17-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही बाबांकडे आले आहात आपले सौभाग्य बनविण्यासाठी, परम सौभाग्य त्या
मुलांचे आहे - ज्यांचे ईश्वर सर्व काही स्वीकार करतात’’
प्रश्न:-
मुलांच्या
कोणत्या एका चुकीमुळे माया खूप बलवान बनते?
उत्तर:-
मुले भोजनाच्या वेळी बाबांना विसरून जातात, बाबांना खाऊ न घातल्यामुळे भोजन माया
खाऊन टाकते, ज्यामुळे ती बलवान बनते, मग मुलांनाच हैराण करते. ही छोटीशी चूक
मायेसमोर मुलांना पराभूत करते म्हणून बाबांची आज्ञा आहे - मुलांनो, आठवणीमध्ये खा.
पक्का प्रण करा - ‘तुम्हीं से खाऊं…’ जेव्हा आठवण कराल तेव्हा ते संतुष्ट होतील.
गीत:-
आज नहीं तो कल
बिखरेंगे यह बादल...
ओम शांती।
मुले समजतात की आता आपले दुर्दैवाचे दिवस बदलून आता कायमसाठी सौभाग्याचे दिवस येत
आहेत. नंबरवार पुरुषार्थानुसार भाग्य बदलतच राहते. शाळेमध्ये देखील नशीब बदलत जाते
ना अर्थात प्रगती करत पुढे जातात. तुम्ही चांगल्या रीतीने जाणता - आता ही रात्र
संपणार आहे, आता नशीब बदलत आहे. ज्ञान वर्षा होत राहते. हुशार मुले समजतात - खरोखर
आपण दुर्दैवी पासून सौभाग्यशाली बनत आहोत अर्थात स्वर्गाचे मालक बनत आहोत. नंबरवार
पुरुषार्थानुसार आपण आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलत आहोत. आता रात्री नंतर दिवस
होत आहे. हे तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नाहीये. बाबा गुप्त आहेत
तर त्यांच्या गोष्टी देखील गुप्त आहेत. भले मनुष्यांनी बसून सहज राजयोग सहज
ज्ञानाच्या गोष्टी शास्त्रांमध्ये लिहिल्या आहेत परंतु ज्यांनी लिहिले आहे ते तर
मरून गेले. बाकी जे काही वाचतात ते काहीच समजू शकत नाहीत कारण अज्ञानी आहेत. किती
अंतर आहे. तुम्ही देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजता. सर्वजण नेहमीच एकसमान
पुरुषार्थ करत नाहीत. दुर्भाग्य कशाला म्हटले जाते, सौभाग्य कशाला म्हटले जाते - हे
केवळ तुम्ही ब्राह्मणच जाणता. बाकीचे तर सर्व घोर अंधारामध्ये आहेत. त्यांना
समजावून सांगून जागे करायचे आहे. सौभाग्यशाली म्हटले जाते सूर्यवंशींना, तेच १६ कला
संपूर्ण आहेत. जे बाबा स्वर्ग रचणारे आहेत त्या बाबांद्वारे आपण स्वर्गाकरिता
सौभाग्य बनवत आहोत. इंग्रजी जाणणाऱ्यांना देखील तुम्ही समजावून सांगू शकता की,
‘आम्ही हेवनली गॉडफादर द्वारे हेवनचे सौभाग्य बनवत आहोत. हेवनमध्ये (स्वर्गामध्ये)
आहे सुख, हेलमध्ये (नरकामध्ये) आहे दुःख. गोल्डन एज अर्थात सतयुग - सुख, आयरन एज
अर्थात कलियुग - दुःख’. एकदम सोपी गोष्ट आहे. आपण सर्व पुरुषार्थ करत आहोत. इंग्रज,
ख्रिश्चन इत्यादी भरपूर येतील. तुम्ही बोला, ‘आम्ही आता फक्त एकाच हेवनली गॉड फादरची
आठवण करतो कारण मृत्यू समोर उभा आहे’. बाबा म्हणतात - तुम्हाला माझ्याजवळ यायचे आहे.
जसे तीर्थ स्थानांवर जातात ना. बौद्धांचे आपले तीर्थस्थान आहे, ख्रिश्चनांचे आपले
आहे. प्रत्येकाचे रीती-रिवाज आपापले आहेत. आपली आहे बुद्धी योगाची गोष्ट. जिथून
पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत, तिथे परत जायचे आहे. ते आहेत हेवन स्थापन करणारे गॉड
फादर. त्यांनी आम्हाला सांगितले आहे, आम्ही देखील तुम्हाला खरा रस्ता सांगतो. पिता
गॉड फादरची आठवण करा तर अंत मती सो गती होईल. जेव्हा कोणी आजारी पडतात तर त्यांना
सर्वजण जाऊन सावध करतात की, ‘राम-राम’ म्हणा. बंगालमध्ये जेव्हा कोणी मरणासन्न होतो
तर त्याला गंगेवर घेऊन जातात आणि म्हणतात - ‘हरी बोल, हरी बोल…’ म्हणजे मग हरीकडे
निघून जाशील. परंतु असे कोणी जात नाही. सतयुगामध्ये तर असे म्हणणार नाहीत की
‘राम-राम’ म्हणा किंवा ‘हरी’ बोला. द्वापर पासून मग हा भक्तिमार्ग सुरू होतो. असे
नाही, सतयुगामध्ये काही भगवंताची अथवा गुरूची आठवण केली जाते. तिथे तर केवळ आपल्या
आत्म्याची आठवण केली जाते, मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेणार. आपली बादशाही आठवते.
समजतात - मी आपल्या राज्यामध्ये जाऊन जन्म घेणार. आता हा पक्का निश्चय आहे, बादशाही
तर मिळणारच आहे ना. बाकी कोणाची आठवण करणार अथवा दान-पुण्य करणार? तिथे कोणी गरीब
असतही नाही ज्याला आपण दान-पुण्य करावे. भक्तीमार्गाचे रीती-रिवाज वेगळे, ज्ञान
मार्गाचे रीती-रिवाज वेगळे आहेत. आता बाबांना सर्व काही देऊन २१ जन्मांचा वारसा
घेतला आहे. बस्स, मग दान-पुण्य करण्याची गरजच नाही. ईश्वर पित्याला आपण सर्व काही
देतो. ईश्वरच स्वीकार करतात. स्वीकार केले नाही तर मग देणार कसे? स्वीकार नाही केले
तर ते देखील दुर्भाग्य. स्वीकार करावे लागते म्हणजे त्यांचा मोह नष्ट होतो. हे
रहस्य देखील तुम्ही मुलेच जाणता. जर गरजच नाही तर मग स्वीकार तरी का करतील? इथे तर
काही गोळा करायचे नाहीये. इथून तर मोह नष्ट करावा लागतो.
बाबांनी समजावून
सांगितले आहे - बाहेर कुठे जाता तर स्वतःला खूप हलके समजा. आपण बाबांची मुले आहोत,
आपण आत्मा रॉकेट पेक्षाही वेगवान आहोत. असे देही-अभिमानी होऊन पायी चालाल तरी देखील
कधी थकणार नाही. देहाचे भान येणार नाही. जणूकाही हे पाय चालतच नाहीत, आपण उडत जात
आहोत. देही-अभिमानी बनून तुम्ही कुठेही जा. पूर्वी तर मनुष्य तीर्थस्थान इत्यादी
ठिकाणी पायी चालत जात असत. त्यावेळी मनुष्यांची बुद्धी तमोप्रधान नव्हती. खूप
श्रद्धेने जात असत, थकून जात नव्हते. बाबांची आठवण केल्याने मदत तर मिळेलच ना. भले
ती दगडाची मूर्ती आहे परंतु बाबा त्यावेळी अल्पकाळासाठी मनोकामना पूर्ण करतात.
त्यावेळी रजोप्रधान आठवण होती त्यामुळे देखील ताकद मिळत होती, थकायला होत नसे. आता
तर सधन व्यक्ती लगेचच थकून जातात. गरीब लोक अनेक तीर्थयात्रांना जातात. श्रीमंत लोक
मोठ्या थाटामाटात घोड्यावर बसून जातील. ते गरीब तर पायी चालत जातील. भावनेचे भाडे
जितके गरिबांना मिळते तितके श्रीमंतांना मिळत नाही. यावेळी देखील तुम्ही जाणता -
बाबा गरीब निवाज आहेत मग गोंधळून का जाता? विसरून का जाता? बाबा म्हणतात तुम्हाला
कोणतेच कष्ट घ्यायचे नाही आहेत. फक्त एका साजनची आठवण करायची आहे. तुम्ही सर्व सजणी
आहात तर साजनची आठवण करावी लागेल. त्या साजनला भोग लावल्याशिवाय खायला लाज नाही
वाटत? ते (बाबा) साजन देखील आहेत, पिता देखील आहेत. म्हणतात तुम्ही मला खाऊ घालणार
नाही! तुम्ही तर मला खाऊ घातले पाहिजे ना! पहा, बाबा युक्त्या सांगतात. तुम्ही पिता
किंवा साजन मानता ना. जो खाऊ घालतो त्याला तर पहिले खाऊ घातले पाहिजे. बाबा म्हणतात
मला भोग लावून, माझ्या आठवणीमध्ये खा. यामध्ये खूप मेहनत आहे. बाबा वारंवार समजावून
सांगतात, बाबांची जरूर आठवण करायची आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः देखील वारंवार
पुरुषार्थ करत राहतात. तुम्हा कुमारींसाठी तर खूपच सोपे आहे. तुम्ही शिडी चढलेल्या
नाही आहात. कन्येची तर साजन सोबत सगाई होतेच. तर अशा साजनची आठवण करत भोजन खाल्ले
पाहिजे. त्यांची आपण आठवण करतो आणि ते आपल्याकडे येतात. आठवण कराल तर भासना घेतील.
तर अशा प्रकारे बाबांसोबत गोष्टी केल्या पाहिजेत. तुमची ही प्रॅक्टिस होईल रात्रीचे
जागल्याने. अभ्यास असेल तर मग दिवसभरामध्ये देखील आठवण राहील. भोजन करत असताना
देखील आठवण केली पाहिजे. साजन सोबत तुमची सगाई झाली आहे. ‘तुम्ही से खाऊं…’ हा पक्का
प्रण करायचा आहे. जेव्हा आठवण कराल तेव्हाच तर ते खातील ना. त्यांना तर भासनाच
मिळणार आहे कारण त्यांना काही आपले शरीर तर नाहीये. कुमारींसाठी तर खूपच सोपे आहे,
यांना जास्त सवलती आहेत. शिवबाबा आमचा सलोना साजन किती गोड आहे. अर्धा कल्प आम्ही
तुमची आठवण केली आहे, आता तुम्ही येऊन भेटले आहात! आम्ही जे खातो, तुम्ही देखील खा.
असे नाही, एकदा आठवण केली, बस झाले, मग तुम्ही स्वतः खात रहाल. त्यांना खाऊ घालणे
विसरून जाल. त्यांना विसरलात तर त्यांना मिळणार नाही. पदार्थ तर खूप खाता, खिचडी
खाल, आंबे खाल, मिठाई खाल… असे थोडेच चालेल की, फक्त सुरुवातीला आठवण केली आणि खलास;
मग बाकीचे पदार्थ ते कसे खातील. साजनने खाल्ले नाहीत तर मध्येच माया खाऊन टाकेल,
त्यांना खाऊ देणार नाही. मी पाहतो (शिवबाबा बघतात) माया खाऊन टाकते त्यामुळे तीच
बलवान बनते आणि तुम्हाला पराभूत करत राहते. बाबा सर्व युक्त्या सांगतात. बाबांची
आठवण कराल तर बाबा अथवा साजन खूप संतुष्ट होईल. म्हणता - ‘बाबा, तुम्हीं से बैठूँ,
तुम्हीं से खाऊं’. आम्ही तुमची आठवण करून खातो. ज्ञानाद्वारे जाणतो तुम्ही तर
भासनाच घ्याल. हे (ब्रह्मा तन) तर लोनवर घेतलेले शरीर आहे. आठवण केल्याने ते येतात.
सर्व काही तुमच्या आठवणीवर अवलंबून आहे. यालाच योग म्हटले जाते. योगामध्ये मेहनत आहे.
संन्यासी-उदासी कधी असे म्हणणार नाहीत. तुम्हाला जर पुरुषार्थ करायचा असेल तर
बाबांच्या श्रीमतावर लक्ष द्या. पुरेपूर पुरुषार्थ करा. बाबा (ब्रह्मा बाबा) आपला
अनुभव सांगतात - म्हणतात, ‘जसे कर्म मी करतो, तुम्ही देखील करा’. तेच कर्म मी
तुम्हाला शिकवतो. बाबांना तर कर्म करायचे नाहीये. सतयुगामध्ये कधी केलेल्या कर्मांचा
पश्चाताप करत नाहीत. बाबा खूप सोप्या गोष्टी सांगतात. ‘तुम्हीं से बैठूँ, सुनूँ,
तुम्हीं से खाऊं…’ हे तुमचेच गायन आहे. साजनच्या रूपामध्ये किंवा पित्याच्या
रूपामध्ये आठवण करा. गायले आहे ना - विचार सागर मंथन करून ज्ञानाचे पॉईंट्स काढतात.
या प्रॅक्टिसने विकर्म देखील विनाश होतील, निरोगी सुद्धा व्हाल. जे पुरुषार्थ करतील
त्यांचा फायदा होईल, जे करणार नाहीत त्यांचे नुकसान होईल. सारी दुनिया काही
स्वर्गाची मालक बनत नाही. हा देखील हिशोब आहे.
बाबा खूप चांगल्या
रीतीने समजावून सांगतात. गाणे तर ऐकले, खरोखर आपण यात्रेवर जात आहोत. यात्रेवर भोजन
इत्यादी तर खावेच लागते, सजनी साजन सोबत, मुले बाबांसोबत खातील. इथे देखील असेच आहे.
साजनवर तुमचे जितके प्रेम असेल तितका आनंदाचा पारा चढेल. निश्चयबुद्धि विजयन्ती होत
जाल. योग अर्थात दौडी (धाव घेणे). ही बुद्धी योगाची धाव आहे. आपण स्टुडंट आहोत,
टीचर आपल्याला धावायला शिकवतात. बाबा म्हणतात असे समजू नका की, दिवसाचे फक्त कर्मच
करायचे आहे. कासवा प्रमाणे कर्म करून मग आठवणीमध्ये बसा. भ्रामरी संपूर्ण दिवस
भुं-भुं करते. मग कोणी उडतात, कोणी मरतात, तो तर एक दृष्टांत आहे. इथे तुम्ही
भुं-भुं करून आप समान बनवता. त्यांच्यामधून कोणाचे तर खूप प्रेम असते. कोणी सडून
जातात, कोणी अर्धवट राहून जातात, भागन्ती होतात आणि मग जाऊन किडे बनतात. तर हे
भुं-भुं करणे खूप सोपे आहे. ‘मनुष्य से देवता किये करत न लागी वार…’ आता आपण योग
लावत आहोत, देवता बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत. हेच ज्ञान गीतेमध्ये होते. ते (बाबा)
मनुष्या पासून देवता बनवून गेले होते. सतयुगामध्ये तर सर्व देवता होते. जरूर त्यांना
संगमयुगावरच येऊन देवता बनविले असेल. तिथे काही देवता बनण्याचा योग शिकवणार नाहीत.
सतयुग-त्रेतामध्ये देवी-देवता धर्म होता आणि कलियुग अंताला आहे आसुरी धर्म. या
गोष्टी फक्त गीतेमध्येच लिहिलेल्या आहेत. मनुष्याला देवता बनविण्यामध्ये वेळ लागत
नाही कारण एम ऑब्जेक्ट सांगतात. तिथे (सतयुगामध्ये) संपूर्ण दुनियेमध्ये एकच धर्म
असेल. दुनिया तर सर्वच असणार ना. असे नाही चीन, युरोप नसेल, सर्व देश असतील परंतु
तिथे मनुष्य नसतील. केवळ देवता धर्मावालेच असतील, बाकी कोणत्याही धर्माचे नसतात. आता
आहे कलियुग. आपण भगवंताद्वारे मनुष्यापासून देवता बनत आहोत. बाबा म्हणतात तुम्ही २१
जन्म नेहमी सुखी बनाल. यामध्ये त्रासाची काही गोष्टच नाही. भक्तीमार्गामध्ये
भगवंताकडे जाण्यासाठी किती मेहनत केली आहे. म्हणतात - पार निर्वाण गेला. असे कधी
म्हणणार नाहीत की, भगवंताकडे गेला. म्हणतील - स्वर्गात गेला. एक गेल्याने काही
स्वर्ग तर बनणार नाही. सर्वांना जायचे आहे. गीतेमध्ये लिहिलेले आहे - भगवान
काळांचेही काळ आहेत. मच्छरांप्रमाणे सर्वांना परत घेऊन जातात. बुद्धी देखील म्हणते
- चक्र रिपीट होणार आहे. तर जरूर सर्वप्रथम सतयुगी देवी-देवता धर्म रिपीट होईल.
त्यानंतर मग इतर धर्म रिपीट होतील. बाबा किती सोपे करून सांगतात - मनमनाभव. बस्स. ५
हजार वर्षांपूर्वी देखील गीतेच्या भगवंताने म्हटले होते - ‘लाडक्या मुलांनो’. हे जर
श्रीकृष्ण म्हणेल तर बाकीच्या धर्माचे कोणी ऐकू शकणार नाहीत. भगवान म्हणतील तर
सर्वांना वाटेल - गॉडफादर हेवन स्थापन करतात ज्यामध्ये आपण जाऊन मग चक्रवर्ती राजा
बनणार. यामध्ये खर्च इत्यादीचा काही प्रश्नच नाही फक्त सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला
जाणायचे आहे.
तुम्हा मुलांना विचार
सागर मंथन करायचे आहे. कर्म करत असताना रात्रं-दिवस असा पुरुषार्थ करत रहा. विचार
सागर मंथन करत नसाल किंवा बाबांची आठवण करत नसाल, फक्त कर्मच करत रहाल तर मग
रात्रीचे देखील तेच विचार चालू राहतील. घर बनवणाऱ्याला घराचाच विचार चालत राहील. भले
विचार सागर मंथन करण्याची जबाबदारी यांच्यावर (ब्रह्मा बाबांवर) आहे परंतु बाबा
म्हणतात - कलश लक्ष्मीला दिला आहे तर तुम्ही लक्ष्मी बनता ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) श्रीमताला
लक्षात घेऊन पुरुषार्थ करायचा आहे. बाबांनी जी कर्म करून शिकविली आहेत, तीच करायची
आहेत. विचार सागर मंथन करून ज्ञानाचे पॉईंट्स काढायचे आहेत.
२) आपणच आपल्याशी
प्रण करायचा आहे की, आम्ही बाबांच्या आठवणी मध्येच भोजन खाणार. ‘तुम्हीं से बैठूँ,
तुम्हीं से खाऊं…’ हा वायदा पक्का निभावायचा आहे.
वरदान:-
कर्म आणि
संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त राहणारे बाप समान कर्मातीत भव
तुम्हा मुलांची सेवा
आहे सर्वांना मुक्त करण्याची. तर इतरांना मुक्त करत असताना स्वतःला बंधनामध्ये बांधू
नका. जेव्हा हदच्या ‘माझे-माझे’ पासून मुक्त व्हाल तेव्हाच अव्यक्त स्थितीचा अनुभव
करू शकाल. जी मुले ‘लौकिक आणि अलौकिक’, ‘कर्म आणि संबंध’ दोन्हीमध्ये स्वार्थ
भावापासून मुक्त आहेत तेच बाप समान कर्मातीत स्थितीचा अनुभव करू शकतात. तर चेक करा
कर्माच्या बंधना पासून कितपत न्यारे बनलो आहोत? व्यर्थ स्वभाव-संस्काराच्या अधीन
होण्यापासून मुक्त.
बोधवाक्य:-
जे सरळ चित्त
आणि सहज स्वभावावाले आहेत तेच सहजयोगी, भोलेनाथचे प्रिय आहेत.