22-12-24 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
17.03.2003 ओम
शान्ति
मधुबन
“सदैव आपल्या
स्वमानामध्ये रहा, सन्मान द्या, सर्वांचे सहयोगी बना आणि समर्थ बनवा”
आज भाग्यविधाता
बापदादा चोहो बाजूच्या प्रत्येक मुलाच्या मस्तकावर भाग्याच्या तीन रेषा पहात आहेत.
एक परमात्म पालनेची भाग्यशाली रेषा, दुसरी सत्य शिक्षकाकडून मिळालेल्या श्रेष्ठ
शिकवणीची भाग्यशाली रेषा, तिसरी श्रीमताची चमकणारी रेषा. चोहो बाजूच्या मुलांच्या
मस्तकामध्ये तिन्ही रेषा खूप छान चमकत आहेत. तुम्ही देखील सर्व आपल्या तिन्ही
भाग्याच्या रेषा बघत आहात ना. जेव्हा भाग्य विधाता तुम्हा मुलांचे पिता आहेत तर
तुमच्याशिवाय श्रेष्ठ भाग्य आणखी कुणाचे असू शकते! बापदादा बघत आहेत विश्वामध्ये
करोडो आत्मे आहेत परंतु त्या करोडोंमधून ६ लाख परिवार… किती थोडे आहेत! कोटींमध्ये
कोणी झालात ना! तसे प्रत्येक मानव जीवनामध्ये या तीन गोष्टी पालना (संगोपन), शिक्षण,
आणि श्रेष्ठ मत, तिन्ही जरुरी आहेत. परंतु ही परमात्म पालना आणि देव आत्म्यांचे
किंवा मानव आत्म्यांचे मत, पालना, शिक्षण यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. तर इतके
श्रेष्ठ भाग्य जे संकल्पामध्ये सुद्धा नव्हते परंतु आता प्रत्येकाचे मन गाते - ‘पा
लिया’. मिळाले की मिळायचे आहे? काय म्हणाल? मिळाले ना! बाबा देखील अशा मुलांच्या
भाग्याला पाहून हर्षित होत आहेत. मुले म्हणतात - ‘वाह बाबा वाह!’ आणि बाबा म्हणतात
- ‘वाह मुलांनो वाह!’ बस्स, याच भाग्याला फक्त स्मृतीमध्येच ठेवायचे नाहीये परंतु
सदैव स्मृति स्वरूप रहायचे आहे. बरीच मुले विचार खूप चांगले करतात परंतु ‘विचार
स्वरूप’ बनायचे नाही, ‘स्मृती स्वरूप’ बनायचे आहे. स्मृती स्वरूप सो समर्थ स्वरूप
आहे. विचार स्वरूप हे काही समर्थ स्वरूप नाहीये.
बापदादा मुलांच्या
भिन्न-भिन्न लीला पाहून हसत असतात. काही-काही ‘विचार स्वरूप’ असतात, सदैव ‘स्मृती
स्वरूप’ राहत नाहीत. कधी विचार स्वरूप, कधी स्मृती स्वरूप. जे स्मृती स्वरूप राहतात
ते निरंतर नॅचरल स्वरूप असतात. जे विचार स्वरूप राहतात त्यांना मेहनत करावी लागते.
हे संगमयुग मेहनत करण्याचे युग नाहीये, सर्व प्राप्तींच्या अनुभवांचे युग आहे. ६३
जन्म मेहनत केलीत आता मेहनतीचे फळ प्राप्त करण्याचे युग अर्थात वेळ आहे.
बापदादा बघत होते की,
देह-भानाच्या स्मृतीमध्ये राहण्यासाठी कोणती मेहनत केलीत - ‘मी अमका आहे, मी तमका
आहे…’ अशी मेहनत केलीत का? नॅचरली झाले ना! बॉडी कॉन्शसचे नेचर बनले ना ! नेचर (स्वभाव)
इतके पक्के झाले जे आता देखील कधी-कधी बऱ्याच मुलांना आत्म-अभिमानी बनण्याच्या वेळी
देहभान आपल्याकडे आकर्षित करते. विचार करतात - ‘मी आत्मा आहे, मी आत्मा आहे’, परंतु
देहभानाची स्मृती इतकी नॅचरल झाली आहे ज्यामुळे इच्छा नसतानाही, विचारही न करता
वारंवार देहभानामध्ये येता. बापदादा म्हणतात - आता मरजीवा जन्मामध्ये आत्म-अभिमान
अर्थात देही-अभिमानी स्थिती देखील अशीच स्वाभाविक आणि नैसर्गिक असावी. मेहनत करावी
लागू नये - ‘मी आत्मा आहे, मी आत्मा आहे’. जसे कोणतेही बाळ जन्माला येते आणि जेव्हा
त्याला थोडी समज येते तर त्याला परिचय दिला जातो तू कोण आहेस, कोणाचा आहेस; असेच
जेव्हा ब्राह्मण जन्म घेतलात तेव्हा तुम्हा ब्राह्मण मुलांना जन्मताच कोणता परिचय
मिळाला? ‘तुम्ही कोण आहात?’ आत्म्याचा धडा पक्का करवून घेतला गेला ना! तर हा पहिला
परिचय नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) बनावा. स्वभाव नैसर्गिक आणि कायमचा राहतो, आठवण
करावी लागत नाही. अशी प्रत्येक ब्राह्मण मुलाची आता वेळेनुसार देही-अभिमानी स्टेज
नॅचरल व्हावी. बऱ्याच मुलांची आहे, विचार करावा लागत नाही, स्मृती स्वरूप आहेत. आता
निरंतर आणि नॅचरल स्मृती स्वरूप बनायचेच आहे. लास्ट शेवटचा पेपर सर्व ब्राह्मणांचा
हाच छोटासा आहे - “नष्टोमोहा स्मृती स्वरूप”.
तर या वर्षामध्ये काय
करणार? अनेक मुले विचारतात - या वर्षामध्ये कोणते विशेष लक्ष्य ठेवायचे आहे? तर
बापदादा म्हणतात - सदा देही-अभिमानी, स्मृती स्वरूप भव. जीवनमुक्ती तर प्राप्त
होणारच आहे परंतु जीवनमुक्त होण्यापूर्वी मेहनत मुक्त बना. ही स्थिती समयाला समीप
आणेल आणि विश्वातील तुमच्या सर्व भाऊ-बहिणींना दुःख-अशांती मधून मुक्त करेल. तुमची
ही स्थिती आत्म्यांकरिता मुक्तिधामचा दरवाजा उघडेल. तर आपल्या भाऊ-बहिणींची दया येत
नाही! चोहो बाजूला आत्मे किती आक्रोश करत आहेत तर तुमची मुक्ती सर्वांना मुक्ती
देईल. हे चेक करा - नॅचरल स्मृती सो समर्थ स्वरूप कितपत बनले आहात? समर्थ स्वरूप
बनणेच व्यर्थला सहज समाप्त करेल. वारंवार मेहनत करावी लागणार नाही.
आता या वर्षी बापदादा
मुलांवरील प्रेमापोटी कोणत्याही मुलाला कोणत्याही समस्येमध्ये मेहनत करताना पाहू
इच्छित नाहीत. समस्या समाप्त आणि समाधान समर्थ स्वरूप. काय असे होऊ शकते का? बोला
दादी, होऊ शकते? टीचर्स बोला, होऊ शकते? पांडव, होऊ शकते? नंतर कारणे सांगू नका,
‘असे होते ना, असे झाले ना! असे झाले नसते तर नसते झाले!’ बापदादांनी खूप मजेशीर
खेळ पाहिले आहेत. काहीही होऊ दे, हिमालयापेक्षाही मोठे, शंभर पट मोठे समस्येचे
स्वरूप असेल, मग तनाद्वारे असेल, किंवा मनाद्वारे असेल, किंवा व्यक्तींद्वारे असेल,
किंवा प्रकृती द्वारे समस्या, परंतु पर-स्थिती तुमच्या स्व-स्थिती समोर काहीच नाही
आहे आणि स्व-स्थितीचे साधन आहे - स्वमान. नॅचरल रूपामध्ये स्वमान असावा. आठवावा लागू
नये, वारंवार मेहनत करावी लागू नये की, नाही-नाही, ‘मी स्वदर्शन चक्रधारी आहे’, ‘मी
नुरे रत्न आहे’, ‘मी दिलतख्तनशीन आहे…’ आहेच. दुसरे कोणी होणार आहेत का! कल्पापूर्वी
कोण बनले होते? दुसरे कोणी बनले होते की तुम्हीच बनला होता? तुम्हीच होता, तुम्हीच
आहात, प्रत्येक कल्पात तुम्हीच बनणार. हे निश्चित आहे. बापदादा सर्व चेहरे पाहत
आहेत हे तेच कल्पापूर्वीचे आहेत. या कल्पातील आहात कि कित्येक कल्पातील आहात? अनेक
कल्पातील आहात ना! आहात? हात वर करा जे कित्येक कल्पातील आहेत? मग तर निश्चित आहे
ना, तुम्हाला तर पास चे सर्टिफिकेट मिळाले आहे ना कि घ्यायचे आहे? मिळाले आहे ना?
मिळाले आहे कि घ्यायचे आहे? कल्पापूर्वी मिळाले आहे, आता का नाही मिळणार. तर असेच
स्मृती स्वरूप बना की, सर्टिफिकेट मिळालेले आहे. भले मग पास विद ऑनरचे असो, किंवा
उत्तीर्ण चे असो, हा फरक तर असणारच, परंतु आम्हीच आहोत. पक्के आहे ना! कि ट्रेन
मधून जाता-जाता विसरून जाल, प्लेनमध्ये गेल्यावर उडून जाईल? नाही.
जसे पहा यावर्षी
संकल्प दृढ केला की, शिवरात्री चोहो बाजूला उमंग-उत्साहाने साजरी करायची आहे. तर
साजरी केलीत ना! दृढ संकल्पाने जो विचार केला तो पूर्ण झाला ना! तर ही कोणत्या
गोष्टीची कमाल आहे? ‘एकता’ आणि ‘दृढता’. विचार केला होता ६७ प्रोग्राम करण्याचा
परंतु बापदादांनी पाहिले की कित्येक मुलांनी त्याहीपेक्षा जास्त प्रोग्राम केले
आहेत. ही आहे ‘समर्थ स्वरूपा’ची निशाणी, उमंग-उत्साहाचे प्रत्यक्ष प्रमाण. सहजच चोहो
बाजूला प्रोग्राम केलेत ना! असेच सर्वांनी मिळून एकमेकांची हिंमत वाढवून हा संकल्प
करा - ‘आता समयाला समीप आणायचेच आहे. आत्म्यांना मुक्ती द्यायची आहे’. परंतु हे
तेव्हा होईल जेव्हा तुम्ही तुमच्या विचाराला स्मृती स्वरूपामध्ये आणाल.
बापदादांनी ऐकले की,
फॉरेनवाल्यांचे देखील विशेष स्नेहसंमेलन किंवा मिटिंग आहे आणि भारतवाल्यांची सुद्धा
मिटिंग आहे तर मिटिंगमध्ये फक्त सेवेचे प्लॅन बनवायचे नाहीत, बनवा परंतु बॅलन्सवाले
प्लॅन बनवा. असे एकमेकांचे सहयोगी बना ज्यामुळे सर्व मास्टर सर्वशक्तिमान बनून पुढे
उडत जातील. दाता बनून सहयोग द्या. गोष्टी पाहू नका, सहयोगी बना. स्वमानामध्ये रहा
आणि सन्मान देऊन सहयोगी बना कारण कोणत्याही आत्म्याला जर तुम्ही मनापासून सन्मान
देता, तर हे खूप-खूप मोठे पुण्य आहे कारण कमजोर आत्म्याला उमंग-उत्साहामध्ये आणले
तर किती मोठे पुण्य आहे! आधीच पडलेल्याला अजून खाली पाडू नका, जवळ घ्यायचे आहे
म्हणजे बाह्यरूपात जवळ घ्यायचे नाहीये, जवळ घ्यायचे अर्थात बाप समान बनविणे. सहयोग
देणे.
तर विचारलेत ना की
यावर्षी काय-काय करायचे आहे? बस्स, सन्मान देणे आणि स्वमानामध्ये राहणे. समर्थ बनून
समर्थ बनविणे. व्यर्थ गोष्टींमध्ये जायचे नाही. कमजोर आत्मा जी आहेच कमजोर, तिच्या
कमजोरीला बघत रहाल तर मग सहयोगी कसे बनाल! सहयोग द्या तर आशीर्वाद मिळतील. सर्वात
सोपा पुरुषार्थ आहे, आणखी काहीच करू शकत नसाल तर सर्वात सोपा पुरुषार्थ आहे -
आशीर्वाद द्या, आशीर्वाद घ्या. सन्मान द्या आणि महिमा योग्य बना. सन्मान देणारेच
सर्वांद्वारे माननीय बनतात. आणि जितके आता माननीय बनाल, तितकेच राज्य अधिकारी आणि
पूज्य आत्मा बनाल. देत जा घ्यायचे नाही, ‘घ्या’ आणि ‘द्या’ हे तर बिझनेसवाल्यांचे
काम आहे. तुम्ही तर दात्याची मुले आहात. बाकी बापदादा चोहो बाजूच्या मुलांची सेवा
पाहून खुश आहेत, सर्वांनी चांगली सेवा केली आहे. परंतु आता पुढे जायचे आहे ना! वाणी
द्वारे सर्वांनी चांगली सेवा केली, साधनांद्वारे सुद्धा सेवेचा रिझल्ट चांगला मिळवला.
अनेक आत्म्यांची तक्रार देखील समाप्त केली. त्याचसोबत तीव्रगतीचा वेग पाहून
बापदादांची हीच इच्छा आहे की, फक्त थोड्याशाच आत्म्यांची सेवा करायची नाही परंतु
विश्वातील सर्व आत्म्यांचे मुक्तिदाता निमित्त तुम्ही आहात कारण बाबांचे साथीदार
आहात, तर समयाच्या गतीनुसार आता एकाच वेळी तिन्ही सेवा एकत्र करायच्या आहेत:- एक -
वाणी, दुसरी - स्वतःची शक्तिशाली स्थिती आणि तिसरी - श्रेष्ठ रुहानी व्हायब्रेशन्स
(आत्मिक प्रकंपने); जिथे कुठे सेवा कराल तिथे असे रुहानी व्हायब्रेशन पसरवा
जेणेकरून व्हायब्रेशनच्या प्रभावाने आपोआपच आकर्षित होत राहतील. पहा, आता लास्ट
जन्मामध्ये देखील तुम्हा सर्वांची जड चित्रे (मुर्त्या) कशी सेवा करत आहेत? कि
वाणीने बोलतात? व्हायब्रेशन असे असते ज्यामुळे भक्तांना त्यांच्या भावनेचे फळ सहजच
मिळते. असे शक्तिशाली व्हायब्रेशन असावे, व्हायब्रेशनमध्ये सर्व शक्तींची किरणे
पसरावीत, वायुमंडळ बदलून जावे. व्हायब्रेशन ही अशी गोष्ट आहे जी मनावर छाप पाडते.
तुम्हा सर्वांना अनुभव आहे की, एखाद्या आत्म्याप्रती जर काही चांगले अथवा वाईट
व्हायब्रेशन तुमच्या मनामध्ये घर करून राहते तर ते किती काळ राहते? खूप काळापर्यंत
राहते ना! काढून टाकावे म्हटले तरी निघत नाही, कोणाविषयी वाईट व्हायब्रेशन डोक्यात
बसले तर ते इतक्या सहजासहजी डोक्यातून जाते का? तर तुमचे सर्व शक्तींच्या किरणांचे
व्हायब्रेशन, छाप पाडण्याचे काम करेल. एकवेळ वाणी विसरली जाऊ शकते, परंतु
व्हायब्रेशनची छाप सहजासहजी जात नाही. अनुभव आहे ना! आहे ना अनुभव?
या गुजरातने, बॉम्बेने
जो उमंग-उत्साह दाखवला, त्याला देखील बापदादा पद्म-पदम पटीने मुबारक देत आहेत.
कशाकरिता? विशेषता कोणती होती? का मुबारक देत आहेत? प्रोग्राम तर मोठ-मोठे करत राहता
परंतु खास मुबारक का देत आहेत? कारण दोन्ही बाजूची विशेषता होती - एकता आणि दृढतेची.
जिथे एकता आणि दृढता आहे तिथे एका वर्षाऐवजी एक महिना वर्षा समान आहे. ऐकले, गुजरात
आणि बॉम्बेने. अच्छा.
आता सेकंदामध्ये
ज्ञान सूर्य स्थितीमध्ये स्थित होऊन चोहो बाजूच्या भयभीत, हवालदिल असणाऱ्या
आत्म्यांवर, सर्व शक्तींची किरणे पसरवा. खूप घाबरलेले आहेत. शक्ती द्या.
व्हायब्रेशन पसरवा. अच्छा. (बापदादांनी ड्रिल करवून घेतली)
चोहो बाजूच्या
मुलांच्या भिन्न-भिन्न प्रेमपूर्वक आठवणी आणि समाचारची पत्रे आणि ई-मेल बाबांपाशी
पोहोचले. प्रत्येकजण म्हणतो - ‘माझी सुद्धा आठवण द्या, माझी सुद्धा आठवण द्या’.
बापदादा म्हणतात - सर्व लाडक्या मुलांची आठवण बापदादांपाशी पोहोचली आहे. दूर असून
देखील बाप-दादांचे दिलतख्तनशीन आहेत. तर तुम्हा सर्वांना ज्यांनीपण म्हटले आहे ना -
‘आठवण द्या, आठवण द्या’. तर बाबांपाशी पोहोचली. हेच मुलांचे प्रेम आणि बाबांचे
प्रेम मुलांना उडवत आहे. अच्छा.
चोहो बाजूच्या अति
श्रेष्ठ भाग्यवान, कोटीमध्ये कोणी विशेष आत्म्यांना सदैव स्वमानामध्ये राहणाऱ्या,
सन्मान देणाऱ्या, सेवाभावी मुलांना, सदैव स्मृती स्वरूप सो समर्थ स्वरूप आत्म्यांना,
सदैव अचल अडोल स्थितीच्या आसनावर स्थित सर्वशक्ति स्वरूप मुलांना बापदादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
दादींसोबत संवाद:-
बापदादा तुमच्यावर
विशेष खुश आहेत. का खुश आहेत? विशेष या गोष्टीवर खुश आहेत की, जसे ब्रह्मा बाबा
सर्वांना ऑर्डर करत होते - ‘हे करायचे आहे, आता करायचे आहे’, तसे तुम्ही देखील
ब्रह्मा बाबांना फॉलो केले. (दादी म्हणाल्या - तुम्ही देखील माझ्या सोबत आहात) ते
तर आहेच, निमित्त तर तू बनली आहेस ना. आणि असा दृढ संकल्प केला ज्यामुळे चोहो बाजूला
सफलता मिळत आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये खूप गुप्त रुहानी ताकद भरलेली आहे. तब्येत
ठीक आहे, रुहानी शक्ती इतकी भरलेली आहे त्यापुढे तब्येत काहीच नाही. आश्चर्य आहे
ना!
दादींचे भेटणे पाहून
सर्वांच्या मनात येते आम्ही सुद्धा दादी असतो तर भेटलो असतो ना. तुम्ही सुद्धा दादी
बनणार. आता बापदादांनी मनामध्ये प्लॅन बनवला आहे, अजून दिलेला नाहीये. तर जी सेवेचे,
ब्रह्मा बाबांच्या साकार समयी सेवेमध्ये आदि रत्न निघाली आहेत, त्यांचे संघटन पक्के
करायचे आहे. (कधी करणार) जेव्हा तुम्ही कराल. ही ड्युटी तुमची (दादी जानकीची) आहे.
तुमच्या मनाचा संकल्प देखील आहे ना? कारण जसे तुम्हा दादींचे एकता आणि दृढतेचे
संघटन पक्के आहे, तसे आदि सेवेच्या रत्नांचे संघटन पक्के व्हावे, याची खूप-खूप
आवश्यकता आहे कारण सेवा तर वाढणारच आहे. तर संघटनची शक्ती जे पाहिजे ते करू शकते.
संघटनच्या निशाणीचे यादगार (प्रतीक) आहे - पाच पांडव. पाच आहेत परंतु ती संघटनेची
निशाणी आहे. अच्छा - आता जे साकार ब्रह्मा बाबा असताना सेवेसाठी सेंटरवर राहिले
आहेत, सेवेला लागले आहेत, त्यांनी उभे रहा. भाऊ सुद्धा आहेत, पांडवांशिवाय गती
थोडीच आहे. इथे तर थोडे आहेत परंतु अजूनही आहेत. संघटनला एकत्र करण्याची जबाबदारी
यांची (दादी जानकीची) आहे, ही (दादी) तर बॅकबोन आहे. खूप चांगली-चांगली रत्ने आहेत.
अच्छा. सर्व ठीक आहेत. काहीही करत असाल परंतु तुमच्या संघटनची महानता आहे. किल्ला
मजबूत आहे. अच्छा.
वरदान:-
स्वमानाच्या
सीटवर सेट होऊन प्रत्येक परिस्थितीला पार करणारे सदैव विजयी भव
सदैव आपल्या या
स्वमानाच्या सीटवर स्थित रहा की, ‘मी विजयी रत्न आहे’, ‘मास्टर सर्वशक्तिमान आहे’ -
तर जशी सीट असते तशी लक्षणे येतात. कोणतीही परिस्थिती समोर आली की सेकंदामध्ये
आपल्या या सीटवर सेट व्हा. सीटवर असणाऱ्याचीच ऑर्डर मानली जाते. सीटवर रहा तर विजयी
बनाल. संगमयुग आहेच सदैव विजयी बनण्याचे युग, हे युगाला वरदान आहे, तर वरदानी बनून
विजयी बना.
सुविचार:-
सर्व आसक्तींवर विजय
प्राप्त करणारी शिवशक्ती पांडव सेना आहे.