16-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला रूहानी हुनर (आत्मिक कौशल्य) शिकविण्याकरिता,
ज्या कौशल्यामुळे तुम्ही सूर्य-चंद्राच्याही पलिकडे शांतीधाममध्ये जाता”
प्रश्न:-
सायन्सचा
अभिमान आणि सायलेन्सचा अभिमान यामध्ये कोणता फरक आहे?
उत्तर:-
सायन्सचे (विज्ञानाचे) अभिमानी चंद्र-ताऱ्यांवर जाण्यासाठी किती खर्च करतात. देहाचा
(मृत्यूचा) धोका पत्करून जातात. त्यांना ही भीती असते की रॉकेट कुठे निकामी तर
होणार नाही ना. तुम्ही मुले सायलेन्सचे अभिमानी बिना कवडी खर्चाचे
सूर्य-चंद्राच्याही पलीकडे मूलवतनमध्ये निघून जाता. तुम्हाला कसलीही भिती वाटत नाही
कारण तुम्ही देह इथेच ठेवून जाता.
ओम शांती।
रूहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. मुले ऐकत तर असतात की
वैज्ञानिक चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ते लोक तर चंद्रापर्यंत
जाण्याचा प्रयत्न करतात, किती खर्च करतात. वरती जाण्यामध्ये खूप भीती असते. आता
तुम्ही स्वतःबद्दल विचार करा, तुम्ही कुठे राहणारे आहात? ते तर चंद्रापर्यंत जातात.
तुम्ही तर सूर्य-चंद्राच्याही पार पलीकडे जाता, एकदम मूलवतनमध्ये. ते लोक वर (अवकाशामध्ये)
जातात तर त्यांना खूप पैसे मिळतात. वरती फेरी मारून येतात तेव्हा त्यांना लाखो
भेटवस्तू मिळतात. देहाचा धोका पत्करून जातात. ते आहेत सायन्सचे अभिमानी; तुमच्याकडे
आहे सायलेन्सचा अभिमान. तुम्ही जाणता - आपण आत्मे आपल्या शांतीधाम ब्रह्मांडामध्ये
जातो. आत्माच सर्व काही करते. त्यांची (वैज्ञानिकांची) देखील आत्मा शरीरासोबत वरती
(अवकाशामध्ये) जाते. खूप भीतीदायक असते. घाबरतात सुद्धा, वरून कोसळलो तर प्राणच
गमवावा लागेल. ती सर्व आहेत भौतिक कौशल्ये. बाबा तुम्हाला रूहानी हुनर (कला)
शिकवतात. ही कला शिकल्यामुळे तुम्हाला किती मोठे बक्षीस मिळते. २१ जन्मांसाठी
नंबरवार पुरुषार्थानुसार बक्षीस मिळते. आजकाल सरकार लॉटरी सुद्धा काढते ना. हे बाबा
तुम्हाला बक्षीस देतात; आणि काय शिकवतात? तुम्हाला एकदम वर घेऊन जातात, जिथे तुमचे
घर आहे. आता तुम्हाला आठवते ना की आपले घर कुठे आहे आणि जे राज्य गमावले आहे, ते
कुठे आहे. रावणाने हिरावून घेतले. आता पुन्हा आम्ही आपल्या मूळ घरीसुद्धा जातो आणि
राज्य देखील मिळवतो. मुक्तीधाम आपले घर आहे - हे कोणालाच माहीती नाही आहे. आता
तुम्हा मुलांना शिकविण्यासाठी बाबा बघा कुठून येतात, किती लांबून येतात. आत्मा
देखील रॉकेट आहे. ते (वैज्ञानिक) वरती जाऊन चंद्रावर काय आहे, ग्रहांवर काय आहे ते
बघण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही मुले जाणता हे तर या मंडपाचे दिवे आहेत. जसे
मंडपामध्ये विजेचे दिवे लावतात. म्युझियममध्ये देखील तुम्ही दिव्यांच्या माळा लावता
ना. ही तर मग आहे बेहदची दुनिया. यामध्ये हे सूर्य, चंद्र, तारे प्रकाश देणारे आहेत.
तर मग मनुष्य समजतात हे सूर्य-चंद्र देवता आहेत. परंतु हे काही देवता तर नाहीत. आता
तुम्ही समजता बाबा कसे येऊन आपल्याला मनुष्या पासून देवता बनवतात. हे ज्ञान सूर्य,
ज्ञान चंद्रमा आणि ज्ञान भाग्यशाली तारे आहेत. ज्ञानामुळेच तुम्हा मुलांची सद्गती
होत आहे. तुम्ही किती दूर जाता. बाबांनीच घरी जाण्याचा मार्ग दाखवला आहे.
बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही आपल्या घरी परत जाऊ शकत नाही. बाबा येऊन जेव्हा शिकवतात,
तेव्हा तुम्हाला माहित होते. हे देखील तुम्ही समजता की आपण आत्मे पवित्र बनल्यावरच
आपल्या घरी जाऊ शकणार. मग ते योगबलाने नाहीतर सजा खाऊन परंतु पावन बनायचेच आहे. बाबा
तर समजावून सांगत राहतात की, जितकी बाबांची आठवण कराल तितके तुम्ही पावन बनाल. आठवण
केली नाहीत तर पतितच राहून जाल मग तर खूप सजा खावी लागेल आणि पद सुद्धा भ्रष्ट होईल.
बाबा स्वतः बसून तुम्हाला समजावून सांगतात - तुम्ही अशा प्रकारे घरी जाऊ शकता.
ब्रह्मांड काय आहे, सूक्ष्मवतन काय आहे, काहीही माहीत नाही. विद्यार्थ्यांना आधी
थोडेच माहीत असते, जेव्हा शिकायला सुरवात करतात तेव्हा ज्ञान मिळते. शिक्षण देखील
कोणते उच्च असते तर कोणते साधारण असते. जसे आय. सी. एस्. ची परीक्षा दिली तर मग
म्हणणार नॉलेजफुल. यापेक्षा उच्च शिक्षण दुसरे कोणते असत नाही. आता तुम्ही देखील
किती उच्च शिक्षण घेत आहात. बाबा तुम्हाला पवित्र बनण्याची युक्ती सांगतात की,
‘मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही पतिता पासून पावन बनाल’. खरे तर
तुम्ही आत्मे पवित्र होता, वरती आपल्या घरामध्ये राहणारे होता. जेव्हा तुम्ही
सतयुगामध्ये जीवनमुक्तीमध्ये असता तेव्हा बाकीचे सर्व मुक्तीधाममध्ये असतात. मुक्ती
आणि जीवनमुक्ती दोन्हीला आपण शिवालय म्हणू शकतो. मुक्तीमध्ये शिवबाबासुद्धा राहतात
आणि आपण मुले (आत्मे) देखील राहतो. हे आहे रूहानी सर्वोच्च ज्ञान. ते (वैज्ञानिक)
म्हणतात आम्ही चंद्रावर जाऊनच दाखवू. किती डोकेफोड करतात. बहादुरी दाखवतात. कित्येक
दशलक्ष मैल वरती जातात, परंतु त्यांची इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमची इच्छा पूर्ण
होते. त्यांचा आहे खोटा दैहिक अहंकार. तुमचा आहे रूहानी अभिमान. ते (वैज्ञानिक)
मायेची वीरता किती दाखवतात आणि लोकं किती टाळ्या वाजवतात, अभिनंदन करतात. भरपूर धन
मिळते. फार-फार तर ५-१० कोटी मिळतील. तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे की त्यांना हे जे
पैसे मिळतात, ते सर्व नष्ट होणार आहेत. बाकी थोडेच दिवस आहेत असे समजा. आज काय आहे,
उद्या काय होईल! आज तुम्ही नरकवासी आहात, उद्या स्वर्गवासी बनाल. फार काही वेळ लागत
नाही, तर त्यांची आहे शारीरिक शक्ती आणि तुमची आहे रूहानी शक्ती. जी केवळ तुम्हीच
जाणता. ते शारीरिक ताकतीच्या आधारे कुठपर्यंत जातील? चंद्र, ताऱ्यांपर्यंत
पोहोचतील आणि युद्ध सुरू होईल. मग ते सर्व नष्ट होतील. त्यांची कला इथेच नष्ट होईल.
ती आहे भौतिक सर्वश्रेष्ठ कला, तुमची आहे रुहानी सर्वश्रेष्ठ कला. तुम्ही शांतीधामला
जाता; त्याचे नावच आहे स्वीट होम. ते लोक किती उंचावर जातात आणि तुम्ही आपला हिशोब
करा - तुम्ही किती मैल वरती जाता? तुम्ही कोण? आत्मे. बाबा म्हणतात, मी किती मैल
वरती राहतो. मोजू शकाल? त्यांच्याकडे तर मोजमाप आहे, सांगतात - इतके मैल वरती गेलो
मग परत येतात. खूप खबरदारी घेतात असे उतरू, हे करू, खूप आवाज होतो. तुमचा काय आवाज
होईल. तुम्ही कुठे जाता आणि कसे येता, कोणालाच माहीत नाही. तुम्हाला काय बक्षीस
मिळते हे देखील तुम्हीच जाणता. अद्भुत आहे. बाबांची कमाल आहे, कोणालाच माहीत नाही.
तुम्ही तर म्हणाल ही काही नवीन गोष्ट थोडीच आहे. दर ५ हजार वर्षांनंतर ते आपले हे
काम करत राहतील. तुम्ही या सृष्टीरूपी ड्रामाचा आदि-मध्य-अंत, त्याचा कालावधी
इत्यादी चांगल्या प्रकारे जाणता. तर तुम्हाला आतून अभिमान वाटला पाहिजे - बाबा
आम्हाला काय शिकवतात. खूप श्रेष्ठ पुरुषार्थ करतो, तरीही पुन्हा करणार. या सर्व
गोष्टी बाकी कोणीही जाणत नाहीत. बाबा तर गुप्त आहेत. तुम्हाला कित्येक दिवस समजावून
सांगतात. तुम्हाला किती ज्ञान देतात. त्या लोकांचे जाणे एका मर्यादे पर्यंत आहे.
तुम्ही बेहद मध्ये जाता. ते चंद्रापर्यंत जातात, आता ते तर मोठ-मोठे दिवे आहेत बाकी
तर काहीच नाही आहे. त्यांना धरणी (पृथ्वी) खूप लहान दिसते. तर त्यांच्या भौतिक
ज्ञानामध्ये आणि तुमच्या ज्ञानामध्ये किती अंतर आहे. तुमची आत्मा किती छोटी आहे
परंतु रॉकेट खूप तीव्र गतीचे आहे. आत्मे वरती राहतात मग पार्ट बजावण्यासाठी येतात.
ते देखील सुप्रीम आत्मा आहेत. परंतु त्यांची पूजा कशी करणार. भक्ती देखील जरूर
होणारच आहे.
बाबांनी समजावून
सांगितले आहे अर्धे कल्प आहे ज्ञान अर्थात दिवस, अर्धे कल्प आहे भक्ती अर्थात रात्र.
आता संंगम युगामध्ये तुम्ही ज्ञान घेता. सतयुगामध्ये तर ज्ञान असतही नाही त्यामुळे
याला पुरुषोत्तम संंगमयुग म्हटले जाते. सर्वांना पुरुषोत्तम बनवतात. तुमची आत्मा
किती दूरपर्यंत जाते, तुम्हाला आनंद होतो ना. ते कला-कौशल्य दाखवतात तर भरपूर पैसे
मिळतात. भले कितीही पैसे मिळो परंतु तुम्ही समजता ते काहीही बरोबर येणारे नाही. आता
मेले की मेले. सर्वकाही नष्ट होणार आहे. आता तुम्हाला किती मौल्यवान रत्ने मिळत
आहेत, यांची किंमत केली जाऊ शकत नाही. एक-एक महावाक्य लाख-लाख रूपयांचे आहे. किती
काळापासून तुम्ही ऐकतच आले आहात. गीतेमध्ये किती मौल्यवान ज्ञान आहे. ही एकच गीता
आहे जिला सर्वात जास्त मौल्यवान म्हणतात. सर्वशास्त्रमई शिरोमणी श्रीमत भगवत गीता
आहे. ते लोक भलेही वाचत राहतात परंतु अर्थ थोडेच समजतात. गीता वाचून काय होणार. आता
बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. ते भले गीता पठण करतात परंतु
एकाचाही बाबांसोबत योग नाही. बाबांनाच सर्वव्यापी म्हणतात. पावनसुद्धा बनू शकत
नाहीत. आता हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र तुमच्या समोर आहे. यांना देवता म्हटले जाते
कारण दैवी गुण आहेत. तुम्हा सर्व आत्म्यांना पवित्र बनून आपल्या घरी जायचे आहे.
नवीन दुनियेमध्ये तर इतके मनुष्य असत नाहीत. बाकी सर्व आत्म्यांना आपल्या घरी जावे
लागेल. बाबा देखील तुम्हाला अद्भुत नॉलेज देतात, ज्यामुळे तुम्ही मनुष्यापासून देवता
खूप श्रेष्ठ बनता. तर अशा शिक्षणावर लक्ष देखील तितके असायला हवे. हे देखील समजतात
जितके ज्याने कल्पापूर्वी लक्ष दिले आहे, तितके देत राहतील. माहिती होत राहते. बाबा
सेवेचा समाचार ऐकून खूष पण होतात. बाबांना कधी पत्रच लिहीत नाहीत तर बाबा समजतात
त्यांचा बुद्धीयोग कुठे दगड-धोंड्यांमधे लागलेला आहे. देह-अभिमान आलेला आहे, बाबांना
विसरले आहेत. नाही तर विचार करा जेव्हा प्रेमविवाह होतो तेव्हा त्यांचे एकमेकांवर
किती प्रेम असते. परंतु हां, जर का कोणाचे विचार बदलतात तर मग पत्नीला देखील मारून
टाकतात. हा तुमचा त्यांच्याबरोबर आहे प्रेमविवाह. बाबा येऊन तुम्हाला आपला परिचय
देतात. तुम्हाला आपोआप परिचय मिळत नाही, बाबांना यावे लागते. बाबा तेव्हाच येतील
जेव्हा दुनिया जुनी होईल. जुन्याला नवीन बनविण्यासाठी जरूर संंगमावरच येतील. बाबांचे
कर्तव्य नवी दुनिया स्थापन करण्याचे आहे. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात तर अशा
बाबांवर किती प्रेम असायला हवे; मग असे का म्हणता की ‘बाबा, आम्ही विसरून जातो’.
बाबा किती सर्व श्रेष्ठ आहेत. यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असत नाही. मनुष्य
मुक्तीसाठी किती डोकेफोड करतात, उपाय करतात. किती फसवाफसवी चालली आहे. महर्षी
इत्यादीचे किती नाव आहे. सरकार १०-२० एकर जमीन देऊन टाकते. असे नाही की सरकार काही
अधार्मिक आहे, त्यांच्यामध्ये कोणी मंत्री धार्मिक आहेत, कोणी अधार्मिक आहेत. कोणी
तर धर्माला मानतच नाहीत. म्हटले जाते धर्म एक शक्ती आहे. ख्रिश्चनांमध्ये ताकद होती
ना. पूर्ण भारताला गिळून टाकले. आता भारतामध्ये काहीच शक्ती राहिलेली नाही. किती
तंटे-मारामाऱ्या चालू आहेत. तोच भारत काय होता. बाबा कसे, कुठे येतात, कोणालाच
काहीही माहिती नाही. तुम्ही जाणता मगध देशामध्ये येतात, जिथे मगरी असतात. मनुष्य असे
आहेत जे सर्वकाही खातात. सर्वात जास्त वैष्णव भारत होता. हे वैष्णव राज्य आहे ना.
कुठे हे महान पवित्र देवता आणि कुठे हे मनुष्य, आजकाल तर बघा काय-काय खात आहेत.
नरभक्षक सुद्धा बनतात. भारताची काय अवस्था झाली आहे. आता तुम्हाला सर्व रहस्ये
समजावून सांगत आहेत. वर पासून खाल पर्यंत पूर्ण ज्ञान देतात. सर्वात पहिले तुम्हीच
या पृथ्वीवर असता मग मनुष्यांची वृद्धी होते. आता थोड्याच वेळात हाहाःकार होईल मग
हाय-हाय करत राहतील. स्वर्गामध्ये बघा किती सुख आहे. ही एम ऑब्जेक्टची निशाणी (लक्ष्मी-नारायण)
बघा. तुम्हा मुलांना हे सर्व धारणसुद्धा करायचे आहे. किती उच्च शिक्षण आहे. बाबा
किती स्पष्ट करून समजावून सांगतात. माळेचे रहस्य देखील सांगितले आहे. वरती आहे फूल
शिवबाबा, नंतर मेरू… प्रवृत्तीमार्ग आहे ना. निवृत्ती मार्गवाल्यांना तर माळा
जपण्याची अनुमती नाही. ही आहेच देवतांची माळा, त्यांनी राज्य कसे मिळवले,
तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. काहीजण आहेत जे कोणालाही अगदी बेधडक सांगू लागतात
- ‘या, आलात तर आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगू ज्या इतर कोणी सांगूच शकणार नाहीत.
शिवबाबांव्यतिरिक्त इतर कोणीही या गोष्टी जाणतही नाहीत. त्यांना हा राजयोग कोणी
शिकवला’. बसून अतिशय रसभरीत वर्णन करून सांगितले पाहिजे. हे ८४ जन्म कसे घेतात,
देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र… बाबा किती सोपे ज्ञान देतात आणि पवित्रसुद्धा बनायचे
आहे तरच उच्च पद मिळवाल. साऱ्या विश्वामध्ये शांती स्थापन करणारे तुम्ही आहात. बाबा
तुम्हाला राज्य-भाग्य देतात. दाता आहेत ना. ते काही घेत नाहीत. तुमच्या केलेल्या
अभ्यासाचे हे बक्षीस आहे. असे बक्षीस तर दुसरे कोणी देऊ शकत नाही. तर अशा बाबांची
प्रेमाने आठवण का करत नाही. लौकिक पित्याची तर पूर्ण जन्मभर आठवण करता. पारलौकिक
पित्याची का आठवण करत नाही. बाबांनी सांगितले आहे हे युद्धाचे मैदान आहे, पवित्र
बनण्याकरिता वेळ लागतो. युद्ध पूर्ण होण्याइतकाच वेळ लागतो. असे नाही जे सुरवातीला
आले आहेत ते संपूर्ण पावन असतील. बाबा म्हणतात - मायेशी खूप जोरदार युद्ध चालते.
चांगले-चांगले असलेल्यांना देखील माया जिंकून घेते इतकी ती बलवान आहे. जे कोसळतात (पतन
होते) ते मग मुरली तरी कुठून ऐकणार. सेंटरवर येत सुद्धा नाहीत तर त्यांना कसे माहीत
होणार. माया एकदम कवडी तुल्य बनवते. जेव्हा मुरली वाचतील तेव्हा जागृत होतील ना.
वाईट कामे करू लागतात. कोणीतरी हुशार मुलगा असावा जो त्यांना समजावून सांगेल -
‘तुम्ही मायेकडून कसे पराभूत झाला आहात. बाबा तुम्हाला काय सांगत आहेत, तरीही तुम्ही
कुठे जात आहात’. तुम्ही बघत असाल की माया यांना खाऊन टाकत आहे तर त्यांना
वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठे मायेने पूर्णच गिळंकृत करू नये. पुन्हा
जागृत व्हावे, नाही तर उच्च पद मिळणार नाही. सद्गुरुची निंदा करण्याच्या निमित्त
बनतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडून
सायलेन्सची हुनर (कला) शिकून या हदच्या दुनियेपासून दूर बेहदमध्ये जायचे आहे. नशा
असावा की बाबा आपल्याला किती अद्भुत ज्ञान देऊन किती मोठे बक्षीस देत आहेत.
२) बेधडकपणे अतिशय
रसभरीत पद्धतीने ज्ञान सांगण्याची सेवा करायची आहे. मायेच्या युद्धामध्ये शक्तिशाली
बनून विजय प्राप्त करायचा आहे. मुरली ऐकून जागृत रहायचे आहे आणि सर्वांना जागृत
करायचे आहे.
वरदान:-
परमपूज्य बनून
परमात्म प्रेमाचा अधिकार प्राप्त करणारे संपूर्ण स्वच्छ आत्मा भव
जीवनामध्ये सदैव ही
स्मृती ठेवा की, मी पूज्य आत्मा या शरीररूपी मंदिरामध्ये विराजमान आहे. अशी पूज्य
आत्माच सर्वांची आवडती आहे. त्यांची जड मूर्ती देखील सर्वांना आवडते. कोणी आपसात भले
भांडत असतील परंतु मूर्तीवर प्रेम करतील कारण तिच्यामध्ये पवित्रता आहे. तर आपणच
आपल्याला विचारा - ‘माझी मन-बुद्धी संपूर्ण स्वच्छ बनली आहे, जरापण अस्वच्छता तर
मिसळलेली नाही ना?’ जे असे संपूर्ण स्वच्छ आहेत, तेच परमात्म-प्रेमाचे अधिकारी आहेत.
बोधवाक्य:-
ज्ञानाच्या
खजिन्याला स्वतःमध्ये धारण करून प्रत्येक वेळी, प्रत्येक कर्म समजून करणारेच
ज्ञानी-तू-आत्मा आहेत.