29-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला आपल्या योग बळानेच विकर्म विनाश करून पावन बनून पावन दुनिया
बनवायची आहे, हीच तुमची सेवा आहे”
प्रश्न:-
देवी-देवता
धर्माची कोणती विशेषता गायली गेली आहे?
उत्तर:-
देवी-देवता धर्मच खूप सुख देणारा आहे. तिथे दुःखाचे नामोनिशाण नसते. तुम्हा मुलांना
३/४ (तीन चतुर्थांश) सुख मिळते. जर अर्धे सुख, अर्धे दुःख असेल तर मजाच येणार नाही.
ओम शांती।
भगवानुवाच. भगवंतानेच समजावून सांगितले आहे की, कोणत्याही मनुष्याला भगवान म्हटले
जाऊ शकत नाही. देवतांना देखील भगवान म्हटले जात नाही. भगवान तर निराकार आहे, त्यांचे
कोणतेही साकारी अथवा आकारी रूप नाही आहे. सूक्ष्म वतनवासींचा देखील सूक्ष्म आकार आहे
म्हणून त्याला म्हटले जाते - ‘सूक्ष्म वतन’. इथे साकारी मनुष्यतन आहे म्हणून याला
‘स्थूल वतन’ म्हटले जाते. सूक्ष्म वतनमध्ये हे स्थूल ५ तत्वांचे शरीर असत नाही. हे
५ तत्वांचे मनुष्य शरीर बनलेले आहे, याला म्हटले जाते मातीचा पुतळा.
सूक्ष्मवतनवासींना मातीचा पुतळा म्हणणार नाही. देवता धर्मवाले देखील आहेत तर
मनुष्यच, परंतु त्यांना म्हणणार दैवी गुणवाले मनुष्य. हे दैवीगुण शिवबाबांकडून
प्राप्त केले आहेत. दैवी गुणवाले मनुष्य आणि आसुरी गुणवाल्या मनुष्यांमध्ये किती
फरक आहे. मनुष्यच शिवालय अथवा वेश्यालयामध्ये राहण्यालायक बनतात. सतयुगाला म्हटले
जाते शिवालय. सतयुग इथेच असते, ते काही मूलवतन किंवा सूक्ष्मवतन मध्ये नसते. तुम्ही
मुले जाणता ते शिवबाबांनी स्थापन केलेले शिवालय आहे. कधी स्थापन केले? संगमावर. हे
पुरुषोत्तम युग आहे. आता ही दुनिया आहे पतित तमोप्रधान, याला सतोप्रधान नवीन दुनिया
म्हणणार नाही. नवीन दुनियेला सतोप्रधान म्हटले जाते. तिच मग जेव्हा जुनी होते तेव्हा
तिला तमोप्रधान म्हटले जाते. मग सतोप्रधान कशी बनते? तुम्हा मुलांच्या योगबलाने.
योगबलाने तुमची विकर्म विनाश होतात आणि तुम्ही पवित्र बनता. पवित्रसाठी तर मग जरूर
पवित्र दुनिया हवी. नवीन दुनियेला पवित्र, जुन्या दुनियेला अपवित्र म्हटले जाते.
पवित्र दुनिया बाबा स्थापन करतात, पतित दुनिया रावण स्थापन करतात. या गोष्टी कोणताही
मनुष्य जाणत नाही. हे ५ विकार नसतील तर मनुष्य दुःखी होऊन बाबांची आठवण कशाला करतील!
बाबा म्हणतात - ‘मी आहेच दुःखहर्ता, सुखकर्ता’. रावणाचा ५ विकारांचा १० डोकी असलेला
पुतळा बनवला आहे. त्या रावणाला शत्रू समजून जाळतात. ते देखील असे नाही की, द्वापर
पासूनच जाळायला सुरुवात करतात. नाही, जेव्हा तमोप्रधान बनतात तेव्हा काही
मतमतांतरवाले बसून या नव्या गोष्टी काढतात. जेव्हा कोणी खूप दुःख देते तेव्हा त्याचा
पुतळा बनवतात. तर इथे देखील मनुष्यांना जेव्हा खूप दुःख मिळते तेव्हा हा रावणाचा
पुतळा बनवून जाळतात. तुम्हा मुलांना ३/४ सुख असते. जर अर्धे दुःख असेल तर मग मजाच
काय राहिली! बाबा म्हणतात, तुमचा हा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे. सृष्टी तर
अनादि बनलेली आहे. हे कोणी विचारू शकत नाही की सृष्टी का बनली, मग केव्हा पूर्ण
होईल? हे चक्र फिरतच राहते. शास्त्रांमध्ये कल्पाचा कालावधी लाखो वर्षे सांगितला आहे.
जरूर संगमयुग देखील असेल, जेव्हा सृष्टी बदलेल. आता जशी तुम्हाला जाणीव होते, तसे
इतर कोणालाही समजत नाही. एवढे सुद्धा समजत नाहीत - लहानपणी राधे-कृष्ण नाव आहे नंतर
मग स्वयंवर होते. दोघेही वेगवेगळ्या राजधानीचे आहेत मग जेव्हा त्यांचे स्वयंवर होते
तेव्हा लक्ष्मी-नारायण बनतात. या सर्व गोष्टी बाबा समजावून सांगतात. बाबाच नॉलेजफुल
आहेत. असे नाही की ते जानी-जाननहार आहेत. आता तुम्ही मुले समजता बाबा तर येऊन नॉलेज
देतात. नॉलेज पाठशाळेमध्ये मिळते. पाठशाळेमध्ये एम ऑब्जेक्ट तर जरूर असले पाहिजे.
आता तुम्ही शिकत आहात. छी-छी (विकारी) दुनियेमध्ये राज्य करू शकत नाही. राज्य कराल
गुल-गुल (फुलांच्या) दुनियेमध्ये. राजयोग काही सतयुगामध्ये थोडेच शिकवतील.
संगमयुगावरच बाबा राजयोग शिकवतात. ही बेहदची गोष्ट आहे. बाबा केव्हा येतात, कोणालाच
माहित नाही. घोर अंधारात आहेत. ज्ञानसूर्य नावाने जपानमध्ये ते लोक स्वतःला
सूर्यवंशी संबोधतात. वास्तविक सूर्यवंशी तर देवता झाले. सूर्यवंशींचे राज्य
सतयुगामध्येच होते. गायले देखील जाते – ‘ज्ञान सूर्य प्रकटला…’ की भक्तिमार्गातील
अंधार नाहीसा होतो. नवीन दुनिया सो जुनी, जुनी दुनिया सो मग नवीन होते. हे बेहदचे
मोठे घर आहे. किती मोठा मंडप आहे. सूर्य, चंद्र, तारे किती सहयोग देतात. रात्रीचे
खूप काम चालू असते. असे देखील अनेक राजे आहेत जे दिवसा झोपतात, रात्रीचे आपली सभा
इत्यादी लावतात, खरेदीला जातात. हे अजूनही काही ठिकाणी सुरु आहे. गिरण्या इत्यादी
देखील रात्रीच्या चालतात. हा आहे हदचा दिवस आणि रात्र. ती आहे बेहदची गोष्ट. या
गोष्टी तुमच्या शिवाय इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहेत. शिवबाबांना सुद्धा
जाणत नाहीत. बाबा प्रत्येक गोष्ट समजावून सांगत राहतात. ब्रह्माच्या बाबतीतही
समजावून सांगितले आहे - प्रजापिता ब्रह्मा आहे. बाबा जेव्हा सृष्टी रचतात तर जरूर
कोणामध्ये प्रवेश तर करतील. पावन मनुष्य तर असतातच सतयुगामध्ये. कलियुगामध्ये तर
सर्व विकारातून जन्म घेतात म्हणून पतित म्हटले जाते. मनुष्य म्हणतील विकाराविना
सृष्टी कशी चालेल? अरे, देवतांना तुम्ही म्हणता संपूर्ण निर्विकारी. किती शुद्धतेने
त्यांची मंदिरे बांधतात. ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही आतमध्ये सोडणार नाहीत.
वास्तविक या देवतांना कोणीही विकारी स्पर्श करू शकत नाही. परंतु आज-काल तर पैशानेच
सर्वकाही होते. कोणी घरामध्ये मंदिर इत्यादी बनवतात तरीही ब्राह्मणालाच बोलावतात.
आता विकारी तर ते ब्राह्मण देखील आहेत, फक्त नाव ‘ब्राह्मण’ आहे. ही तर दुनियाच
विकारी आहे तर पूजा देखील विकारींकडूनच होते. निर्विकारी कुठून येतील! निर्विकारी
असतातच सतयुगामध्ये. असे नाही की जे विकारामध्ये जात नाहीत त्यांना निर्विकारी
म्हणायचे. शरीर तर तरी देखील विकारातूनच जन्माला आले आहे ना. बाबांनी एकच गोष्ट
सांगितली आहे की, हे सारे रावण राज्य आहे. राम राज्यामध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी,
रावण राज्यामध्ये आहेत विकारी. सतयुगामध्ये पवित्रता होती तर शांती, समृद्धी होती.
तुम्ही दाखवू शकता सतयुगामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. तिथे ५ विकार
असत नाहीत. ते आहेच पवित्र राज्य, जे ईश्वर स्थापन करतात. ईश्वर पतित राज्य थोडेच
स्थापन करतात. सतयुगामध्ये जर पतित असते तर धावा केला असता ना. तिथे तर कोणी
बोलावतच नाही. सुखामध्ये कोणीही आठवण करत नाहीत. परमात्म्याची महिमा देखील करतात -
सुखाचा सागर, पवित्रतेचा सागर… म्हणतात देखील - शांती व्हावी. आता मनुष्य साऱ्या
दुनियेमध्ये शांती कशी बरे स्थापन करतील? शांतीचे राज्य तर एका स्वर्गामध्येच होते.
जेव्हा कोणी आपसात भांडतात तर समेट घडवून आणावा लागतो. तिथे तर आहेच एक राज्य.
बाबा म्हणतात - ही
जुनी दुनियाच आता नष्ट होणार आहे. या महाभारत लढाईमध्ये सर्व काही नष्ट होते.
विनाशकाले विपरीत बुद्धी - शब्द देखील लिहिलेले आहेत. खरोखर पांडव तर तुम्हीच आहात
ना. तुम्ही आहात रूहानी पंडे. सर्वांना मुक्तीधामचा रस्ता सांगता. ते आहे आत्म्यांचे
घर शांतीधाम. हे आहे दुःख धाम. आता बाबा म्हणतात - या दुःखधामला बघत असताना सुद्धा
विसरून जा. बस्स, आता तर आपल्याला शांतीधामला जायचे आहे. हे आत्मा म्हणते, आत्म्याला
जाणीव होते. आत्म्याला स्मृती आली आहे की, मी आत्मा आहे. बाबा म्हणतात - ‘मी जो आहे
जसा आहे…’ दुसरे कोणीही समजू शकत नाहीत. तुम्हालाच समजावून सांगितले आहे - मी बिंदू
आहे. हे तर तुमच्या कायम लक्षात राहिले पाहिजे की, आपण ८४ चे चक्र कसे फिरलो आहोत.
यामुळे बाबांची देखील आठवण येईल, घराची देखील आठवण येईल, चक्र सुद्धा आठवेल. या
दुनियेच्या इतिहास-भूगोलाला तुम्ही जाणता. किती खंड आहेत. किती युद्ध इत्यादी झाली.
सतयुगामध्ये युद्ध इत्यादींचा काही प्रश्नच नाही. कुठे राम राज्य, कुठे रावण राज्य.
बाबा म्हणतात आता तुम्ही जणूकाही ईश्वरीय राज्यामध्ये आहात कारण ईश्वर इथे आले आहेत
राज्य स्थापन करण्यासाठी. ईश्वर स्वतः काही राज्य करत नाहीत, स्वतः राजाई घेत नाहीत.
निष्काम सेवा करतात. उच्च ते उच्च भगवान आहेत सर्व आत्म्यांचे पिता. ‘बाबा’,
म्हणताच आनंदाचा पारा एकदम चढला पाहिजे. अतींद्रीय सुख तुमच्या अंतिम अवस्थेचे गायले
गेले आहे. जेव्हा परीक्षेचे दिवस जवळ येतात, त्यावेळी सर्व साक्षात्कार होतात.
अतींद्रिय सुख देखील मुलांना नंबरवार आहे. कोणी तर बाबांच्या आठवणीमध्ये खूप आनंदी
राहतात.
तुम्हा मुलांना सर्व
दिवस हीच फिलिंग राहावी की, ओहो! बाबा, तुम्ही आम्हाला कोणापासून कोण बनवलेत!
तुमच्याकडून आम्हाला कित्ती सुख मिळते… बाबांची आठवण करताना प्रेमाचे अश्रू येतात.
कमाल आहे, तुम्ही येऊन आम्हाला दुःखातून सोडवता, विषय सागरातून क्षीरसागरामध्ये
घेऊन जाता, संपूर्ण दिवसभर हीच फिलिंग रहायला हवी. बाबा ज्यावेळी तुम्हाला आठवण
करून देतात तर तुम्ही किती गदगद होता. शिवबाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. बरोबर
शिवरात्री देखील साजरी केली जाते. परंतु लोकांनी शिवबाबांच्या ऐवजी श्रीकृष्णाचे
नाव गीतेमध्ये घातले आहे. ही मोठ्यात मोठी एकच चूक आहे. नंबर वन गीतेमध्येच चूक केली
आहे. ड्रामाच असा बनलेला आहे. बाबा येऊन ही चूक सांगतात की, पतित-पावन मी आहे की
श्रीकृष्ण? तुम्हाला मी राजयोग शिकवून मनुष्यापासून देवता बनविले. गायन देखील माझे
आहे ना. अकाल मूर्त, अजोनी… अशी महिमा श्रीकृष्णाची थोडीच करू शकतो. तो तर
पुनर्जन्मामध्ये येणारा आहे. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत, ज्यांच्या
बुद्धीमध्ये या सर्व गोष्टी राहतात. ज्ञानासोबत वर्तन देखील चांगले पाहिजे. माया
देखील काही कमी नाही. जे आधी येतील ते जरूर इतके ताकद वाले असतील. विभिन्न पार्टधारी
असतात ना. हिरो-हिरोइनचा पार्ट भारतवासीयांनाच मिळालेला आहे. तुम्ही सर्वांना रावण
राज्यातून सोडवता. श्रीमतावर तुम्हाला किती बळ मिळते. माया देखील अतिशय वाईट आहे,
चालता-चालता धोका देते.
बाबा प्रेमाचे सागर
आहेत तर तुम्हा मुलांना देखील बाप समान प्रेमाचा सागर बनायचे आहे. कधी कटू वचन बोलू
नका. कोणाला दुःख द्याल, तर दुःखी होऊन मराल. या सर्व सवयी काढून टाकल्या पाहिजेत.
वाईटात वाईट सवय आहे विषय सागरामध्ये गटांगळ्या खाणे. बाबा देखील म्हणतात - काम
महाशत्रू आहे. किती मुली मार खातात. काहीजण तर मुलीला सांगतातही, भले पवित्र रहा.
अरे, आधी स्वतः तर पवित्र बना. मुलगी दिली, खर्च इत्यादीच्या ओझ्यातून अजूनच सुटला;
कारण समजतात की, माहित नाही, हिच्या नशिबामध्ये काय आहे, घर देखील कोणते सुखी मिळेल
की नाही. आजकाल खर्च देखील खूप होतो. गरीब लोक तर लगेच देऊन टाकतात. कोणाला मग मोह
असतो. पूर्वी एक भिल्लीण येत असे, तिला ज्ञानामध्ये येऊ दिले नाही कारण जादूची भीती
होती. ईश्वराला जादूगार सुद्धा म्हणतात. दयाळू देखील ईश्वरालाच म्हणणार,
श्रीकृष्णाला थोडेच म्हणणार. दयाळू तो जो क्रूरतेपासून सोडवेल. क्रूर आहे रावण.
सर्व प्रथम आहे ज्ञान.
ज्ञान, भक्ती आणि मग वैराग्य. असे नाही की भक्ति, ज्ञान आणि मग वैराग्य म्हणायचे.
ज्ञानाचे वैराग्य थोडेच म्हणू शकतो. भक्तीचे वैराग्य करायचे असते म्हणून ज्ञान,
भक्ती, वैराग्य हे योग्य शब्द आहेत. बाबा तुम्हाला बेहदचे अर्थात जुन्या दुनियेचे
वैराग्य येण्यासाठी प्रेरित करतात. संन्यासी तर केवळ घरा-दाराचे वैराग्य करण्यासाठी
प्रेरित होतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. लोकांच्या डोक्यात शिरतच नाही.
भारत १०० टक्के पवित्र, निर्विकारी, हेल्दी होता, कधी अकाली मृत्यू होत नव्हते, या
सर्व गोष्टींची धारणा फार थोड्याजणांनाच होते. जे चांगली सेवा करतात, ते खूप
श्रीमंत बनतील. मुलांना तर संपूर्ण दिवस बाबा-बाबाच आठवणीत राहायला हवे. परंतु माया
करू देत नाही. बाबा म्हणतात सतोप्रधान बनायचे असेल तर चालता-फिरता, खाता-पिता माझी
आठवण करा. मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो, तुम्ही आठवण करणार नाही का! अनेकांना
मायेची वादळे खूप येतात. बाबा समजावून सांगतात - हे तर होणारच. ड्रामामध्ये नोंदलेले
आहे. स्वर्गाची स्थापना तर होणारच आहे. कायमची नवीन दुनिया काही राहू शकत नाही.
चक्र फिरेल त्यामुळे खाली जरूर उतरणार. प्रत्येक वस्तू नव्यापासून मग जुनी जरूर होते.
यावेळी मायेने सर्वांना एप्रिलफूल बनवले आहे, बाबा येऊन गुल-गुल (फूल) बनवतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाप समान
प्रेमाचा सागर बनायचे आहे. कधी कोणाला दुःख द्यायचे नाही. कटु वचन बोलायचे नाही.
वाईट सवयी काढून टाकायच्या आहेत.
२) बाबांसोबत गोड-गोड
गोष्टी करत या अनुभवामध्ये रहायचे आहे की, ओहो! बाबा, तुम्ही आम्हाला कोणापासून काय
बनवलेत! तुम्ही आम्हाला किती सुख दिले आहे! बाबा, तुम्ही क्षीरसागरामध्ये घेऊन जाता…
संपूर्ण दिवसभर बाबा-बाबा आणि बाबांचीच आठवण रहावी.
वरदान:-
सर्व नाती आणि
सर्व गुणांच्या अनुभूतीमध्ये संपन्न बनणारे संपूर्ण मूर्त भव
संगमयुगावर विशेषत:
सर्व प्राप्तींमध्ये स्वतःला संपन्न बनवायचे आहे त्यामुळे सर्व खजिने, सर्व नाती,
सर्व गुण आणि कर्तव्याला समोर ठेवून चेक करा की, मी सर्व गोष्टींमध्ये अनुभवी बनलो
आहे. जर कोणत्याही गोष्टीच्या अनुभवाची कमतरता असेल तर त्यामध्ये स्वतःला संपन्न
बनवा. एका जरी नात्याची अथवा गुणाची कमी असेल तर संपूर्ण स्टेज अथवा संपूर्ण मूर्त
म्हटले जाऊ शकत नाही म्हणून बाबांच्या गुणांचा किंवा आपल्या आदि स्वरूपातील गुणांचा
अनुभव करा तेव्हाच संपूर्ण मूर्त बनाल.
बोधवाक्य:-
जोशमध्ये येणे
हे देखील मनाचे रडणे आहे - आता रडण्याची फाईल बंद करा.
आपल्या शक्तिशाली
मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
मनसा सेवा करण्यासाठी
सर्व शक्तींना आपल्या जीवनाचे अंग बनवा. बाप समान असे परफेक्ट बना जेणेकरून आतमध्ये
कोणताही डिफेक्ट राहू नये तेव्हाच श्रेष्ठ संकल्पांच्या एकाग्रतेद्वारे अर्थात
मनसाद्वारे सकाश आपोआपच पसरेल.