25-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - सक्रिय स्टुडंट बनून चांगल्या मार्कांनी पास होण्याचा पुरुषार्थ करा,
आळशी स्टुडंट बनायचे नाही, आळशी ते ज्यांना पूर्ण दिवस मित्र-नातेवाईकांची आठवण
येते”
प्रश्न:-
संगम युगावर
सर्वात भाग्यवान कोणाला म्हणणार?
उत्तर:-
ज्यांनी आपले तन-मन-धन सर्व सफल केले आहे किंवा करत आहेत - ते आहेत भाग्यवान.
काहीजण तर खूप कंजूस असतात मग समजून येते भाग्यामध्ये नाही आहे. समजत नाहीत की
विनाश समोर उभा आहे, काहीतरी करावे. भाग्यवान मुले समजतात बाबा आता सन्मुख आले आहेत,
आपण आपले सर्व काही सफल करावे. हिम्मत ठेवून अनेकांचे भाग्य बनवण्याच्या निमित्त
बनावे.
गीत:-
तकदीर जगा कर
आई हूँ…
ओम शांती।
हे तर तुम्ही मुले भाग्य घडवत आहात. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे आणि असे
म्हणतात भगवानुवाच मी तुम्हाला राजयोग शिकवतो. आता कृष्ण भगवानुवाच तर काही नाही आहे.
हा श्रीकृष्ण तर एम ऑब्जेक्ट आहे मग शिव भगवानुवाच की मी तुम्हाला राजांचाही राजा
बनवतो. तर जरूर पहिले कृष्ण प्रिन्स बनणार. बाकी कृष्ण भगवानुवाच काही नाही आहे.
कृष्ण तर तुम्हा मुलांचे एम ऑब्जेक्ट आहे, ही पाठशाळा आहे. भगवान शिकवतात, तुम्ही
सर्व प्रिन्स-प्रिन्सेस बनता.
बाबा म्हणतात - अनेक
जन्मांच्या अंताच्या देखील अंतामध्ये मी तुम्हाला हे ज्ञान ऐकवतो पुन्हा सो
श्रीकृष्ण बनण्यासाठी. या पाठशाळेचे टिचर शिवबाबा आहेत, श्रीकृष्ण नाही. शिवबाबाच
देवी धर्माची स्थापना करतात. तुम्ही मुले म्हणता आम्ही आलो आहोत भाग्य बनविण्यासाठी.
आत्मा जाणते आपण परमपिता परमात्म्याकडून आता भाग्य बनविण्यासाठी आलो आहोत. हे आहे
प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याचे भाग्य. राजयोग आहे ना. शिवबाबांद्वारे सर्वप्रथम
स्वर्गाची दोन पाने राधा-कृष्ण निघतात. हे जे चित्र बनविले आहे, ते अगदी बरोबर आहे,
समजावून सांगण्यासाठी चांगले आहे. गीतेच्या ज्ञानानेच भाग्य बनते. भाग्य जागृत झाले
होते ते पुन्हा फुटून गेले. अनेक जन्मांच्या अंतामध्ये तुम्ही एकदम तमोप्रधान बेगर
बनले आहात. आता पुन्हा प्रिन्स बनायचे आहे. आधी तर जरूर राधा-कृष्णच बनतील मग
त्यांची देखील राजधानी चालते. फक्त एकच तर नसणार ना. स्वयंवरा नंतर राधा-कृष्ण सो
परत लक्ष्मी-नारायण बनतात. नरापासून प्रिन्स अथवा नारायण बनणे एकच गोष्ट आहे. तुम्ही
मुले जाणता हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते. जरूर संगमावरच स्थापना झाली
असेल म्हणून संगमयुगाला पुरुषोत्तम युग म्हटले जाते. आदि सनातन देवी-देवता धर्माची
स्थापना होते, बाकी इतर सर्व धर्म विनाश होतील. सतयुगामध्ये बरोबर एकच धर्म होता.
तो इतिहास-भूगोल जरूर पुन्हा रिपीट होणार आहे. पुन्हा स्वर्गाची स्थापना होईल.
ज्यामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, परिस्थान होते, आता तर कब्रस्तान आहे.
सर्व काम-चितेवर बसून भस्म होतील. सतयुगामध्ये तुम्ही महाल इत्यादी बनवाल. असे नाही
की खालून कोणती सोन्याची द्वारका अथवा लंका वर येईल. द्वारका असू शकते, लंका तर
असणार नाही. गोल्डन एज म्हटले जाते राम राज्याला. खरे सोने जे होते ते सर्व लुटले
गेले. तुम्ही समजावून सांगता भारत किती श्रीमंत होता. आता तर गरीब आहे. गरीब शब्द
लिहिणे काही वाईट गोष्ट नाही. तुम्ही समजावून सांगू शकता सतयुगामध्ये एकच धर्म होता.
तिथे दुसरा कोणता धर्म असू शकत नाही. बरेचजण म्हणतात हे कसे होऊ शकते, फक्त देवताच
असणार की काय? अनेक मतमतांतरे आहेत, एक दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. किती आश्चर्य
आहे. किती ॲक्टर्स आहेत. आता स्वर्गाची स्थापना होत आहे, आपण स्वर्गवासी बनत आहोत
याची आठवण राहिली तर नेहमी हर्षितमुख रहाल. तुम्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे.
तुमचे एम ऑब्जेक्ट तर उच्च आहे ना. आपण मनुष्यापासून देवता, स्वर्गवासी बनत आहोत.
हे देखील तुम्ही ब्राह्मणच जाणता की, स्वर्गाची स्थापना होत आहे. हे देखील सदैव
लक्षात राहिले पाहिजे. परंतु माया घडोघडी विसरायला लावते. भाग्यामध्ये नसेल तर
सुधारत नाहीत. खोटे बोलण्याची सवय अर्ध्या कल्पापासून जडलेली आहे, ती सुटत नाही.
खोट्याला देखील खजिना समजून जपून ठेवतात, सोडतच नाही तर समजले जाते की यांचे भाग्यच
असे आहे. बाबांची आठवण करत नाहीत. आठवण देखील तेव्हाच राहील जेव्हा पूर्णत: मोह
नष्ट होईल. साऱ्या दुनियेपासून वैराग्य. मित्र-नातेवाईक इत्यादींना बघत असताना जसे
की बघतच नाही. जाणतात हे सर्व नरकवासी, कब्रस्तानी आहेत. हे सर्व नष्ट होणार आहेत.
आता आपल्याला परत घरी जायचे आहे त्यासाठी सुखधाम-शांतीधामचीच आठवण करतात. आपण काल
स्वर्गवासी होतो, राज्य करत होतो, ते गमावले आहे आपण पुन्हा राज्य घेत आहोत. मुले
समजतात भक्तिमार्गामध्ये किती डोके टेकवणे, पैसे बरबाद करणे असते. हाका मारतच
राहतात, मिळत काहीच नाही. आत्मा बोलावते - ‘बाबा या, सुखधाममध्ये घेऊन चला ते देखील
जेव्हा शेवटी खूप दुःख होते तेव्हा आठवण करतात.
तुम्ही बघता आता ही
जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आता आपला हा अंतिम जन्म आहे, यामध्ये आपल्याला पूर्ण
नॉलेज मिळाले आहे. नॉलेज पूर्णपणे धारण करायचे आहे. भूकंप इत्यादी अचानक होतात ना.
हिंदुस्तान, पाकिस्तानच्या फाळणी मध्ये किती मेले असतील. तुम्हा मुलांना
सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सर्व माहिती झाली आहे. बाकी जे राहिलेले असेल त्याची
देखील माहिती होत जाईल. फक्त एक सोमनाथाचे मंदिर सोन्याचे असणार नाही, अजूनही खूप
जणांचे महाल, मंदिरे इत्यादी सोन्याची असतील. मग त्याचे काय होते, कुठे नाहीसे
होतात? ते काय भूकंपामध्ये धरणीत गाडले जातात जे परत वर येतच नाहीत? आतच सडून जातात…
नक्की काय होते? पुढे चालून तुम्हाला त्याची माहिती होईल. असे म्हणतात सोन्याची
द्वारका खाली गेली. आता तुम्ही म्हणाल ड्रामामध्ये ती खाली गेली मग चक्र फिरेल
तेव्हा वर येईल. ते देखील परत बनवावी लागेल. हे चक्र बुद्धीमध्ये फिरवताना खूप आनंद
झाला पाहिजे. हे चित्र (लक्ष्मी-नारायणाचे चित्र) तर खिशामध्ये ठेवले पाहिजे. हा
बॅज खूप सेवेलायक आहे. परंतु इतकी सेवा कोणी करत नाहीत. तुम्ही मुले ट्रेनमध्ये खूप
सेवा करू शकता परंतु कोणीही कधी समाचार लिहित नाहीत की ट्रेनमध्ये काय सेवा केली?
थर्ड क्लासमध्ये देखील सेवा होऊ शकते. ज्यांना कल्पापूर्वी समजले होते, जे
मनुष्यापासून देवता बनले होते त्यांनाच समजेल. ‘मनुष्य से देवता’ असे गायले जाते.
असे म्हणणार नाही की मनुष्यापासून ख्रिश्चन किंवा मनुष्यापासून शीख. नाही,
मनुष्यापासून देवता बनले अर्थात आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना झाली. बाकी
सर्व आपापल्या धर्मामध्ये निघून गेले. झाडामध्ये (कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये)
दाखवले आहे अमके-अमके धर्म पुन्हा कधी स्थापन होणार? देवता हिंदू बनले. हिंदू पासून
मग आणखी दुसऱ्या-दुसऱ्या धर्मामध्ये कन्व्हर्ट झाले. ते देखील खूप निघतील जे आपल्या
श्रेष्ठ धर्म-कर्माला सोडून दुसऱ्या धर्मांमध्ये गेले, ते निघून येतील. शेवटी येणारे
थोडे समजतील, प्रजेमध्ये येतील. सगळेच काही देवी-देवता धर्मामध्ये थोडेच येतील.
सर्व आपापल्या सेक्शनमध्ये निघून जातील. तुमच्या बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी आहेत.
दुनियेमध्ये काय-काय करत राहतात. धान्यासाठी किती प्रबंध करतात. मोठ-मोठ्या मशिनी
लावतात. होत मात्र काहीच नाही. सृष्टीला तमोप्रधान बनायचेच आहे. शिडी खाली उतरायचीच
आहे. ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे ते होत राहते. मग नवीन दुनियेची स्थापना होणारच
आहे. विज्ञान जे आता शिकत आहेत, थोड्याच वर्षांत खूप हुशार होतील. ज्यामुळे मग तिथे
खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी बनतील. हे विज्ञान तिथे सुख देणारे असेल. इथे तर सुख
थोडे आहे, दुःख जास्त आहे. या विज्ञानाला निघून किती वर्षे झाली? आधी तर ही वीज,
गॅस इत्यादी काहीच नव्हते. आता तर बघा काय झाले आहे. तिथे तर शिकून तयार झालेले
जाणार. लवकर-लवकर काम होईल. इथे तर बघा घरे कशी बनतात. सर्व काही तयार असते. किती
मजले बनवतात. तिथे असे असणार नाही. तिथे तर सर्वांना आपापली शेती असणार. टॅक्स वगैरे
काहीच लागणार नाही. तिथे तर अथाह धन असते. जमीन देखील पुष्कळ असते. नद्या तर सगळ्या
असतील, बाकी नाले असणार नाहीत जे नंतर खोदून तयार केले जातात.
मुलांना आतून किती
आनंद झाला पाहिजे आपल्याला डबल इंजिन मिळाले आहे. पहाडीवर ट्रेनला डबल इंजिन मिळते.
तुम्ही मुले देखील हात-बोट देता ना. तुम्ही आहात किती थोडे. तुमची महिमा देखील गायली
गेली आहे. तुम्ही जाणता आपण खुदाई खिदमदगार (ईश्वरीय सेवाधारी) आहोत. श्रीमतावर सेवा
करत आहोत. बाबा देखील सेवा करण्यासाठी आले आहेत. एका धर्माची स्थापना, अनेक धर्मांचा
विनाश करतात, थोडे पुढे चालून सर्व बघाल, खूप दंगली होतील. आत्ता देखील घाबरत आहेत
- कुठे भांडण करून बॉम्बस तर टाकणार नाहीत. ठिणग्या तर खूप पडत राहतात. वारंवार
आपसामध्ये भांडत राहतात. मुले जाणतात जुनी दुनिया नष्ट होणार आहे. मग आपण आपल्या घरी
निघून जाणार. आता ८४ चे चक्र पूर्ण झाले. सर्व एकत्र निघून जाणार. तुमच्यामध्ये
देखील थोडे आहेत ज्यांना सतत आठवण राहते. ड्रामा अनुसार चुस्त आणि सुस्त (सक्रिय आणि
आळशी) दोन्ही प्रकारचे स्टुडंट आहेत. सक्रिय स्टुडंट्स चांगल्या मार्कांनी पास
होतात. जो आळशी असेल तो तर दिवसभर भांडतच राहील. बाबांची आठवण करत नाहीत. पूर्ण
दिवस मित्र-नातेवाईकांचीच खूप आठवण येत असते. इथे तर सर्व काही विसरायचे आहे. मी
आत्मा आहे, हे शरीर रुपी शेपूट लटकलेले आहे. आपण कर्मातीत अवस्थेला जेव्हा प्राप्त
करू तेव्हा हे शेपूट सुटेल. याचीच चिंता आहे, कर्मातीत अवस्था होईल तेव्हा हे शरीर
नष्ट होईल. आपण शाम पासून सुंदर बनू. मेहनत तर करायची आहे. प्रदर्शनीमध्ये सुद्धा
बघा किती मेहनत करतात. महेंद्र (भोपालने) किती हिम्मत दाखवली आहे. एकटे किती
मेहनतीने प्रदर्शनी इत्यादी करतात. मेहनतीचे फळ देखील मिळेल ना. एकाने किती कमाल
केली आहे. किती जणांचे कल्याण केले आहे. मित्र-नातेवाईक इत्यादींच्या मदतीनेच किती
काम केले आहे. कमाल आहे! मित्र-नातलगांना समजावून सांगतात हे पैसे इत्यादी सर्व या
कार्यामध्ये लावा, ठेवून काय करणार? हिंमतीने सेंटर देखील उघडले आहे. किती जणांचे
भाग्य बनवले आहे. असे ५-७ निघतील तर किती सेवा होईल. कोणी-कोणी तर फार कंजूस असतात.
मग समजले जाते भाग्यामध्ये नाही आहे. समजत नाहीत विनाश समोर उभा आहे, काहीतरी करावे.
आता मनुष्य जे ईश्वर अर्थ दान करतात, त्याने काहीही मिळत नाही. ईश्वर तर आत्ता आले
आहेत स्वर्गाची राजाई देण्यासाठी. दान-पुण्य करणाऱ्यांना काहीच मिळणार नाही.
संगमावर ज्यांनी आपले तन-मन-धन सर्व सफल केले आहे किंवा करत आहेत, ते आहेत भाग्यवान.
परंतु भाग्यात नसेल तर समजणारच नाहीत. तुम्ही जाणता ते देखील ब्राह्मण आहेत, आपण
देखील ब्राह्मण आहोत. आपण आहोत प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. इतके जे पुष्कळ
ब्राह्मण, ते आहेत कुख-वंशावळी. तुम्ही आहात मुख-वंशावळी. शिवजयंती संगमावर होते.
आता स्वर्ग बनविण्यासाठी बाबा मंत्र देत आहेत - मनमनाभव. माझी आठवण करा तर तुम्ही
पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनाल. अशी युक्ती करून पत्रके छापली पाहिजेत.
दुनियेमध्ये तर अनेक लोकं मरतात ना. जिथे कोणाचा मृत्यू झाला असेल तिथे ही पत्रके
वाटली पाहिजेत. बाबा जेव्हा येतात तेव्हाच जुन्या दुनियेचा विनाश होतो आणि त्यानंतर
स्वर्गाचे दरवाजे उघडतात. जर कोणी सुखधाममध्ये येऊ इच्छित असेल तर हा मंत्र आहे -
मनमनाभव. असे रसभरीत वर्णन छापलेले पत्रक सर्वांजवळ असले पाहिजे. स्मशानामध्ये
सुद्धा वाटू शकता. मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. सेवेच्या युक्त्या तर खूप सांगत
असतात. हे तर चांगल्या रीतीने लिहिले पाहिजे. एम ऑब्जेक्ट तर लिहिलेले आहे. समजावून
सांगण्याची खूप चांगली युक्ती पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कर्मातीत
अवस्थेला प्राप्त करण्यासाठी या शरीररुपी शेपटाला विसरायचे आहे. एका बाबांशिवाय
कोणतेही मित्र-नातेवाईक इत्यादींची आठवण येऊ नये, ही मेहनत करायची आहे.
२) श्रीमतावर खुदाई
खिदमदगार बनायचे आहे. तन-मन-धन सर्व सफल करून आपले श्रेष्ठ भाग्य बनवायचे आहे.
वरदान:-
कर्मभोग रूपी
परिस्थितीच्या आकर्षणाला देखील समाप्त करणारे संपूर्ण नष्टोमोहा भव
आज पर्यंत
प्रकृतीद्वारा निर्माण झालेल्या परिस्थिती अवस्थेला आपल्या बाजूने काही प्रमाणात
आकर्षित करतात. सर्वात जास्त आपल्या देहाचे हिशोब, राहिलेल्या कर्मभोगाच्या
रूपामध्ये येणारी परिस्थिती आपल्याकडे आकर्षित करते - जेव्हा हे देखील आकर्षण
समाप्त होईल तेव्हा म्हणणार संपूर्ण नष्टोमोहा. कोणत्याही देहाची अथवा देहाच्या
दुनियेची परिस्थिती स्थितीला हलवू शकत नाही - ही आहे संपूर्ण स्टेज. जेव्हा अशा
स्टेज पर्यंत पोहोचाल तेव्हा सेकंदामध्ये आपल्या मास्टर सर्वशक्तिमान स्वरूपामध्ये
सहज स्थित होऊ शकाल.
बोधवाक्य:-
पवित्रतेचे
व्रत हे सर्वात श्रेष्ठ सत्यनारायणाचे व्रत आहे - यातच अतींद्रिय सुख सामावलेले आहे.
आपल्या शक्तिशाली
मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
मनसा सेवा बेहदची सेवा
आहे. जितके तुम्ही मनसाद्वारे, वाणीद्वारे स्वतः सॅम्पल बनाल, तर सॅम्पलला बघून
आपोआप आकर्षित होतील. कोणतेही स्थूल कार्य करताना मनसाद्वारे व्हायब्रेशन
पसरविण्याची सेवा करा. जसे कोणी बिझनेस मॅन असतो तर स्वप्नात देखील स्वतःचा बिजनेस
बघतो, तसे तुमचे काम आहे - विश्व-कल्याण करणे. हेच तुमचे ऑक्युपेशन आहे, या
ऑक्युपेशनला स्मृतीमध्ये ठेवून सदैव सेवेमध्ये बिझी रहा.