31-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पुण्यात्मा बनायचे असेल तर आपला पोतामेल बघा की काही पाप तर होत नाही ना, सत्याचे खाते जमा आहे?”

प्रश्न:-
सर्वात मोठे पाप कोणते आहे?

उत्तर:-
कोणावरही वाईट (विकारी) दृष्टी ठेवणे - हे सर्वात मोठे पाप आहे. तुम्ही पुण्यात्मा बनणारी मुले कोणावरही वाईट दृष्टी (विकारी दृष्टी) ठेवू शकत नाही. तपासून बघा की, आपण कितपत योगामध्ये राहतो? काही पाप तर करत नाही ना? श्रेष्ठ पद मिळवायचे असेल तर काळजी घ्या की जरा सुद्धा कु-दृष्टी (विकारी दृष्टी) नसावी. बाबा जी श्रीमत देतात त्यानुसार पूर्णपणे चालत रहा.

गीत:-
मुखडा देख ले प्राणी...

ओम शांती।
बेहदचे बाबा आपल्या मुलांना सांगत आहेत - ‘मुलांनो, आपल्या स्वतःमध्ये जरा तपासून पहा. हे तर मनुष्यांना माहिती असते की आपण पूर्ण जीवनभरात किती पाप केले आणि किती पुण्य केले आहे. दररोज आपला हिशोब तपासा - किती पापे आणि किती पुण्य केले आहे? कोणाला दुःखी तर केले नाही ना? प्रत्येक मनुष्य समजू शकतो - आपण आयुष्यामध्ये काय-काय केले आहे? किती पाप, किती दान-पुण्य वगैरे केले आहे? मनुष्य तीर्थयात्रेला जातात तेव्हा दान-पुण्य करतात. पाप होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. तर बाबा मुलांनाच विचारतात - किती पापे केली आहेत, किती पुण्य केले आहे? आता तुम्हा मुलांना पुण्यात्मा बनायचे आहे. कोणतेही पाप करायचे नाही. पाप देखील अनेक प्रकारचे असते. कोणावर वाईट दृष्टी गेली तर हे देखील पाप आहे. वाईट दृष्टी असतेच विकाराची. ती आहे सर्वात वाईट. कधीही विकारी दृष्टी जाता कामा नये. जास्त करून पती-पत्नीची दृष्टी तर विकाराचीच असते. कुमार-कुमारींची देखील कुठे ना कुठे विकारी दृष्टी दिसून येते. आता बाबा म्हणतात - ही विकारी दृष्टी असता कामा नये, नाही तर तुम्हाला माकड म्हणावे लागेल. नारदाचे उदाहरण आहे ना. म्हणाला - ‘मी लक्ष्मीला वरू शकतो’! तुम्ही देखील म्हणता ना, आम्ही तर लक्ष्मीला वरणार. नारी पासून लक्ष्मी, नरा पासून नारायण बनाल. बाबा म्हणतात - आपल्या मनाला विचारा की आपण कितपत पुण्य-आत्मा बनलो आहोत? कोणते पाप तर करत नाही ना? योगामध्ये कितपत राहतो?

तुम्ही मुले बाबांना ओळखता म्हणूनच तर इथे बसला आहात. दुनियेतील मनुष्य थोडेच बाबांना ओळखतील की हे बापदादा आहेत? तुम्ही मुले तर जाणता परमपिता परमात्मा ब्रह्मामध्ये प्रवेश करून आम्हाला अविनाशी ज्ञान रत्नांचा खजिना देत आहेत. मनुष्यांकडे असते विनाशी संपत्ती. तीच दान करतात, ते तर आहेत दगड. ही आहेत ज्ञानाची रत्ने. ज्ञानसागर बाबांकडेच रत्ने आहेत. हे एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे. रत्नाकर बाबांकडून ज्ञान-रत्न धारण करायची आहेत आणि मग या रत्नांचे दान करायचे आहे. जितके जे घेतील आणि देतील, तितके उच्च पद मिळवतील. तर बाबा समजावून सांगत आहेत - आपल्या स्वतःमध्ये डोकावून पहा की, आपण किती पापे केली आहेत? आता कोणते पाप तर होत नाही ना? जरा सुद्धा कु-दृष्टी असू नये. बाबा जी श्रीमत देतात त्यानुसार पूर्णपणे चालत रहाण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. भले मायेची वादळे येतील, परंतु कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करायचे नाही. कोणाची कु-दृष्टी असेल तर त्याच्यासमोर उभे देखील राहता कामा नये. लगेच तिथून निघून गेले पाहिजे. लक्षात येते की यांची कु-दृष्टी आहे. जर उच्च पद प्राप्त करायचे असेल तर खूप सावध रहायचे आहे. कु-दृष्टी असेल तर मग लुळे-पांगळे लंगडे बनाल. बाबा जे श्रीमत देतात, त्याप्रमाणे चालायचे आहे. बाबांना मुलेच ओळखू शकतात. समजा बाबा कुठे गेले तर ती मुलेच समजतील की बापदादा आले आहेत. इतरही पुष्कळ लोक बघतात परंतु त्यांना थोडेच माहित आहे. कोणी विचारले जरी की हे कोण आहेत? तुम्ही बोला - बापदादा आहेत. बॅज तर सर्वांकडे असला पाहिजे. बोला, शिवबाबा आम्हाला या दादांच्या मार्फत अविनाशी रत्नांचे दान देतात. हे आहे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान). आत्मिक बाबा, सर्व आत्म्यांचे पिता बसून हे ज्ञान देत आहेत. शिव भगवानुवाच आहे, गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानुवाच असे चुकीचे लिहिले आहे. ज्ञान सागर, पतित-पावन शिवालाच म्हटले जाते. ज्ञानाद्वारेच सद्गती होते. ही आहेत अविनाशी ज्ञान रत्ने. सद्गती दाता एक बाबाच आहेत. हे सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजेत. आता मुले समजतात की आपण बाबांना ओळखतो आणि बाबा देखील समजतात की मी मुलांना ओळखतो. बाबा तर म्हणतील ना - ही सर्व माझी मुले आहेत, परंतु ओळखू शकत नाहीत. नशीबात असेल तर पुढे जाऊन ओळखतील. समजा हे बाबा (ब्रह्मा बाबा) कुठे जातात, कोणी विचारले की हे कोण आहेत? नक्कीच शुद्ध हेतूनेच विचारतील. याच शब्दात सांगा की, बापदादा आहेत. बेहदचे बाबा आहेत निराकार. ते जोपर्यंत साकारमध्ये येत नाहीत तोपर्यंत बाबांकडून वारसा कसा मिळेल? तर शिवबाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा दत्तक घेऊन वारसा देतात. हे प्रजापिता ब्रह्मा आणि हे बी. के. आहेत. शिकवणारे ज्ञानाचा सागर आहेत. त्यांच्याकडूनच वारसा मिळतो. हे ब्रह्मा देखील शिकत आहेत. हे ब्राह्मणापासून मग देवता बनणार आहेत. समजावून सांगणे किती सोपे आहे. कोणालाही बॅजवरून समजावून सांगणे चांगले आहे. बोला, बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची विकर्म नष्ट होतील. पावन बनून पावन दुनियेमध्ये निघून जाल. हे पतित-पावन बाबा आहेत ना. आपण पुरुषार्थ करत आहोत पावन बनण्यासाठी. जेव्हा विनाशाची वेळ येईल तेव्हा आपला अभ्यास पूर्ण होईल. समजावून सांगणे किती सोपे आहे. कोणीही कुठे येतात-जातात तेव्हा देखील बॅज सोबत असला पाहिजे. या बॅजसोबत मग एक छोटेसे पत्रक सुद्धा असले पाहिजे. त्यामध्ये असे लिहिले पाहिजे की, बाबा भारतात येऊन पुन्हा आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन करत आहेत. बाकीचे सर्व अनेक धर्म या महाभारत युद्धाद्वारे कल्पापूर्वी प्रमाणे ड्रामा प्लॅन अनुसार नष्ट होतील. अशी २-४ लाख पत्रके छापलेली असली पाहिजेत, म्हणजे कोणालाही पत्रक देता येईल. वरती त्रिमूर्ती असावा, दुसऱ्या बाजूला सेवाकेन्द्राचा पत्ता असावा. मुलांचे पूर्ण दिवस सेवे विषयी विचार चालले पाहिजेत.

मुलांनी गाणे ऐकले - रोज बसून आपला पोतामेल (हिशोब) काढला पाहिजे की आज पूर्ण दिवस माझी अवस्था कशी होती? बाबांनी असे खूप लोक बघितले आहेत जे रोज रात्री बसून पूर्ण दिवसाचा हिशोब लिहितात. तपासतात - काही वाईट काम तर केले नाही? सर्व काही लिहितात. समजतात की, चांगली जीवन कहाणी लिहिलेली असेल तर मागचे देखील वाचून असे शिकतील. असे लिहिणाऱ्या व्यक्ती चांगल्याच असतात. विकारी तर सर्व असतातच. इथे काही ती गोष्ट नाहीये. तुम्ही आपला पोतामेल रोज बघा. मग बाबांकडे पाठवून दिला पाहिजे म्हणजे मग चांगली उन्नती होईल आणि भिती देखील राहील. सर्व स्पष्टपणे लिहिले पाहिजे - ‘आज माझी वाईट दृष्टी गेली, असे झाले…’ जे एकमेकांना दुःख देतात त्यांना बाबा कपटी म्हणतात. जन्म-जन्मांतरीची पापे तुमच्या डोक्यावर आहेत. आता तुम्हाला आठवणीच्या शक्तीने पापांचे ओझे उतरवायचे आहे त्यामुळे रोज बघितले पाहिजे मी पूर्ण दिवसभरामध्ये कोणाला दुःख तर दिले नाही ना? त्यामुळे पाप बनते. बाबा म्हणतात, मुलांनो, कोणालाही दुःख देऊ नका. स्वतःची पूर्ण तपासणी करा की, मी किती पापे केली आहेत, किती पुण्य केले आहे? जो कोणी भेटेल त्या सर्वांना हाच मार्ग सांगायचा आहे. सर्वांना अतिशय प्रेमाने सांगा, बाबांची आठवण करायची आहे आणि पवित्र बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे. भले तुम्ही संगमावर आहात परंतु हे रावणराज्य आहे ना? या मायावी विषय वैतरणी नदी मध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बनायचे आहे. कमळाचे फूल खूप मुला-बाळावाले असते. तरीसुद्धा पाण्यापासून वरती राहते. गृहस्थी आहे, खूप गोष्टी पैदा करते. हा दृष्टांत तुमच्यासाठी देखील आहे, विकारांपासून अलिप्त रहा. हा एक जन्म पवित्र रहा म्हणजे मग हे अविनाशी होईल. तुम्हाला बाबा अविनाशी ज्ञान रत्ने देतात. बाकी तर सगळे आहेत दगड. ते लोक तर भक्तीच्याच गोष्टी ऐकवतात. ज्ञान सागर पतित-पावन तर एकच आहेत, तर अशा बाबांवर मुलांचे किती प्रेम असले पाहिजे. बाबांचे मुलांवर, मुलांचे बाबांवर प्रेम असते. इतर कोणाशीही संबंध नाही. सावत्र ते आहेत जे बाबांच्या मतानुसार पूर्णपणे चालत नाहीत. रावणाच्या मतानुसार चालतात तर रामाचे मत थोडेच राहिले. अर्धा कल्प आहे रावण संप्रदाय म्हणून हिला भ्रष्टाचारी दुनिया म्हटले जाते. आता इतर सर्वांना सोडून एका बाबांच्या मतानुसार तुम्हाला चालायचे आहे. बी.के. चे मत मिळाले तरीही त्याची देखील तपासणी करायची असते की, हे मत योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्हा मुलांना योग्य आणि अयोग्यची समज देखील आता मिळाली आहे. जेव्हा राइटियस (नीतिमान बाबा) येतील तेव्हाच योग्य आणि अयोग्य विषयी सांगतील. बाबा म्हणतात - तुम्ही अर्धा कल्प ही भक्तीमार्गाची शास्त्रे ऐकली आहेत, आता मी तुम्हाला जे काही ऐकवतो, तर हे बरोबर आहे की ते बरोबर आहे? ते (दुनियावाले) म्हणतात - ‘ईश्वर सर्वव्यापी आहे’, मी सांगतो - ‘मी तर तुमचा पिता आहे’. आता ठरवा कोण बरोबर आहे? हे देखील मुलांनाच समजावून सांगितले जाते ना, जेव्हा ब्राह्मण बनतील तेव्हा समजतील. रावण संप्रदाय तर फार मोठा आहे, तुम्ही तर फार थोडे आहात. त्यामध्ये देखील नंबरवार आहेत. जर कोणाची कु-दृष्टी असेल, तरीही त्याला रावण संप्रदाय म्हटले जाईल. राम संप्रदायाचा तेव्हा समजले जाईल जेव्हा पूर्ण दृष्टी बदलून दैवी बनेल. आपल्या अवस्थेवरून प्रत्येकजण समजू तर शकतात ना. आधी तर ज्ञान काही नव्हते, आता बाबांनी मार्ग सांगितला आहे. तर बघायचे आहे अविनाशी ज्ञान रत्नांचे दान करत रहातो का? भक्त लोक दान करतात विनाशी धनाचे. आता तुम्हाला दान करायचे अविनाशी धनाचे, विनाशी धनाचे नाही. जर विनाशी धन असेल तर अलौकिक सेवेमध्ये लावत जा. पतिताला दान केल्याने पतितच बनता. आता तुम्ही आपले धन दान करता तर त्याचा परतावा मग २१ जन्मांसाठी नवीन दुनियेमध्ये मिळतो. या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. बाबा सेवेच्या युक्त्या देखील सांगत राहतात. सर्वांवर दया करा. गायन देखील आहे परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत. परंतु अर्थ समजत नाहीत. परमात्म्यालाच सर्वव्यापी म्हटले आहे. तर मुलांना सेवेचा खूप चांगला छंद बाळगायचा आहे. दुसऱ्यांचे कल्याण कराल तर आपले देखील कल्याण होईल. दिवसेंदिवस बाबा खूप सोपे करत जातात. हे त्रिमूर्तीचे चित्र तर खूप चांगली गोष्ट आहे. यामध्ये शिवबाबा देखील आहेत, मग प्रजापिता ब्रह्मा देखील आहेत. प्रजापिता ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारींद्वारा भारतामध्ये पुन्हा १०० टक्के पवित्रता-सुख-शांतीचे दैवी राज्य स्थापन करत आहेत. बाकीचे अनेक धर्म या महाभारत युद्धामुळे कल्पापूर्वीप्रमाणे नष्ट होतील. अशा प्रकारे पत्रके छापून वाटली पाहिजेत. बाबा किती सोपा मार्ग सांगतात. प्रदर्शनीमध्ये सुद्धा पत्रके द्या. पत्रकाद्वारे समजावून सांगणे सोपे आहे. जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे. नव्या दुनियेची स्थापना होत आहे. एक आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. बाकी हे सर्व कल्पापूर्वीप्रमाणे नष्ट होतील. कुठेही गेलात तरी नेहमी खिशात देखील पत्रके आणि बॅजेस ठेवून द्या. सेकंदात जीवनमुक्ती गायली गेली आहे. तुम्ही बोला, हे आहेत बाबा, हे दादा. त्या बाबांची आठवण केल्याने हे सतयुगी देवता पद मिळवाल. जुन्या दुनियेचा विनाश, नवीन दुनियेची स्थापना, विष्णूपुरी नव्या दुनियेमध्ये मग यांचे राज्य असेल. किती सोपे आहे. तीर्थयात्रा इत्यादी ठिकाणी मनुष्य जातात, किती त्रास सहन करतात. आर्य समाजाचे देखील ट्रेनच्या ट्रेन भरून जातात. याला म्हटले जाते धर्मामुळे भटकणे, खरेतर आहे अधर्मामुळे भटकणे. धर्मामध्ये काही भटकण्याची गरजच नसते. तुम्ही तर शिक्षण घेत आहात. भक्ती मार्गामध्ये मनुष्य काय-काय करत असतात!

मुलांनी गाण्यामध्ये सुद्धा ऐकले की, ‘मुखडा देख…’ हा मुखडा (चेहरा) तुमच्या शिवाय तर कोणी पाहू शकत नाही. भगवंताला देखील तुम्ही दाखवू शकता. या आहेत ज्ञानाच्या गोष्टी. तुम्ही मनुष्यापासून देवता, पाप आत्म्यापासून पुण्य-आत्मा बनता. दुनिया अशा गोष्टींना अजिबात जाणत नाही. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक कसे बनले हे कोणालाच माहित नाही आहे. तुम्ही मुले तर सर्व काही जाणता. कोणाच्या बुद्धीला बाण लागेल तर बेडा (जीवन रुपी नाव) पार जाईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जर विनाशी धन असेल तर त्याला सफल करण्यासाठी अलौकिक सेवेमध्ये लावायचे आहे. अविनाशी धनाचे दान देखील जरूर करायचे आहे.

२) आपल्या पोतामेलमध्ये बघायचे आहे की, माझी अवस्था कशी आहे? पूर्ण दिवसभरामध्ये कोणते वाईट काम तर होत नाही ना? एकमेकांना दुःख तर देत नाही ना? कोणावर कु-दृष्टी तर जात नाही ना?

वरदान:-
डबल लाईट बनून सर्व समस्यांना उंच उडी मारून पार करणारे तीव्र पुरुषार्थी भव

नेहमी स्वतःला अमूल्य रत्न समजून बापदादांच्या हृदयाच्या डबीमध्ये रहा अर्थात सदैव बाबांच्या आठवणीमध्ये सामावून रहा तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण भासणार नाही, सर्व ओझी संपून जातील. याच सहजयोगाद्वारे डबल लाईट बनून, पुरुषार्थामध्ये उंच उडी मारून तीव्र पुरुषार्थी बनाल. जेव्हा कधी कोणत्या समस्येचा अनुभव आला तर बाबांच्या समोर बसा आणि बापदादांच्या वरदानाचा हात स्वतःवर अनुभव करा. यामुळे सेकंदामध्ये सर्व समस्यांचे उत्तर मिळेल.

बोधवाक्य:-
सहयोगाची शक्ती असंभवला संभव बनविते. हाच सुरक्षेचा किल्ला आहे.

आपल्या शक्तीशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

वेळेनुसार चहू बाजूंना सकाश देण्याचे, व्हायब्रेशन्स देण्याचे, मनसा द्वारे वायुमंडळ बनविण्याचे काम करायचे आहे. आता याच सेवेची आवश्यकता आहे. जसे साकार रूपामध्ये बघितले - कोणतीही अशी प्रसंगाची वेळ जेव्हा येत असे, तेव्हा रात्रं-दिवस सकाश देण्याकडे, निर्बलांमध्ये शक्ती भरण्याकडे लक्ष दिले जात होते. वेळ काढून आत्म्यांना सकाश देण्याची सेवा चालत असे. असे फॉलो फादर करा.