर उठून बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल, अमृतवेलेची वेळ खूप चांगली आहे”

प्रश्न:-
आज्ञाधारक मुलांची लक्षणे काय असतात?

उत्तर:-
आज्ञाधारक मुले - सर्वश्रेष्ठ बाबांच्या महावाक्यांना मस्तकी धारण करतील अर्थात आपल्या जीवनात धारण करतील. त्यांचे वर्तन अतिशय रॉयल (राजेशाही) असेल. ते खूप धीरोदात्त असतील. त्यांना विश्वाच्या मालकीपणाचा गुप्त नशा असेल. आज्ञाधारक मुले आपल्या कोणत्याही कृतीने (कर्माने) बापदादांचा अपमान होऊ देणार नाहीत. अपमान करणारे अर्थात अवज्ञा करणारी मुले खूप डिससर्व्हिस (नुकसान) करतात. आज्ञाधारक मुले सदैव फॉलो फादर करतात, कधी उलटे (नुकसानदायक) काम करत नाहीत.

गीत:-
छोड भी दे आकाश सिंहासन...

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांनी दोन शब्द ऐकले. आता मुले तर त्यांचा अर्थ समजलेच आहेत की बाबा इथे आहेत. बाबा बसून योग्य गोष्ट समजावून सांगतात कारण प्रत्येक गोष्ट जी ज्ञानाच्या बाबतीत अथवा ईश्वराच्या बाबतीत मनुष्य बोलतात, त्या चुकीच्याच आहेत. आता गाण्याचे बोल ऐकले - ‘छोड भी दे आकाश सिंहासन…’, परंतु आकाश सिंहासन काय आहे, हे कोणालाच माहीत नाही. पतित-पावन बाबांना तर यायचेच आहे. कोणी म्हणतात - भगवान अस्तित्वातच नाही. कोणी म्हणतात - सर्व भगवानच भगवान आहेत. कशाला येईल? हे तर तुम्ही मुलांनी जाणले आहे की बाबा आले आहेत; मग हे भक्तिमार्गातले गायन इत्यादी सर्व ऐकणे चांगले वाटत नाही. पतित-पावन येऊन स्वतःचा परिचय देऊन, रचनेच्या आदि-मध्य-अंताची रहस्ये समजावून सांगतात. बाकी दुनियेमध्ये या गोष्टी इतर कोणीही समजू शकणार नाही. इथे देखील किती मते असणारे मनुष्य आहेत. म्हणतात - मनुष्य पवित्र बनतील, हे होऊ शकत नाही. तर जरूर जोपर्यंत भगवान येणार नाहीत तोपर्यंत पवित्र कसे बनू शकतील? परमात्माच येऊन शिक्षण देतात आणि प्रलोभन देखील देतात की याच्यामध्ये किती मोठी प्राप्ती आहे. तुम्ही जाणता बाबा म्हणतात - माझे बनून श्रीमतावर चालला नाहीत तर शिक्षा भोगावी लागेल. जसे लहान मुलांची वर्तणूक चांगली नाही असे बघितले तर वडील थप्पड मारतात. हे बाबा थप्पड तर मारत नाहीत, फक्त समजावून सांगतात. रक्ताने देखील प्रतिज्ञा लिहून देतात, आणि तरी देखील हार खातात. मनुष्यांना माहितीच नाही की पवित्र बनल्यामुळे काय मिळते, पतित कोणाला म्हटले जाते? बाबा समजावून सांगत आहेत - जे विकारामध्ये जातात ते पतित आहेत. मनुष्य समजतात विकार सोडणे अशक्य आहे. त्यांना सांगा, देवी-देवता तर संपूर्ण निर्विकारी होते. चित्रे दाखवली पाहिजेत. ही दुनिया निर्विकारी होती ना. पवित्रता होती तेव्हा भारत किती श्रीमंत होता, शिवालय होता. लोकांना हीच चिंता असते की विकारा शिवाय लोकसंख्या कशी वाढेल. अरे गव्हर्मेंट कंटाळली आहे की ही लोकसंख्या अजून वाढू नये, तरी देखील दरवर्षी मानवी लोकसंख्या किती वाढतच चालली आहे. कमी होणे तर खूप अवघड आहे. इथे बेहदचे बाबा म्हणतात - जर तुम्ही पवित्र बनलात तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवेन. प्राप्ती खूप मोठी आहे. मुले जाणतात - बरोबर, मायाजीत बनल्यामुळे आम्ही जगतजीत बनू. रावणाला जिंकून रामराज्य मिळवू. तिथे हे विकार असू शकत नाहीत. त्यांना तुम्ही जिंकून घेतले ना. या गोष्टी कोणाला मोठ्या मुश्किलीने समजतात, म्हणतात - याच्याशिवाय दुनिया कशी चालेल! अशा प्रकारच्या गोष्टी जो बोलेल तर समजले पाहिजे की, हा आदि सनातन धर्माचा नाहीये. जिथे तुम्ही भाषण करता, तर तिथे बोला - भगवानुवाच, भगवान म्हणतात काम महाशत्रू आहे, त्याच्यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. स्पष्टीकरण अत्यंत साधे आणि सरळ आहे. परंतु तरी देखील ते समजत नाहीत अथवा समजावून सांगणाऱ्यांमध्ये तेवढी हुशारी नाहीये. बाबा तर समजतात, मुले रूपया मध्ये ५ आणे देखील मुश्किलने शिकले आहेत, किंवा स्वतः पूर्ण योगी बनलेले नाहीत, त्यामुळे ती ताकद मिळत नाही. आठवणीद्वारेच ताकद मिळते. बाबा सर्वशक्तिमान ऑथॉरिटी आहेत ना. योग असेल तर शक्ती देखील मिळेल. बऱ्याच मुलांचा योग तर फारच कमी आहे. खरे देखील कोणी लिहीत नाहीत. आठवणीचा चार्ट लिहिणे देखील अवघड आहे. टीचरच जर चार्ट ठेवत नसेल तर स्टुडंट तरी कसे ठेवतील. बरेचसे स्टुडंट योग लावण्यामध्ये खूप हुशार आहेत. मुख्य गोष्ट आहे - बाबांची आठवण करायची आहे. ‘योग’ हा शब्द शास्त्रांमधला आहे. मनुष्य ऐकल्यावर गोंधळून जातात. म्हणतात योग शिकवा. अरे योग काही शिकण्याची गोष्ट थोडीच आहे? पहाटे लवकर उठून स्वतःच आठवण करायची आहे, यामध्ये टीचरची काय आवश्यकता आहे जो बसून शिकवतील; म्हणून ‘आठवण’ शब्द योग्य आहे. योग काही शिकवण्याची गोष्ट नाहीये; ही सवय लावता कामा नये. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल. अमृतवेलेला आठवण करणे चांगले आहे. भक्ती देखील पहाटे उठून करतात. हे देखील (ब्रह्मा बाबा देखील) बाबांची आठवण तर करतात. आठवण का करतात? कारण बाबांकडून वारसा मिळणार आहे. भले भक्तिमार्गामध्ये ‘शिव’ची आठवण करतात परंतु त्यांना हे माहीत नाही की शिवबाबांकडून काय मिळणार आहे. हे फक्त तुम्ही मुलेच जाणता. आता बाबा श्रीमत देत आहेत की, आपले कल्याण करण्यासाठी माझी आठवण करा. आठवणीमुळेच शक्ती येते. शक्तीमुळे विकर्म विनाश होतील. ज्ञानामुळे काही विकर्म विनाश होणार नाहीत. ज्ञानामुळे पद मिळेल. पतितापासून पावन आठवणीमुळेच बनतात. खूप मुले याच्यामध्ये असफल (नापास) आहेत. खूप चांगले महारथी ५ आणे देखील मुश्किलीने आठवण करतात. काही जण तर एक पैसा देखील आठवण करत नाहीत, यामध्येच खूप मेहनत आहे. ज्ञान तर पटकन शिकतात, परंतु बेडा पार तेव्हा होईल जेव्हा आठवणीमध्ये राहतील (नाव तर पैल-तीरी तेव्हा जाईल जेव्हा आठवणीमध्ये राहतील). तेव्हाच जन्म-जन्मांतरीची विकर्म विनाश होतील, आणि मग पुण्य-आत्मा बनाल. बाबांना बोलावतात - ‘येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा’. पावन तर भरपूर बनतात, परंतु उच्च पदाचा वारसा तेच प्राप्त करतील जे चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहतील. तुमच्यापेक्षा ज्या बंधनात आहेत त्या जास्त आठवण करतात. आठवणीनेच विकर्म विनाश होऊ शकतात. तर जेव्हा कोणी म्हणतील की, पवित्र राहणे अशक्य आहे, तर मग त्यांच्याशी बोलायला सुद्धा नको. भारत, निर्विकारी होता तेव्हा सतोप्रधान होता, परंतु श्रीमंतांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान बसणेच मुळी अवघड आहे, कारण आठवणीमध्येच मेहनत आहे.

बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून घरच्यांशी देखील तोड निभावा. खरे तर कायदे खूप कडक आहेत. तुम्ही तर जन्म-जन्मांतर पाप-आत्म्यांना दान देत पाप-आत्मा बनत राहिला आहात. आता तुम्ही पाप-आत्म्यांना पैसे देऊ शकत नाही, परंतु आजोबांचा वारसा आहे त्यामुळे द्यावे लागतात; म्हणून बाबा म्हणतात - पहिले लौकिकमधील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून नंतर मग सरेंडर व्हा (समर्पित व्हा). असा देखील कोटींमध्ये कोणीच निघतो. खूप मोठे लक्ष्य आहे. फॉलो फादर करायचे आहे. नष्टोमोहा बनणे काही मावशीचे घर नाहीये (सहज सोपी गोष्ट नाहीये), यामध्ये खूप मेहनत आहे. विश्वाचा मालक बनणे, प्राप्ती किती मोठी आहे. कल्प-कल्प जे विश्वाचे मालक बनले आहेत, तेच पुन्हा देखील बनतात. ड्रामाचे रहस्य देखील थोड्याजणांच्याच बुद्धीमध्ये टिकते. श्रीमंत तर मुश्किलीने समजू शकतात. गरीब तर लगेचच म्हणतात - बाबा, हे सर्व काही तुमचे आहे, मग त्यांनी सेवा देखील करायची आहे. पावन बनण्यासाठी आठवण देखील पाहिजे, नाहीतर खूप शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा भोगली तर पद देखील कमी दर्जाचे मिळेल. शिक्षा ते भोगतात, जे आठवण करत नाहीत. ज्ञान कितीही मिळवले तरी त्याने विकर्मे नष्ट होणार नाहीत. दंड भोगून मग छोटेसे पद मिळवणे - हा काही वारसा थोडाच आहे? बाबांकडून पूर्ण वारसा घेण्यासाठी तर बाबांचे आज्ञाधारक बनले पाहिजे. उच्च ते उच्च बाबांची महावाक्ये मस्तकी धारण केली पाहिजेत. श्रीकृष्णाचा आत्मा देखील या वेळी वारसा घेत आहे. या लक्ष्मी-नारायणाच्या अनेक जन्मांच्या शेवटी मी पुन्हा त्यांना शिकवून वारसा देतो. तुमच्यामध्ये देखील राजकुमार-राजकुमारी बनणारे असतील ना. रॉयल घराण्यातील असणाऱ्यांचे वर्तन खूप धीरोदात्त असते. त्यांना गुप्त नशा असतो. बाबा किती साधारण पद्धतीने राहतात. जाणतात - थोडा वेळ शिल्लक आहे, मला तर जाऊन विश्व-महाराजन बनायचे आहे. हे (ब्रह्मा बाबा) सुध्दा पतित होते. हा तर बाबांचा रथ आहे, म्हणून इथे संदलीवर बसावे लागते. नाही तर बाबा कुठे बसले असते? हे देखील तुमच्यासारखेच स्टुडंट आहेत. शिकत आहेत. अशी बरीच मुले आहेत जी बाबांना ओळखत नाहीत. बाबांच्या सोबत धर्मराज देखील आहे. बाबा म्हणतात - माझी आज्ञा मानली नाहीत, माझा अपमान केलात तर धर्मराज खूप शिक्षा देईल. डायरेक्ट माझी अथवा माझ्या मुलाची तुम्ही अवज्ञा करता. बाबांचा एकच सिकीलधा मुलगा आहे. प्रेम तर आहे ना. यांचा अपमान केला तर किती शिक्षा भोगावी लागेल. थोड्या आपदा येऊ द्या, मग बघा किती पळत येतील. तुम्ही सर्व पळून आला आहात, यांनी जादू इत्यादी काही केलेली नाही. जादूगार शिवबाबा आहेत. असे भरपूर आहेत - ज्यांना हे देखील लक्षात येत नाही की यांच्यामध्ये शिवबाबा येतात. शिवबाबांच्या समोर आम्ही काही उलट काम केले, तर बाबा म्हणतील - हा नालायक मुलगा आहे. यांच्यामध्ये डबल आहेत ना म्हणून तारेमध्ये लिहितात - ‘बापदादा’. परंतु यावरून देखील मुले समजत नाहीत की बापदादा एकत्र कसे आहेत. बाबा, दादांद्वारे वारसा देतात. स्वतःहून बोलायला पाहिजे. तुम्ही जाणता ‘बाप-दादा’ कोण आहेत? भले कोणी विचारले की तुम्ही ‘बाप-दादा’ कोणाला म्हणता? बाप-दादा एकाचे नाव तर असू शकत नाही. तर मुलांनी युक्तीने समजावून सांगितले पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणाला समजावून सांगाल तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये हे पक्के व्हावे की, शिवबाबा दादांच्याद्वारे वारसा देतात. आता विनाश तर होणारच आहे. त्याच्यापूर्वी राजयोग शिकवत आहेत, तुम्ही देखील शिका. अर्धेकल्प ज्या बाबांना बोलावले ते नॉलेज देण्यासाठी आले आहेत. तरी देखील म्हणतात - समजून घेण्यासाठी वेळ नाहीये. तर म्हणणार - तुम्ही देवी-देवता धर्माचे नाहीत. तुमच्या नशिबामध्ये स्वर्गाचे सुख नाहीये. बाकी इथे काही डोके इत्यादी टेकवायचे नाहीये. संन्याशांच्या पायावर जरूर लोटांगण घालतील. हे (शिवबाबा) तर गुप्त आहेत ना. पुढे जाऊन खूप प्रभाव पडेल. त्यावेळी खूप गर्दी होईल. गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन किती मनुष्य मरतात. पंतप्रधानांच्या दर्शनासाठी किती गर्दी उभी राहते. इथे मुलांसोबत किती गुप्तपणे बसले आहेत. इथे कोणाला बघणार? यांच्याबाबतीत (ब्रह्मा बाबांना) तर जाणता की ते हिऱ्यांचे व्यापारी होते. शास्त्रांमध्ये देखील आहे - ब्रह्मा द्वारा मनुष्य-सृष्टी कशी रचली. बाबा म्हणतात - मी यांच्यामध्ये प्रवेश करून रचना रचतो. हे देखील लिहिलेले आहे, परंतु पत्थर-बुद्धी समजत नाहीत.

बाबा येऊन मुलांना पतितापासून पावन बनवून ट्रान्सफर करतात. बाकी कोणती नवी रचना थोडीच रचतात! ही आहे पतितांना पावन बनविण्याची युक्ती. विराट रूपाचे चित्र जरूर असायला पाहिजे. चित्र मोठे असेल तर समजावून सांगण्यासाठी देखील सोपे होईल. पत्थर-बुद्धीपासून पारस-बुद्धी बनविणे काही सोपी गोष्ट थोडीच आहे? कोणी तर बिलकुल असे तवाईसारखे (वेड्यासारखे) बघून निघून जातात. प्रजा बनणाऱ्या पैकी असेल तर त्याच्या देखील थोडेफार बुद्धीमध्ये हे ज्ञान जाईल! हम सो ब्राह्मण, सो हम देवता; ‘हम सो’ (मीच तो) चा अर्थ बाबांनी किती चांगला समजावून सांगितला आहे. ते (दुनियावाले) म्हणतात - आत्मा सो परमात्मा. बस्स. इथे तुम्ही जाणता - आपण आहोतच मुळी आत्मा. मीच आत्मा आधी ब्राह्मण, मग हम सो देवता, हम सो क्षत्रिय… बनतो. आपण किती वर्ण वाले बनतो! ८४ चे चक्र पूर्ण करतो. बाकी जे नंतर येतात त्यांचे अंदाजे किती जन्म असतील! हिशोब काढू शकता. चित्रे बाबांच्या मनपसंत खूप चांगली बनवली पाहिजेत. दोन-चार चांगली मुले असली पाहिजेत, जी चित्रे बनविण्यासाठी मदत करतील. बाबा खर्च देण्यासाठी तयार आहेत, मग हुंडी (धन) स्वतःच बाबा उपलब्ध करून देतील. बाबा म्हणतात - मुख्य चित्रे ट्रान्सलाईटची बनवली पाहिजेत. मनुष्य पाहूनच खुश होतील. सर्व प्रदर्शनी अशी बनवली पाहिजे, परंतु मुलांना तयार करण्यासाठी बाबांना मेहनत करावी लागते.

मुख्य आहे बाबांची आठवण. आठवणीद्वारेच तुम्ही पतितापासून पावन, सृष्टीचे मालक बनाल. दुसरा कोणताही उपाय नाही. चालता-फिरता बाबांची आठवण करा. चक्राची आठवण करा. तुमचा स्वभाव खूप रॉयल (राजसी) असला पाहिजे. परंतु चालता-चालता कोणाला लोभ पकडतो, कोणाला मोह पकडतो. एखाद्या मनपसंत गोष्टीची इतकी सवय झालेली असते की, ती मिळाली नाही तर आजारी पडतात. त्यामुळे अशी कोणतीही सवय लावून घेता कामा नये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपले कल्याण करण्यासाठी बाबांची आज्ञा पाळायची आहे. बापदादांची कधीही अवज्ञा करायची नाही. कोणत्याही लोभ अथवा मोह उत्पन्न करणाऱ्या वस्तूची सवय लावून घ्यायची नाही.

२) आपला स्वभाव अतिशय रॉयल (राजसी) बनवायचा आहे. अमृतवेलेला पहाटे लवकर उठून बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
सर्व आत्म्यांना शक्तींचे दान देणारे मास्टर बीजरूप भव

अनेक भक्त-आत्मारूपी पाने जी सुकून गेली आहेत, कोमेजली आहेत त्यांना पुन्हा आपल्या बीजरूप स्थिती द्वारे शक्तींचे दान द्या. त्यांना, सर्वप्राप्ती करून देण्याचा आधार आहे - तुमची ‘इच्छा मात्रम् अविद्या’ स्थिती. जेव्हा स्वतः इच्छा मात्रम् अविद्या बनाल तेव्हाच इतर आत्म्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. इच्छा मात्रम् अविद्या अर्थात संपूर्ण शक्तिशाली बीजरूप स्थिती. तर मास्टर बीजरूप बनून भक्तांची हाक ऐका, प्राप्ती करून द्या.

बोधवाक्य:-
सदैव सुप्रीम आत्म्याच्या छत्रछायेमध्ये राहणे, हेच अलौकिक जीवनाच्या सेफ्टीचे (सुरक्षेचे) साधन आहे.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

या काळाला अमूल्य समजून प्रयोग करा तेव्हाच संपूर्ण बनू शकाल. संपूर्ण होण्यामध्ये व्यर्थ संकल्प जे अडथळा आणतात त्यापासून वाचण्यासाठी कधीही आंतरिक अथवा बाह्य विश्रांती घेऊ नका. ‘रेस्ट’मध्ये नसाल तर ‘वेस्ट’ जाणार नाही. दुसरी गोष्ट - स्वतःला सदैव ‘गेस्ट’ (पाहुणा) समजा.