26-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण आता ईश्वराच्या कुशीत आला आहात,
तुम्हाला मनुष्यापासून देवता बनायचे असेल तर दैवी गुण देखील हवे”
प्रश्न:-
ब्राह्मण
मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये आपली खूप-खूप काळजी घ्यायची आहे आणि का?
उत्तर:-
संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येमध्ये कोणतेही पाप कर्म होऊ नये याची काळजी घ्यायची आहे
कारण तुमच्या समोर बाबा धर्मराजाच्या रूपामध्ये उभे आहेत. चेक करा कोणाला दुःख तर
दिले नाही ना? श्रीमतावर किती प्रमाणात चालतो? रावण मतावर तर चालत नाही ना? कारण
बाबांचे बनल्या नंतर जर कोणतेही विकर्म होते तर एकाचे शंभर पट होते.
ओम शांती।
भगवानुवाच. हे तर मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, कोणत्याही मनुष्याला अथवा
देवतांना भगवान म्हटले जाऊ शकत नाही. इथे जेव्हा बसता तेव्हा बुद्धीमध्ये हे असते
की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत. ही देखील आठवण कोणाला सदैव राहत नाही. स्वतःला
खरोखरच ब्राह्मण समजतात, असे देखील नाहीये. ब्राह्मण मुलांना मग दैवी गुण देखील
धारण करायचे आहेत. आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत, आपण शिवबाबांद्वारे पुरुषोत्तम बनत
आहोत. ही आठवण देखील सर्वांनाच रहात नाही. घडो-घडी हे विसरून जातात की आपण
पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण आहोत. एवढे जरी बुद्धीमध्ये लक्षात राहिले तरी अहो
सौभाग्य. नेहमी नंबरवार तर असतातच. सर्वजण आपापल्या बुद्धीनुसार पुरुषार्थी आहेत.
आता तुम्ही संगमयुगी आहात. पुरुषोत्तम बनणारे आहात. तुम्ही जाणता की, आपण
पुरुषोत्तम तेव्हा बनणार जेव्हा अब्बांची अर्थात मोस्ट बिलवेड बाबांची आठवण कराल.
आठवणीनेच पापे नष्ट होतील. जर कोणी पाप केले तर त्याचे ओझे शंभर पटीने चढते. पूर्वी
(अज्ञान काळामध्ये) जे पाप करत होतो तर त्याचे ओझे १० पटीने पाप चढत होते. आता तर
१०० पटीने चढते कारण ईश्वराच्या कुशीमध्ये आल्यानंतर मग पाप करतात ना. तुम्ही मुले
जाणता बाबा आपल्याला शिकवत आहेत पुरुषोत्तम सो देवता बनविण्यासाठी. ही आठवण ज्यांना
स्थाई राहते ते अलौकिक सेवा देखील खूप करत राहतील. सदैव हर्षितमुख बनण्यासाठी
इतरांना देखील रस्ता सांगायचा आहे. भले कुठेही जाता बुद्धीमध्ये हे लक्षात रहावे की
आपण संगमयुगावर आहोत. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. ते (दुनियावाले) पुरुषोत्तम महिना
किंवा वर्ष म्हणतात. तुम्ही म्हणता - आम्ही पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण आहोत. हे
चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करायचे आहे की, आता आपण पुरुषोत्तम बनण्याच्या
यात्रेवर आहोत. हे आठवणीत राहिले तरी देखील मनमनाभवच झाले. तुम्ही पुरुषोत्तम बनत
आहात, पुरुषार्था अनुसार आणि कर्मा अनुसार. दैवी गुण देखील पाहिजेत आणि श्रीमतावरही
चालावे लागेल. सर्व मनुष्य आपल्या स्वतःच्याच मतावर चालतात. ते आहेच रावण मत. असे
देखील नाही, तुम्ही सर्वच काही श्रीमतावर चालता. असे बरेच आहेत जे रावणाच्या मतावर
देखील चालतात. श्रीमतावर कोणी किती टक्के चालतात कोणी किती. कोणी तर २ टक्के सुद्धा
चालत असतील. भले इथे बसले आहेत तरी देखील शिवबाबांच्या आठवणीमध्ये रहात नाहीत. कुठे
ना कुठे बुद्धियोग भटकत असेल. रोज स्वतःला पहायचे आहे की, आज कोणते पापाचे काम तर
केले नाही ना? कोणाला दुःख तर दिले नाही ना? स्वतःची खूप काळजी घ्यायची आहे कारण
धर्मराज देखील उभे आहेत ना. आताचा काळ आहेच हिशोब चुकता करण्यासाठी. सजा देखील
भोगाव्या लागतील. मुले जाणतात आपण जन्म-जन्मांतरीचे पापी आहोत. कुठेही कोणत्या
मंदिरामध्ये किंवा गुरूकडे किंवा कोणत्या इष्ट देवतेकडे जातात तर म्हणतात - आम्ही
तर जन्मा-जन्माचे पापी आहोत, आमचे रक्षण करा, दया करा. सतयुगामध्ये कधी असे शब्द
काढणार नाहीत. कोणी खरे बोलतात, कोणी मग खोटे बोलतात. इथे देखील असेच आहे. बाबा
नेहमी म्हणतात आपली जीवन कथा बाबांना लिहून पाठवा. कोणी तर एकदम खरे लिहितात, कोणी
लपवतात देखील. लाज वाटते. हे तर जाणतात - वाईट कर्म केल्याने त्याचे फळ देखील वाईट
मिळेल. ती तर आहे अल्पकाळाची गोष्ट. ही तर खूप काळाची गोष्ट आहे. वाईट कर्म कराल तर
सजा देखील खाल आणि मग स्वर्गामध्ये खूप शेवटी याल. आता सर्व माहित होते की कोण-कोण
पुरुषोत्तम बनतात. ते आहे पुरुषोत्तम दैवी राज्य. उत्तम ते उत्तम पुरुष बनता ना.
इतर कोणत्या ठिकाणी अशी कोणाची महिमा करणार नाही. मनुष्य तर देवतांच्या गुणांना
सुद्धा जाणत नाहीत. भले महिमा गातात परंतु पोपटा प्रमाणे म्हणून बाबा देखील म्हणतात
भक्तांना समजावून सांगा. भक्त जेव्हा स्वतःला नीच, पापी म्हणतात तर त्यांना विचारा
की काय तुम्ही जेव्हा शांतीधाममध्ये होता तर तिथे पाप करत होता का? तिथे तर सर्व
आत्मे पवित्र असतात. इथे अपवित्र बनले आहेत कारण तमोप्रधान दुनिया आहे. नवीन
दुनियेमध्ये तर पवित्रच असतात. अपवित्र बनवणारा आहे - रावण.
यावेळी भारत खास आणि
आम साऱ्या दुनियेवर रावणाचे राज्य आहे. यथा राजा-राणी तथा प्रजा. हाइएस्ट, लोएस्ट (अति
उच्च, अति नीच). इथे सर्व पतित आहेत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला पावन बनवून जातो
मग तुम्हाला पतित कोण बनवतो? रावण. आता पुन्हा तुम्ही माझ्या मताद्वारे पावन बनत
आहात आणि मग अर्ध्या कल्पानंतर रावणाच्या मतावर पतित बनाल अर्थात देह-अभिमानामध्ये
येऊन विकारांच्या अधीन होता. त्याला आसुरी मत म्हटले जाते. भारत पावन होता तोच आता
पतित बनला आहे पुन्हा पावन बनणार आहे. पावन बनविण्यासाठी पतित-पावन बाबांना यावे
लागते. यावेळी पाहा किती असंख्य मनुष्य आहेत. उद्या किती असतील! युद्ध सुरु होईल,
मृत्यू तर समोर उभा आहे. उद्या इतके सर्व कुठे जातील? सर्वांची शरीरे आणि ही जुनी
दुनिया विनाश होते. हे रहस्य आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे - नंबरवार
पुरुषार्थानुसार. कित्येकजण तर आपण कोणाच्या सन्मुख बसलो आहोत, ते देखील समजत नाहीत.
कमीत-कमी पद प्राप्त करणारे आहेत. ड्रामा अनुसार करूच काय शकतात, भाग्यामध्येच
नाहीये. आता तर मुलांना सेवा करायची आहे, बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही संगमयुगी
ब्राह्मण आहात, तुम्हाला बाप समान ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर बनायचे आहे. बनविणारे
बाबा मिळाले आहेत ना. देवतांची महिमा गायली जाते - ‘सर्व गुण संपन्न…’ आता तर असे
गुण असणारा कोणीही नाही. नेहमी स्वतःला विचारत रहा की, मी उच्च पद प्राप्त
करण्यासाठी कितपत लायक बनलो आहे? संगमयुगाला चांगल्या रीतीने आठवण करा. आपण संगमयुगी
ब्राह्मण पुरुषोत्तम बनणारे आहोत. श्रीकृष्ण पुरुषोत्तम आहे ना, नवीन दुनियेचा. मुले
जाणतात आपण बाबांच्या सन्मुख बसलो आहोत, तर अजूनच जास्त अभ्यास केला पाहिजे.
शिकवायचे देखील आहे. शिकवत नाही तर सिद्ध होते की तुम्ही अभ्यास करत नाही. ज्ञान
बुद्धीमध्ये टिकतच नाही. ५ टक्के सुद्धा डोक्यात येत नाही. हे देखील लक्षात राहत
नाही की आपण संगमयुगी ब्राह्मण आहोत. बुद्धीमध्ये बाबांची आठवण रहावी आणि चक्र फिरत
रहावे, स्पष्टीकरण तर खूप सोपे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे.
ते आहेत सर्वात मोठे पिता. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश
होतील’. हम सो पूज्य, हम सो पुजारी, हा मंत्र आहे तर खूप छान. त्यांनी मग आत्मा सो
परमात्मा म्हटले आहे, जे काही बोलतात एकदम चुकीचे. आपण पवित्र होतो, ८४ जन्म चक्र
फिरून आता असे बनलो आहोत. आता आपण परत जातो. आज इथे, उद्या घरी जाणार. आपण बेहद
बाबांच्या घरी जातो. हे बेहदचे नाटक आहे जे आता रिपीट होणार आहे. बाबा म्हणतात -
‘देहा सहीत देहाचे सर्व धर्म विसरून स्वतःला आत्मा समजा’. आता आपण या शरीराला सोडून
घरी जातो, हे पक्के लक्षात ठेवा, आपण आत्मा आहोत - हे देखील लक्षात रहावे आणि आपले
घर देखील लक्षात रहावे म्हणजे मग बुद्धीद्वारे साऱ्या दुनियेचा संन्यास होईल.
शरीराचा देखील संन्यास, म्हणजे सगळ्याचा संन्यास. ते हठयोगी काही साऱ्या सृष्टीचा
संन्यास थोडाच करतात, त्यांचा आहे अर्धवट संन्यास. तुम्हाला तर साऱ्या दुनियेचा
त्याग करायचा आहे, स्वतःला देह समजता तर मग कार्य देखील असेच करता. देह-अभिमानी
बनल्याने चोरी-मारी, खोटे बोलणे, पाप करणे… या सर्व सवयी लागतात. मोठ्याने बोलण्याची
देखील सवय लागते, मग म्हणतात आमचा आवाजच असा आहे. दिवसभरामध्ये २५-३० पापे देखील
करतात. खोटे बोलणे हे देखील पाप झाले ना. सवय लागते. बाबा म्हणतात - आवाज कमी करायला
शिका ना. आवाज कमी करायला वेळ थोडाच लागतो. कुत्र्याला देखील पाळतात तर तो देखील
किती चांगला तयार होतो, माकड किती हुशार असते आणि मग कोणाच्या संगतीची सवय झाली तर
डान्स इत्यादी करू लागते. पशु देखील सुधारतात. पशूंना सुधारणारे आहेत मनुष्य.
मनुष्यांना सुधारणारे आहेत बाबा. तुम्ही देखील पशु सारखे आहात. त्यामुळे मला देखील
कच्छ अवतार, वराह अवतार म्हणता. जशी तुमची कर्म आहेत, त्याहीपेक्षा मला वाईट करून
ठेवले आहे. हे देखील तुम्ही जाणता, दुनिया जाणत नाही. शेवटी तुम्हाला साक्षात्कार
होईल. कसे-कसे सजा खातात, ते देखील तुम्हाला माहीत होईल. अर्धा कल्प भक्ती केली आहे,
आता बाबा भेटले आहेत. बाबा म्हणतात - माझ्या मतावर चालला नाहीत तर अजूनच सजा वाढत
जाईल म्हणून आता पाप इत्यादी करणे सोडून द्या. आपला चार्ट ठेवा आणि त्यासोबत धारणा
देखील पाहिजे. कोणाला समजावून सांगण्याची प्रॅक्टिस देखील पाहिजे. प्रदर्शनीच्या
चित्रांवर विचार करत रहा की, आपण कोणाला कसे समजावून सांगावे. सर्वप्रथम हाच मुद्दा
घ्या की, गीतेचे भगवान कोण? ज्ञानाचा सागर तर पतित-पावन परमपिता परमात्मा आहेत ना.
हे बाबा आहेत सर्व आत्म्यांचे पिता. तर बाबांचा परिचय पाहिजे ना. ऋषी-मुनी इत्यादी
कोणालाही ना बाबांचा परिचय आहे, ना रचनेच्या आदि-मध्य-अंताचा त्यामुळे सर्वात अगोदर
तर हे समजावून सांगा आणि मग लिहून घ्या की, भगवान एकच आहे. दुसरा कोणी असू शकत नाही.
मनुष्य स्वतःला भगवान म्हणू शकत नाहीत.
तुम्हा मुलांना आता
निश्चय आहे - भगवान निराकार आहेत. बाबा आपल्याला शिकवत आहेत. आपण स्टुडंट आहोत. ते
पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, सद्गुरु देखील आहेत. एकाची आठवण कराल तर टीचर आणि
गुरु दोघांचीही आठवण येईल. बुद्धी भटकता कामा नये. फक्त ‘शिव’ एवढेच म्हणायचे नाही
तर शिव आमचे पिता देखील आहेत, सुप्रीम टीचर देखील आहेत, आम्हाला सोबत घेऊन जातील.
त्या एकाची किती महिमा आहे, त्यांचीच आठवण करायची आहे. काहीजण म्हणतात - याने तर
जाऊन बी.के. ना आपला गुरु बनवले आहे. तुम्ही गुरू तर बनता ना. परंतु तुम्हाला पिता
म्हणता येणार नाही. टीचर, गुरु म्हणता येईल परंतु पिता म्हणता येणार नाही. तिन्ही
मग त्या एका बाबांनाच म्हणणार. ते सर्वात मोठे पिता आहेत, यांच्याही वरचे देखील ते
पिता आहेत. हे चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे. प्रदर्शनीमध्ये समजावून
सांगण्याची कला पाहिजे. परंतु स्वतःमध्ये तेवढी हिंमत अनुभव करत नाहीत. मोठ-मोठ्या
प्रदर्शनी होतात तर जी चांगली-चांगली सेवाभावी मुले आहेत, त्यांनी जाऊन सेवा केली
पाहिजे. बाबा थोडेच मना करतात. पुढे चालून साधु-संत इत्यादींना देखील तुम्ही
ज्ञान-बाण मारत रहाल. जातील कुठे! एकच हट्टी (दुकान) आहे. सर्वांची सद्गती याच
दुकानातून होणार आहे. हे दुकान असे आहे, जिथे तुम्ही सर्वांना पवित्र होण्याचा
मार्ग सांगता मग बनो अथवा न बनो.
तुम्हा मुलांचे लक्ष
विशेष सेवेवर असले पाहिजे. भले मुले समजूतदार आहेत परंतु नीट सेवा करत नाहीत तर बाबा
समजतात राहूची दशा बसली आहे. दशा तर सर्वांवर परिणाम करतात ना. मायेची सावली पडते
मग दोन दिवसा नंतर ठीक होतात. मुलांनी सेवेचा अनुभव घेऊन आले पाहिजे. प्रदर्शनी तर
करत राहतात, मग का नाही मनुष्य प्रदर्शनी समजून घेतल्यानंतर लगेच असे लिहित की,
‘बरोबर गीता काही कृष्णाची नाहीये गीता तर शिवभगवानाने गायली आहे’. कोणी तर फक्त
म्हणतात - ‘हे खूप चांगले आहे. लोकांसाठी खूप कल्याणकारी आहे, सर्वांना दाखवले
पाहिजे’. परंतु मी सुद्धा हा वारसा घेणार… असे कोणी म्हणत नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
देह-अभिमानामध्ये येऊन मोठ्याने बोलायचे नाही. या सवयीला नाहीसे करायचे आहे. चोरी
करणे, खोटे बोलणे… हे सर्व पाप आहे, याच्यापासून वाचण्याकरिता देही-अभिमानी होऊन
रहायचे आहे.
२) मृत्यू समोर आहे
म्हणून बाबांच्या श्रीमतावर चालून पावन बनायचे आहे. बाबांचे बनल्यानंतर कोणतेही
वाईट कर्म करायचे नाही. सजेपासून वाचण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
लोक पसंत सभेचे
तिकीट बुक करणारे राज्य सिंहासन अधिकारी भव
कोणताही संकल्प किंवा
विचार करता तर पहिले चेक करा की, हा विचार, हा संकल्प बाबांना पसंत आहे? जे बाबांना
पसंत आहेत ते लोक पसंत स्वतः बनतात. जर कोणत्याही संकल्पामध्ये स्वार्थ असेल तर मन
पसंत म्हणता येईल आणि विश्व कल्याणार्थ असेल तर लोक पसंत किंवा प्रभू पसंत म्हणता
येईल. लोक पसंत सभेचे मेंबर बनणे अर्थात लॉ एण्ड ऑर्डरचा राज्य अधिकार किंवा राज्य
सिंहासन प्राप्त करणे.
बोधवाक्य:-
परमात्म
सोबतीचा अनुभव करा तर सर्व काही सहज अनुभव करत सुरक्षित रहाल.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”
जसे शिव-शक्ती
कंबाइंड रुप आहे तसे पांडवपती आणि पांडव हे कायमचे कंबाइंड रुप आहे. पांडवपती,
पांडवांशिवाय काहीच करू शकत नाहीत. जे कायम असे कंबाइंड रुपामध्ये राहतात त्यांच्या
पुढे बापदादा साकारमध्ये जणू काही सर्व नात्यांनी समोर असतात. जिथे बोलवाल तिथे
सेकंदामध्ये हजर होतात; म्हणूनच म्हटले जाते - हाजिरा हजूर.