28-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - पास विथ ऑनर व्हायचे असेल तर श्रीमतावर चालत रहा, कुसंगती पासून आणि
मायेच्या वादळांपासून स्वतःला सांभाळा”
प्रश्न:-
बाबांनी
मुलांची कोणती सेवा केली, जी मुलांना देखील करायची आहे?
उत्तर:-
बाबांनी - ‘लाडक्या मुलांनो’, असे म्हणून हिऱ्यासमान बनविण्याची सेवा केली. असे
आम्हा मुलांना देखील आपल्या गोड भावांना हिऱ्यासमान बनवायचे आहे. यामध्ये कोणतीही
त्रासाची गोष्टच नाही, फक्त एवढेच सांगायचे आहे की, बाबांची आठवण करा तर हिऱ्यासारखे
बनाल.
प्रश्न:-
बाबांनी कोणता
हुकूम आपल्या मुलांना दिला आहे?
उत्तर:-
मुलांनो, तुम्ही खरी कमाई करा आणि करवून घ्या. तुम्हाला कोणाकडूनही उधार घेण्याचा
हुकूम नाही आहे.
गीत:-
इस पाप की
दुनिया से…
ओम शांती।
नव्या दुनियेमध्ये येणाऱ्या गोड-गोड रुहानी मुलांप्रती बाबा गुड मॉर्निंग करत आहेत.
रुहानी मुले नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात की खरोखर आपण या दुनियेपासून दूर जात
आहोत. कुठे? आपल्या स्वीट सायलेन्स होम मध्ये. शांतीधामच दूर आहे, जिथून आपण आत्मे
येतो ते आहे मूल वतन, हे आहे स्थूल वतन. ते आहे आम्हा आत्म्यांचे घर. त्या घरामध्ये
बाबांशिवाय इतर कोणीही घेऊन तर जाऊ शकत नाही. तुम्ही सर्व ब्राह्मण-ब्राह्मणी रूहानी
सेवा करत आहात. कोणी शिकवले आहे? दूर घेऊन जाणाऱ्या बाबांनी. किती जणांना घेऊन
जातील दूर? अगणित आहेत. एका पंड्याची मुले तुम्ही देखील सर्व पंडे आहात. तुमचे नावच
आहे पांडव सेना. तुम्ही मुले प्रत्येकाला दूर घेऊन जाण्याची युक्ती सांगता -
मनमनाभव, बाबांची आठवण करा. म्हणतात देखील - ‘बाबा, या दूनियेपासून कुठेतरी दूर
घेऊन चला’. नव्या दुनियेमध्ये तर असे काही म्हणणार नाही. इथे आहे रावण राज्य,
म्हणून म्हणतात इथून दूर घेऊन जा, इथे आराम नाही आहे. याचे नावच आहे दुःखधाम. आता
बाबा तुम्हाला कोणताही त्रास सहन करायला लावत नाहीत. भक्तिमार्गामध्ये बाबांना
शोधण्यासाठी तुम्ही किती त्रास सहन करता. बाबा स्वतः म्हणतात मी आहेच गुप्त. या
डोळ्यांनी मला कोणी पाहू शकत नाही. कृष्णाच्या मंदिरामध्ये डोके टेकविण्यासाठी
पादुका ठेवतात, मला काही पाय तर नाही आहेत जे तुम्हाला डोके टेकवावे लागेल. तुम्हाला
तर फक्त म्हणतो - ‘लाडक्या मुलांनो’; तुम्ही देखील इतरांना म्हणता - ‘गोड भावांनो,
पारलौकिक पित्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील’. बस्स, अजून कोणताही त्रास नाही.
जसे बाबा हिऱ्यासमान बनवतात, मुले देखील इतरांना हिऱ्याप्रमाणे बनवतात. हेच शिकायचे
आहे - मनुष्यांना हिऱ्याप्रमाणे कसे बनवावे? ड्रामा अनुसार कल्पा पूर्वीप्रमाणे
कल्प-कल्पाच्या संगमावर बाबा येऊन आम्हाला शिकवतात. मग आम्ही इतरांना शिकवतो. बाबा
हिऱ्यासमान बनवत आहेत. तुम्हाला माहित आहे खोजों (आगा खानच्या अनुयायींनी) आपला गुरु
आगा खानचे सोने, चांदी, हिऱ्यांमध्ये वजन केले होते. नेहरूंची सुवर्णतुला केली होती.
आता ते काही हिऱ्याप्रमाणे बनवत तर नव्हते. बाबा तर तुम्हाला हिऱ्यासमान बनवतात.
त्यांची तुम्ही कशाने तुला कराल? तुम्ही हिरे इत्यादीचे काय कराल. तुम्हाला तर गरजच
नाही. ते लोक तर रेसमध्ये खूप पैसे उधळतात. घर, प्रॉपर्टी इत्यादी बनवत राहतात.
तुम्ही मुले तर खरी कमाई करत आहात. तुम्ही कोणाकडून उधार घ्याल तर मग २१ जन्मांसाठी
भरून द्यावे लागेल. तुम्हाला कोणाकडूनही उधार घेण्याचा हुकूम नाही आहे. तुम्ही जाणता
यावेळी आहे खोटी कमाई, जी संपुष्टात येणार आहे. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) पाहिले
या तर कवड्या आहेत, मला हिरे मिळत आहेत, तर मग या कवड्यांचे काय करु? का नाही
बाबांकडून बेहदचा वारसा घ्यावा. पोटापुरते तर मिळणारच आहे. एक म्हण देखील आहे -
‘हाथ जिनका ऐसे... पहला पूर वह पा लेते हैं’ (हात ज्यांचा असा… पहिला नंबर ते
मिळवतात). बाबांना सराफ (व्यापारी) देखील म्हणतात ना. तर बाबा म्हणतात - तुमच्या
जुन्या वस्तू एक्सचेंज करतो. कोणाचा मृत्यू होतो तर त्याच्या जुन्या वस्तू
करणीघोराला (श्राद्ध करणाऱ्या भटाला) देतात ना. बाबा म्हणतात - मी तुमच्याकडून काय
घेतो, हे सॅम्पल बघा. द्रौपदी सुद्धा काही एकच तर नव्हती ना. तुम्ही सर्व द्रौपदी
आहात. खूप हाका मारता - बाबा, आम्हाला विवस्त्र होण्यापासून वाचवा. बाबा किती
प्रेमाने समजावून सांगतात - ‘मुलांनो, हा अंतिम जन्म पवित्र बना’. जसे वडील आपल्या
मुलांना सांगतात ना की, माझ्या दाढीची लाज राखा. कुळाला कलंक लावू नका. तुम्हा
गोड-गोड मुलांना किती अभिमान असला पाहिजे. बाबा तुम्हाला हिऱ्याप्रमाणे बनवतात,
यांना (ब्रह्मा बाबांना) देखील ते बाबा हिऱ्यासमान बनवतात. आठवण त्यांची (शिवबाबांची)
करायची आहे. हे ब्रम्हा बाबा म्हणतात - ‘माझी आठवण केल्याने तुमची विकर्मे विनाश
होणार नाहीत. मी तुमचा गुरु नाही. ते मला शिकवतात, मी मग तुम्हाला शिकवतो.
हिऱ्यासमान बनायचे असेल तर बाबांची आठवण करा’.
बाबांनी समजावून
सांगितले आहे भक्तिमार्गामध्ये भले कोणत्या देवतेची भक्ती करत असतात, तरीही बुद्धी
दुकान, धंदा इत्यादीकडे धावत असते, कारण त्यातून कमाई होते. बाबा (ब्रह्मा बाबा)
आपला अनुभव देखील सांगतात की जेव्हा बुद्धी इकडे-तिकडे धावत असे तेव्हा स्वतःला
चापट मारत असे - याची आठवण का येते? तर आता आम्हा आत्म्यांना एका बाबांची आठवण
करायची आहे, परंतु माया घडोघडी विसरायला लावते, ठोसा बसतो. माया बुद्धियोग तोडते.
अशाप्रकारे आपण आपल्यासोबत गोष्टी केल्या पाहिजेत. बाबा म्हणतात - आता आपले कल्याण
करा आणि दुसऱ्यांचे देखील कल्याण करा, सेंटर्स उघडा. असे बरीच मुले म्हणतात -
‘बाबा, अमक्या जागी सेंटर उघडू?’ बाबा म्हणतात - मी तर दाता आहे. मला काही आवश्यकता
नाही. ही घरे इत्यादी देखील तुम्हा मुलांसाठी बनवतात ना. शिवबाबा तर तुम्हाला
हिऱ्यासमान बनविण्यासाठी आले आहेत. तुम्ही जे काही करता ते तुमच्याच कामी येते. हे
काही गुरु नाहीत जे चेले इत्यादी बनवतील, घरे मुलेच बनवतात स्वतःला राहण्यासाठी.
हो, बनविणारे जेव्हा येतात तर आदरातिथ्य केले जाते की, तुम्ही वर नवीन घरामध्ये
जाऊन रहा. कोणी तर म्हणतात - ‘मी नवीन घरामध्ये का राहू, मला तर जुनेच चांगले वाटते.
जसे तुम्ही राहता, मी देखील राहीन. मला काही अहंकार नाहीये की मी दाता आहे.
बापदादाच राहत नाहीत तर मी का राहू? मलाही तुमच्यासोबत ठेवा. तुम्ही जितके जवळ असाल
तितके चांगले आहे’.
बाबा समजावून सांगतात
- जेवढा पुरुषार्थ कराल तेवढे सुखधाममध्ये उच्च पद प्राप्त कराल. स्वर्गामध्ये तर
सर्व जातील ना. भारतवासी जाणतात भारत पुण्य आत्म्यांची दुनिया होती, पापाचे नाव
देखील नव्हते. आता तर पाप-आत्मा बनले आहेत. हे आहे रावण राज्य. सतयुगामध्ये रावण
असत नाही. रावण राज्य असतेच अर्ध्या कल्पानंतर. बाबा इतके समजावून सांगतात तरीही
समजत नाहीत. कल्प-कल्प असे होत आले आहे. काही नवीन गोष्ट नाही. तुम्ही प्रदर्शनी
करता, लोक किती प्रचंड प्रमाणात येतात. प्रजा तर भरपूर बनेल. हिऱ्यासमान बनण्यासाठी
वेळ तर लागतो. प्रजा बनावी तेही चांगले आहे. आता आहेच कयामतचा वेळ (महाविनाशाची वेळ).
सर्वांचा हिशोब चुकता होणार आहे. आठची माळा जी बनलेली आहे ती आहे पास विथ ऑनर्सची.
आठ मणीच पहिल्या नंबरमध्ये जातात, ज्यांना जरा सुद्धा सजा होत नाही. कर्मातीत
अवस्थेला प्राप्त करतात. नंतर मग आहेत १०८, नंबरवार तर म्हणणार ना. हा पूर्वनियोजित
अनादि ड्रामा आहे, ज्याला साक्षी होऊन बघतात की कोण चांगला पुरुषार्थ करतात?
काही-काही मुले मागाहून आली आहेत, श्रीमतावर चालत राहतात. असेच श्रीमतावर चालत
राहतील तर पास विथ ऑनर्स बनून आठच्या माळेमध्ये येऊ शकतात. हो, चालता-चालता कधी
ग्रहचारी देखील येते. हा चढ-उतार सर्वांसमोर येतो. ही कमाई आहे. कधी खूप आनंदात
राहतील, कधी कमी. मायेचे वादळ किंवा कुसंगत मागे सारतो. आनंद नाहीसा होतो. गायले
देखील आहे - ‘संग तारे कुसंग बोरे’. आता रावणाचा संग बोरे (बुडवेल), रामाचा संग तारे
(तारेल). रावणाच्या मतामुळे असे बनले आहात. देवता देखील वाममार्गामध्ये जातात.
त्यांची चित्रे कशी घाणेरडी (विकारी) दाखवतात. ही निशाणी आहे वाम मार्गामध्ये
जाण्याची. भारतामध्येच रामराज्य होते, भारतामध्येच आता रावण राज्य आहे. रावण
राज्यामध्ये १०० प्रतिशत दुःखी बनतात. हा खेळ आहे. हे ज्ञान कोणालाही समजावून सांगणे
किती सोपे आहे.
(एक नर्स बाबांसमोर
बसली आहे) बाबा त्या मुलीला म्हणतात तू नर्स आहेस, ती सर्व्हीस देखील करत रहा,
सोबतच तू ही सेवा देखील करू शकतेस. पेशंटला सुद्धा हे ज्ञान ऐकवत रहा की, बाबांची
आठवण कर तर विकर्म विनाश होतील, मग २१ जन्मांसाठी तू रोगी बनणार नाहीस. योगानेच
हेल्थ आणि या ८४ च्या चक्राला जाणल्याने वेल्थ मिळते. तू तर खूप सेवा करू शकतेस,
अनेकांचे कल्याण करशील. पैसे सुद्धा जे मिळतील ते या रूहानी सेवेमध्ये लावशील.
वास्तविक तुम्ही देखील सर्व नर्सेस आहात ना. छी-छी (विकारी) मनुष्यांना देवता बनविणे
- ही नर्स सारखी सेवा झाली ना. बाबा देखील म्हणतात - मला पतित मनुष्य बोलावतात की
येऊन पावन बनवा. तुम्ही देखील रोग्यांची ही सेवा करा, तुमच्यावर कुर्बान जातील.
तुमच्याद्वारे साक्षात्कार देखील होऊ शकतो. जर योगयुक्त असाल तर मोठ-मोठे सर्जन
इत्यादी सर्व तुमच्या पायावर येऊन पडतील. तुम्ही करून पहा. इथे ढग येतात रिफ्रेश
होण्यासाठी. मग जाऊन वर्षा करून इतरांना रिफ्रेश करतील. बऱ्याच मुलांना हे देखील
माहीत नसते की पाऊस कुठून येतो? समजतात इंद्र पाऊस पाडतात. इंद्रधनुष्य म्हणतात ना.
शास्त्रांमध्ये तर किती गोष्टी लिहिलेल्या आहेत. बाबा म्हणतात - हे तरी देखील होईल,
ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे. आम्ही कोणाचे निंदा करत नाही, हा तर पूर्वनियोजित
अनादि ड्रामा आहे. सांगितले जाते की, हा भक्ती मार्ग आहे. म्हणतात देखील ज्ञान,
भक्ती, वैराग्य. तुम्हा मुलांना या जुन्या दुनियेपासून वैराग्य आहे. आप मुए मर गई
दुनिया. आत्मा शरीरापासून वेगळी झाली तर दुनियाच संपते.
बाबा मुलांना समजावून
सांगतात - गोड मुलांनो, अभ्यासामध्ये निष्काळजीपणा करू नका. सर्व काही अभ्यासावर
अवलंबून आहे. कोणी बॅरिस्टर एक लाख रुपये कमावतात आणि कोणा बॅरिस्टरला घालण्यासाठी
कोट देखील नसेल. सारे अभ्यासावर अवलंबून आहे. हा अभ्यास तर खूप सोपा आहे. स्वदर्शन
चक्रधारी बनायचे आहे अर्थात आपल्या ८४ जन्मांच्या आदि-मध्य-अंताला जाणायचे आहे. आता
या सर्व झाडाची जडजडीभूत अवस्था आहे, फाउंडेशन राहिलेले नाही आहे. बाकी सर्व झाड उभे
आहे. तसेही हा आदि सनातन देवी-देवता धर्म जो होता, ते खोड होते, ते आता नाही आहे.
धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट बनले आहेत. मनुष्य कोणाला सद्गती देऊ शकत नाहीत. बाबा बसून
या सर्व गोष्टी समजावून सांगतात, तुम्ही कायमसाठी सुखी बनता. कधी अकाली मृत्यू होत
नाही. अमका मेला, हे शब्द तिथे नसतात. तर बाबा सल्ला देतात, अनेकांना रस्ता सांगाल
तर ते तुमच्यावर कुरबान जातील. कोणाला साक्षात्कार देखील होऊ शकतो. साक्षात्कार
फक्त एम ऑब्जेक्ट आहे. त्यासाठी शिकावे तर लागेल ना. शिकल्याशिवाय थोडेच बॅरिस्टर
बनाल. असे नाही की साक्षात्कार झाला म्हणजे मुक्त झाले, मीरेला साक्षात्कार झाला,
तर असे नाही की ती कृष्णपुरीमध्ये गेली. नवधा भक्ती केल्याने साक्षात्कार होतो. इथे
मग आहे नवधा आठवण. संन्यासी मग ब्रह्मज्ञानी, तत्त्वज्ञानी बनतात. बस, ब्रह्ममध्ये
लीन व्हायचे आहे. आता ब्रह्म काही परमात्मा तर नाही आहे.
आता बाबा समजावून
सांगतात - शरीर निर्वाहासाठी आपला धंदा इत्यादी भले करा परंतु स्वतःला ट्रस्टी
समजून, तर उच्चपद मिळेल. मग मोह नष्ट होईल. हे बाबा घेऊन काय करणार? यांनी तर
सर्वकाही सोडले ना. घरदार किंवा बंगले इत्यादी तर बनवायचे नाही आहे. ही घरे बनवतात
कारण पुढे पुष्कळ मुले येतील. आबू रोड पासून इथवर रांग लागेल. तुमचा आता प्रभाव
निघाला तर डोकेच खराब करतील. मोठ्या व्यक्ती येतात तर गर्दी होते. तुमचा प्रभाव
मागाहून दिसून येणार आहे, आता नाही. बाबांची आठवण करण्याचा अभ्यास करायचा आहे
जेणेकरून पापे भस्म होतील. अशा आठवणीमध्ये शरीर सोडायचे आहे. सतयुगामध्ये शरीर
सोडाल, तेव्हा समजाल एक सोडून दुसरे नवीन घेणार. इथे तर देह-अभिमान किती असतो. फरक
आहे ना. या सर्व गोष्टी नोट करायच्या आहेत आणि करवून घ्यायच्या आहेत. इतरांना देखील
आप समान हिऱ्याप्रमाणे बनवावे लागेल. जितका पुरुषार्थ कराल, तितके उच्च पद प्राप्त
कराल. हे बाबा समजावून सांगत आहेत, हे कोणी साधु-महात्मा नाही आहेत.
हे ज्ञान खूप मजेशीर
आहे, याला चांगल्या रीतीने धारण करायचे आहे. असे नाही बाबांकडून ऐकले मग इथले इथेच
राहिले. गाण्यामध्ये देखील ऐकले ना, म्हणतात सोबत घेऊन चला. तुम्ही या गोष्टींना
पूर्वी समजत नव्हता, आता बाबांनी समजावून सांगितले आहे तेव्हा समजता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
२) खरी कमाई
करायची आहे आणि करवून घ्यायची आहे. आपल्या सर्व जुन्या गोष्टी एक्सचेंज करायच्या
आहेत. कुसंगती पासून आपल्याला सांभाळायचे आहे.
वरदान:-
जहान के नूर (संसाराला
प्रकाश देणारे) बनून भक्तांना नजरेने निहाल (तृप्त) करणारे दर्शनीय मूर्त भव सारे
विश्व तुमच्या जगातील नजरेची दृष्टी घेण्यासाठी वाट पाहत आहेत. जेव्हा तुम्ही
‘जहानचे नूर’ आपल्या संपूर्ण स्टेजपर्यंत पोहोचाल अर्थात संपूर्णतेचा नेत्र उघडाल
तेव्हा सेकंदामध्ये विश्व परिवर्तन होईल. आणि मग तुम्ही दर्शनीय मूर्त आत्मे आपल्या
नजरेने भक्त आत्म्यांना निहाल करू शकाल. नजरेने निहाल होणाऱ्यांची खूप मोठी लाईन आहे
त्यामुळे संपूर्णतेचा नेत्र उघडा रहावा. डोळे चोळत बसणे आणि संकल्पांची घुसमट आणि
डुलक्या काढणे बंद करा तेव्हाच दर्शनीय मूर्त बनू शकाल.
बोधवाक्य:-
निर्मळ स्वभाव
निर्माणतेची निशाणी आहे. निर्मळ बना तर सफलता मिळेल.
आपल्या शक्तिशाली मनसा
द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
मन-बुद्धीला
एकाग्र करण्यासाठी मनमनाभवच्या मंत्राला कायम स्मृतीमध्ये ठेवा. मनमनाभव या
मंत्राच्या प्रॅक्टिकल धारणेने पहिल्या नंबरमध्ये येऊ शकता. मनाची एकाग्रता अर्थात
एकाच्या आठवणीमध्ये राहणे, एकाग्र होणे आणि हाच एकांत आहे. जेव्हा सर्व आकर्षणांच्या
व्हायब्रेशन पासून अंतर्मुख व्हाल तेव्हा मनसाद्वारे पूर्ण विश्वाला सकाश देण्याची
सेवा करू शकाल.