23-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता नाटक पूर्ण झाले आहे, परत घरी जायचे आहे, कलियुगानंतर पुन्हा सतयुग रिपीट होईल, हे रहस्य सर्वांना समजावून सांगा”

प्रश्न:-
आत्मा पार्ट बजावता-बजावता थकून गेली आहे, थकण्याचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर:-
खूप भक्ती केली, अनेक मंदिरे बनवली, धन खर्च केले, धक्के खात-खात सतोप्रधान आत्मा तमोप्रधान बनली. तमोप्रधान झाल्यामुळेच दुःखी झाली. जेव्हा एखाद्या गोष्टीमुळे कोणी त्रस्त होतो तेव्हा थकवा येतो. आता बाबा आले आहेत सर्व थकवा दूर करण्यासाठी.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून मुलांना समजावून सांगतात, त्यांचे नाव काय आहे? शिव. इथे जे बसले आहेत तर मुलांना व्यवस्थित आठवण राहिली पाहिजे. या ड्रामामध्ये जो सर्वांचा पार्ट आहे, तो आता पूर्ण होत आहे. नाटक जेव्हा संपते तेव्हा सर्व ॲक्टर्स समजतात की आपला पार्ट आता पूर्ण झाला. आता घरी जायचे आहे. तुम्हा मुलांना देखील बाबांनी आता समज (बुद्धी) दिली आहे, ही बुद्धी अजून कोणामध्येच नाहीये. आता तुम्हाला बाबांनी हुशार बनवले आहे. मुलांनो, आता नाटक पूर्ण होत आहे, आता पुन्हा नव्याने चक्र सुरु होणार आहे. नव्या दुनियेमध्ये सतयुग होते. आता जुन्या दुनियेमध्ये हा कलियुगाचा अंत आहे. या गोष्टी तुम्हीच जाणता, ज्यांना बाबा मिळाले आहेत. नवीन जे येतात त्यांना देखील हे समजून सांगायचे आहे - आता नाटक पूर्ण होत आहे, कलियुगाच्या अंतानंतर पुन्हा सतयुग रिपीट होणार आहे. इतके सर्व जे आहेत त्यांना परत आपल्या घरी जायचे आहे. आता नाटक पूर्ण होत आहे, यावरून मनुष्य समजतात की प्रलय होतो. आता तुम्ही जाणता जुन्या दुनियेचा विनाश कसा होतो. भारत तर अविनाशी खंड आहे, बाबा देखील इथेच येतात. बाकीचे सर्व खंड नष्ट होतील. असे विचार आणखी कोणाच्या बुद्धीमध्ये येऊ शकत नाहीत. बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात, आता नाटक पूर्ण होत आहे, पुन्हा रिपीट करायचे आहे. आधी नाटकाचे नाव देखील तुमच्या बुद्धीमध्ये नव्हते. म्हणायचे म्हणून म्हणत होता, हे सृष्टी नाटक आहे, यामध्ये आपण ॲक्टर्स आहोत. आधी जेव्हा आपण म्हणत होतो तर शरीरासाठी समजत होतो. आता बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. आता आपल्याला परत घरी जायचे आहे, ते आहे स्वीट होम. त्या निराकारी दुनियेमध्ये आपण आत्मे राहतो. हे ज्ञान कोणत्याही मनुष्यमात्रामध्ये नाहीये. आता तुम्ही संगमावर आहात. जाणता आता आपल्याला परत जायचे आहे. जुनी दुनिया नष्ट होते तर भक्ती देखील नष्ट होते. सर्वप्रथम कोण येतात, कसे हे धर्म नंबरवार येतात, या गोष्टी काही शास्त्रांमध्ये नाही आहेत. हे बाबा या नवीन गोष्टी समजावून सांगतात. हे दुसरे कोणीही समजावून सांगू शकत नाही. बाबा देखील एकदाच येऊन समजावून सांगतात. ज्ञानसागर बाबा येतातच एकदा जेव्हा नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश करायचा असतो. बाबांच्या आठवणी सोबत हे चक्र देखील बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. आता नाटक पूर्ण होत आहे, आपण घरी जाणार. पार्ट बजावता-बजावता आपण थकलो आहोत. पैसे देखील खर्च केले, भक्ती करता-करता आपण सतोप्रधानापासून तमोप्रधान बनलो आहोत. दुनियाच जुनी झाली आहे. नाटक जुने म्हणणार का? नाही. नाटक तर कधी जुने होत नाही. नाटक तर नित्य नवीन आहे. हे चालतच राहते. बाकी दुनिया जुनी होते, आपण ॲक्टर्स तमोप्रधान दुःखी होतो, थकून जातो. सतयुगामध्ये थोडेच आपण असे थकणार. कोणत्याही गोष्टीने थकण्याचा किंवा त्रस्त होण्याचा प्रश्नच नाही. इथे तर अनेक प्रकारची तंगी (कमतरता) बघावी लागते. तुम्ही जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. नातलग इत्यादी काहीही आठवता कामा नये. एक बाबांचीच आठवण केली पाहिजे, ज्यामुळे विकर्म विनाश होतील, विकर्म विनाश होण्याचा आणखी कोणताही उपाय नाही. गीतेमध्ये देखील मनमनाभव शब्द आहे. परंतु कोणीही अर्थ समजू शकणार नाही. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा. तुम्ही विश्वाचे वारसदार अर्थात मालक होता. आता तुम्ही विश्वाचे वारसदार बनत आहात. तर किती आनंद झाला पाहिजे. आता तुम्ही कवडी पासून हिऱ्या समान बनत आहात. इथे तुम्ही आले आहात बाबांकडून वारसा घेण्याकरिता.

तुम्ही जाणता जेव्हा कला कमी होतात तेव्हा फुलांचा बगीचा कोमेजून जातो. आता तुम्ही बनता गार्डन ऑफ फ्लॉवर. सतयुग गार्डन आहे तर किती सुंदर आहे मग हळूहळू कला कमी होत जातात. दोन कला कमी झाल्या, गार्डन कोमेजून गेले. आता तर काट्यांचे जंगल झाले आहे. आता तुम्ही जाणता दुनियेला काहीच माहिती नाहीये. हे नॉलेज तुम्हाला मिळत आहे. हे आहे नवीन दुनियेसाठी नवीन नॉलेज. नवीन दुनिया स्थापन होत आहे. करणारे आहेत बाबा. सृष्टीचे रचयिता बाबा आहेत. आठवण देखील बाबांचीच करतात की येऊन स्वर्ग रचा. सुखधाम रचले तर जरूर दुःखधामाचा विनाश होणार ना. बाबा दररोज समजावून सांगतात, ते धारण करून मग इतरांना समजावून सांगायचे आहे. सर्वप्रथम तर मुख्य गोष्ट समजावून सांगायची आहे - आपले पिता कोण आहेत, ज्यांच्याकडून वारसा मिळवायचा आहे. भक्तीमार्गामध्ये देखील गॉड फादरची आठवण करतात की, आमचे दुःख हरण करून सुख द्या. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये देखील ही स्मृती राहिली पाहिजे. शाळेमध्ये स्टुडंट्सच्या बुद्धीमध्ये नॉलेज असते ना, ना की घरदार. स्टुडंट् लाईफमध्ये काम-धंद्याच्या गोष्टी असत नाहीत. अभ्यासाचीच आठवण असते. तर मग कर्म करत, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून, बाबा म्हणतात हा अभ्यास करा. असे म्हणत नाहीत की संन्याशांसारखे घरदार सोडा. हा आहेच राजयोग. हा प्रवृत्ती मार्ग आहे. संन्याशांना देखील तुम्ही म्हणू शकता की, तुमचा आहे हठयोग, तुम्ही घरदार सोडता. इथे ती गोष्ट नाहीये. ही दुनियाच कशी घाणेरडी आहे. कशी अवस्था झाली आहे! गरीब इत्यादी कसे राहतात. बघूनच घृणा येते. बाहेरून जे व्हिजिटर्स इत्यादी येतात त्यांना तर चांगली-चांगली ठिकाणे दाखवतात, गरीब इत्यादी कसे घाणी मध्ये राहतात, ते थोडेच दाखवतात. हा तर आहेच नरक परंतु त्यामध्ये देखील फरक तर खूप आहे ना. श्रीमंत लोक कुठे राहतात, गरीब कुठे राहतात, कर्मांचा हिशोब आहे ना. सतयुगामध्ये अशी घाण असू शकत नाही. तिथे देखील फरक तर असतो ना. कोणी सोन्याचे महाल बनवतील, कोणी चांदीचे, कोणी विटांचे. इथे तर किती खंड आहेत. एक युरोप खंडच किती मोठा आहे. तिथे तर फक्त आपणच असणार. एवढे जरी बुद्धीमध्ये राहिले तरी हर्षितमुख अवस्था होईल. स्टुडंट्सच्या बुद्धीमध्ये अभ्यासच लक्षात राहतो - बाबा आणि वारसा. हे तर समजावून सांगितले आहे आता थोडा वेळ बाकी आहे. ते (दुनियावाले) तर म्हणतात लाखो-हजारो वर्षे आहेत. इथे तर गोष्टच पाच हजार वर्षांची आहे. तुम्ही मुले समजू शकता आता आपल्या राजधानीची स्थापना होत आहे. बाकीची सारी दुनिया नष्ट होणार आहे. हे शिक्षण आहे ना. बुद्धीमध्ये हे लक्षात रहावे कि, आपण स्टुडन्ट आहोत, आपल्याला भगवान शिकवत आहेत; तरी देखील किती खुशी राहील. हे विसरायला का होते! माया खूप प्रबळ आहे, ती विसरायला भाग पाडते. स्कूलमध्ये सर्व स्टुडंट्स शिकत आहेत. सर्वजण जाणतात की आपल्याला भगवान शिकवत आहेत, तिथे (दुनियेमध्ये) तर अनेक प्रकारच्या विद्या शिकवल्या जातात. अनेक टीचर्स असतात. हे तर एकच टीचर आहेत, एकच विद्या आहे. बाकी नायब (सहाय्यक) टीचर्स तर जरूर पाहिजेत. स्कूल एक आहे, बाकी सर्व शाखा आहेत, शिकवणारे एक बाबा आहेत. बाबा येऊन सर्वांना सुख देतात. तुम्ही जाणता - अर्धाकल्प आपण सुखी राहणार. तर ही देखील खुशी राहिली पाहिजे, शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत. शिवबाबा रचना रचतातच स्वर्गाची. आपण स्वर्गाचा मालक बनण्यासाठी शिकत आहोत. आतून किती आनंद झाला पाहिजे. ते स्टुडंट्स देखील खातात-पितात सर्व काही घरातील काम इत्यादी करतात. हां, कोणी हॉस्टेलमध्ये राहतात जेणेकरून अभ्यासावर जास्त लक्ष राहील. नोकरी करण्यासाठी मुली बाहेर राहतात. कसली-कसली माणसे येतात. इथे तर तुम्ही किती सुरक्षित बसले आहात. कोणी आतमध्ये येऊ शकत नाही. इथे कोणाचाही संग नाही. पतितासोबत बोलण्याची गरजच नाही. तुम्हाला कोणाचेही तोंड बघण्याची सुद्धा गरज नाही. तरी देखील बाहेर राहणारे वेगाने पुढे जातात. काय आश्चर्य आहे, बाहेर राहणारे किती जणांना शिकवून, आप समान बनवून मग घेऊन येतात. बाबा समाचार विचारतात - कसल्या पेशंटला घेऊन आला आहात, कोणी खूप खराब पेशंट असेल तर त्यांना ७ दिवस भट्टीमध्ये ठेवले जाते. इथे कोणत्याही शुद्राला घेऊन यायचे नाही. हे मधुबन आहे जसे की तुम्हा ब्राह्मणांचे एक गाव. इथे बाबा तुम्हा मुलांना बसून समजावून सांगतात, विश्वाचा मालक बनवतात. कोणत्या शुद्राला घेऊन याल तर ते व्हायब्रेशन खराब करतील. तुम्हा मुलांचे वर्तन देखील अतिशय रॉयल पाहिजे.

पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होत राहतील - तिथे काय-काय असणार. प्राणी देखील किती सुंदर-सुंदर असतील. सर्व चीज-वस्तू उत्तम असतील. सतयुगातील कोणतीही वस्तू इथे असू शकत नाही. तिथे मग इथल्या वस्तू असू शकत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आपण स्वर्गासाठी परीक्षा पास करत आहोत. जितके शिकाल आणि मग इतरांना शिकवाल. टीचर बनून इतरांना रस्ता दाखवतात. सर्व टीचर्स आहेत. सर्वांना शिकवायचे आहे. सर्वप्रथम तर बाबांची ओळख देऊन सांगायचे आहे की बाबांकडून हा वारसा मिळतो. गीता बाबांनी ऐकवली आहे. हे प्रजापिता ब्रह्मा आहेत तर ब्राह्मण देखील इथे पाहिजेत. ब्रह्मा देखील शिवबाबांकडून शिकतात. तुम्ही आता शिकता विष्णुपुरी मध्ये जाण्यासाठी. हे आहे तुमचे अलौकिक घर. लौकिक, पारलौकिक आणि मग अलौकिक. नवीन गोष्ट आहे ना. भक्तीमार्गामध्ये कधी ब्रह्माची आठवण करत नाहीत. ब्रह्माबाबा कोणाला म्हणता येत नाही. शिवबाबांची आठवण करतात की दुःखातून सोडवा. ते आहेत पारलौकिक पिता, मग हे आहेत अलौकिक. यांना तुम्ही सूक्ष्म वतनमध्ये देखील पाहता आणि मग इथे देखील पाहता. लौकिक पिता तर इथे दिसतात, पारलौकीक पिता तर परलोक मध्येच पाहू शकता. हे मग आहेत अलौकिक वंडरफुल पिता. या अलौकिक पित्याला ओळखण्यामध्येच गोंधळून जातात. शिवबाबांसाठी तर म्हणणार निराकार आहेत. तुम्ही म्हणाल ते बिंदू आहेत. ते फार-फार तर अखंड ज्योती किंवा ब्रह्म म्हणतात. अनेक मते आहेत. तुमचे तर एकच मत आहे. एकाद्वारे बाबांनी मत देण्याची सुरुवात केली मग वृद्धी किती होते. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे - आपल्याला शिवबाबा शिकवत आहेत. पतितापासून पावन बनवत आहेत. रावण राज्यामध्ये जरूर पतित, तमोप्रधान बनायचेच आहे. नावच आहे पतित दुनिया. सर्वजण दुःखी सुद्धा आहेत तेव्हाच तर बाबांची आठवण करतात की बाबा, आमचे दुःख दूर करून आम्हाला सुख द्या. सर्व मुलांचा पिता एकच आहे. ते तर सर्वांना सुखच देतील ना. नवीन दुनियेमध्ये तर सुखच सुख आहे. बाकी सर्व शांतीधाममध्ये राहतात. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की, आता आपण शांतीधामला जाणार. जितके जवळ येत जाऊ तसे आजची दुनिया काय आहे, उद्याची दुनिया काय असेल, सर्व बघत राहणार. स्वर्गाची बादशाही जवळ बघत राहणार. तर मुलांना मुख्य गोष्ट समजावून सांगतात - बुद्धीमध्ये ही आठवण रहावी की आपण स्कूलमध्ये बसलो आहोत. शिवबाबा या रथावर स्वार झाले आहेत आपल्याला शिकविण्यासाठी. हे भागीरथ आहेत. बाबा येतील देखील एकदाच. भागीरथाचे नाव काय आहे, हे देखील कोणाला माहिती नाही आहे.

इथे तुम्ही मुले जेव्हा बाबांच्या सन्मुख बसता तर बुद्धीमध्ये याची आठवण राहावी की बाबा आलेले आहेत - आपल्याला सृष्टी चक्राचे रहस्य सांगत आहेत. आता नाटक पूर्ण होत आहे, आता आपल्याला जायचे आहे. हे लक्षात ठेवणे किती सोपे आहे परंतु एवढी देखील आठवण करू शकत नाहीत. आता चक्र पूर्ण होत आहे, आता आपल्याला जायचे आहे आणि मग नवीन दुनियेमध्ये येऊन पार्ट बजावायचा आहे, मग आपल्या नंतर अमके-अमके येतील. तुम्ही जाणता हे संपूर्ण चक्र कसे फिरते. दुनियेची वृद्धी कशी होते. नवीन पासून जुनी आणि परत जुन्या पासून नवीन कशी होते. विनाशाची तयारी देखील बघत आहात. नैसर्गिक आपत्ती देखील येणार आहेत. इतके बॉम्ब्स बनवून ठेवले आहेत तर वापरण्यात तर येतील ना. बॉम्ब्सनेच इतके काम होईल ज्यामुळे मग मनुष्यांच्या युद्धाची गरजच राहणार नाही. लष्कराला मग नोकरीतून काढून टाकत जातील. बॉम्ब्स फेकत जातील. मग इतके सर्व मनुष्य नोकरीतून काढून टाकले तर भुकेने मरतील ना. हे सर्व होणार आहे. मग सैनिक इत्यादी काय करतील. भूकंप होत राहतील, बॉम्बस पडत राहतील. एकमेकांना मारत राहतील. खूने-नाहेक खेळ (रक्त रंजीत खेळ) तर होणार आहे ना. तर इथे जेव्हा येऊन बसता तेव्हा या गोष्टींमध्ये तल्लीन झाले पाहिजे. शांतीधाम, सुखधामाची आठवण करत रहा. मनाला विचारा आपल्याला कशाची आठवण येते. जर बाबांची आठवण नसेल तर जरूर बुद्धी कुठे भटकत आहे. विकर्म देखील विनाश होणार नाहीत, पद देखील कमी होईल. अच्छा, बाबांची आठवण टिकत नसेल तर चक्राची आठवण करा तरी देखील आनंद होईल. परंतु श्रीमतावर चालत नाहीत, सेवा करत नाहीत तर बापदादांच्या हृदयामध्ये देखील स्थान मिळवू शकत नाहीत. सेवा करत नाहीत तर खूप जणांना हैराण करत राहतात. कोणी तर अनेकांना आप समान बनवून बाबांकडे घेऊन येतात. तर बाबा पाहून आनंदीत होतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कायम हर्षित राहण्यासाठी बुद्धिमध्ये अभ्यास आणि शिकवणाऱ्या बाबांची आठवण रहावी. खाताना-पिताना सर्व काम करताना अभ्यासावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे.

२) बापदादांच्या हृदयामध्ये स्थान मिळविण्यासाठी श्रीमतानुसार खूप जणांना आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. कोणालाही हैराण करायचे नाही.

वरदान:-
अशरिरीपणाच्या इंजेक्शनद्वारे मनाला कंट्रोल करणारे एकाग्रचित्त भव

जसे आजकाल जर कोणी कंट्रोलमध्ये येत नसेल, खूप हैराण करत असेल, उड्या मारत असेल किंवा वेडा होतो तर त्याला असे इंजेक्शन देतात ज्यामुळे तो शांत होईल. अशी जर संकल्प शक्ती तुमच्या कंट्रोलमध्ये येत नसेल तर अशरिरीपणाचे इंजेक्शन लावा. मग संकल्प शक्ती व्यर्थ उड्या मारणार नाही. सहज एकाग्रचित्त व्हाल. परंतु जर बुद्धीचा लगाम बाबांना देऊन मग परत घेता तर मन व्यर्थ मेहनत करायला लावते. आता व्यर्थच्या मेहनती पासून मुक्त व्हा.

बोधवाक्य:-
आपल्या पूर्वज स्वरूपाला स्मृतीमध्ये ठेवून सर्व आत्म्यांवर दया करा.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

जसे शरीर आणि आत्मा दोन्ही कंबाइंड होऊन कर्म करत आहेत, तसे कर्म आणि योग दोन्ही कंबाइंड असावेत. कर्म करत असताना आठवणीमध्ये राहणारे सदैव न्यारे आणि प्यारे असतील, हलके असतील. नॉलेजफुल सोबतच पॉवरफुल स्टेजवर रहा. नॉलेजफुल आणि पॉवरफुल या दोन्ही स्टेज कंबाइंड असाव्यात तेव्हा स्थापनेचे कार्य तीव्र गतीने होईल.