18-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - सर्व शक्तिमान बाबांसोबत बुद्धियोग लावल्याने शक्ती मिळेल, आठवणीनेच
आत्मा रुपी बॅटरी चार्ज होते, आत्मा पवित्र सतोप्रधान बनते”
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले कोणता पुरुषार्थ करता ज्याचे प्रारब्ध (फळ स्वरुप) देवता पद मिळते?
उत्तर:-
संगमयुगावर आपण शीतल बनण्याचा पुरुषार्थ करतो. शीतल अर्थात पवित्र बनल्याने आपण
देवता बनतो. जोपर्यंत शीतल बनत नाही तोपर्यंत देवता देखील बनू शकत नाही. संगमावर
शीतल देवी बनून सर्वांवर ज्ञानाचे थंडगार जल शिंपडून सर्वांना शांत करायचे आहे.
सर्वांमधील आग (दुःखाची आग) विझवायची आहे. स्वत: देखील शीतल बनायचे आहे आणि इतरांना
देखील शीतल बनवायचे आहे.
ओम शांती।
मुलांनी सर्वप्रथम एकच गोष्ट समजून घ्यायची आहे की, आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत आणि
शिवबाबा सर्वांचे पिता आहेत. त्यांना सर्वशक्तिमान म्हटले जाते. तुमच्यामध्ये सर्व
शक्ती होत्या. तुम्ही संपूर्ण विश्वावर राज्य करत होता. भारतामध्ये या देवी-देवतांचे
राज्य होते, तुम्हीच पवित्र देवी-देवता होता. तुमच्या कुळामध्ये किंवा घराण्यामध्ये
सर्व निर्विकारी होते. कोण निर्विकारी होते? आत्मे. आता पुन्हा तुम्ही निर्विकारी
बनत आहात. सर्वशक्तिमान बाबांच्या आठवणीद्वारे शक्ती भरत आहात. बाबांनी समजावून
सांगितले आहे आत्माच ८४ चा पार्ट बजावते. आत्म्यामध्येच सतोप्रधानतेची ताकद होती,
ती मग दिवसेंदिवस कमी होत जाते. सतोप्रधाना पासून तमोप्रधान तर बनायचेच आहे. जशी
बॅटरीची ताकद कमी होत जाते तशी मोटार बंद पडते. बॅटरी डिस्चार्ज होते. आत्म्याची
बॅटरी संपूर्ण डिस्चार्ज होत नाही, थोडीफार ताकद राहते. जसे कोणाचा मृत्यू होतो
तेव्हा दिवा लावतात आणि ज्योत विझू नये म्हणून त्यामध्ये घृत टाकतच राहतात. आता
तुम्ही मुले समजता तुमच्या आत्म्यामध्ये पुरेपूर शक्ती होती, आता नाही आहे. आता
पुन्हा तुम्ही सर्व शक्तीमान बाबांसोबत आपला बुद्धीयोग लावता, स्वतःमध्ये शक्ती भरता
कारण शक्ती कमी झाली आहे. पूर्णपणे शक्ती संपून गेली तर मग शरीरच राहणार नाही. आत्मा
बाबांची आठवण करता-करता एकदम पवित्र होऊन जाते. सतयुगामध्ये तुमची बॅटरी संपूर्ण
चार्ज असते. नंतर मग हळूहळू कला अर्थात बॅटरी कमी होत जाते. कलियुगाच्या शेवटी
आत्म्याची ताकद अगदीच थोडीशी उरते. जणू ताकदीचे दिवाळेच निघते. बाबांची आठवण
केल्याने आत्मा मग पुन्हा संपन्न होते. तर आता बाबा समजावून सांगत आहेत एकाचीच आठवण
करायची आहे. सर्वोच्च आहेत ईश्वर. बाकी सर्व आहे रचना. रचनेला रचनेकडून हदचा वारसा
मिळतो. क्रियेटर तर एक बेहदचे बाबाच आहेत. बाकी सर्व आहेत हदचे. बेहदच्या बाबांची
आठवण केल्याने बेहदचा वारसा मिळतो. तर मुलांनी मनोमन समजले पाहिजे की बाबा
आमच्यासाठी स्वर्ग नवी दुनिया स्थापन करत आहेत. ड्रामा प्लॅन अनुसार स्वर्गाची
स्थापना होत आहे, ज्यामध्ये तुम्ही मुलेच येऊन राज्य करता. मी तर सदैव पवित्र आहे.
मी कधी गर्भातून जन्म घेत नाही, ना देवी-देवतांप्रमाणे जन्म घेत. फक्त तुम्हा
मुलांना स्वर्गाची बादशाही देण्यासाठी जेव्हा हे (ब्रह्माबाबा) वयाच्या साठीला
वानप्रस्थ अवस्थेमध्ये असतात तेव्हा यांच्या तनामध्ये मी प्रवेश करतो. हेच मग
नंबरवन तमोप्रधाना पासून नंबरवन सतोप्रधान बनतात. उच्च ते उच्च आहेत भगवंत. नंतर मग
आहेत सूक्ष्मवतन वासी ब्रह्मा, विष्णू, शंकर. हे ब्रह्मा, विष्णू, शंकर कुठून आले?
हा फक्त साक्षात्कार होतो. सूक्ष्म वतन मध्यभागी आहे ना. जिथे स्थूल शरीर नाही आहे.
सूक्ष्म शरीर फक्त दिव्य दृष्टीनेच दिसू शकते. ब्रह्मा तर आहेत सफेद वस्त्रधारी.
विष्णू आहेत हिरे-माणकांनी सजलेले. आणि मग शंकराच्या गळ्यामध्ये सर्प इत्यादी
दाखवतात. असे शंकर इत्यादी कोणी असू शकत नाही. असे दाखवतात की, अमरनाथवर शंकराने
पार्वतीला अमर कथा ऐकवली. परंतु आता सूक्ष्म वतनमध्ये तर मनुष्य सृष्टीच नाही आहे
तर तिथे कथा कशी ऐकवतील? बाकी सूक्ष्मवतनचा साक्षात्कार मात्र होतो. जे संपूर्ण
पवित्र होतात त्यांचा साक्षात्कार होतो. हेच मग सतयुगामध्ये जाऊन स्वर्गाचे मालक
बनतात. तर बुद्धीमध्ये आले पाहिजे की, यांनी मग हे राज्य-भाग्य कसे मिळवले? युद्ध
इत्यादी तर काही होत नाही. देवता हिंसा कसे करतील? आता तुम्ही बाबांची आठवण करून
राजाई प्राप्त करता, कोणी मानो अथवा न मानो. गीतेमध्ये देखील आहे - देहा सहित
देहाच्या सर्व धर्मांना विसरून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबांना तर देहच नाहीये,
की ज्यामध्ये मोह असेल. बाबा म्हणतात - काही काळासाठी या शरीराचे (ब्रह्मा तनाचे)
लोन घेतो. नाहीतर मी ज्ञान कसे देऊ? मी या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे चैतन्य बीजरूप
आहे. या झाडाचे नॉलेज माझ्याकडेच आहे. या सृष्टीचे आयुर्मान किती आहे? कशी उत्पत्ती,
पालना, विनाश होतो? मनुष्यांना काहीच माहिती नाही आहे. ते शिकतात हदचे शिक्षण. बाबा
तर बेहदचे शिक्षण शिकवून मुलांना विश्वाचा मालक बनवतात.
ईश्वर काही कधी
देहधारी मनुष्याला म्हटले जात नाही. यांना (ब्रह्मा-विष्णू-शंकराला) देखील आपले
सूक्ष्म देह आहेत म्हणून यांना देखील भगवान म्हणता येणार नाही. हे शरीर तर या
दादाच्या (ब्रह्माच्या) आत्म्याचे तख्त आहे. ‘अकालतख्त’ आहे ना. आता हे अकाल मूर्त
बाबांचे तख्त आहे. अमृतसरमध्ये देखील अकाल तख्त आहे. मोठ-मोठ्या ज्या आसामी आहेत,
त्या अकाल तख्तावर जाऊन बसतात. आता बाबा समजावून सांगत आहेत - ही सर्व आत्म्यांची
अकाल तख्त आहेत. आत्म्यामध्येच चांगले अथवा वाईट संस्कार असतात, तेव्हाच तर म्हणतात
हे कर्मांचे फळ आहे. सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. बाबा काही शास्त्र इत्यादी
वाचून समजावत नाहीत. या गोष्टी तर शास्त्रांमध्ये सुद्धा कुठेच नाहीत, म्हणून तर
लोक चिडतात, म्हणतात - हे लोक शास्त्रांना मानत नाहीत. साधु-संत इत्यादी गंगेमध्ये
जाऊन स्नान करतात तर काय ते पावन झाले का? असे परत तर कोणी जाऊ शकत नाही. सगळे
सर्वात शेवटी जातील. जसे टोळांची झुंड किंवा मधमाशांची झुंड जाते. मधमाशांमध्ये
देखील राणीमाशी असते, सगळे तिच्या मागोमाग जातात, बाबा देखील जातील तेव्हा त्यांच्या
मागे सर्व आत्मे जातील. मुलवतनमध्ये देखील जशी सर्व आत्म्यांची झुंड (कळप) आहे. इथे
मग आहे सर्व मनुष्यांची झुंड. तर ही झुंड देखील एक दिवस पळत जाणार आहे. बाबा येऊन
सर्व आत्म्यांना घेऊन जातात. ‘शिवची वरात’ गायली गेली आहे. मुलगे म्हणा किंवा मुली
म्हणा, बाबा येऊन मुलांना आठवणीची यात्रा शिकवतात. पवित्र बनल्याशिवाय आत्मा परत घरी
जाऊ शकत नाही. जेव्हा पवित्र बनेल तेव्हा अगोदर शांतीधाममध्ये जाईल आणि मग तिथून
हळू-हळू खाली येत राहतात, वृद्धी होत राहते. राजधानी बनणार आहे ना. सर्व एकत्र येत
नाहीत. झाड हळूहळू वृद्धिंगत होत जाते ना. अगदी सुरुवातीला आदि सनातन देवी-देवता
धर्म आहे जो बाबा स्थापन करतात. ब्राह्मण देखील सर्वात अगोदर तेच बनतील ज्यांना
देवता बनायचे आहे. प्रजापिता ब्रह्मा तर आहेत ना. प्रजेमध्ये देखील भाऊ-बहीणी असतात.
ब्रह्माकुमार-कुमारी तर इथे पुष्कळ बनतात. तर नक्कीच निश्चय बुद्धी असतील म्हणूनच
तर इतके भरपूर मार्क्स मिळतात. तुमच्यामध्ये जे पक्के आहेत ते तिथे (स्वर्गामध्ये)
पहिले येतात, कच्चे असणारे शेवटीच येतील. मूल वतनमध्ये सर्व आत्मे राहतात नंतर मग
जसे खाली येतात तस-तशी वृद्धी होत जाते. शरीराशिवाय आत्मा पार्ट कशी बजावणार? ही
पार्टधारींची दुनिया आहे जी चारही युगांमध्ये फिरत राहते. सतयुगामध्ये आम्हीच देवता
होतो मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतो. आता हे आहे पुरुषोत्तम संगम युग. हे युग
आत्ताच तयार होते जेव्हा बाबा येतात. हे बेहदचे ज्ञान बेहदचे बाबाच देतात.
शिवबाबांना स्वतःच्या शरीराचे काही नाव नाही आहे. हे शरीर तर या दादाचे (ब्रह्मा
बाबांचे) आहे. बाबांनी थोड्या वेळाकरिता हे लोन घेतले आहे. बाबा म्हणतात - ‘मला
तुमच्यासोबत बोलण्याकरिता मुख तर पाहिजे ना. जर मुख नसेल तर बाबा मुलांशी बोलू
देखील शकणार नाहीत. मग बेहदचे ज्ञान देखील याच मुखाने ऐकवतो, म्हणूनच याला गोमुख
सुद्धा म्हणतात’. डोंगरातून पाणी तर कुठूनही येऊ शकते. मग इथे गोमुख बनवले आहे,
त्यातून पाणी येते. त्याला मग गंगाजल समजून पितात. आणि त्या पाण्याला किती महत्व
देतात. या दुनियेमध्ये सर्व काही खोटेच आहे. सत्य तर एक बाबाच ऐकवतात. परंतु ते खोटे
मनुष्य या बाबांच्या ज्ञानाला खोटे समजतात. भारतामध्ये जेव्हा सतयुग होते तेव्हा
याला सचखंड म्हटले जात होते. मग भारतच एकदम जुना होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू खोटी होऊन जाते. किती फरक पडतो. बाबा म्हणतात तुम्ही माझी किती निंदा
करता. सर्वव्यापी म्हणून किती अपमान केला आहे. शिवबाबांना बोलवतातच की, ‘या जुन्या
दुनियेमधून घेऊन चला’. बाबा म्हणतात - माझी सर्व मुले काम-चितेवर चढून गरीब बनली
आहेत. बाबा मुलांना म्हणतात - ‘तुम्ही तर स्वर्गाचे मालक होता. आठवते आहे का?’
मुलांनाच समजावून सांगतात, साऱ्या दुनियेला तर समजावून सांगणार नाहीत. मुलेच बाबांना
समजू शकतात. दुनियेला ही गोष्ट कशी कळणार!
सर्वात मोठा काटा आहे
काम विकाराचा. नावच आहे पतित दुनिया. सतयुग आहे १०० टक्के पवित्र दुनिया. मनुष्यच,
पवित्र देवतांसमोर जाऊन नमस्कार करतात. भले असे पुष्कळ भक्त आहेत जे शाकाहारी आहेत,
परंतु असे नाही की विकारामध्ये जात नाहीत. असे तर पुष्कळ बालब्रह्मचारी सुद्धा
असतात. बालपणापासूनच कधीही घाणेरडे अभक्ष खाणे इत्यादी खात नाहीत. संन्यासी देखील
म्हणतात निर्विकारी बना. घरादाराचा संन्यास करतात मग पुढच्या जन्मामध्ये देखील
एखाद्या गृहस्थीच्या घरामध्ये जन्म घेऊन मग पुन्हा घरदार सोडून जंगलामध्ये निघून
जातात. परंतु पतितापासून पावन बनू शकतात का? नाही. पतित-पावन बाबांच्या श्रीमता
शिवाय कोणीही पतितापासून पावन बनू शकत नाही. भक्ती आहे उतरत्या कलेचा मार्ग तर मग
पावन कसे बनतील बरे? जर पावन बनत असतील तर मग घरी जावे, स्वर्गामध्ये यावे. सतयुगी
देवी-देवता कधी घरदार सोडतात का? त्यांचा (दुनियावाल्यांचा) आहे हदचा संन्यास, तुमचा
आहे बेहदचा संन्यास. संपूर्ण दुनिया, मित्र-नातेवाईक इत्यादी सर्वांपासून संन्यास.
तुमच्यासाठीच आता स्वर्गाची स्थापना होत आहे. तुमची बुद्धी स्वर्गाच्या दिशेने आहे.
मनुष्य तर नरकामध्येच अडकून पडले आहेत. तुम्ही मुले मात्र एका बाबांच्या आठवणीमध्ये
टिकून राहिले आहात.
तुम्हाला शीतल देवी
बनविण्याकरिता ज्ञान चितेवर बसविले जाते. शीतल शब्दाच्या विरुद्ध आहे उष्ण. तुमचे
नावच आहे शीत-लादेवी. एकच तर असणार नाही. जरूर पुष्कळ असणार, ज्यांनी भारताला शीतल
बनवले आहे. या समयी सर्व काम-चितेवर जळत आहेत. इथे तुमचे नाव शीतलादेवी आहे. तुम्ही
शीतल करणाऱ्या, थंडगार शिडकावा करणाऱ्या देवी आहात. ज्ञान अमृत शिंपडण्याकरिता जाता
ना. हा आहे ज्ञानाचा शिडकावा, जो आत्म्यावर केला जातो. हे आहेत ज्ञानाचे शिंतोडे,
जे आत्म्यावर टाकले जातात. आत्मा पवित्र बनल्यानेच शीतल बनते. यावेळी सारी दुनिया
काम चितेवर चढून काळी झाली आहे. आता कलश तुम्हा मुलांना मिळत आहे. कलशाद्वारे तुम्ही
स्वतः देखील शीतल बनता आणि इतरांना सुद्धा बनवता. हे (ब्रह्मा बाबा) सुद्धा शीतल
बनले आहेत ना. दोघेही एकत्र आहेत. घरदार सोडण्याची तर गोष्टच नाही, परंतु गोशाळा
बनली असेल तर जरूर कोणी घरदार सोडले असेल. कशासाठी? ज्ञान चितेवर बसून शीतल
बनण्यासाठी. जेव्हा तुम्ही इथे शीतल बनाल तेव्हाच तुम्ही देवता बनू शकाल. आता तुम्हा
मुलांचा बुद्धीयोग जुन्या घराकडे जाता कामा नये. बाबांमध्ये बुद्धी गुंतून रहावी
कारण तुम्हा सर्वांना घरी बाबांकडे (परमधाममध्ये) जायचे आहे. बाबा म्हणतात - गोड
मुलांनो, मी गाईड बनून आलो आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. ही शिव शक्ती पांडव सेना
आहे. तुम्ही आहात शिवबाबांकडून शक्ती घेणारे, ते आहेत सर्वशक्तीमान. मनुष्य तर
समजतात - परमेश्वर मेलेल्याला जिवंत करू शकतात. परंतु बाबा म्हणतात - ‘लाडक्या
मुलांनो, या ड्रामामध्ये प्रत्येकाला अनादि पार्ट मिळालेला आहे. मी देखील क्रियेटर,
डायरेक्टर, मुख्य ॲक्टर आहे. ड्रामातील पार्टला मी अजिबात बदलू शकत नाही’. मनुष्य
समजतात पानंनपान सुद्धा परमेश्वराच्या आदेशानेच हलते परंतु परमात्मा स्वतः म्हणतात
की, मी देखील ड्रामाच्या अधीन आहे, याच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. असे नाही की
माझ्या आदेशाने पाने हलतील. सर्वव्यापीच्या ज्ञानाने भारतवासीयांना एकदम गरीब बनवले
आहे. बाबांच्या ज्ञानाद्वारे भारत पुन्हा सिरताज (मुकुटधारी) बनतो. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
सूर्यवंशीमध्ये सर्वात पहिले येण्याकरिता निश्चयबुद्धी बनून फुल मार्क्स घ्यायचे
आहेत. पक्का ब्राह्मण बनायचे आहे. बेहदचे नॉलेज लक्षात ठेवायचे आहे.
२) ज्ञान-चितेवर बसून
शीतल अर्थात पवित्र बनायचे आहे. ज्ञान आणि योगाद्वारे काम विकाराची आग नष्ट करायची
आहे. बुद्धियोग कायम एका बाबांमध्येच गुंतून रहावा.
वरदान:-
ब्राह्मण
जीवनामध्ये श्रेष्ठ स्थितीरुपी मेडल प्राप्त करणारे बेगमपूरचे बादशहा भव
तुम्ही सर्व आपली
स्वस्थिती चांगल्यात चांगली बनविण्यासाठीच ब्राह्मण बनले आहात. ब्राह्मण जीवनामध्ये
श्रेष्ठ स्थिती हीच तुमची प्रॉपर्टी आहे. हेच ब्राह्मण जीवनाचे मेडल आहे. जे कोणी
हे मेडल प्राप्त करतात ते सदैव अचल अडोल एकरस स्थितीमध्ये राहून, सदा निश्चिंत,
बेगमपूरचे बादशहा बनतात. ते सर्व इच्छांपासून मुक्त, इच्छा मात्रम् अविद्या स्वरूप
असतात.
बोधवाक्य:-
अतुट निश्चयाने
आणि अभिमानाने म्हणा “मेरा बाबा” म्हणजे माया जवळपास सुद्धा फिरकणार नाही.