27-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाप समान दयाळू आणि कल्याणकारी बना, शहाणा तो जो स्वतः देखील पुरुषार्थ करेल आणि दुसऱ्यांकडून देखील करवून घेईल”

प्रश्न:-
तुम्ही मुले आपल्या अभ्यासावरून कोणते चेकिंग करू शकता, तुमचा पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
अभ्यासावरून तुम्ही चेकिंग करू शकता की आपण उत्तम पार्ट बजावत आहोत का मध्यम का कनिष्ठ. सर्वात उत्तम पार्ट त्यांचा म्हणणार जे दुसऱ्यांना देखील उत्तम बनवितात अर्थात सेवा करून ब्राह्मणांची वृद्धी करतात. तुमचा पुरुषार्थ आहे जुनी जुत्ती (जुने शरीर) सोडून नवीन शरीर घेण्याचा. जेव्हा आत्मा पवित्र बनेल तेव्हा तिला नवीन पवित्र शरीर मिळेल.

ओम शांती।
मुले दोन्ही बाजूंनी कमाई करत आहेत. एका बाजूने आहे आठवणीच्या यात्रेद्वारे कमाई आणि दुसऱ्या बाजूने आहे ८४ च्या चक्राच्या ज्ञानाचे चिंतन करून कमाई. याला म्हटले जाते डबल कमाई आणि अज्ञान काळामध्ये होते अल्पकाळाची क्षणभंगुर सिंगल कमाई. ही तुमच्या आठवणीच्या यात्रेची कमाई खूप मोठी आहे. आयुर्मान देखील वाढते, पवित्र सुद्धा बनता. सर्व दुःखांपासून सुटका होते. खूप मोठी कमाई आहे. सतयुगामध्ये आयुर्मान देखील वाढते. दुःखाचे नाव सुद्धा नाही कारण तिथे रावणराज्यच नाही. अज्ञान काळामध्ये शिक्षणाचे अल्पकाळासाठी सुख असते आणि दुसरे शिक्षणाचे सुख, शास्त्र पठण करणाऱ्यांना देखील मिळते. त्यांच्यापासून फॉलोअर्स ना काहीच फायदा नसतो. तसे देखील ते फॉलोअर्स सुद्धा नाहीत कारण ते ना ड्रेस इत्यादी बदलत आणि ना घरदार सोडत तर फॉलोअर्स कसे म्हणू शकतो! तिथे (सतयुगामध्ये) तर शांती, पवित्रता सर्व आहे. इथे अपवित्रतेमुळे घरा-घरामध्ये किती अशांती असते. तुम्हाला मत मिळते ईश्वराचे. आता तुम्ही आपल्या बाबांची आठवण करा. स्वतःला ईश्वरीय गव्हर्मेंट समजा. परंतु तुम्ही आहात गुप्त. मनातून किती आनंद झाला पाहिजे. आता आपण आहोत श्रीमतावर. त्यांच्या शक्तीने सतोप्रधान बनत आहोत. इथे तर कोणते राज्य-भाग्य घ्यायचे नाहीये. आपले राज्य-भाग्य असतेच नवीन दुनियेमध्ये. आता त्याची आपल्याला माहिती झाली आहे. या लक्ष्मी-नारायणाच्या ८४ जन्मांची कहाणी तुम्ही सांगू शकता. भले कोणीही मनुष्यमात्र असेल, कोणी कसाही शिकवणारा असेल परंतु एकही असे म्हणू शकणार नाही की, ‘या, याल तर आम्ही यांच्या ८४ जन्मांची कहाणी सांगू’. तुमच्या बुद्धीमध्ये आता हि कहाणी लक्षात आहे, विचार सागर मंथन देखील करता.

आता तुम्ही आहात - ‘ज्ञान सूर्यवंशी’. सतयुगामध्ये मग ‘विष्णूवंशी’ म्हणून संबोधले जाल. ‘ज्ञानसूर्य प्रगटा…’. आता यावेळी तुम्हाला ज्ञान मिळत आहे ना. ज्ञानाद्वारेच सद्गती होते. अर्धा कल्प ज्ञान चालते आणि मग अर्धा कल्प अज्ञान पसरते. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. तुम्ही आता हुशार बनले आहात. जितके-जितके तुम्ही हुशार बनता तितके इतरांना देखील आप समान बनविण्याचा पुरुषार्थ करता. तुमचे बाबा दयाळू, कल्याणकारी आहेत तर मुलांना देखील बनले पाहिजे. जर मुले कल्याणकारी बनली नाहीत तर त्यांना काय म्हणणार? गायन देखील आहे ना - “हिम्मते बच्चे, मददे बाप”, हे देखील जरूर पाहिजे. नाहीतर वारसा कसा मिळणार. सेवेनुसारच तर वारसा मिळवता, ईश्वरीय मिशन आहात ना. जसे ख्रिश्चनांचे मिशन, इस्लामींचे मिशन असते, आपल्या धर्माची वृद्धी करतात. तुम्ही आपल्या ब्राह्मण धर्माला आणि देवता धर्माला वाढवता. ड्रामा अनुसार तुम्ही मुले जरूर मदतगार बनणार. कल्पापूर्वी जो पार्ट बजावला होता तो जरूर बजावणार. तुम्ही बघत आहात प्रत्येकजण आपला उत्तम, मध्यम, कनिष्ठ पार्ट बजावत आहेत. सर्वात उत्तम पार्ट ते बजावतात, जे उत्तम बनणारे आहेत. तर सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे आणि आदि, मध्य, अंतचे रहस्य समजावून सांगायचे आहे. ऋषी-मुनी इत्यादी देखील नेती-नेती (आम्हाला माहित नाही) म्हणून निघून गेले. आणि मग असे म्हणतात सर्वव्यापी आहे, बाकी काहीच जाणत नाहीत. ड्रामा अनुसार आत्म्याची बुद्धी देखील तमोप्रधान बनते. शरीराची बुद्धी म्हणणार नाही. आत्म्यामध्येच मन-बुद्धी आहे. हे व्यवस्थित समजून घेऊन मग मुलांनी चिंतन करायचे आहे. आणि नंतर मग समजावून सांगायचे असते. ते लोक शास्त्र इत्यादी ऐकविण्यासाठी किती दुकाने उघडून बसले आहेत. तुमचे देखील दुकान आहे. मोठ-मोठ्या शहरांमध्ये मोठी दुकाने पाहिजेत. जी मुले कुशाग्र असतात, त्यांच्याकडे भरपूर खजिना असतो. जर तितकासा खजिना नसेल तर कुणाला देऊ देखील शकणार नाहीत! धारणा नंबरवार होते. मुलांनी चांगल्या प्रकारे धारणा करायची आहे जेणेकरून कुणालाही समजावून सांगू शकतील. काही मोठी गोष्ट नाहीये, बाबांकडून वारसा घेणे तर सेकंदाची गोष्ट आहे. तुम्ही आत्म्यांनी बाबांना ओळखले आहे तर बेहदचे मालक बनलात. मालक देखील नंबरवार असतात. राजा देखील मालक, तर प्रजा देखील म्हणेल की आम्ही देखील मालक आहोत. इथे देखील सर्वजण म्हणतात ना, ‘आमचा भारत’. तुम्ही देखील म्हणता - श्रीमतावर आम्ही आमचा स्वर्ग स्थापन करत आहोत, मग स्वर्गामध्ये देखील राजधानी आहे. अनेक प्रकारची पदे (स्टेटस) आहेत. पुरुषार्थ केला पाहिजे उच्च पद मिळविण्यासाठी. बाबा म्हणतात - आता पुरुषार्थ करून जितके पद मिळवाल, तेच कल्प-कल्पांतरासाठी होईल. परीक्षेमध्ये कोणाचे मार्क्स कमी होतात तर मग हार्टफेल देखील होते. ही तर आहे बेहदची गोष्ट. पूर्ण पुरुषार्थ नाही केला तर मग निराश देखील होतील, सजा देखील भोगावी लागेल. त्यावेळेस करू तरी काय शकणार! काहीच नाही. आत्मा काय करेल! ते लोक तर जीवाचा घात करतात, बुडून मरतात. यामध्ये घात इत्यादी करून घेण्याची गोष्टच नाही. आत्म्याचा तर घात होतच नाही, ती तर अविनाशी आहे. बाकी शरीराचा घात होतो, ज्याद्वारे तुम्ही पार्ट बजावता. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात - ही जुनी जुत्ती (जुने शरीर) सोडून आपण नवीन दैवी शरीर घ्यावे. हे कोण म्हणते? आत्मा. जसे मुले म्हणतात ना - आम्हाला नवीन कपडे द्या. आम्हा आत्म्यांना देखील नवीन कपडा पाहिजे (नवीन शरीर पाहिजे). बाबा म्हणतात तुमची आत्मा नवीन बनली तर शरीर देखील नवीन पाहिजे तेव्हाच शोभा येईल. आत्मा पवित्र बनल्याने ५ तत्व देखील नवीन बनतात. ५ तत्वांपासूनच तर शरीर बनते. जेव्हा आत्मा सतोप्रधान असते तर शरीर देखील सतोप्रधान मिळते. आत्मा तमोप्रधान आहे तर शरीर देखील तमोप्रधान असते. आता साऱ्या दुनियेतील पुतळे तमोप्रधान आहेत, दिन-प्रतिदिन दुनिया जुनी होत जाते, पतन होत जाते. नव्या पासून जुनी तर प्रत्येक वस्तू होते ना. जुनी झाली की मग नष्ट होते; हा तर साऱ्या सृष्टीचा प्रश्न आहे. नवीन दुनियेला सतयुग, जुन्या दुनियेला कलियुग म्हटले जाते. बाकी या संगमयुगा विषयी तर कुणालाच माहित नाही. तुम्हीच जाणता ही जुनी दुनिया बदलणार आहे.

आता बेहदचे बाबा जे पिता, टीचर, गुरु आहेत, त्यांचा आदेश आहे की, ‘पावन बना’. काम विकार जो महाशत्रू आहे, त्यावर विजय प्राप्त करून जगतजीत बना. जगतजीत अर्थात विष्णूवंशी बना. गोष्ट एकच आहे. या शब्दांचा अर्थ तुम्हीच जाणता. मुले जाणतात आपल्याला शिकविणारे आहेत - बाबा. आधी तर हा पक्का निश्चय पाहिजे. मूल मोठे झाल्यावर त्याला वडिलांची आठवण करावी लागते. मग टीचरची आणि नंतर गुरुची आठवण करावी लागते. वेगवेगळ्या वेळेला तिघांची आठवण करतील. इथे तर तुम्हाला तिघेही एकत्र एकाच वेळेस मिळाले आहेत. पिता, टीचर, गुरु एकच आहेत. ते लोक तर वानप्रस्थचा अर्थ देखील समजत नाहीत. वानप्रस्थमध्ये जायचे आहे म्हणून असे समजतात की, गुरु केला पाहिजे. साठी नंतर गुरु करतात. हा नियम आत्ताच निघाला आहे. बाबा म्हणतात - यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये वानप्रस्थ अवस्थेमध्ये मी यांचा सद्गुरु बनतो. बाबा देखील म्हणतात साठी नंतर सद्गुरु केला आहे जेव्हा की निर्वाणधाममध्ये जाण्याची वेळ आहे. बाबा येतातच मुळी सर्वांना निर्वाणधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. मुक्ती धाममध्ये जाऊन मग परत पार्ट बजावण्यासाठी यायचे आहे. वानप्रस्थ अवस्था तर खूप जणांची होते, मग गुरु करतात. आजकाल तर छोट्या मुलाला देखील गुरू करतात मग गुरूला दक्षिणा मिळते. ख्रिश्चन लोक ख्रिस्ती करण्यासाठी दत्तक देतात. परंतु ते काही निर्वाणधाममध्ये जात नाहीत. हे सारे रहस्य बाबा समजावून सांगतात, ईश्वराचा अंत तर ईश्वरच सांगतील. सुरुवातीपासून सांगत आले आहेत. स्वतःच्या अंता विषयी देखील माहिती देतात आणि सृष्टीचे ज्ञान देखील देतात. ईश्वर स्वतः येऊन आदि सनातन देवी-देवता धर्म अर्थात स्वर्गाची स्थापना करतात, त्याचे नाव भारतच चालत आले आहे. गीतेमध्ये फक्त श्रीकृष्णाचे नाव टाकून किती गोंधळ केला आहे. हा देखील ड्रामा आहे, हार आणि जीतचा खेळ आहे. यामध्ये हार-जीत कशी होते, हे बाबांशिवाय कोणीही सांगू शकणार नाही. हे लक्ष्मी-नारायण सुद्धा जाणत नाहीत की आपल्याला पुन्हा हार खावी लागणार आहे. हे तर फक्त तुम्ही ब्राह्मणच जाणता. शूद्र सुद्धा जाणत नाहीत. बाबाच येऊन तुम्हाला ब्राह्मणा पासून देवता बनवतात. ‘हम सो’ चा अर्थ एकदम वेगळा आहे. ‘ओम्’चा अर्थ वेगळा आहे. मनुष्य तर अर्थाशिवाय जे येईल ते बोलत राहतात. आता तुम्ही जाणता की कसे खाली पडतो (पतित होतो) आणि परत वर चढतो (पावन बनतो). हे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळते. ड्रामा अनुसार कल्पा नंतर पुन्हा बाबाच येऊन सांगतात. जे काही धर्मस्थापक आहेत, ते येऊन मग आपला धर्म आपल्या वेळेला स्थापन करतील. नंबरवार पुरुषार्था नुसार म्हणणार नाही, नंबरवार वेळेनुसार येऊन आपला-आपला धर्म स्थापन करतात. हे एक बाबाच समजावून सांगतात की, कसे मी ब्राह्मण मग सूर्यवंशी, चंद्रवंशी घराणे स्थापन करतो? आता तुम्ही आहात ज्ञान सूर्यवंशी जे मग विष्णूवंशी बनता. शब्द अतिशय काळजीपूर्वक लिहायचे आहेत, जेणेकरून कोणी चूका काढू नयेत.

तुम्ही जाणता हे ज्ञानाचे एक-एक महावाक्य रत्न, हिरे आहेत. मुलांमध्ये समजावून सांगण्यासाठी देखील खूप रिफाईननेस (सफाईदारपणा) पाहिजे. एखादा शब्द चुकीचा निघाला तर लगेच बरोबर करून समजावून सांगितले पाहिजे. सर्वात मोठी चूक आहे बाबांना विसरणे. बाबा आदेश देत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हे विसरता कामा नये. बाबा म्हणतात - तुम्ही खूप जुने आशिक आहात. तुम्हा सर्व आशिकांचा मी एक माशुक आहे. ते (दुनियावाले) तर एकमेकांच्या चेहऱ्यावर आशिक-माशुक होतात. इथे तर एकच माशुक आहे. ते एकच किती आशिकांची आठवण करतील. अनेकांना एकाची आठवण करणे तर सोपे आहे परंतु एक अनेकांची कशी आठवण करेल! बाबांना म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमची आठवण करतो. तुम्ही आमची आठवण करता का?’ अरे, आठवण तुम्हाला करायची आहे, पतिता पासून पावन होण्यासाठी. मी थोडाच पतित आहे, ज्याच्यासाठी आठवण करेन. तुमचे काम आहे आठवण करणे; कारण पावन बनायचे आहे. जे जितकी आठवण करतात आणि चांगल्या रीतीने सेवा देखील करतात, त्यांना धारणा होते. आठवणीची यात्रा खूप अवघड आहे, यामध्येच युद्ध चालते. बाकी असे नाही की ८४ चे चक्र तुम्ही विसरून जाल. हे कान सोन्याच्या भांड्या प्रमाणे पाहिजेत. जेवढी तुम्ही आठवण कराल तेवढी धारणा चांगली होईल, यामध्ये ताकद राहील म्हणून म्हणतात - आठवणीचे जौहर (शक्ती) पाहिजे. ज्ञानाने कमाई होते. आठवणीने सर्व शक्ती मिळतात नंबरवार. तलवारींमध्ये देखील जौहरमध्ये (धारदारपणामध्ये) नंबरवार फरक असतो. त्या तर आहेत स्थूल गोष्टी. मूळ गोष्ट बाबा एकच सांगतात - अल्फला (बाबांची) आठवण करा. दुनियेच्या विनाशासाठी तर हा एक ॲटोमिक बॉम्ब शिल्लक राहील आणखी काहीच नाही, त्यामध्ये ना सेना पाहिजे, ना कॅप्टन. आजकाल तर असे बनवले आहे, जे तिथे बसल्या-बसल्या बॉम्ब सोडतील. तुम्ही इथे बसल्या-बसल्या राज्य घेता, ते तिथे बसून सर्वांचा विनाश करतील. तुमचे ज्ञान आणि योग आणि त्यांचे मृत्यूचे सामान एकसमान होते. हा देखील खेळ आहे. ॲक्टर्स तर सर्वजण आहेत ना. भक्ती मार्ग पूर्ण झाला आहे, बाबाच येऊन आपला आणि रचनेच्या आदि-मध्य-अंतचा परिचय देतात. आता बाबा म्हणतात - ‘व्यर्थ गोष्टी तुम्ही ऐकू नका; म्हणून हियर नो ईविल…’. याचे चित्र बनवले आहे. आधी माकडांचे बनवत होते, आता मनुष्याचे बनवतात कारण चेहरा मनुष्याचा आहे परंतु सीरत (वर्तन) माकडा प्रमाणे आहे, म्हणून तुलना करतात. आता तुम्ही कोणाची सेना आहात? शिवबाबांची. तुम्हाला ‘बंदर’ पासून ‘मंदिर’ लायक बनवत आहेत. कुठली गोष्टी कुठे घेऊन गेले आहेत. माकड काही पूल वगैरे बांधू शकतो का? या सर्व आहेत दंतकथा. कधीही कोणी विचारले शास्त्रांना तुम्ही मानता का? तर बोला - ‘वाह! असा कुणी असेल जो शास्त्रांना मानणार नाही. सर्वात जास्त आम्ही शास्त्रांना मानतो. तुम्ही देखील इतके वाचत नसाल जितके आम्ही वाचतो. अर्धा कल्प आम्ही शास्त्रे वाचली आहेत. स्वर्गामध्ये शास्त्र, भक्तीची कोणतीही गोष्ट असत नाही. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात. तरी देखील आप समान बनवू शकत नाहीत. मुले इत्यादींच्या बंधनामुळे सेवेसाठी कुठे जाऊ शकत नाहीत. हा देखील ड्रामाच म्हणणार. बाबा म्हणतात - एक आठवडा, पंधरा दिवस कोर्स करा मग आप समान बनवायला सुरवात केली पाहिजे. जी मोठ-मोठी शहरे आहेत, राजधानीमध्ये घेराव घातला पाहिजे तेव्हा मग त्यांचा आवाज निघेल. मोठ्या व्यक्ती कोणाच्या आवाजाशिवाय निघू शकणार नाहीत. जोरदारपणे घेराव घाला म्हणजे मग पुष्कळ येतील. बाबांचे डायरेक्शन मिळते ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) ज्ञान आणि योगाद्वारे आपल्या बुद्धीला रिफाईन (स्वच्छ) बनवायचे आहे. बाबांना विसरण्याची कधीही चूक करायची नाही. आशिक बनून माशूकची आठवण करायची आहे.

२) बंधन मुक्त बनून आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. उच्च पद मिळवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थामध्ये कधीही निराश व्हायचे नाही.

वरदान:-
एका मिनिटाच्या एकाग्र स्थितीद्वारे शक्तिशाली अनुभव करणारे आणि करविणारे एकांतवासी भव
एकांतवासी बनणे अर्थात कोणत्याही एका शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित होणे. भले मग बीजरूप स्थितीमध्ये स्थित व्हा, नाहीतर लाईट-माईट हाऊसच्या स्थितीमध्ये स्थित होऊन विश्वाला लाईट-माईट द्या, नाहीतर फरिश्तेपणाच्या स्थिती द्वारे इतरांना अव्यक्त स्थितीचा अनुभव करवा. एक सेकंद अथवा एक मिनिट जरी या स्थितीमध्ये एकाग्र होऊन स्थित झालात तरी स्वतःला आणि अन्य आत्म्यांना खूप फायदा करून देऊ शकता. फक्त याची प्रॅक्टिस पाहिजे.

बोधवाक्य:-
ब्रह्माचारी तो आहे ज्याच्या प्रत्येक संकल्पामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये पवित्रतेचे व्हायब्रेशन सामावलेले आहे.