25-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांचे श्रीमत तुम्हाला कायम सुखी बनविणारे आहे, त्यामुळे देहधारींचे मत
सोडून एका बाबांच्या श्रीमतावर चाला”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांच्या बुद्धीचे भटकणे अजूनही बंद झालेले नाहीये?
उत्तर:-
ज्यांना उच्च ते उच्च बाबांच्या मतावर अथवा ईश्वरीय मतावर भरवसा नाही, त्यांचे भटकणे
अजूनही बंद झालेले नाही. बाबांवर पूर्ण निश्चय नसल्याकारणाने दोन्ही बाजूला पाय
ठेवतात. भक्ती, गंगा स्नान इत्यादी देखील करतील आणि बाबांच्या मतावर देखील चालतील.
अशा मुलांचे काय हाल होतील! श्रीमतावर पूर्ण चालत नाहीत म्हणून त्रास सहन करावा
लागतो.
गीत:-
इस पाप की
दुनिया से…
ओम शांती।
मुलांनी हे भक्तांचे गाणे ऐकले. आता तुम्ही काही असे म्हणत नाही. तुम्ही जाणता -
आम्हाला उच्च ते उच्च बाबा मिळाले आहेत, ते एकच उच्च ते उच्च आहेत. बाकी जे काही या
वेळचे मनुष्य मात्र आहेत, सर्व नीच ते नीच आहेत. उच्च ते उच्च मनुष्य देखील
भारतामध्ये हे देवी-देवताच होते. त्यांची महिमा आहे - सर्वगुण संपन्न… आता
मनुष्यांना हे माहीत नाही आहे की या देवतांना इतके श्रेष्ठ कोणी बनवले. आता तर
अगदीच पतित बनले आहेत. बाबा आहेत सर्वश्रेष्ठ. साधू-संत इत्यादी सर्व त्यांची साधना
करतात. अशा साधूंच्या मागे मनुष्य अर्धा कल्प भटकले आहेत. आता तुम्ही जाणता बाबा
आलेले आहेत, आपण आता बाबांकडे जातो. ते आम्हाला श्रीमत देऊन श्रेष्ठ ते श्रेष्ठ, सदा
सुखी बनवतात. रावणाच्या मतावर तुम्ही किती तुच्छ-बुद्धि बनले आहात. आता तुम्ही
दुसऱ्या कोणाच्याही मतावर चालू नका. मज पतित-पावन पित्याला बोलावले आहे तरी देखील
बुडविणाऱ्यांच्या मागे का लागता! एकाचे मत सोडून अनेकांकडे वणवण भटकत का राहता?
बरीच मुले ज्ञानही ऐकत राहतील, आणि मग जाऊन गंगा स्नान देखील करतील, गुरूजवळ देखील
जातील… बाबा म्हणतात - ती गंगा काही पतित-पावनी तर नाही आहे. तरी देखील मनुष्यांच्या
मतावर जाऊन तुम्ही स्नान इत्यादी कराल तर बाबा म्हणतील - मज सर्वश्रेष्ठ पित्याच्या
मतावर देखील भरवसा नाहीये. एकीकडे ईश्वरीय मत, दुसरीकडे आहे आसुरी मत. त्यांचे हाल
काय होतील. दोन्ही बाजूला पाय ठेवाल तर चिरले जाल. बाबांवर देखील पूर्ण निश्चय ठेवत
नाहीत. म्हणतात देखील - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत. तुमच्या श्रीमतावर आम्ही श्रेष्ठ
बनणार’. आपल्याला उच्च ते उच्च बाबांच्या मतावर पाऊल ठेवायचे आहे. शांतीधाम,
सुखधामाचा मालक तर बाबाच बनवतील. तर बाबा म्हणतात - ज्याच्या शरीरामध्ये मी प्रवेश
केला त्याने तर १२ गुरू केले, तरीसुद्धा तमोप्रधानच बनला आहे, फायदा काहीच झाला नाही.
आता बाबा मिळाले आहेत तर सर्वांना सोडून दिले. उच्च ते उच्च बाबा मिळाले, बाबा
म्हणाले - ‘हिअर नो ईव्हिल, सी नो ईव्हिल…’ परंतु मनुष्य अगदीच पतित तमोप्रधान
बुद्धी आहेत. इथे देखील असे भरपूर आहेत जे श्रीमतावर चालू शकत नाहीत. ताकद नाही आहे.
माया धक्के मारत राहते कारण रावण आहे शत्रु, राम आहे मित्र. कोणी राम म्हणतात, कोणी
शिव म्हणतात. खरे नाव आहे - ‘शिवबाबा’. मी पुनर्जन्मामध्ये येत नाही. माझे
ड्रामामध्ये नाव ‘शिव’ असेच ठेवले गेले आहे. एका गोष्टीची दहा नावे ठेवल्याने
मनुष्य गोंधळलेले आहेत, ज्याला जे आले ते नाव ठेवले. माझे खरे नाव शिव आहे. मी या
शरीरामध्ये प्रवेश करतो. मी काही कृष्ण इत्यादी मध्ये येत नाही. ते समजतात विष्णू
तर सूक्ष्म वतनमध्ये राहणारा आहे. वास्तविक ते आहे युगल रूप, प्रवृत्ती मार्गाचे.
बाकी चार भुजा काही असत नाहीत. चार भुजा अर्थात प्रवृत्ती मार्ग, दोन भुजा आहे -
निवृत्ती मार्ग. बाबांनी प्रवृत्ती मार्गाचा धर्म स्थापन केला आहे. संन्यासी
निवृत्ती मार्गाचे आहेत. प्रवृत्ती मार्गवालेच मग पावन पासून पतित बनतात म्हणून
सृष्टीला थोपवून धरण्यासाठी संन्याशांचा पवित्र बनविण्याचा पार्ट आहे. ते देखील
लाखो-करोडो आहेत. जेव्हा जत्रा भरते तेव्हा असंख्य येतात, ते जेवण शिजवत नाहीत,
गृहस्थींच्या पालनेवर चालतात. कर्म संन्यास केला मग भोजन कुठून खाणार. तर
गृहस्थींकडून घेऊन खातात. गृहस्थी लोक समजतात - हे देखील आमचे दान झाले. हे (ब्रह्मा
बाबा) देखील पुजारी पतित होते, मग आता श्रीमतावर चालून पावन बनत आहेत. बाबांकडून
वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत आहेत, म्हणूनच तर म्हणतात - ‘फॉलो फादर करा’. माया
प्रत्येक गोष्टीत हैराण करते. देह-अभिमानामुळेच मनुष्य चुका करतात. भले गरीब असो
किंवा श्रीमंत असो परंतु देह-अभिमान जेव्हा तुटेल तेव्हा ना. देह-अभिमान तुटणे हीच
मोठी मेहनत आहे. बाबा म्हणतात - तुम्ही स्वतःला आत्मा समजून देहाने पार्ट बजावा.
तुम्ही देह-अभिमानामध्ये का येता! ड्रामा अनुसार देह-अभिमानामध्ये देखील यायचेच आहे.
यावेळी तर पक्के देह-अभिमानी बनले आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही तर आत्मा आहात.
आत्माच सर्व काही करते. आत्मा शरीरापासून वेगळी झाली मग शरीराला कापा, काही आवाज
येईल का? नाही, आत्माच म्हणते - माझ्या शरीराला दुःख देऊ नका. आत्मा अविनाशी आहे,
शरीर विनाशी आहे. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. देह-अभिमान सोडा.
तुम्ही मुले जितके
देह-अभिमानी बनाल तितके तंदुरुस्त आणि निरोगी बनत जाल. या योगबळानेच तुम्ही २१ जन्म
निरोगी बनाल. जितके बनाल तितके पद देखील उच्च मिळेल. सजा होण्यापासून वाचाल. नाहीतर
खूप सजा खावी लागेल. तर किती देही-अभिमानी बनायचे आहे. कितीतरी जणांच्या भाग्यामध्ये
हे ज्ञानच नाही आहे. जोपर्यंत तुमच्या कुळामध्ये येत नाहीत अर्थात ब्रह्मा
मुखवंशावळी बनत नाहीत तोपर्यंत ब्राह्मण बनल्याशिवाय देवता कसे बनतील. भले येतात
पुष्कळ, ‘बाबा-बाबा’ असे लिहितात किंवा म्हणतात देखील परंतु फक्त म्हणण्यापुरते. एक
दोन चिठ्ठ्या लिहून परत गायब होतात. ते देखील सतयुगामध्ये येतील परंतु प्रजेमध्ये.
प्रजा तर पुष्कळ बनते ना. पुढे जाऊन जेव्हा खूप दुःख होईल तेव्हा खूप भोगतील. आवाज
होईल - ‘भगवान आलेले आहेत’. तुमची देखील अनेक सेंटर्स उघडतील. तुम्हा मुलांची कमजोरी
आहे, तुम्ही देही-अभिमानी बनत नाही. अजून खूप देह-अभिमान आहे. अंतिम वेळेस थोडा जरी
देह-अभिमान असेल तर पद सुद्धा कमी होईल. मग येऊन दास-दासी बनतील. दास-दासी देखील
नंबरवार भरपूर असतात. राजांना किती दासी हुंड्यामध्ये मिळतात, श्रीमंतांना मिळत
नाहीत. मुलांनी पाहिले आहे राधा हुंड्यामध्ये किती दासी घेऊन जाते. पुढे जाऊन
तुम्हाला अनेक साक्षात्कार होतील. कमी दर्जाची दासी बनण्यापेक्षा तर श्रीमंत प्रजा
बनणे चांगले आहे. दासी शब्द खराब आहे. प्रजेमध्ये श्रीमंत बनणे तरीही चांगले आहे.
बाबांचे बनल्याने माया अजूनच चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करते. पैलवाना सोबत पैलवान
होऊन लढते. देह-अभिमान येतो. शिवबाबांपासून सुद्धा तोंड फिरवतात. बाबांची आठवण
करणेच सोडून देतात. अरे, तुम्हाला खाण्यासाठी सवड आहे आणि असे बाबा जे विश्वाचा
मालक बनवतात त्यांची आठवण करण्यासाठी सवड नाही. चांगली-चांगली मुले शिवबाबांना
विसरून देह-अभिमानामध्ये येतात. नाहीतर असे बाबा जे जीवनदान देतात, त्यांची आठवण
करून पत्र तरी लिहावे. परंतु इथे तर काही विचारूच नका. माया एकदम नाकाला पकडून
मारून टाकते. पावलो-पावली श्रीमतावर चालाल तर पावलामध्ये पदम आहेत. तुम्ही अगणित
धनवान बनता. तिथे मोजदाद केली जात नाही. धन-दौलत, शेतीवाडी सर्वकाही मिळते. तिथे
तांबे, लोखंड, पितळ इत्यादी असत नाही. सोन्याचीच नाणी असतात. घरच सोन्याचे बनवतात
तर काय असणार नाही. इथे तर आहेच भ्रष्टाचारी राज्य, यथा राजा-राणी तथा प्रजा.
सतयुगामध्ये यथा राजा-राणी तथा प्रजा सर्वश्रेष्ठाचारी असतात. परंतु लोकांच्या
डोक्यात टिकते थोडेच. तमोप्रधान आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही देखील असेच होता. हा (ब्रह्मा)
देखील असाच होता. आता मी येऊन देवता बनवतो, तरीही बनत नाहीत. आपसात भांडण-तंटे करत
राहतात. ‘मी खूप चांगला आहे, असा आहे…’ हे कोणी समजतात थोडेच की आपण दोजक मध्ये (नरकामध्ये)
पडलो आहोत, आपण रौरव नरकामध्ये पडलो आहोत. हे देखील तुम्ही मुलेच जाणता परंतु
नंबरवार पुरुषार्थानुसार. मनुष्य अगदीच नरकामध्ये पडले आहेत - रात्रं-दिवस काळजीत
पडलेले असतात. ज्ञानमार्गामध्ये जे आप समान बनविण्याची सेवा करू शकत नाहीत,
‘तुझे-माझे’ च्या चिंतेमध्ये असतात ते आजारी रोगी आहेत. बाबांशिवाय दुसऱ्या कोणाची
आठवण केली तर व्यभिचारी झाले ना. बाबा म्हणतात - दुसऱ्या कोणाचेही ऐकू नका,
माझ्याकडूनच ऐका. माझी आठवण करा. देवतांची आठवण केली तरीही चांगले आहे, मनुष्याची
आठवण केल्याने काहीच फायदा नाही. इथे तर बाबा म्हणतात - तुम्ही डोके तरी का झुकवता!
तुम्ही या बाबांकडे सुद्धा जेव्हा येता तेव्हा शिवबाबांची आठवण करून या. शिवबाबांची
आठवण करत नाही तर जणू पाप करता. बाबा म्हणतात - पहिले तर पवित्र बनण्याची प्रतिज्ञा
करा. शिवबाबांची आठवण करा. खूप संयम-नियम आहेत. खूप मुश्किलीने कोणी समजतात. इतकी
बुद्धी नाही आहे. बाबांसोबत कसे चालायचे आहे, यामध्ये तर खूप मेहनत हवी. माळेचा मणी
बनणे - काही मावशीचे घर थोडेच आहे. मुख्य आहे बाबांची आठवण करणे. तुम्ही बाबांची
आठवण करू शकत नाही. बाबांची सेवा, बाबांची आठवण किती केली पाहिजे. बाबा दररोज
सांगतात - पोतामेल (हिशोब) काढा. ज्या मुलांना आपले कल्याण करण्याचा विचार असतो -
ते हरप्रकारे पूर्णपणे संयम-नियमाप्रमाणे चालत राहतील. त्यांचे खाणे-पिणे अतिशय
सात्विक असेल.
बाबा मुलांच्या
कल्याणासाठी किती समजावून सांगत असतात. सर्व प्रकारचा संयम आवश्यक आहे. चेक केले
पाहिजे - आपले खाणे-पिणे असे तर नाही ना? लोभी तर नाही आहोत? जोपर्यंत कर्मातीत
अवस्था होत नाही तोपर्यंत माया उलटे-सुलटे काम करायला लावत राहील. त्याला अजून वेळ
आहे, मग तेव्हा माहित होईल - आता तर विनाश समोर आहे. आग पूर्ण पसरली आहे. तुम्ही
बघाल कसे बॉम्ब्स पडतात. भारतामध्ये तर रक्ताच्या नद्या वाहणार आहेत. तिथे तर
बॉम्ब्सने एकमेकांना संपवून टाकतील. नैसर्गिक आपत्ती येतील. सर्वात जास्त संकट
भारतावर आहे. स्वतःवर खूप नजर ठेवायची आहे, आपण काय सेवा करतो? किती जणांना आप समान,
नरापासून नारायण बनवतो? काहीजण भक्तीमध्ये खूप अडकलेले आहेत तर समजतात - या मुली
आम्हाला काय शिकवणार. समजत नाहीत की यांना शिकविणारा पिता (स्वयं ईश्वर) आहे. थोडेसे
शिकलेले असतील किंवा धन असेल तर भांडू लागतात. इज्जतच घालवून टाकतात. सद्गुरूची
निंदा करणारे उच्च पद मिळवू शकणार नाहीत. मग जाऊन पाई-पैशाचे पद मिळवतील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
‘तुझे-माझे’च्या चिंतेला सोडून आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. एका बाबांकडूनच
ऐकायचे आहे, बाबांचीच आठवण करायची आहे, व्यभिचारी बनायचे नाही.
२) आपल्या कल्याणासाठी
खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप संयम ठेवायचा आहे - कोणत्याही वस्तूमध्ये लोभ ठेवायचा
नाही. लक्ष असावे की, माया कोणतेही उलटे काम करायला लावू नये.
वरदान:-
निर्णय शक्ती
आणि कंट्रोलिंग पॉवर द्वारे सदा सफलतामूर्त भव
कोणत्याही लौकिक किंवा
अलौकिक कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी विशेष कंट्रोलिंग पॉवरची आणि जजमेंट
पॉवरची आवश्यकता असते; कारण जेव्हा कोणतीही आत्मा तुमच्या संपर्कामध्ये येते तर आधी
ठरवायचे असते की हिला कोणत्या गोष्टीची गरज आहे, नाडीद्वारे पारख करून तिच्या
अपेक्षेप्रमाणे तिला तृप्त करणे आणि स्वतःच्या कंट्रोलिंग पॉवरने दुसऱ्यांवर आपल्या
अचल स्थितीचा प्रभाव पाडणे - याच दोन शक्ती सेवेच्या क्षेत्रामध्ये सफलता मूर्त
बनवतात.
बोधवाक्य:-
सर्वशक्तीमानला
सोबती बनवा तर माया पेपर टायगर बनेल.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
सेवेच्या
क्षेत्रामध्ये जी भिन्न-भिन्न प्रकारची स्वतः प्रति किंवा सेवे प्रति विघ्न येतात,
त्याचे देखील कारण फक्त हेच आहे - जे स्वतःला फक्त सेवाधारी समजता परंतु मी ईश्वरीय
सेवाधारी आहे, फक्त सेवेवर नाही परंतु गॉडली सेवेवर आहे - याच स्मृतीने आठवण आणि
सेवा आपोआपच दोन्ही कंबाइंड होत राहते.