19-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुमची आठवण अतिशय वंडरफूल आहे कारण तुम्ही एकाच वेळी पिता, टीचर आणि
सद्गुरू तिघांचीही आठवण करता”
प्रश्न:-
कोणत्याही
मुलाला माया जेव्हा अहंकारी बनवते तेव्हा ते कोणत्या गोष्टीच्या बाबतीत डोंटकेयर
करतात (दुर्लक्ष करतात)?
उत्तर:-
अहंकारी मुले देह-अभिमानामध्ये येऊन मुरलीकडे दुर्लक्ष करतात, एक म्हण आहे ना -
‘चूहे को हल्दी की गांठ मिली, समझा मै पंसारी हूँ…’ असे खुपजण आहेत जे मुरली वाचतच
नाहीत; म्हणतात - आमचे तर डायरेक्ट शिवबाबांशी कनेक्शन आहे. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, मुरलीमध्ये तर नवीन-नवीन गोष्टी येत असतात त्यामुळे मुरली कधीही चुकवू नका,
यावर नीट लक्ष द्या.
ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांना (खूप-खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांना) रुहानी बाबा
विचारत आहेत - ‘इथे तुम्ही बसले आहात, कोणाच्या आठवणीमध्ये बसले आहात?’ (बाबा,
शिक्षक, सद्गुरूच्या). सगळेच या तिघांच्याही आठवणीमध्ये बसला आहात का? प्रत्येकाने
स्वतःला विचारा की असे केवळ इथे बसले असताना आठवणीत राहते की चालता-फिरता आठवण राहते?
कारण ही आहे वंडरफुल गोष्ट. दुसऱ्या कोणत्या आत्म्याला असे कधी म्हटले जात नाही. जरी
हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक आहेत परंतु त्यांच्या आत्म्याला कधी असे म्हणणार
नाही की, हे बाबा सुद्धा आहेत, टीचर सुद्धा आहेत, सद्गुरू सुद्धा आहेत. किंबहुना
साऱ्या दुनियेमध्ये जे काही जीव आत्मे आहेत, कोणत्याही आत्म्याला असे म्हटले जाणार
नाही. तुम्ही मुलेच अशी आठवण करता. आतून वाटते हे बाबा, पिता देखील आहेत, टीचर
देखील आहेत आणि सद्गुरू सुद्धा आहेत; ते देखील सुप्रीम. तिघांची आठवण करता कि एकाची?
भले ते एक आहेत परंतु तिन्ही गुणांनी आठवण करता. शिवबाबा आमचे बाबा सुद्धा आहेत,
टीचर आणि सद्गुरू सुद्धा आहेत. याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी (असामान्य) म्हटले जाते.
जेव्हा बसलेले असता किंवा चालता, फिरता तेव्हा हे लक्षात राहिले पाहिजे. बाबा
विचारत आहेत - ‘अशी आठवण करता का की, हे आमचे बाबा, टीचर, सद्गुरू सुद्धा आहेत. असा
कोणीही देहधारी असू शकत नाही. नंबरवन देहधारी आहे श्रीकृष्ण, त्याला काही पिता,
टीचर, सद्गुरू म्हणू शकत नाही, ही एकदम वंडरफुल गोष्ट आहे. तर खरे सांगितले पाहिजे
की, तुम्ही तिन्ही रूपामध्ये आठवण करता का? भोजन करायला बसता तेव्हा फक्त शिवबाबांची
आठवण करता कि तिघेही बुद्धीमध्ये येतात? इतर कोणत्याही आत्म्याला काही असे म्हणू
शकत नाही. ही आहे वंडरफुल गोष्ट. बाबांची विचित्र महिमा आहे. तर बाबांची आठवण देखील
अशी करायची आहे. म्हणजे बुद्धी एकदम त्या बाजूला जाईल जे असे वंडरफूल आहेत. बाबाच
बसून आपला परिचय देतात आणि मग साऱ्या चक्राचे सुद्धा ज्ञान देतात. अशी ही युगे आहेत,
इतक्या-इतक्या वर्षांची आहेत जी फिरत राहतात. हे ज्ञान देखील ते रचयिता बाबाच देतात.
तर त्यांची आठवण करण्यामध्ये खूप मदत मिळेल. पिता, टीचर, गुरु ते एकच आहेत. इतकी
श्रेष्ठ आत्मा दुसरी कोणती असू शकत नाही. परंतु माया अशा बाबांची आठवण सुद्धा
विसरायला लावते तर मग टीचर, गुरुला देखील विसरून जातात; तर हे प्रत्येकाने आपापल्या
मनामध्ये पडताळून पाहिले पाहिजे. बाबा आम्हाला असे विश्वाचे मालक बनवणार. बेहदच्या
बाबांचा वारसा जरूर बेहदचाच आहे. त्याच सोबत ही महिमा देखील बुद्धीमध्ये यावी,
चालता-फिरता तिघांचीही आठवण यावी. या एका आत्म्याच्या तिन्ही सेवा एकत्र आहेत
म्हणून त्यांना ‘सुप्रीम’ म्हटले जाते.
आता कॉन्फरन्स इत्यादी
करतात, म्हणतात विश्वामध्ये शांती कशी होईल? ती तर आता होत आहे, या आणि समजून घ्या.
कोण करत आहेत? तुम्हाला बाबांचे ऑक्युपेशन (कर्तव्य) सिद्ध करून सांगायचे आहे.
बाबांचे ऑक्युपेशन आणि श्रीकृष्णाचे ऑक्युपेशन यामध्ये खूप फरक आहे. बाकी सर्वांचे
नाव तर शरीराचेच घेतले जाते. यांच्या (शिवबाबांच्या) आत्म्याचे नाव गायले जाते. ती
आत्मा पिता देखील आहे, टीचर, गुरु सुद्धा आहे. आत्म्यामध्ये नॉलेज आहे परंतु ते
देणार कसे? शरीराद्वारेच देतील ना. जेव्हा देतात तेव्हाच तर महिमा गायली जाते. आता
शिवजयंतीला मुले कॉन्फरन्स करतात. सर्व धर्मांच्या नेत्यांना बोलावतात. तुम्हाला
समजावून सांगायचे आहे - ईश्वर काही सर्वव्यापी नाही आहे. जर सर्वांमध्ये ईश्वर आहे
तर काय प्रत्येक आत्मा भगवान पिता देखील आहे, टीचर सुद्धा आहे, गुरु सुद्धा आहे! मग
सांगा सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे नॉलेज आहे? हे तर कोणीही सांगू शकणार नाही.
तुम्हा मुलांना आतून
जाणवले पाहिजे उच्च ते उच्च बाबांची किती महिमा आहे. ते साऱ्या विश्वाला पावन
बनविणारे आहेत. प्रकृती सुद्धा पावन बनते. कॉन्फरन्समध्ये अगोदर तर तुम्ही हे
विचाराल की, ‘गीतेचे भगवान कोण आहेत? सतयुगी देवी-देवता धर्माची स्थापना करणारे कोण?’
जर श्रीकृष्णासाठी म्हणाल तर बाबांचे नाव गायब कराल; नाहीतर मग म्हणतील ते
नावा-रूपापासून वेगळे आहेत. जसे काही अस्तित्वातच नाहीत. तर बाबांशिवाय अनाथ झाले
ना. बेहदच्या बाबांनाच जाणत नाहीत. एकमेकांवर काम कटारी चालवून किती त्रास देतात.
एकमेकांना दुःख देतात. तर या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये घोळत राहिल्या
पाहिजेत. विरोधाभास स्पष्ट करायचा आहे - हे लक्ष्मी-नारायण भगवान-भगवती आहेत ना,
यांची देखील वंशावळी आहे ना. तर जरूर सर्व असे गॉड-गॉडेज असायला हवेत. तर तुम्ही
सर्व धर्मवाल्यांना बोलावता. जे चांगले शिकले-सवरलेले आहेत, जे बाबांचा परिचय देऊ
शकतात, त्यांनाच बोलवायचे आहे. तुम्ही लिहू शकता - ‘जे येऊन रचयिता आणि रचनेच्या आदि,
मध्य, अंताचा परिचय देतील त्यांच्यासाठी आम्ही येण्या-जाण्याचा, राहणे इत्यादीचा
सर्व प्रबंध करू - जर रचता आणि रचनेचा परिचय दिलात तर’. हे तर जाणतात कोणीही हे
ज्ञान देऊ शकत नाहीत. भले मग कोणी परदेशातून जरी आले, रचयिता आणि रचनेच्या आदि,
मध्य, अंताचा परिचय दिला तर आम्ही खर्च देऊ. अशी ॲडव्हरटाइज इतर कोणीही करू शकणार
नाही. तुम्ही तर बहाद्दूर आहात ना. महावीर-महावीरणी आहात. तुम्ही जाणता यांनी (लक्ष्मी-नारायणाने)
विश्वाची बादशाही कशी घेतली? कोणता पराक्रम केला? बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आल्या
पाहिजेत. तुम्ही किती श्रेष्ठ कार्य करत आहात. साऱ्या विश्वाला पावन बनवत आहात. तर
बाबांची आठवण करायची आहे, वारशाची सुद्धा आठवण करायची आहे. केवळ असे नाही की
शिवबाबांची आठवण आहे. परंतु त्यांची महिमा देखील सांगायची आहे. ही महिमा आहेच मुळी
निराकाराची. परंतु निराकार आपला परिचय कसा देतील? जरूर रचनेच्या आदि, मध्य, अंताचे
नॉलेज देण्यासाठी मुख पाहिजे ना. मुखाची किती महिमा आहे. मनुष्य गोमुखावर जातात,
किती त्रास सहन करतात. काय-काय गोष्टी बनवल्या आहेत. बाण मारला आणि गंगा प्रकटली.
गंगेला समजतात पतित-पावनी. आता पाणी कसे बरे पतितापासून पावन बनवू शकते. पतित-पावन
तर बाबाच आहेत. तर बाबा तुम्हा मुलांना किती शिकवत राहतात. बाबा तर म्हणतात असे-असे
करा. कोण येऊन रचयिता बाबांचा आणि रचनेचा परिचय देईल. साधू-संन्यासी इत्यादी हे
देखील जाणतात की, आपले ऋषी-मुनी इत्यादी सगळे म्हणत होते - नेती-नेती, आम्ही जाणत
नाही, जणू नास्तिक होते. आता पहा कोणी आस्तिक निघतो का? आता तुम्ही मुले नास्तिक
पासून आस्तिक बनत आहात. तुम्ही बेहदच्या बाबांना जाणता जे तुम्हाला इतके श्रेष्ठ
बनवतात. आळवतात सुद्धा - ‘ओ गॉड फादर, लिबरेट करा’. बाबा समजावून सांगत आहेत -
यावेळी रावणाचे साऱ्या विश्वावर राज्य आहे. सगळे भ्रष्टाचारी आहेत पुन्हा
श्रेष्ठाचारी सुद्धा होणार ना. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - अगदी सुरवातीला
पवित्र दुनिया होती. बाबा अपवित्र दुनिया थोडीच बनवतील. बाबा तर येऊन पावन दुनिया
स्थापन करतात, ज्याला शिवालय म्हटले जाते. शिवबाबा शिवालय बनवतील ना. ते कसे बनवतात
ते देखील तुम्ही जाणता. महाप्रलय, जलमय इत्यादी काही होत नाही. शास्त्रांमध्ये तर
काय-काय लिहिले आहे. बाकी ५ पांडव राहिले जे हिमालय पर्वतावर वितळून गेले, मग त्याचा
परिणाम कोणालाच माहिती नाही. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. हे देखील
तुम्हीच जाणता - ते बाबा, पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरू देखील आहेत.
तिथे (सतयुगामध्ये) तर ही मंदिरे असत नाहीत. हे देवता होऊन गेले आहेत, ज्यांची
स्मृतीरूपामध्ये मंदिरे इथे आहेत. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सेकंद बाय
सेकंद नवीन गोष्ट होत राहते, चक्र फिरत राहते. आता बाबा मुलांना डायरेक्शन तर खूप
चांगले देतात. मुले खूप देह-अभिमानी आहेत ज्यामुळे समजतात की आम्ही तर सर्व काही
जाणले आहे. मुरली सुद्धा वाचत नाहीत. किंमतच नाही. बाबा प्रोत्साहन देतात, काही-काही
वेळा मुरली खूप छान चालते. तर चुकवता कामा नये. १०-१५ दिवसांच्या मुरल्या ज्या मिस
झाल्या असतील त्या नंतर बसून वाचल्या पाहिजेत. बाबा हे देखील सांगतात की, अशा
प्रकारे चॅलेंज द्या - ‘या रचता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताचे नॉलेज कोणी येऊन
देईल तर आम्ही त्यांना खर्च इत्यादी सर्व देऊ’. असे चॅलेंज तर जे जाणतात तेच देतील
ना. टीचर स्वतः जाणतात तेव्हाच तर विचारतात ना! माहित असल्याशिवाय विचारणार कसे.
काही-काही मुले
मुरलीकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. बस आमचे तर शिवबाबांशीच कनेक्शन आहे. परंतु शिवबाबा
जे ऐकवतात ते देखील ऐकायचे आहे ना की फक्त त्यांची आठवण करायची आहे. बाबा कशा
छान-छान गोड-गोड गोष्टी ऐकवतात. परंतु माया एकदम अहंकारी बनवते. एक म्हण आहे ना -
‘चूहे को हल्दी की गांठ मिली, समझा मै पंसारी हूँ…’. असे बरेच आहेत जे मुरली वाचतच
नाहीत. मुरलीमध्ये तर नवनवीन गोष्टी येत असतात ना. तर या सर्व गोष्टी समजून
घ्यायच्या आहेत. जेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये बसता तर याची देखील आठवण करायची आहे
की ते बाबा टीचर सुद्धा आहेत आणि सद्गुरू सुद्धा आहेत. नाहीतर शिकणार कुठून. बाबांनी
तर मुलांना सर्व समजावून सांगितले आहे. मुलेच बाबांचा शो करणार. सन शोज फादर. सन चा
मग फादर शो करतात. आत्म्याचा शो करतात. मग मुलांचे काम आहे बाबांचा शो करणे. बाबा
सुद्धा मुलांना सोडत नाहीत, म्हणणार आज अमक्या ठिकाणी जा, आज इथे जा. यांना (ब्रह्मा
बाबांना) थोडेच कोणी ऑर्डर करणारे असणार. तर ही निमंत्रणे इत्यादी वर्तमानपत्रामध्ये
येतील. यावेळी संपूर्ण दुनिया नास्तिक आहे. बाबाच येऊन आस्तिक बनवतात. यावेळी सारी
दुनिया आहे वर्थ नॉट ए पेनी. अमेरिकेकडे जरी कितीही धन-दौलत आहे परंतु वर्थ नॉट ए
पेनी (कवडीमोल) आहे. हे तर सर्व नष्ट होणार आहे. साऱ्या दुनियेमधून तुम्ही वर्थ
पाउंड (मौल्यवान) बनत आहात. तिथे (सतयुगामध्ये) कोणी गरीब असणार नाहीत.
तुम्हा मुलांना सदैव
ज्ञानाचे चिंतन करत हर्षित राहिले पाहिजे. त्यासाठीच गायन आहे - ‘अतिंद्रिय सुख
गोप-गोपींना विचारा’. या संगमातीलच गोष्टी आहेत. संगमयुगाला कोणीही जाणत नाहीत.
विहंग मार्गाची सेवा केल्याने कदाचित महिमा होईल. गायन देखील आहे - ‘अहो प्रभू तेरी
लीला’. हे कोणीही जाणत नव्हते की स्वयं भगवान पिता, टीचर, सद्गुरू सुद्धा आहेत. आता
फादर तर मुलांना शिकवत राहतात. मुलांना हा नशा कायम टिकून राहिला पाहिजे. आता तर नशा
पटकन सोडावॉटर होऊन जातो. सोडा देखील असा होतो ना, थोडा वेळ ठेवल्याने जसे खारट पाणी
होऊन जातो. असे तर होता कामा नये. कोणालाही असे काही समजावून सांगा जेणेकरून त्याला
देखील आश्चर्य वाटेल. ‘चांगले आहे - चांगले आहे’, असे म्हणतात सुद्धा परंतु त्याला
मग वेळ काढून समजून घेतील, जीवन बनवतील ते खूप कठीण आहे. बाबा काही धंदा इत्यादी
करण्याची मनाई करत नाहीत. पवित्र बना आणि जे शिकवतो त्याची आठवण करा. हे तर टीचर
आहेत ना. आणि हे आहे असामान्य शिक्षण. कोणीही मनुष्य शिकवू शकत नाही. बाबाच
भाग्यशाली रथावर येऊन शिकवतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - हे तुमचे तख्त आहे
ज्यावर अकाल मूर्त आत्मा येऊन बसते. तिला हा संपूर्ण पार्ट मिळालेला आहे. आता तुम्ही
समजता ही तर खरी गोष्ट आहे. बाकी या सर्व आहेत कृत्रिम गोष्टी. हे चांगल्या प्रकारे
धारण करून गाठ बांधा. म्हणजे गाठीला हात लागला की आठवेल. परंतु गाठ कशासाठी बांधली
आहे, ते देखील विसरतात. तुम्हाला तर हे पक्के लक्षात ठेवायचे आहे. बाबांच्या आठवणी
सोबत नॉलेज देखील हवे. मुक्ती देखील आहे तर जीवनमुक्ती देखील आहे. अतिशय गोड-गोड
मुले बना. बाबा आतून समजतात कल्प-कल्प ही मुले शिकत राहतात. नंबरवार
पुरुषार्थानुसारच वारसा घेतील. तरीही टीचर अभ्यास करून घेण्याचा पुरुषार्थ तर करून
घेतील ना. तुम्ही वारंवार विसरून जाता म्हणून आठवण करून दिली जाते. शिवबाबांची आठवण
करा. ते पिता, टीचर, सद्गुरू सुद्धा आहेत. छोटी मुले अशी आठवण करणार नाहीत.
श्रीकृष्णासाठी असे थोडेच म्हणणार की ते पिता, टीचर, सद्गुरु आहेत. सतयुगाचा
प्रिन्स श्रीकृष्ण तो मग गुरु कसा बनणार. गुरु हवेत दुर्गतीमध्ये. गायन देखील आहे -
‘बाबा येऊन सर्वांची सद्गती करतात’. श्रीकृष्णाला तर असा काही काळा बनवतात जसा काही
काळा कोळसा. बाबा म्हणतात - यावेळी सगळे कामचितेवर चढून काळे कोळसे बनले आहेत
म्हणून काळे म्हटले जाते. किती गुह्य गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. गीता तर सगळे
वाचतात. भारतवासीच आहेत जे सर्व शास्त्रांना मानतात. सर्वांच्या प्रतिमा लावत
राहतात. तर त्यांना काय म्हणणार? व्यभिचारी भक्ती झाली ना. अव्यभिचारी भक्ती एका
शिवाचीच आहे. ज्ञान देखील एका शिवबाबांकडूनच मिळते. हे ज्ञानच वेगळे आहे, याला
म्हटले जाते स्पिरीच्युअल नॉलेज. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) विनाशी
नशेला सोडून अलौकिक नशा असू द्या की आता आम्ही वर्थ नॉट पेनी पासून वर्थ पाउंड (कवडी
तुल्य पासून हिरे तुल्य) बनत आहोत. स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत, आमचे शिक्षण
असामान्य आहे.
२) आस्तिक बनून
बाबांचा शो करणारी सेवा करायची आहे. कधीही अहंकारी बनून मुरली चुकवायची नाही.
वरदान:-
पवित्रतेच्या
फाउंडेशन द्वारे सदैव श्रेष्ठ कर्म करणारे पूज्य आत्मा भव
पवित्रता पूज्य बनवते.
पूज्य तेच बनतात जे सदैव श्रेष्ठ कर्म करतात. परंतु पवित्रता म्हणजे केवळ
ब्रह्मचर्य नाही. मनसा संकल्पामध्ये देखील कोणा प्रती निगेटिव्ह संकल्प उत्पन्न होऊ
नये. बोल सुद्धा अयथार्थ नसावेत. संबंध-संपर्कामध्ये देखील फरक नसावा, सर्वांसोबत
चांगला एकसमान संबंध असावा. मनसा-वाचा-कर्मणा कोणत्याही बाबतीत पवित्रता खंडित होऊ
नये तेव्हा म्हटले जाईल पूज्य आत्मा. ‘मी परम पूज्य आत्मा आहे’ - या स्मृतीने
पवित्रतेचे फाऊंडेशन मजबूत बनवा.
बोधवाक्य:-
सदैव याच
अलौकिक नशेमध्ये रहा “वाह रे मैं” तर नॅचरली मनाने आणि तनाने आनंदामध्ये डान्स करत
रहाल.