30-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या जुन्या दुनियेमध्ये काहीही सार (अर्थ) राहिलेले नाही आहे, त्यामुळे यावर मन जडू द्यायचे नाही, बाबांची आठवण सुटली तर सजा भोगावी लागेल”

प्रश्न:-
बाबांचे मुख्य डायरेक्शन कोणते आहे? त्याचे उल्लंघन का होते?

उत्तर:-
बाबांचे डायरेक्शन आहे कोणाकडून सेवा घेऊ नका कारण तुम्ही स्वतः सेवाधारी आहात. परंतु देह-अभिमानामुळे बाबांच्या या डायरेक्शनचे उल्लंघन करतात. बाबा म्हणतात तुम्ही इथे सुख घ्याल तर तिथले (सतयुगामधील) सुख कमी होईल. बरीच मुले म्हणतात आम्ही तर स्वतंत्र राहू परंतु तुम्ही तर सर्व बाबांवर अवलंबून आहात.

गीत:-
दिल का सहारा टूट न जाए...

ओम शांती।
शिव भगवानुवाच आपल्या शाळीग्रामांप्रती. शिव आणि शाळीग्रामना तर सर्व मनुष्य जाणतात. दोन्ही निराकार आहेत. आता श्रीकृष्ण भगवानुवाच म्हणू शकत नाही. भगवान तर एकच आहेत. तर मग शिव भगवानुवाच कोणा प्रति? रूहानी मुलांप्रती. बाबांनी समजावून सांगितले आहे मुलांचे आता कनेक्शन आहेच एका बाबांसोबत कारण पतित-पावन ज्ञानाचे सागर, स्वर्गाचा वारसा देणारे तर शिवबाबाच आहेत. आठवण देखील त्यांचीच करायची आहे. ब्रह्मा आहे त्यांचा भाग्यशाली रथ. या रथाद्वारेच बाबा वारसा देत आहेत. ब्रह्मा वारसा देणारे नाहीत, ते तर घेणारे आहेत. तर मुलांनी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. उदाहरणार्थ समजा रथाला काही त्रास होतो किंवा कुठल्याही कारणाने मुलांना मुरली मिळू शकत नाही तर मुलांचे सर्व लक्ष शिवबाबांकडे जाते. ते तर कधीच आजारी पडू शकत नाहीत. मुलांना आता इतके ज्ञान मिळाले आहे की ते सुद्धा समजावून सांगू शकतात. प्रदर्शनीमध्ये मुले किती छान समजावून सांगतात. मुलांमध्ये ज्ञान तर आहे ना. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये प्रदर्शनीतील चित्रांचे ज्ञान भरलेले आहे. मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही. समजा टपाल येणे-जाणे बंद होते, संप होतो मग काय करणार? ज्ञान तर मुलांमध्ये आहे. समजावून सांगायचे आहे - सतयुग होते, आता कलियुग जुनी दुनिया आहे. गाण्यामध्ये सुद्धा सांगतात - जुन्या दुनियेमध्ये काहीच सार (अर्थ) राहिलेले नाही आहे, यावर जीव लावायचा नाही. नाहीतर सजा भोगावी लागेल. बाबांच्या आठवणीने सजा कमी होत जाईल. असे होऊ नये की बाबांची आठवण विसराल आणि सजा भोगावी लागेल आणि पुन्हा जुन्या दुनियेमध्ये निघून जाल. असे तर भरपूरजण गेले आहेत, ज्यांना बाबांची आठवण सुद्धा नाही आहे. जुन्या दुनियेमध्ये मन लागले आहे, जमाना खूप वाईट आहे. कोणावर मन जडले तर खूप सजा मिळेल. मुलांनी ज्ञान ऐकायचे आहे. भक्तीमार्गाची गाणी सुद्धा ऐकायची नाहीत. आता तुम्ही आहात संगमयुगावर. ज्ञानसागर बाबांकडून तुम्हाला संगमावरच ज्ञान मिळते. दुनियेमध्ये हे कोणालाही माहित नाही आहे की, ज्ञानसागर एकच आहेत. ते जेव्हा ज्ञान देतात तेव्हाच मनुष्यांची सद्गती होते. सद्गती दाता एकच आहेत तर मग त्यांच्या मतावर चालायचे आहे. माया कोणालाही सोडत नाही. देह-अभिमान आल्यानंतरच काही ना काही चुक होते. कोणी थोडे काम-वश होतात, कोणी क्रोध-वश. मनसामध्ये भरपूर वादळे येतात - प्रेम करावे, असे करावे... कोणाच्याही शरीरावर मन जडू द्यायचे नाही. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा तर शरीराचे भानच राहणार नाही. नाहीतर बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन होते. देह-अहंकारामुळे खूप नुकसान होते म्हणूनच देहा सहीत सर्व काही विसरून जायचे आहे. फक्त बाबांची आणि घराची आठवण करायची आहे. आत्म्यांना बाबा समजावून सांगत आहेत, शरीराने काम करत असताना माझी आठवण करा तर विकर्म भस्म होतील. मार्ग तर खूप सोपा आहे. हे देखील समजतात तुमच्याकडून चुका तर होत राहतात. परंतु असे होऊ नये की चुकांमध्ये अडकतच जाल. एकदा जी चूक झाली ती चूक पुन्हा करता कामा नये. कान पकडला पाहिजे की, पुन्हा ही चूक होणार नाही. पुरुषार्थ केला पाहिजे. जर वारंवार चूक होत असेल तर समजले पाहिजे की आपले खूप नुकसान होणार. चुका करुन-करुनच दुर्गतीला पोचले आहात ना. एवढी मोठी शिडी उतरून काय बनले आहात! अगोदर काही हे ज्ञान तर नव्हते. आता नंबरवार पुरुषार्थानुसार ज्ञानामध्ये सर्व प्रवीण झाले आहेत. जितके शक्य आहे तितके अंतर्मुखी सुद्धा रहायचे आहे, मुखाने काहीही बोलायचे नाही. जी मुले ज्ञानामध्ये प्रवीण आहेत, ते कधी जुन्या दुनियेमध्ये मन लावणार नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये असेल आम्ही तर रावण राज्याचा विनाश करू इच्छितो. हे शरीर देखील जुन्या रावण संप्रदायाचे आहे तर मग आम्ही रावण संप्रदायाची का आठवण करावी? एका रामालाच आठवण करणार. खरेखुरे पिताव्रता बना ना.

बाबा म्हणतात - माझी आठवण करत रहा तर तुमची विकर्म विनाश होतील. पिताव्रता किंवा भगवान व्रता बनले पाहिजे. भक्त भगवंताचीच आठवण करतात की, हे ईश्वरा, येऊन आम्हाला सुख-शांतीचा वारसा द्या. भक्तिमार्गामध्ये तर कुर्बान जातात, बळी चढतात. इथे बळी चढण्याचा तर काही प्रश्नच नाही. आपण तर जिवंतपणीच मरतो जणू बळी चढतो. हे आहे जिवंतपणी बाबांचे बनणे कारण त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. त्यांच्या मतावर चालायचे आहे. जीवंतपणी बळी चढणे, आत्मसमर्पण करणे ही खरेतर आताची गोष्ट आहे. भक्तीमार्गामध्ये ते मग किती जीवांचे बळी देतात. इथे जीवघात करण्याची गोष्ट नाहीये. बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा, बाबांसोबत योग लावा, देह-अभिमानामध्ये येऊ नका. उठता-बसता बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. १०० टक्के पास तर कोणी अजून झालेला नाही आहे. वर-खाली होत राहतात. चुका होतात, त्यासाठी जर तुम्हाला सावध केले नाही तर चुका करणे सोडणार कसे? माया कोणालाच सोडत नाही. मुले म्हणतात - बाबा, आम्ही मायेकडून हरतो, पुरुषार्थ सुद्धा करतो तरी देखील माहित नाही काय होते. यामध्ये इतक्या मोठ्या चुका माहित नाही कशा होतात. समजतात देखील की यामुळे ब्राह्मण कुळामध्ये आपले नाव खराब होते. तरी देखील मायेचा असा वार होतो जो लक्षातही येत नाही. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे जसे काही अडाणी बनतात. अडाणीपणाची कृत्ये होतात तर मग निंदा सुद्धा होते आणि वारसा देखील कमी होतो. अशा खूप चुका करत राहतात. माया अशी जोरदार थोबाडीत मारते की स्वतः तर हरतातच आणि मग रागात येऊन एखाद्याला श्रीमुखात ठेऊन देतात किंवा चप्पल इत्यादी मारु लागतात आणि मग पश्चाताप सुद्धा करतात. बाबा म्हणतात, म्हणजे आता तर खूप मेहनत करावी लागेल. आपले सुद्धा नुकसान केले आणि दुसऱ्याचे देखील नुकसान केले, किती तोटा झाला. राहूचे ग्रहण लागले. आता बाबा म्हणतात - ‘दे दान तर सुटे ग्रहण’. राहूचे ग्रहण बसते तर मग ते सुटण्यासाठी वेळ लागतो. शिडी चढून पुन्हा उतरणे खूप अवघड आहे. व्यक्तीला दारूची सवय लागली तर त्याला ती सोडण्यासाठी किती कठीण असते. सर्वात मोठी चूक आहे - तोंड काळे करणे. घडोघडी शरीराची आठवण येते. आणि मग मुले वगैरे होतात तेव्हा त्यांची आठवण येत राहते. ते मग दुसऱ्यांना ज्ञान काय देणार. त्यांचे कोणी ऐकणार देखील नाही. आपण आता सर्वांना विसरण्याचा प्रयत्न करुन फक्त एका बाबांची आठवण करतो. यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. माया खूप शक्तिशाली आहे. संपूर्ण दिवस शिवबाबांची आठवण करण्याचाच विचार बुद्धीमध्ये राहिला पाहिजे. आता नाटक पूर्ण होत आहे, आपल्याला परत जायचे आहे. हे शरीर सुद्धा नष्ट होणार आहे. जितकी बाबांची आठवण कराल तितका देह-अभिमान नष्ट होईल आणि दुसऱ्या कोणाचीही आठवण येणार नाही. किती उच्च ध्येय आहे, एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणावरही मन जडू द्यायचे नाही. नाहीतर जरूर तेच समोर येतील. जरुर बदला घेतील. खूप उच्च ध्येय आहे. सांगणे खूप सोपे आहे, लाखांतून कोणीतरी एक मणी निघतो. कोणी तर स्कॉलरशिप सुद्धा घेतात ना. जे भरपूर मेहनत करतील, जरूर स्कॉलरशिप घेतील. साक्षी होऊन पाहायचे आहे की, आपण कशी सेवा करतो? बऱ्याच मुलांची इच्छा असते भौतिक नोकरी सोडून या सेवेमध्ये लागावे. परंतु बाबा परिस्थिती देखील बघतात. एकटा आहे, कोणी नातलग नाहीत तर मग काहीच हरकत नाही. तरी देखील म्हणतात नोकरी सुद्धा करा आणि सेवा सुद्धा करा. नोकरी करताना देखील बऱ्याच जणांना भेटणे होते. तुम्हा मुलांना भरपूर ज्ञान मिळाले आहे. बाबा मुलांकडूनही खूप सेवा करवून घेतात. एखाद्याच्या तनामध्ये प्रवेश करून सेवा करतात. सेवा तर करायचीच आहे. ज्यांच्या डोक्यावर जबाबदारी आहे त्यांना झोप कशी येणार! शिवबाबा तर आहेतच जागती ज्योत. बाबा म्हणतात मी तर रात्रं-दिवस सेवा करतो, शरीर थकते. मग आत्मा तरी काय करणार, शरीर काम करत नाही. बाबा तर अथक आहेत ना. ते आहेत जागती ज्योत, साऱ्या दुनियेला जागे करतात. त्यांचा पार्टच वंडरफुल आहे, जो तुम्हा मुलांमध्ये फार थोडे जाणतात. काळांचाही काळ आहेत बाबा. त्यांची आज्ञा मानली नाहीत तर धर्मराजाकडून फटके खाल. बाबांचे मुख्य डायरेक्शन आहे कोणाकडूनही सेवा स्वीकारू नका. परंतु देह-अभिमानामध्ये येऊन बाबांच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. बाबा म्हणतात तुम्ही स्वतः सेवाधारी आहात. इथे सुख घ्याल तर तिथे (सतयुगामध्ये) तुमचे सुख कमी होईल. सवय लागते त्यामुळे मग नोकराशिवाय राहू शकत नाहीत. खूपजण म्हणतात आम्ही स्वतंत्र राहू परंतु बाबा म्हणतात अवलंबून राहणे चांगले आहे. तुम्ही सर्व बाबांवर अवलंबून आहात. स्वतंत्र झाल्याने मग कोसळतात (पतन होते). तुम्ही सर्व अवलंबून आहात शिवबाबांवर. संपूर्ण दुनिया अवलंबून आहे, म्हणूनच तर म्हणतात - ‘हे पतित-पावन या’. त्यांच्याकडूनच सुख-शांती मिळते, परंतु समजत नाहीत. हा भक्तीमार्गाचा काळ देखील पार करावाच लागतो, जेव्हा रात्र पूर्ण होते तेव्हा बाबा येतात. एका सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत नाही. बाबा म्हणतात - ‘मीच या ड्रामाला जाणतो’. ड्रामाच्या आदि, मध्य, अंताला दुसरे कोणीही जाणत नाही. सतयुगापासून हे ज्ञान प्राय: लोप होते. आता तुम्ही रचयिता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताला जाणता, यालाच ज्ञान म्हटले जाते, बाकी सर्व आहे भक्ती. बाबांना नॉलेजफुल म्हणतात. आपल्याला ते ज्ञान मिळत आहे. मुलांना खूप अत्यानंद सुद्धा झाला पाहिजे. हे देखील जाणतात की, राजधानी स्थापन होत आहे. कोणी तर प्रजेमध्ये सुद्धा साधारण नोकर-चाकर बनतात. जरा सुद्धा ज्ञान समजू शकत नाहीत. आश्चर्य आहे ना! ज्ञान तर खूप सोपे आहे. 84 जन्मांचे चक्र आता पूर्ण झाले आहे. आता आपल्या घरी जायचे आहे. आम्ही ड्रामातील मुख्य ॲक्टर्स आहोत. संपूर्ण ड्रामाला जाणले आहे. पूर्ण ड्रामामध्ये हिरो-हिरॉईन ॲक्टर आपणच आहोत. किती सोपे आहे. परंतु नशिबात नसेल तर पुरूषार्थ तरी काय करणार! अभ्यासामध्ये असे होते. कोणी नापास होतात, किती मोठी शाळा आहे. राजधानी स्थापन होणार आहे. आता जितके जे शिकतील, मुले जाणू शकतात की आपल्याला कोणते पद मिळेल? भरपूर आहेत, सर्वच काही वारसदार तर बनणार नाहीत. पवित्र बनणे खूप कठीण आहे. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात, आता नाटक पूर्ण होत आहे. बाबांच्या आठवणीने सतोप्रधान बनून, सतोप्रधान दुनियेचा मालक बनायचे आहे. जितके शक्य आहे तितके आठवणीमध्ये रहायचे आहे. परंतु नशिबात नसेल तर बाबांऐवजी दुसऱ्या कोणा-कोणाची आठवण करतात. हृदय गुंतवल्याने मग रडावे सुद्धा लागते. बाबा म्हणतात - या जुन्या दुनियेवर जीव लावू नका. ही तर नष्ट होणार आहे. हे दुसऱ्या कोणालाच माहीत नाहीये. ते तर समजतात कलियुग अजून बराच काळ चालणार आहे. घोर निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. तुमची ही प्रदर्शनी प्रजा बनविण्यासाठी विहंगमार्गाची सेवा करण्याचे साधन आहे. या सेवेतून कोणी राजा-राणी सुद्धा निघतील. असे बरेच आहेत ज्यांना सेवेची खूप आवड आहे. मग कोणी गरीब, कोणी श्रीमंत आहेत. दुसऱ्यांना आप समान बनवतात, त्याचा सुद्धा फायदा तर मिळतोच ना. आंधळ्यांची काठी बनायचे आहे, फक्त एवढेच सांगायचे आहे की, पित्याची आणि वारशाची आठवण करा, विनाश समोर उभा आहे. जेव्हा विनाशाची वेळ जवळ आलेली बघतील तेव्हा तुमच्या गोष्टी ऐकतील. तुमची सेवा देखील वृद्धिंगत होत जाईल, समजतील खरोखर अगदी बरोबर आहे. तुम्ही टाहो फोडून सांगत असता की, विनाश होणार आहे.

तुमची प्रदर्शनी, जत्रा इत्यादी मधून सेवेची वृद्धि होत राहील. प्रयत्न करायचा आहे की एखादा चांगला हॉल मिळेल, भाडे देण्यासाठी तर आम्ही तयार आहोत. बोला, तुमचे नाव अजूनच प्रसिद्ध होईल. असे खूप जणांकडे हॉल रिकामे पडलेले असतात. पुरुषार्थ केल्याने पृथ्वीची ३ पावले जरूर मिळतील. तोपर्यंत तुम्ही छोट्या-छोट्या प्रदर्शनी ठेवा. तुम्ही शिवजयंती देखील साजरी कराल तर त्याचा देखील गाजावाजा होईल. तुम्ही लिहिता देखील की शिवजयंतीची सुट्टी निश्चित करा. वास्तविक जन्मदिवस तर एकाचाच साजरा केला पाहिजे. तेच पतित-पावन आहेत. खरेतर स्टॅम्प (पोस्टाचे तिकीट) देखील या त्रिमूर्तीचाच आहे. सत्य मेव जयते... ही आहे विजय प्राप्त करण्याची वेळ. समजावून सांगणारा देखील चांगला पाहिजे. सर्व सेंटरचे जे मुख्य आहेत त्यांना लक्ष द्यावे लागेल. आपला स्वतःचा स्टॅम्प काढू शकता. ही आहे त्रिमूर्ती शिवजयंती. फक्त शिवजयंती म्हटल्याने समजू शकणार नाही. आता काम तर मुलांनाच करायचे आहे. अनेकांचे कल्याण झाले तर किती मोठी लिफ्ट मिळेल, सेवेची लिफ्ट खूप मिळते. प्रदर्शनीमधून खूप सेवा होऊ शकते. प्रजा तर बनेल ना. बाबा बघतात सेवेवर कोणत्या मुलांचे लक्ष असते! हृदयामध्ये स्थान देखील तेच घेतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जर एकदा कोणती चूक झाली तर त्याचवेळी कान पकडायचा आहे, पुन्हा ती चूक होऊ नये. कधीही देह-अहंकारामध्ये यायचे नाही. ज्ञानामध्ये प्रवीण बनून अंतर्मुखी होऊन रहायचे आहे.

२) सच्चे पिताव्रता बनायचे आहे. जिवंतपणी बळी चढायचे आहे. कोणावरही मन जडू द्यायचे नाही. अडाण्यासारखे कोणतेही काम करायचे नाही.

वरदान:-
वियोगाला कायमसाठी निरोप देणारे स्नेही स्वरूप भव

जे स्नेह्याला पसंत आहे तेच स्नेह करणाऱ्याला देखील पसंत असावे - हेच स्नेहाचे स्वरूप आहे. चालणे-खाणे-पिणे-राहणे स्नेह्याला मनपसंत असावे यासाठी जे काही संकल्प किंवा कर्म कराल तेव्हा पहिले विचार करा की हे स्नेही बाबांना मनपसंत आहे का. असे सच्चे स्नेही बना तरच निरंतर योगी, सहज योगी बनाल. जर स्नेही स्वरूपाला समान स्वरुपामध्ये परीवर्तन कराल तर ‘अमर भव’चे वरदान मिळेल आणि वियोगाला कायमसाठी निरोप मिळेल.

बोधवाक्य:-
स्वभाव इझी आणि पुरुषार्थ अटेंशनवाला बनवा.

आपल्या शक्तिशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

जसे बीजामध्ये संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो, तसेच संकल्प रुपी बिजामध्ये संपूर्ण वृक्षाचा विस्तार सामावून जाईल तेव्हाच संकल्पांची गडबड समाप्त होईल. जसे आजकाल दुनियेमध्ये राजकारणाची गडबड, वस्तूंच्या किमती मधील गडबड, करन्सीची गडबड, कर्मभोगाची गडबड, धर्माची गडबड... वाढत चालली आहे. या सर्व गडबडींपासून स्वतःला आणि बाकीच्या सर्वांना वाचविण्यासाठी मन-बुद्धी एकाग्र करण्याचा अभ्यास करताना सकाश देण्याची सेवा करत रहा.