20-04-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.01.2005  ओम शान्ति   मधुबन


“सेकंदामध्ये देहभानापासून मुक्त होऊन जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा आणि मास्टर मुक्ती-जीवनमुक्ती दाता बना”


आज बापदादा चहू बाजूच्या लकी आणि लवली (भाग्यवान आणि लाडक्या) मुलांना बघत आहेत. प्रत्येक मूल स्नेहामध्ये सामावलेले आहे. हा परमात्म स्नेह अलौकिक स्नेह आहे. या स्नेहानेच मुलांना बाबांचे बनवले आहे. स्नेहानेच सहज विजयी बनविले आहे. आज अमृतवेलेपासून चारही बाजूंच्या प्रत्येक मुलाने आपली स्नेहाची माळा बाबांना घातली कारण प्रत्येक मुलगा जाणतो की हा परमात्म स्नेह कोणापासून काय बनवतो. स्नेहाची अनुभूती अनेक परमात्म खजिन्यांचा मालक बनविणारी आहे आणि सर्व परमात्म खजिन्यांची गोल्डन चावी बाबांनी सर्व मुलांना दिली आहे. जाणता ना! ती गोल्डन चावी कोणती आहे? ती गोल्डन चावी आहे - “मेरा बाबा”. मेरा बाबा म्हटले आणि सर्व खजिन्यांचे अधिकारी बनले. सर्व प्राप्तींच्या अधिकाराने संपन्न बनले, सर्व शक्तींनी समर्थ बनले, मास्टर सर्वशक्तिवान आत्मे बनले. अशा संपन्न आत्म्यांच्या हृदयातून कोणते गाणे निघते? ‘अप्राप्त नहीं कोई वस्तु हम ब्राह्मणों के खजाने में’.

आजच्या दिवसाला स्मृती दिवस म्हणता, आज सर्व मुलांना विशेष आदि देव ब्रह्मा बाबाच जास्त स्मृतीमध्ये येत आहेत. ब्रह्मा बाबा तुम्हा ब्राह्मण मुलांना बघून हर्षित होतात, का? प्रत्येक ब्राह्मण मूल कोटींमध्ये कोणी भाग्यवान मूल आहे. आपल्या भाग्याला जाणता ना! बापदादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर चमकत असलेला भाग्याचा तारा पाहून हर्षित होत आहेत. आजच्या स्मृती दिवशी विशेष बापदादांनी विश्वसेवेच्या जबाबदारीचा मुकुट मुलांना अर्पण केला. तर हा स्मृती दिवस तुम्हा मुलांच्या राज्य तिलकाचा दिवस आहे. मुलांच्या विशेष साकार स्वरूपामध्ये विल पॉवर्स विल करण्याचा दिवस आहे. ‘सन शोज फादर’ या म्हणीला साकार करण्याचा दिवस आहे. बापदादा मुलांच्या निमित्त बनून नि:स्वार्थ विश्वसेवेला पाहून खुश होतात. बापदादा करावनहार बनून, करनहार मुलांच्या प्रत्येक पावलाला पाहून खुश होतात कारण सेवेच्या सफलतेचा विशेष आधारच आहे - करावनहार बाबा मज करनहार आत्म्याद्वारे करवून घेत आहेत. मी आत्मा निमित्त आहे कारण निमित्त भावाने निर्मान (विनम्र) स्थिती स्वतः होते. ‘मी’पणा जो देहभानामध्ये घेऊन येतो तो स्वतःच निर्मान भावाने (विनम्र भावाने) नाहीसा होतो. या ब्राह्मण जीवनामध्ये सर्वात जास्त विघ्नरूप बनतो तो देह-भानाचा ‘मी’पणा. करावनहार करवून घेत आहेत, मी निमित्त करनहार बनून करत आहे, तर सहजच देह-अभिमान मुक्त बनतात आणि जीवनमुक्तीची मजा अनुभव करतात. भविष्यामध्ये जीवनमुक्ती तर प्राप्त होणारच आहे परंतु आता संगमयुगावर जीवन मुक्तीचा अलौकिक आनंद अजूनच अलौकिक आहे. जसे ब्रह्माबाबांना बघितले - कर्म करत असताना कर्माच्या बंधनापासून न्यारे. जीवनामध्ये असताना कमल पुष्प समान न्यारे आणि प्यारे. इतक्या मोठ्या परिवाराची जबाबदारी, जीवनाची जबाबदारी, योगी बनविण्याची जबाबदारी, फरिश्ता सो देवता बनविण्याची जबाबदारी असताना देखील बेफिकर बादशहा. यालाच जीवनमुक्त स्थिती म्हटले जाते म्हणूनच भक्ती मार्गामध्ये ब्रह्माचे आसन कमलपुष्प दाखवतात. कमल आसनधारी दाखवतात. तर तुम्हा सर्व मुलांना देखील संगमावरच जीवनमुक्तीचा अनुभव करायचाच आहे. बापदादांकडून मुक्ती, जीवन-मुक्तीचा वारसा या वेळीच प्राप्त होतो. यावेळीच मास्टर मुक्ती, जीवन-मुक्ती दाता बनायचे आहे. बनले आहात आणि बनायचे आहे. मुक्ती, जीवन-मुक्तीचे मास्टर दाता बनण्याची विधी आहे - सेकंदामध्ये देह-भान मुक्त होणे. या अभ्यासाची आता आवश्यकता आहे. मनावर अशी कंट्रोलिंग पॉवर असावी, जशी ही स्थूल कर्मेंद्रिये हात आहेत, पाय आहेत, त्यांना जेव्हा पाहिजे जसे पाहिजे तसे करू शकता, वेळ लागतो का! आता विचार करा हात वर करायचा आहे, वेळ लागेल? करू शकता ना! आता बापदादांनी म्हटले हात वर करा, तर कराल ना! करू नका, करू शकता. असा मनावर कंट्रोल असावा, जिथे एकाग्र करू इच्छिता, तिथे एकाग्र व्हावे. मन भले हातापेक्षा, पायापेक्षा देखील सूक्ष्म आहे परंतु आहे तर तुमचे ना! ‘माझे मन’ म्हणता ना, ‘तुझे मन’ असे तर म्हणत नाही ना! तर जशी स्थूल कर्मेंद्रिये कंट्रोलमध्ये राहतात, असेच मन-बुद्धी-संस्कार कंट्रोलमध्ये असावेत तेव्हा म्हणणार नंबर वन विजयी. सायन्सवाले तर रॉकेटद्वारे किंवा आपल्या साधनांद्वारे याच लोकापर्यंत पोहोचतात, आणि जास्तीत जास्त ग्रहांपर्यंत पोहोचतात. परंतु तुम्ही ब्राह्मण आत्मे तीन्ही लोक पर्यंत पोहोचू शकता. सेकंदामध्ये सूक्ष्म लोक, निराकारी लोक आणि स्थूलमधे मधुबन पर्यंत तर पोहोचू शकता ना! जर मनाला ऑर्डर केली मधुबनमध्ये पोहोचायचे आहे तर सेकंदामध्ये पोहोचू शकता का? तनाने नाही, मनाने. ऑर्डर करा सूक्ष्मवतनमध्ये जायचे आहे, निराकारी वतनमध्ये जायचे आहे नंतर तिन्ही लोकामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा मनाला नेऊ शकता ना! आहे प्रॅक्टिस? आता याच अभ्यासाची जास्त आवश्यकता आहे. बापदादांनी बघितले आहे अभ्यास तर करता परंतु जेव्हा पाहिजे, जितका वेळ पाहिजे एकाग्र व्हावे, अचल व्हावे, हलचल मध्ये येऊ नये, यावर आणखी अटेंशन हवे. जे गायन आहे - ‘मन जीत जगत जीत’, कधी-कधी मन धोका सुद्धा देते.

तर बापदादा आजच्या समर्थ दिवशी (शक्तिशाली दिवसानिमित्त) याच समर्थीकडे (याच शक्तीकडे) विशेष लक्ष वेधून घेत आहेत. हे स्वराज्य अधिकारी मुलांनो, आता या विशेष अभ्यासाला चालता-फिरता चेक करा कारण काळानुसार आता अचानकचे खेळ खूप दिसून येतील. यासाठी एकाग्रतेची शक्ती आवश्यक आहे. एकाग्रतेच्या शक्तीने दृढतेची शक्ती देखील आपोआप येते आणि दृढता सफलता स्वतः प्राप्त करविते. तर विशेष समर्थ दिवशी या समर्थीचा अभ्यास विशेष ध्यानामध्ये ठेवा; म्हणूनच भक्तीमार्गामध्ये देखील म्हणतात - ‘मन के हारे हार, मन के जीते जीत’. तर जेव्हा ‘माझे’ मन म्हणता, तर ‘माझे’पणाचे मालक बनून शक्तींच्या लगामाने विजय प्राप्त करा. या नवीन वर्षामध्ये या होमवर्कवर विशेष लक्ष द्या! यालाच म्हटले जाते ‘योगी’ तर आहात परंतु आता ‘प्रयोगी’ बना.

बाकी आजच्या दिवशी स्नेहाची रूहरीहान (प्रेमळ आत्मिक गप्पा), प्रेमळ तक्रारी आणि समान बनण्याचा उमंग-उत्साह तिन्ही प्रकारची रूहरीहान बापदादांकडे पोहोचली आहे. चारही बाजूच्या मुलांच्या स्नेहाने ओथंबलेल्या आठवणी, स्नेहाने भरलेले प्रेम बापदादांकडे पोहोचले. पत्र देखील पोहोचली तर रूहरीहान देखील पोहोचले, संदेश सुद्धा पोहोचले, बापदादांनी मुलांचा स्नेह स्वीकारला. रिटर्नमध्ये हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण देखील दिली. हृदया पासून आशीर्वाद देखील दिले. प्रत्येकाचे नाव तर घेऊ शकत नाही ना. पुष्कळजण आहेत. परंतु कानाकोपऱ्यातील, गावा-गावातील, शहरा-शहरातील सर्व बाजूंच्या मुलांची, बंधनात असलेल्यांची, विलाप करणाऱ्यांची सर्वांची प्रेमपूर्वक आठवण पोहोचली, आता बापदादा हेच म्हणतात - स्नेहाच्या रिटर्नमध्ये आता आपल्या स्वतःला टर्न करा, परिवर्तन करा. आता स्टेजवर आपले संपन्न स्वरूप प्रत्यक्ष करा. तुमच्या संपन्नतेने दुःख आणि अशांतीची समाप्ती होणार आहे. आता आपल्या भाऊ-बहिणींना जास्त दुःख बघायला लावू नका. या दुःख, अशांती पासून मुक्ती द्या. खूप भयभीत आहेत. ‘काय करावे, काय होईल…’ या अंधारामध्ये भटकत आहेत. आता आत्म्यांना प्रकाशाचा रस्ता दाखवा. उमंग येतो का? दया येते का? आता बेहदला बघा. बेहदमध्ये दृष्टी ठेवा. अच्छा. होमवर्कची तर आठवण राहील ना! विसरायचे नाही. प्राईज (बक्षीस) देणार. जे एका महिन्यामध्ये आपल्या मनाला पूर्णतः कंट्रोलिंग पॉवरने पूर्ण महिना जिथे पाहिजे तिथे, जेव्हा पाहिजे तेव्हा एकाग्र करू शकतील, या चार्टच्या रिझल्टला बक्षीस देणार. ठीक आहे? कोण बक्षीस घेणार? पांडव, पांडव तर पहिले. मुबारक असो पांडवांना आणि शक्तींना. ए वन. पांडव नंबर वन तर शक्ती ए वन. शक्ती ए वन नाही झाल्या तर पांडव ए वन. आता गती थोडी तीव्र करा. आरामवाली नको. तीव्र गतीनेच आत्म्यांचे दुःख-वेदना नाहीशा होतील. दयेची छत्रछाया आत्म्यांवर घाला. अच्छा.

डबल विदेशी भाऊ-बहिणींसोबत संवाद:- डबल विदेशी, बापदादा म्हणतात डबल विदेशी अर्थात डबल पुरुषार्थाने पुढे जाणारे. जसे ‘डबल विदेशी’ टायटल आहे ना, ही खूण आहे ना तुमची. असेच डबल विदेशी नंबर वन घेण्यामध्ये देखील डबल गतीने पुढे जाणारे. चांगले आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये बापदादा डबल विदेशींना पाहून आनंदीत होतात कारण भारतवासी तुम्हा सर्वांना पाहून आनंदीत होतात. बापदादा देखील विश्व कल्याणकारी टायटलला पाहून आनंदीत होतात. आता डबल विदेशी काय प्लॅन बनवत आहेत? बापदादांना आनंद झाला की, आफ्रिकावाले तीव्र पुरुषार्थ करत आहेत. तर तुम्ही सर्वांनी देखील आस-पास जे तुमचे भाऊ-बहिणी वंचित राहिले आहेत, त्यांना संदेश देण्याचा उमंग-उत्साह ठेवा. तक्रार राहू नये. वृद्धी होत आहे आणि होत देखील राहील परंतु आता त्यांची तक्रार पूर्ण करायची आहे. डबल विदेशींची ही विशेषता तर ऐकवतात की, भोळ्या बाबांना राजी करण्याचे जे साधन आहे - ‘सच्ची दिल पर साहेब राजी’, ही डबल विदेशींची विशेषता आहे. बाबांना राजी खूप लीलया करता येते. सच्चे दिल बाबांना का प्रिय वाटते? कारण बाबांना म्हणतातच सत्य. गॉड इज ट्रूथ म्हणतात ना! तर बापदादांना साफ दिल, सच्चे दिलवाले खूप प्रिय आहेत. असे आहे ना! साफ दिल आहे, सच्चे दिल आहे. सत्यताच ब्राह्मण जीवनाची महानता आहे. म्हणून बापदादा डबल विदेशींची नेहमी आठवण करतात. विभिन्न देशांमध्ये आत्म्यांना संदेश देण्याच्या निमित्त बनले. बघा किती देशांमधून येतात? तर या सर्व देशांचे कल्याण तर झाले ना! तर बापदादा, इथे तर तुम्ही निमित्त आलेले आहात परंतु चारही बाजूंच्या डबल विदेशी मुलांना, निमित्त बनलेल्या मुलांना मुबारक देत आहेत, बधाई देत आहेत, उडत रहा आणि उडवत रहा. उडत्या कलेने सर्वांचे भले तर होणारच आहे. सर्व रिफ्रेश होत आहेत ना? रिफ्रेश झाले? सदा अमर राहिल का अर्धे मधुबन मध्येच सोडून जाणार? सोबत राहील, सदा राहील? ‘अमर भव’चे वरदान आहे ना. तर जे परिवर्तन केले आहे ते नेहमी वाढत जाईल. अमर राहील. अच्छा. बापदादा खुश आहेत आणि तुम्ही देखील खुश आहात, इतरांना देखील खुशी द्या. अच्छा.

ज्ञान सरोवरला दहा वर्षे झाली आहेत:- अच्छा. चांगले आहे, ज्ञानसरोवर ने एक विशेषता आरंभ केली, जेव्हापासून ज्ञान सरोवर सुरु झाले आहे तर व्ही. आय. पी., आय. पी. यांचे विशेष विधिपूर्वक प्रोग्राम्स सुरु झाले आहेत. प्रत्येक वर्गाचे प्रोग्राम्स एका मागोमाग एक होतच राहतात. आणि बघितले गेले आहे की ज्ञान सरोवरमध्ये येणाऱ्या आत्म्यांची स्थूल सेवा आणि अलौकिक सेवा खूप अगदी आनंदाने करतात म्हणून ज्ञानसरोवरवाल्यांना बापदादा विशेष मुबारक देत आहेत की, सेवेचा रिझल्ट म्हणजे सर्वजण आनंदीत होऊन जातात आणि अगदी आनंदाने आणखी इतर साथींना सोबत घेऊन येतात. चारही बाजूंना आवाज पसरविण्याच्या निमित्त ज्ञान सरोवर बनले आहे. तर मुबारक असो आणि सदा मुबारक घेत रहा, अच्छा.

आता एका सेकंदामध्ये मनाला एकाग्र करू शकता? सर्व एका सेकंदामध्ये बिंदू रुपामध्ये स्थित व्हा. (बापदादांनी ड्रिल करून घेतली) अच्छा - असा अभ्यास चालता-फिरता करत रहा.

चहू बाजूंच्या स्नेही, लवलीन आत्म्यांना, नेहमी दयाळू बनून प्रत्येक आत्म्याला दुःख अशांतीपासून मुक्त करणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदा आपल्या मन-बुद्धी-संस्काराला कंट्रोलिंग पॉवर द्वारे कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या महावीर आत्म्यांना, सदा संगमयुगातील जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणाऱ्या बाप समान आत्म्यांना बापदादांची पदम गुणा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
सर्वांना ठिकाणा देणाऱ्या दयाळू बाबांची मुले रहमदिल भव

दयाळू बाबांची दयाळू मुले कोणालाही भिकाऱ्याच्या रूपामध्ये बघतील तर त्यांना दया येईल की या आत्म्याला सुद्धा ठिकाणा मिळावा, याचे देखील कल्याण व्हावे. यांच्या संपर्कामध्ये जो कोणी येईल त्याला बाबांचा परिचय जरूर देतील. जसे कोणी आपल्या घरी आला तर अगोदर त्याला पाणी विचारले जाते, जर तो असाच निघून गेला तर ते वाईट समजले जाते. असे जो कोणी संपर्कामध्ये येतो त्याला बाबांच्या परिचयाचे पाणी जरूर विचारा अर्थात दात्याची मुले दाता बनून काही ना काही द्या जेणेकरून त्याला देखील ठिकाणा मिळेल.

सुविचार:-
यथार्थ वैराग्य वृत्तीचा सोपा अर्थ आहे - जितका न्यारा तितका प्यारा.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

मी आणि माझे बाबा, याच आठवणीमध्ये कंबाइंड रहा तर मायाजीत बनाल. ‘करन-करावनहार’, या शब्दामध्ये बाबा आणि मुले दोघेही कंबाइंड आहेत. हात मुलांचे आणि काम बाबांचे. हात पुढे करण्याचा गोल्डन चान्स मुलांनाच मिळतो. परंतु अनुभव होतो की, करविणारा करत आहे. निमित्त बनवून चालवत आहे - नेहमी हाच आवाज मनातून निघतो.