19-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - हे पुरुषोत्तम संगम युग ट्रान्सफर होण्याचे युग आहे, आता तुम्हाला कनिष्ठ
पासून उत्तम पुरुष बनायचे आहे”
प्रश्न:-
बाबांसोबतच
कोणत्या मुलांचीही महिमा गायली जाते?
उत्तर:-
जे टीचर बनून अनेकांचे कल्याण करण्याच्या निमित्त बनतात, त्यांची देखील महिमा
बाबांसोबत गायली जाते. करन-करावनहार बाबा मुलांकडून अनेकांचे कल्याण करवून घेतात तर
मुलांची देखील महिमा होते. म्हणतात - बाबा, अमक्याने माझ्यावर दया केली, ज्यामुळे
मी कशापासून काय बनलो! टीचर बनल्याशिवाय आशीर्वाद मिळू शकत नाहीत.
ओम शांती।
रूहानी बाबा रूहानी मुलांना विचारत आहेत. समजावून देखील सांगतात आणि मग विचारतात
देखील. आता बाबांना मुलांनी ओळखले आहे. भले कोणी सर्वव्यापी देखील म्हणतात परंतु
तत्पूर्वी बाबांना ओळखायला तर हवे ना - बाबा कोण आहेत? ओळखून मग बोलले पाहिजे,
बाबांचे निवासस्थान कोठे आहे? बाबांना जाणतच नाहीत तर त्यांच्या निवासस्थानाविषयी
कसे माहित होईल. म्हणतात - ते तर नावा-रूपा पासून न्यारे आहेत, म्हणजे जणू ते नाही
आहेत. तर जी गोष्ट नाही आहे त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा तरी कसा काय विचार केला
जाईल? हे आता तुम्ही मुले जाणता. बाबांनी सर्वप्रथम तर आपली ओळख दिली आहे, नंतर मग
राहण्याच्या स्थानाविषयी समजावून सांगितले जाते. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला या
रथाद्वारे ओळख देण्याकरिता आलो आहे. मी तुम्हा सर्वांचा पिता आहे, ज्यांना
‘परमपिता’ म्हटले जाते’. आत्म्याला देखील कोणी जाणत नाही. बाबांचे नाव, रूप, देश,
काळ नाही आहे तर मुलांचे मग कोठून येईल? पिताच नावा-रुपा पासून न्यारा आहे तर मुले
मग कुठून आली? मुले आहेत तर जरूर पिता देखील आहे. तर हे सिद्ध होते तो नावा-रूपा
पासून न्यारा नाही आहे. मुलांचे देखील नाव-रूप आहे. भले कितीही सूक्ष्म असो. आकाश
सूक्ष्म आहे तरीही नाव तर आहे ना आकाश. जसे हे पोलार सूक्ष्म आहे, तसे बाबा देखील
अति सूक्ष्म आहेत. मुले वर्णन करतात ‘वंडरफुल तारा’ आहे, जे यांच्यामध्ये प्रवेश
करतात, ज्याला आत्मा म्हणतात. बाबा तर राहतातच परमधाममध्ये, ते राहण्याचे स्थान आहे.
नजर वर जाते ना. बोटाने वर इशारा करून आठवण करतात. तर जरूर ज्याची आठवण करतात, कोणती
वस्तू असेल. परमपिता परमात्मा म्हणतात तर खरे ना. तरीही नावा-रूपा पासून न्यारा
म्हणणे - याला अज्ञान म्हटले जाते. बाबांना जाणणे, याला ज्ञान म्हटले जाते. हे
देखील तुम्ही समजता - आपण अगोदर अज्ञानी होतो. बाबांना सुद्धा ओळखत नव्हतो, स्वतःला
देखील जाणत नव्हतो. आता समजता आम्ही आत्मा आहोत, ना की शरीर. आत्म्याला अविनाशी
म्हटले जाते तर जरूर कोणती गोष्ट आहे ना. अविनाशी असे काही कोणते नाव नाही. अविनाशी
अर्थात ज्याचा विनाश होऊ शकत नाही. तर जरूर कोणती वस्तू आहे. मुलांना चांगल्या
रीतीने समजावून सांगितले गेले आहे, गोड-गोड मुलांनो, ज्यांना मुलांनो-मुलांनो
म्हणतात ते आत्मे अविनाशी आहेत. हे आत्म्यांचे पिता परमपिता परमात्मा बसून समजावून
सांगत आहेत. हा खेळ एकदाच होतो जेव्हा बाबा येऊन मुलांना आपला परिचय देतात. मी
देखील पार्टधारी आहे. कसा पार्ट बजावतो, हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. जुन्या
अर्थात पतित आत्म्याला नवीन पावन बनवतात तर मग तुमचे शरीर देखील तिथे गुल-गुल (फूला
समान सुंदर) असते. हे तर लक्षात आहे ना.
आता तुम्ही बाबा-बाबा
म्हणता, हा पार्ट चालू आहे ना. आत्मा म्हणते - ‘बाबा आले आहेत - आम्हा मुलांना
शांतीधाम घरी घेऊन जाण्यासाठी’. शांतीधामच्या नंतर आहेच मुळी सुखधाम. शांतिधामच्या
नंतर दुःख धाम असू शकत नाही. नव्या दुनियेमध्ये सुखच म्हटले जाते. या देवी-देवता जर
चैतन्य असतील आणि यांना कोणी विचारले की तुम्ही कुठले राहणारे आहात, तर म्हणतील
आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. आता हे जड मूर्ती तर सांगू शकत नाही. तुम्ही तर सांगू
शकता ना, आम्ही खरे तर स्वर्गामध्ये राहणारे देवी-देवता होतो मग ८४ चे चक्र फिरून
आता संगमावर आलो आहोत. हे ट्रान्सफर होण्याचे पुरुषोत्तम संगमयुग आहे. मुले जाणतात
- आपण आता उत्तम पुरुष (श्रेष्ठ आत्मा) बनतो. आम्ही दर ५ हजार वर्षांनंतर सतोप्रधान
बनतो. सतोप्रधान देखील नंबरवार म्हणणार. तर हा सारा पार्ट आत्म्याला मिळालेला आहे.
असे म्हणणार नाही की मनुष्याला पार्ट मिळाला आहे. मज आत्म्याला पार्ट मिळालेला आहे.
मी आत्मा ८४ जन्म घेते. मी आत्मा वारसदार आहे, वारसदार कायम पुरुष असतात, स्त्रिया
नाहीत. तर आता तुम्हा मुलांना हे पक्के समजायचे आहे की आपण सर्व आत्मे पुरुष आहोत.
सर्वांना बेहदच्या पित्याकडून वारसा मिळतो. हदच्या लौकिक पित्याकडून फक्त मुलांना
वारसा मिळतो, मुलीला नाही. असे देखील नाही की, आत्मा नेहमीच फीमेल बनते. बाबा
समजावून सांगतात, तुम्ही आत्मे कधी पुरुषाचे तर कधी स्त्रीचे शरीर घेता. यावेळी
तुम्ही सर्व मेल (पुरुष) आहात. सर्व आत्म्यांना एका बाबांकडून वारसा मिळतो. सर्व
मुलेच मुले आहेत. सर्वांचा पिता एक आहे. बाबा देखील म्हणतात - ‘माझ्या मुलांनो,
तुम्ही सर्व आत्मे पुरुष आहात. माझी रूहानी मुले आहात’. मग पार्ट बजावण्यासाठी
मेल-फिमेल दोघेही पाहिजेत. तेव्हाच तर मनुष्य सृष्टीची वृद्धी होईल. या गोष्टी
तुमच्या शिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. भले म्हणतात खरे की, ‘आपण सर्व बांधव आहोत’,
परंतु समजत नाहीत.
आता तुम्ही म्हणता -
‘बाबा, तुमच्याकडून आम्ही अनेकदा वारसा घेतला आहे’. आत्म्याला हे पक्के होते. आत्मा
बाबांची आठवण जरूर करते - ‘ओ बाबा, दया करा. बाबा आता तुम्ही या, आम्ही सर्व तुमची
संतान बनू. देहासहित देहाचे सर्व संबंध सोडून आम्ही आत्मा तुमचीच आठवण करू. बाबांनी
समजावून सांगितले आहे - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. बाबांकडून आपण
वारसा कसा प्राप्त करतो, दर ५ हजार वर्षानंतर आपण हे देवता कसे बनतो, हे देखील
जाणून घेतले पाहिजे ना. स्वर्गाचा वारसा कोणाकडून मिळतो, हे आता तुम्हाला समजले आहे.
बाबा काही स्वर्गवासी नाही आहेत, मुलांना बनवतात. स्वतः तर नरकामध्येच येतात, तुम्ही
बाबांना बोलवता देखील नरकामध्ये, जेव्हा तुम्ही तमोप्रधान बनता. ही तमोप्रधान दुनिया
आहे ना. सतोप्रधान दुनिया होती, ५ हजार वर्षांपूर्वी यांचे राज्य होते. या गोष्टींना,
या शिक्षणाला आता तुम्हीच जाणता. हे आहे मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण.
‘मनुष्य से देवता किये करत न लागी वार…’ संतान बनला आणि वारसदार झाला; बाबा म्हणतात
- तुम्ही सर्व आत्मे माझी संतान आहात. तुम्हाला वारसा देतो. तुम्ही भाऊ-भाऊ आहात,
राहण्याचे स्थान मूलवतन अथवा निर्वाणधाम आहे, ज्याला निराकारी दुनिया देखील म्हणतात.
सर्व आत्मे तिथे राहतात. या सूर्य-चंद्राच्याही पार पलीकडे ते तुमचे स्वीट सायलेन्स
घर आहे परंतु तिथे बसून तर रहायचे नाहीये. बसून राहून काय करणार. ती तर जशी जड
अवस्था झाली. आत्मा जेव्हा पार्ट बजावेल तेव्हाच चैतन्य म्हटली जाईल. आहे चैतन्य
परंतु पार्ट बजावला नाही तर मग जड झाली ना. तुम्ही इथे उभे रहाल आणि हातपाय हलवणारच
नाहीत तर जणू जड झालात ना. तिथे तर नॅचरल शांती असते, आत्मे जसे कि जड आहेत. काहीही
पार्ट बजावत नाहीत. सौंदर्य तर पार्टमध्येच आहे ना. शांतीधाम मध्ये कसले सौंदर्य
असणार? आत्मे सुख-दुःखाच्या जाणीवे पासून अलिप्त असतात. काही पार्टच बजावत नाहीत तर
तिथे राहून काय फायदा? सर्वप्रथम सुखाचा पार्ट बजावायचा आहे. प्रत्येकाला आधीपासूनच
पार्ट मिळालेला आहे. कोणी म्हणतात - आम्हाला तर मोक्ष हवा. बुडबुडा पाण्यामध्ये
विलीन झाला बस्स, आत्मा जशी काही नाहीच आहे. काहीच पार्ट बजावत नसेल जणूकाही जड
म्हणणार. चैतन्य असतानाही जड होऊन पडून राहिल तर काय फायदा? पार्ट तर सर्वांना
बजावायचाच आहे. मुख्य पार्ट हिरो-हिरॉईनचा म्हटला जातो. तुम्हा मुलांना
हिरो-हिरॉईनचे टायटल (उपाधी) मिळते. आत्मा इथे पार्ट बजावते. आधी सुखामध्ये राज्य
करते नंतर मग रावणाच्या दुःखाच्या राज्यामध्ये जाते. आता बाबा म्हणतात - तुम्ही
मुलांनी सर्वांना हा निरोप द्या. टीचर बनून इतरांना समजावून सांगा. जे टीचर बनत
नाहीत त्यांच्या पदाचा दर्जा कमी होईल. टीचर बनल्याशिवाय कोणाला आशीर्वाद तरी कसा
मिळेल? कोणाला पैसे द्याल तर त्यांना आनंद होईल ना. आतून समजतात बी. के. आमच्यावर
खूप दया करतात, जे आम्हाला कोणापासून काय बनवतात! तसे तर महिमा एका बाबांचीच करतात
- ‘वाह बाबा, तुम्ही या मुलांद्वारे आमचे किती कल्याण करता’! कोणाच्या तरी
माध्यमातून कल्याण तर होते ना. बाबा करन-करावनहार आहेत, तुमच्या द्वारे करून घेतात.
तुमचे कल्याण होते. तर तुम्ही मग इतरांचे कलम लावता (इतरांना ज्ञान देता). जे जशी
जितकी सेवा करतात, तितके उच्च पद मिळवतात. राजा बनायचे आहे तर प्रजा देखील बनवायची
आहे. मग जे चांगले नंबर घेतात ते देखील राजा बनतात. माळा बनते ना. स्वतःला विचारले
पाहिजे की, ‘मी माळेतील कितवा नंबर बनेन?’ ९ रत्न मुख्य आहेत ना. मधोमध आहे हिरा
बनविणारा. हिऱ्याला मध्ये ठेवतात. माळेमध्ये वर फुल देखील आहे ना. शेवटी तुम्हाला
माहित होईल - मुख्य मणी कोण बनतात, जे डिनायस्टीमध्ये (घराण्यामध्ये) येतील. नंतर
शेवटी तुम्हाला सर्व साक्षात्कार होईल जरूर. बघाल - कसे हे सर्व सजा भोगतात.
सुरुवातीला तुम्ही दिव्य दृष्टीने सूक्ष्म वतनमध्ये पाहत होता. हे देखील गुप्त आहे.
आत्मा सजा कुठे भोगते - हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. गर्भ जेलमध्ये सजा मिळते.
जेलमध्ये धर्मराजाला बघतात आणि म्हणतात बाहेर काढा. आजार इत्यादी उद्भवतात, तो
देखील कर्माचा हिशोब आहे ना. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा तर जरूर
बरोबर तेच ऐकवतील ना. आता तुम्ही राइटियस (नीतिमान) बनता. नीतिमान त्यांना म्हटले
जाते जे बाबांकडून खूप शक्ती घेतात.
तुम्ही विश्वाचे मालक
बनता ना. किती ताकद असते. दंगे-मारामारी इत्यादींचा काही प्रश्नच नाही. ताकद कमी आहे
तर किती दंगे-मारामाऱ्या होतात. तुम्हा मुलांना ताकद मिळते - अर्ध्या कल्पासाठी. तरी
देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. सर्वच एकसमान ताकद मिळवू शकत नाहीत, आणि एकसमान पदही
मिळवू शकत नाहीत. हे देखील आधीपासूनच नोंदलेले आहे. ड्रामामध्ये अनादि नोंदलेले आहे.
कोणी मागाहून येतात, एक-दोन जन्म घेतले आणि शरीर सोडले. जसे दिवाळीला कीटक असतात,
ते रात्री जन्म घेतात आणि सकाळी मरून जातात. ते तर अगणित असतात. मनुष्यांची तरी
देखील मोजदाद तर होते. सर्वप्रथम जे आत्मे येतात ते किती दीर्घायुषी असतात! तुम्हा
मुलांना आनंद झाला पाहिजे की, आपण दीर्घायुषी बनणार. तुम्ही पूर्ण पार्ट बजावता.
तुम्ही कसे पूर्ण पार्ट बजावता ते बाबा तुम्हालाच समजावून सांगतात. केलेल्या
अभ्यासानुसार वरून पार्ट बजावण्यासाठी येता. तुमचे हे शिक्षण आहेच मुळी नवीन
दुनियेसाठी. बाबा म्हणतात - अनेकदा तुम्हाला शिकवतो. हे शिक्षण अविनाशी बनते. अर्धा
कल्प तुम्ही प्रारब्ध प्राप्त करता. त्या विनाशी शिक्षणाद्वारे सुख देखील
अल्पकाळासाठी मिळते. आता जर कोणी बॅरिस्टर बनत असेल तर मग कल्पानंतर पुन्हा
बॅरिस्टर बनेल. हे देखील तुम्ही जाणता - जो काही सर्वांचा पार्ट आहे, तोच पार्ट
कल्प-कल्प बजावला जात राहील. देवता असो अथवा शूद्र असो, प्रत्येकाचा पार्ट तोच
बजावला जातो जो कल्प-कल्प बजावला जातो. त्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही.
प्रत्येकजण आपला पार्ट बजावत राहतात. हा सारा पूर्वनियोजित खेळ आहे. विचारतात -
‘पुरुषार्थ मोठा कि प्रारब्ध मोठे?’ आता बिना पुरुषार्थाचे प्रारब्ध तर मिळत नाही.
पुरुषार्थाने प्रारब्ध मिळते ड्रामा अनुसार. तर सर्व ओझे ड्रामावर येते. पुरुषार्थ
कोणी करतात, कोणी नाही करत. येतात देखील तरीही पुरुषार्थ करत नाहीत तर मग प्रारब्ध
सुद्धा मिळत नाही. संपूर्ण दुनियेमध्ये जी काही ॲक्ट चालते (कृती केली जाते), सर्व
पूर्वनियोजित ड्रामा आहे. आत्म्यामध्ये आदि पासून अंतापर्यंत सर्व पार्ट
अगोदरपासूनच नोंदलेला आहे. जसे तुमच्या आत्म्यामध्ये ८४ चा पार्ट आहे, हिरा देखील
बनते तर कवडी समान सुद्धा बनते. या सर्व गोष्टी तुम्ही आता ऐकता. शाळेमध्ये जेव्हा
कोणी नापास होतो तर म्हणतात, हा बुद्धीहीन आहे. धारणा होत नाही, याला म्हटले जाते
व्हरायटी झाड, व्हरायटी फीचर्स. हे व्हरायटी झाडाचे नॉलेज बाबाच समजावून सांगतात.
कल्पवृक्षावर देखील समजावून सांगतात. वडाच्या झाडाचे उदाहरण देखील याच्यावरच आहे.
त्याच्या शाखा खूप पसरतात.
मुले समजतात - आपली
आत्मा अविनाशी आहे, शरीर तर विनाश होईल. आत्माच धारणा करते, आत्मा ८४ जन्म घेते,
शरीरे तर बदलत जातात. आत्मा तीच आहे, आत्माच विभिन्न शरीरे घेऊन पार्ट बजावते. ही
नवीन गोष्ट आहे ना. तुम्हा मुलांना देखील आता ही समज मिळाली आहे. कल्पा पूर्वी
देखील असे समजले होते. बाबा येतात देखील भारतामध्ये. तुम्ही सर्वांना संदेश देत
राहता, असा कोणीही राहणार नाही ज्याला संदेश मिळालेला नाही. सर्वांना संदेश ऐकण्याचा
अधिकार आहे. मग बाबांकडून वारसा देखील घेतील. काहीतरी ऐकतील ना, तरीही बाबांची मुले
आहेत ना. बाबा समजावून सांगत आहेत - मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे. माझ्याद्वारे
या रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणल्याने तुम्ही हे पद मिळवता. बाकी सर्व मुक्तीमध्ये
निघून जातात. बाबा तर सर्वांची सद्गती करतात. गातात - ‘अहो बाबा, तेरी लीला अपरंपार…’
काय लीला? कोणती लीला? या जुन्या दुनियेला बदलण्याची लीला आहे. माहित असले पाहिजे
ना. मनुष्यच जाणतील ना. बाबा तुम्हा मुलांनाच येऊन सर्व गोष्टी समजावून सांगतात.
बाबा नॉलेजफुल आहेत. तुम्हाला देखील नॉलेजफुल बनवतात. नंबरवार तुम्ही बनता.
स्कॉलरशिप घेणारे नॉलेजफुल म्हटले जातील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव याच
स्मृतीमध्ये रहायचे आहे की, मी आत्मा पुरुष आहे, मला बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा
आहे. मनुष्यापासून देवता बनण्याचा अभ्यास शिकायचा आहे आणि शिकवायचा आहे.
२) साऱ्या दुनियेमध्ये
जी काही ॲक्ट चालते, हा सर्व पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामध्ये पुरुषार्थ आणि
प्रारब्ध दोन्ही नोंदलेले आहे. पुरुषार्थ विना प्रारब्ध मिळू शकत नाही, या गोष्टीला
व्यवस्थित समजून घ्यायचे आहे.
वरदान:-
कोणतीही सेवा
सच्च्या मनाने अथवा प्रेमाने करणारे सच्चे रूहानी सेवाधारी भव
सेवा कोणतीही असो
परंतु ती खऱ्या मनाने, प्रेमाने केली तर त्याचे १०० मार्क्स मिळतात. सेवेमध्ये
चिडचिडेपणा असू नये, सेवा करायची म्हणून केली जाऊ नये. तुमची सेवा आहेच मुळी
दुःखातून सोडविणे, सर्वांना सुख देणे, आत्म्यांना योग्य आणि योगी बनविणे, अपकारिंवर
उपकार करणे, वेळेवर प्रत्येकाला साथ किंवा सहयोग देणे, अशी सेवा करणारेच खरे रूहानी
सेवाधारी आहेत.
बोधवाक्य:-
पवित्रताच
ब्राह्मण जीवनाची नवीनता आहे, हेच ज्ञानाचे फाउंडेशन आहे.