28-10-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - सद्गुरूचे सर्वात पहिले श्रीमत आहे देही-अभिमानी बना, देह-अभिमान सोडून
द्या’’
प्रश्न:-
यावेळी तुम्ही
मुले कोणतीही इच्छा किंवा आशा ठेवू शकत नाही - असे का?
उत्तर:-
कारण तुम्ही सर्व वानप्रस्थी आहात. तुम्ही जाणता या डोळ्यांनी जे काही पाहत आहोत ते
विनाश होणार आहे. आता तुम्हाला काहीही नको आहे, एकदम बेगर बनायचे आहे. जर अशी कोणती
उंची वस्तू वापराल तर ती तुम्हाला अजून आकर्षित करेल, आणि मग देह-अभिमानामध्ये अडकत
रहाल. यामध्येच मेहनत आहे. जेव्हा मेहनत करून पूर्ण देही-अभिमानी बनाल तेव्हाच
विश्वाची बादशाही मिळेल.
ओम शांती।
ही पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास मुले बसली आहेत, बाबा देखील पंधरा मिनिटे बसवतात
की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. हे शिक्षण एकदाच मिळते पुन्हा कधीही
मिळणार नाही. सतयुगामध्ये असे म्हणणार नाहीत की आत्म-अभिमानी होऊन बसा. हे एकच
सद्गुरु म्हणतात, त्यांच्यासाठी म्हटले जाते - ‘एक सद्गुरु तारे, बाकी सब बोरे (बुडविणारे)’.
इथे बाबा तुम्हाला देही-अभिमानी बनवितात. स्वतः देखील देही आहेत ना. समजावून
सांगण्यासाठी म्हणतात - ‘मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता आहे’. त्यांना काही देही
बनून बाबांची आठवण करायची नाहीये. आठवण देखील तेच करतील जे आदि सनातन देवी-देवता
धर्माचे सदस्य असतील. सदस्य तर खूप असतात ना, नंबरवार पुरुषार्था नुसार. ही गोष्ट
व्यवस्थित समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची आहे. परमपिता परमात्मा तुम्हा
सर्वांचे पिता देखील आहेत आणि मग नॉलेजफुल देखील आहेत. आत्म्यामध्येच नॉलेज असते
ना. तुमची आत्मा संस्कार घेऊन जाते. बाबांमध्ये तर अगोदर पासूनच संस्कार आहेत. ते
पिता आहेत, हे तर सर्व मानतात देखील. त्यानंतर मग दुसरी विशेषता त्यांच्यामध्ये आहे
ती म्हणजे - त्यांच्यामध्ये ओरिजिनल नॉलेज आहे. बीजरूप आहेत. जसे बाबा तुम्हाला
बसून समजावून सांगतात तसे तुम्हाला मग इतरांना समजावून सांगायचे आहे. बाबा मनुष्य
सृष्टीचे बीजरूप आहेत आणि ते सत्य आहेत, चैतन्य आहेत, नॉलेजफुल आहेत, त्यांना या
संपूर्ण झाडाचे नॉलेज आहे. इतर कोणालाही या झाडाचे नॉलेजच नाही. याचे बीज आहेत बाबा,
ज्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. ज्याप्रमाणे आंब्याचे झाड आहे तर त्याचा
क्रियेटर बीजालाच म्हटले जाईल ना. ते बीज जसे पिता झाले परंतु ते जड आहे. जर ते
चैतन्य असते तर त्याला माहिती असले असते ना की, माझ्या पासून संपूर्ण झाड कसे
उत्पन्न होते; परंतु ते जड आहे, त्याचे बीज खाली पेरले जाते. हे (बाबा) तर आहेत
चैतन्य बीजरूप. हे वरती राहतात, तुम्ही देखील मास्टर बीजरूप बनता. बाबांद्वारे
तुम्हाला नॉलेज मिळते. ते आहेत उच्च ते उच्च. पद देखील तुम्ही उच्च प्राप्त करता.
स्वर्गामध्ये देखील उच्च पद पाहिजे ना. हे मनुष्य समजत नाहीत. स्वर्गामध्ये
देवी-देवतांची राजधानी आहे. राजधानीमध्ये राजा, राणी, प्रजा, गरीब, श्रीमंत इत्यादी
हे सर्व कसे बनले असतील. आता तुम्ही जाणता आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना कशी
होत आहे. कोण करतात? भगवान. बाबा मग म्हणतात - ‘मुलांनो, जे काही होते ते ड्रामा
प्लॅन अनुसार होते’. सर्व ड्रामाच्या अधीन आहे. बाबा देखील म्हणतात - ‘मी ड्रामाच्या
अधीन आहे. मला देखील पार्ट मिळालेला आहे. तोच पार्ट बजावतो’. ते आहेत सुप्रीम आत्मा.
त्यांना सुप्रीम फादर म्हटले जाते, बाकी सर्वांना तर ब्रदर्स म्हटले जाते. इतर
कोणालाही फादर, टीचर, गुरु म्हटले जात नाही. ते सर्वांचे सुप्रीम पिता देखील आहेत,
टीचर, सद्गुरु देखील आहेत. या गोष्टी विसरता कामा नये. परंतु मुले विसरतात कारण
नंबरवार पुरुषार्था नुसार राजधानी स्थापन होत आहे. प्रत्येकजण जसा पुरुषार्थ करतात,
तो लगेच स्थूलमध्ये देखील माहित होतो - हे बाबांची आठवण करतात की नाही? देही-अभिमानी
बनले आहेत की नाही? हे नॉलेजमध्ये हुशार आहेत, ॲक्टिव्हिटीवरून (कार्य व्यवहारावरून)
समजून येते. बाबा कोणाला काहीच डायरेक्ट म्हणत नाहीत, कारण मग नाराज होतील.
पश्चाताप करू लागतील की, हे बाबांनी काय म्हटले, आता सर्वजण मला काय म्हणतील! बाबा
सांगू शकतात की अमके-अमके कशी सेवा करतात. सर्व काही सेवेवर अवलंबून आहे. बाबा
देखील येऊन सेवा करतात ना. मुलांनीच बाबांची आठवण करायची आहे. आठवणीचा सब्जेक्टच
डिफिकल्ट आहे. बाबा योग आणि नॉलेज शिकवतात. नॉलेज तर खूप सोपे आहे. बाकी
आठवणीमध्येच फेल होतात. देह-अभिमान येतो. मग हे पाहिजे, ही चांगली वस्तू पाहिजे. अशा
प्रकारचे विचार येतात.
बाबा म्हणतात - ‘इथे
तर तुम्ही वनवासामध्ये आहात ना. तुम्हाला तर आता वानप्रस्थमध्ये जायचे आहे. तर मग
तुम्ही अशी कोणतीही वस्तू वापरू शकत नाही. जर अशी कोणती दुनियावी वस्तू असेल तर
आकर्षित करेल. शरीर देखील ओढ घेईल. या गोष्टी वेळो-वेळी देह-अभिमानामध्ये घेऊन
येतात. यामध्ये आहे मेहनत. मेहनती शिवाय विश्वाची बादशाही थोडीच मिळू शकेल. मेहनत
देखील नंबरवार पुरुषार्थानुसार कल्प-कल्प करत आला आहात आणि करत राहता. रिझल्ट
प्रत्यक्ष होत जाईल. स्कूलमध्ये देखील नंबरवार ट्रान्सफर होतात. टीचर समजून जातात
अमक्याने चांगली मेहनत केली आहे. याला शिकवण्याची आवड आहे. जाणीव होते. तिथे तर एका
क्लास मधून ट्रान्सफर दुसऱ्यामध्ये मग तिसऱ्यामध्ये होतात. इथे तर एकदाच शिकायचे आहे.
पुढे चालून जितके तुम्ही जवळ येत जाल तितके सर्व माहित होत जाईल. हीच खूप मेहनत
करायची आहे. जरूर उच्च पद प्राप्त कराल. हे तर जाणता, कोणी राजा-राणी बनतात, कोणी
काय बनतात, कोणी काय बनतात. प्रजा देखील खूप बनते. सर्व काही कृतीमधून स्पष्ट होते.
हे किती देह-अभिमानामध्ये राहतात, यांचे बाबांवर किती प्रेम आहे. बाबांवरच प्रेम
असायला हवे ना, भावा-भावाचे नाही. भावांवरील प्रेमाने काहीच मिळत नाही. वारसा
सर्वांना एका बाबांकडून मिळणार आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजून
माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. मुख्य गोष्ट हीच आहे. आठवणीने ताकद येईल.
दिवसेंदिवस बॅटरी भरत जाईल कारण ज्ञानाची धारणा होत जाते ना. तीर लागत राहतो.
दिवसेंदिवस तुमची उन्नती नंबरवार पुरुषार्था नुसार होत राहते. हे एकच
पिता-टीचर-सद्गुरु आहेत, जे देही-अभिमानी बनण्याचे शिक्षण देतात, दुसरे कोणीही देऊ
शकत नाही, बाकीचे सर्व तर देह-अभिमानी आहेत, आत्म-अभिमानीचे नॉलेज कोणालाच मिळत नाही.
कोणताही मनुष्य पिता, टिचर, गुरु असू शकत नाही. प्रत्येकजण आपापला पार्ट बजावत आहेत.
तुम्ही साक्षी होऊन पाहता. संपूर्ण नाटक तुम्हाला साक्षी होऊन पहायचे आहे. ॲक्ट
देखील करायची आहे. बाबा क्रियेटर, डायरेक्टर, ॲक्टर आहेत. शिवबाबा येऊन ॲक्ट करत
आहेत ना. सर्वांचे पिता आहेत ना. मुलगे किंवा मुली सर्वांना येऊन वारसा देतात. पिता
एकच आहेत आणि बाकी सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. वारसा एका बाबांकडूनच मिळतो. या
दुनियेतील तर कोणत्याही वस्तूची बुद्धीमध्ये आठवण येत नाही. बाबा म्हणतात - ‘जे काही
पाहता हे सर्व विनाशी आहे. आता तर तुम्हाला घरी जायचे आहे’. ते लोक ब्रह्मची आठवण
करतात म्हणजे घराची आठवण करतात. समजतात ब्रह्ममध्ये लीन होणार. याला म्हटले जाते -
अज्ञान. मनुष्य मुक्ती-जीवनमुक्तीसाठी जे काही सांगतात ते चुकीचे, ज्या काही
युक्त्या करतात, ते सर्व चुकीचेच आहे. खरा रस्ता तर एक बाबाच सांगतात. बाबा म्हणतात
मी तुम्हाला ड्रामा प्लॅन अनुसार राजांचाही राजा बनवतो. बरेचजण म्हणतात आमच्या
बुद्धीमध्ये राहत नाही, बाबा आमचे मुख उघडा (भाषण करायला शिकवा), कृपा करा. बाबा
म्हणतात यामध्ये बाबांना तर काही करण्याची गोष्टच नाही. मुख्य गोष्ट आहे तुम्हाला
बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे (आज्ञेप्रमाणे) चालायचे आहे. बाबांचेच योग्य डायरेक्शन
मिळते, बाकी सर्व मनुष्यांची आहेत चुकीची डायरेक्शन्स कारण सर्वांमध्ये ५ विकार
आहेत ना. अजूनच खाली उतरत-उतरत चुकीचे बनत जातात. काय-काय रिध्दी-सिद्धी इत्यादी
करत राहतात. त्यामध्ये काहीच सुख नाही. तुम्ही जाणता हे सर्व अल्पकाळाचे सुख आहे.
त्याला म्हटले जाते काग विष्ठा समान सुख. शिडीच्या चित्रावर खूप चांगल्या प्रकारे
समजावून सांगायचे आहे आणि झाडाच्या चित्रावर देखील समजावून सांगायचे आहे. कोणत्याही
धर्माच्या व्यक्तीला तुम्ही दाखवू शकता की, तुमचा धर्म स्थापन करणारा अमक्या-अमक्या
वेळेवर येतो, क्राईस्ट अमक्या वेळेवर येईल. जे दुसऱ्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये
कन्व्हर्ट झाले आहेत त्यांना हाच धर्म चांगला वाटेल, लगेच निघून येतील. दुसऱ्या
कोणाला हा धर्म चांगला वाटणारच नाही तर ते पुरुषार्थ तरी कसा करतील. मनुष्य,
मनुष्याला फाशीवर चढवतात (आपल्यामध्येच अडकवून ठेवतात), तुम्हाला तर एका बाबांच्याच
आठवणीमध्ये रहायचे आहे. ही खूप गोड फाशी आहे. आत्म्याच्या बुद्धीचा योग आहे बाबांकडे.
आत्म्याला सांगितले जाते बाबांची आठवण कर. ही आठवणीची फाशी आहे. बाबा तर वरती
राहतात ना. तुम्ही जाणता आपण आत्मा आहोत, आपल्याला बाबांचीच आठवण करायची आहे. हे
शरीर तर इथेच सोडून द्यायचे आहे. तुम्हाला हे संपूर्ण ज्ञान आहे. तुम्ही इथे बसून
काय करता? वाणी पासून परे जाण्यासाठी पुरुषार्थ करता. बाबा म्हणतात सर्वांना माझ्या
जवळ यायचे आहे. तर काळाचा देखील काळ झाले ना. तो काळ तर एकाला घेऊन जातो, तो देखील
काही कोणता काळ नाही आहे जो घेऊन जातो. हे तर ड्रामामध्ये सर्व नोंदलेले आहे. आत्मा
आपणच आपल्या वेळेवर निघून जाते. हे बाबा तर सर्व आत्म्यांना घेऊन जातात. तर आता
तुम्हा सर्वांचा बुद्धियोग आहे आपल्या घरी जाण्यासाठी. शरीर सोडण्याला मृत्यू म्हटले
जाते. शरीर नष्ट झाले, आत्मा निघून गेली. बाबांना बोलावतात देखील यासाठी की, ‘बाबा,
येऊन आम्हाला या दुनियेतून घेऊन जा. इथे आम्हाला रहायचे नाही आहे’. ड्रामा प्लॅन
अनुसार आता परत जायचे आहे. म्हणतात - ‘बाबा, इथे अपार दुःख आहे. आता इथे रहायचे
नाहीये. ही खूप घाणेरडी दुनिया आहे’. मरायचे देखील जरूर आहे. सर्वांची वानप्रस्थ
अवस्था आहे. आता वाणी पासून परे जायचे आहे. तुम्हाला कोणता काळ खाणार नाही. तुम्ही
आनंदाने जाता. शास्त्र इत्यादी जी काही आहेत ती सर्व भक्तिमार्गाची आहेत, ही तरी
देखील पुन्हा बनतील. ड्रामाची ही खूप वंडरफुल गोष्ट आहे. हा टेपरेकॉर्डर, हे घड्याळ
जे काही यावेळी बघत आहात हे सर्व पुन्हा असेल. यामध्ये गोंधळून जाण्याचा काही
प्रश्नच नाही. जगाच्या इतिहास-भूगोलाची पुनरावृत्ती याचा अर्थच आहे हुबेहुब रिपीट
होणार. आता तुम्ही जाणता आपण पुन्हा सो देवी-देवता बनत आहोत, तेच पुन्हा बनणार.
यामध्ये जरा देखील फरक पडू शकत नाही. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
तुम्ही जाणता ते
बेहदचे पिता देखील आहेत, टीचर-सद्गुरु सुद्धा आहेत. असा कोणता मनुष्य असू शकत नाही.
यांना तुम्ही बाबा म्हणता. प्रजापिता ब्रह्मा म्हणता. हे (ब्रह्मा बाबा) देखील
म्हणतात माझ्याकडून तुम्हाला वारसा मिळणार नाही. बापू गांधीजी देखील प्रजापिता
नव्हते ना. बाबा म्हणतात या गोष्टींमध्ये तुम्ही गोंधळून जाऊ नका. तुम्ही बोला -
‘आम्ही ब्रह्माला भगवान किंवा देवता इत्यादी म्हणतच नाही. बाबांनी सांगितले आहे
अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये, वानप्रस्थ अवस्थेमध्ये मी यांच्यामध्ये
प्रवेश करतो संपूर्ण विश्वाला पावन बनविण्यासाठी’. झाडाच्या चित्रामध्ये देखील दाखवा,
पहा एकदम शेवटी उभे आहेत. आता तर सर्व तमोप्रधान जड-जडीभूत अवस्थेमध्ये आहेत ना. हे
देखील तमोप्रधान अवस्थेमध्ये उभे आहेत, तिच फीचर्स आहेत. यांच्यामध्ये बाबा प्रवेश
करून यांचे नाव ब्रह्मा ठेवतात. नाहीतर तुम्ही सांगा ब्रह्मा नाव कुठून आले? हे
आहेत पतित, ते आहेत पावन. ते पावन देवताच मग ८४ जन्म घेऊन पतित मनुष्य बनतात. हे
मनुष्यापासून देवता बनणार आहेत. मनुष्यांना देवता बनविणे - हे बाबांचेच कार्य आहे.
या सर्व अतिशय अद्भुत समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे, ते बनतात (ब्रह्माबाबाच
श्रीकृष्ण बनतात) सेकंदामध्ये, मग ते ८४ जन्म घेऊन हे बनतात. बाबा यांच्यामध्ये
प्रवेश करून शिकवतात, तुम्ही देखील शिकता. यांचे देखील घराणे आहे ना.
लक्ष्मी-नारायण, राधे-कृष्णाची मंदिरे देखील आहेत. परंतु हे कोणालाच माहित नाही आहे
की, राधे-कृष्ण पहिले प्रिन्स-प्रिन्सेस आहेत जे मग लक्ष्मी-नारायण बनतात. हे बेगर
टू प्रिन्स बनतील. प्रिन्स सो बेगर बनतात. किती सोपी गोष्ट आहे. ८४ जन्मांची कहाणी
या दोन्ही चित्रांमध्ये आहे. हे, ते बनतात. युगल आहे म्हणून चार भुजा दाखवतात.
प्रवृत्ती मार्ग आहे ना. एक सद्गुरुच तुम्हाला पार घेऊन जातात. बाबा किती चांगल्या
रितीने समजावून सांगतात आणि मग दैवी गुण देखील पाहिजेत. पत्नीच्या बाबतीत पतीला
विचारा किंवा पत्नीला पतीच्या बाबतीत विचारा तर लगेच सांगतील की, यांच्यामध्ये हे
दोष आहेत, हे या गोष्टीमध्ये त्रास देतात; नाही तर म्हणतील आम्ही दोघे ठीक चालतो.
कोणी-कोणाला त्रास देत नाही, दोघेही एकमेकांचे मदतगार सोबती होऊन चालतो. आणि कोणी
एकमेकांना अपमानीत करण्याचा प्रयत्न करतात. बाबा म्हणतात - यामध्ये स्वभावाला
पूर्णतः बदलावे लागते. ते सर्व आहेत आसुरी स्वभाव. देवतांचा असतोच दैवी स्वभाव. हे
सर्व तुम्ही जाणता, असुरांचे आणि देवतांचे युद्ध झालेले नाही आहे. जुन्या
दुनियेमधील आणि नवीन दुनियेमधील आपसामध्ये भेटू कसे शकतील. बाबा म्हणतात -
‘भूतकाळामध्ये ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्याच मग लिहून ठेवल्या आहेत, त्यांना
कहाण्या म्हणणार’. सण-वार इत्यादी सर्व इथले आहेत. द्वापर पासून साजरे केले जातात.
सतयुगामध्ये साजरे केले जात नाहीत. या सर्व बुध्दीने समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
देह-अभिमानामुळे मुले बरेच पॉईंट्स विसरून जातात. नॉलेज तर सोपे आहे. ७ दिवसामध्ये
संपूर्ण नॉलेज धारण होऊ शकते. पहिले अटेंशन पाहिजे आठवणीच्या यात्रेवर. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) आपल्या
आसुरी स्वभावाला बदलून दैवी स्वभाव धारण करायचा आहे. एकमेकांचा मदतगार बनून चालायचे
आहे, कोणालाही त्रास द्यायचा नाही.
वरदान:-
स्वतःमध्ये
सर्व शक्तींना इमर्ज रूपामध्ये अनुभव करणारे सर्व सिद्धी स्वरूप भव लौकिकमध्ये
जेव्हा कोणाकडे कोणत्या गोष्टीची शक्ती असते, मग ती धनाची असो, बुद्धीची असो,
नाहीतर संबंध-संपर्काची… तर त्याला निश्चय राहतो की ही काही मोठी गोष्ट आहे काय. ते
शक्तीच्या आधारावर सिद्धी प्राप्त करतात. तुमच्याकडे तर सर्वशक्ती आहेत, अविनाशी
धनाची शक्ती नेहमी सोबत आहे, बुद्धीची देखील शक्ती आहे तर पोझिशनची देखील शक्ती आहे,
सर्व शक्ती तुमच्यामध्ये आहेत, यांना फक्त इमर्ज रूपामध्ये अनुभव करा तर वेळेवर विधी
द्वारे सिद्धी प्राप्त करून सिद्धी स्वरूप बनाल.
बोधवाक्य:-
मनाला प्रभुची
ठेव समजून त्याला नेहमी श्रेष्ठ कार्यामध्ये लावा.