21-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला करंट देण्यासाठी, तुम्ही देही-अभिमानी असाल,
बुद्धियोग एका बाबांसोबत असेल तर करंट मिळत राहील”
प्रश्न:-
सर्वात मोठा
आसुरी स्वभाव कोणता आहे, जो तुम्हा मुलांमध्ये असता कामा नये?
उत्तर:-
अशांती पसरविणे, हा सर्वात मोठा आसुरी स्वभाव. अशांती पसरवणाऱ्यांना माणसे कंटाळतात.
ते जिथे जातील तिथे अशांती पसरवतील म्हणून भगवंताकडे सर्वजण शांतीचा वर मागतात.
गीत:-
यह कहानी है
दीवे और तुफान की…
ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांनी (खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांनी) गाण्याची ओळ ऐकली.
हे गाणे तर भक्तिमार्गाचे आहे मग त्याला ज्ञानामध्ये ट्रान्सफर केले जाते इतर कोणीही
असे ट्रान्सफर करू शकत नाही. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजू
शकतात, दिवा काय आहे, तुफान काय आहे! मुले जाणतात आत्म्याची ज्योत विझलेली आहे. आता
बाबा आले आहेत ज्योत जागृत करण्यासाठी. कोणी मरतात तरी देखील दिवा पेटवतात. त्याची
खूप काळजी घेतात. समजतात दिवा जर विझला तर आत्म्याला अंधारातून जावे लागेल म्हणून
दिवा पेटवतात. आता सतयुगामध्ये तर या गोष्टी असतही नाहीत. तिथे तर प्रकाशामध्ये
असाल. भूक इत्यादीचा तर प्रश्नच नाही, तिथे तर खूप संपत्ती मिळते. इथे आहे घोर
अंध:कार. छी-छी दुनिया आहे ना. सर्व आत्म्यांची ज्योत विझलेली आहे. सर्वात जास्त
ज्योत तुमची विझलेली आहे. खास तुमच्यासाठीच बाबा येतात. तुमची ज्योत विझली आहे, आता
करंट कुठून मिळणार? मुले जाणतात करंट तर बाबांकडूनच मिळणार. करंट जास्त असतो तेव्हा
बल्बमध्ये प्रखर प्रकाश होतो. तर आता तुम्ही करंट घेत आहात, मोठ्या मशीन द्वारे. पहा
बॉम्बे सारख्या शहरामध्ये किती प्रचंड प्रमाणात लोक राहतात, किती जास्त करंट पाहिजे.
जरूर इतकी मोठी मशीन असेल. ही आहे बेहदची गोष्ट. साऱ्या दुनियेतील आत्म्यांची ज्योत
विझलेली आहे. त्यांना करंट द्यायचा आहे. मुख्य गोष्ट बाबा समजावून सांगतात,
बुद्धीयोग बाबांसोबत लावा. देही-अभिमानी बना. किती मोठा पिता आहे, साऱ्या दुनियेतील
पतित मनुष्यांना पावन करणारे सुप्रीम बाबा आले आहेत सर्वांची ज्योती जागृत
करण्यासाठी. साऱ्या दुनियेतील मनुष्यमात्रांची ज्योत जागृत करतात. पिता कोण आहेत,
कशी ज्योत जागृत करतात? हे काही कोणी जाणत नाहीत. त्यांना ज्योती स्वरूप देखील
म्हणतात मग सर्वव्यापी देखील म्हणतात. ज्योती स्वरूपाला बोलावतात कारण ज्योत विझली
आहे. साक्षात्कार देखील होतो, अखंड ज्योतीचा. दाखवतात अर्जुनाने म्हटले मी हे तेज
सहन करू शकत नाही. खूप करंट आहे. तर आता या गोष्टींना तुम्ही मुले समजता. सर्वांना
समजावून देखील हेच सांगायचे आहे की, तुम्ही आत्मा आहात. आत्मे वरून इथे येतात.
सुरुवातीला आत्मा पवित्र आहे, तिच्यामध्ये करंट आहे. सतोप्रधान आहे. गोल्डन एजमध्ये
पवित्र आत्मे आहेत मग त्यांना अपवित्र देखील बनायचे आहे. जेव्हा अपवित्र बनतात
तेव्हा गॉड फादरला बोलावतात की येऊन लिब्रेट करा अर्थात दुःखातून सोडवा. लिबरेट करणे
आणि पावन बनविणे दोन्हीचा अर्थ वेग-वेगळा आहे. जरूर कोणाद्वारे पतित बनले आहेत
तेव्हाच म्हणतात - ‘बाबा या, येऊन लिबरेट देखील करा, पावन सुद्धा बनवा. इथून
शांतीधामला घेऊन चला. शांतीचा वर द्या. आता बाबांनी सांगितले आहे - इथे शांतीमध्ये
काही राहू शकत नाही. शांती तर आहेच शांतीधाममध्ये. सतयुगामध्ये एक धर्म, एक राज्य
आहे तर शांती असते. काहीच गडबड नाही. इथे मनुष्य त्रस्त होतात अशांतीमुळे. एकाच
घरामध्ये किती भांडणे होतात. समजा पती-पत्नीमध्ये भांडण असेल तर आई, वडील, मुले,
भाऊ-बहीण इत्यादी सर्व त्रस्त होतात. अशांतीवाला मनुष्य जिथे जाईल अशांतीच पसरवेल
कारण आसुरी स्वभाव आहे ना. आता तुम्ही जाणता सतयुग आहे सुखधाम. तिथे सुख आणि शांती
दोन्ही आहे. आणि तिथे (परमधामामध्ये) तर केवळ शांती आहे, त्याला म्हटले जाते स्वीट
सायलेन्स होम. मुक्तीधामवाल्यांना फक्त एवढेच समजावून सांगायचे आहे की तुम्हाला
मुक्ती पाहिजे ना तर बाबांची आठवण करा.
मुक्ती नंतर
जीवनमुक्ती जरूर आहे. पहिले जीवनमुक्त असतात मग जीवनबंधमध्ये येतात. अर्धे-अर्धे आहे
ना. सतोप्रधानापासून मग सतो, रजो, तमोमध्ये जरूर यायचे आहे. शेवटी जे अर्धा एक जन्म
घेऊन येतात, ते कसला सुख-दुःखाचा अनुभव करत असतील. तुम्ही तर सगळा अनुभव करता.
तुम्ही जाणता इतके जन्म आपण सुखामध्ये राहतो मग इतके जन्म दुःखामध्ये असतो.
अमके-अमके धर्म नवीन दुनियेमध्ये येऊ शकत नाहीत. त्यांचा पार्टच नंतर आहे, भले नवीन
खंड आहे, त्यांच्यासाठी जशी काही ती नवीन दुनिया आहे. जसे बौद्धी खंड, ख्रिश्चन खंड
नवीन झाला ना. त्यांना देखील सतो, रजो, तमो मधून जायचे आहे. झाडामध्ये देखील असेच
घडते ना. झाड हळू-हळू वाढत जाते. पहिली जी पाने येतात ती खालीच राहतात. पाहिले आहे
ना नवीन-नवीन पाने कशी येतात. छोटी-छोटी हिरवी पाने येत राहतात मग फुल येते, नवीन
झाड खूप छोटे आहे. नवीन बीया पेरल्या जातात, आणि जर त्यांचे नीट संगोपन केले नाही
तर सडून जातात. तुम्ही देखील व्यवस्थित संगोपन करत नाही तर सडून जातात. बाबा येऊन
मनुष्यापासून देवता बनवतात मग त्यामध्ये नंबरवार बनतात. राजधानी स्थापन होते ना.
अनेकजण फेल होतात.
मुलांची जशी अवस्था
आहे, तसे प्रेम बाबांकडून मिळते. बऱ्याच मुलांना बाहेरून देखील प्रेम करावे लागते.
काहीजण लिहितात - ‘बाबा, आम्ही फेल झालो’. पतित बनलो. आता त्यांना कोण हात लावणार!
ते बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकत नाहीत. पवित्र असणाऱ्यांनाच बाबा वारसा
देऊ शकतात. अगोदर प्रत्येकाला पूर्ण समाचार विचारून पोतामेल घेतात. जशी अवस्था तसे
प्रेम. बाहेरून भले प्रेम करतील, आतून जाणतात हा अगदीच बुद्धू आहे, सेवा करू शकत
नाही. विचार तर येतो ना. अज्ञान काळामध्ये मुलगा चांगली कमाई करणारा असतो तर वडील
देखील खूप प्रेमाने भेटतील. आणि कोणी कमाई करणारा नसेल तर वडिलांचे देखील इतके
प्रेम राहत नाही. तर इथे देखील असेच आहे. मुले बाहेर देखील सेवा करतात ना. भले
कोणत्याही धर्माचा असो, त्यांना समजावून सांगायचे आहे. बाबांना लिबरेटर म्हटले जाते
ना. लिबरेटर आणि गाईड कोण आहेत, त्यांचा परिचय द्यायचा आहे. सुप्रीम गॉडफादर येतात,
सर्वांना लिब्रेट करतात. बाबा म्हणतात तुम्ही किती पतित बनला आहात. प्युरिटी नाहीये.
आता माझी आठवण करा. बाबा तर एव्हर प्युअर (सदा पावन) आहेत. बाकी सर्व पवित्र पासून
अपवित्र जरूर बनतात. पुनर्जन्म घेत-घेत उतरत येतात. यावेळी सर्व पतित आहेत म्हणून
बाबा सल्ला देतात - ‘मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा तर पावन बनाल. आता मृत्यू तर
समोर उभा आहे. जुन्या दुनियेचा आता अंत आहे. मायेचा किती थाट आहे म्हणून मनुष्य
समजतात हा तर स्वर्ग आहे. विमाने, वीज इत्यादी काय-काय आहे, हा सर्व आहे मायेचा भपका.
हे सर्व नष्ट होणार आहे. मग स्वर्गाची स्थापना होईल. ही लाईट इत्यादी सर्व
स्वर्गामध्ये तर असते ना. आता हे सर्व स्वर्गामध्ये कसे येणार. जरूर जाणकार पाहिजे
ना. तुमच्याकडे खूप चांगले-चांगले कारागीर लोक सुद्धा येतील. ते काही राजाई मध्ये
येणार नाहीत तरीही तुमच्या प्रजेमध्ये येतील. इंजिनियर इत्यादी शिकलेले
चांगले-चांगले कारागीर येतील. ही सर्व फॅशन बाहेर विदेशातून येत राहते. तर तुम्ही
बाहेरच्यांना देखील शिवबाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांची आठवण करा. तुम्हाला
देखील योगामध्ये राहण्याचा खूप पुरुषार्थ करायचा आहे, यामध्येच मायेची खूप वादळे
येतात. बाबा फक्त म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ही तर चांगली गोष्ट आहे
ना. क्राइस्ट देखील त्यांचीच रचना आहे, रचयिता सुप्रीम सोल तर एकच आहेत. बाकी सर्व
आहे रचना. वारसा रचयित्याकडून मिळतो. असे चांगले पॉईंट्स जे आहेत ते नोट केले
पाहिजेत.
बाबांचे मुख्य
कर्तव्य आहे सर्वांना दुःखातून मुक्त करणे. ते सुखधाम आणि शांतीधामचे गेट उघडतात.
त्यांना म्हणतात - ‘हे लिबरेटर, दुःखातून लिबरेट करून आम्हाला शांतीधाम-सुखधामला
घेऊन चला’. जेव्हा इथे सुखधाम आहे तर बाकी आत्मे शांतीधाममध्ये राहतात. हेवनचे गेट
बाबाच उघडतात. एक गेट उघडते नवीन दुनियेचे, दुसरे शांतीधामचे. आता जे आत्मे अपवित्र
झाले आहेत त्यांना बाबा श्रीमत देतात स्वतःला आत्मा समजा, माझी आठवण करा तर तुमची
पापे नष्ट होतील. आता जे-जे पुरुषार्थ करतील ते मग आपल्या धर्मामध्ये उच्च पद
प्राप्त करतील. पुरुषार्थ केला नाहीत तर कमी दर्जाचे पद मिळेल. चांगले-चांगले
पॉईंट्स नोट करा म्हणजे मग वेळेवर उपयोगाला येऊ शकतात. बोला, शिवबाबांचे ऑक्युपेशन
(जीवन-चरित्र) आम्ही सांगतो, तर मग मनुष्य म्हणतील हे कोण आहेत जे गॉडफादर शिवाचे
ऑक्युपेशन सांगत आहेत. बोला, ‘तुम्ही आत्म्याच्या रूपामध्ये तर सर्व ब्रदर्स आहात.
मग प्रजापिता ब्रह्माद्वारे रचना रचतात तर भाऊ-बहीणी होतात. गॉडफादर ज्यांना
लिबरेटर, गाईड म्हणतात, त्यांचे ऑक्युपेशन आम्ही तुम्हाला सांगतो. जरूर आम्हाला गॉड
फादरने सांगितले आहे तेव्हाच तर तुम्हाला सांगत आहोत’. सन शोज फादर. हे देखील
समजावून सांगितले पाहिजे. आत्मा एक अतिशय छोटासा तारा आहे, या डोळ्यांनी त्याला पाहू
शकत नाही. दिव्य दृष्टीने साक्षात्कार होऊ शकतो. बिंदू आहे, पाहिल्याने थोडाच फायदा
होऊ शकतो. बाबा देखील असेच बिंदू आहेत, त्यांना सुप्रीम सोल म्हटले जाते. सोल एक
सारखेच आहेत परंतु ते सुप्रीम आहेत, नॉलेजफुल आहेत, ब्लिसफुल आहेत, लिबरेटर आणि
गाईड आहेत. त्यांची खूप महिमा करावी लागते. जरूर बाबा येतील तेव्हाच तर सोबत घेऊन
जातील ना. येऊन नॉलेज देतील. बाबाच सांगतात - आत्मा इतकी छोटी आहे, मी देखील तेवढाच
आहे. नॉलेज देखील जरूर कोणत्या शरीरामध्ये प्रवेश करून देतील. आत्म्याच्या बाजूला
येऊन बसेन. माझ्यामध्ये पॉवर आहे, कर्मेंद्रिये मिळाली तर मी धनी झालो. या
कर्मेंद्रियांद्वारे बसून समजावून सांगतो, यांना ॲडम देखील म्हटले जाते. ॲडम आहे
सर्वात पहिला मनुष्य. मनुष्यांची वंशावळ आहे ना. हे माता-पिता देखील बनतात,
यांच्याद्वारे मग रचना होते, आहेत जुने परंतु ॲडॉप्ट केले आहे, नाही तर ब्रह्मा
कुठून आला. ब्रह्माच्या पित्याचे नाव कोणी सांगावे. ब्रह्मा, विष्णू, शंकर ही कोणाची
रचना तर असेल ना! रचयिता तर एकच आहेत, बाबांनी तर यांना ॲडॉप्ट केले आहे, हे कोणी
लहान मुले बसून ऐकवतील तर म्हणतील हे तर खूप चांगले नॉलेज आहे.
ज्या मुलांना चांगली
धारणा होते त्यांना खूप खुशी राहील, कधी जांभई येणार नाही. कोणी समजणारा नसेल तर
जांभई देत राहील. इथे तर तुम्हाला कधी जांभई येता कामा नये. कमाईच्या वेळी कधी
जांभई येत नाही. गिऱ्हाईक नसेल, धंदा थंड असेल तर जांभई येत राहील. इथे देखील धारणा
होत नाही. कोणी तर अजिबातच समजत नाहीत कारण देह-अभिमान आहे. देही-अभिमानी होऊन बसू
शकत नाहीत. काही ना काही बाहेरच्या गोष्टी आठवतील. पॉईंट्स इत्यादी देखील नोट करू
शकणार नाहीत. शुरुड-बुद्धीवाले (तीक्ष्ण-बुद्धीवाले) लगेच नोट करतील - हा पॉईंट खूप
चांगला आहे. स्टूडंटचे वर्तन देखील शिक्षकाला दिसून येते ना. हुशार टीचरची नजर
सगळीकडे फिरत असते तेव्हाच तर अभ्यासाचे सर्टिफिकेट देतात. वर्तणुकीचा दाखला तयार
करतात. किती गैरहजर राहिला, ते देखील काढतात. इथे तर भले प्रेझेंट असतात परंतु समजत
काहीच नाहीत, धारणा होत नाही. कोणी म्हणतात बुद्धी डल आहे, धारणा होत नाही, बाबा
काय करतील! हा तर तुमच्या कर्मांचा हिशोब आहे. बाबा तर एकच पुरुषार्थ करवून घेतात.
तुमच्या नशिबात नाही तर काय करणार. स्कूलमध्ये देखील कोणी पास, कोणी नापास होतात.
हे आहे बेहदचे शिक्षण जे बेहदचे बाबाच शिकवतात. इतर धर्माचे गीतेमधील गोष्टी समजणार
नाहीत. राष्ट्र पाहून समजावून सांगावे लागते. सर्व प्रथम उच्च ते उच्च बाबांचा
परिचय द्यावा लागतो. ते कसे लिबरेटर, गाईड आहेत! हेवनमध्ये हे विकार असत नाहीत.
यावेळी याला म्हटले जाते सैतानी राज्य. जुनी दुनिया आहे ना, याला गोल्डन एजड म्हणता
येणार नाही. नवीन दुनिया होती, आता जुनी झाली आहे. मुलांमध्ये, ज्यांना सेवेची आवड
आहे तर पॉईंट्स नोट केले पाहिजेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
शिक्षणामध्ये खूप-खूप कमाई आहे म्हणून कमाई खुशी-खुशीने करायची आहे. अभ्यासाच्या
वेळी कधीही जांभई इत्यादी येऊ नये, बुद्धियोग इकडे-तिकडे भटकू नये. पॉईंट्स नोट
करून धारणा करत रहा.
२) पवित्र बनून
बाबांच्या हृदयातील प्रेम प्राप्त करणारे अधिकारी बनायचे आहे. सेवेमध्ये हुशार
बनायचे आहे, चांगली कमाई करायची आहे आणि करवून घ्यायची आहे.
वरदान:-
मरजीवा
जन्माच्या स्मृती द्वारे सर्व कर्मबंधनांना समाप्त करणारे कर्मयोगी भव
हा मरजीवा दिव्य जन्म
कर्म-बंधनवाला जन्म नाही, हा कर्मयोगी जन्म आहे. या अलौकिक दिव्य जन्मामध्ये
ब्राह्मण आत्मा स्वतंत्र आहे ना की परतंत्र. हा देह लोनमध्ये मिळालेला आहे, साऱ्या
विश्वाच्या सेवेसाठी जुन्या शरीरांमध्ये बाबा शक्ती भरून चालवत आहेत, जबाबदारी
बाबांची आहे, ना की तुमची. बाबांनी डायरेक्शन दिले आहे की, कर्म करा, तुम्ही
स्वतंत्र आहात. चालविणारा चालवत आहे. या विशेष धारणे द्वारे कर्म बंधनांना समाप्त
करून कर्मयोगी बना.
बोधवाक्य:-
काळाच्या
समाप्तीचे फाउंडेशन आहे - बेहदची वैराग्य वृत्ती.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
जितके-जितके
आठवणीमध्ये रहाल तितका अनुभव कराल की, मी एकटा नाही परंतु बाप-दादा नेहमी सोबत आहेत.
कोणतीही समस्या समोर आली तर हीच स्मृती रहावी की मी कंबाइंड आहे, तर घाबरणार नाही.
कंबाइंड रुपाच्या स्मृतीमुळे कोणतेही कठीण कार्य सोपे होईल. आपले सर्व ओझे बाबांवर
सोपवून स्वतः हलके व्हा तर नेहमी स्वतःला खुशनसीब अनुभव कराल आणि फरिश्त्यासारखे
नाचत रहाल.