19-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बेहदच्या बाबांसोबत प्रामाणिक रहा तर भरपूर माईट (शक्ती) मिळेल मायेवर
विजय मिळवाल”
प्रश्न:-
बाबांकडे
मुख्य ऑथॉरिटी कोणती आहे? त्याची निशाणी काय आहे?
उत्तर:-
बाबांकडे मुख्य आहे ज्ञानाची ऑथॉरिटी. ज्ञानसागर आहेत म्हणून तुम्हा मुलांना
शिकवतात. आप समान नॉलेजफुल बनवतात. तुमच्याकडे शिक्षणाचे एम ऑब्जेक्ट आहे.
शिक्षणाद्वारे तुम्ही उच्च पद प्राप्त करता.
गीत:-
बदल जाए दुनिया…
ओम शांती।
भक्त भगवंताची महिमा करतात. आता तुम्ही काही भक्त नाही आहात. तुम्ही तर त्या
भगवंताची संतान बनला आहात. ती देखील प्रामाणिक मुले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीमध्ये
प्रामाणिक रहायचे आहे. पत्नीची पतीशिवाय किंवा पतीची पत्नीशिवाय इतर कोणाकडे दृष्टी
गेली तर त्यांना देखील कृतघ्न म्हटले जाईल. आता इथे देखील आहेत बेहदचे बाबा.
त्यांच्यासोबत अप्रामाणिक आणि प्रामाणिक दोन्ही राहतात. प्रामाणिक बनून मग
अप्रामाणिक बनतात. बाबा तर आहेत हाइएस्ट ऑथॉरिटी. ऑलमाइटी आहेत ना. तर त्यांची मुले
देखील अशी असली पाहिजेत. बाबांमध्ये ताकद आहे, मुलांना रावणावर विजय प्राप्त
करण्याची युक्ती सांगतात म्हणून त्यांना म्हटले देखील जाते - सर्वशक्तीमान. तुम्ही
देखील शक्ती सेना आहात ना. तुम्ही स्वतःला देखील ऑलमाइटी (मास्टर सर्वशक्तिमान)
म्हणाल. बाबांमध्ये जी माईट (शक्ती) आहे ती आम्हाला देतात, सांगतात की तुम्ही माया
रावणावर कसा विजय प्राप्त करू शकता, तर तुम्हाला देखील शक्तिवान बनायचे आहे. बाबा
आहेत ज्ञानाची ऑथॉरिटी. नॉलेजफुल आहेत ना. जसे ते लोक (दुनियावाले) ऑथॉरिटी (अधिकारी)
आहेत शास्त्रांचे, भक्तिमार्गाचे, तसे तुम्ही आता ऑलमाइटी ऑथॉरिटी नॉलेजफुल बनता.
तुम्हाला देखील नॉलेज मिळते. ही पाठशाळा आहे. यामध्ये जे नॉलेज तुम्ही शिकता,
त्याद्वारे उच्च पद प्राप्त करू शकता. ही एकच पाठशाळा आहे. तुम्हाला तर इथे शिकायचे
आहे, बाकी प्रार्थना इत्यादी काही करायची नाहीये. तुम्हाला शिक्षणाने वारसा मिळतो,
एम ऑब्जेक्ट आहे. तुम्ही मुले जाणता बाबा नॉलेजफुल आहेत, त्यांचे शिक्षण एकदम वेगळे
आहे. ज्ञानाचे सागर बाबा आहेत तर तेच जाणतील. तेच आपल्याला सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताचे नॉलेज देतात. इतर कोणीही देऊ शकत नाही. बाबा सन्मुख येऊन ज्ञान
देऊन मग निघून जातात. शिक्षणाचे प्रारब्ध काय मिळते, ते देखील तुम्ही जाणता. बाकी
जे पण सतसंग इत्यादी आहेत किंवा गुरु-गोसावी आहेत ते सर्व आहेत भक्तीमार्गाचे. आता
तुम्हाला ज्ञान मिळत आहे. हे देखील जाणता की त्यांच्यामध्ये देखील इथले कोणी असतील
तर तेही निघून येतील. तुम्हा मुलांना सेवेच्या भिन्न-भिन्न युक्त्या शोधून काढायच्या
आहेत. आपला अनुभव ऐकवून अनेकांचे भाग्य बनवायचे आहे. तुम्हा सेवाभावी मुलांची अवस्था
खूप निर्भय, अडोल आणि योगयुक्त पाहिजे. योगामध्ये राहून सेवा कराल तर सफलता मिळू
शकते.
मुलांनो, तुम्हाला
स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवायचे आहे. कधी आवेश इत्यादी येऊ नये, पक्का योगयुक्त
पाहिजे. बाबांनी समजावून सांगितले आहे - खरे तर तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात,
वाणीपासून परे अवस्थावाले. वानप्रस्थी अर्थात वाणीपासून परे (दूर) घराची आणि बाबांची
आठवण करणारे. याच्याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. आम्हाला चांगले कपडे पाहिजेत,
या सर्व आहेत छी-छी (घाणेरड्या) इच्छा. देह-अभिमानवाले सेवा करू शकणार नाहीत.
देही-अभिमानी बनावे लागेल. भगवंताच्या मुलांना तर माईट (शक्ती) पाहिजे आणि ती आहे -
योगाची. बाबा तर सर्व मुलांना ओळखू शकतात ना. बाबा लगेच सांगतील, या-या कमजोरी
काढून टाका. बाबांनी सांगितले आहे शिवाच्या मंदिरामध्ये जा, तिथे तुम्हाला भरपूर
मिळतील. असे बरेच आहेत जे काशीमध्ये जाऊन निवास करतात. समजतात - काशीनाथ आमचे
कल्याण करणार. तिथे तुम्हाला खूप ग्राहक मिळतील, परंतु यामध्ये खूप शुरुड-बुद्धी (तीक्ष्ण-बुद्धी)
पाहिजे. गंगा स्नान करणाऱ्यांना देखील जाऊन समजावून सांगू शकता. मंदिरांमध्ये देखील
जाऊन समजावून सांगा. गुप्त वेशामध्ये जाऊ शकता. हनुमानाचे उदाहरण आहे. वास्तविक
आहात तर तुम्हीच ना. चपलांवर जाऊन बसण्याची काही गोष्ट नाहीये. यामध्ये खूप
बुद्धिमान हुशार पाहिजे. बाबांनी सांगितले आहे अजून कोणीही कर्मातीत बनलेला नाहीये.
काही ना काही दोष जरूर आहेत.
तुम्हा मुलांना
अभिमान वाटला पाहिजे की, ही एकच हट्टी (दुकान) आहे, जिथे सर्वांना यायचे आहे. एक
दिवस हे संन्यासी इत्यादी सर्व येतील. एकच दुकान आहे तर जातील कुठे. जो खूप भटकलेला
असेल त्यालाच रस्ता मिळेल. समजतील हे एकच दुकान आहे. सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच
आहेत ना. असा नशा जेव्हा चढेल तेव्हाची गोष्ट आहे. बाबांना हाच ओना (काळजी) आहे ना
- मी आलो आहे पतितांना पावन बनवून शांतिधाम-सुखधामाचा वारसा देण्यासाठी. तुमचा
देखील हाच धंदा आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे. ही आहे जुनी दुनिया. याची आयु किती
आहे? थोड्याच काळामध्ये समजतील, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. सर्व आत्म्यांच्या
हे लक्षात येईल, नवीन दुनियेची स्थापना होईल तेव्हाच तर जुन्या दुनियेचा विनाश होईल.
पुढे चालून मग म्हणतील - खरोखर, भगवान इथेच आहेत. रचयिता बाबांनाच विसरले आहेत.
त्रिमूर्तीमध्ये शिवाचे चित्र नाहीसे केले आहे, त्यामुळे काही कामाचे राहिलेले नाही.
रचयिता तर तेच आहेत ना. शिवाचे चित्र असल्याने क्लिअर होते - ब्रह्माद्वारे स्थापना.
प्रजापिता ब्रह्मा असेल तर जरूर बी. के. देखील असले पाहिजेत. ब्राह्मण कुळ सर्वात
श्रेष्ठ असते. ब्रह्माची संतान आहेत. ब्राह्मणांना कसे रचतात, हे कोणीही जाणत नाहीत.
बाबाच येऊन तुम्हाला शूद्रापासून ब्राह्मण बनवतात. या खूप विचित्र गोष्टी आहेत. बाबा
जेव्हा सन्मुख येऊन समजावून सांगतील तेव्हाच समजतील. जे देवता होते ते आता शूद्र
बनले आहेत. आता त्यांना कसे शोधायचे त्यासाठी युक्त्या शोधून काढायच्या आहेत.
जेणेकरून समजतील या बी. के. चे तर भारी कार्य आहे. किती पत्रके इत्यादी वाटतात.
बाबांनी एरोप्लेनमधून पत्रके टाकण्यासाठी देखील सांगितले आहे. कमीत-कमी वर्तमानपत्रा
एवढा एक पेपर असावा, त्यामध्ये मुख्य पॉईंट्स, शिडी इत्यादी देखील येऊ शकते. मुख्य
आहे इंग्रजी आणि हिंदी भाषा. तर मुलांना संपूर्ण दिवस विचार केला पाहिजे - सेवेला
कसे वाढवावे? हे देखील जाणता ड्रामा अनुसार पुरुषार्थ होत राहतो. समजून येते हे सेवा
चांगली करतात, यांचे पद देखील उच्च असेल. ‘प्रत्येक ॲक्टरचा आपला पार्ट आहे’, ही
लाईन देखील जरूर लिहायची आहे. बाबा देखील या ड्रामामध्ये निराकारी दुनियेमधून येऊन
साकारी शरीराचा आधार घेऊन पार्ट बजावतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे कोण-कोण किती
पार्ट बजावतात? तर ही लाईन देखील मुख्य आहे. सिद्ध करून सांगायचे आहे की, या
सृष्टीचक्राला जाणल्याने मनुष्य स्व-दर्शन चक्रधारी बनून चक्रवर्ती राजा विश्वाचा
मालक बनू शकतो. तुमच्या जवळ तर संपूर्ण नॉलेज आहे ना. बाबांकडे नॉलेज आहेच मुळी
गीतेचे, ज्याद्वारे मनुष्य नरापासून नारायण बनतात. फुल नॉलेज बुद्धीमध्ये आले तर मग
फुल बादशाही पाहिजे. तर मुलांना अशा प्रकारे विचार करून बाबांच्या सेवेमध्ये व्यस्त
झाले पाहिजे.
जयपुर मध्ये देखील हे
रूहानी म्युजियम स्थाई राहील. लिहिलेले आहे - ‘याला समजून घेतल्याने मनुष्य विश्वाचे
मालक बनू शकतात’. जे बघतील ते एकमेकांना ऐकवत राहतील. मुलांना नेहमी सेवेवर रहायचे
आहे. मम्मा देखील सेवेवर आहे, त्यांना नियुक्त केले होते. हे कोणत्याही
शास्त्रामध्ये नाही की सरस्वती कोण आहे? प्रजापिता ब्रह्माची फक्त एकच मुलगी असेल
काय? अनेक मुली, अनेक नावे असणाऱ्या असतील ना. ती तरीही ॲडॉप्टेड होती. जसे तुम्ही
आहात. एक हेड निघून जातो तर मग दुसरा नियुक्त केला जातो. प्राईम मिनिस्टर देखील
दुसरा नियुक्त करतात. सेवायोग्य समजले जाते, तेव्हा त्यांना पसंत करतात आणि मग
त्यांचा कालावधी पूर्ण झाला की मग दुसऱ्याला निवडावे लागते. बाबा मुलांना तर पहिला
मैनर्स हाच शिकवतात की, तुम्ही कोणाचा रिगार्ड (आदर) कसा ठेवायचा! अशिक्षित जे
असतात त्यांना रिगार्ड देखील ठेवता येत नाही. जे जास्त हुशार पुरुषार्थी आहेत तर
त्यांचा सर्वांनी रिगार्ड ठेवायचाच आहे. मोठ्यांचा रिगार्ड ठेवल्याने ते देखील
शिकतील. अशिक्षित लोक तर बुद्धू असतात. बाबांनी देखील अशिक्षितांना येऊन उठवले आहे
(ज्ञान दिले आहे). आज-काल फीमेलला प्राधान्य देतात. तुम्ही मुले जाणता आम्हा
आत्म्यांचा साखरपुडा परमात्म्यासोबत झालेला आहे. तुम्ही खूप आनंदीत होता - आम्ही तर
विष्णुपुरीचे मालक बनणार. कन्येचा न बघता देखील बुद्धियोग लागतो ना. हे देखील आत्मा
जाणते - हा आत्मा आणि परमात्म्याचा साखरपुडा वंडरफुल आहे. एका बाबांचीच आठवण करावी
लागेल. ते (दुनियावाले) तर म्हणतील गुरूची आठवण करा, अमक्या मंत्राची आठवण करा. हे
तर बाबाच सर्व काही आहेत. यांच्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) येऊन साखरपुडा करतात.
म्हणतात - मी तुमचा पिता देखील आहे, माझ्याकडून वारसा मिळतो. कन्येचा साखरपुडा होतो
तर मग ती विसरत नाही. मग तुम्ही का विसरता? कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी
वेळ लागतो. कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून परत तर कोणी जाऊ शकत नाही. जेव्हा पहिला
साजन जाईल तेव्हा मग वरात जाईल. शंकराची वरात नाहीये, शिवाची वरात आहे. साजन एक आहे
बाकी सर्व आहेत सजणी. तर ही आहे शिवबाबांची वरात. नाव ठेवले आहे मुलाचे. दृष्टांत
देऊन सांगितले जाते. बाबा येऊन गुल-गुल (फूल) बनवून सर्वांना घेऊन जातात. मुले जी
काम-चितेवर बसून पतित बनली आहेत त्यांना ज्ञान-चितेवर बसवून गुल-गुल बनवून सर्वांना
घेऊन जातात. रावण छी-छी (पतित) बनवतो आणि शिवबाबा गुल-गुल (फूल) बनवतात. तर बाबा
खूप युक्त्या सांगत राहतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
खाण्या-पिण्याच्या छी-छी (घाणेरड्या) इच्छांना सोडून देही-अभिमानी बनून सेवा करायची
आहे. आठवणीद्वारे माईट (शक्ती) घेऊन निर्भय आणि अडोल अवस्था बनवायची आहे.
२) जे शिक्षणामध्ये
खूप हुशार आहेत त्यांचा रिगार्ड ठेवायचा आहे. जे भटकत आहेत त्यांना रस्ता सांगण्याची
युक्ती रचायची आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे.
वरदान:-
आपल्या
महत्वाला आणि कर्तव्याला जाणणारे सदा जागती ज्योत भव
तुम्ही मुले सर्व
जगाचा प्रकाश आहात, तुमच्या परिवर्तनाने विश्वाचे परिवर्तन होणार आहे - त्यामुळे जे
झाले ते झाले, असे म्हणून आपल्या महत्वाला किंवा कर्तव्याला जाणून सदैव जागती ज्योत
बना. तुम्ही सेकंदामध्ये स्व-परिवर्तनाद्वारे विश्व-परिवर्तन करू शकता. फक्त
प्रॅक्टिस करा - आता-आता कर्मयोगी, आता-आता कर्मातीत स्टेज. जसे तुमची रचना कासव
सेकंदामध्ये सर्व कर्मेंद्रिये समेटून घेते. असे तुम्ही मास्टर रचयिता समेटण्याच्या
शक्तीच्या आधारे सेकंदामध्ये सर्व संकल्पांना सामावून घेऊन एका संकल्पामध्ये स्थित
व्हा.
बोधवाक्य:-
लवलीन स्थितीचा
अनुभव करण्यासाठी स्मृती-विस्मृतीचे युद्ध बंद करा.
मातेश्वरीजींची मधुर
महावाक्ये:-
“अर्धा कल्प ब्रह्माचा
दिवस आणि अर्धा कल्प ब्रह्माची रात्र” अर्धा कल्प आहे ब्रह्माचा दिवस, अर्धा कल्प
आहे ब्रह्माची रात्र, आता रात्र पूर्ण होऊन सकाळ येणार आहे. आता परमात्मा येऊन
अंधाराचा शेवट करून प्रकाशाची सुरुवात करतात; ज्ञानाने आहे प्रकाश, भक्तीने आहे
अंधार. गाण्यामध्ये देखील म्हणतात - ‘इस पाप की दुनिया से दूर कहीं ले चल, चित चैन
जहाँ पावे...’ ही आहे बेचैन (अशांत) दुनिया, जिथे चैन (शांती) नाहीये. मुक्तीमध्ये
ना चैन आहे, ना बेचैन आहे. सतयुग, त्रेता आहे चैनची दुनिया, ज्या सुखधामची सर्वजण
आठवण करतात. तर आता तुम्ही चैन असलेल्या (शांती असलेल्या) दुनियेमध्ये जात आहात,
तिथे कोणीही अपवित्र आत्मा जाऊ शकत नाही, ते अंतामध्ये धर्मराजाचे दांडे खाऊन
कर्म-बंधनातून मुक्त होऊन शुद्ध संस्कार घेऊन जातात, कारण तिथे ना अशुद्ध संस्कार
असतात, ना पाप असते. जेव्हा आत्मा आपल्या खऱ्या पित्याला विसरून जाते तेव्हा हा
भुल-भुलैयाचा अनादि हार-जीतचा खेळ बनलेला आहे म्हणून आपण या सर्वशक्तिवान
परमात्म्याकडून शक्ती घेऊन विकारांवर विजय प्राप्त करून २१ जन्मांसाठी राज्य-भाग्य
घेत आहोत अच्छा - ओम् शांती.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” मज आत्म्याचे करावनहार ते सुप्रीम
रुह आहेत. करावनहारच्या आधारे मी निमित्त करणारा आहे. मी करनहार ते करावनहार आहेत.
ते चालवत आहेत, मी चालत आहे. प्रत्येक डायरेक्शनवर मज आत्म्यासाठी संकल्प, बोल आणि
कर्मामध्ये नेहमी हजूर हाजिर आहेत म्हणून हजूरच्या समोर मी आत्मा देखील सदैव हाजिर
आहे. नेहमी याच कंबाइंड रुपामध्ये रहा.