27-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमची जेव्हा कर्मातीत अवस्था होईल तेव्हा विष्णुपुरीमध्ये जाल, पास विद् ऑनर होणारी मुलेच कर्मातीत बनतात’’

प्रश्न:-
तुम्हा मुलांवर दोन्ही पिता कोणती मेहनत करतात?

उत्तर:-
मुले स्वर्गाच्या लायक बनावीत. सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण बनण्याची मेहनत बापदादा दोघेही करतात. हे जसे तुम्हाला डबल इंजन मिळाले आहे. असे वंडरफुल शिक्षण शिकवतात ज्यामुळे तुम्ही २१ जन्मांची बादशाही प्राप्त करता.

गीत:-
बचपन के दिन भुला ना देना…

ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांनी गीत ऐकले. ड्रामा प्लॅन अनुसार अशा प्रकारची गाणी सिलेक्ट केलेली आहेत. मनुष्य संभ्रमित होतात की हे काय फिल्मच्या गाण्यांवर वाणी (मुरली) चालवतात. मग हे कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे! शास्त्र, वेद, उपनिषद इत्यादी सोडून दिले, आता गाण्यांवर वाणी चालते! हे देखील तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आपण बेहदच्या बाबांचे बनलो आहोत, ज्यांच्याकडून अतींद्रिय सुख मिळते अशा बाबांना विसरायचे नाही. बाबांच्या आठवणीनेच जन्म-जन्मांतरीची पापे दग्ध होतात. असे होऊ नये जे आठवण करणे सोडून द्याल आणि पापे राहून जातील. मग पद देखील कमी होईल. अशा बाबांना तर चांगल्या रीतीने आठवण करण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. जसा साखरपुडा झाला की मग एकमेकांची आठवण करू लागतात. तुमचा देखील साखरपुडा झाला आहे मग जेव्हा तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल तेव्हा विष्णुपुरी मध्ये जाल. आता शिवबाबा देखील आहेत. प्रजापिता ब्रह्मा बाबा सुद्धा आहेत. दोन इंजन मिळाली आहेत - एक निराकार, दुसरे साकार. दोघेही मेहनत करतात जेणेकरून मुलांनी स्वर्गाच्या लायक बनावे. सर्वगुण संपन्न १६ कला संपूर्ण बनायचे आहे. इथे परीक्षा पास करायची आहे. या गोष्टी कोणत्या शास्त्रांमध्ये नाहीत. हे शिक्षण अतिशय वंडरफुल आहे - भविष्य २१ जन्मासाठी. इतर जे शिक्षण असते मृत्यूलोक करिता, हे शिक्षण आहे अमरलोक करिता. त्याच्यासाठी शिकायचे तर इथेच आहे ना. जोपर्यंत आत्मा पवित्र बनत नाही तोपर्यंत सतयुगामध्ये जाऊ शकत नाही म्हणून बाबा संगमावरच येतात, यालाच पुरुषोत्तम कल्याणकारी युग म्हटले जाते. जेव्हा की तुम्ही कवडी पासून हिऱ्याप्रमाणे बनता म्हणून श्रीमतावर चालत रहा. ‘श्री श्री’, शिवबाबांनाच म्हटले जाते. माळेचा अर्थ देखील मुलांना समजावून सांगितला आहे. वरती फूल आहे शिवबाबा, मग आहे युगल मेरू. प्रवृत्ती मार्ग आहे ना. नंतर मग आहेत मणी, जे विजय प्राप्त करणारे आहेत, त्यांचीच रुद्र माळा मग विष्णूची माळा बनते. या माळेचा अर्थ कोणीही जाणत नाहीत. बाबा बसून समजावून सांगतात तुम्हा मुलांना कवडी पासून हिऱ्याप्रमाणे बनायचे आहे. ६३ जन्म तुम्ही बाबांची आठवण करत आला आहात. तुम्ही आता आशिक आहात एका माशुकचे. सर्व भक्त आहेत एका भगवंताचे. पतींचाही पती, पित्यांचाही पिता ते एकच आहेत. तुम्हा मुलांना राजांचाही राजा बनवितात. आपण स्वतः बनत नाहीत. बाबा वारंवार समजावून सांगतात - बाबांच्या आठवणीनेच तुमची जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील. साधु-संत तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे. बाबा समजावून सांगतात - चांगले अथवा वाईट संस्कार आत्माच घेऊन जाते. ते म्हणतात - बस्स, जिकडे बघतो तिकडे सर्व भगवानच भगवान आहेत. भगवंताचीच ही सर्व लिला आहे. एकदमच वाममार्गामध्ये घाणेरडे (विकारी) बनतात. असे अनेकांच्या मतावर देखील लाखो मनुष्य चालत आहेत. हे देखील ड्रामा मध्ये नोंदलेले आहे. नेहमी बुद्धीमध्ये तीन धाम लक्षात ठेवा - शांतीधाम जिथे आत्मे राहतात, सुखधाम ज्याच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात, दुःखधाम सुरू होते अर्ध्या कल्पा नंतर. भगवंताला म्हटले जाते - हेवनली गॉडफादर. ते काही हेल (नरक) स्थापन करत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी तर सुखधामच स्थापन करतो’. बाकी हा जय आणि पराजयाचा खेळ आहे. तुम्ही मुले श्रीमतावर चालून आता मायारूपी रावणावर विजय प्राप्त करता. मग अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य सुरू होते. तुम्ही मुले आता युद्धाच्या मैदानावर आहात. हे बुद्धीमध्ये धारण करायचे आहे आणि मग इतरांना समजावून सांगायचे आहे. आंधळ्यांची काठी बनून घराचा रस्ता सांगायचा आहे कारण सर्व घराला विसरले आहेत. म्हणतात देखील की, हे एक नाटक आहे. परंतु याचा कालावधी लाखो हजारो वर्षे आहे असे म्हणतात. बाबा समजावून सांगतात रावणाने तुम्हाला किती आंधळे (ज्ञान नेत्रहीन) बनविले आहे. आता बाबा सर्व गोष्टी समजावून सांगत आहेत. बाबांनाच नॉलेजफुल म्हटले जाते. याचा अर्थ हा नाही की प्रत्येकाच्या अंतर्मनाला जाणणारे आहेत. ते तर रिद्धी-सिद्धीवाले शिकतात जे तुमच्या अंतर्मनातील गोष्टी तुम्हाला सांगतात. नॉलेजफुलचा अर्थ हा नाही आहे. ही तर बाबांचीच महिमा आहे. ते ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर आहेत. मनुष्य तर म्हणतात की ते अंतर्यामी आहेत. आता तुम्ही मुले समजता की ते तर टीचर आहेत, आपल्याला शिकवतात. ते रूहानी पिता देखील आहेत, रूहानी सद्गुरु देखील आहेत. ते जिस्मानी टीचर, गुरु असतात, परंतु तेही वेग-वेगळे असतात, तिन्ही एकच असू शकत नाही. फारफार तर कोणी-कोणी पिता मग टीचर देखील असतात. परंतु गुरु काही असू शकत नाहीत. ते तरीही मनुष्य आहेत. इथे तर ते सुप्रीम रूह परमपिता परमात्मा शिकवतात. आत्म्याला परमात्मा म्हटले जात नाही. हे देखील कोणीच समजत नाहीत. म्हणतात - परमात्म्याने अर्जुनाला साक्षात्कार घडवला तर अर्जुन त्यांना म्हणाला, ‘बस करा, बस करा मी इतके तेज सहन करू शकत नाही’. हे सर्व जे ऐकले आहे त्यामुळे समजतात परमात्मा इतके तेजस्वी आहेत. अगोदर बाबांकडे येत असत तर तेव्हा ध्यानामध्ये जात होते. म्हणत असत - ‘बस करा, खूप तेज आहे, आम्ही सहन करू शकत नाही’. जे ऐकलेले आहे तीच भावना बुद्धीमध्ये राहते. बाबा म्हणतात - जे ज्या भावनेने आठवण करतात, मी त्यांची भावना पूर्ण करू शकतो. कोणी गणेशाचा पुजारी असेल तर त्याला गणेशचा साक्षात्कार घडवतील. साक्षात्कार झाल्याने मग समजतात की, बस्स मुक्तिधाममध्येच पोहोचलो. परंतु नाही, मुक्तिधाममध्ये कोणीही जाऊ शकत नाही. नारदाचे देखील उदाहरण आहे. तो शिरोमणी भक्त गायला गेला आहे. त्याने विचारले मी लक्ष्मीला वरू शकतो का? तर म्हणाले - तुझे तोंड तर बघ. भक्तमाळा सुद्धा असते. महिलांमध्ये मीरा आणि पुरुषांमध्ये नारद मुख्य गायले गेले आहेत. इथे ज्ञानामध्ये मग मुख्य शिरोमणी आहे सरस्वती. नंबरवार तर असतात ना.

बाबा समजावून सांगतात मायेपासून खूप सावध रहायचे आहे. माया असे उलटे काम करून घेईल. मग शेवटी खूप रडावे लागेल, पश्चात्ताप करावा लागेल - भगवान आले आणि आम्ही वारसा घेऊ शकलो नाही! मग प्रजेमध्ये सुद्धा दास-दासी बनतील. शेवटी शिक्षण तर पूर्ण होते, मग खूप पश्चाताप करावा लागतो म्हणून बाबा अगोदरच सांगतात जेणेकरून नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. जितकी बाबांची आठवण करत रहाल तितकी योग अग्नीने पापे भस्म होतील. आत्मा सतोप्रधान होती मग त्यामध्ये खाद पडत-पडत तमोप्रधान बनली आहे. गोल्डन, सिल्व्हर, कॉपर, आयरन… नावे देखील आहेत. आता आयरन एज मधून तुम्हाला गोल्डन एज मध्ये जायचे आहे. पवित्र बनल्याशिवाय आत्मा जाऊ शकत नाही. सतयुगामध्ये पवित्रता होती तर शांती, समृद्धी देखील होती. इथे पवित्रता नाही तर शांती, समृद्धी सुद्धा नाही. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तर बाबा समजावून सांगत आहेत - हे लहानपणीचे दिवस (ज्ञानाचे सुरुवातीचे दिवस) विसरू नका. बाबांनी ॲडॉप्ट केले आहे ना. ब्रह्माद्वारे ॲडॉप्ट करतात, हे ॲडॉप्शन आहे (हे दत्तकविधान आहे). पत्नीला ॲडॉप्ट केले जाते. बाकी मुलांना मग क्रिएट केले जाते (जन्माला घातले जाते). पत्नीला रचना म्हणता येणार नाही. हे बाबा देखील ॲडॉप्ट करतात की, तुम्ही माझी तीच मुले आहात ज्यांना कल्पापूर्वी ॲडॉप्ट केले होते. ॲडॉप्टेड मुलांनाच बाबांकडून वारसा मिळतो. उच्च ते उच्च बाबांकडून उच्च ते उच्च वारसा मिळतो. ते आहेतच भगवान मग दुसऱ्या क्रमांकावर आहेत लक्ष्मी-नारायण सतयुगाचे मालक. आता तुम्ही सतयुगाचे मालक बनत आहात. अजून संपूर्ण बनले नाही आहात, बनत आहात.

पावन बनून पावन बनविणे, हीच खरी रुहानी सेवा आहे. तुम्ही आता रूहानी सेवा करता म्हणून तुम्ही खूप श्रेष्ठ आहात. शिवबाबा पतितांना पावन बनवितात. तुम्ही देखील पावन बनवता. रावणाने किती तुच्छ-बुद्धी बनवले आहे. आता बाबा मग लायक बनवून विश्वाचा मालक बनवितात. अशा बाबांना मग दगड-मातीमध्ये कसे म्हणू शकता? बाबा म्हणतात - हा खेळ बनलेला आहे. कल्पानंतर पुन्हा असेच होईल. आता ड्रामा प्लॅन अनुसार मी आलो आहे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. यामध्ये जरा देखील फरक पडू शकत नाही. बाबा एका सेकंदाने सुद्धा उशीर करू शकत नाहीत. जसे बाबांचे रिइनकारनेशन (अवतरण) होते, तसेच तुम्हा मुलांचे देखील रिइनकारनेशन (अवतरण) होते, तुम्ही अवतारी आहात. आत्मा इथे येऊन मग साकारमध्ये पार्ट बजावते, याला म्हटले जाते अवतरण. वरून खाली आले पार्ट बजावण्याकरिता. बाबांचा देखील दिव्य, अलौकिक जन्म आहे. बाबा स्वतः म्हणतात मला प्रकृतीचा आधार घ्यावा लागतो. मी या शरीरामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) प्रवेश करतो. हे माझे मुकर्रर (ठरलेले) शरीर आहे. हा खूप मोठा वंडरफुल असा खेळ आहे. या नाटकामध्ये प्रत्येकाचा पार्ट नोंदलेला आहे जो बजावतच राहतात. २१ जन्मांचा पार्ट पुन्हा असाच बजावणार. तुम्हाला क्लिअर नॉलेज मिळाले आहे ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. बाबा महारथींची महिमा तर करतात ना. हे जे दाखवतात पांडव आणि कौरवांचे युद्ध झाले, या सर्व आहेत बनावटी गोष्टी. आता तुम्ही समजता ते आहेत देहधारी डबल हिंसक, तुम्ही आहात रूहानी डबल अहिंसक. बादशाही घेण्यासाठी पहा तुम्ही कसे बसले आहात. तुम्ही जाणता, बाबांच्या आठवणीने विकर्म विनाश होतील. हीच चिंता लागून राहिली आहे. सगळी मेहनत आठवण करण्यामध्येच आहे कारण भारताच्या प्राचीन योगाचे गायन आहे. ते बाहेरचे (परदेशी) देखील हा भारताचा प्राचीन योग शिकू इच्छितात. समजतात की संन्यासी लोक आम्हाला हा योग शिकवतील. वास्तविक ते शिकवत तर काहीच नाहीत. त्यांचा संन्यास आहेच हठ योगाचा. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले. सुरुवातीला तुमचेच राज्य होते. आता आहे अंत. आता तर पंचायती राज्य आहे. दुनियेमध्ये अंध:कार तर खूप आहे. तुम्ही जाणता आता तर रक्तरंजित खेळ होणार आहे. असा देखील एक खेळ दाखवतात; ही तर बेहदची गोष्ट आहे, किती खून होतील. नैसर्गिक आपत्ती येतील. सर्वांचा मृत्यू होईल. याला खुने नाहेक (विनाकारण हत्या) म्हटले जाते. याला बघण्यासाठी खूप हिंमत पाहिजे. भित्रे तर लगेच बेशुद्ध होतील, यामध्ये खूप निर्भयपणा पाहिजे. तुम्ही तर शिव शक्ती आहात ना. शिवबाबा आहेत सर्वशक्तीमान, आपण त्यांच्याकडून शक्ती घेतो, पतितापासून पावन बनण्याची युक्ती बाबाच सांगतात. बाबा एकदम सोपे मत देतात - ‘मुलांनो, तुम्ही सतोप्रधान होता, आता तमोप्रधान बनले आहात, आता बाबा म्हणतात माझी आठवण कराल तर तुम्ही पतितापासून पावन सतोप्रधान बनाल. आत्म्याला बाबांसोबत योग लावायचा आहे तर पापे भस्म होतील. ऑथॉरिटी देखील बाबाच आहेत. चित्रांमध्ये दाखवतात - विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले. त्यांच्याद्वारे सर्व वेद-शास्त्रांचे रहस्य बसून समजावून सांगितले. आता तुम्ही जाणता ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा बनतात. ब्रह्माद्वारे स्थापना करतात मग जी स्थापना झाली त्याची पालना देखील जरूर करतील ना. हे सर्व चांगल्या प्रकारे समजावून सांगितले जाते, जे समजतात त्यांना हा विचार राहील की हे रूहानी नॉलेज सर्वांना कसे मिळाले पाहिजे. आपल्या जवळ धन आहे तर का नाही सेंटर उघडायचे. बाबा म्हणतात - ठीक आहे, भाड्यानेच घर घ्या, त्यामध्ये हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी उघडा. योगाद्वारे आहे मुक्ती, ज्ञानाद्वारे आहे जीवनमुक्ती. दोन वारसे मिळतात. यामध्ये केवळ ३ पावले पृथ्वी पाहिजे, आणखी काही नाही. गॉड फादरली युनिव्हर्सिटी उघडा. विश्व विद्यालय किंवा युनिव्हर्सिटी, गोष्ट तर एकच आहे. ही मनुष्यापासून देवता बनण्याची किती मोठी युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला विचारतील - ‘तुमचा खर्च कसा चालतो?’ अरे, बी.के.च्या बाबांना इतकी भरपूर मुले आहेत, तुम्ही विचारायला आले आहात! बोर्डावर पहा काय लिहिलेले आहे? अतिशय वंडरफुल नॉलेज आहे. बाबा देखील वंडरफुल आहेत ना. तुम्ही विश्वाचे मालक कसे बनता? शिवबाबांना म्हणणार ‘श्री श्री’ कारण उच्च ते उच्च आहेत ना. लक्ष्मी-नारायणाला म्हणणार श्री लक्ष्मी, श्री नारायण. या सर्व व्यवस्थित धारण करण्याच्या गोष्टी आहेत. बाबा म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकवतो. ही आहे खरी-खरी अमर कथा. फक्त एका पार्वतीला थोडीच अमर कथा ऐकवली असेल. कित्येक मनुष्य अमरनाथला जातात. तुम्ही मुले बाबांकडे आले आहात रिफ्रेश होण्यासाठी. मग सर्वांना समजावून सांगायचे आहे, जाऊन रिफ्रेश करायचे आहे, सेंटर उघडायचे आहेत. बाबा म्हणतात फक्त पृथ्वीची तीन पावले घेऊन हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी उघडत जा तर अनेकांचे कल्याण होईल. यामध्ये खर्च तर काहीच नाही. हेल्थ, वेल्थ आणि हॅपिनेस एका सेकंदामध्ये मिळतो. बाळ जन्मले आणि वारसदार झाले. तुम्हाला देखील निश्चय झाला आणि विश्वाचे मालक बनलात. नंतर मग पुरुषार्थावर अवलंबून आहे. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अंतिम खुने नाहेक (रक्तरंजित) दृश्य पाहण्यासाठी खूप-खूप निर्भय, शिव शक्ती बनायचे आहे. सर्वशक्तिमान बाबांच्या आठवणीने शक्ती घ्यायची आहे.

२) पावन बनून, पावन बनविण्याची खरी रूहानी सेवा करायची आहे. डबल अहिंसक बनायचे आहे. आंधळ्यांची काठी बनून सर्वांना घराचा रस्ता सांगायचा आहे.

वरदान:-
‘मी’ आणि ‘माझे’पणाला समाप्त करून समानता आणि संपूर्णतेचा अनुभव करणारे सच्चे त्यागी भव

प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक संकल्पामध्ये बाबा-बाबा आठवणीत रहावा, ‘मी’पणा समाप्त व्हावा, जेव्हा ‘मी’ नाही तर ‘माझे’ देखील नाही. माझा स्वभाव, माझे संस्कार, माझी नेचर, माझे काम किंवा ड्युटी, माझे नाव, माझी शान… हा ‘मी’ आणि ‘माझे’पणा जेव्हा समाप्त होतो तर हीच समानता आणि संपूर्णता आहे. हा ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा त्यागच मोठ्यात मोठा सूक्ष्म त्याग आहे. या ‘मी’पणाच्या अश्वाला अश्वमेध यज्ञामध्ये स्वाहा करा तेव्हा अंतिम आहुती पडेल आणि विजयाचे ढोल वाजतील.

बोधवाक्य:-
‘हां जी’ करून सहयोगाचा हात देणे अर्थात आशीर्वादांच्या माळा घालणे.

आपल्या शक्तिशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

मनसा द्वारे सकाश तेव्हा देऊ शकाल जेव्हा निरंतर एकरस स्थितीमध्ये स्थित होण्याचा अभ्यास असेल. यासाठी पहिले व्यर्थ संकल्पांना शुद्ध संकल्पामध्ये परिवर्तन करा. मग मायेद्वारे येणाऱ्या अनेक प्रकारच्या विघ्नांना ईश्वरीय प्रेमाच्या आधारे नष्ट करा. ‘एक बाप दुसरा न कोई’, या पाठाद्वारे एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा.