26-01-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2003  ओम शान्ति   मधुबन


“प्रत्यक्षतेसाठी साधारणतेला अ लौकीकतेमध्ये परिवर्तन करून दर्शनीय मूर्त बना”


आज बापदादा आपल्या चोहो बाजूच्या ब्राह्मण मुलांच्या मस्तकामध्ये भाग्याचे तीन तारे चमकत असलेले बघत आहेत. किती श्रेष्ठ भाग्य आहे आणि किती सहज प्राप्त झाले आहे. एक आहे अलौकिक श्रेष्ठ जन्माचे भाग्य, दुसरे आहे - श्रेष्ठ संबंधाचे भाग्य, तिसरे आहे - सर्व प्राप्तीचे भाग्य. भाग्याच्या चमकत असलेल्या तिन्ही सिताऱ्यांना पाहून बापदादा देखील हर्षित होत आहेत. जन्माचे भाग्य बघा - स्वयं भाग्य विधाता बाबांद्वारे तुम्हा सर्वांचा जन्म आहे. जेव्हा जन्म-दाताच भाग्य-विधाता आहे तर जन्म किती अलौकिक आणि श्रेष्ठ आहे. तुम्हा सर्वांनाही आपल्या या भाग्याच्या जन्माचा नशा आणि खुशी आहे ना! त्याच सोबत संबंधाची (नात्याची) विशेषता पहा - साऱ्या कल्पामध्ये असा संबंध अन्य कोणत्याही आत्म्याचा नाही आहे. तुम्हा विशेष आत्म्यांनाच एकाद्वारे तीन संबंध प्राप्त आहेत. ते एकच पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत आणि सद्गुरु देखील आहेत. असे एकाद्वारे तीन संबंध ब्राह्मण आत्म्यांच्याशिवाय कोणाचेही नाहीत. अनुभव आहे ना? पित्याच्या नात्याने वारसा देखील देत आहेत, पालना देखील करत आहेत. वारसा देखील पहा किती उच्च आणि अविनाशी आहे. दुनियावाले म्हणतात - ‘आमचा पालनहार भगवान आहे’; परंतु तुम्ही मुले निश्चय आणि नशेने म्हणता आमचा पालनहार स्वयं भगवान आहे. अशी पालना, परमात्म पालना, परमात्म प्रेम, परमात्म वारसा अजून कोणाला प्राप्त आहे! तर एकच पिता देखील आहेत, पालनहार देखील आहेत आणि शिक्षक देखील आहेत.

प्रत्येक आत्म्याच्या जीवनामध्ये विशेष तीन संबंध (नाती) आवश्यक आहेत परंतु तीनही संबंध वेगळे-वेगळे असतात. तुम्हाला एकामध्ये तीन संबंध आहेत. शिक्षण देखील पहा - तिन्ही काळाचे शिक्षण आहे. त्रिकालदर्शी बनण्याचे शिक्षण आहे. शिक्षणाला सोर्स ऑफ इन्कम म्हटले जाते. शिक्षणाने पदाची प्राप्ती होते. साऱ्या विश्वामध्ये पहा - सर्वात उच्च ते उच्च पद, राज्य पद गायले गेले आहे. तर तुम्हाला या शिक्षणामुळे कोणते पद प्राप्त होते? आता देखील राजे आणि भविष्यामध्ये देखील राज्य पद. आत्ता स्व-राज्य आहे, राज-योगी स्वराज्य अधिकारी आहात आणि भविष्याचे राज्य भाग्य तर अविनाशी आहेच. यापेक्षा मोठे पद कोणते असतही नाही. शिक्षकाद्वारे शिक्षण देखील त्रिकालदर्शीचे आहे आणि पद देखील दैवी राज्य पद आहे. असे शिक्षकाचे नाते ब्राह्मण जीवनाशिवाय ना कोणाचे झाले आहे, ना होऊ शकते. त्याच सोबत सद्गुरुचे नाते, सद्गुरू द्वारा श्रीमत, ज्या श्रीमताचे गायन आजही भक्तीमध्ये होत आहे. तुम्ही निश्चयाने म्हणता आमचे प्रत्येक पाऊल कोणाच्या आधारे चालते? श्रीमताच्या आधारावर प्रत्येक पाऊल पडते. तर चेक करा - प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार पडते? भाग्य तर प्राप्त आहे परंतु जीवनामध्ये भाग्याच्या प्राप्तीचा अनुभव आहे? प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार आहे की कधी-कधी मनमत अथवा परमत तर मिक्स होत नाही ना? याची पारख आहे - जर पाऊल श्रीमतावर आहे तर प्रत्येक पावलामध्ये पद्मांच्या कमाईचा अनुभव होईल. पाऊल श्रीमतावर असेल तर सहज सफलता आहे. त्याच सोबत सद्गुरु द्वारे वरदानांची खाण प्राप्त आहे. वरदान आहे त्याची ओळख - जिथे वरदान असेल तिथे मेहनत नसेल. तर सद्गुरुच्या संबंधामध्ये श्रेष्ठ मत आणि सदैव वरदानाची प्राप्ति आहे. आणि विशेषता सहज मार्गाची आहे, जेव्हा एकामध्ये तीन संबंध आहेत तर एकाची आठवण करणे सोपे आहे. वेग-वेगळी तिघांची आठवण करण्याची आवश्यकता नाही म्हणून तुम्ही सर्व म्हणता - ‘एक बाबा दुसरा न कोई’. हे सोपे आहे कारण की विशेष संबंध एकामध्येच येतात. तर भाग्याचे सितारे तर चमकत आहेत कारण की बाबांद्वारे सर्वांना प्राप्ति तर आहेतच.

तिसरा भाग्याचा सितारा आहे - सर्व प्राप्ति; गायन आहे - ‘अप्राप्त नहीं कोई वस्तु ब्राह्मणों के खजाने में’. आठवण करा आपल्या खजिन्यांना. असा खजिना अथवा सर्व प्राप्ति आणखी कोणाद्वारे होऊ शकते का! हृदयापासून म्हटले - ‘माझे बाबा’, आणि खजिने हजर; म्हणून इतके श्रेष्ठ भाग्य सदैव स्मृतीमध्ये रहावे, यामध्ये नंबरवार आहेत. आता बापदादा हेच इच्छितात की प्रत्येक मुल जेव्हा कोटींमध्ये देखील कोणी आहे तर सर्व मुले नंबरवार नाही, तर नंबरवन होणार आहेत. तर स्वतःला विचारा नंबरवारमध्ये आहात की नंबरवन आहात? काय आहात? टीचर्स नंबरवन की नंबरवार? पांडव नंबरवन आहात की नंबरवार आहात? काय आहात? जे समजतात आम्ही नंबरवन आहोत आणि नेहमी रहाणार, असे नाही आज नंबरवन आणि उद्या नंबरवार मध्ये याल, जे इतके निश्चयबुद्धी आहेत की आम्ही सदैव जसे ब्रह्माबाबा नंबरवन, तसे फॉलो ब्रह्माबाबा नंबरवन आहोत आणि रहाणार त्यांनी हात वर करा. आहेत? असाच हात वर करू नका, विचार करून हात वर करा. उंच हात वर करा, अर्धा वर केलात म्हणजे अर्धे आहात. हात तर खूप जणांनी वर केला आहे, बघितले, दादींनी बघितले. आता यांच्याकडून (नंबरवन वाल्यांकडून) हिशोब घ्या. जनक (दादी जानकी) हिशोब घ्या. डबल फॉरेनर्सनी हात वर केला. वर करा, नंबरवन? बापदादांचे तर हात वर करून मन खुश केलेत. मुबारक असो. अच्छा - हात वर केलात याचा अर्थ आहे की तुम्हाला स्वतःमध्ये हिंमत आहे आणि हिंमत आहे तर बापदादा देखील मदतगार आहेतच. परंतु आत्ता बापदादा काय इच्छितात? नंबरवन आहात, हि तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु…. परंतु सांगू का की ‘परंतु’ नाहीच आहे? बापदादांकडे ‘परंतु’ आहे.

बापदादांनी पाहिले की मनामध्ये तर सामावलेले आहे परंतु मनापर्यंतच आहे, चेहरा आणि वर्तनामध्ये इमर्ज झालेले नाही आहे. आता बापदादा नंबरवनची स्टेज वर्तनामध्ये आणि चेहऱ्यावर पाहू इच्छित आहेत. आता वेळेनुसार नंबरवन म्हणणाऱ्यांची प्रत्येक व्यवहारामध्ये दर्शनीय मूर्ती दिसून आली पाहिजे. तुमचा चेहरा सांगू देत की हे दर्शनीय मूर्त आहेत. तुमची जड चित्रे अंतिम जन्मापर्यंत देखील, अखेरच्या काळातही दर्शनीय मूर्त असल्याचे अनुभव होतात. तर चैतन्यमध्ये देखील जसे ब्रह्मा बाबांना बघितले, साकार स्वरूपामध्ये, फरिश्ता तर नंतर बनले, परंतु साकार स्वरूपामध्ये असताना तुम्हा सर्वांना काय दिसून येत होते? साधारण दिसून येत होते? अंतिम ८४ वा जन्म, जुना जन्म, ६० वर्षानंतरचे वय, तरी देखील आदि पासून अंतापर्यंत दर्शनीय मूर्त असल्याचा अनुभव केला. केला ना? साकार रूपामध्ये केला ना? तसे ज्यांनी नंबरवन मध्ये हात वर केला, टी. व्ही. मध्ये घेतले आहे ना? बापदादा त्यांची फाईल बघतील, बापदादांकडे फाईल तर आहे ना. तर आतापासून तुमच्या प्रत्येक वर्तनामधून अनुभव व्हावा, कर्म साधारण असो, भले कोणतेही कर्म करता, बिजनेस करत असाल, डॉक्टरी करत असाल, वकिली करत असाल, जे काही करत असाल परंतु ज्या स्थानावर तुम्ही संबंध-संपर्कामध्ये येता ते तुमच्या वर्तनावरून असे अनुभव करतात की हे काही वेगळेच आणि अलौकिक आहेत? की साधारण समजतात की असे तर लौकिक देखील असतात? कामाची विशेषता नाही परंतु प्रॅक्टिकल लाईफची विशेषता. खूप चांगला बिझनेस आहे, खूप चांगली वकिली करतात, खूप चांगले डायरेक्टर आहेत… ते तर पुष्कळ आहे. असे एक गिनीज बुक ज्यामध्ये विशेष आत्म्यांची नावे असतात. कितीतरी जणांची नावे त्यात येतात, पुष्कळ असतात. याने हे विशेष कार्य केले, त्याने ते विशेष कार्य केले, नाव आले. तर ज्यांनी कोणी हात वर केला, तसा हात तर सर्वांनी वर करायला हवा परंतु ज्यांनी वर केला आहे आणि वर करावाच लागेल. तर तुमच्या प्रॅक्टिकल वर्तनामध्ये बदल पहा. हा आवाज अजून निघालेला नाही आहे, भले इंडस्ट्रीमध्ये असो, किंवा इतर कुठेही काम करत असाल, प्रत्येक आत्म्याने म्हणावे की, हे साधारण कर्म करताना देखील दर्शनीय मूर्त आहेत. असे होऊ शकते, होऊ शकते? पुढे बसलेले बोला, होऊ शकते? आता रिझल्टमध्ये असे वर्तन कमी ऐकिवात येते. साधारणता जास्त दिसून येते. हो, जेव्हा कधी कोणते विशेष कार्य करता, विशेष अटेंशन ठेवता तेव्हा तर चांगले दिसून येते परंतु तुमचे बाबांवर प्रेम आहे, बाबांवर प्रेम आहे? किती परसेंट आहे? टीचर्स हात वर करा. या तर भरपूर टीचर्स आल्या आहेत. होऊ शकते? की कधी साधारण कधी विशेष? शब्द देखील जो निघतो ना, कोणतेही कार्य करताना भाषा देखील अलौकिक पाहिजे. साधारण भाषा नाही.

आता बापदादांची सर्व मुलांकडून हीच सर्वात मोठी आशा आहे - त्यानंतर मग बाबांची प्रत्यक्षता होईल. तुमचे कर्म, वर्तन, चेहरा आपोआपच सिद्ध करेल, भाषणाने सिद्ध होणार नाही. भाषण तर एक बाण मारण्यासारखे आहे. परंतु प्रत्यक्षता होईल, यांना असे घडविणारा कोण! आपणहूनच शोधतील, आपणहून विचारतील - तुम्हाला असे घडविणारा कोण? रचना, (pause घेणे) रचणाऱ्याला प्रत्यक्ष करते.

तर या वर्षी तुम्ही काय करणार आहात? दादींनी तर सांगितले आहे गावाची सेवा करा. ती भले करा. परंतु बापदादा आता हे परिवर्तन बघू इच्छित आहेत. एका वर्षामध्ये संभव आहे का? एका वर्षामध्ये? दुसऱ्या वेळी जेव्हा सीझन सुरु होईल तेव्हा हा फरक दिसून यावा, सर्व सेंटर्समधून आवाज यावा की, ‘महान परिवर्तन’; म्हणजे मग गाणे गाऊ - ‘परिवर्तन, परिवर्तन…’ तुमच्या भाग्यासमोर आता साधारण बोल चांगले वाटत नाहीत. कारण आहे ‘मी’. हा ‘मी’, ‘मी’-पणा, ‘मी’ जो विचार केला, ‘मी’ जे म्हटले, ‘मी’ जे करतो... तेच बरोबर आहे. या ‘मी’पणामुळे अभिमान देखील येतो, क्रोध सुद्धा येतो. दोघेही आपले काम करतात. बाबांचा प्रसाद आहे, मग ‘मी’ कुठून आला! प्रसादाला कधी कोणी ‘मी’पणामध्ये आणू शकतो काय? भले बुद्धी जरी असेल, कोणती कला देखील असेल, कोणती विशेषता देखील असेल. बापदादा विशेषतेची, बुद्धीची प्रशंसा करतात परंतु ‘मी’ आणू नका. या ‘मी’पणाला नष्ट करा. हा सूक्ष्म ‘मी’पणा आहे. अलौकिक जीवनामध्ये हा ‘मी’पणा दर्शनीय मूर्त बनू देत नाही. तर दादी तुम्हाला काय वाटते? परिवर्तन होऊ शकते? तीनही पांडव (निर्वैर भाई, रमेश भाई, बृजमोहन भाई) सांगा बरे. तिघेही विशेष आहात ना. तिघांनीही सांगा हे होऊ शकते? होऊ शकते का? होऊ शकते? अच्छा - आता याचे कमांडर बना इतर गोष्टींमध्ये कमांडर बनू नका. परिवर्तनामध्ये कमांडर बना. मधुबनवाले बनणार का? बनणार ना? मधुबनवाले हात वर करा. अच्छा - बनणार? बाँबेवाले हात वर करा, योगिनी देखील बसली आहे. (योगिनी दीदी - पार्ला) बॉंबेवाले बनणार? जर बनणार असाल तर हात हलवा. अच्छा दिल्लीवाले हात वर करा. तर दिल्लीवाले करणार? टीचर्स सांगा. बघा. दर महिन्याला बापदादा रिपोर्ट घेतील. हिंमत आहे ना? मुबारक असो.

अच्छा, इंदोरवाले हात वर करा. इंदोरच्या टीचर्स हात वर करा. तर टीचर्स करणार? इंदोर करणार? हात हलवा. सर्वांचे हात हलले नाहीत. करणार, करून घेणार का? दादी पहा. टी.व्ही.मध्ये बघत आहेत. गुजरात हात वर करा. गुजरात करेल का? हात हलवणे तर सोपे आहे. आता मनाला हलवायचे आहे. कशासाठी, तुम्हाला इतके दु:ख पाहून दया येत नाही का? आता परिवर्तन झाले तर चांगले आहे ना? तर आता प्रत्यक्षतेचा प्लॅन आहे - प्रॅक्टिकल जीवन. बाकी प्रोग्राम करता, ते तर बिझी राहण्यासाठी खूप चांगले आहे परंतु प्रत्यक्षता होणार तुमच्या वर्तन आणि चेहेऱ्याद्वारे. आणखी कोणता झोन राहीला आहे का? यू.पी. वाले हात वर करा. यू.पी.चे थोडे आहेत. अच्छा यु.पी. करणार का? महाराष्ट्रवाले हात वर करा. उंच हात वर करा. अच्छा. महाराष्ट्र करणार ना? मुबारक असो. राजस्थान हात वर करा. टीचर्स हात हलवा. कर्नाटक हात वर करा. अच्छा - कर्नाटक करणार का? आंध्र प्रदेश हात वर करा. चला ही बातचीत केली. डबल विदेशी हात वर करा. जयंती कुठे आहे? करणार का डबल विदेशी? आता बघा सभेमध्ये सांगितले आहे. सर्वांनी हिंमत खूप चांगली दाखवली, यासाठी पद्म गुणा मुबारक असो. बाहेरचे देखील ऐकत आहेत, आपल्या देशांमध्ये सुद्धा ऐकत आहेत, ते सुद्धा हात वर करत आहेत.

तसेही बघा जे श्रेष्ठ आत्मे असतात त्यांच्या प्रत्येक वचनाला सत् वचन म्हटले जाते. म्हणतात ना - ‘सत् वचन महाराज’. आणि तुम्ही तर महा महाराज आहात. तुम्हा सर्वांचे प्रत्येक वचन जे कोणी ऐकतील ते मनामध्ये अनुभव करतील की, सत् वचन आहेत. तुमच्या मनामध्ये खूप काही भरलेले आहे, बापदादांकडे मनाला बघण्याचा टी. व्ही. सुद्धा आहे. इथे हा टी. व्ही. तर बाहेरील चेहेरा दाखवतो ना. परंतु बापदादांकडे प्रत्येकाच्या प्रत्येक क्षणाचे मनाच्या गतीचे यंत्र आहे. तर मनामध्ये खूप काही दिसून येते, जेव्हा मनाचा टी. व्ही. बघतात तेव्हा आनंदित होतात, पुष्कळ खजिने आहेत, पुष्कळ शक्ती आहेत. परंतु कर्मामध्ये यथा शक्ती होऊन जाते. आता कर्मामध्ये आणा, वाणीमध्ये आणा, चेहऱ्यावर आणा, वर्तनामध्ये आणा. तेव्हा सगळे म्हणतील, जे तुमचे एक गाणे आहे ना, ‘शक्तियां आ गई…’ सर्वजण शिव च्या शक्ती आहेत. पांडव देखील शक्ती आहेत. मग सर्व शक्ती मिळून शिवबाबांना प्रत्यक्ष करणार. आता छोटे-छोटे खेळ खेळणे बंद करा. आता वानप्रस्थ स्थितीला इमर्ज करा. तर बापदादा सर्व मुलांना, यावेळी बापदादांच्या आशांना पूर्ण करणारे आशेचे तारे म्हणून बघत आहेत. कोणतीही गोष्ट आली तर हे स्लोगन लक्षात ठेवा - “परिवर्तन, परिवर्तन, परिवर्तन”.

तर बापदादांच्या आजच्या महावाक्यातील एक शब्द विसरायचा नाही, तो कोणता? ‘परिवर्तन’. मला बदलायचे आहे. दुसऱ्यांना बदलून बदलायचे नाही, मला स्वतःला बदलून इतरांना बदलायचे आहे. दुसरा बदलला तर मी बदलेन, नाही. मला निमित्त बनायचे आहे. मला ‘हे अर्जुन’ बनायचे आहे तेव्हाच ब्रह्मा बाप समान नंबरवन घेणार. (मागे बसलेले हात वर करा) मागे बसलेल्यांना बापदादा पहिल्या क्रमांकाची प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. अच्छा.

चोहो बाजूच्या खूप-खूप-खूप भाग्यवान आत्म्यांना, साऱ्या विश्वामधून कोटींमध्ये कोणी, कोणीमध्ये देखील कोणी विशेष आत्म्यांना, सदैव आपल्या वर्तनातून आणि चेहेऱ्याद्वारे बापदादांना प्रत्यक्ष करणाऱ्या विशेष मुलांना, सदैव सहयोग आणि स्नेहाच्या बंधनामध्ये राहणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव ब्रह्माबाबां प्रमाणे प्रत्येक कर्मामध्ये अलौकिक कर्म करणाऱ्या अलौकिक आत्म्यांना, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

विंग्जच्या (प्रभागाच्या) सेवे प्रती बापदादांच्या प्रेरणा:- विंग्जच्या सेवेमध्ये चांगला रिजल्ट दिसून येत आहे कारण प्रत्येक विंग मेहनत करत आहे, संपर्क वाढवत जातात. परंतु बापदादांची इच्छा आहे की, जसे मेडिकल विंगने मेडिटेशन द्वारे हार्टचे प्रॅक्टिकल करून दाखवले. प्रमाण दिले आहे की, मेडिटेशनने हार्टचा आजार बरा होऊ शकतो आणि पुरावाही दिला आहे, दिला आहे ना पुरावा! तुम्ही सर्वांनी ऐकले आहे ना! दुनियावाल्यांना असा प्रत्यक्ष पुरावा हवा आहे. तर अशा प्रकारे ज्या कोणत्या विंग्ज आल्या आहेत, प्रोग्राम तर करायचाच आहे, करत देखील आहात परंतु असा कोणता प्लॅन बनवा, ज्यामुळे प्रॅक्टिकल रिझल्ट सर्वांच्या समोर येईल. बापदादा सर्व विंग्ज साठी सांगत आहेत. हे गव्हर्मेंट पर्यंत सुद्धा पोहचत तर आहे ना! आणि जिकडे-तिकडे आवाज तर पसरला आहे की मेडिटेशनद्वारे सुद्धा होऊ शकते. आता यामध्ये अजून वाढ झाली पाहिजे. आता प्रॅक्टिकलमध्ये पुरावा द्या ज्यामुळे ही गोष्ट पसरेल की मेडिटेशन द्वारे सर्वकाही होऊ शकते. सर्वांचे अटेंशन मेडिटेशनकडे असावे, अध्यात्मिकतेकडे असावे. समजले. अच्छा.

वरदान:-
सायलेन्सच्या शक्तीद्वारे विश्वामध्ये प्रत्यक्षतेचा डंका वाजविणारे शांत स्वरूप भव

गायले गेले आहे “सायन्स वर सायलेंसचा विजय”, वाणीचा नाही. जितका काळ आणि संपूर्णता समीप येत जाईल तितके ऑटोमॅटिक जास्त आवाजामध्ये येण्याचे वैराग्य येत जाईल. जसे आता आवाजापासून परे जाण्याची इच्छा असून देखील सवय आवाजामध्ये घेऊन येते तसे इच्छा असून देखील आवाजापासून परे व्हाल. प्रोग्राम बनवून आवाजामध्ये याल. जेव्हा असा बदल दिसून येईल तेव्हा समजा की, आता विजयाचा डंका वाजणार आहे. त्यामुळे जितका वेळ मिळेल - शांत स्वरूप स्थितीमध्ये राहण्याचे अभ्यासी बना.

सुविचार:-
झीरो बाबांसोबत राहणारेच हिरो पार्टधारी आहेत.

आपल्या शक्तीशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

वर्तमान वेळी विश्व कल्याण करण्याचे सोपे साधन आहे आपल्या श्रेष्ठ संकल्पांच्या एकाग्रते द्वारे, सर्व आत्म्यांच्या भटकणाऱ्या बुद्धीला एकाग्र करणे. संपूर्ण विश्वातील सर्व आत्मे विशेष हीच इच्छा ठेवतात की, भटकणारी बुद्धी एकाग्र व्हावी किंवा चंचल मन एकाग्र व्हावे. हि विश्वाची मागणी किंवा इच्छा तेव्हा पूर्ण करू शकाल जेव्हा एकाग्र होऊन मनसा शक्तींचे दान द्याल.