24-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - वैजयंती माळेमध्ये येण्यासाठी निरंतर बाबांची आठवण करा, आपला वेळ वेस्ट
करू नका, अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्या”
प्रश्न:-
बाबा आपल्या
मुलांना कोणती एक रिक्वेस्ट करतात?
उत्तर:-
गोड मुलांनो, बाबा रिक्वेस्ट करतात - नीट अभ्यास करत रहा. बाबांच्या दाढीची लाज राखा.
असे कोणते वाईट काम करू नका ज्यामुळे बाबांचे नाव बदनाम होईल. सत् बाबा, सत् शिक्षक,
सद्गुरुची कधीही निंदा करु नका. प्रतिज्ञा करा - जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत
पवित्र जरूर रहाणार.
गीत:-
तुम्हें पाके
हमने जहाँ पा लिया है…
ओम शांती।
हे कोणी म्हटले की, तुम्हें पाकर सारे जहान की राजाई पाते है? आता तुम्ही स्टूडंट
देखील आहात तर मुले देखील आहात. तुम्ही जाणता बेहदचे बाबा आम्हा मुलांना विश्वाचा
मालक बनविण्यासाठी आले आहेत. त्यांच्यासमोर आपण बसलो आहोत आणि आपण राजयोग शिकत आहोत
अर्थात विश्वाचा क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस बनण्यासाठी तुम्ही इथे शिकण्यासाठी आला
आहात किंवा शिकत आहात. हे गाणे तर भक्तिमार्गाचे गायलेले आहे. बुद्धीने मुले जाणतात
आपण विश्वाचे महाराजा-महाराणी बनणार. बाबा आहेत ज्ञानाचे सागर, सुप्रीम रूहानी टीचर
आत्म्यांना बसून शिकवतात. आत्मा या शरीररूपी कर्मेंद्रियांद्वारे जाणते की आपण
बाबांकडून विश्व क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस (विश्वाचे मुकुटधारी राजकुमार-राजकुमारी)
बनण्यासाठी पाठशाळेमध्ये बसलो आहोत. किती अभिमान वाटला पाहिजे. स्वतःच्या मनाला
विचारा - इतका अभिमान आम्हा स्टूडंटना आहे? ही काही नवीन पण गोष्ट नाहीये. आपण
कल्प-कल्प विश्वाचे क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस बनण्यासाठी बाबांकडे आलो आहोत. जे बाबा,
पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत. बाबा विचारतात तेव्हा सर्वजण म्हणतात की, आम्ही
तर सूर्यवंशी क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस किंवा लक्ष्मी-नारायण बनणार. आपल्या मनाला
विचारले पाहिजे की, आपण असा पुरुषार्थ करतो का? बेहदचे बाबा जे स्वर्गाचा वारसा
देण्यासाठी आले आहेत, ते आपले पिता-टीचर-गुरु देखील आहेत तर जरूर वारसा देखील इतका
उच्च ते उच्च देतील. पाहिले पाहिजे आपल्याला इतकी खुशी आहे की आज शिकत आहोत, उद्या
क्राऊन प्रिन्स बनणार? कारण हा संगम आहे ना. आता या बाजूला आहोत, त्या बाजूला
स्वर्गामध्ये जाण्यासाठी शिकत आहोत. तिथे तर सर्वगुण संपन्न, १६ कला संपन्न बनूनच
जाल. आपण असे लायक बनलो आहोत - स्वतःला विचारायचे असते. फक्त एका नारद भक्ताचीच
गोष्ट नाहीये. तुम्ही सर्व भक्त होता, आता बाबा भक्तीपासून सोडवतात. तुम्ही जाणता
आपण बाबांची संतान बनलो आहोत त्यांच्याकडून वारसा घेण्यासाठी, विश्वाचा क्राऊन
प्रिन्स बनण्यासाठी आलो आहोत. बाबा म्हणतात - भले आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये रहा.
वानप्रस्थ अवस्थावाल्यांना गृहस्थ व्यवहारामध्ये रहायचे नसते आणि कुमार-कुमारी
देखील गृहस्थ व्यवहारामध्ये नाहीत. त्यांची देखील स्टूडंट लाइफ आहे.
ब्रह्मचर्यामध्येच शिक्षण शिकतात. आता हे शिक्षण आहे खूप श्रेष्ठ, यामध्ये कायमसाठी
पवित्र बनायचे आहे. ते तर ब्रह्मचर्यामध्ये शिकून मग विकारामध्ये जातात. इथे तुम्ही
ब्रह्मचर्यामध्ये राहून पूर्ण शिक्षण शिकता. बाबा म्हणतात - मी पवित्रतेचा सागर आहे,
तुम्हाला देखील बनवतात. तुम्ही जाणता अर्धा कल्प आपण पवित्र राहत होतो. खरोखर
बाबांसोबत प्रतिज्ञा केली होती - बाबा, आम्ही का नाही पवित्र बनून मग पवित्र
दुनियेचे मालक बनणार. किती मोठे बाबा आहेत, भले आहे साधारण तन, परंतु आत्म्याला नशा
चढतो ना. बाबा आले आहेत पवित्र बनविण्यासाठी. म्हणतात - तुम्ही विकारामध्ये
जाता-जाता वेश्यालयामध्ये येऊन पडले आहात. तुम्ही सतयुगामध्ये पवित्र होता, हे
राधे-कृष्ण पवित्र प्रिन्स-प्रिन्सेस आहेत ना. रुद्रमाळा देखील पहा, विष्णूची माळा
देखील पहा. रुद्रमाळा सो विष्णूची माळा बनेल. वैजयंती माळेमध्ये येण्यासाठी बाबा
समजावून सांगतात - पहिले तर बाबांची निरंतर आठवण करा, आपला वेळ वाया घालवू नका. या
कवड्यांच्या मागे माकड बनू नका. माकडे चणे खातात. आता तुम्हाला बाबा रत्न देत आहेत.
मग कवड्यांच्या किंवा चण्याच्या मागे जाल तर काय हालत होईल! रावणाच्या कैदेमध्ये
जाल. बाबा येऊन रावणाच्या कैदेतून सोडवतात. म्हणतात - देहा सहीत देहाच्या सर्व
नात्यांचा बुद्धीने त्याग करा. स्वतःला आत्मा निश्चय करा. बाबा म्हणतात - ‘मी
कल्प-कल्प भारतामध्येच येतो. भारतवासी मुलांना विश्वाचा क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस
बनवतो. किती सोपे करून शिकवतात, असेही काही म्हणत नाहीत की, ४-८ तास येऊन बसा. नाही,
गृहस्थ व्यवहारामध्ये रहात असताना स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर तुम्ही
पतितापासून पावन बनाल. विकारामध्ये जाणाऱ्याला पतित म्हटले जाते. देवता पावन आहेत
म्हणून त्यांची महिमा गायली जाते. बाबा म्हणतात - ते आहे अल्पकालीन क्षणभंगुर सुख.
संन्यासी बरोबर म्हणतात की, ‘काग विष्ठा समान सुख आहे’. परंतु त्यांना हे माहीत नाही
आहे की, देवतांना किती सुख आहे. नावच सुखधाम आहे. हे आहे दुःखधाम. या गोष्टींविषयी
दुनियेमध्ये कोणालाही माहित नाही. बाबाच येऊन कल्प-कल्प समजावून सांगतात
देही-अभिमानी बनवतात. स्वतःला आत्मा समजा. तुम्ही आत्मा आहात, ना की देह. तुम्ही
देहाचे मालक आहात, देह तुमचा मालक नाही. ८४ जन्म घेता-घेता आता तुम्ही तमोप्रधान
बनले आहात. तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पतित बनले आहेत. देह-अभिमानी बनल्याने
तुमच्याकडून पापे झाली आहेत. आता तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. माझ्या सोबत
परत घरी यायचे आहे. आत्मा आणि शरीर दोघांना शुद्ध बनविण्यासाठी बाबा म्हणतात -
मनमनाभव. बाबांनी तुम्हाला रावणापासून अर्धा कल्प फ्रीडम (मुक्ती) दिली होती, आता
पुन्हा फ्रीडम (मुक्ती) देत आहेत. अर्धा कल्प तुम्ही फ्रीडम (स्वातंत्र्यामध्ये)
राज्य करा. तिथे ५ विकारांचे नावही नाही. आता श्रीमतावर चालून श्रेष्ठ बनायचे आहे.
स्वतःला विचारा - माझ्यामध्ये विकार कितपत आहेत? बाबा म्हणतात - एक तर मामेकम् (मज
एकाची) आठवण करा आणि कोणतेही भांडण-तंटे सुद्धा करायचे नाहीत. नाही तर तुम्ही
पवित्र कसे बनणार. तुम्ही इथे आलेच आहात पुरुषार्थ करून माळेमध्ये ओवण्यासाठी.
नापास व्हाल तर मग माळेमध्ये ओवले जाऊ शकणार नाही. कल्प-कल्पाची बादशाही गमावून
बसाल. मग अंतामध्ये खूप पश्चाताप करावा लागेल. त्या लौकिक शिक्षणामध्ये देखील
रजिस्टर असते. लक्षण देखील बघतात. हे देखील शिक्षण आहे, पहाटे उठून तुम्ही तुमचे हे
शिका. दिवसाचे तर कर्म करायचेच आहे. वेळ मिळत नाही तर भक्ती देखील मनुष्य पहाटेचे
उठून करतात. हा तर आहे ज्ञान मार्ग. भक्तीमध्ये देखील पूजा करता-करता मग बुद्धीमध्ये
कोणत्या ना कोणत्या देहधारीची आठवण येते. इथे देखील तुम्ही बाबांची आठवण करता मग
धंदा इत्यादी आठवू लागतो. जितके बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तितकी पापे नष्ट होत
जातील.
तुम्ही मुले जेव्हा
पुरुषार्थ करता-करता पूर्णपणे पवित्र बनाल तेव्हा ही माळा बनेल. पूर्ण पुरुषार्थ
केला नाही तर प्रजेमध्ये जाल. चांगल्या रीतीने योग लावाल, अभ्यास कराल, आपले
बॅग-बॅगेज भविष्यासाठी ट्रान्सफर कराल तर रिटर्नमध्ये भविष्यामध्ये मिळेल. ईश्वर
अर्थ देतात तर दुसऱ्या जन्मामध्ये त्याचे रिटर्न मिळते ना. आता बाबा म्हणतात - मी
डायरेक्ट येतो. आता तुम्ही जे काही करता ते स्वतःसाठी. मनुष्य दान-पुण्य करतात ते
आहे इनडायरेक्ट. यावेळी तुम्ही बाबांना खूप मदत करता. जाणता हे पैसे तर सर्व नष्ट
होणार आहेत. यापेक्षा तर का नाही बाबांना मदत करावी, ते चांगले. बाबा राजाई कसे
स्थापन करतील. ना कोणते लष्कर किंवा सेना इत्यादी आहे, ना शस्त्रे इत्यादी आहेत.
सर्व काही आहे गुप्त. काहीजण कन्येला हुंडा गुप्तपणे देतात. पेटी बंद करून चावी
हातामध्ये देतात. कोणी खूप शो करतात, कोणी गुप्त देतात. बाबा देखील म्हणतात तुम्ही
सर्व सजणी आहात, तुम्हाला मी विश्वाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे. तुम्ही गुप्तपणे
मदत करता. हे आत्मा जाणते, बाहेरचा भपका (दिखावटी वैभव) काहीच नाहीये. ही आहेच
विकारी पतित दुनिया. सृष्टीची वृद्धी होणारच आहे. आत्म्यांना यायचे आहे जरूर. जन्म
तर अजूनच जास्त होणार आहेत. म्हणतात देखील या हिशेबाने धान्य पुरणार नाही. ही आहेच
आसुरी दुनिया. तुम्हा मुलांना आता ईश्वरीय बुद्धी मिळाली आहे. भगवान शिकवतात तर
त्यांचा किती रिगार्ड ठेवला पाहिजे. किती शिकले पाहिजे. कितीतरी मुले आहेत ज्यांना
शिक्षणाची आवडच नाही आहे. तुम्हा मुलांच्या एवढे तर बुद्धीमध्ये राहिले पाहिजे ना -
आपण बाबांद्वारे क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस बनत आहोत. आता बाबा म्हणतात - माझ्या
मतावर चाला, बाबांची आठवण करा. घडो-घडी म्हणतात - आम्ही विसरून जातो. स्टूडंट
म्हणेल मी धडा विसरून जातो, तर टीचर काय करतील! आठवण केली नाही तर विकर्म विनाश
होणार नाहीत. टीचर सर्वांवर कृपा किंवा आशीर्वाद करतील काय की, हा पास होऊ दे. इथे
ही आशीर्वाद, कृपेची गोष्टच नाही. बाबा म्हणतात शिका. भले धंदा इत्यादी करा, परंतु
शिकायचे जरुरी आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बना, इतरांना देखील रस्ता सांगा.
मनाला विचारले पाहिजे आपण बाबांच्या खिदमतमध्ये (सेवेमध्ये) किती आहोत? किती जणांना
आप समान बनवतो? त्रिमूर्तीचे चित्र तर समोर ठेवलेले आहे. हे शिवबाबा आहेत, हे
ब्रह्मा आहेत. या शिक्षणाने हे बनतात. मग ८४ जन्मानंतर हे बनणार. शिवबाबा ब्रह्मा
तनामध्ये प्रवेश करून ब्राह्मणांना हे बनवत आहेत. तुम्ही ब्राह्मण बनला आहात. आता
आपल्या मनाला विचारा आपण पवित्र बनलो आहोत? दैवी गुण धारण करतो का? जुन्या देहाला
विसरलो आहोत? हे शरीर तर जुनी जुत्ती आहे ना. आत्मा पवित्र बनेल तेव्हा मग जुत्ती (शरीर)
देखील फर्स्ट क्लास मिळेल. हा जुना चोला (हे जुने शरीर) सोडून नवीन शरीर घ्याल, हे
चक्र फिरत राहते. आज जुन्या जुत्तीमध्ये आहोत, उद्या हे देवता बनायचे आहे.
बाबांद्वारे भविष्य अर्ध्या कल्पासाठी विश्वाचा क्राऊन प्रिन्स बनतो. आपल्या त्या
राजाईला कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाहीत. तर बाबांच्या श्रीमतावर चालले पाहिजे ना.
स्वतःशी विचारा आपण किती आठवण करतो? किती स्वदर्शन चक्रधारी बनतो आणि बनवितो? जो
करेल तो मिळवेल. बाबा रोज शिकवतात. सर्वांकडे मुरली जाते. अच्छा, जरी मिळाली नाही,
७ दिवसांचा कोर्स तर मिळाला ना, बुद्धीमध्ये ज्ञान तर आले. सुरुवातीला तर भट्टी बनली
मग कोणी पक्के, कोणी कच्चे निघाले कारण मायेचे वादळ सुद्धा येतेच ना. ६-८ महिने
पवित्र बनून मग देह-अभिमानामध्ये येऊन आपलाच घात करतात. माया अतिशय वाईट आहे. अर्धा
कल्प मायेकडून हार खाल्ली आहे. आत्ता देखील हार खाल तर आपले पद गमावून बसाल.
नंबरवार मर्तबे (पदे) तर अनेक आहेत ना. कोणी राजा-राणी, कोणी वजीर, कोणी प्रजा,
कोणाला हिरे-माणकांचे महाल. प्रजेमध्ये देखील कोणी खूप श्रीमंत असतात, हीरे-माणकांचे
महाल असतात, इथे देखील पाहा प्रजेकडून कर्ज घेतात ना. तर प्रजा श्रीमंत झाली का राजा?
अन्धेर नगरी… या आत्ताच्याच गोष्टी आहेत. आता तुम्हा मुलांना हा निश्चय असला पाहिजे
की, आपण विश्वाचे क्राऊन प्रिन्स बनण्याकरिता शिकत आहोत. आपण बॅरिस्टर किंवा
इंजिनियर बनणार आहोत, हे शाळेमध्ये विसरायला होते का! बरेचजण तर चालता-चालता मायेची
वादळे लागल्यामुळे शिक्षणच सोडून देतात.
बाबा आपल्या मुलांना
एक रिक्वेस्ट करतात - गोड मुलांनो, चांगल्या रीतीने शिकाल तर चांगले पद मिळवाल.
बाबांच्या दाढीची लाज ठेवा. तुम्ही असे वाईट काम कराल तर नाव बदनाम कराल. सत्य बाबा,
सत्य टीचर, सद्गुरूची निंदा करणारे उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. यावेळी तुम्ही
हिऱ्या समान बनत आहात तर कवड्यांच्या मागे थोडेच पडायचे आहे. बाबांना साक्षात्कार
झाला आणि लगेच कवड्यांना सोडून दिले. अरे, २१ जन्मांसाठी बादशाही मिळतेय मग याचे
काय करणार! सर्व देऊन टाकले. आपण तर विश्वाची बादशाही घेणार. हे देखील जाणता विनाश
होणार आहे. आता अभ्यास केला नाहीत तर टू लेट व्हाल, पश्चाताप करावा लागेल. मुलांना
सर्व साक्षात्कार होतील. बाबा म्हणतात - तुम्ही बोलावता देखील की, ‘हे पतित-पावन
या’. आता मी पतित दुनियेमध्ये तुमच्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला म्हणतो - पावन बना.
तुम्ही मग वारंवार घाणी मध्ये पडता (विकारामध्ये जाता). मी तर काळांचाही काळ आहे.
सर्वांना घेऊन जाणार. स्वर्गामध्ये जाण्यासाठी बाबा येऊन रस्ता सांगतात. नॉलेज
देतात की, हे सृष्टी चक्र कसे फिरते. हे आहे बेहदचे नॉलेज. ज्यांनी कल्पापूर्वी
शिक्षण घेतले होते तेच येऊन शिकतील, तो देखील साक्षात्कार होत राहतो. निश्चय होईल
की बेहदचे बाबा आलेले आहेत, ज्या भगवंताला भेटण्यासाठी इतकी भक्ती केली ते इथे येऊन
शिकवत आहेत. अशा भगवान पित्यासोबत आपण भेट तर करावी. किती उल्हासाने आनंदाने धावत
येऊन भेटतील, जर पक्का निश्चय असेल तर. ठकवण्याची गोष्ट नाहीये. असे देखील पुष्कळ
आहेत जे पवित्र बनत नाहीत, अभ्यास करत नाहीत, बस्स, चला बाबांकडे. असेच
हिंडण्या-फिरण्यासाठी देखील येतात. बाबा मुलांना समजावून सांगतात - तुम्हा मुलांना
गुप्तपणे आपली राजधानी स्थापन करायची आहे. पवित्र बनाल तर तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनाल. हा राजयोग बाबाच शिकवतात. बाकी ते तर आहेत हठयोगी. बाबा म्हणतात -
स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. हा नशा ठेवा - आपण बेहदच्या बाबांकडून
विश्वाचा क्राऊन प्रिन्स बनण्यासाठी आलो आहोत मग श्रीमतावर चालले पाहिजे. माया अशी
आहे जी बुद्धीचा योग तोडून टाकते. बाबा समर्थ आहेत, तर माया देखील समर्थ आहे. अर्धा
कल्प आहे रामाचे राज्य, अर्धा कल्प आहे रावणाचे राज्य. हे देखील कोणी जाणत नाही.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव हा नशा
रहावा की आज आपण शिकतो आहोत उद्या क्राऊन प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. स्वतःच्या मनाला
विचारायचे आहे - आपण असा पुरुषार्थ करतो का? बाबांचा इतका रिगार्ड आहे? अभ्यासाची
आवड आहे?
२) बाबांच्या
कर्तव्यामध्ये गुप्त मदतगार बनायचे आहे. भविष्यासाठी आपले बॅग-बॅगेज ट्रान्सफर
करायचे आहे. कवड्यांच्या मागे वेळ न घालवता हिऱ्या समान बनण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे.
वरदान:-
मन-बुद्धीला
मनमतापासून फ्री करून सूक्ष्म वतनचा अनुभव करणारे डबल लाईट भव
केवळ संकल्प शक्ती
अर्थात मन आणि बुद्धीला नेहमी मन मतापासून रिकामे ठेवा तर इथे राहत असताना देखील
वतनमधील सर्व (सिन-सिनरी) दृश्ये अशी स्पष्ट अनुभव कराल जसे काही या दुनियेतील
कोणतेही दृश्य स्पष्ट दिसते. या अनुभूतीसाठी कोणतेही ओझे स्वतःवर ठेवू नका, सर्व ओझे
बाबांना देऊन डबल लाईट बना. मन-बुद्धीने सदैव शुद्ध संकल्पांचे भोजन करा. कधीही
व्यर्थ संकल्प किंवा विकल्पाचे अशुद्ध भोजन करू नका तेव्हा ओझ्या पासून हलके होऊन
उच्च स्थितीचा अनुभव करू शकाल.
बोधवाक्य:-
व्यर्थला
फुलस्टॉप द्या आणि शुभ भावनेचा स्टॉक फुल करा.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
जर चालता-चालता कधी
असफलता किंवा अवघड अनुभव होत असेल तर त्याचे कारण फक्त खिदमतगार बनता. खुदाई
खिदमतगार बनत नाही. खुदाला खिदमत पासून वेगळे करू नका. जेव्हा नावच आहे खुदाई
खिदमतगार, तर कंबाइंडला वेगळे का करता. नेहमी आपले हे नाव लक्षात ठेवा तर सेवेमध्ये
स्वतःच खुदाई जादू भरेल.