15-11-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.03.2012  ओम शान्ति   मधुबन


“सन्तुष्टतेची शक्ती चेहऱ्यावर आणि वर्तनामध्ये धारण करून ब्रह्मा बाबांसमान बना, सदैव आनंदी राहा आणि आनंद वाटा”


आज भले सन्मुख असलेल्या अथवा दूर असलेल्या संतुष्टमणि मुलांना पाहत आहेत. प्रत्येक बच्चा आपल्या संतुष्टतेच्या शक्तीने झळाळत स्मितहास्य करत मिलन साजरे करत आहे. ही संतुष्टतेची शक्ती सर्वात महान आहे म्हणून यामध्ये सर्व प्राप्ती आहेत. संतुष्टतेची शक्ती धारण करणारे संतुष्टमणि स्वतःला देखील प्रिय, बाबांना देखील प्रिय, परिवाराला देखील प्रिय आहेत, कारण जिथे संतुष्टता आहे तिथे सर्व शक्ती संतुष्टतेमध्ये सामावलेल्या आहेत. संतुष्टतेच्या शक्तीचे वातावरण चोहो बाजूंना पसरते. संतुष्टमणि असणारे आत्मे कधीही मायेकडून हार खाऊ शकत नाहीत, माया हार खाते. संतुष्टमणि आत्मे सर्वांच्या हृदयाला आपले बनवू शकतात. संतुष्टमणि आत्मा भले माया असो, अथवा प्रकृतीच्या विभिन्न भयग्रस्त परिस्थितीला असे अनुभव करते जसे एखाद्या कार्टूनला पाहत आहेत. प्रत्येक बच्चा स्वतःला असा संतुष्टतेच्या शक्तीने संपन्न समजतो का? स्वतःला विचारा की मी संतुष्टमणि आहे? बरीच मुले म्हणतात - कधी-कधी राहतो, सदैव नाही; परंतु बापदादांना ‘कधी-कधी’ हा शब्द आवडत नाही. बापदादा प्रत्येक मुलाला नेहमी प्रेमपूर्वक आठवण देतात, आनंद देतात. तर बापदादांना हा ‘कधी-कधी’ शब्द आवडत नाही, सदैव खुशनुमा (आनंददायी). तर बापदादा हेच इच्छित आहेत की, या ‘कधी-कधी’ शब्दाला काय परिवर्तन करू शकता का! ‘कधी-कधी’ हा शब्द ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्येच नाहीये, ‘सदैव’. तर सर्व मुले जी बाबांची लाडकी, मायेच्या प्रभावापासून न्यारी बनली आहेत, ती आज या ‘कधी-कधी’ शब्दाला समाप्त करू शकतात काय? करू शकता? कारण बापदादा बऱ्याच काळापासून सांगत आहेत की, कोणतीही हादरवून टाकणारी परिस्थिती अचानक उद्भवणार आहे. त्याच्या तयारीसाठी, अजूनही जर हे ‘कधी-कधी’ चे संस्कार असतील तर मग तुम्ही कायमच्या राज्य-भाग्याचे अधिकारी बनू शकाल का? ब्रह्मा बाबांवर सर्वांचे मनापासून प्रेम आहे. ब्रह्माबाबांशी वायदा आहे की, सोबत आहोत, सोबत येणार, सोबत राज्य करणार. हा वायदा पक्का आहे ना! मान हालवा. पक्का आहे? किती पक्का आहे! ब्रह्माबाबा हा ‘कधी-कधी’ शब्द बोलले का! तुम्हा सर्वांनापण नेहमी अमृतवेलेला प्रेमपूर्वक आठवण दिली आणि सदैव बाबांसोबत मिळून ज्ञानाच्या गोष्टी, स्नेहाच्या गोष्टी, उमंग-उत्साहाच्या गोष्टी ऐकवल्या. जर सर्वांना हात वर करायला सांगितले की बापदादांवर प्रेम आहे, तर सर्वजण दोन-दोन हात वर करतील. हो ना! पक्के? जेव्हा प्रेम असते तेव्हा प्रेम असणाऱ्याच्या प्रत्येक शब्दावर देखील प्रेम असते. ब्रह्माबाबांनी शिव-पित्याला कधीही असे म्हटले नाही की, ‘कधी-कधी होते’. नेहमीच फॉलो फादर केले आणि सोबत तुमच्याकडूनही करवून घेतले; कारण ब्रह्माबाबांचे मुलांवर जिवापाड प्रेम आहे म्हणून तुमचे नाव देखील काय आहे? ‘ब्रह्माकुमारी’, ‘शिवकुमारी’ नाव नाही आहे. तर ब्रह्माबाबांवर प्रेम अर्थात ब्रह्माबाबांचे सांगणे आणि ब्रह्माकुमार-कुमारींनी मानणे. प्रेम अर्थात न्योछावर (समर्पित). तर कशावर न्योछावर व्हाल? त्यांच्या आज्ञेवर. जे सांगितले ते केले; कारण ब्रह्मा बाबांसोबत शिवबाबा देखील आहेत. एकटे नाहीत. ‘बाप-दादा’, ‘बापदादा’, म्हणता ना!

तर आज बापदादा या ‘कधी-कधी’ शब्दाला प्रत्येक मुलाच्या मुखातून समाप्त करू इच्छित आहेत. तर तुम्ही सर्व मुले बाबांचे साथीदार आहात. प्रेम आहे ना! प्रेमामध्ये तर स्वतःला न्योछावर (समर्पित) देखील करतात, हे तर फक्त शब्दाला न्योछावर करायचे आहे, कारण बापदादा प्रत्येक मुलाला माळेतील विजयी रत्न बनवू इच्छित आहेत. तर स्वतःला माळेचा मणी समजता का? विजयी समजता आहात? बरीच मुले म्हणतात - ब्राह्मणांची संख्या तर खूप आहे आणि माळा तर १०८ चीच आहे; तर १०८ च येतील ना! परंतु जर तुम्ही संपन्न बनलात, विजयी बनलात, तर तुम्ही असा विचार करू नका की, फक्त १०८ चीच माळा आहे; बापदादा त्याच माळेमध्ये अजून लड्या (सर) देखील जोडू शकतात. परंतु तुम्ही विजयी बना. कितीतरी मुले विचार करतात - माहित नाही, नंबर मिळेल की नाही मिळेल. तुम्ही जर संपन्न बनलात तर बाबा नंबर देतीलच देतील; कारण बाबांचे प्रत्येक मुलावर प्रेम आहे. सांगितले देखील होते, भले कोणी लास्ट बच्चा आहे, त्याच्यावर देखील बाबांचे प्रेम आहे, कारण त्या मुलाने, भले मग स्वभावाच्या वश आहे परंतु बाबांना ओळखून ‘माझे बाबा’ तर म्हटले. दुनियेमध्ये किती उच्च पदस्थ व्यक्ती आहेत त्यांनी बाबांना ओळखले नाही, परंतु त्या शेवटच्या मुलाने तर बाबांना ओळखले, भले कोणत्या कमजोरीच्या वश आहे परंतु बाबांना तर ओळखले आहे. प्रेमाने ‘माझे बाबा’, तर म्हणत आहे; म्हणून बाबांनी यापूर्वी देखील ऐकवले होते की, शेवटच्या मुलावर देखील बाबांचे प्रेम तर आहेच, परंतु त्याच्यावर विशेष कल्याणाची दृष्टी, कल्याणाची वृत्ती देखील आहे की हा बच्चा थोडा तरी पुढे जात राहो. तर बापदादा आज स्पष्टपणे सांगत आहेत, की तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचारच करू नका की, हे कसे होईल, याचे काय होईल, तुम्ही स्वतःला योग्य आत्मा बनवा. कर्मयोगी आत्मा बनवा. बाकी बाबा प्रत्येक मुलाला, असा जो योग्य बच्चा बनेल त्याला सर्व प्राप्तीचे वरदान देऊन सुद्धा पुढे नेतील, मागे ठेवणार नाहीत.

तर बापदादा आज अमृतवेलेला चोहो बाजूंच्या, भले मग देश असो अथवा विदेशमध्ये चक्कर मारण्यासाठी गेले. तसे तर बापदादा मेजॉरिटी फेरी मारतातच परंतु आज जेव्हा फेरी मारली, हे सांगितले होते की, बापदादा जेव्हा चक्कर मारायला जातात तेव्हा विशेष तुमच्या पूर्वज दादी देखील सोबत चक्कर मारायला येतात. तर चक्कर मारताना काय पाहिले? जाणता तर तुम्ही सुद्धा आहात. चांगले-चांगले संकल्प करतात, करूनच दाखवू, बनूनच दाखवू, हातात हात घालूनच जाणार. तर हात कोणता आहे? शिवबाबांना तर फरिश्ता रूप देखील नाहीये, तर मग हात कोणता आहे? श्रीमताचा हात आहे. फॉरेनमध्ये हातात हात देऊन चालण्याची फॅशन आहे. तर इथे हात आहे - ‘श्रीमत’; तर सर्वजण हातात हात देवून चालणारे आहात ना! आहे एवढी ताकद? ब्रह्माबाबांनी बघा पावलोपावली श्रीमतावर चालून तुम्हा सर्वांना करून दाखवले. काय करायचे आहे, कसे करायचे आहे, उदाहरण आहे. साकारमध्ये उदाहरण आहे. निराकाराची तर गोष्टच सोडा परंतु ब्रह्मा बाबा साकारमध्ये तुमचे साथीदार होते. तर जसे ब्रह्मा बाबा श्रीमताचा हात हातात घेऊन फरिश्ता बनले; असेच फॉलो फादर आहात ना! ‘फॉलो फादर’, लक्षात आहे ना! तर फॉलो काय करायचे आहे? सर्व गोष्टी स्पष्ट करून दाखवल्या, ब्रह्माबाबांचा चेहरा आणि चलन सर्वजण जाणतात ना! आपल्या बुद्धीद्वारे ब्रह्माबाबांना इमर्ज तर करू शकता ना! जी दिनचर्या, जसे ब्रह्मा बाबांनी दिनचर्येचे पालन केले, साकार शरीरामध्ये असताना, साकारमध्ये देखील सर्व अनुभव केले. ब्रह्मा बाबांचे चरित्र तर सर्वजण जाणतातच. तर फॉलो फादर. तुम्हाला पक्के करण्यासाठी ब्रह्माबाबांच्या प्रत्येक पावलाची उजळणी देखील केली आहे. ‘आठ कदम’ वाचता ना, काय-काय केले! बस्स त्याला फॉलो करायचे आहे. फॉलो करणे अर्थात ब्रह्माबाबांसमान बनणे. तर विचार करा, बाबांवर प्रेम आहे, दोन्ही बाबांवर प्रेम आहे. प्रेम अर्थात यापूर्वी देखील सांगितले आहे - तर प्रेमाचे प्रॅक्टिकल रूप आहे ब्रह्माबाबांचे सांगणे आणि मुलांनी बाबांप्रमाणे करणे, हे आहे खरे मनापासून असलेले प्रेम. अनेक मुले काय करतात? ब्रह्माबाबांसारखे करायचे आहे, असा विचार करतात, परंतु आधी करून मग विचार करतात की, ब्रह्माबाबांसारखे तर केले नाही; परंतु केले तर खरे. परंतु फॉलो करायचे असेल तर आधी विचार करा, संकल्प करण्यापूर्वी विचार करा काय हा संकल्प ब्रह्माबाबांचा आहे! जर असेल तर प्रॅक्टिकल करा. करून मग विचार करू नका. परंतु आधी विचार करून मग फॉलो करा. ब्रह्माबाबांना फॉलो करणे अर्थात ब्रह्मा बाबांसारखे बनणे. हिंमत आहे? फॉलो करण्याची हिंमत आहे? जे समजतात करायचेच आहे, त्यांनी हात वर करा. आधी विचार करा आणि मग करा. आधी करून नंतर मग विचार करू नका.

तर आज बापदादा, ब्रह्मा बाबांसारखी विशेष संतुष्टतेची शक्ती प्रत्येक मुलामध्ये पाहू इच्छित आहेत. या एका संतुष्टतेच्या शक्तीमध्ये बाकीच्या सर्व शक्ती सामावलेल्या आहेत. तर आज बापदादांचे विशेष वरदान आहे ‘संतुष्टतेच्या शक्तीने सपंन्न भव!’ काहीही होवो आपल्या संतुष्टतेला कधीही सोडू नका. अनेक मुले म्हणतात, रुहरिहान करतात ना! तर म्हणतात - संतुष्ट बनणे सोपे आहे, परंतु संतुष्ट बनविणे खूप अवघड आहे. एखादा जेव्हा अशी काही गोष्ट करतो आणि तुम्ही समजता की, हे बरोबर नाहीये; मग तरी देखील ते तुम्ही मनात का ठेवता? ‘हा असा करतो, हा तसा करतो, याचा स्वभाव असा आहे, त्याचा तसा आहे…’ या गोष्टी मनात ठेवू नका, कारण तुम्ही हृदयामध्ये (मनामध्ये) बाबांना बसवले आहे. बसवले आहे ना? मान हलवा. बसवले आहे ना पक्के? की बाबांना मनातून काढता सुद्धा आणि मग पुन्हा बसवता सुद्धा? जर बाबांना बसवले आहे तर मग मनामध्ये बाबांसोबत इतर गोष्टी देखील तुम्ही ठेवणार आहात का? तर अशा गोष्टी मनामध्ये ठेवू नका.

बापदादांनी यापूर्वी देखील ही युक्ती सांगितली आहे की, सदैव अशा आत्म्याप्रति शुभ भावना, शुभ कामना ठेवून आपल्या शुभ कामनेला कार्यामध्ये लावा; आणि तसेही पहा तुम्हाला वाटते की, ‘ही चांगले करत नाही’, याचा अर्थ ती खराब गोष्ट आहे. मग जर का तुम्हाला कोणी खराब वस्तू दिली, तर तुम्ही ती घ्याल का? तर जेव्हा खराब आहे हे समजता म्हणजे ते बुद्धीमध्ये ठेवणे, मनात ठेवणे आहे; तर खराब वस्तू तुम्ही स्वीकारलीच का? अशा प्रकारे आपल्या मनामध्ये सदैव बाबांना ठेवून बाबांसारखे बनून जाल. हा तर वायदा आहे ना, पित्यासमान बनायचे आहे ना! बनायचे आहे ना पक्के? की, माहीत नाही बनू की नाही? असा तर विचार करत नाही ना! प्रेम अर्थात फॉलो फादर. तर बापदादा आता प्रत्येक मुलाला शुभ कामना, शुभ भावना संपन्न आत्मा पाहू इच्छित आहेत.

टीचर्स, बनणार ना? टीचर्सवर बापदादांचे विशेष प्रेम आहे. का प्रेम आहे? कारण बाबांच्या गादीवर बसण्याची हिंमत ठेवली आहे. तर टीचर्समध्ये हिंमत आहे ना! प्रत्येक टीचरकडून बाबांची हीच इच्छा आहे की प्रत्येकाच्या फिचरवरून फ्युचर दिसून यावे. निमित्त टीचर्सना बापदादा सांगत आहेत परंतु तुम्ही देखील साथीदार आहात ना! बापदादांनी बोर्डिंगमध्ये पहिली लहान-लहान मुलांना देखील हीच शिकवण दिली की,
प्रत्येकाचा चेहरा असा खुशनुमा आणि खुशकिस्मत (आनंदी आणि भाग्यवान), असावा. तर आता देखील बापदादांची हीच इच्छा आहे की प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरून दिसावे की ही खुशनुमा आणि खुशकिस्मत (आनंदी आणि भाग्यवान) असणारी आत्मा आहे. तुम्ही वाणीद्वारे खूप सेवा केली आहे आणि चांगली केली आहे, त्याचे सर्टिफिकेट तर आहेच, परंतु आता आपल्या चेहऱ्याद्वारे आणि वर्तनाद्वारे सेवा करण्यामध्ये पुढे जा. जसे कोणी गरीब असतो त्याला लॉटरी लागली तर त्याचा चेहरा आणि वर्तन बोलते ना! त्याचा चेहरा पाहूनच सगळे अनुभव करतात आज याला काहीतरी मिळाले आहे. तसेच तुमच्या वर्तनावरून आणि चेहऱ्यावरून त्यांना वाटावे की, यांना काही विशेष प्राप्ती झाली आहे.

तर आज बापदादांना काय हवे आहे? ब्रह्माबाबांसमान बना. फॉलो फादर; कारण काळानुसार भयग्रस्त परिस्थिती उद्भवत देखील आहे आणि हे होणार देखील आहे; म्हणून बापदादा प्रत्येक मुलाला हीच शिकवण देऊ इच्छितात की सदैव आनंदी राहा आणि आनंद वाटा. जितका आनंद वाटाल तितका आनंद वाढेल. तुम्हाला आनंदी पाहून बाकीचे देखील ५ मिनिटांसाठी तरी आनंदी होतील. दुःखी आत्मे जर तुम्हाला पाहून ५ मिनिटे जरी आनंदीत झाले तर त्यांच्यासाठी तर ती अतिशय मनपसंत गोष्ट आहे. तर आज बापदादा प्रत्येक मुलाला विशेष संतुष्टतेची शक्ती वर्तनामध्ये आणि चेहऱ्यावर धारण करून आणि इतरांनाही धारण करण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. अच्छा.

आज सर्वजण जे पहिल्यांदा आले आहेत त्यांनी उभे राहा. बघा, तुम्हाला दिसत आहे. अर्धा क्लास पहिल्यांदा आलेल्यांचा आहे. हात वर करा. बघा, सर्वांचे हात बघा. किती नवीन भाऊ-बहिणी तुमचे साथीदार बनले आहेत. मुबारक असो, खूप-खूप मुबारक असो. आता जसे इथेपर्यंत पोहोचला आहात ना! बापदादांना भेटण्यापर्यंत पोहोचला आहात, पुढे काय करायचे आहे? फॉलो ब्रह्मा बाबा. बापदादांना देखील तुम्हा मुलांना पाहून खूप आनंद होतो - वाह! माझा बच्चा आला! साऱ्या परिवाराला देखील आनंद होतो आमचे भाऊ-बहिण आले, आले, आले! आता फॉलो ब्रह्मा बाबा. कधीही काहीही झाले, एखादा प्रश्न उद्भवला किंवा कोणता प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम्सचीच तर दुनिया आहे. तर ताबडतोब आपल्या टीचरद्वारे त्याचे समाधान करून घ्या. ‘दोन दिवस झाले आहेत, असे आहे’, असे करू नका; कारण खूप उशिरा आला आहात ना आणि पुढे जायची इच्छा आहे ना! मागे राहू इच्छिता का? नाही. पुढे जाऊ इच्छिता तर पुढे जाण्यासाठी हीच एक गोष्ट करा, मनामध्ये कोणतीही व्यर्थ गोष्ट ठेवू नका. यासाठी आपल्या अमृतवेलेला बाबांना भेटल्यानंतर, एक तर अमृतवेला जरूर करा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण दिवसाची दिनचर्या फिक्स करा ज्यामध्ये मन बिझी राहील, कोणते ना कोणते ड्रिल, बापदादांनी अनेक ड्रिल सांगितल्या आहेत, परंतु त्यातील एखादे ड्रिल, कामा सोबतच ते ड्रिल एकत्र करत राहा. बापदादा सर्वांसाठी सांगत आहेत की, मधून-मधून वेळ काढून भले जुने असोत, अथवा नवीन सर्वांनी पूर्णतः अशरीरी बनण्याची ड्रिल जरूर करायची आहे; कारण येणाऱ्या काळामध्ये सेकंदात अशरीरी बनावेच लागेल. तर ही ड्रिल, कोणी म्हणेल - वेळ मिळाला नाही; कितीही कोणी बिझी असो, पाण्याची तहान लागली तर पाणी पिण्यासाठी तुम्ही उठणार नाही काय? आवश्यक समजून उठाल ना! तर हे एक मिनिट अशरीरी बनण्याचे ड्रिल, याची प्रॅक्टिस जरूर करा. त्यावेळी प्रॅक्टिस करू शकणार नाही. बऱ्याचजणांना वाटते ना की, वेळ येईल तेव्हा करू. परंतु नाही. हा जन्मो-जन्मीचा बॉडीकॉन्शसचा अभ्यास त्यावेळी तुम्हाला अशरीरी बनू देणार नाही; त्यामुळे आतापासूनच कोणताही वेळ काढून संपूर्ण दिवसभरामध्ये वेळोवेळी जो कोणता वेळ निश्चित कराल त्या वेळी - एका सेकंदामध्ये मी अशरीरी आत्मा आहे, आत्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित व्हा. बॉडीकॉन्शस आपल्याकडे आकर्षित करू नये. हा अभ्यास सर्वांनी करायचा आहे. जुने असो अथवा नवे कारण बापदादांनी काही वेळापूर्वी ही गोष्ट सांगितली आहे. परंतु करणे जरुरी आहे. नाहीतर श्रीमताचा हात हातात देऊन चालू शकणार नाही. तुमचा वायदा आहे - सोबत जाणार, सोबत राज्यामध्ये येणार. तर हे ड्रिल सर्वांनी करायचे आहे. बाकी जेपण नवीन आले आहेत, आनंदी राहा, प्रगती करत राहा, पुढे-पुढे जात राहा. अच्छा.

चोहो बाजूंच्या दूर बसून हृदयामध्ये सामावलेल्या मुलांना बापदादा देखील पाहत आहेत. सर्वांच्या प्रेमाचा सुगंध मधुबनमध्ये पोहोचत आहे. तर सर्वांना आता तीव्र गतीने पुढे जायचे आहे, वेगाने पुरुषार्थ करायचा आहे, दुनियेतील लोकांना सुखी करण्याचा वेग वाढवायचा आहे. दुःखी असणाऱ्यांना सुखी करायचे आहे. हा सुखी करण्याचा संदेश देऊन सर्वांना सुखी बनवायचे आहे, या सेवेमध्ये वेग तर आहे देखील परंतु अजून वेग वाढवायचा आहे. अच्छा! सर्वांना मनापासून खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो.

वरदान:-
स्वतःच्या आरामाचाही त्याग करून सेवा करणारे सदैव संतुष्ट, सदैव हर्षित भव

सेवाधारी आपल्या दिवस-रात्रीच्या विश्रांतीचा देखील त्याग करून सेवेमध्येच विश्रांती अनुभव करतात, त्यांच्या संपर्कामध्ये राहणारे अथवा संबंधामध्ये येणारे समीपतेचा असा अनुभव करतात जसे शीतलता अथवा शक्तीच्या, शांतीच्या झऱ्याखाली बसले आहेत. श्रेष्ठ चरित्रवान सेवाधारी कामधेनू बनून सर्वांच्या कायमच्या मनोकामना पूर्ण करतात. अशा सेवाधारींना सदैव हर्षित आणि सदैव संतुष्ट राहण्याचे वरदान स्वतः प्राप्त होते.

सुविचार:-
ज्ञान-स्वरूप बनायचे असेल तर सदैव अभ्यासावर लक्ष ठेवा, बाबांवर आणि अभ्यासावर समान प्रेम असावे.

हे अव्यक्त इशारे - ब्रह्माबाबांप्रमाणे संपन्न आणि संपूर्ण स्थितीचा अनुभव करा.

व्यर्थ संकल्प अथवा विकल्प जे चालतात त्याचे कारण - एकच शब्द बुद्धीमध्ये येतो की, ‘हे का झाले,’ या ‘का’ पासून व्यर्थ संकल्पांचा क्यू सुरू होतो. या ‘क्यू’च्या समाप्तीनंतरच संपूर्णता येईल; आणि मग तो क्यू लागेल. जेव्हा ‘का’ हा शब्द नष्ट होईल तेव्हा ड्रामाच्या भावीवर एकरस स्थेरियम (कायमचे स्थिर) राहाल.

विशेष सूचना - महिन्याच्या तिसऱ्या रविवारचा योग अभ्यास -

आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपामध्ये एकत्र येऊन सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजेपर्यंत आपल्या शक्तीस्वरूप स्थितीमध्ये स्थित होऊन, ज्ञान-सूर्याच्या शक्तिशाली किरणांना स्वतःमध्ये धारण करून त्या किरणांद्वारे विश्व परिवर्तनाच्या सेवेमध्ये सहयोगी बना.