20-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - मनमनाभवच्या वशीकरण मंत्रानेच तुम्ही मायेवर विजय प्राप्त करू शकता, याच
मंत्राची सर्वांना आठवण करून द्या”
प्रश्न:-
या बेहदच्या
ड्रामामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगार कोण-कोण आहेत आणि कसे?
उत्तर:-
या जुन्या दुनियेची स्वच्छता करणारे सर्वात उत्कृष्ट कामगार आहेत - नैसर्गिक आपत्ती.
धरणी हलते, पूर येतात, स्वच्छता होते. याच्यासाठी भगवान कोणाला डायरेक्शन देत नाहीत.
बाबा मुलांना कसे नष्ट करतील. हा तर ड्रामामध्ये पार्ट आहे. रावणाचे राज्य आहे ना,
याला ईश्वरीय आपत्ती म्हणत नाहीत.
ओम शांती।
बाबाच मुलांना समजावून सांगतात - मुलांनो, मनमनाभव. असे नाही की मुले बसून बाबांना
समजावून सांगतील. मुले असे म्हणणार नाहीत की शिवबाबा, मनमनाभव. नाही. तशी तर मुले
भलेही बसून आपापसात गप्पागोष्टी करतात, विचार विनिमय करतात परंतु जो मूळ महामंत्र
आहे, तो तर बाबाच देतात. मंत्र, गुरु लोक देतात. ही पद्धत कुठून आली? हे बाबा जे
नवीन सृष्टी रचणारे आहेत, तेच सर्वात पहिले मंत्र देतात - मनमनाभव. याचे नावच आहे
वशीकरण मंत्र अर्थात मायेवर विजय प्राप्त करण्याचा मंत्र. हा काही मनातल्या मनात
जपायचा नाहीये. हे तर स्पष्ट करून सांगावे लागते. बाबा अर्थासहित समजावून सांगतात.
भले गीतेमध्ये आहे परंतु अर्थ कोणालाच समजत नाही. हा गीतेचा एपिसोड सुद्धा (अध्याय
सुद्धा) आहे. परंतु फक्त नाव बदलून टाकले आहे. भक्तीमार्गामध्ये किती मोठी-मोठी
पुस्तके इत्यादी बनतात. खरे तर हे बाबा बसून मुलांना तोंडी समजावतात. बाबांच्या
आत्म्यामध्ये ज्ञान आहे. मुलांचीही आत्माच ज्ञान धारण करते. बाकी फक्त सोपे करून
समजावून सांगण्याकरिता म्हणून ही चित्रे इत्यादी बनवली जातात. तुम्हा मुलांच्या
बुद्धीमध्ये तर हे सर्व नॉलेज आहे. तुम्ही जाणता बरोबर आदि सनातन देवी-देवता धर्म
होता दुसरा कोणताही खंड नव्हता. नंतर मग हे बाकीचे खंड जोडले गेले आहेत. तर ते
देखील चित्र एका कोपऱ्यात ठेवले पाहिजे, ज्यावर तुम्ही दाखवता की, भारतामध्ये यांचे
राज्य होते तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. आता तर कित्येक धर्म झाले आहेत नंतर मग
हे सर्व राहणार नाहीत. ही आहे बाबांची योजना. त्या बिचाऱ्यांना किती काळजी लागून
राहिलेली आहे. तुम्ही मुले समजता हे तर अगदी बरोबर आहे. लिहिलेले सुद्धा आहे -
‘बाबा येऊन ब्रह्मा द्वारे स्थापना करतात’. कशाची? नवीन दुनियेची. यमुनेचा किनारा
आहे राजधानी. तिथे एकच धर्म असतो. झाड अगदी छोटे आहे, या झाडाचे ज्ञान देखील बाबाच
देतात, चक्राचेही ज्ञान देतात. सतयुगामध्ये एकच भाषा असते, दुसरी कोणतीही भाषा नसेल.
तुम्ही सिद्ध करू शकता एकच भारत होता, एकच राज्य होते, एकच भाषा होती. पॅराडाईजमध्ये
(स्वर्गामध्ये) सुख-शांती होती. दुःखाचे नामोनिशाणही नव्हते. (हेल्थ, वेल्थ,
हॅपिनेस) आरोग्य, संपत्ती, आनंद सर्वकाही होते. भारत नवीन होता तेव्हा आयुर्मान
सुद्धा जास्त होते कारण पवित्रता होती. पवित्रतेमुळे मनुष्य निरोगी राहतात.
अपवित्रतेमुळे बघा मनुष्यांची काय हालत होते. बसल्या-बसल्या अकाली मृत्यू होतो.
तरूण देखील मृत्युमुखी पडतात. किती दुःख होते. तिथे अकाली मृत्यू होत नाही. पूर्ण
आयुष्य असते. पीढी पर्यंत अर्थात म्हातारे होईपर्यंत कोणी मरत नाहीत.
कोणालाही समजावून
सांगाल तर त्यांच्या बुद्धीमध्ये हे पक्के बसवायचे आहे - ‘बेहदच्या बाबांची आठवण करा,
तेच पतित-पावन आहेत, सद्गतीदाता आहेत’. तुमच्याजवळ तो नकाशा सुद्धा असला पाहिजे तर
सिद्ध करून सांगू शकाल. आजचा नकाशा हा आहे, उद्याचा नकाशा हा आहे. काहीजण तर
व्यवस्थित ऐकतात देखील. हे पूर्णपणे स्पष्ट करून सांगायचे आहे. हा भारत अविनाशी खंड
आहे. जेव्हा हा देवी-देवता धर्म होता तेव्हा दुसरे कोणतेही धर्म नव्हते. आता तो आदि
सनातन देवी-देवता धर्मच राहिलेला नाही. हे लक्ष्मी-नारायण कुठे गेले, कोणीही सांगू
शकणार नाही. कोणामध्ये ताकद नाही सांगण्याची. तुम्ही मुले चांगले रहस्यमय पद्धतीने
समजावून सांगू शकता. यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. तुम्ही सर्व काही जाणता आणि
जसेच्या तसे पुन्हा सांगू शकता. तुम्ही कोणालाही विचारू शकता - हे कुठे गेले? तुमचा
प्रश्न ऐकून चकित होतील. तुम्ही तर खात्रीने सांगता, हे सुद्धा कसे ८४ जन्म घेतात.
बुद्धीमध्ये तर आहे ना. तुम्ही लगेच सांगाल - सतयुग नव्या दुनियेमध्ये आमचे राज्य
होते. एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता. दुसरा कोणताही धर्म नव्हता. सर्व काही
नवीन होते. प्रत्येक गोष्ट सतोप्रधान असते. सोने सुद्धा किती अथाह असते. किती सहजपणे
खाणीमध्ये उपलब्ध होत असेल, ज्याच्या मग विटा, घरे इत्यादी बनत असतील. तिथे तर सर्व
काही सोन्याचे असते. सर्व खाणी नवीन असतील. इमिटेशन (नकली) तर बनवणार नाहीत कारण खरे
सोने तर भरपूर आहे. इथे खऱ्याचे नावच नाही. नकलीचा इतका प्रभाव आहे म्हणूनच म्हटले
जाते - झूठी माया, झूठी काया…’ संपत्तीसुद्धा खोटी आहे. हिरे-मोती अशा काही प्रकारचे
निघाले आहेत जे कळतसुद्धा नाही की खरे आहेत कि खोटे आहेत. दिखावा इतका असतो की पारखू
शकत नाही की खरे आहे कि खोटे. तिथे तर या नकली वस्तू इत्यादी असतच नाहीत. विनाश होतो
तेव्हा सर्व जमिनीमध्ये गाडले जाते. इतके मोठे-मोठे मौल्यवान दगड, हिरे इत्यादी
घरांना लावत असतील. ते सर्व कुठून आले असेल, कोण कटिंग करत असतील? भारतामध्ये देखील
कुशल लोक खूप आहेत, हुषार होत जातील. मग तिथे हे कौशल्य घेऊन येतील ना. मुकुट
इत्यादी फक्त हिऱ्यांचे थोडेच बनतील. ते तर एकदम उत्कृष्ट खरे हिरे असतात. पूर्वी
ही वीज, टेलिफोन, मोटार इत्यादी काहीच नव्हते. बाबांच्या (ब्रह्मा बाबांच्या)
काळामध्येच काय-काय निघाले आहे! हे सर्व निघून १०० वर्षे झाली आहेत, तिथे तर खूप
एक्सपर्ट असतात. आतापर्यंत शिकत राहतात. हुशार बनत जातात. हा देखील मुलांना
साक्षात्कार घडवला जातो. तिथे हेलिकॉप्टर्स सुद्धा संपूर्ण सुरक्षित असतात. मुले
देखील अतिशय सतोप्रधान चाणाक्ष बुद्धीची असतात. थोडा काळ जाऊ दे, तुम्हाला सर्व
साक्षात्कार होत रहातील. जसे आपल्या देशाच्या जवळपास पोचतो तशी झाडे दिसू लागतात
ना. आतून आनंद होत असतो, आता घर आले की आले! आता येऊन पोहोचलो आहोत. शेवटी तुम्हाला
देखील असे साक्षात्कार होत राहतील. मुले समजतात मोस्ट बिलवेड (अति प्रिय) बाबा आहेत.
ते आहेतच सुप्रीम आत्मा. त्यांची सर्व आठवणसुद्धा करतात. भक्तीमार्गामध्ये तुम्ही
देखील परमात्म्याची आठवण करत होता ना. परंतु ते छोटे आहेत की मोठे हे माहीत नव्हते.
गातात देखील - ‘चमकता है अजब सितारा भ्रकुटी के बीच में…’ म्हणजे नक्कीच बिंदू
प्रमाणे असेल ना. त्यांनाच म्हटले जाते सुप्रीम (सर्वोच्च) आत्मा अर्थात परमात्मा.
त्यांच्यामध्ये विशेषता तर सर्व आहेतच. ज्ञानाचे सागर आहेत, कोणते ज्ञान ऐकवतील. ते
तर जेव्हा ऐकवतील तेव्हाच तर समजेल ना. तुम्हीसुद्धा आधी जाणत होता का, फक्त भक्तीच
माहित होती. आता तर समजता वंडर (आश्चर्य) आहे, आत्म्याला सुद्धा या डोळ्यांनी बघू
शकत नाही आणि बाबांना सुद्धा विसरून जाता. ड्रामामधे पार्टच असा आहे ज्याला विश्वाचा
मालक बनवतात त्याचे नाव घालतात आणि बनवणाऱ्याचे नाव गायब करतात. श्रीकृष्णाला
त्रिलोकीनाथ, वैकुंठनाथ म्हटले आहे, अर्थ काहीच समजत नाहीत. फक्त मोठेपणा देतात.
भक्तीमार्गामध्ये अनेक गोष्टी बसून बनवल्या आहेत. म्हणतात भगवंता मध्ये इतकी शक्ती
आहे, ते हजार सूर्यांपेक्षा तेजस्वी आहेत, सर्वांना भस्म करू शकतात. अशा प्रकारच्या
गोष्टी बनवल्या आहेत. बाबा म्हणतात - ‘मी मुलांना जाळेन कसा! हे तर होऊ शकत नाही’.
बाबा मुलांना नष्ट करतील का? नाही. हा तर ड्रामामध्ये पार्ट आहे. जुनी दुनिया नष्ट
होणार आहे. जुन्या दुनियेच्या विनाशाकरिता या नैसर्गिक आपत्ती सर्व कामगार आहेत.
किती उत्कृष्ट कामगार आहेत. असे नाही की त्यांना बाबांचे डायरेक्शन मिळाले आहे की
विनाश करा. नाही, वादळे येतात, दुष्काळ पडतो. हे भगवान सांगतात का की, असे करा?
कधीच नाही. हा तर ड्रामामध्ये पार्ट आहे. बाबा सांगत नाहीत बॉम्ब बनवा. ही सर्व
रावणाची मते म्हणणार. हा पूर्व नियोजित ड्रामा आहे. रावणाचे राज्य आहे त्यामुळे
आसुरी बुद्धीचे बनतात. किती मृत्युमुखी पडतात. शेवटी सर्व काही जाळून टाकतील. हा
पूर्व नियोजित खेळ आहे, जो रिपीट होतो. बाकी असे नाही की शंकराने नेत्र उघडल्यामुळे
विनाश होतो, यांना ईश्वरीय आपत्ती सुद्धा म्हणत नाहीत. या नैसर्गिकच आहेत.
आता बाबा तुम्हा
मुलांना श्रीमत देत आहेत. कोणाला दुःख वगैरे देण्याची गोष्टच नाही. बाबा तर आहेतच
सुखाचा मार्ग दाखवणारे. ड्रामा प्लॅन अनुसार घर जुने होतच जाणार. बाबा देखील
म्हणतात ही सर्व दुनिया जुनी झाली आहे. ही नष्ट झाली पाहिजे. बघा कसे आपापसात भांडत
आहेत! आसुरी बुद्धी आहे ना. जेव्हा ईश्वरीय बुद्धी असते तेव्हा कोणतीही मारणे
इत्यादीची काही गोष्टच नसते. बाबा म्हणतात - ‘मी तर सर्वांचा पिता आहे. माझे
सर्वांवर प्रेम आहे’. बाबा इकडे बघतात आणि मग अनन्य मुलांकडेच नजर जाते, जी बाबांची
खूप प्रेमाने आठवण करतात. सेवा देखील करतात. इथे बसून बाबांची नजर सेवाभावी
मुलांकडेच जाते. कधी डेहराडून, कधी मेरठ, कधी दिल्ली… जी मुले माझी आठवण करतात
त्यांची मी देखील आठवण करतो. काही तर माझी आठवण सुद्धा करत नाहीत तरीदेखील मी
सर्वांची आठवण करतो कारण मला तर सर्वांना घेऊन जायचे आहे ना. हो, जे माझ्याकडून
सृष्टी चक्राचे नॉलेज घेतात ते मग नंबरवार उच्च पद प्राप्त करतील. या बेहदच्या
गोष्टी आहेत. ते टीचर इत्यादी असतात हदचे. हे आहेत बेहदचे. तर मुलांना आतून किती
आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात, सर्वांचा पार्ट एकसारखा असू शकत नाही, यांचा (ब्रह्मा
बाबांचा) तर पार्ट होता. परंतु फॉलो फादर करणारे कोटींमधून कोणी निघाले. म्हणतात -
बाबा, मी ७ दिवसांचा मुलगा आहे, एक दिवसाचा मुलगा आहे. तर मांजरीची पिल्ले झाली ना.
तर बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगत राहतात. नदी सुद्धा बरोबर पार करून आले होते.
बाबांच्या आगमनानेच ज्ञानाची सुरुवात झाली आहे. त्यांची किती महिमा आहे. ते गीतेचे
अध्याय तर तुम्ही जन्म-जन्मांतर किती वेळा वाचले असतील. फरक बघा किती आहे. कुठे
श्रीकृष्ण भगवान उवाच, कुठे शिव परमात्मा उवाच. रात्रं-दिवसाचा फरक आहे. आता तुमच्या
बुद्धीमध्ये आहे आपण सचखंडामध्ये होतो, सुखसुद्धा खूप बघितले. ३/४ सुख बघता. बाबांनी
ड्रामा सुखासाठी बनवला आहे, दुःखासाठी नाही. हे दुःख तर तुम्हाला नंतर मिळाले आहे.
युद्ध तर इतक्या लवकर सुरू होणार नाही. तुम्हाला खूप सुख मिळते. अर्धे-अर्धे असेल
तरी देखील इतकी मजा राहणार नाही. साडेतीन हजार वर्षे तर कोणते युद्धच नाही. रोगराई
इत्यादी काहीच नाही. इथे तर बघा आजारामागून आजार चालूच असतात. सतयुगामध्ये थोडेच असे
किडे वगैरे असतील जे धान्य खातील, म्हणून त्याचे नांवच आहे स्वर्ग. तर जगाचा नकाशा
सुद्धा तुम्ही दाखवला पाहिजे तर समजू शकतील. खरा भारत असा होता, दुसरा कोणताही धर्म
नव्हता. धर्म स्थापन करणारे नंतर नंबरवार येतात. आता तुम्हा मुलांना जगाच्या
इतिहास-भूगोला विषयी माहीत आहे. तुमच्या शिवाय बाकी सर्व तर म्हणतील नेती-नेती,
आम्ही बाबांना जाणत नाही. म्हणतात - त्यांचे काही नाव, रूप, देश, काळ अस्तित्वात
नाही. नाव-रूप नसेल तर कोणता देश सुद्धा असू शकत नाही. काहीही समजत नाहीत. आता बाबा
आपला यथार्थ परिचय तुम्हा मुलांना देतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव अपार
आनंदात राहण्यासाठी बेहदचे बाबा ज्या बेहदच्या गोष्टी सांगतात, त्यांचे चिंतन करायचे
आहे आणि बाबांना फॉलो करत चालायचे आहे.
२) सदैव निरोगी
राहण्यासाठी ‘पवित्रता’ धारण करायची आहे. पवित्रतेच्या आधारावर बाबांकडून हेल्थ,
वेल्थ आणि हॅपिनेस (आरोग्य, संपत्ती आणि आनंद) यांचा वारसा घ्यायचा आहे.
वरदान:-
सर्व
प्राप्तींना स्मृतीमध्ये इमर्ज ठेवून सदैव संपन्न राहणारी संतुष्ट आत्मा भव
संगमयुगावर
बापदादांकडून ज्या काही प्राप्ती झाल्या आहेत त्यांची स्मृती इमर्ज रूपात रहावी. तर
प्राप्तींचा आनंद कधी खाली आणून डळमळीत करणार नाही. सदैव अचल (खंबीर) रहाल. संपन्नता
खंबीर बनवते, डळमळण्यापासून सोडवते. जे सर्व प्राप्तींनी संपन्न आहेत, ते सदैव
संतुष्ट राहतात. संतुष्टता सर्वात श्रेष्ठ खजिना आहे. ज्याच्याकडे संतुष्टता आहे
त्याच्याकडे सर्व काही आहे. ते हेच गाणे गात राहतात की, ‘पाना था वो पा लिया’.
बोधवाक्य:-
प्रेमाच्या
झोपाळ्यावर बसा तर मेहनती पासून आपोआपच सुटका होईल.